✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

महाभारत व रामायणातील अतिशयोक्ती

ह
हेमंत लाटकर यांनी
Mon, 10/26/2015 - 17:36  ·  लेख
लेख
महाभारत व रामायण काळातील बर्याच गोष्टीत अतिशयोक्ती वाटते. 1. पराशर ऋषिनी सत्यवतीशी संबंध करूनही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. 2. पांडवाचा जन्म कुंतीने देवांना आवाहन केल्याने झाला. 3. जयद्रथाचा वध अर्जुनाने केला त्यावेळेस कृष्णाने सुर्याला सूदर्शन चक्राने झाकले. 4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली. 5. परशुरामाने बाणाने मारून समुद्र हटवून कोकण भुमी निर्माण केली. 6. कृष्णाच्या बाबतीतील अतिशयोक्ती. पुतना राक्षणीचा मृत्यू, कालिया मर्दन, गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे. 7. श्रीरामाने बाण मारून समुद्राची पातळी कमी करून सेतू बांधला. 8. रावणाला दहा तोंडे होती. 9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
40894 वाचन

💬 प्रतिसाद (169)

प्रतिक्रिया

तुमी जुसिंग करता, विपश्यनाही

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 13:49 नवीन
तुमी जुसिंग करता, विपश्यनाही केली आहे, मग तुम्हाला साधना करायचा अनुभव आहे हे नक्कि. आपण सश्रध नाही तरीही आपणास हटयोग अवश्य साध्य आहे. तो सुधा विपश्यनेप्रमाणे अभ्यासाने साध्य होणारा प्रवास आहे. इश्वर श्रध्देची नितांत आवश्यक्ता अजिबात नाही. जुसिंग अभ्यासाने जसे सिक्स पॅक बनवायचा आपला मानस आहे तसेच याला हटयोगाची जोड देउन आपण पुन्हा तरुण बनु शकता, व मग बनवलेल्या सिक्सपॅकचा वापर निव्वळ दर्शनापलिकडेही (तुम्हाला) होइल. अनायसे तुम्हाला साधनेची सवय आहेच त्याला आता हटयोगाची अवश्य जोद द्या, काळ, सवयी व वय आपणास नक्किच अनुकुल आहे. गंभिर्याने विचार करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हठयोग

चित्रगुप्त
Tue, 10/27/2015 - 16:17 नवीन
@ द - बाहुबली: हठयोगासाठी प्रेरित केल्याबद्दल आभारी आहे . योग्य वेळ आली, की तेही घडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: द-बाहुबली

मला मनःपुर्वक वाटते तुम्हाला

द-बाहुबली
Tue, 10/27/2015 - 17:28 नवीन
मला मनःपुर्वक वाटते तुम्हाला हे नक्कि जमु शकेल. धन्यवाद. (अन्यथा हटयोगाचे तव्तज्ञान पुरेसे न पटुन त्याचे वाभाडे निघणारा एक धागा तरी अवश्य प्रसेल, ज्याचे स्वागतच आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

काल घडलेली खरी घटना ब्रेकिंग

चित्रगुप्त
Tue, 10/27/2015 - 13:30 नवीन
काल घडलेली खरी घटना ब्रेकिंग न्यूज बनून आज विस्मरणात जाते, महाकाव्ये हजारो वर्षे टिकतात ती त्यातील कल्पनाविस्तारामुळे. उगाच तथाकथित वैज्ञानिक कसोट्या लावण्यची गरज नाही .
  • Log in or register to post comments

हाफशेंच्युरी निमीत्त लाटकर

जेपी
Tue, 10/27/2015 - 13:36 नवीन
हाफशेंच्युरी निमीत्त लाटकर सायबांचा सत्कार ,महाभारत आणी रामायणाची एक एक प्रत देऊन करण्यात येत आहे. शुभेच्छुक - जेपी आणी तमाम विस्तववादी कार्यकर्ते.
  • Log in or register to post comments

>>> महाभारत आणी रामायणाची एक

प्यारे१
Tue, 10/27/2015 - 13:43 नवीन
>>> महाभारत आणी रामायणाची एक एक प्रत कुठल्या लेखक आणि प्रकाशकाची ते पण नक्की करा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

विसू

नाखु
Tue, 10/27/2015 - 14:09 नवीन
विसू: दिलेल्या (आवृत्ती) प्रतीतील पात्रे आणि त्यांची माहीती इथेच तपासून घेणे नंतर कसलीही तक्रार चालणार नाही वा प्रत बदलून मिळणार नाही सचि(ड्)व सत्कार समीती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

कसलीहि अतिशयोक्ती वगेरे काही

तुडतुडी
Tue, 10/27/2015 - 14:25 नवीन
कसलीहि अतिशयोक्ती वगेरे काही नाही .कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणतात न तसंच आहे हे . दैवी शक्ती , मंत्र शक्ती जाणून घ्यायची किवा तिचा अनुभव घ्यायची आपली कुवत नसते . आपला त्या विषयातला तेवढा अभ्यास नसतो म्हणून मग अतिशयोक्ती वाटतं आणि आपण स्वताची तर फसवणूक करतोच पण लोकांचीही दिशाभूल करून रामायण , महाभारताबद्दल आणि एकूणच हिंदू अध्यात्माबद्दल गैरसमज पसरवायचं काम चोख बजावतो .
  • Log in or register to post comments

लाटकर जी धागा तुमच्या मागच्या धाग्यांशी तुलनेने विसंगत वाटला

मारवा
Tue, 10/27/2015 - 17:00 नवीन
लाटकर जी तुमचे मागचे धागे जे होते त्यात जे विचार व्यक्त झाले होते त्या सर्वांशी तुलना केली तर हा धागा सर्वथा वेगळा वाटतो. इतकं मोठ वैचारीक परीवर्तन इतक्या अल्पावधीत एकदम कोकिळाव्रता पासुन नियोगा पर्यंत ? हे कस काय ?
  • Log in or register to post comments

इतकं मोठ वैचारीक परीवर्तन इतक्या अल्पावधीत

होबासराव
Tue, 10/27/2015 - 17:04 नवीन
सतरंजी चोर दादु चा तर ह्यात हात नाहि ?
  • Log in or register to post comments

यात डावा हात असावा

मारवा
Tue, 10/27/2015 - 17:09 नवीन
यात डावा हात असावा एक जाहीरात आठवतेय जुनी एस्सेल वर्ल्ड ची भुलभुलैय्या मे खोया है पाटकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

@ तुडतुडी अतिशयोक्ती का नाही.

हेमंत लाटकर
Tue, 10/27/2015 - 17:45 नवीन
@ तुडतुडी अतिशयोक्ती का नाही. 1. सत्यवतीला लग्नाआधी व्यास झाले तरी ती कुमारी कशी राहील. 2. यम, वायू, इंद्र, अश्विनीकुमार या देवांपासून कुंती व माद्री या राण्यांना मुले झाली. 3. त्यावेळेस चंद्रग्रहण लागले असेल. 4. समुद्राची पातळी वाढल्यामुळे व्दारका बुडाली असावी. 5. भुकंपामुळे कोकण भागाची निर्मिती झाली असेल. 6. गोवर्धन पर्वत करंगळीवर उचलणे कसे शक्य आहे. 7. बाण मारून समुद्राची पातळी कशी कमी होईल. 8.रावणाला दहा तोंडे कशी असतील. 9 संजिवनी बुटी हिमालयात सापडते.
  • Log in or register to post comments

लाटकर जी माफ करा पण तुम्ही गंभीरतेने प्रश्न उपस्थित केला का?

मारवा
Tue, 10/27/2015 - 18:20 नवीन
लाटकर जी तुमच्या बदलत्या भुमिकांमुळे संभ्रम निर्माण होतो . विचार पुर्णपणे बदलण्यात काही म्हणजे काहीच गैर नाही पण इतक्या वेगाने कस हो तुमचा स्टॅन्ड बदलतो हे अनाकलनीय आहे थोडं. वरचा प्रतिसादातला विनोदाचा भाग सोडा पण तुम्ही खरचं सीरीयस आहात का धाग्याच्या विषयाशी ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

ज्या गोष्टी आपल्या विवेक

शब्दबम्बाळ
Tue, 10/27/2015 - 18:27 नवीन
ज्या गोष्टी आपल्या विवेक बुद्धीला योग्य वाटतात त्यांचे अनुकरण करावे किंवा विश्वास ठेवावा(अर्थात त्याने इतरांना काही त्रास होत नाही ना याचाही थोडा विचार व्हावा) , ज्या पटत नाहीत त्या तपासून पहाव्यात. तरीही नाहीच पटल्या तर सोडून द्याव्यात... आता महाभारत/रामायण वैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिले गेले आहे असे मला तरी वाटत नाही. त्यामुळे त्यांना कलात्मकतेच्या कसोटीवर न पाहता वैज्ञानिक कसोटीवर तोलणे गैर वाटते.
  • Log in or register to post comments

पराशर कडून सत्यवतीला

ऋतुराज चित्रे
Tue, 10/27/2015 - 19:20 नवीन
पराशर कडून सत्यवतीला व्यास हा मुलगा लग्नाआधी झाला. तरीही सत्यवतीचा कोमार्य भंग झाला नाही. आधुनिक शास्त्रानुसार हे शक्य आहे. सुक्ष्म सुईद्वारे कृत्रिम रेतन करून स्त्रीचे कोमार्य टिकवणे शक्य आहे. व गर्भाची पुर्ण वाढ झाल्यावर त्या गर्भवती स्त्रीचे सिझेरिअन डिलिव्हरी केल्यास तीचे कोमार्य टिकून राहील.
  • Log in or register to post comments

पराशरांना सत्यवतीप्रति

याॅर्कर
Tue, 10/27/2015 - 19:34 नवीन
पराशरांना सत्यवतीप्रति कामवासना जागृत झाली होती,त्यांनी संबंध प्रस्थापित केले. आणि वासना जागृत झालेला मनुष्य तुम्ही सांगतलेली पद्धत वापरेल काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

आधुनिक शास्त्रानुसार हे शक्य

आनंदी गोपाळ
Tue, 10/27/2015 - 21:39 नवीन
आधुनिक शास्त्रानुसार हे शक्य आहे. सुक्ष्म सुईद्वारे कृत्रिम रेतन करून स्त्रीचे कोमार्य टिकवणे शक्य आहे. व गर्भाची पुर्ण वाढ झाल्यावर त्या गर्भवती स्त्रीचे सिझेरिअन डिलिव्हरी केल्यास तीचे कोमार्य टिकून राहील.
आधुनिक शास्त्रानुसार → वॉव! आपल्या चरणकमलांचा फोटू व्यनि करा. व्हॅटिकन सिटीमधे डकवीन म्हणतो. इम्मॅक्युलेट कन्सेप्शन (ऑफ आयडियाज) बर्का ;) (रच्याकने. सिझरच्या काळात अर्थात रोमन लोकांच्या काळात उदयाला आलेल्या या शस्त्रक्रियेने जीझस ऑफ नाझारेथचा जन्म झालेला असण्याची शक्यता पडताळून पहायला हवी. तुम्हाला त्या काळच्या सिझरियन सेक्शनबद्दलचे काही ज्ञान आहे काय? असल्यास टंकण्याचे करावे ही नंर इनंती.) कठीण शब्दांचे अर्थः रच्याकने : रस्त्याच्या कडेने. बाय द वे. नंर : नम् र
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋतुराज चित्रे

आधुनिक शास्त्रानुसार

द-बाहुबली
Wed, 10/28/2015 - 12:07 नवीन
आधुनिक शास्त्रानुसार कॉस्मेटीक सरजरी करुन हायमेन पुर्ववत करता येतो की नाही ? म्हणून हीच ती प्रोसेस होती म्हणत मी याला नक्किच प्रक्षीप्त करणार नाही. पण मुळात पुराणातील गोष्टीत आधुनीक शास्त्रच होते असे अजिबात मानत नाही कारण आधुनीक शास्त्र आणि पुराणातील गोश्टीत महत्वाची तफावत म्हणजे सामान्य माणसाला त्याचा उपयोग करायचा नसलेला अधिकार. जसे पुराणात विमान होते तर होते पण त्याचा सामान्य व्यक्तीला उपयोग काय ? पण आधुनीक शास्त्राचे विमानातु मात्र जो कोणी पैसा फेकेल तो तिकीट काढुन त्यातुन फिरुन येइल पैसा जास्त असेल तर विमान विकतही घेइल. त्यामुळे मला आधुनीक शास्त्रातील तंत्र्ज्ञान व पुराणात वर्णन केलेल्या गोष्टींच्या तंत्रज्ञानात कमालीची तफावत आहे.. उगा भारतीयांनी ते पुर्वीपासुन आधुनीकच होते याची टीमकी मारणे बंद केले पाहीजे. स्वगतः- आता इथे सिन्सीअर चर्चा वगैरे घडणार आहे की काय ? तेवडी कुवत आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदी गोपाळ

"भावना दुखावणे एक दुखणं"

याॅर्कर
Tue, 10/27/2015 - 19:26 नवीन
मिपावर हा लेख आहे "भावना दुखावणे एक दुखणं लिंक माहित नाही,शोधा सापडेल . . . . . . (दुसर्याच्या भावना दुखावतील म्हणून आपल्या भावना दाबून ठेवाव्या लागतात.)
  • Log in or register to post comments

लाटकर साहेब

मनिमौ
Tue, 10/27/2015 - 19:29 नवीन
एकदा भैरप्पा यांनी लिहिलेले व उमा कुलकर्णी यांनी अनुवाद केलेल पर्व हे पुस्तक वाचले तर तुम्हाला जे प्रश्न पडले आहेत त्या बद्दल बरीच माहिती मिळेल. एका वेगळ्या पद्धतीने विचार करून लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

पराशरांना सत्यवतीप्रति

ऋतुराज चित्रे
Tue, 10/27/2015 - 19:46 नवीन
पराशरांना सत्यवतीप्रति कामवासना जागृत झाली होती,त्यांनी संबंध प्रस्थापित केले. कामवासना शमवण्यासाठी वेगळ्या प्रकारचेही संबंध प्रस्थापित केले असतील.
  • Log in or register to post comments

@ ऋतराज

हेमंत लाटकर
Tue, 10/27/2015 - 20:35 नवीन
@ ऋतराज मग सत्यवतीला पराशर पासून व्यास कसा झाला विनासबंध.
  • Log in or register to post comments

सर, त्यांना काय विचारता?

नाव आडनाव
Tue, 10/27/2015 - 20:49 नवीन
सर, त्यांना काय विचारता? त्यांचा तरी काय संबंध ? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

8. रावणाला दहा तोंडे होती.

काळा पहाड
Tue, 10/27/2015 - 20:43 नवीन
१. रावण बहुधा बेभरवशाचा माणूस असावा. म्हणजे तो दहा लोकांना दहा वेगवेगळ्या आणि गोंधळात टाकणार्‍या सूचना देत असावा आणि मग स्वतःच त्या केल्याबद्दल जाब विचारत असावा. आपण नाही का एखाद्याला दुतोंडी किंवा "लै बारा xxचा" म्हणतो. तसंच. २. किंवा रावणाचं गुप्तहेर खातं अतिशय निष्णात असावं. तो दहा कानांनं ऐकतो असं म्हटलं जात असेल आणि अपभ्रंश होवून ते दहा तोंडं असं झालं असेल. ३. किंवा त्याचे नऊ डमी असावेत.
  • Log in or register to post comments

दशानन..

प्रभाकर पेठकर
Wed, 10/28/2015 - 01:21 नवीन
रावणाला दहा ग्रंथ मुखोद्गत होते. म्हणजे त्याला सर्व ज्ञान अवगत होते. म्हणून त्याला दशग्रंथी, दहा वेगवेगळी व्यक्तीमत्व असणारा मानायचे आणि सर्वसामान्यांना समजण्यासाठी त्याला दहा डोक्यांची उपमा आहे. (असे कुठेतरी वाचले आहे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

9 हनूमानाने संजिवनी बुटी आणताना पर्वत उचलून आणला.

काळा पहाड
Tue, 10/27/2015 - 20:44 नवीन
हे सुद्धा रुपकात्मक असू शकतं. पर्वत उचलणे म्हणजे अतिशय अवघड काम करणे अशा अर्थानं,
  • Log in or register to post comments

4. यादवांचे पाप वाढल्यामुळे व्दारका समुद्रात बुडाली.

काळा पहाड
Tue, 10/27/2015 - 20:51 नवीन
अटलांटिस सुद्धा समुद्रात बुडाल्याबद्दल बरंच चर्विचरण होत असतं. द्वारकेबद्दल का आश्चर्य वाटतं? बाकी मानवी कृत्यामुळे आर्क्टिक वितळून समुद्राची पातळी (ज्यावेळी) वाढेल, आणि मालदीव पाण्याखाली जाईल, तेव्हा मानवी पापांमुळे हे झालं अशी हेडलाईन सकाळच देईल की नाही पहा. तशीच घटना तेव्हा कशावरून घडली नसेल? त्यावेळी पण लालू यादव सारखे असतीलच. त्यामुळे लोकांची भावना यांच्यामुळेच हे झालं अशी असू शकते. बाकी बुडालेल्या द्वारकेचा शोध गुजरात जवळच्या समुद्रात चालू आहे (होता!). ती कधी मिळेल तेव्हा काय झालं ते कळेलच.
  • Log in or register to post comments

सहा महिने माल्दीवात काढलेत

मोगा
Wed, 10/28/2015 - 11:19 नवीन
बाकीच्या देशानी उष्णता वाढवायची व बिचा र्‍या मालदीवने बुडायचे ! यादव स्वतःच्या पापाने बुडले , मालदीव दुसर्‍याच्या पापाने बुडणार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

और उनका खुदा उनके साथ है.

मोगा
Wed, 10/28/2015 - 11:35 नवीन
मालदीव दरवर्षी ऑष्ट्रेलियात थोडीथोडी जागा खरेदी करत आहे. बेटं बुडली की ते ऑष्ट्रेलियात जाउन तिथले नागरिइक होणार आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

ऑस्ट्रेलियात नागरिक होता येईल

सुबोध खरे
Wed, 10/28/2015 - 11:53 नवीन
ऑस्ट्रेलियात नागरिक होता येईल पण रस्त्यावर नमाज पढता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

.

मोगा
Wed, 10/28/2015 - 12:29 नवीन
कदाचित तिथे मशिदीही मोठ्या बांधतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ऑस्ट्रेलियात राहायचे असेल तर

सुबोध खरे
Wed, 10/28/2015 - 12:38 नवीन
ऑस्ट्रेलियात राहायचे असेल तर ऑस्ट्रेलियाचे कायदे पाळावे लागतील अन्यथा जिथे जायचे आहे तिथे चालू लागा हे तिथल्या पंतप्रधानानी स्वच्छ शब्दात तेथील मुसलमान नागरिकांना सांगितले आहे. आणी हितेसभाऊ तुम्ही मालदीवचे नागरिक प्रथम तिथे नागरिक होणार आणी मग मोठी मशीद बांधून ती तयार झाली कि मग त्यात नमाज पढणार म्हणून गाजरं खात बसा. हा हा हा, हि हि हि, हु हु हु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोगा

भगवी गाजरं तुम्ही खा .

मोगा
Wed, 10/28/2015 - 13:11 नवीन
ते खजूर खातील. http://googleweblight.com/?lite_url=http://oilprice.com/Latest-Energy-News/World-News/Maldives-Buying-Land-In-Australia-As-Preparation-For-Mass-Migration.html&ei=w9jd-Sze&lc=en-IN&s=1&m=166&ts=1446017962&sig=APONPFmB-RArnhMdUga2vXjbaWhivxkECg
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

ते टॉप गियर्ड फिलॉसॉफर कुठे

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/28/2015 - 00:16 नवीन
ते टॉप गियर्ड फिलॉसॉफर कुठे गेले हो? लैच आठवण यायली त्यांची! ;)
  • Log in or register to post comments

मेले ते

काळा पहाड
Wed, 10/28/2015 - 00:44 नवीन
मेले ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आत्मा

कपिलमुनी
Wed, 10/28/2015 - 01:09 नवीन
त्यांच्या आत्म्याने फक्त शरीर ( आयडी) बदलला आहे . देह नश्वर आहे आत्मा अमर आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

महाभारतात द्रोपदीवर अन्याय

हेमंत लाटकर
Wed, 10/28/2015 - 10:30 नवीन
महाभारतात द्रोपदीवर अन्याय झाला. अर्जुनाने स्वयंवरात द्रोपदीला जिंकले तरी तिला पाचही पांडवाशी विवाह करावा लागला. व्यासाच्या सांगण्यानुसार प्रत्येक पांडवाबरोबर 1-1 वर्ष सबंध ठेवायचे ठरले. त्यामुळे एकाही पांडवाचे प्रेम तिला मिळाले नाही. चीर हरणाला सामोरे जावे लागले. पांडवा सोबत वनवासात जावे लागले. महाभारत युद्ध जिंकूनही अश्वत्थामाने द्रोपदीच्या पाचही पुत्राचा वध केल्यामुळे दुख: भोगावे लागले.
  • Log in or register to post comments

एकेक वर्ष नाय हो !

मोगा
Wed, 10/28/2015 - 11:15 नवीन
बारा महिने भागिले पाच .... इतके महिने. कर्ण सहावा पांडव असता तर विभागणी बरोबर दोन महिने झाली असते असे कर्णाला पाहिल्यावर द्रौपदीला वाटते म्हणे असा कायतरी संदर्भ जांभळाख्यानात आहे. ( ? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

कुंतीने सांगितले आणि द्रौपदीने मान्य केले?

याॅर्कर
Wed, 10/28/2015 - 13:14 नवीन
कि पाचजणांबरोबर विवाह कर म्हणून.काय जबरदस्ती होती काय?(तिची तशी इच्छा असणार!) कुठलं वचन आणि काय ते पूर्वजन्मातील वरदान?पाच पती मिळण्याचे.छे छे काहीही हं. द्युतसभेत कर्णाने जे उद्गार काढले ते काही चुकिचे वाटत नाहीत.(मी चीरहरणाचे समर्थन करत नाही) पाच! मुलं झाली आणि एकाही पांडवाचे प्रेम मिळाले नाही,ते कसं? . . . . . एकंदरीतच काय बुद्धीभेद चालवलाय बघा! महाभारत नव्हे कामभारत असं पाहिजे (इतरांना पटावं अशी अपेक्षा नाही)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

बारा महिने भागिले पाच ....

हेमंत लाटकर
Wed, 10/28/2015 - 11:50 नवीन
बारा महिने भागिले पाच .... इतके महिने.
http://googleweblight.com/?lite_url=http://mnaidunia.jagran.com/spiritual/kehte-hain-draupadi-remained-virgin-lifelong-309964&ei=VShNdxfx&lc=en-IN&s=1&m=329&ts=1446012990&sig=APONPFkTaCr5JOjNT6o9bRYbgw71LKgYrA
  • Log in or register to post comments

पाच! मुलं झाली आणि एकाही

हेमंत लाटकर
Wed, 10/28/2015 - 14:13 नवीन
पाच! मुलं झाली आणि एकाही पांडवाचे प्रेम मिळाले नाही,ते कसं?
मुले होणे म्हणजे प्रेम मिळाले असा होत नाही. पाच जणात एक बायको असल्यावर कोणाचे प्रेम मिळेल. अर्जुनाने द्रोपदीला स्वयंवरात जिंकले पण द्रोपदीचे सोंदर्य पाहुन युद्धिष्टराचे चित्त ढळले व द्रोपदी विषयी अभिलाषा निर्माण झाली. युद्धिष्टर ज्ञानी होता पण पराक्रमी नव्हता. जेष्ठपणाचा युक्तीवाद केला. व्यास व नारदांनी दैवी दाखले देऊन द्रोपदीला पाच पांडवा बरोबर विवाह करण्यास राजी केले. (द्युष्टद्युम्नाने विरोध केला होता)
  • Log in or register to post comments

बरं ठीक हाय,

याॅर्कर
Wed, 10/28/2015 - 14:25 नवीन
मग हे तुमच्या मनाला पटतं का?तेव्हडं सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

वाचन वाढवा लट्टुकाका.

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 10/28/2015 - 19:11 नवीन
वाचन वाढवा लट्टुकाका. द्रौपदी इनिशिअली फक्तं अर्जुनाची बायको होती. तिला घेउन घरी आल्यानंतर पांडवांनी कुंतीला हाक मारली. तिने त्यावर आणलेली भिक्षा समान वाटुन घ्या असं नं पहाता म्हणलं होतं. त्याकाळी जेष्ठांच्या आज्ञा पाळल्या जात असल्याने आणि सर्व पांडव मातेच्या वचनामधे असल्याने त्यांना द्रौपदीशी विवाह कराव लागला. दुसरं म्हणजे हे वाक्यं.
युद्धिष्टर ज्ञानी होता पण पराक्रमी नव्हता
असं कोणं म्हणालं? पांडवांपैकी प्रत्येक जणं एकेका प्रकारच्या शस्त्रास्त्र विद्येमधे निपुण होता जसं की अर्जुन= धनुष्य बाण भीम= गदा, नकुल किंवा सहदेवांपैकी एकजण= खड्ग अर्थात तलवार ई.ई.. माझ्या माहितीप्रमाणे युधिष्ठिरानेही कौ.पां. युद्धात प्रचंड पराक्रम गाजवलेला होता. उगीचं वाटेल ती माहिती पसरवु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

जाणकारांनी प्रकाश टाकावा !

पगला गजोधर
गुरुवार, 10/29/2015 - 12:04 नवीन
पांडवांमध्ये, अर्जुनाला > अभिमन्यु, भीमाला > घटत्कोच अशी संततीचा उल्लेख आढळतो, परंतु युधिष्ठीराच्या पुत्र / कन्या ची नावं /नांवे काय ? युधिष्ठीराला संतती होती का ? याचे उत्तर जर ''नाही'' असेल, तर आमच्या शालेयजिवनातील शिक्षक डॉ चाफेकरांनी, युधिष्ठीराच्या पौरुषत्वा-संधर्भात विधान केलेले (सन १९९२ मधे) , ते मी सांगू शकेन. (आणि जर युधिष्ठीराच्यासंततीचा अस्सल उल्लेख असेल, तर त्यामुळे चाफेकर सरांच विधान मी इथे देणार नाही, त्यांच्या तर्कानुसार द्रौपदीला पाचही पांडवांची पत्नी म्हणून ठेवण्याच्या मागे, पांडव व कुंतीचे पूर्वनियोजित कृत्य असल्याची मीमांसा, मी इथे देणार नाही )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

लेख व लेखकाचे आतापर्यंतचे

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 10/28/2015 - 19:02 नवीन
लेख व लेखकाचे आतापर्यंतचे दोन्ही बाजूंनी दिलेले प्रतिसाद पाहता, हे विचार मनात आले... १. रामायण व महाभारत यांना महा/काव्य असे संबोधले जाते. म्हणजे त्यांचे लेखक कवी झाले. कवींना काव्यात वस्तुस्थितीपासून दूर जाण्याची सूट (पोएटिक लिबर्टी) असते असे म्हणतात. या लिखाणाच्या लेखकांपैकी कोणीही "ही जशी घडली तशीच लिहीलेली सत्यकथा आहे" असे कुठेच लिहून ठेवल्याचे ऐकिवात नाही (जाणकारांनी खुलासा करावा). २. रामायण व महाभारत यांना बर्‍याच भारतियांच्या मनात बरेच आदराचे व आस्थेचे स्थान असले तरी, त्या लेखनातील संदर्भ आजच्या जीवनात वापरा असे सांगितले तर त्यातले बरेच जण "वेडे झालेत काय? हे आजच्या काळात चालणार नाही" असे सांगून आपल्याला वेड्यात काढतील अशीच परिस्थिती आहे. तेव्हा आता "हे असे कसे" असे म्हणण्याचे फारसे प्रयोजन उरले नाही ही वस्तुस्थिती आहे. ३. जगातील प्रत्येक अर्वाचीन/मध्ययुगीन/प्राचीन लेखनात सर्वांना सर्वकाळ पटेल असे कधीच काही नव्हते/नाही/असणार नाही. त्यामुळे, कोणत्याही लेखनातील शास्त्रिय कसोट्यांवर "न उतरणार्‍या / न पटणार्‍या" गोष्टी जोपर्यंत सर्वांवर लादल्या जात नाहीत किंवा त्यांचा इतरांना उपद्रव होत नाही, तोपर्यंत त्यांचा उगाच बाऊ करणे असहिष्णूपणा होईल. तसा बाऊ न करण्याला अर्वाचीन कालात विचारस्वातंत्र्याचा मानवी अधिकार असे म्हणतात. ४. लेख व लेखकाचे प्रतिसाद पाहता लेखकाकडे उत्तम लिखाण करण्याची ताकद आहे असा अंदाज आहे. तेव्हा त्याने, असला चावून चोथा झालेला आणि चर्चेचे शून्य फलित असलेले विषय सोडून इतर काही वैचारिक / रोचक / लालित्यपूर्ण लिहीले तर नक्कीच आवडेल. हे लेखक व मिपासभासद दोघांसाठी सकारात्मक होईल. शिवाय, चांगले लिहीले तर मिपाकर भरभरून प्रतिसाद देतातच... त्याकरिता वादग्रस्त मुद्दे असायलाच हवेत असे नाही. हे माझे व्यक्तिगत मनोगत झाले. बाकी मिपाकर (यात लेखकमहाशयही आलेच) आपापले योग्य निर्णय घेण्याइतके सुज्ञ आहेतच.
  • Log in or register to post comments

लेख व लेखकाचे प्रतिसाद पाहता

हेमंत लाटकर
गुरुवार, 10/29/2015 - 11:17 नवीन
लेख व लेखकाचे प्रतिसाद पाहता लेखकाकडे उत्तम लिखाण करण्याची ताकद आहे असा अंदाज आहे.
डाॅक्टर म्हात्रे हे कौतुक आहे की पुणेरी खोचकपणा आहे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

फॉर्म्यालिटी आहे बहुधा. ;)

अभ्या..
गुरुवार, 10/29/2015 - 12:06 नवीन
फॉर्म्यालिटी आहे बहुधा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

मी जे लिहायचे ते स्पष्ट

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 10/29/2015 - 15:56 नवीन
मी जे लिहायचे ते स्पष्ट लिहीतो. त्यामागे वेगळा अर्थ नसतो. :) तुमची विषय मांडण्याची आणि विषद करण्याची पद्धत चांगली आहे. तर्कही चांगले करता/वापरता. यामुळे तुम्ही चांगले लिहू शकाल असा माझा अंदाज आहे. वादग्रस्त विषय निवडू नये असे माझे मत अजिबात नाही... पण ज्या विषयावर केवळ वादच होणार, काहीच सकारत्मक होणार नाही, हे नक्की आहे, त्या विषयाला परत परत उकरून काढणे कोणाच्याच फायद्याचे नाही असे माझे मत आहे. आपण मांडलेला विषय व त्यावरची चर्चा फलदायी झाल्यास त्या लिखाणापासून लेखकाला जास्त सकारात्मक समाधान मिळते, असा माझा अनुभव आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंत लाटकर

समर्पक प्रतिसाद.

चित्रगुप्त
गुरुवार, 10/29/2015 - 01:16 नवीन
डॉ. सुहास म्हात्रे यांचा प्रतिसाद अतिशय समर्पक.
  • Log in or register to post comments

+१११

नाखु
गुरुवार, 10/29/2015 - 08:13 नवीन
वरील प्रतीसादास दोन्ही हातांनी बाक वाजवून अनुमोदन आणि काकांचे अभिनंदन !!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा