Skip to main content

"हाय"कू

लेखक नाखु यांनी बुधवार, 07/10/2015 09:37 या दिवशी प्रकाशित केले.

"हाय"कू

"हाय"कू हा प्रकार समजवण्याचा नाही समजण्याचा आहे. लेखक मकदूरांना त्यांचे प्रेरणास्थान श्री श्री श्री श्री आत्मुदा (इथे आपला उजवा हात आपल्याच उजव्या आणि डाव्या कानाला लावेल न लावेल असा स्पर्श करणे अतिआवश्यक आहे).यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला. पुणे प्रांतीही त्यांना केलेली आर्त विनवणी दुर्लक्षली गेली आणि आम्हाला अंगठा दाखविला. ( त्या अंगठ्याला चुना होता असे वल्लींचा अंदाज आहे, त्या मुळे तो अंगठा आमच्या विनवणीसाठी ठेंगा म्हणून होता का चैतन्यचूर्ण करामत हे कळाले नाही. आमच्या भीडस्त आणि कोकरू मनाने तो प्रोत्साहन "थम्स अप" या अर्थाने घेऊन समजूत घातली.) शेवटी बॅटोबांशी संपर्क केला तर ते गारव्या यांच्या "गीतेतील ऊकार आणि मिपातील टुकार एक अन्योन्य कार्यकारण भाव” या शोधनिबंधासाठी मार्गदर्शक म्हणून व्यग्र आहेत असे समजले. आम्ही खट्टू मनाने गुरुजी प्रतीमा डोळ्यासमोर आणून पुढील काव्य-जिलेबी पीठ लावायला घेतले आणि...... खास मिपाकरांसाठी ताट सजवले. ****** ब्लॉग रद्दी थोपु सद्दी वाचक रिता सुना सुना ================= धागा पिसाट गर्दभ सुसाट खेळ नव्याने जुना जुना ================= भाव विभोर हाव छचोर साद घालीसी पुन्हा पुन्हा ================== हळूच कट्टा मिटवू बट्टा भांड्याची आठवण गुन्हा गुन्हा ====================== खफ जोगवा लेख नागवा किंचाळे मनगटी चुना चुना ===================
अखिल मिपा "हाय"खालेल्या कुप्रसीद्ध चिमण हटेला मित्र परीवार आणि सत्कार मूर्ती जेपी संचालीत ट का मिपा साक्षर ते सु(र्)शिक्षीत योजना यांचे सहकार्याने आणि प्रोत्साहनाने.

वाचने 27136
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

हहा हहा हहा हहा!!! :-D गळका नळ फाटकं टमरेल थेंब थेंब पाणी पुन्हा पुन्हा आगोबा रांगेत डब्डे टांगेत घूसखोर आहे जुना जुना :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

सरड्याची धाव कुंपणापर्यंत तशी बुवाची धाव टमरेलापर्यंत.

In reply to by प्रचेतस

@बुवाची धाव टमरेलापर्यंत.>> अपेक्षित निरर्थक

लेखातील हायकू प्रचंड आवडले. प्रतिसादात इतरांनी ठिगळं लावलीच आहेत तर मी ही एका गीताची आठवण करुन देतो. गीत गायले आहे लोकसंगितातील नामवंत गायकाने. गाण्याची सुरुवात "ना"चे यमक साधणारी काहिशी अशी आहे *(माझ्या बायकोचा) सांगू किती मी चांगुलपणा असल्यावरती टनाटना नसल्यावर मग कणाकणा *ही ओळ नेमकी आठवत नाही.

ढळला पदर, बाजारी गदर, वेड लावी कुणा कुणा कुजकट जळला राखेत कळला देह संपतो जुना जुना काचेवर टकटक बघतो एकटक सिग्नलवर विकतो चणा चणा आरती इथे लक्ष तिथे दूध जातंय का उतू क्षणा क्षणा

In reply to by तर्राट जोकर

दुसरा आवडला. पहिल्यामध्ये "गदर" काही अर्थाने वापरला आहे की नुसताच यमकी फिलर आहे? :)

In reply to by सतिश गावडे

गदर म्हणजे बंडाळी किंवा हाराकिरि सदृश परिस्थिति... अर्थ बरोबर बसतोय.

नाखुनकाका मस्त जमलेत हायकू. इतरांचे हायकू सुद्धा त्यांच्या त्यांच्या 'सोच के अनुसार' च उतरले आहेत.

In reply to by अजया

तुम्च्याल्याप्टोप्चाकिबोर्ड्ख्राब्झाल्लाहेब्घून्वैट्टवाट्ले :)

In reply to by टवाळ कार्टा

देवाचीमर्जीपुसातेडोळेजास्त्वाइ्टवाटु्नघेऊनकाहिविनंती;)

In reply to by अजया

माझेड्वाळेपाणाव्व्ल्लेअस्सेतुम्ह्ल्लाक्कावाट्ले

In reply to by टवाळ कार्टा

वाइट्वाट्लेकील्हान्पोरेगळाकाढुन्रडतात्महणून

In reply to by अजया

मग्ल्हान्पोरांन्नाघेउन्खेळाय्ल्लाघेव्वून्ज्जा

जमलंय!
यांनी कार्यबाहुल्याने आणी किंचीत खप्पामर्जी (कट्टप्पा मर्जी नाही) असलेने मार्गदर्शनास नकार दिला.
हे फार बरं झालं. =)) तुम्ही मार्गदर्शनाशिवाय मस्त लिहीलं आहे. 'दोन कवि येती तेथे कवितेची माती' हे संतवचन लक्षात ठेवा.

=)) नाख़ुनचे हायकु भिताय कायकु नवलेखकाना जुने म्हणा!

In reply to by अन्या दातार

ते मी नव्या बाटलीत जुनी दारु वगैरे अर्थानी म्हटले होते. हायकू मधे बरेच अर्थ दडलेले असतात ना! पण हेही चालेल!!

चारोलीचे हायकु भितोय कायकु भ्यायास्नी आमाय हाय कि घरा याक बायकु ( तिस इचारूण शाण लिवल्याल हाय )

कालचीच स्क्रिप्ट कालचाच बग लंचटाइम झाला पळा पळा. हे गुर्जीन्साठी गुर्जी नाराज कुणाचा आवाज धोतर तुमचे सांभाळा सांभाळा. रुसू नका बरे! :)

शेतकरी मरतो मोदी फिरतो नवा देश पुन्हा पुन्हा

In reply to by अत्रुप्त आत्मा

कंचाबी इश्श्यू धरता टिश्श्यू लावी जनां तो चुना चुना खमके उत्तर यमकी लक्तर "बुवा मस्त!" म्हणा म्हणा

लैच भारी.. बर्‍याच दिसांनी चांगली जिल्बी खाल्ली. हैकूदाता सुखी भव| @दादादरेकर कसं जमतं हो तुम्हाला सगळ्या गोष्टी मोदींना चिकटवायला??

झाला खून एक पडती मुडदे अनेक मरते लोकशाही पुन्हा पुन्हा असू दे की हिंदू असो मुसलमान वारतो तो धर्म पुन्हा पुन्हा हाती असो तलवार असो ती कृपाण चिरते ते सत्य पुन्हा पुन्हा खाऊ आम्ही शाक किंवा खाऊ पाव जाई सुळी येशू पुन्हा पुन्हा नकोच ती नीती नको मज पंथ जगवा माणुसकी पुन्हा पुन्हा