Skip to main content

वधू आणि वरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत का?

लेखक मुक्त विहारि यांनी गुरुवार, 15/01/2015 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
मला बरेच जण विचारतात की बाबारे कशाला आखातात नौकरी करतो? कालच एक लेख वाचला. (http://www.misalpav.com/node/30015) आणि मनांत थोडे विचारांचे काहूर उठले म्हणून हा काथ्या कुटत आहे. माझी सौ.आई गेली ५-६ वर्षे वधू-वर सुचक मंडळांत काम करते.तिच्या मतानुसार, आजकाल मुलांच्या आणि विशेषतः मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. भरपूर शिक्षण, भरगच्च पगार, स्वतःचा फ्लॅट आणि चार-चाकी असल्याशिवाय मुलांनी लग्नाच्या बाजारात उतरू नये असे सौ.आईचे मत पडले. शिक्षण आणि नौकरी , हे जरी मुलांच्या हातात असले तरी वयाच्या २६-२८ वर्षी स्वतःचा फ्लॅट असणारी तरूण मंडळी किती असतील? एकतर मुलांना शिक्षण द्या.नौकरी मिळवून द्यायला प्रयत्न करा.फ्लॅट घेवून द्या. मुलींचे एक बरे असते.जबादारीने शिकतात.नौकरी मिळवतात.फ्लॅट घेवून द्यायची आवश्यकता नसते. ह्यापेक्षा मुलगी असती तर अजिबात गल्फ मध्ये आलो नसतो. माझे लग्न झाले (१९९२ साली) त्यावेळी माझ्याकडे काहीच न्हवते. शिक्षण : जेमतेम डिप्लोमा पगार : २२००/- नौकरी : खाजगी. जागा : भाड्याची त्यात परत उंदीर आणि साप हे बिनभाड्याचे पोट-भाडेकरू. इंधन : रॉकेल (हे मात्र भरपूर असायचे.शेजारीच सरकारमान्य धान्य-दुकान होते.) वाहन : समोरच्या शेजार्‍याने दिलेली सायकल. आता सांगा त्या काळात पण मला कुणी मुलगी दिली असती का?पण सुदैवाने बायको भेटली ती पण मनापासून प्रेम करणारी. लग्नानंतर स्वपैशावर आणि स्वबळावर (त्यात पण बायकोने खूप मदत केली.) शिक्षण पुर्ण केले. शिक्षण वाढले, तशी जबाबदारी पण वाढली आणि पगार पण वाढला. अद्याप स्वतःची जागा नसली तरी, बायकोच्या नावाने फ्लॅट आहे. दोन मोटरसायकली आहेत.उगाच हौस न्हणून एक चार-चाकी २/३ कि.मी. साठी वापरून पण झाली. थोडक्यात काय? तर लग्नाच्या वेळी ज्या-ज्या गोष्टी न्हवत्या त्या सगळ्या गोष्टी २२-२३ वर्षात आल्याच की.आज-उद्याकडे माझी पण मुले वधू संशोधन करतील.त्यांना पण हाच प्रश्र्न भेडसावेल का?हल्लीच्या मुली तडजोड करायला तयार असतात का? संसारात तडजोडीला पर्याय नाही, हेच माझ्या मते सत्य. डिस्केमर : मी मुलांचा बाप म्हणून माझे विचार व्यक्त करत आहे.मुलींच्या पालकांचे मत जाणून घ्यायला नक्कीच आवडेल..

वाचने 367191
प्रतिक्रिया 1423

प्रतिक्रिया

In reply to by अजया

बाकी सोडा ओ, तूर्तास या धाग्याकडून आमच्या अपेक्षा आहेत बर्‍याच. नक्की किती प्रतिसाद झेलू शकतो ते पहाञचे आहे. एक कमेंट टाकू बे दोन कमेंट टाकू दोन कमेंट टाकू बे तीन कमेंट टाकू

In reply to by बॅटमॅन

स्ट्रेस टेस्ट इनिशिएटिंग. लोडिंग एक्प्लोजीव्ज. प्लांटिंग डिटोनेटर. चेकिंग कनेक्शन्स. रिचिंग सेफ डिस्टन्स. ट्रिगर सेट. फायर इन होल!!! काsssSssबुsssSSsम!!! -मुलींच्या अवास्त्व वाढत्या अपेक्षांमुळे हल्ली अविवाहितांचे प्रमाण वाढत चाललं आहे का तसेच तरुणांची "कु"चंबणा होते आहे का?- (मेल्या खातय्स मार आता कॅप्टना. शीडात वारा भर आणि फुट) =))

In reply to by टवाळ कार्टा

अरे सोन्या. तुला काडी टाकणेचा वेगळा अर्थ सांगायला हवा का रे? अच्रट बाव्ल्ट मेला. मुलींच्या वाढत्या अपेक्षांनी तरुंणींची होणारी कुचंबणा हा १०००० करतानाचा विषय आहे काय समजलास. =))

In reply to by पैसा

निता - तुम्ही जे केलय व करताय ते एकदम योग्य आहे. तुम्हाला या कामात पाठिंबा देणारा अनुरुप जोडीदार मिळो ही शुभेच्छा!! आर्थिक अडचणी या तात्पुरत्या असतात. संपूर्ण आयुष्याचा विचार केला असता त्या आर्थिक अडचणींच्या रकमा खूप क्षुल्लक असतात. दुर्दैवाने बर्‍याच लोकांकडे तेवढी दूरदृष्टी नसते अन त्या अडचणींचा परिणाम नातेसंबंधावर होतो.

In reply to by निताकाळे

ओ नितातै....अस्ल्या मुलांना फाट्यावर मारायचे....मुलाचे असे विचार सुरवातीच्या बोलण्यातूनच समजत अस्तील तर ते चांग्लेच समजा...लग्नानंतर समजले तर कैच्याकै पस्तावाल
ani maji tr kahich apeksha nahi mulakadun me kontyahi paristhit adjust karyla tayr ahe,pn sarvch jan mala nakartyt
"मुलीच्या काहिच अपेक्षा नाहित" असे काही नस्ते हो....जोपर्यंत समोरचा हळू हळू बोलण्यातून अपेक्षा आहेत की नाहीत त्याचा अंदाज घ्यायला लागतो तेव्हा मुलींना त्यांच्या अपेक्षा सापडत जातात (आधीच माहित नसतील तर) आणि तुम्च्या नस्ल्या तरी तुम्च्या घरच्यांच्या अपेक्षा या तुम्च्याच नावावर खपवल्या जाणार....त्या अपेक्षांना नाकारण्याची धमक तुम्च्यात आहे का?....मी म्हणतो असावी...मुख्य प्रॉब्लेम मुलांमध्ये नाही तर "तुम्च्या समोर कोणती मुले यावीत" हे ठरवणार्या सेलेक्शन प्रोसेसचा आहे... पटले तर विचार करा....नैतर सोडून द्या....

In reply to by बॅटमॅन

चायला आप्ले हे प्रतिसाद अनाहितांना दिसू नये असे काही सेटिंग करून ठेवले आहे कै मिपावर? ;)

In reply to by टवाळ कार्टा

सगळीकडे अनाहिता ! मोगल सैन्य झालंय का तुझं? ( :प झाले इथेच २-४ हजार ) हे प्रतिसाद दिसतायेत आणि अर्थात च सहमती आहे पण निता ताईंची समस्या खुप ठळक पणे चूक बरोबर वेगळे करुन दाखवते ( ब्लॅक अँड व्हाईट) . मतमतांतरं तेंव्हा जास्त येतात तेंव्हा ग्रे एरीआ असतो. जसं आता जे पी ने लिहीलंय. खरंच पहिल्या मुद्द्यात काय चूक आहे? मुलं नाही का सांगत "माझी फिरतीची नोकरी आहे", "आज ना उद्या मी अमेरिकेत जाणार च", "मी आताच अमेरिकेत आहे" वगैरे? मुद्दा हा असतो की एक पार्टनर खुप बिझी असेल तर दुसार्‍याला जादा भार उचलावा लागतो ते सगळं जमेल का? दोघांचं करीअर हे सपोर्ट सिस्टीम असल्याशिवाय होत नाही तशी ती मिळेल ना हे समजुन घ्यायला मुलीने सांगितलं की मी महत्वाकांक्षी आहे तर काय बिघडलं? कुणाला नको असेल ती मुलगी तर आवडीचा , रीलेटिविटीचा, सबजेक्टिविटीचा भाग आला. त्यामुळे यात काळं पांढरं काही नाही. म्हणुन मतं भिन्न पडतात आणि ती ज्या पद्धतीने मांडली जातात त्यामुळे बहुतांश वेळा वाद सुरु होतात.

In reply to by स्रुजा

सगळीकडे अनाहिता !
अनाहिता तो मिपाकी जान है...अनाहितांशिवाय मिपा हे मिपा राहील काय :)
मोगल सैन्य झालंय का तुझं?
खि खि खि....आता दरेकर पण हजेरी लावून जातील =))
मतमतांतरं तेंव्हा जास्त येतात तेंव्हा ग्रे एरीआ असतो. जसं आता जे पी ने लिहीलंय. खरंच पहिल्या मुद्द्यात काय चूक आहे? मुलं नाही का सांगत "माझी फिरतीची नोकरी आहे", "आज ना उद्या मी अमेरिकेत जाणार च", "मी आताच अमेरिकेत आहे" वगैरे? मुद्दा हा असतो की एक पार्टनर खुप बिझी असेल तर दुसार्‍याला जादा भार उचलावा लागतो ते सगळं जमेल का? दोघांचं करीअर हे सपोर्ट सिस्टीम असल्याशिवाय होत नाही तशी ती मिळेल ना हे समजुन घ्यायला मुलीने सांगितलं की मी महत्वाकांक्षी आहे तर काय बिघडलं? कुणाला नको असेल ती मुलगी तर आवडीचा , रीलेटिविटीचा, सबजेक्टिविटीचा भाग आला. त्यामुळे यात काळं पांढरं काही नाही. म्हणुन मतं भिन्न पडतात आणि ती ज्या पद्धतीने मांडली जातात त्यामुळे बहुतांश वेळा वाद सुरु होतात.
एकदम सहमत....चायला या गोष्टी लग्न ठरवताना का नाही डिस्कस करत....घरातल्या बाकीच्यांना नसेल समजत पण ज्यांना लग्न करायचे आहे त्यांना नको समजायला

In reply to by बॅटमॅन

यावर एक खंग्री प्रतिसाद द्यायला हात शिवशिवत आहेत....आख्खे आग्यामोहोळ येईल धावून माझ्यावर =)) बहुत काय लिहिणें...तुम्ही शहाणे आहात...समजोनी घेणें ;)

In reply to by टवाळ कार्टा

खिक ! मी मुद्दाम च खोडी काढली होती. सम्जोन घेतलं आहे कल्जी क्रु नये ;) तू हो पुढे, मी आहेच खुसपटं काढायला. पाच हजार करायचे आहेत ना? मग झालं तर .. खंग्री बिंग्री च्या मोहात न पडता एक एक प्रतिसाद देत राहायचं.

In reply to by स्रुजा

best बाकी तो प्रतिसाद जर्रा जास्तच खंग्री झाला अस्ता (हिंट - "** अस्ते???") मला लाडोबा म्हणतात ना...मग मी अस्से कस्से वैट ल्हिन :) खि खि खि....विकांत आहे ना....सत्कारणी लागेल =))

In reply to by टवाळ कार्टा

ते जौ दे. तु आशा परेरा बरोबर ब्लाईंड डेट ला गेलेलास त्याचं काय झालं ते सांग की टक्या.

In reply to by टवाळ कार्टा

असं एका वाक्यात नाही कटवायचं. =)) नीट डिट्टेल्वारीने लिहायचं. अगदी मी हापिसातुन निघालो आणि अमुक तमुक रेस्तॉरामधे वाट बघत बसलो इथपासुन ते तु जीव वाचवुन पळेपर्यंतचं सगळ डिटेलात लिही रे. हौ कॅन वी हेल्प इफ वी आर ब्लाईंड टु डिटेल्स?????????!!

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

अगदी!! इथे लाल रंगाचा डबा तुझ्या हातात देतायेत लोक आणि तू सदाशिवपेठेत पत्ता विचारायला सांगितल्यासारखा आढेवेढे घेतोयेस.

In reply to by टवाळ कार्टा

aaaaaaa

In reply to by निताकाळे

नीताताई, प्रथम तुमचे कौतुक. स्वतःच्या आईवडिलांच्या कष्टांची जाणीव तुम्हांला आहे आणि स्वतःहून तुम्ही त्यात तुमचा वाटा उचलला आहे हे पाहून 'मुलगा म्हणजेच वंशाचा दिवा'छाप लोकांच्या डोळ्यांवरची पट्टी उतरेल असे वाटते. वर इतरांनीही सांगितल्याप्रमाणे तुमच्या दृष्टिकोनाचा आदर करणारा तुम्हांला अनुरूप असा मुलगा तुम्हांला नक्की भेटेल. जगरहाटीत असे नकारात्मक, धक्कादायक अनुभव नेहमीच येतील असे नाही. काही माणसे समजूतदार असतातही. आपण माणसांमधलं सोनं वेचावं. मातीच्या ढिगार्‍यांकडे लक्ष देऊ नये. तुम्ही उत्तमरित्या तुमचं करिअर घडवा. कर्जेतर फेडालच, आर्थिक स्थैर्यही मिळवाल असा विश्वास वाटतो. मनःपूर्वक शुभेच्छा!

सीख हम बितें युगौंसे, नये युग का करे स्वागत, करे स्वागत, करे स्वागत, करे स्वागतSSSSS... पुंऊऊऊऊऊS..S..S..S

वधुच्या अपेक्षा- 1) मला करियर करायचे आहे.माझ्या महत्वकांक्षा आहेत. 2)जेष्ठ नागरिक चालणार नाहीत. 3) आपण मित्रांसारखे राहु. --- माझे उत्तर- ताई राखी बांधायला ये पुढच्या वर्षी...

In reply to by स्रुजा

यातल्या पहिल्या मुद्द्यात काय प्रॉब्लेम आहे? तिसरा मुद्दा समजू शकतो. मित्रांसारखे राहू मधे मित्राचं सगळं वापरणं गृहीत असतं. सकाळची टूथपेस्ट ते रात्रीची मच्छरदाणी काहीही! आणि परतफेड शून्य. पर्वडत नाय! ;)

In reply to by जेपी

जेप्या...यातल्या कोणत्या मुद्द्यांना तुझा आक्षेप आहे? मी २ नंबरचा नक्की पकडलाय पण ते चूक असले तरी सांग =))

In reply to by टवाळ कार्टा

आपला आक्षेप 3 नी मुद्याला आहे. 1)करियर कर पण त्याला ambition बनवु नको. 2) family always first. 3)नवरा बायको ..मित्रांसारखे कसे राहु शकतात??

In reply to by टवाळ कार्टा

मांड मत..कदाचित काहि नव निघेल. -- असो त्या मुलीचे तिन्ही मुद्दे मान्य केले तर ..लग्न या शब्दात तरी का अडकायच?? या मुद्यावर लगेच माघार घेतली तिने.

In reply to by जेपी

हे फक्त तु रिक्वेस्ट केलीस म्हणून....आणि मी लिहिलेली मते माझी वैयक्तीक मते आहेत
वधुच्या अपेक्षा- 1) मला करियर करायचे आहे.माझ्या महत्वकांक्षा आहेत. 2)जेष्ठ नागरिक चालणार नाहीत. 3) आपण मित्रांसारखे राहु.
१) मुलींमध्ये "करियर + महत्वकांक्षा" असणार्या / नसणार्या / काही काळापुरत्या या गोष्टी महत्वाच्या मानणार्या / स्वतःलाच माहीत नसणार्या / स्वतःलाच माहीत नसणार्या पण मुलाने विचारले की मग विचार करणार्या असे व इतर अनेक काँबिनेशन्स असणारे टैप असतात...समोरच्या मुलीचे विचार तुझ्या विचारांशी मॅच नसतील होत तर तिला बदलायला / अ‍ॅडजेस्ट करायला लावण्यापेक्षा दुसरी मुलगी शोध...प्रत्येकाची अ‍ॅडजस्ट करायची क्षमता वेगवेगळी असते २) याबाबत काळे/पांढरे असे नसते....प्रत्येकाचे वेगवेगळे कारण असू शकते...तस्मात याबाबत मी काहीही लिहू शकत नाही ३) Personally I would anytime prefer a girl having this kind of approach....

माझ्या मी उपवर तरुण असतो तर या धाग्यावर उपवर तरुणांकडून फारसे मूल्यवर्धन करणारे प्रतिसाद आले नाहीत. हरकत नाही. या निमित्ताने तो धागा वाचला जावा अन त्यावर द्यायचे प्रतिसाद इथे दिले जावे म्हणजे मिशन ५००० मध्ये मोलाची भर टाकली जाईल. आगावू धन्यवाद.

In reply to by टवाळ कार्टा

ज्या समस्या सुटाव्या असे वाटते त्या आहे तशाच स्वीकारल्याशिवाय सोडवायच्या कशा? वास्तव आपल्याला पटत नसले तरी जे आहे त्याचा अनुल्लेख केल्याने ते बदलत नसतं.

In reply to by श्रीरंग_जोशी

विकेट कीपरने ओवरथ्रो केला आहे त्यामुळे आणखी एक धाव काढू शकतोस ;-) .

रविवारी सकाळी सकाळी वडिलांचा फोन आला , "तुझी उंची किती आहे ? एक जण आलेत माहिती मागताएत ! "(यावेळी घरी जाईन तेव्हा बॉम्ब फुटणार आहे बहुतेक )

१३००

१३०१

१३०३ . मुवि ३-१३ वाजायच्या आत वाचनमात्र करुन घ्या धागा. कंटाळा आला आता.

In reply to by अभ्या..

हे काय अभ्या भौ. काही षटके निर्धाव जातात. आणि आता तर काय विकांत आहे. पब्लीक घरचे आंतरजाल खर्च करून मिपा कधी बघायला शिकणार देव जाणे. जो स्वतःच्या पैशाने घेतलेले नेट वापरून मिपावर येतो तोच खरा मिपाकर. तो जेपी बघा...

In reply to by खटपट्या

जो स्वतःच्या पैशाने घेतलेले नेट वापरून मिपावर येतो तोच खरा मिपाकर. हायला म्हणजे आम्ही डब्बल (नाही ट्रिपल) खरे मिपाकर एक -- आडनावाने खरे दोन -- घरी स्वताच्या खर्चाने नेट आहे तीन -- दवाखान्यातही नेटचा खर्च स्वतःचा आहे.

In reply to by खटपट्या

आम्ही हपिसाताले नेट वापरतो पण हपिसचे बिल सोताच भरतो. मोबाईलचे तर भरल्याशिवाय पर्याय नाहि. एकूण खरे मध्ये धरुन चाला मला बी.