Skip to main content

तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी रविवार, 01/11/2015 18:50 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले…. त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच… उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते… सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो. ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल… चला तर मग !
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 57304
प्रतिक्रिया 316

प्रतिक्रिया

In reply to by सालस

नम्र स्वभाव-अभ्या
हाय मै मर जावा. हि नम्रता कायम माझ्यासोबत राहो. आणि खरे तरः ____त हाय बे कोण आसंल ती आसंल. काय खाऊ घालून दमलीय का?

In reply to by सालस

अय्या!!!! एक महिने वय असूनपण बरेच स्वभाव पकडलेत तुम्ही! तुमची बोलवती धनीण कोण बरे? =))

In reply to by टवाळ कार्टा

+११११११ हे बरीक मान्य करावंच लागेल. सगळे आयडी मिपा चालवतात. जगन्नाथाचा गाड़ा आहे हा प्रत्येकाचा हात लागला आहे.

आज्ञाधारक आणि हुशार! लोल! धन्यवाद! आवडणारे आयडी - व्यक्तिमत्त्व या अर्थाने - अनेक आहेत. पण चित्रविचित्र आयडीनामं हा एक लय आवडणारा प्रकार आहे. केशवसुमार हा आयडी वाचून फिस्कन् हसलो होतो. सूड वाचून काहीतरी भयानक चित्र उभं राहिलं होतं, पण प्रत्यक्षातला माणूस एकदम माइल्ड आहे. परवा नाना स्कॉच आयडी वाचून अशीच करमणूक झाली.

टका बिका कॅजॅस्पा सोन्याबापू...... आणि नाखु त्यांच्या प्रतिसादातील शब्दामुळे। eg गृहसंसारी नाखु(स ) ..... अत्रुप्त-स्मायलीरत्न...... पिलीयन रायडर... नाना स्काॅच... पाटील हो ... बोका ए आझम...

माझे आवडते आयडी: ह्यांच्या क्रमाचा कमीजास्तं मैत्री वगैरेशी कुठलाही संबंध नाही. १. कॅप्टन जॅक स्पॅरो: स्वतःच्या आयडीवर लैचं जास्तं प्रेम असल्याने. २. टवाळ कार्टा: हे कार्ट प्रत्यक्षात भेटल्यानंतर भयानकचं शांत आणि सज्जन असल्याचं लक्षात आलं. ३. मोदकः भयानक उत्साही माणुस आहे हा. सायकलिंग काय, ट्रिपा काय, बुलेटप्रेम काय. ४. कपिलमुनी: मिपावर जी काही जेन्युईन लोकं भेटली त्यातला हा एक नग. खादाडी हा म्युचुअल गुण असल्याने आणि बोंबलत भटकणे हा छंद असल्याने खुप चांगला मित्रं झाला. ५. बॅट्या: हा मणुष्य मणुष्य णसुन पुस्तकं खाणारा राक्षस आहे. असंख्य रेफरन्सेस ह्याच्याकडे असे तयार असतात. शिवाय ह्याचा आयडी आमच्या आवडत्या बॅटम्यानाशी संबंधित असल्याने मैत्री फ्याक्टर चांगला जमलायं. ६. वल्ली: मिपावर मैत्री झालेल्या लोकांपैकी अजुन एक जेन्युइन व्यक्ती. सुरुवातीला मला वल्लीबुवा भयानक आखडु आणि खडुस वाटायचे पण ते तसे नाहित हे परिचय वाढत गेल्यावर लक्षात आलं. ह्यांचा आणि माझा म्युच्युअल बकरा म्हणुन बुवा असल्याने आमचं चांगलं जमतं. ते लेण्याबिण्यांमधलं काही शष्प कळत नसल्याने त्याला पास. ७.नाखुनःह्यांच्यासमहेचंहोचुकुन्कधीदोन्शब्दांमधेअंतर्सोडतीलतर्शपथ्काकाभयानकविनोदीआहेत्समोरच्याचीखेचणंआणिशालजोडीतलेदेणंहेह्यांचेआणिमाझेम्युचुअलछंदअसल्यानेहेभयानकवडतातशिवायामच्याशीअमच्यावयाएवढंलहानहोउनसुद्धाबोलतात. ८. अत्रुप्तः हे आमचे मित्र जेवढं छान लिहितात तेवढेचं एक व्यक्ती म्हणुनही चांगले आहेत. ह्यांना कितीही त्रास दिला तरी फार फार तर दोन बुक्क्या हाणुन गप्पं बसतील आणि लगेचं पुढचे उपद्व्याप करायला पुढे सरकतील. ९. सूडः हा मनुष्य लिहायच्या बाबतीत भयानक आळशी आहे. पण जेव्हा कधी लिहितो ना तेव्हा "कट्यार काळजात घुसली" चा फिल येतो. शिवाय ह्यांनी रिसेंटली बाजीरावाचे ट्रेलर बघुन कानामधे भिकबाळी घातलेली असल्याने अमचा अवडता अयडीआहे. १०. डॉक्टर सुबोध खरे: Doctors Job is assumed to be limited well within room ह्या माझ्या समजाला तडा घालवणारे पहिले गृहस्थ. नौदलामधे डॉक्टर असल्याने ह्यांचे अनुभव वाचणं हि मेजवानी असते. एक-दोनदा त्यांच्याशी फोनवर बोलणंही झालयं. युनिकॉर्नप्रेमी असल्याने आमच्या दोघांमधे किमान एक मुद्दा तरी कॉमन निघाला शेवटी =)) ११. एक्काकाका उर्फ डॉ. सुहास म्हात्रे: अतिशय डाउन टु अर्थ व्यक्तीमत्व. कधीही बोलत असतील तेव्हा अगदी अगत्याने बोलतील. त्यांचे प्रवासाचे लेखं भयानक आवडतात. लेफ्ट हँड मर्सिडिझ स्वप्न्सुंदरी जब्बर आहे त्यांची :) १२. सोन्याबापु: सॅल्युट सोल्जर...बॉस!! माझ्याकडे शब्द नाहित. एकदा भेटायचं आहे बस्सं. १३. रंगाण्णा बिंगफोडे जोशी: =)) माणुस किती नम्र असावा (का नसावा) ह्याचं उत्तम उदाहरण. मिपावर वाचनमात्रं होतो तेव्हापासुन रंगाण्णांनी कोणाशीही वाद घातल्याचं आठवतं नाही. एक मिपासंवादांमधलं माझं आणि त्यांची एक असहमती सोडली तर बाकी कसलाही वाद नाहित. मिपावरची विकीपेडिया असा पुरस्कार ह्यांना द्यावा अशी मागणी मी येथे करतो. १४. यशोधरा/ हिमोधरा: ह्या तै सखाराम गटण्याच्या सख्ख्या तै आहेत म्हणे. दिलं पुस्तकं की खा...दिलं पुस्तकं की खा. वाचन, वेगवेगळ्या पुस्तकांची मेलामेली वगैरे उद्योगांमुळे अवडता आयडी आहे. शिवाय प्रवास आणि ट्रेक्स हा हि म्युचुअल लैक्स चा भाग असल्याने सुद्धा असावं. हौडी यशोतै? १५. स्रुजा: सेम अ‍ॅज यशोधरा...पुस्तक आवड आणि इन जनरल खफ वरती गडबडगंमत करण्यामधे आघाडीवर असल्याने अवडता आयडी असु शकेल. शिवाय व्यनिय गप्पांमधुन अधुन मधुन प्रोफेशनल डिस्कशनही होत असतं तिच्याशी. =)) १४. सानिकास्वप्निल आणि स्वातीदिनेश: त्यांच्या रेसिपीज, पदार्थ सजवायची पद्धत, पदार्थाचं कलात्मक सादरीकरणं कसं करावं ह्याचं उत्तम उदाहरण (चुकुन उदरभरण लिहिणार होतो :P) १५. रेवाक्का: चिंग्याच्या गोष्टी भयानक आवडतात हो तुमच्या. अगदी मी लहानपणी माझ्या आयशीला कसं पिडत असेन ह्याचं अगदी चित्रं डोळ्यासमोर उभं रहातं तुमच्याशी गप्पा मारताना. बाकी आय सपोर्ट चिंग्या बरं का. =)) १६. आदूबाळः झॅक माणुस है ह्यो. कंदी बी गफ्फा हाणा चार नव्या गोष्टी शिकिवणार बगा तुमान्सी. मागे मला काही रेफरन्सेस दिलेले त्याचा मला भरपुर फायदा झालेला. १७. अद्द्या: हे आमचे कानडीअप्पा त्यांच्या लेखांमुळे आणि इतर गप्पांमुळे आमचे मित्रं बनलेत. १८. पैसातै: :) :) :) :)!!! ह्यांच्या घरी झेंडु बाम, अम्रुतांजन, अ‍ॅस्परिन वगैरेंचा खप वाढवायला मी कारणीभुत ठरलो आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे =)). ह्यांना संपादन असु द्या, वादग्रस्तं मुद्द्यांवर घातलेल्या वादावर त्यांच्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर घातलेला वाद असु द्या. त्या कायमपणे समजुतदार भुमिका घेत आलेल्या आहेत. बाकी त्यांनी काजुबिजुची पाकिटं वगैरे आणायचं प्रॉमिस दिलेलं आहे बरं का रे होतकरु पुणेकरांनो. तेवढं चहाचं बघा. =)) बाकी मामलेदार, खटपट्या, पेठकर काका, मंद्या, प्यारे१, वेल्लाभट, सूड्क्या, सगा ह्या आयडींचा नामोल्लेख एका वेगळ्या प्रतिसादामधुन देइनचं. आत्ता एवढचं सांगतो. थँक्स मित्रांनो...यु आर बेस्ट अ‍ॅट व्हॉट यु डु. !!!!

In reply to by सूड

आपण नुसती अश्वासनं देता. प्रतेक्ष भेटीमधे चुना आणि बायप्रोडक्ट्स फासुन मिस्टर इंडिया होता असा आण्भव आहे.

लय मिपाकर आवडतात. वल्ली ऊर्फ प्रचेतस: फॉर ऑब्व्हिअस रीझन्स. लेणी-मंदिरे-शिल्पकला-रामायण-महाभारत-सातवाहन अशा नानाविध विषयांचा निव्वळ एन्सायक्लोपीडिया. माहितीचा महासागर आणि नवीन माहिती मिळवण्यास परमोत्सुक. अत्रुप्तः हे ग्रुहस्थ वडण्याचेही कारण ब्व्हियस आहे. यांच्या पाचक कविता, रोचक स्मायल्या आणि खोचक इडंबने आणि प्रांजळपणा याकरिता. पण सध्या यांचेवर दोन कारणांसाठी नाराज होत हेही सांगणे अवश्यमेव आहे. ती कारणे खालीलप्रमाणे: १. यांनी त्यांच्या चाहत्यांच्या जगात म्हांला अजूण स्थाण दिलेले नाही. २. "मी माझा तर माझा कुणाचा" या कवी सूर्यकांत खोकले लिखित प्रसिद्ध काव्यसंग्रहाची प्रत अजूनही म्हांला दिलेली नाही. सतिश गावडे: सायकॉलॉजिकल अ‍ॅनॅलिसिस केल्यामुळे बहुतेक गोष्टींकडे पाहण्याचा एक ब्यालन्स्ड दृष्टिकोन असतो त्याकरिता. सूड & प्रगो: तर्कशुद्ध मुद्दा नेटाने आणि कुणाची भीडभाड न बाळगता मांडणे याकरिता. अभ्या: कलाकार तर आहेच, शिवाय व्यक्तिचित्रणाची हातोटीही विलक्षण आहे. एवढे सगळे असूनही पाय जमिनीवरच आहेत. पन्नास फक्तः एकदम दिलखुलास व्यक्तिमत्त्व, शिवाय पट्टीचे खाद्यरसिक. डॉ. सुहास म्हात्रे: उच्चविद्याविभूषित आणि उच्चपदस्थ असूनही "मी माझे मला" चा पाढा न वाचणारे. आणि जबराट प्रवासवर्णने लिहिणारे. (हीच मेन ओळख होती अगोदर) खास साहित्यिक चर्चेकरिता आदूबाळ आणि नंदनला तोड नाही. ( गटण्याचे आत्मवृत्त नेमके नंदननेच लिहावे हा योगायोग नक्कीच नाही. आदूबाळही तसा अंमळ छुपा रुस्तुम आहे. चित्रगुप्त आणि चौराकाका हे दोघे तरुणांपेक्षाही तरुण आहेत. कॅप्टन जॅक स्पॅरो: यंत्रोपवीत या लेखमालेकरिता आणि बाकी अनुभवांकरिता मान गये. अन्या दातारः अस्सल कोल्लापुरी. सोन्याबापू: त्यांची ती सैनिकी प्रशिक्षणवाली लेखमाला वाचून त्यांचे एकदम गरगरा फिरणारे फ्यान झालेलो आहोत. आतिवासः यांना बाकी काही न बोलता एकदा भेटून नमस्कार करावयाचा आहे फक्त. कारण ऑब्व्हियस आहे. प्रभाकर पेठकरः आखाती प्रदेशात गेली अनेक वर्षे मोठ्या हिंमतीने हॉटेल चालवणार्‍या या उद्योजकास आपला कडक सलाम. मालोजीरावः मुख्यतः ऐतिहासिक चर्चेसाठी. साती आणि अजया यांच्या अनुभवकथनाचाही मोठा फॅन क्लब आहे इथे. यशोधरा यांचे हिमालयाख्यान विशेष आवडते. जेव्हा मी बोटीवर होतो जेव्हा काश्मीरला गेलो तेव्हा त्याच्याशी पूर्णपणे रिलेट होता आले. बाकी जुन्या जाणत्यांमध्ये गवि, रामदास, पिवळे डांबिसकाका, विसोबा खेचर, परा, टार्झन, बिका, शरदिनी, भडकमकर मास्तर, इ.इ. अनेक लोक्स आहेत. नावे घेऊ तरी कितीजणांची? काही नजरेतून सुटून गेली असतील तरी माफ करणे. नंतर लक्षात येतील तसतशी लिहीनच.

In reply to by बॅटमॅन

नाखुनकाकांचे नाव विसरलो कसे!!!! देवामलामाफकर. नाखुकाका म्हणजे विनोदप्रेमी आणि अतिशय खंबीर व्यक्तिमत्त्व. त्यांच्यापासून कुणालाही बरेच काही शिकण्याजोगे आहे.

प्रत्यक्ष न भेटलेले लिहायचे आहेत का? एक्काकाका म्हणजे डॉ. सुहास म्हात्रे. आणि अतिवास ताई. ...... आणि माईसाहेब!! ;-)

बादवे, या निमित्ताने मिपावरच्या नावडत्या आयडींचीही यादी करा. (स्वगत : नारायण, नारायण..! ;-) )

पटकन लक्षात येणारे माझे आवडते आयडी म्हणजे क्लिंटन, टारझन, परा, रामदास, नगरीनिरंजन, चतुरंग, रेवती, प्रभाकर पेठकर, गवि, मुवि, बॅटमन, इस्पिकचा एक्का, डॉ. सुबोध खरे - आवडण्याचे एकमेव कारण म्हणजे हे सर्वजण अतिशय प्रामाणिकपणे लिहितात आणि स्पष्टपणे लिहितात, असे मला वाटते. कंपूबाजीत भाग घेत नाहीत. कधीही कमरेखाली वार करत नाहीत. (टार्‍याला जरा माफ करू या बाबतीत) :) गणपाच्या रेसिपीज आवडतात. तात्यानी लिहिलेली व्यक्तीचित्रे छान असत. स्वॅप्स यांची फोटोग्राफीची मालिका आणि इस्पिकचा एक्का यांचे प्रवासवर्णन म्हणजे अप्रतिम. मी व्यक्तिश: एकाही मिपाकराला भेटलेलो नाही आणि भेटायची शक्यताही नाही. त्यामुळे माझे मत केवळ आंतरजालाच्या वाचनावर आधारित आहे आणि त्यामुळे अनबायस्ड आहे, असे माझे मत आहे, (जे अर्थातच चुकीचेही असू शकेल.) :)

बिहारमधे निवडणुका चालु आहेत तशा इथेही पण वाटते! परवा अरुणकाका म्हणलेच मिपा म्हनजे जंगलराज आहे म्हणून. काय योगायोग आहे!! धागाकर्ते कोनच्या पार्टीत म्हणायचे? आणा लाल रंगाचे डब्बे. लावा फ्लेक्श. रंगारी कैक मिळतील इथे. पळवा मतपेट्या. बंदुकी घेऊन फिरा लेकाहो. चालु दे धमाल!!

In reply to by स्टुपिड

नावाच्या मागं अल्ट्रासुपरएलिट असा शब्दं लाउन घ्या. त्यासाठी पैसा किंवा प्रचेतस ह्यांना संपर्क करु शकता.ठँज्क्यु!!

मी इथे चांगले लिहायला वाचायला येतो. कधीतरी चांगले वाचायला मिळते. नाही असे नाही. तेव्हा जे चांगले लिहितात ते आयडी मला आवडतात. लिखाण सोडून इतर गोष्टीत मला इंटरेस्ट नाही. आणि इतर हजारों वाचकांनाही नसेल.

भेटलेले टाळायचेत ना? भेटलेले बरेच आवडते आय डी निघतील! जनसंपर्क प्रमुख- पैसाताई मुवि किस्से - डाॅ खरे कंजूस काकांचे ट्रेकचे किस्से रेवाक्का! माहिती - नूलकर ज्यांचे नाव दिसताच लेख प्रतिसाद वाचला जातो असे मिपाभूषण विद्वान - बॅट्या वल्ली डाॅ म्हात्रे गॅरी ट्रुमन मानस शास्त्रीय लिखाण - प्रगो ,त्यातले सगाचे प्रतिसाद जेटमाउलीचे प्रतिसाद कथा - जव्हेरगंज चुकलामाकला आदूबाळ बहुगुणी कविता- विशाल प्राची अश्विनी मिसळलेला काव्यप्रेमी सूडची तारा दगडवाल्या बाईंना टेम्पुत बसवलेली कविता अत्रुप्त गुर्जींचे कुटुंब ;) बोका ए आझम त्याच्या भाषाप्रभुत्वासाठी सानिकास्वप्निल स्वातीताई सुगरणी मधुरा देशपांडे भटकंतीसाठी, रसग्रहण करावं तर मितानने टका तर लाडकाच!! खरं तर अनेक निघतील.मिपा जनांचा प्रवाह आहे.सदस्य येत असतात.रागावून रूसून जात असतात.भांडणं होतात. कंपू होतात.मिपाला शिव्या घातल्या जातात.पण तरी मिपा वाचलं जातंच.कधीतरी काहीतरी मस्त प्रतिसाद येतो,सुरेख लेख येतो.आपल्याला नेहमी राग येणारा आय डी लिहिणारा असतो.त्या क्षणी त्याचं कौतुक करताना आपण खरे मिपाकर असतो.एका कुटुंबातले.चालायचंच घर घर की कहानी म्हणून सोडून देणारे !!

वसुबारसे पूर्वी यावा ह्यात काही "जोगा योग " आहे काय? आता मूळ मुद्दा : बर्याच आय डींच्या लिखाणातून प्रतिसादातून एक प्रतिमा (स्वभाव विषेश ) मनात तयार होतात कधी कधी प्रत्यक्ष भेटून त्यातील स्वभाव कंगोरे आणि प्रावीण्य विषय समजतात पुढे भेटी गाठींंनी सूर आण़खी जुळतात. मी मिपावर लिहिते होण्याचा मान वल्लींकडेच जातो आणि निर्भीड लेखणासाठी बुवांचा कायम स्नेह-पाठींबा आहेच. कप्तानाने आणी बॅटोबा ने सांगीतलेले तंततोत सहमत (फक्त माझ्याबद्दलचा भाग सोडून). कप्तान , प्रगो यांचा जीवनाकडे पाहण्याचा तार्कीक आणि सुस्पष्ट दृष्टीकोण प्रचंड भारावून टाकतो. ( बरेचदा अगदी पन्नाशीत येईपर्यंत आपण हे काय (आणि का) करतो आणि पुढे काय करावचे तेच माहीत नसते.) त्याच्याबद्दल केवळ पंचवि शी- तीशीत फोक्स्ड असणे फार मोठी गोष्ट आहे.(प्राधीकरणात गेल्यावर कप्तानाला आणि पिंपरीत गेल्यावर वल्लीदांना न भेटता येणे झाले तर चुटपुट लागते इतका स्नेह त्यांनी दिला आहे) बॅट्या खजिन्याचे भांडार आहे पण तो गूगल म्हणजे माहीतीचे सर्च इंजीन नसून कुठली माहीती कुठे वापरायची याचे तारतम्य असलेला कसलेला खेळाडू आहे आणि इतीहास धांडोळ्यासाठी "व्यासंग"(थोडा वेडच असलेला इसम आहे याची ) खात्री होती आणि ती प्रत्यक्ष भेटीत खरी ठरली.किंबहुना त्याचे भाषेवरचे प्रभुत्व "पांडीत्य" न राहता त्याने सगळ्यांना समजेल अश्या भाषेत (प्रतिसादातून) पोहोचवले आहेच, पण स्वतंत्र लिखाणाचा आळस असल्याने त्याचे धागे फारसे दिसत नाही.(इतीहासातील आम्हाला माहीत नसलेला भाग त्याने लेखमालेद्वारे लिहावा ही विनंती) माझ्याही पेक्षा सम्रुद्ध अनुभव विश्व असलेले आणी खडतर परीस्थीतीशी सामना करून जिद्दीने भरारी यशस्वी व्यक्तीमत्वे मिपावर आहेत. त्या सर्व ज्ञात अज्ञात आयडींच्या लिखाणाचा,प्रतीसादांचा वैयक्तीक आयुष्यात नवी उमेद आणि मानसीक बळ देण्यास महत्वाचा भाग होता आणि असेलही. कारण आय्डीची नावे काहीही असू देत, त्या नावामागची माणसे अस्सल आहेत आणि त्यांच्या (गुणदोषांसहीत) ती मिपाकर आहेत इतकेच माझ्यासाठी पुरेसे आहे.

काहींना आवर्जून भेटायचे आहे त्यात प्रा.डॉ,पैसा ताई आणि आदूबाळ ,सोन्या बापू,सुबोध खरे,बोका-ए-आझम,अभ्या..,जेपी, विशालदा,चुकलामाकला, पैजारबुवा ई प्रामुख्याने.

लिहिताना कुठे आणी कसं थांबाव हे रामदास काका,बोका-ए-आझम इ च्या लिखाणात कळते. बाकी टक्या,खटपट्या आणि इरसाल यांच्याशीही भेटायचे आहेच.

In reply to by टवाळ कार्टा

कारण सांगत बसू नकोस ! शनिवारी ये ! कुठ जायचा काय करायचा ते आल्यवर ठरवू ( आणि पाताळेश्वरला नेणार नाही, त्यामुळे नक्की ये )

In reply to by कपिलमुनी

रात्रीच्या मुक्कामाची सोय कुठे? तिकडे दुसरे घर (अथवा घरोबा ;)) अस्ते तर प्रश्नच नव्हता...या शन्वारीतरी नै जम्णार

आधी मिपा-जनका वंदावे तात्या अभंकरांसि स्मरावे विसोबा खेचर नावे 'रोशनी' देती झमझम पुढे स्तवन अनेकांचे जुन्या-नव्या मिपावंतांचे लेखकु-प्रतिसादकु-वाचकांचे केले पाहिजे बात्मन वल्ली चौरा म्हणो नयेत ऐरा-गैरा परि संक्षिंचा 'औरा' भल्या-भल्यांसि हतप्रभ करी एक्का पैसा आणि बोका प्यारे प्रगो तोषविती लोका ओक-नाडि र्‍हदय ठोका चुकवी भल्या-भल्यांचा राँर्बर्ट-जीवन नित्य स्मरावे मोकलाया दिशेकडे दुरी जावे कवि सुरेचचंद्रासि वंदावे म्हणिजे बरें आणखी असती बहुत उल्लेखिले किंचित हिमनगाचे टोक वर्ते दिसत खालते पर्वत विशाळ

बरेच आहेत.. लेखनप्रतिभेसाठी .. गवि रामदास विसोबाखेचर संपन्न अनुभवविश्व शेअर करण्यासाठी.. पेठकरकाका डॉ सुबोध खरे अतिवास विविधतापूर्ण पाककृतींसाठी .. सानिकास्वप्निल गणपा.. पुन्ह पेठकरकाका विचारातील स्पष्टता, निर्भीडपणा, मोकळेपणा.. बॅटमॅन स्वॅप्स घासुगुर्जी आदिती बिका श्रीरंग जोशी सूड साती राही आनंदीगोपाळ पैसा मोदक विकास क्लिंटन उर्फ ट्रुमन आणि हो.. वादग्रस्त संक्षीदेखिल..

In reply to by बाळ सप्रे

काही आयडी राहून गेले.. वरचे काही प्रतिसाद वाचून आठवले.. आणखीही काही असतील.. अभ्या अत्रुप्त भडकमकरमास्तर पिडां तिमा परा

माझे आवडते आयड़ि (लेखन) batman (प्रत्यक्ष भेटलोय) , पिलियन रायडर, डॉ म्हात्रे (इ. एक्का)(प्रत्यक्ष भेटलोय) , डॉ बिरुटे, अजया, अतिवास, बोका ए आझम , गवि, पद्मावति ----------------------------- माझे आवडते आयड़ि (प्रतिक्रिया) batman, पिलियन रायडर, डॉ म्हात्रे (इ. एक्का), डॉ बिरुटे, कन्फ़ुस्ड अकौ, स्वाप्स, सगा(प्रत्यक्ष भेटलोय) , कपिलमुनी

In reply to by पगला गजोधर

गजोधर. उत्तरपत्रिका जमा करा. वेळ संपलाय. पुरवणी मिळणार नाही आता. ;) . भय्या हळू अन हलके घ्यायचे बर्का.

In reply to by पगला गजोधर

@अभ्या (आम्हाला कमीतकमी २ -३ पुरवण्या लागायच्या, आजूबाजूचे खूप रागाने बघायचे … पण काय करणार … )

आयला! सध्या मिपावर येणे फारसे जमत नाहीये. दंगा वगैरे तर इतिहासजमा झालं आहे. लेखनही नाहीच सध्या फारसे. पण तरीही, माझे नाव आल्याचे वाचून अंमळ हळवा झालो आणि जुन्या स्मृती चाळवल्या. सर्वांना धन्यवाद _/\_ इथे बर्‍याच जुन्या आयडींचे उल्लेख आलेले आहेत. धागाकर्त्याला आयडीमागचा माणूस अपेक्षित आहे की आयडीचे नाव ते कळले नाही. मिपावर आजवर अनेकानेक अप्रतिम आयडी नावे आलेली आहेत. सगळीच लक्षात नाहीत. पण मिपा गाजवणारे आणि आयडी अत्यंत कल्पक असणारे असे काही जे आहेत त्यात 'पिवळा डांबिस' ऊर्फ पिडांकाका हे एक अचाट व्यक्तिमत्त्व आहे. केवळ आयडीच नव्हे तर आयडीमागचा माणूसही माझा मित्र झाला याचा खरंच अभिमान वाटतो. बाकी रोचक आयडीनावे म्हणाल तर आमचा धम्या ऊर्फ धमाल मुलगा आहे. भडकमकर मास्तर आहेत. बॅटमॅन आहे. आजानुकर्ण आहे. चतुरंग आहे. केसु ऊर्फ केशवसुमार आहे. ३_१४ विक्षिप्त अदिती आहे. ढब्बू पैसा आहे. टार्‍या ऊर्फ टारझन ऊर्फ कुबडा खवीस आहे. सर्किट हा असाच अजून एक. एके काळी मिसळभोक्ताने खळबळ उडवली होती. धम्मकलाडू हे एक प्रकरण होते (आहे. ;) ). चिंतातूर जंतू आहेच. परिकथेतील राजकुमार ऊर्फ़ परा हा एक पापग्रह आमच्या कुंडलीत आला तो मिपामुळेच. मकी ऊर्फ़ मस्त कलंदर आल्या आल्याच लोकप्रिय झाली. लीमाउजेट इथेच भेटली. स्पा ऊर्फ़ स्पावड्या इथे आला आणि सुधारला. सामान्यांपेक्षा दसपटीने बुद्धीमान असलेला अर्धवट ऊर्फ़ अर्ध्या इथे आहे. खर्‍या आयुष्यात पैसा नाही मिळाला पण पैसाताई इथे भेटली. ब्रिटिश असे नाव धारण केलेला पण अस्सल आगरी बाला इथे आहे. तसाच ब्रिटिश टिंग्याही आहे. बुद्धीमान नाना चेंगटने मिपा गाजवले. रमताराम इथेच भेटला. सखाराम गटणे ऊर्फ़ चार काड्यावाला विकास आता दिसत नाही. एक बाकरवडीही होती. टार्‍याशी पंगा घेतला आणि नाहीशी झाली. विनायक पाचलग ऊर्फ़ कोल्हापुरी दादा ऊर्फ़ कोदा अजूनही संपर्कात आहे, पण मिपावर नाही. उत्तम लेखन करणारी पुष्करिणी. कवितांचा वेडा मेघवेडा. किती किती नावं घेऊ... विचित्र वाटणारे पण पटकन आठवतील असे अजूनही खूप आयडी आहेत. (या निमित्ताने सर्व आयडींची लिस्ट कुठे मिळेल असा विचार मनात आला. :( ) बाकी, मिपावर डूआयडीची पिलावळ कधी सुरू झाली असे धाग्यात म्हणले आहे. याचे उत्तर सोपे आहे... ज्या दिवशी मिपा सुरू झाले त्याच दिवशी. रम्य होता तो काळ. पहिल्या पाच पन्नासातच ढीगभर डू आयडी असतील. ;) मिपावरील डुआयडी आणि त्यांचे चाळे यावर अनेकानेक प्रतिसाद लिहिता येतील. जरा विदा गोळा करावा लागेल. डु आयडी वरून आठवले. निनादने गुंडोपंत हे एक व्यक्तिमत्त्व उभे केले होते आणि अनेक वर्षे अनेक संस्थळांवर यशस्वीरीत्या चालवलेही होते. शेवटी कंटाळा आला म्हणून त्यानेच जाहीर करून टाकले.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

बिकांच्या प्रतिसादाला मम म्हणते. अनेक आयडी आवडले आणि त्यानंतर कट्ट्यांमधे भेटले, ओळखी झाल्या आणि आज हे सारे आमचे मित्रमंडळ आहे. मिपाने मला काय दिले असे कधी कुणी विचारले तर हे मिपावरच मित्रमंडळ असच उत्तर पहिल असेल. वरच्या नावांमधे अ‍ॅडीशन्स डॉन्या उर्फ छोटा डॉन फॉर बाकी शून्य आणि खूप सारा दंगा आणि मेगाबायटी खरडी!!!! मितान , अर्धवट(अर्ध्या)- काव्यवाचन/प्रवासवर्णन्/बालकथा मिसळलेला काव्यप्रेमी, विशाल(दा) कुल्कर्णी य दोघांच्या कवितांची मी पंखी आहे. मिपाबल्लव गणपा, कोटीभास्कर नंदन, अजया, स्रुजा, पिरा, आणि सविता००१, भावना कल्लोळ, सानिकास्वप्नील, मृणालिनी, स्वाती दिनेश, स्वाती२ ताई आणि नॉट टु मेंशन बिका, विमो, श्रामो असे अनेक आयडी माझे मित्र मैत्रिणी असल्याच भाग्य फक्त मिपामुळे लाभल. :)

In reply to by प्रीत-मोहर

येस्स... हे सगळे आहेतच. नावं येऊ द्या एक एक. डॉन्याच्या मेगाबायटी खरडी आणि प्रतिसाद. नंदन लिंकाळे. मितानचे अनुभव. बाकी अर्ध्या बालकथा लिहित होता हे वाचून तो देखील सदेह स्वर्गाला जाईल गो! ;)

In reply to by बिपिन कार्यकर्ते

=)) अर्ध्याच बाकीबाब प्रेम आणि काव्यवाचन :) पण आता त्यालाही त्याच्या बालाला कथा सांगाव्या लागतातच की

In reply to by बिपिन कार्यकर्ते

पुपे, घाटपांडे काका, स्मिता.,(हीला हाळी घालावी लागतेय....) चैतन्य दिक्षीत, मनोबा, कितीतरी नाव आहेत. अपडेट करत राहित आठवतात तशी. मनोबा आणि मी एकाच कुंप्णीत काम करत होतो. ४ महिने एकमेकांसमोर असुन ओळखलो नव्हतो =)) लपुन छपुन मिपा मिपा खेळयचो. एके दिवशी दिसल मिपा याच्या स्क्रीनवर. मग झाली ओळख.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

धागाकर्त्याला आयडीमागचा माणूस अपेक्षित आहे की आयडीचे नाव ते कळले नाही. हे अगदी बरोबर लिहिले. मीसुद्धा कन्फ्युज्ड असल्याने लिहिले नाही.