✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

म
मुक्त विहारि यांनी
गुरुवार, 01/15/2015 - 03:24  ·  लेख
लेख
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
364376 वाचन

💬 प्रतिसाद (1423)

प्रतिक्रिया

जेप्या...यातल्या कोणत्या

टवाळ कार्टा
Fri, 10/09/2015 - 20:16 नवीन
जेप्या...यातल्या कोणत्या मुद्द्यांना तुझा आक्षेप आहे? मी २ नंबरचा नक्की पकडलाय पण ते चूक असले तरी सांग =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ट्ठो =)) =)) =))

बॅटमॅन
Fri, 10/09/2015 - 20:32 नवीन
ट्ठो =)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

आपला आक्षेप 3 नी मुद्याला आहे

जेपी
Fri, 10/09/2015 - 20:43 नवीन
आपला आक्षेप 3 नी मुद्याला आहे. 1)करियर कर पण त्याला ambition बनवु नको. 2) family always first. 3)नवरा बायको ..मित्रांसारखे कसे राहु शकतात??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

यावर मी माझी मते लिहिली तर

टवाळ कार्टा
Fri, 10/09/2015 - 20:59 नवीन
यावर मी माझी मते लिहिली तर बाकी जाउदे....आपणच वाद घालत बसू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मांड मत..कदाचित काहि नव निघेल

जेपी
Sat, 10/10/2015 - 11:28 नवीन
मांड मत..कदाचित काहि नव निघेल. -- असो त्या मुलीचे तिन्ही मुद्दे मान्य केले तर ..लग्न या शब्दात तरी का अडकायच?? या मुद्यावर लगेच माघार घेतली तिने.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

हे फक्त तु रिक्वेस्ट केलीस

टवाळ कार्टा
Sat, 10/10/2015 - 22:11 नवीन
हे फक्त तु रिक्वेस्ट केलीस म्हणून....आणि मी लिहिलेली मते माझी वैयक्तीक मते आहेत
वधुच्या अपेक्षा- 1) मला करियर करायचे आहे.माझ्या महत्वकांक्षा आहेत. 2)जेष्ठ नागरिक चालणार नाहीत. 3) आपण मित्रांसारखे राहु.
१) मुलींमध्ये "करियर + महत्वकांक्षा" असणार्या / नसणार्या / काही काळापुरत्या या गोष्टी महत्वाच्या मानणार्या / स्वतःलाच माहीत नसणार्या / स्वतःलाच माहीत नसणार्या पण मुलाने विचारले की मग विचार करणार्या असे व इतर अनेक काँबिनेशन्स असणारे टैप असतात...समोरच्या मुलीचे विचार तुझ्या विचारांशी मॅच नसतील होत तर तिला बदलायला / अ‍ॅडजेस्ट करायला लावण्यापेक्षा दुसरी मुलगी शोध...प्रत्येकाची अ‍ॅडजस्ट करायची क्षमता वेगवेगळी असते २) याबाबत काळे/पांढरे असे नसते....प्रत्येकाचे वेगवेगळे कारण असू शकते...तस्मात याबाबत मी काहीही लिहू शकत नाही ३) Personally I would anytime prefer a girl having this kind of approach....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मिशन ५०००

श्रीरंग_जोशी
Fri, 10/09/2015 - 20:15 नवीन
माझ्या मी उपवर तरुण असतो तर या धाग्यावर उपवर तरुणांकडून फारसे मूल्यवर्धन करणारे प्रतिसाद आले नाहीत. हरकत नाही. या निमित्ताने तो धागा वाचला जावा अन त्यावर द्यायचे प्रतिसाद इथे दिले जावे म्हणजे मिशन ५००० मध्ये मोलाची भर टाकली जाईल. आगावू धन्यवाद.
  • Log in or register to post comments

असे जातियवादी लिखाण लिंका

टवाळ कार्टा
Fri, 10/09/2015 - 20:18 नवीन
असे जातियवादी लिखाण लिंका देणे (तुम्हाला) शोभत नाही हो पंत =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वास्तव नाकारून कसं चालणार

श्रीरंग_जोशी
Fri, 10/09/2015 - 20:22 नवीन
ज्या समस्या सुटाव्या असे वाटते त्या आहे तशाच स्वीकारल्याशिवाय सोडवायच्या कशा? वास्तव आपल्याला पटत नसले तरी जे आहे त्याचा अनुल्लेख केल्याने ते बदलत नसतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

पार डोक्यावरून फुल्टॉस गेला

टवाळ कार्टा
Fri, 10/09/2015 - 20:24 नवीन
पार डोक्यावरून फुल्टॉस गेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

हरकत नाही

श्रीरंग_जोशी
Fri, 10/09/2015 - 20:26 नवीन
विकेट कीपर जरा मंद आहे त्यामुळे एक धाव काढू शकतोस ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

ओवरथ्रो

श्रीरंग_जोशी
Fri, 10/09/2015 - 20:48 नवीन
विकेट कीपरने ओवरथ्रो केला आहे त्यामुळे आणखी एक धाव काढू शकतोस ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

रविवारी सकाळी सकाळी वडिलांचा

उगा काहितरीच
Sat, 10/10/2015 - 01:10 नवीन
रविवारी सकाळी सकाळी वडिलांचा फोन आला , "तुझी उंची किती आहे ? एक जण आलेत माहिती मागताएत ! "(यावेळी घरी जाईन तेव्हा बॉम्ब फुटणार आहे बहुतेक )
  • Log in or register to post comments

मुलीची किती आहे त्याच्या

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 10/10/2015 - 09:22 नवीन
मुलीची किती आहे त्याच्या अर्धा फुट कमी सांगा. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

शुभेच्छा मित्रा :)

नाव आडनाव
Sat, 10/10/2015 - 09:35 नवीन
शुभेच्छा मित्रा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उगा काहितरीच

इति श्री मुवि पुराणे

याॅर्कर
Sat, 10/10/2015 - 15:18 नवीन
"वधू आणि वराच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?" खंड 1 संपूर्णम ओवी संख्या 1293
  • Log in or register to post comments

इतक्यात नै संपणार :)

टवाळ कार्टा
Sat, 10/10/2015 - 17:12 नवीन
इतक्यात नै संपणार :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: याॅर्कर

रच्याकने, मी पण लग्न जमवतो

खटपट्या
Sat, 10/10/2015 - 17:18 नवीन
रच्याकने, मी पण लग्न जमवतो आजकाल. काय जबरा आणुभव येतात म्हणून सांगू.
  • Log in or register to post comments

१३००

टवाळ कार्टा
Sat, 10/10/2015 - 17:35 नवीन
१३००
  • Log in or register to post comments

१३०१

टवाळ कार्टा
Sat, 10/10/2015 - 17:35 नवीन
१३०१
  • Log in or register to post comments

१३०२

अभ्या..
Sat, 10/10/2015 - 18:47 नवीन
१३०२
  • Log in or register to post comments

१३०३

अभ्या..
Sat, 10/10/2015 - 18:48 नवीन
१३०३ . मुवि ३-१३ वाजायच्या आत वाचनमात्र करुन घ्या धागा. कंटाळा आला आता.
  • Log in or register to post comments

वाचनमात्र नै कलाचं. हवे तर

बॅटमॅन
Sat, 10/10/2015 - 20:10 नवीन
वाचनमात्र नै कलाचं. हवे तर रेष्ट घ्या पण असे नको म्हणूस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हे काय अभ्या भौ. काही षटके

खटपट्या
Sat, 10/10/2015 - 20:33 नवीन
हे काय अभ्या भौ. काही षटके निर्धाव जातात. आणि आता तर काय विकांत आहे. पब्लीक घरचे आंतरजाल खर्च करून मिपा कधी बघायला शिकणार देव जाणे. जो स्वतःच्या पैशाने घेतलेले नेट वापरून मिपावर येतो तोच खरा मिपाकर. तो जेपी बघा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

जो स्वतःच्या पैशाने घेतलेले

सुबोध खरे
Mon, 10/12/2015 - 13:41 नवीन
जो स्वतःच्या पैशाने घेतलेले नेट वापरून मिपावर येतो तोच खरा मिपाकर. हायला म्हणजे आम्ही डब्बल (नाही ट्रिपल) खरे मिपाकर एक -- आडनावाने खरे दोन -- घरी स्वताच्या खर्चाने नेट आहे तीन -- दवाखान्यातही नेटचा खर्च स्वतःचा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

आम्ही हपिसाताले नेट वापरतो पण

अभ्या..
Mon, 10/12/2015 - 18:46 नवीन
आम्ही हपिसाताले नेट वापरतो पण हपिसचे बिल सोताच भरतो. मोबाईलचे तर भरल्याशिवाय पर्याय नाहि. एकूण खरे मध्ये धरुन चाला मला बी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

ओ अभ्याराजे! आम्हाला पण

मांत्रिक
Sat, 10/10/2015 - 20:38 नवीन
ओ अभ्याराजे! आम्हाला पण लिवायचंय अजून. असू देत की वो धागा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

तु तुझा टंकाळ्याचा अधिकार

टवाळ कार्टा
Sat, 10/10/2015 - 22:11 नवीन
तु तुझा टंकाळ्याचा अधिकार वापर....नक्को येउ इथे...आम्चा टैम्पास का बंद कर्तोय्स =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

फारचं आळशी झाले लोक्स. टाका

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sun, 10/11/2015 - 00:17 नवीन
फारचं आळशी झाले लोक्स. टाका की रे भरपुर....प्रतिसाद म्हणतो मी.
  • Log in or register to post comments

रविवार आहे म्हणून निवांत आहे

उगा काहितरीच
Sun, 10/11/2015 - 13:39 नवीन
रविवार आहे म्हणून निवांत आहे बहुतेक .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

काउंटच वाढवायचा असेल तर, हे

जातवेद
Sun, 10/11/2015 - 22:38 नवीन
काउंटच वाढवायचा असेल तर, हे घ्या मनगटावर मोगर्‍याचे हार आले बादवे, मिपा वर 'संबंधित लेखन' नावाचा भाग असावा का प्रत्येक लेखनाखाली?
  • Log in or register to post comments

वा झकासच कविता आहे. वाचनात

मांत्रिक
Mon, 10/12/2015 - 11:55 नवीन
वा झकासच कविता आहे. वाचनात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! त्याच निमित्ताने कुठेतरी वाचनात आलेलं नमूद करतो. बहुतेक ओशोंनीच म्हटलेलं आहे. "पुरुषप्रधान समाजरचनेत केवळ हिंसा, विषमता आणि अन्याय फार वाढलेले आहेत. आता ही सिस्टिम बदलण्याची गरज आहे. स्त्रीप्रधान समाजरचना ही नव्या काळात आदर्श ठरु शकेल असं वाटतं. कारण स्त्रीकडे नैसर्गिकरित्या कोमलता, दयाळू वृत्ती, भावनाप्रधानता, क्षमाशीलता हे गुण असतात. समाजातील अनेक विषांवर ही समाजरचना उतारा ठरु शकेल." कृपया चर्चा अपेक्षित आहे. मी कोणताही एक पक्ष घेत नाहीये. दोन्ही बाजूंचं उत्तम विश्लेषण वाचता आल्यास फार आनंद होईल. तसेच याबाबत लोकमत काय आहे हे देखील जाणून घेता येईल. समाजात एकंदरीत स्त्रीतत्वाविषयक कल काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. फार पूर्वी स्त्रीच्या नव्या जीवास जन्म देण्याच्या अद्भुत क्षमतेमुळे स्त्रीतत्व मानवी धर्मात देखील समाविष्ट झालं. पण पुढे पुढे मात्र हे तत्व पुरुष तत्वाच्या तुलनेत दुय्यम ठरत गेलं. याचं काय कारण असावं? समाज, धर्म, राजकारण या सर्वच पातळ्यांवर हे तत्व मागं पडत गेलं. त्याचा देखील मानववंशशास्त्रीयदृष्ट्या धांडोळा घेता आल्यास वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जातवेद

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 10/12/2015 - 12:12 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

मधल्या काळात काय मेमे गोळा

जेपी
Mon, 10/12/2015 - 12:15 नवीन
मधल्या काळात काय मेमे गोळा करत होतास काय,?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

नै रे

टवाळ कार्टा
Mon, 10/12/2015 - 12:17 नवीन
नै रे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

ते मेमे नसून मीम असा उच्चार

बॅटमॅन
Mon, 10/12/2015 - 13:37 नवीन
ते मेमे नसून मीम असा उच्चार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

याला काही ऐतिहासीक पुरावा..

टवाळ कार्टा
Mon, 10/12/2015 - 14:04 नवीन
याला काही ऐतिहासीक पुरावा...एखादा शिलालेख....गेलाबाजार बखर्/पत्रं वगैरे?? =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हा घ्या पुरावा.

बॅटमॅन
Mon, 10/12/2015 - 14:08 नवीन
हा घ्या पुरावा. https://www.youtube.com/watch?v=3dErjFPTarc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

धन्यवाद टकाराजे! एक विनोद

मांत्रिक
Mon, 10/12/2015 - 12:22 नवीन
धन्यवाद टकाराजे! एक विनोद म्हणून मस्तच आहे. पण पुरुषांच्यात देखील जेलसी असतेच की! फक्त तिचं क्षेत्र वेगळं असतं. ही जेलसी सत्ता, संपत्ती, अधिकार, मानाच्या खुर्च्या, इतरांच्या सुंदर मैत्रिणी/पत्नी, बाईक्स-महागड्या कार्स यांच्यासाठी असते एवढेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

(No subject)

टवाळ कार्टा
Mon, 10/12/2015 - 12:56 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मांत्रिक

मग काय ठरलं

इरसाल
Mon, 10/12/2015 - 14:55 नवीन
धागा वाचनमात्र करायचा !
  • Log in or register to post comments

शुभ बोल रे इरसाला.

बॅटमॅन
Mon, 10/12/2015 - 15:01 नवीन
शुभ बोल रे इरसाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

कायकू रे?

टवाळ कार्टा
Mon, 10/12/2015 - 15:31 नवीन
कायकू रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

वरचे सगळे अभिप्राय वाचुन

बदामची राणी
Mon, 10/12/2015 - 17:51 नवीन
वरचे सगळे अभिप्राय वाचुन भारतात समस्त मुली आणि त्यांचे आई वडील, विशेषत: आई यांनी समस्त लग्नाळू मुलांचा आणि त्यांच्या आई वडिलांचा भयंकर छळ मांडला आहे असा वाटु लागलं आहे. या मुली ज्यांचा स्वत:चा पगार 80000 ते 100000 च्या घरात असतो त्याच अश्या मोठ्ठ्या पगारवाल्या मुलाची अपेक्षा करतात. आणि का करु नये? या पोज़िशन ला येण्या साठी त्यांनीही कष्ट केलेले असतात. आता त्यांना जर त्यांच्या पोज़िशन ला साजेसा मुलगा हवा असेल तर त्यात लोकांचे काय जाते? आणि जर सरसकट सगळ्या मुलीच अश्या अपेक्षा करु लागल्या (जे माझ्या मते अजिबातच नाही) तर अशी मुलेच त्यांना मिळाणार नाहीत. त्यामुळे त्या आपोआपच आकडा खाली आणतील. त्यामुळे बिच्चार्या मुलांनी अजिबात काळजी करु नये. ज्या मुलीचा पगार 20000 असेल, ती 100000 वाल्याची अपेक्षाच करणार नाही. तेव्हडा पोच त्या मुलीला आणि तिच्या पालकांनाही असतो. आणि तो 100000 वालाही अश्या कमी पगार किंवा शिक्षण असलेल्या मुलीशी लग्नाला तयार होणार नाही. हां त्याची अटच पैसा नसुन सौंदर्य असेल तर गोष्ट वेगळी. पण मग तो प्रोब्लेम मुलींनाही लागु होतो. असही जनरलाईज करुन म्हणु शकतो की सगळ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना गोर्या, लांबसडक केस वाल्या मुलीच/ सुनाच हव्या असतात. मग बिचार्या ह्या कॅटॅगरीत ना बसणार्या मुलींनी कुठे जायचं? आज भारतात होणारे महीलां वरचे अत्याचार, हुंडाबळी सगळ्या कपोलक्ल्पित कथाच आहेत की काय असा वाटायला लागले आहे. सगळे जणु महान अपर्णा रामतिर्थकर बाईंच्या किर्तनातुनबाहेर पडल्या सारखे बोलत आहेत. खरतर मुलींना मजेत जरी असा म्हंटल की, “अगं तुझ्या अश्या सवयी असतील (महागडे कपडे, हॉटेलींग, फॉरेन ट्रीप्स वगैरे तर तुला श्रीमंत नवराच बघायला हवा”, तर त्यांना राग येतो. त्या म्हणतात, “ का? आमच्या मनगटात जोर नाही का? आम्हाला जेव्हडा पगार आहे त्यात बसेल असेच खर्च आम्ही करतो. नवर्याच्या जिवावर नाही.” तेंव्हा असा जनरलायझेशन करु नका प्लीज.
  • Log in or register to post comments

वेलकम ग....

स्वप्नांची राणी
Mon, 10/12/2015 - 18:39 नवीन
हायला बर्‍याच नव्व्या नव्व्या अनाहिता आल्यात की..!! (अनाहिता रुल्स अँड रेग्युलेशन्सः हे बघ, प्रत्येक अनाहितेच्या प्रतिसादाला 'फारच छान, सहमत ग, हो ना ग, अगदी अगदी...' हे उपप्रतिसाद जर तु दिले नाहीस तर तो फाऊल धरण्यात येईल. स्त्रितत्त्व आणायचेय ना आपल्याला... मग? )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बदामची राणी

>>> स्त्रितत्त्व

प्यारे१
Mon, 10/12/2015 - 19:15 नवीन
>>> स्त्रितत्त्व स्त्रितत्त्व? बोले तो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

क्या मालूम रे...?? मांत्रिक

स्वप्नांची राणी
Mon, 10/12/2015 - 19:28 नवीन
क्या मालूम रे...?? मांत्रिक अल्हवाहिध अल्ल्लवं...अर्थात मांत्रिक ओन्ली नोज्..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

मेरकु पैले लगा 'स्त्रीत

प्यारे१
Mon, 10/12/2015 - 19:37 नवीन
मेरकु पैले लगा 'स्त्रीत तत्त्व'. कुछ समझ्या नै की ऐसे कैसे बाहर से तत्त्व डाल सकते. अब्बी वो मांत्रिक को पुछना मतबल सारा लफडे का काम है. उससे अच्चा चारमिनार पे जाके बैठकु चाया पिते. तुमको होना कटींग चाय????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

बटर हौर खारी भी होना रे...देख

स्वप्नांची राणी
Mon, 10/12/2015 - 19:46 नवीन
बटर हौर खारी भी होना रे...देख अब बोलनेका नय हां की अपेक्षा बढ़ गयेला है....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

तुम अरबों के ऊंटको अच्चे से

प्यारे१
Mon, 10/12/2015 - 19:52 नवीन
तुम अरबों के ऊंटको अच्चे से जानते लगताय. हा कौन???? सलिम आरा मै आरा. अच्चा चाची, मेरकु सलिम बुला रा. वो अपने लॅन्ड का मॅटर सुलटा के आता. इदरीच रुको हा! ;) ___/\___
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी
  • «
  • ‹
  • 21
  • 22
  • 23
  • 24
  • 25
  • 26
  • 27
  • 28
  • 29
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा