सप्टेंबर महिन्यातला शेवटचा शनिवार हा जगभरात 'सरिता दिन' म्हणून साजरा केला जातो.
(जगभरातील नद्यांचे प्रदूषण हा चिंतेचा विषय आहेच.) पण आजच्या दिवशी, परमपावन मानल्या गेलेल्या गंगेचे, तिच्या नितळ स्वरूपात केलेले स्मरण समयोचित ठरावे!
तू कावेरी तूच नर्मदा, गोदा भद्रा सरस्वती
तुझीच सारी अनंत रूपे, कृष्णा पद्मा शरावती
तू कल्याणी, नीरदायिनी
तुलाच नमितो सांबसदाशिव,
हरहर गंगे तुलाच स्मरती
भगिरथाचे पुत्र चिरंजीव
प्रकटयोगिनी बिकटगामिनी
तुझ्या तटाचे कडे निसरडे….
कितीक आले गेले भुलले
तुझ्या किनारी शांत निमाले
प्रयागसंगम अलख निरंजन
तुझ्यात फिरते चक्र चिरंतन
विशालसुंदर तरल निरंतर
तुझ्यात विरते माझे अंतर
पुण्यसलिला, मुक्ता माता
ये वेगे, जा घेऊन मजला
तव तीर्थाचा एक दिलासा,
जीवास थकल्या तोच विसावा
तू कावेरी, तूच नर्मदा........................
"Ganga Aarti at Varanasi ghats" by http://www.flickr.com/photos/u-suke/ - http://www.flickr.com/photos/u-suke/3156784664/. Licensed under CC BY 2.0 via Commons - https://commons.wikimedia.org/wiki/File:Ganga_Aarti_at_Varanasi_ghats.j…
(छायाचित्र विकि वरून साभार)
काव्यरस
वाचने
12474
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
संपा मंडळास विनंती.....
व्यनि पाठवला आहे
In reply to संपा मंडळास विनंती..... by शिव कन्या
पाहिला.
In reply to व्यनि पाठवला आहे by बहुगुणी
संपादक मंडळाचे आभार.
In reply to संपा मंडळास विनंती..... by शिव कन्या
कविता आवडली
प्रकटयोगिनी बिकटगामिनी तुझ्या तटाचे कडे निसरडे…. कितीक आले गेले भुलले तुझ्या किनारी शांत निमाले प्रयागसंगम अलख निरंजन तुझ्यात फिरते चक्र चिरंतन विशालसुंदर तरल निरंतर तुझ्यात विरते माझे अंतरयातला ताल सुंदर!सुंदर, अप्रतिम!!! लय तर
सुंदर कविता!
फारच छान लिहिलंत!
आपला दांभिकपणा हा काय वर्णावा
In reply to फारच छान लिहिलंत! by एस
अतिशय सुंदर
:-) अहंम संस्कृतम नैव जानामि!
In reply to अतिशय सुंदर by प्रचेतस
ऋग्वेदातल्या १० व्या मंडलात
In reply to :-) अहंम संस्कृतम नैव जानामि! by शिव कन्या
सुंदर ! म्हैती नव्हती ही नावं
In reply to ऋग्वेदातल्या १० व्या मंडलात by प्रचेतस
वाह!!!!!!!
सुरेख...
होय, नदीच्या कवितेला ताल, लय
In reply to सुरेख... by ज्ञानोबाचे पैजार
सुंदर काव्य. प्रदूषण हे
सुरेख लिहिलेय. खूप आवडले.
यशोधरा... तुमचा गंगेचा धागा
यशोधरा... तुमचा गंगेचा धागा
यशोधरा... तुमचा गंगेचा धागा
फार सुंदर. सुरेख कविता रचलीत.
__/\__
वा! लय ताल न प्रवाही!
सुरेख लिहिलंय
सुंदर कविता.
मला ही बया अजिबात आवडत नाह्वी.
हितं बाई कुठून आली?
In reply to मला ही बया अजिबात आवडत नाह्वी. by dadadarekar
अभ्यास वाढवा.
In reply to हितं बाई कुठून आली? by शिव कन्या
स्वतःच्या प्रवाहात गंगेने
In reply to अभ्यास वाढवा. by dadadarekar
हो
In reply to स्वतःच्या प्रवाहात गंगेने by यशोधरा
तुमच्या दौदला आत्तापरेंत
In reply to हो by dadadarekar
.
In reply to तुमच्या दौदला आत्तापरेंत by यशोधरा
तुम्हीच नेहमी म्हणता तसे ना.
In reply to . by dadadarekar
समज वाढवा.
In reply to अभ्यास वाढवा. by dadadarekar
वाह सुंदर स्पष्टीकरण!
In reply to समज वाढवा. by शिव कन्या
छान कविता
मी या व अशाच अनेक कारणानी हिंदू धर्म सोडला.
In reply to छान कविता by होबासराव