Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367191
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

काउंटच वाढवायचा असेल तर, हे घ्या मनगटावर मोगर्‍याचे हार आले बादवे, मिपा वर 'संबंधित लेखन' नावाचा भाग असावा का प्रत्येक लेखनाखाली?

In reply to by जातवेद

वा झकासच कविता आहे. वाचनात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! त्याच निमित्ताने कुठेतरी वाचनात आलेलं नमूद करतो. बहुतेक ओशोंनीच म्हटलेलं आहे. "पुरुषप्रधान समाजरचनेत केवळ हिंसा, विषमता आणि अन्याय फार वाढलेले आहेत. आता ही सिस्टिम बदलण्याची गरज आहे. स्त्रीप्रधान समाजरचना ही नव्या काळात आदर्श ठरु शकेल असं वाटतं. कारण स्त्रीकडे नैसर्गिकरित्या कोमलता, दयाळू वृत्ती, भावनाप्रधानता, क्षमाशीलता हे गुण असतात. समाजातील अनेक विषांवर ही समाजरचना उतारा ठरु शकेल." कृपया चर्चा अपेक्षित आहे. मी कोणताही एक पक्ष घेत नाहीये. दोन्ही बाजूंचं उत्तम विश्लेषण वाचता आल्यास फार आनंद होईल. तसेच याबाबत लोकमत काय आहे हे देखील जाणून घेता येईल. समाजात एकंदरीत स्त्रीतत्वाविषयक कल काय आहे हे जाणून घ्यायला आवडेल. फार पूर्वी स्त्रीच्या नव्या जीवास जन्म देण्याच्या अद्भुत क्षमतेमुळे स्त्रीतत्व मानवी धर्मात देखील समाविष्ट झालं. पण पुढे पुढे मात्र हे तत्व पुरुष तत्वाच्या तुलनेत दुय्यम ठरत गेलं. याचं काय कारण असावं? समाज, धर्म, राजकारण या सर्वच पातळ्यांवर हे तत्व मागं पडत गेलं. त्याचा देखील मानववंशशास्त्रीयदृष्ट्या धांडोळा घेता आल्यास वाचायला आवडेल.

In reply to by टवाळ कार्टा

धन्यवाद टकाराजे! एक विनोद म्हणून मस्तच आहे. पण पुरुषांच्यात देखील जेलसी असतेच की! फक्त तिचं क्षेत्र वेगळं असतं. ही जेलसी सत्ता, संपत्ती, अधिकार, मानाच्या खुर्च्या, इतरांच्या सुंदर मैत्रिणी/पत्नी, बाईक्स-महागड्या कार्स यांच्यासाठी असते एवढेच!

वरचे सगळे अभिप्राय वाचुन भारतात समस्त मुली आणि त्यांचे आई वडील, विशेषत: आई यांनी समस्त लग्नाळू मुलांचा आणि त्यांच्या आई वडिलांचा भयंकर छळ मांडला आहे असा वाटु लागलं आहे. या मुली ज्यांचा स्वत:चा पगार 80000 ते 100000 च्या घरात असतो त्याच अश्या मोठ्ठ्या पगारवाल्या मुलाची अपेक्षा करतात. आणि का करु नये? या पोज़िशन ला येण्या साठी त्यांनीही कष्ट केलेले असतात. आता त्यांना जर त्यांच्या पोज़िशन ला साजेसा मुलगा हवा असेल तर त्यात लोकांचे काय जाते? आणि जर सरसकट सगळ्या मुलीच अश्या अपेक्षा करु लागल्या (जे माझ्या मते अजिबातच नाही) तर अशी मुलेच त्यांना मिळाणार नाहीत. त्यामुळे त्या आपोआपच आकडा खाली आणतील. त्यामुळे बिच्चार्या मुलांनी अजिबात काळजी करु नये. ज्या मुलीचा पगार 20000 असेल, ती 100000 वाल्याची अपेक्षाच करणार नाही. तेव्हडा पोच त्या मुलीला आणि तिच्या पालकांनाही असतो. आणि तो 100000 वालाही अश्या कमी पगार किंवा शिक्षण असलेल्या मुलीशी लग्नाला तयार होणार नाही. हां त्याची अटच पैसा नसुन सौंदर्य असेल तर गोष्ट वेगळी. पण मग तो प्रोब्लेम मुलींनाही लागु होतो. असही जनरलाईज करुन म्हणु शकतो की सगळ्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना गोर्या, लांबसडक केस वाल्या मुलीच/ सुनाच हव्या असतात. मग बिचार्या ह्या कॅटॅगरीत ना बसणार्या मुलींनी कुठे जायचं? आज भारतात होणारे महीलां वरचे अत्याचार, हुंडाबळी सगळ्या कपोलक्ल्पित कथाच आहेत की काय असा वाटायला लागले आहे. सगळे जणु महान अपर्णा रामतिर्थकर बाईंच्या किर्तनातुनबाहेर पडल्या सारखे बोलत आहेत. खरतर मुलींना मजेत जरी असा म्हंटल की, “अगं तुझ्या अश्या सवयी असतील (महागडे कपडे, हॉटेलींग, फॉरेन ट्रीप्स वगैरे तर तुला श्रीमंत नवराच बघायला हवा”, तर त्यांना राग येतो. त्या म्हणतात, “ का? आमच्या मनगटात जोर नाही का? आम्हाला जेव्हडा पगार आहे त्यात बसेल असेच खर्च आम्ही करतो. नवर्याच्या जिवावर नाही.” तेंव्हा असा जनरलायझेशन करु नका प्लीज.

In reply to by बदामची राणी

हायला बर्‍याच नव्व्या नव्व्या अनाहिता आल्यात की..!! (अनाहिता रुल्स अँड रेग्युलेशन्सः हे बघ, प्रत्येक अनाहितेच्या प्रतिसादाला 'फारच छान, सहमत ग, हो ना ग, अगदी अगदी...' हे उपप्रतिसाद जर तु दिले नाहीस तर तो फाऊल धरण्यात येईल. स्त्रितत्त्व आणायचेय ना आपल्याला... मग? )

In reply to by स्वप्नांची राणी

मेरकु पैले लगा 'स्त्रीत तत्त्व'. कुछ समझ्या नै की ऐसे कैसे बाहर से तत्त्व डाल सकते. अब्बी वो मांत्रिक को पुछना मतबल सारा लफडे का काम है. उससे अच्चा चारमिनार पे जाके बैठकु चाया पिते. तुमको होना कटींग चाय????

In reply to by स्वप्नांची राणी

तुम अरबों के ऊंटको अच्चे से जानते लगताय. हा कौन???? सलिम आरा मै आरा. अच्चा चाची, मेरकु सलिम बुला रा. वो अपने लॅन्ड का मॅटर सुलटा के आता. इदरीच रुको हा! ;) ___/\___

हो का? कित्ती कित्ती छान! आपल्याला कोणतही तत्व आणायच नाही बुवा. मग काय? आता धरा फाऊल. ऑन अ सिरिअस नोट, मी नवीन नाही इथे. पण लिहित नाही. फक्त वाचते. आता फारच वेगळी मत दिसल्यानी लिहिल^ ईतकच.

हो का? कित्ती कित्ती छान! आपल्याला कोणतही तत्व आणायच नाही बुवा. मग काय? आता धरा फाऊल. ऑन अ सिरिअस नोट, मी नवीन नाही इथे. पण लिहित नाही. फक्त वाचते. आता फारच वेगळी मत दिसल्यानी लिहिल^ ईतकच.

ते खर तर मलाही नाही समजल. जलतत्व वगैरे ऐकल होत. :) बघ लिहायची सवय नसल्यानी हे अस तत्व वगैरे आल की चुका होतात. पास केल्याबद्दल आभारी आहे.कित्ती कित्ती छान! :)

मी आणि माझी मैत्रीण कॅन्टीन मध्ये कॉफी घेत होतो. तिच्याकडे 'बघण्याचे'कार्यक्रम चालू होते. मी: काय मग? कसा होता कालचा मुलगा? ती:मुलगा ओके होता पण he is not cool मी: का? काय झाल? सेटल तर आहे मस्त ती: हो ग… पण तो स्मोकिंग नाही करत आणि ड्रिंक्स तर अजिबात घेत नहि. सो बोरिंग … मी आणि कॉफी दोन्ही गार!

In reply to by इन कम

तुमच्या मैत्रिणिचा प्रॉब्लेम सॉल्व झाला असं समजा. वरच्या काही प्रतिक्रियांत बघा, एक जण ड्रिंक्स घेणारा (आणि लग्नाचा पण) आहे :)

मुविंना खरंच काही काम नव्हतं! 'धागा बनानेवाले, क्या तेरे मन में समायी...?' लग्न आणि लग्नविषयक चर्चा ह्या दोन गोष्टींवर कायदेशीर बंदी आणली गेली पाहिजे. निरर्थक वादविवाद! तोपर्यंत निदान धागा वाचनमात्र व्हायला हवा.

In reply to by एस

जोवर लोक सांसदीय भाषेत एकमेकांशी सामाजिक विषयांवर चर्चा करत आहे तोवर सदर धागे वाचनमात्र करणे म्हणजे लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणे होईल. आपल्या सूचनेवर पुनर्विचार करावा ही विनंती. बाकी कायदेशीर बंदीबाबत कायदेमंडळांकडे पत्रव्यवहार करू शकताच.

In reply to by श्रीरंग_जोशी

वाईच वारा आवलेचा प्यारा. (समीर हवा का झोंका चालीवर वाचावे. किंवा ह्यापी गो लक्की वाचले तरी चालेल)

In reply to by टवाळ कार्टा

इथल्या हौशी मंडळींना माहिती असेल ना रे त्याविषयी काढ एखादा काथ्याकुट धागा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

काथ्याकूट कशाला एकदा घेऊनच बघ ना!! नाही चढली तर तुला कळेल आणि चढली तर सोबतच्यांना!! =))

In reply to by सूड

गांधीजींचं नाव घेऊन मस्तानीसारखं पेय? आपल्याच्यानी हसू आवरलं नाही बुवा. किमान एखाद्या मिपा कट्ट्याला दोघे मिळून उपास तरी करावा (सद्भावना दिवस साजरा होईल).

In reply to by श्रीरंग_जोशी

शेळीच्या दूधाची मस्तानी चालेल? मला नाहीच चालणार. उपास करीन पण कट्ट्याच्या पवित्र दिवशी नको. एखादा पवित्र महिना पाहीन न करीन.

In reply to by अभ्या..

भावना अधिक महत्वाची त्यामुळे दूध कोणते याने फरक पडू नये. मिपाकट्ट्यापेक्षा अधिक पवित्र दिवस मिपाकरांसाठी कोणता असणार ;-) ?

In reply to by श्रीरंग_जोशी

भावना अधिक महत्वाची त्यामुळे दूध कोणते याने फरक पडू नये.
गायीचे दूध घ्यायला सांग त्याला

In reply to by अभ्या..

शेळीच्या दुधाची मस्तानी??????????????? उद्या केळाची बिर्यानी बनवशील लेका अभ्या. फुटलो ना वाचून मर्दाऽ =))

In reply to by बॅटमॅन

कच्च्या केळांचे कबाब बनू शकतात. संदर्भ: हिंदी चित्रपट बावर्ची (नायकाच्या भूमिकेत राजेश खन्ना). तर बिर्यानी बनायलाही हरकत नसावी =)) .

In reply to by बॅटमॅन

नियोजित वधु आणि वरांना मस्तानी नको नुसती छान कॉफी बनवता येते का हे पाहायला लागतं म्हणे हल्ली. बाकी शेळीला मध्ये आणल्याबद्दल अभ्याचा मौन धरून नैष्ठिक निषेध!

मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.
धाग्यात हे लिहिलेले....याबाबत कोणी काही लिहिले होते का या धाग्यावर?

हल्लीच्या मुली एकत्र कुटुंब पद्धतीत राहतील का? पुरेसे मोठे घर असेल तर? मुलगा चांगला असेल ,पुरेसा कमावता असेल तर? घरात dust bin नको, जेष्ठ नागरिक नको असले प्रतिसाद वाचून विचारतो आहे. - अजून लग्नाला वेळ असलेला पण मुलींच्या अपेक्षांनी धास्तावलेला साधा मुलगा

In reply to by साधा मुलगा

हल्लीच्या मुली एकत्र कुटुंब पद्धतीत राहतील का? पुरेसे मोठे घर असेल तर? मुलगा चांगला असेल ,पुरेसा कमावता असेल तर?
घर पुरेसं मोठं असेल तर राहीलं पाहीजे. तोट्यापेक्षा फायदेच जास्त असतात एकत्र कुटूंब पध्दतीत. कमीत कमी प्रयत्न केला पाहीजे. न जमल्यास चर्चा करून, सामंजस्याने, कटूता टाळून वेगळे व्हावे.

In reply to by साधा मुलगा

>>>> अजून लग्नाला वेळ असलेला पण मुलींच्या अपेक्षांनी धास्तावलेला साधा मुलगा जन्मतारीख काय? उंची किती? नोकरी काय करता?

ह्म्म एकंदरित अवघड प्रकरण आहे सध्या तरि, आपल्या कडे समाजाचा फार प्रभाव आहे सर्व गोश्टित , शिक्शण , लग्न , संसार, ईई . लोक मदतिला कमि पण अड्चणित टाकायला लगेच जातिल. समुपदेशक लोकांचि फार गरज आहे. माझ्या एका मुस्लिम मैत्रिणि च्या मुलिचे लग्न झाले, मुलगा निवड्तांना हुनर आहे ना एवधेच बघितले. म्हनजे नोकरि करित नाहि पण उद्योग करु शकतो ना एवढेच बघितले.

खरेच लग्न ठरवणे इतके अवघड आहे का ? वधु वरांच्या अपेक्षांचे मेळ घालण एइतके कॉम्प्लिकेटेद असेल असे मला वाटले नव्हते . वधुवरांच्या अपेक्षा म्यॅच करता यावा अन नीयरेस्ट नेबर ही सजेस्ट करता यावा ह्या साठी फार पुर्वी मी एक अ‍ॅल्गोरिथ्म लिहिला होता , तो वापरुन अ‍ॅप आणि म्यॅट्रीमोनियल बनवले तर तुफान चालल का ? ( इतर म्यॅट्रीमोनियलस सुध्दा सजेशन्स देतातच पण तुमच्या अपेक्षांच्या सर्वात जवळ कोण येते आणि तुम्ही कोणाच्या अपेक्षांच्या सर्वात जवळ जाता हे सांगणारा अ‍ॅल्गोरिथम नाहीये बाजारात बहुतेक ) लग्नाळुंच्या माहीतीपुर्ण मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत !!