✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

"हाय"कू

न — नाखु, Wed, 10/07/2015 - 09:37

"हाय"कू

"हाय"कू हा प्रकार समजवण्याचा नाही समजण्याचा आहे. लेखक मकदूरांना त्यांचे प्रेरणास्थान श्री श्री श्री श्री आत्मुदा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे).यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला. पुणे प्रांतीही त्यांना केलेली आर्त विनवणी दुर्लक्षली गेली आणि आम्हाला अंगठा दाखविला. ( त्या अंगठ्याला चुना होता असे वल्लींचा अंदाज आहे, त्या मुळे तो अंगठा आमच्या विनवणीसाठी ठेंगा म्हणून होता का चैतन्यचूर्ण करामत हे कळाले नाही. आमच्या भीडस्त आणि कोकरू मनाने तो प्रोत्साहन "थम्स अप" या अर्थाने घेऊन समजूत घातली.) शेवटी बॅटोबांशी संपर्क केला तर ते गारव्या यांच्या "गीतेतील ऊकार आणि मिपातील टुकार एक अन्योन्य कार्यकारण भाव” या शोधनिबंधासाठी मार्गदर्शक म्हणून व्यग्र आहेत असे समजले. आम्ही खट्टू मनाने गुरुजी प्रतीमा डोळ्यासमोर आणून पुढील काव्य-जिलेबी पीठ लावायला घेतले आणि...... खास मिपाकरांसाठी ताट सजवले. ****** ब्लॉग रद्दी थोपु सद्दी वाचक रिता सुना सुना ================= धागा पिसाट गर्दभ सुसाट खेळ नव्याने जुना जुना ================= भाव विभोर हाव छचोर साद घालीसी पुन्हा पुन्हा ================== हळूच कट्टा मिटवू बट्टा भांड्याची आठवण गुन्हा गुन्हा ====================== खफ जोगवा लेख नागवा किंचाळे मनगटी चुना चुना ===================
अखिल मिपा "हाय"खालेल्या कुप्रसीद्ध चिमण हटेला मित्र परीवार आणि सत्कार मूर्ती जेपी संचालीत ट का मिपा साक्षर ते सु(र्)शिक्षीत योजना यांचे सहकार्याने आणि प्रोत्साहनाने.
  • हायकु (कायकु)-२

Book traversal links for "हाय"कू

  • हायकु (कायकु)-२ ›

प्रतिक्रिया द्या
27030 वाचन

💬 प्रतिसाद (50)

भारी कविता

दमामि
Wed, 10/07/2015 - 09:47 नवीन
भारी कविता तुम्ही लिहिता आठवे ब्रम्हेंची लुना लुना ( तेवढं एकच यमक शिल्लक होतं)
  • Log in or register to post comments

हहा हहा हहा हहा!!! :-D

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/07/2015 - 10:21 नवीन
हहा हहा हहा हहा!!! :-D गळका नळ फाटकं टमरेल थेंब थेंब पाणी पुन्हा पुन्हा आगोबा रांगेत डब्डे टांगेत घूसखोर आहे जुना जुना :-D
  • Log in or register to post comments

क्या बात है !

सस्नेह
Wed, 10/07/2015 - 10:42 नवीन
बुवा रॉक्स !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी

प्रचेतस
Wed, 10/07/2015 - 19:52 नवीन
सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी बुवाची धाव टमरेलापर्यंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सांगतोच सरांना.

अभ्या..
गुरुवार, 10/08/2015 - 00:08 नवीन
सांगतोच सरांना. तुम्हाला सरडा म्हणला म्हणून.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

@बुवाची धाव टमरेलापर्यंत.>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/08/2015 - 00:25 नवीन
@बुवाची धाव टमरेलापर्यंत.>> अपेक्षित निरर्थक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

'अत्मरंजन' लिवायचं राहिलं काय

सस्नेह
Fri, 10/09/2015 - 16:00 नवीन
'अत्मरंजन' लिवायचं राहिलं काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

सिंव्हाचा गड

टवाळ कार्टा
Wed, 10/07/2015 - 11:59 नवीन
सिंव्हाचा गड चोहिकडे हिरवळ उत्कटतेस साक्षी कोना कोना ;)
  • Log in or register to post comments

मस्त...

सतिश गावडे
Wed, 10/07/2015 - 13:11 नवीन
लेखातील हायकू प्रचंड आवडले. प्रतिसादात इतरांनी ठिगळं लावलीच आहेत तर मी ही एका गीताची आठवण करुन देतो. गीत गायले आहे लोकसंगितातील नामवंत गायकाने. गाण्याची सुरुवात "ना"चे यमक साधणारी काहिशी अशी आहे *(माझ्या बायकोचा) सांगू किती मी चांगुलपणा असल्यावरती टनाटना नसल्यावर मग कणाकणा *ही ओळ नेमकी आठवत नाही.
  • Log in or register to post comments

ढळला पदर,

तर्राट जोकर
Wed, 10/07/2015 - 13:36 नवीन
ढळला पदर, बाजारी गदर, वेड लावी कुणा कुणा कुजकट जळला राखेत कळला देह संपतो जुना जुना काचेवर टकटक बघतो एकटक सिग्नलवर विकतो चणा चणा आरती इथे लक्ष तिथे दूध जातंय का उतू क्षणा क्षणा
  • Log in or register to post comments

दुसरा आवडला.

सतिश गावडे
Wed, 10/07/2015 - 13:46 नवीन
दुसरा आवडला. पहिल्यामध्ये "गदर" काही अर्थाने वापरला आहे की नुसताच यमकी फिलर आहे? :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

गदर म्हणजे बंडाळी किंवा

प्यारे१
Wed, 10/07/2015 - 13:51 नवीन
गदर म्हणजे बंडाळी किंवा हाराकिरि सदृश परिस्थिति... अर्थ बरोबर बसतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

@सतिश, प्यारे म्हणतायत तसंच.

तर्राट जोकर
Wed, 10/07/2015 - 13:54 नवीन
@सतिश, प्यारे म्हणतायत तसंच. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

प्यारे आणि तर्राट जोकर, आभारी

सतिश गावडे
Wed, 10/07/2015 - 14:00 नवीन
प्यारे आणि तर्राट जोकर, आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्राट जोकर

हयकु मस्त जमलेत नाखुकाका.

किसन शिंदे
Wed, 10/07/2015 - 13:46 नवीन
हयकु मस्त जमलेत नाखुकाका.
  • Log in or register to post comments

मस्तं हायकू. आवडलं.

पद्मावति
Wed, 10/07/2015 - 13:53 नवीन
मस्तं हायकू. आवडलं.
  • Log in or register to post comments

नाखुनकाका मस्त जमलेत हायकू.

प्यारे१
Wed, 10/07/2015 - 13:57 नवीन
नाखुनकाका मस्त जमलेत हायकू. इतरांचे हायकू सुद्धा त्यांच्या त्यांच्या 'सोच के अनुसार' च उतरले आहेत.
  • Log in or register to post comments

सर्वनाखुहायकुआवडलेलेआहेत

अजया
Wed, 10/07/2015 - 14:13 नवीन
सर्वनाखुहायकुआवडलेलेआहेत।स्पेसबाररहितप्रतिसादकसंघाकडूननाखुहितार्थजारी
  • Log in or register to post comments

तुम्च्याल्याप्टोप्चाकिबोर्ड्ख

टवाळ कार्टा
Wed, 10/07/2015 - 14:27 नवीन
तुम्च्याल्याप्टोप्चाकिबोर्ड्ख्राब्झाल्लाहेब्घून्वैट्टवाट्ले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

देवाचीमर्जीपुसातेडोळेजास्त्वा

अजया
Wed, 10/07/2015 - 16:44 नवीन
देवाचीमर्जीपुसातेडोळेजास्त्वाइ्टवाटु्नघेऊनकाहिविनंती;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

माझेड्वाळेपाणाव्व्ल्लेअस्सेतु

टवाळ कार्टा
Wed, 10/07/2015 - 16:58 नवीन
माझेड्वाळेपाणाव्व्ल्लेअस्सेतुम्ह्ल्लाक्कावाट्ले
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

वाइट्वाट्लेकील्हान्पोरेगळाकाढ

अजया
गुरुवार, 10/08/2015 - 08:14 नवीन
वाइट्वाट्लेकील्हान्पोरेगळाकाढुन्रडतात्महणून
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टवाळ कार्टा

मग्ल्हान्पोरांन्नाघेउन्खेळाय्

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/08/2015 - 12:05 नवीन
मग्ल्हान्पोरांन्नाघेउन्खेळाय्ल्लाघेव्वून्ज्जा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

आवडले..

जेपी
Wed, 10/07/2015 - 14:23 नवीन
आवडले..
  • Log in or register to post comments

जमलंय!

सूड
Wed, 10/07/2015 - 14:37 नवीन
जमलंय!
यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला.
हे फार बरं झालं. =)) तुम्ही मार्गदर्शनाशिवाय मस्त लिहीलं आहे. 'दोन कवि येती तेथे कवितेची माती' हे संतवचन लक्षात ठेवा.
  • Log in or register to post comments

हायकू म्हणजे नेमकं काय?

शब्दवेडी
Wed, 10/07/2015 - 15:08 नवीन
हायकू म्हणजे नेमकं काय? त्याचे पण प्रकार असतात का?
  • Log in or register to post comments

:) आवडले.

मधुरा देशपांडे
Wed, 10/07/2015 - 15:09 नवीन
:) आवडले.
  • Log in or register to post comments

एकापेक्षा एक खतरनाक हायकू

प्रचेतस
Wed, 10/07/2015 - 16:14 नवीन
एकापेक्षा एक खतरनाक हायकू झालेत.
  • Log in or register to post comments

नाखुन काका

बॅटमॅन
Wed, 10/07/2015 - 16:38 नवीन
नाखुन काका काव्य सपाटा काढि पिसांना पटा पटा!
  • Log in or register to post comments

गद्य लेखन

दिवाकर कुलकर्णी
Wed, 10/07/2015 - 18:19 नवीन
गद्य लेखन पद्य लेखन सर्व लेखन वंद्य लेखन ष्टाईल्च भारी है भाई
  • Log in or register to post comments

=))

पैसा
Wed, 10/07/2015 - 18:34 नवीन
=)) नाख़ुनचे हायकु भिताय कायकु नवलेखकाना जुने म्हणा!
  • Log in or register to post comments

किंचित बदल

अन्या दातार
Wed, 10/07/2015 - 18:42 नवीन
नवलेखकांना 'आपले' म्हणा हे जास्त चांगलं वाटतय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हॅहे

पैसा
Wed, 10/07/2015 - 18:57 नवीन
ते मी नव्या बाटलीत जुनी दारु वगैरे अर्थानी म्हटले होते. हायकू मधे बरेच अर्थ दडलेले असतात ना! पण हेही चालेल!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अन्या दातार

चारोलीचे हायकु

दिवाकर कुलकर्णी
Wed, 10/07/2015 - 19:34 नवीन
चारोलीचे हायकु भितोय कायकु भ्यायास्नी आमाय हाय कि घरा याक बायकु ( तिस इचारूण शाण लिवल्याल हाय )
  • Log in or register to post comments

आवडला हा प्रकार. मी पण ट्राय करतो.

जव्हेरगंज
Wed, 10/07/2015 - 20:04 नवीन
उंच शीडी चढतेय कुडी खालचं रान ठणाणा रांगडा गडी धरुन तंगडी जोर काढी खणाणा
  • Log in or register to post comments

मस्त हायकू

मित्रहो
Wed, 10/07/2015 - 20:04 नवीन
एकापेक्षा हायकू सांगती नाखु बाकी सारे मम म्हणा
  • Log in or register to post comments

गुर्जीँची खप्पामर्जी? ती का

रातराणी
Wed, 10/07/2015 - 23:11 नवीन
गुर्जीँची खप्पामर्जी? ती का म्हणे?
  • Log in or register to post comments

कालचीच स्क्रिप्ट

रातराणी
Wed, 10/07/2015 - 23:53 नवीन
कालचीच स्क्रिप्ट कालचाच बग लंचटाइम झाला पळा पळा. हे गुर्जीन्साठी गुर्जी नाराज कुणाचा आवाज धोतर तुमचे सांभाळा सांभाळा. रुसू नका बरे! :)
  • Log in or register to post comments

मस्त...

मदनबाण
गुरुवार, 10/08/2015 - 03:27 नवीन
मस्त... @ आत्मास्तु हॅहॅहॅ... ;) मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Ittage Recchipodham... ;) :- Temper
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
गुरुवार, 10/08/2015 - 06:40 नवीन
शेतकरी मरतो मोदी फिरतो नवा देश पुन्हा पुन्हा
  • Log in or register to post comments

तेच पीठ

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/08/2015 - 08:49 नवीन
तेच पीठ तीच जिल्बि मती मंद तू रे जुना जुना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

कधी हि तेस

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/08/2015 - 12:04 नवीन
कधी हि तेस कधी जीनी यस येती पुन्हा माई-नाना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

कंचाबी इश्श्यू

बॅटमॅन
गुरुवार, 10/08/2015 - 14:09 नवीन
कंचाबी इश्श्यू धरता टिश्श्यू लावी जनां तो चुना चुना खमके उत्तर यमकी लक्तर "बुवा मस्त!" म्हणा म्हणा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

आरारा =))

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/08/2015 - 14:46 नवीन
आरारा =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

खमके उत्तर

अत्रुप्त आत्मा
Fri, 10/09/2015 - 15:16 नवीन
खमके उत्तर यमकी लक्तर "बुवा मस्त!" म्हणा म्हणा
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

लैच भारी.. बर्‍याच दिसांनी

कोमल
गुरुवार, 10/08/2015 - 08:30 नवीन
लैच भारी.. बर्‍याच दिसांनी चांगली जिल्बी खाल्ली. हैकूदाता सुखी भव| @दादादरेकर कसं जमतं हो तुम्हाला सगळ्या गोष्टी मोदींना चिकटवायला??
  • Log in or register to post comments

खुप चांगले आहेत हाय कू...

अभिजीत अवलिया
Fri, 10/09/2015 - 07:20 नवीन
खुप चांगले आहेत हाय कू...
  • Log in or register to post comments

आमची पण येक

चौकटराजा
Sat, 10/10/2015 - 16:59 नवीन
बुवा रॉक्स खवट फॉक्स करतो टॉक्स अगोबाच्या नावाने ठणा ठणा
  • Log in or register to post comments

हायकू भन्नाट ! खूप आवडले

बाजीगर
Mon, 10/19/2015 - 03:07 नवीन
आधी ते बाबरी आता हे दादरी, सहीष्णूतेचा गुन्हा पुन्हा
  • Log in or register to post comments

झाला खून एक

प्यारे१
Mon, 10/19/2015 - 16:37 नवीन
झाला खून एक पडती मुडदे अनेक मरते लोकशाही पुन्हा पुन्हा असू दे की हिंदू असो मुसलमान वारतो तो धर्म पुन्हा पुन्हा हाती असो तलवार असो ती कृपाण चिरते ते सत्य पुन्हा पुन्हा खाऊ आम्ही शाक किंवा खाऊ पाव जाई सुळी येशू पुन्हा पुन्हा नकोच ती नीती नको मज पंथ जगवा माणुसकी पुन्हा पुन्हा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा