✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

तुम्हाला मिपावरचा कुठला आयडी आवडतो आणि का?

म
माम्लेदारचा पन्खा यांनी
Sun, 11/01/2015 - 18:50  ·  लेख
लेख
आजपर्यंत मिपावर हजारो आयडी आले आणि गेले असतील…. काही या भाऊगर्दीतही टिकून (की टिच्चून ???) राहिले…. त्यातले बरेचसे प्रामाणिक, पारदर्शक आणि मनापासून विचारप्रवाह मांडणारे आहेत. डू आयडीची पिल्लावळ नक्की कधी सुरु झाली ते माहित नाही पण हळू हळू मिपाच्या घरातल्या माणसांपेक्षा चपलांचे जोड वाढू लागले. मतमतांतराचा भाग आपसूकच मिपावर येतो. आयडी बरोबरच एक व्यक्तिमत्वही आलेच … त्या आयडीच्या नावामागे (खर्या आणि डू आयडी सुद्धा) एक मन असते… विचार असतात… काही ना काही ध्येयही असते… असे वेगवेगळे आयडी वाचल्यावर मनात कुठले न कुठले विचार उमटतातच… उदाहरणार्थ : आदूबाळ म्हटले की डोळ्यासमोर एक आज्ञाधारक, हुशार आणि चुणचुणीत व्यक्तिमत्व उभे राहते… सतीश गावडे म्हटले की एक प्रामाणिक आणि सरळ माणसाची प्रतिमा दिसते …. अभ्या म्हटले की एक खूप जिवलग आणि अडीअडचणीला धावून येणारा मित्र भेटल्यासारखे वाटते… सगळ्यांचे विचार आणि स्वभाव आयडीवरून ओळखता येतातच असे नाही, पण बर्याच वेळा हे आपण अंदाजाने सांगू शकतो. ही उदाहरणे वानगीदाखल आहेत …असे कितीतरी आयडी तुमच्याही मनात काहीतरी विचार उत्पन्न करीत असतीलच… तर तुम्हाला कुठला आयडी आवडतो आणि का ते थोडक्यात सांगू शकाल का ? कुठलीही चिखलफेक किंवा वैयक्तिक आरोप न करता निखळपणे विचार मांडावेत ही विनंती …व्यक्तिश: भेटलेली व्यक्ती शक्यतो टाळा कारण त्या आयडीचा मूळ स्वभाव बराचसा माहित झालेला असतो. ज्या आयडीबद्दल ते मत व्यक्त केलेले असेल त्या आयडीने (तो अस्तित्वात असल्यास) ते अंदाज बरोबर की चूक हेही सांगितल्यास मजा येईल… चला तर मग !
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
ज्योतिष
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
57029 वाचन

💬 प्रतिसाद (316)

प्रतिक्रिया

धन्यवाद ! म्हणजे आम्ही पण

उगा काहितरीच
Mon, 11/02/2015 - 17:38 नवीन
धन्यवाद ! म्हणजे आम्ही पण आहोत तर थोडेफार प्रसिद्ध . (रच्याकने त्याच काय आहे ना मी जेव्हा नवीन नवीन आलो होतो मिपावर एकापेक्षा एक नावाजलेले आयडी होते इथे, सो डायरेक्ट 'तुमचा लेख आवडला नाही' असे लिहायची छाती व्हायची नाही. सो 'लेख आमच्या आयडीप्रमाणे वाटला' असे लिहीण्यासाठी हा आयडीप्रपंच ! ) रच्याकने , मिपावरील चांगले आयडी म्हणजे चांगले २-३ पानाची लिस्ट होईल ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

हा..हा..

चांदणे संदीप
Mon, 11/02/2015 - 18:33 नवीन
धन्यवाद उ.का. हलके घेतल्याबद्दल!
मिपावरील चांगले आयडी म्हणजे चांगले २-३ पानाची लिस्ट होईल ;-)
ह्याच्याशी दणकून सहमत! Sandy
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

हा नियमात बसतो का नाही माहित नाही

पीके
Sun, 11/01/2015 - 20:48 नवीन
यकु... का ते विचारू नका.
  • Log in or register to post comments

माझे आवडते आयडी

बोका-ए-आझम
Sun, 11/01/2015 - 21:08 नवीन
मामलेदारचा पंखा - मी स्वतःच मामलेदार मिसळीचा फुलस्पीड पंखा आहे, पण तिला आयडीत स्थान देऊन कट्ट्याचा मसालेदार पंचनामा लिहिणाऱ्या मापंचा पण मी फ्यान आहे. रामदास - बस्, नामही काफी है!काटेकोरांटीच्या फुलांसारखं लेखन होणे नाही! मुक्त विहारी - उर्फ नंदी पॅलेसचे अर्धे मालक उर्फ कट्टा डाॅन. सोन्याबापू - रगडोत्तम भारती बापूसाहेब! गवि - वातावरण निर्मिती - मग ती गव्हाणी घुबडांच्या घराची असो, MH370 च्या लेखाची असो, ब्राऊ आणि वाड्याची असो, टोलनाक्याची असो किंवा पुरेपूर कोल्हापूर आणि पाॅप टेट्सच्या कट्ट्याची असो - गविभाऊ दोन ओळीत एखाद्या दिग्दर्शकासारखं वातावरण उभं करतात. स्क्रीनप्ले लिहा गविभाऊ. कल्ला कराल! स्वॅप्स (आता एस)- मी जर नेट धरून एखादी लेखमालिका पूर्ण केली असेल, तर त्याचं श्रेय हे स्वॅप्सभाऊंनाच. क्लिंटन (आता गॅरी ट्रूमन) - राजकारण, अर्थकारण, इतिहास म्हणजे क्लिंटन. Peerless. बॅटमॅन - वाल्गुदस्वामी, लिहा हो काहीतरी. अभ्या - व्यक्तिचित्रं काढावीत तर अभ्याभाऊंनीच. माझीच एक आधी दिलेली प्रतिक्रिया इथे देतो - लेखणीचा चित्रकार आणि कुंचल्याचा कवी! नाद खुळा - सत्कारबहाद्दर, स्पेसबारकर्दनकाळ नाखु!
  • Log in or register to post comments

एक जाहीर आवाहन

चांदणे संदीप
Sun, 11/01/2015 - 21:19 नवीन
हा वरचा श्री बोका-ए-आझम यांचा प्रतिसाद पाहून माझ्याकडून काहीतरी राहून गेल्यासारख वाटतय, म्हणून यापुढे या धाग्यावर जे काही चांगले प्रतिसाद येतील (आयडी संदर्भात) त्याला माझा डिट्टो/कॉपी अस समाजाव! बोका-ए-आझम यांच्याबद्दल काय बोलाव? आफताब-ए-मिपा आहेत ते! धन्यवाद! Sandy
  • Log in or register to post comments

आतिवास, रामदास, बॅटमन, गवि,

सुहास झेले
Sun, 11/01/2015 - 21:23 नवीन
आतिवास, रामदास, बॅटमन, गवि, वल्लीशेठ, गणपा... खूप मोठी लिस्ट आहे राव :)
  • Log in or register to post comments

सगळे शरदिनीला विसरले का ?

अजया
Sun, 11/01/2015 - 21:27 नवीन
सगळे शरदिनीला विसरले का ? माझ्या अत्यंत आवडीचा आय डी आणि व्यवसाय बंधु/ भगिनी. ;) असले आय डी मला हल्ली भलतेच आवडायला लागले आहेत. ( कंपूची कृपा. दुसरे काय !!)
  • Log in or register to post comments

रामदास का ते सांगायला नकोच.

रातराणी
Sun, 11/01/2015 - 21:45 नवीन
रामदास का ते सांगायला नकोच. त्यांनी लिहलेल काही वाचलं की आपण लिहायच्या फंदात नाही पडलं पाहिजे याची जाणीव होते. :) कथांमधे जव्हेरगंज,अभ्या.., कवितांमध्ये शिव कन्या,विशालदा,चुकलामाकला, 3ए,गणेशा, पैजारबुवा, मिसळलेला काव्यप्रेमी. खुसखुशीत लेखनात स्नेहांकिता, संदीप चांदणे.
  • Log in or register to post comments

माझ्या आवडत्या आयडी म्हणजे

सुबोध खरे
Sun, 11/01/2015 - 21:46 नवीन
माझ्या आवडत्या आयडी म्हणजे फुलथ्रोटल जीनियस, हितेश, दादा दरेकर, आणी आणि …. जशा आठवतील तशा टंकतो. यांच्या शिवाय बरेचसे धागे शंभरी सुद्धा गाठू शकले नसते आणी यांच्या हातभाराशिवाय अनेक धागे वाचनमात्र सुद्धा झाले नसते. काय एक एक विद्वत्तापूर्ण विवेचन असे . गेले ते दिन गेले
  • Log in or register to post comments

दादूस आणि माई हल्ली का दिसत

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 22:17 नवीन
दादूस आणि माई हल्ली का दिसत नाहीत? काय झालंय नक्की?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

माझे आवडते आय डी

सालस
Sun, 11/01/2015 - 22:07 नवीन
माझे आवडते आय डी नम्र भाषा- प्रगो नम्र स्वभाव-अभ्या अत्यंत विश्वासू वाटणारे -प्रचेतस किसन शिंदे ही संपादक द्वयी उगाच सुंदर वाटणार्‍या -गौरी लेले अत्यंत प्रेमळ -प्यारे विडंबन जात शृंगार यांच्या लेखणीला काही वर्ज्य नाहीच अशा स्त्री नाही.. महान स्त्री -कोमल आवड्ते आय डी नाव-अग्यावेताळ सगळ्यात आवडता डु आयडी -संपादक मंडळ! हु एल्स ! दहा बारा जण तरी वापरत असतील एक आय डी ;) कृ ह घे.
  • Log in or register to post comments

नम्र भाषा- प्रगो

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 22:23 नवीन
नम्र भाषा- प्रगो अत्यंत प्रेमळ -प्यारे हं!!! धन्यवाद!!! हे तर आम्हां सातारकरांचं वैशिष्ट्य आहे. समजलं नसेल तर जाऊ देत!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालस

अत्यंत प्रेमळ -प्यारे हं!!!

बॅटमॅन
Sun, 11/01/2015 - 23:41 नवीन
अत्यंत प्रेमळ -प्यारे हं!!! धन्यवाद!!!
ओक्के प्यारेकाका आपलं मांत्रिककाका!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

अरे मी मांत्रिक नाही. गैरसमज

प्यारे१
Mon, 11/02/2015 - 00:01 नवीन
अरे मी मांत्रिक नाही. गैरसमज झालेला दिसतो. माझा मिपावर फ़क्त प्यारे१ हा एकच आयडी आहे. pacificready वाचनमात्र होण्यासाठी घेतला होता दीड वर्षापूर्वी. तो वापरत नाही. भगवान कसम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

का एवढे मनाला लावून घेतोयस

अभ्या..
Mon, 11/02/2015 - 00:04 नवीन
का एवढे मनाला लावून घेतोयस बाबा. डूआयडी असणं म्हणजे एवढा काही गंभीर अपराध नाही. चालू दे. त्यासाठी भगवानाला कशाला ओढतोस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

अरे पण मांत्रिक माझा आयडी

प्यारे१
Mon, 11/02/2015 - 00:14 नवीन
अरे पण मांत्रिक माझा आयडी नसताना मी का स्वीकारु? कोण आहे मला माहिती नाही पण अतिशय हुशार व्यक्ति आहे. मांत्रिक इज मांत्रिक. परवा खफ वर गाण्यातली नावं मी पहिल्यांदा वाचली. ज्या गाण्याचे रागाचे रेफरंसेस त्यांनी दिले ते माझ्यासाठी अतिशय नवीन आहेत. अनेक इंग्रजी आणि हिन्दुस्तानी नावं सुद्धा पहिल्यांदा वाचली. he must get his due credit boss....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

+११११११

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 00:16 नवीन
हो ना. त्यातही डुआयडी जर कंपूतला असला तर त्याला डुआयडी म्हणणे हेच पाप होते जणू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

अग्दी अग्दी

टवाळ कार्टा
Mon, 11/02/2015 - 01:29 नवीन
अग्दी अग्दी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगो बाई सालस का?

प्यारे१
Sun, 11/01/2015 - 22:52 नवीन
अगो बाई सालस का? तू ये तुला फुकट देईन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालस

नक्की काय विकता आपण? =))

टवाळ कार्टा
Sun, 11/01/2015 - 22:54 नवीन
नक्की काय विकता आपण? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सगळं आहे. ;)

प्यारे१
Sun, 11/01/2015 - 23:15 नवीन
सगळं आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नम्र स्वभाव-अभ्या

अभ्या..
Sun, 11/01/2015 - 23:48 नवीन
नम्र स्वभाव-अभ्या
हाय मै मर जावा. हि नम्रता कायम माझ्यासोबत राहो. आणि खरे तरः ____त हाय बे कोण आसंल ती आसंल. काय खाऊ घालून दमलीय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालस

अय्या!!!!

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 00:59 नवीन
अय्या!!!! एक महिने वय असूनपण बरेच स्वभाव पकडलेत तुम्ही! तुमची बोलवती धनीण कोण बरे? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालस

उगाच सुंदर वाटणार्‍या -गौरी

गौरी लेले
Mon, 11/09/2015 - 18:51 नवीन
उगाच सुंदर वाटणार्‍या -गौरी लेले
इश्श , काहीही हां सालस ! आठवण ठेवल्याबद्दल धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सालस

बर्‍याच दिवसांनी दिसलात लेलीण

सूड
Mon, 11/09/2015 - 18:53 नवीन
बर्‍याच दिवसांनी दिसलात लेलीण का़कू, कशा आहात?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गौरी लेले

कहर....दंगा होणार इथे =))

टवाळ कार्टा
Sun, 11/01/2015 - 22:30 नवीन
कहर....दंगा होणार इथे =))
  • Log in or register to post comments

मग शंका है का?

मांत्रिक
Sun, 11/01/2015 - 22:32 नवीन
मग शंका है का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मला काही बोल्लात का ?

कहर
Wed, 11/04/2015 - 14:09 नवीन
मला काही बोल्लात का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मला सग्ळेच आयडी आवडतात

टवाळ कार्टा
Sun, 11/01/2015 - 22:35 नवीन
मला सग्ळेच आयडी आवडतात
  • Log in or register to post comments

+११११११

प्यारे१
Mon, 11/02/2015 - 00:26 नवीन
+११११११ हे बरीक मान्य करावंच लागेल. सगळे आयडी मिपा चालवतात. जगन्नाथाचा गाड़ा आहे हा प्रत्येकाचा हात लागला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

जीवन भाऊ त्यांच्या जीवनविषयक

धनावडे
Sun, 11/01/2015 - 22:40 नवीन
जीवन भाऊ त्यांच्या जीवनविषयक कथांमुळे
  • Log in or register to post comments

आज्ञाधारक आणि हुशार! लोल!

आदूबाळ
Sun, 11/01/2015 - 22:42 नवीन
आज्ञाधारक आणि हुशार! लोल! धन्यवाद! आवडणारे आयडी - व्यक्तिमत्त्व या अर्थाने - अनेक आहेत. पण चित्रविचित्र आयडीनामं हा एक लय आवडणारा प्रकार आहे. केशवसुमार हा आयडी वाचून फिस्कन् हसलो होतो. सूड वाचून काहीतरी भयानक चित्र उभं राहिलं होतं, पण प्रत्यक्षातला माणूस एकदम माइल्ड आहे. परवा नाना स्कॉच आयडी वाचून अशीच करमणूक झाली.
  • Log in or register to post comments

सूड आणि माईल्ड??? =))

टवाळ कार्टा
Sun, 11/01/2015 - 22:53 नवीन
सूड आणि माईल्ड??? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आदूबाळ

सूड आणि माईल्ड??? =))

सूड
Mon, 11/02/2015 - 15:28 नवीन
सूड आणि माईल्ड??? =))
टवाळ लोकांसमोर हातात छडी घेऊनच उभं राहावं लागतं!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

टका बिका कॅजॅस्पा सोन्याबापू.

लालगरूड
Sun, 11/01/2015 - 22:52 नवीन
टका बिका कॅजॅस्पा सोन्याबापू...... आणि नाखु त्यांच्या प्रतिसादातील शब्दामुळे। eg गृहसंसारी नाखु(स ) ..... अत्रुप्त-स्मायलीरत्न...... पिलीयन रायडर... नाना स्काॅच... पाटील हो ... बोका ए आझम...
  • Log in or register to post comments

माझे आवडते आयडी: ह्यांच्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 11/02/2015 - 00:04 नवीन
माझे आवडते आयडी: ह्यांच्या क्रमाचा कमीजास्तं मैत्री वगैरेशी कुठलाही संबंध नाही. १. कॅप्टन जॅक स्पॅरो: स्वतःच्या आयडीवर लैचं जास्तं प्रेम असल्याने. २. टवाळ कार्टा: हे कार्ट प्रत्यक्षात भेटल्यानंतर भयानकचं शांत आणि सज्जन असल्याचं लक्षात आलं. ३. मोदकः भयानक उत्साही माणुस आहे हा. सायकलिंग काय, ट्रिपा काय, बुलेटप्रेम काय. ४. कपिलमुनी: मिपावर जी काही जेन्युईन लोकं भेटली त्यातला हा एक नग. खादाडी हा म्युचुअल गुण असल्याने आणि बोंबलत भटकणे हा छंद असल्याने खुप चांगला मित्रं झाला. ५. बॅट्या: हा मणुष्य मणुष्य णसुन पुस्तकं खाणारा राक्षस आहे. असंख्य रेफरन्सेस ह्याच्याकडे असे तयार असतात. शिवाय ह्याचा आयडी आमच्या आवडत्या बॅटम्यानाशी संबंधित असल्याने मैत्री फ्याक्टर चांगला जमलायं. ६. वल्ली: मिपावर मैत्री झालेल्या लोकांपैकी अजुन एक जेन्युइन व्यक्ती. सुरुवातीला मला वल्लीबुवा भयानक आखडु आणि खडुस वाटायचे पण ते तसे नाहित हे परिचय वाढत गेल्यावर लक्षात आलं. ह्यांचा आणि माझा म्युच्युअल बकरा म्हणुन बुवा असल्याने आमचं चांगलं जमतं. ते लेण्याबिण्यांमधलं काही शष्प कळत नसल्याने त्याला पास. ७.नाखुनःह्यांच्यासमहेचंहोचुकुन्कधीदोन्शब्दांमधेअंतर्सोडतीलतर्शपथ्काकाभयानकविनोदीआहेत्समोरच्याचीखेचणंआणिशालजोडीतलेदेणंहेह्यांचेआणिमाझेम्युचुअलछंदअसल्यानेहेभयानकवडतातशिवायामच्याशीअमच्यावयाएवढंलहानहोउनसुद्धाबोलतात. ८. अत्रुप्तः हे आमचे मित्र जेवढं छान लिहितात तेवढेचं एक व्यक्ती म्हणुनही चांगले आहेत. ह्यांना कितीही त्रास दिला तरी फार फार तर दोन बुक्क्या हाणुन गप्पं बसतील आणि लगेचं पुढचे उपद्व्याप करायला पुढे सरकतील. ९. सूडः हा मनुष्य लिहायच्या बाबतीत भयानक आळशी आहे. पण जेव्हा कधी लिहितो ना तेव्हा "कट्यार काळजात घुसली" चा फिल येतो. शिवाय ह्यांनी रिसेंटली बाजीरावाचे ट्रेलर बघुन कानामधे भिकबाळी घातलेली असल्याने अमचा अवडता अयडीआहे. १०. डॉक्टर सुबोध खरे: Doctors Job is assumed to be limited well within room ह्या माझ्या समजाला तडा घालवणारे पहिले गृहस्थ. नौदलामधे डॉक्टर असल्याने ह्यांचे अनुभव वाचणं हि मेजवानी असते. एक-दोनदा त्यांच्याशी फोनवर बोलणंही झालयं. युनिकॉर्नप्रेमी असल्याने आमच्या दोघांमधे किमान एक मुद्दा तरी कॉमन निघाला शेवटी =)) ११. एक्काकाका उर्फ डॉ. सुहास म्हात्रे: अतिशय डाउन टु अर्थ व्यक्तीमत्व. कधीही बोलत असतील तेव्हा अगदी अगत्याने बोलतील. त्यांचे प्रवासाचे लेखं भयानक आवडतात. लेफ्ट हँड मर्सिडिझ स्वप्न्सुंदरी जब्बर आहे त्यांची :) १२. सोन्याबापु: सॅल्युट सोल्जर...बॉस!! माझ्याकडे शब्द नाहित. एकदा भेटायचं आहे बस्सं. १३. रंगाण्णा बिंगफोडे जोशी: =)) माणुस किती नम्र असावा (का नसावा) ह्याचं उत्तम उदाहरण. मिपावर वाचनमात्रं होतो तेव्हापासुन रंगाण्णांनी कोणाशीही वाद घातल्याचं आठवतं नाही. एक मिपासंवादांमधलं माझं आणि त्यांची एक असहमती सोडली तर बाकी कसलाही वाद नाहित. मिपावरची विकीपेडिया असा पुरस्कार ह्यांना द्यावा अशी मागणी मी येथे करतो. १४. यशोधरा/ हिमोधरा: ह्या तै सखाराम गटण्याच्या सख्ख्या तै आहेत म्हणे. दिलं पुस्तकं की खा...दिलं पुस्तकं की खा. वाचन, वेगवेगळ्या पुस्तकांची मेलामेली वगैरे उद्योगांमुळे अवडता आयडी आहे. शिवाय प्रवास आणि ट्रेक्स हा हि म्युचुअल लैक्स चा भाग असल्याने सुद्धा असावं. हौडी यशोतै? १५. स्रुजा: सेम अ‍ॅज यशोधरा...पुस्तक आवड आणि इन जनरल खफ वरती गडबडगंमत करण्यामधे आघाडीवर असल्याने अवडता आयडी असु शकेल. शिवाय व्यनिय गप्पांमधुन अधुन मधुन प्रोफेशनल डिस्कशनही होत असतं तिच्याशी. =)) १४. सानिकास्वप्निल आणि स्वातीदिनेश: त्यांच्या रेसिपीज, पदार्थ सजवायची पद्धत, पदार्थाचं कलात्मक सादरीकरणं कसं करावं ह्याचं उत्तम उदाहरण (चुकुन उदरभरण लिहिणार होतो :P) १५. रेवाक्का: चिंग्याच्या गोष्टी भयानक आवडतात हो तुमच्या. अगदी मी लहानपणी माझ्या आयशीला कसं पिडत असेन ह्याचं अगदी चित्रं डोळ्यासमोर उभं रहातं तुमच्याशी गप्पा मारताना. बाकी आय सपोर्ट चिंग्या बरं का. =)) १६. आदूबाळः झॅक माणुस है ह्यो. कंदी बी गफ्फा हाणा चार नव्या गोष्टी शिकिवणार बगा तुमान्सी. मागे मला काही रेफरन्सेस दिलेले त्याचा मला भरपुर फायदा झालेला. १७. अद्द्या: हे आमचे कानडीअप्पा त्यांच्या लेखांमुळे आणि इतर गप्पांमुळे आमचे मित्रं बनलेत. १८. पैसातै: :) :) :) :)!!! ह्यांच्या घरी झेंडु बाम, अम्रुतांजन, अ‍ॅस्परिन वगैरेंचा खप वाढवायला मी कारणीभुत ठरलो आहे ह्याचा मला सार्थ अभिमान आहे =)). ह्यांना संपादन असु द्या, वादग्रस्तं मुद्द्यांवर घातलेल्या वादावर त्यांच्याशी व्हॉट्सअ‍ॅपवर घातलेला वाद असु द्या. त्या कायमपणे समजुतदार भुमिका घेत आलेल्या आहेत. बाकी त्यांनी काजुबिजुची पाकिटं वगैरे आणायचं प्रॉमिस दिलेलं आहे बरं का रे होतकरु पुणेकरांनो. तेवढं चहाचं बघा. =)) बाकी मामलेदार, खटपट्या, पेठकर काका, मंद्या, प्यारे१, वेल्लाभट, सूड्क्या, सगा ह्या आयडींचा नामोल्लेख एका वेगळ्या प्रतिसादामधुन देइनचं. आत्ता एवढचं सांगतो. थँक्स मित्रांनो...यु आर बेस्ट अ‍ॅट व्हॉट यु डु. !!!!
  • Log in or register to post comments

+११११११११११

टवाळ कार्टा
Mon, 11/02/2015 - 01:30 नवीन
+११११११११११
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अक्ख्या प्रतिसादाशी सहमत..

चिगो
Mon, 11/02/2015 - 13:17 नवीन
+१०००००० अक्ख्या प्रतिसादाशी सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

भिकबाळीची झायरात केल्याने

सूड
Mon, 11/02/2015 - 19:38 नवीन
भिकबाळीची झायरात केल्याने पुढल्या भेटीत एक मस्तानी (शीतपेय) देण्यात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

आपण नुसती अश्वासनं देता.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 11/04/2015 - 07:17 नवीन
आपण नुसती अश्वासनं देता. प्रतेक्ष भेटीमधे चुना आणि बायप्रोडक्ट्स फासुन मिस्टर इंडिया होता असा आण्भव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+1111111111

रुस्तम
Tue, 11/10/2015 - 18:32 नवीन
+1111111111
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

लय मिपाकर आवडतात.

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 00:07 नवीन
लय मिपाकर आवडतात. वल्ली ऊर्फ प्रचेतस: फॉर ऑब्व्हिअस रीझन्स. लेणी-मंदिरे-शिल्पकला-रामायण-महाभारत-सातवाहन अशा नानाविध विषयांचा निव्वळ एन्सायक्लोपीडिया. माहितीचा महासागर आणि नवीन माहिती मिळवण्यास परमोत्सुक. अत्रुप्तः हे ग्रुहस्थ अवडण्याचेही कारण अब्व्हियस आहे. यांच्या पाचक कविता, रोचक स्मायल्या आणि खोचक इडंबने आणि प्रांजळपणा याकरिता. पण सध्या यांचेवर दोन कारणांसाठी नाराज अहोत हेही सांगणे अवश्यमेव आहे. ती कारणे खालीलप्रमाणे: १. यांनी त्यांच्या चाहत्यांच्या जगात अम्हांला अजूण स्थाण दिलेले नाही. २. "मी माझा तर माझा कुणाचा" या कवी सूर्यकांत खोकले लिखित प्रसिद्ध काव्यसंग्रहाची प्रत अजूनही अम्हांला दिलेली नाही. सतिश गावडे: सायकॉलॉजिकल अ‍ॅनॅलिसिस केल्यामुळे बहुतेक गोष्टींकडे पाहण्याचा एक ब्यालन्स्ड दृष्टिकोन असतो त्याकरिता. सूड & प्रगो: तर्कशुद्ध मुद्दा नेटाने आणि कुणाची भीडभाड न बाळगता मांडणे याकरिता. अभ्या: कलाकार तर आहेच, शिवाय व्यक्तिचित्रणाची हातोटीही विलक्षण आहे. एवढे सगळे असूनही पाय जमिनीवरच आहेत. पन्नास फक्तः एकदम दिलखुलास व्यक्तिमत्त्व, शिवाय पट्टीचे खाद्यरसिक. डॉ. सुहास म्हात्रे: उच्चविद्याविभूषित आणि उच्चपदस्थ असूनही "मी माझे मला" चा पाढा न वाचणारे. आणि जबराट प्रवासवर्णने लिहिणारे. (हीच मेन ओळख होती अगोदर) खास साहित्यिक चर्चेकरिता आदूबाळ आणि नंदनला तोड नाही. ( गटण्याचे आत्मवृत्त नेमके नंदननेच लिहावे हा योगायोग नक्कीच नाही. आदूबाळही तसा अंमळ छुपा रुस्तुम आहे. चित्रगुप्त आणि चौराकाका हे दोघे तरुणांपेक्षाही तरुण आहेत. कॅप्टन जॅक स्पॅरो: यंत्रोपवीत या लेखमालेकरिता आणि बाकी अनुभवांकरिता मान गये. अन्या दातारः अस्सल कोल्लापुरी. सोन्याबापू: त्यांची ती सैनिकी प्रशिक्षणवाली लेखमाला वाचून त्यांचे एकदम गरगरा फिरणारे फ्यान झालेलो आहोत. आतिवासः यांना बाकी काही न बोलता एकदा भेटून नमस्कार करावयाचा आहे फक्त. कारण ऑब्व्हियस आहे. प्रभाकर पेठकरः आखाती प्रदेशात गेली अनेक वर्षे मोठ्या हिंमतीने हॉटेल चालवणार्‍या या उद्योजकास आपला कडक सलाम. मालोजीरावः मुख्यतः ऐतिहासिक चर्चेसाठी. साती आणि अजया यांच्या अनुभवकथनाचाही मोठा फॅन क्लब आहे इथे. यशोधरा यांचे हिमालयाख्यान विशेष आवडते. जेव्हा मी बोटीवर होतो जेव्हा काश्मीरला गेलो तेव्हा त्याच्याशी पूर्णपणे रिलेट होता आले. बाकी जुन्या जाणत्यांमध्ये गवि, रामदास, पिवळे डांबिसकाका, विसोबा खेचर, परा, टार्झन, बिका, शरदिनी, भडकमकर मास्तर, इ.इ. अनेक लोक्स आहेत. नावे घेऊ तरी कितीजणांची? काही नजरेतून सुटून गेली असतील तरी माफ करणे. नंतर लक्षात येतील तसतशी लिहीनच.
  • Log in or register to post comments

नाखुनकाकांचे नाव विसरलो कसे!!

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 00:09 नवीन
नाखुनकाकांचे नाव विसरलो कसे!!!! देवामलामाफकर. नाखुकाका म्हणजे विनोदप्रेमी आणि अतिशय खंबीर व्यक्तिमत्त्व. त्यांच्यापासून कुणालाही बरेच काही शिकण्याजोगे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अद्द्या, श्रीरंगपंत जोशी,

बॅटमॅन
Mon, 11/02/2015 - 00:15 नवीन
अद्द्या, श्रीरंगपंत जोशी, क्लिंटन ऊर्फ ग्यारी ट्रूमन, टक्या यांची नावे विसरलो.
  • Log in or register to post comments

.

कवितानागेश
Mon, 11/02/2015 - 00:45 नवीन
प्रत्यक्ष न भेटलेले लिहायचे आहेत का? एक्काकाका म्हणजे डॉ. सुहास म्हात्रे. आणि अतिवास ताई. ...... आणि माईसाहेब!! ;-)
  • Log in or register to post comments

सूचना

एस
Mon, 11/02/2015 - 05:58 नवीन
बादवे, या निमित्ताने मिपावरच्या नावडत्या आयडींचीही यादी करा. (स्वगत : नारायण, नारायण..! ;-) )
  • Log in or register to post comments

Hya comment chi kadhipasun

कॅप्टन जॅक स्पॅरो
Mon, 11/02/2015 - 06:24 नवीन
Hya comment chi kadhipasun vaat pahatoy :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मी विडंबन पाडणार होतो यावर =)

टवाळ कार्टा
Mon, 11/02/2015 - 13:50 नवीन
मी विडंबन पाडणार होतो यावर =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

सुंदर सूचना

उपाशी बोका
Mon, 11/02/2015 - 07:16 नवीन
संपादकांचं काम कशाला वाढवताय? :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

आवडते आयडी

उपाशी बोका
Mon, 11/02/2015 - 07:14 नवीन
पटकन लक्षात येणारे माझे आवडते आयडी म्हणजे क्लिंटन, टारझन, परा, रामदास, नगरीनिरंजन, चतुरंग, रेवती, प्रभाकर पेठकर, गवि, मुवि, बॅटमन, इस्पिकचा एक्का, डॉ. सुबोध खरे - आवडण्याचे एकमेव कारण म्हणजे हे सर्वजण अतिशय प्रामाणिकपणे लिहितात आणि स्पष्टपणे लिहितात, असे मला वाटते. कंपूबाजीत भाग घेत नाहीत. कधीही कमरेखाली वार करत नाहीत. (टार्‍याला जरा माफ करू या बाबतीत) :) गणपाच्या रेसिपीज आवडतात. तात्यानी लिहिलेली व्यक्तीचित्रे छान असत. स्वॅप्स यांची फोटोग्राफीची मालिका आणि इस्पिकचा एक्का यांचे प्रवासवर्णन म्हणजे अप्रतिम. मी व्यक्तिश: एकाही मिपाकराला भेटलेलो नाही आणि भेटायची शक्यताही नाही. त्यामुळे माझे मत केवळ आंतरजालाच्या वाचनावर आधारित आहे आणि त्यामुळे अनबायस्ड आहे, असे माझे मत आहे, (जे अर्थातच चुकीचेही असू शकेल.) :)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा