अहो एक अध्याय लिहायला लागेल आमच्या बायडीवर. मला काल तीचा फोन आला. दारावर टांगलेली दुधाची पिशवी कामाला जाताना नेलीत का? हे विचारायला.
मी एकदा मोबाईलच्या जागी टिवी रिमोट नेला होता म्हणुन काय झाले. "दुधाची पिशवी"- जरा जास्तच झाले हो.
माझ्यासारख्या विचीत्र प्राण्याबरोबर २३ वर्ष संसार केला म्हणुन तीला एक पदक द्यायला पाहिजे-इती आदिमाया दुर्बिट्णे.
पाकृबरोबर फोटो टाकीन कुटंबाचा.
माकडाला मोत्याची माळ असे आमचे हितशत्रु म्हणतात.
मुलाच्या बरोबर संगोपनाचे १००% श्रेय तीलाच.
माझ्यासारख्या विचीत्र प्राण्याबरोबर २३ वर्ष संसार केला म्हणुन तीला एक पदक द्यायला पाहिजे-
हे मात्र खरे हो! :)
माकडाला मोत्याची माळ असे आमचे हितशत्रु म्हणतात.
हा हा हा! :)
आपला,
( लग्न करून स्वत:चं माकड करून न घेतलेला :) ) तात्या.
मी एकदा मोबाईलच्या जागी टिवी रिमोट नेला होता म्हणुन काय झाले. "दुधाची पिशवी"- जरा जास्तच झाले हो.
हा हा हा हा.. हे मस्तच... दुधाची पिशवी नेली असतीत तर खरेच जास्त झालं असतं :)
-- लिखाळ.
आमच्या नात्यातल्या एकजण रोज आंघोळ झाल्यावर पंचा गुंडाळून पूजा वगैरे करायचे. तसे विसराळूच होते ते. एकदा पूजा वगैरे झाल्यावर ऑफिसला जायला पँट घातली पण पंचा काढायला विसरले. आत पंचा तसाच. तसेच गेले ऑफिसला. :)
बिपिन कार्यकर्ते
आधी मला हा धागा **** काढणे ने चालू केला की काय असंच वाटलं .. खरंच .. पण तात्याने काढलाय .. चांगल्या प्रतिक्रिया यायची अपेक्षा आहेत ..
आम्ही बैचलर असल्यामुळे आम्ही पण इथं बाद .. तसं होणारी सुन आहेच म्हणा मिपावर ! पण तात्याने ती अट टाकलेली आहे ..
मिपाची भावी सुन -- "जेन"
- जेनचा टारझन
माझ्या बायकोला मी इथल्या पाक कृती सांगतो आणि ती मला त्या करायला मदत करते ! ( हे वाक्य असेच आहे.... ती मला त्या करायला मदत करते .... टायपो मिस्टेक झालयाची शन्का कृपया काढु नये.)
पाक कृती च्या खाली लोकांच्या अनेक प्रकारच्या कमेन्ट्स असतात, असे सांगितले तर म्हणाली म्हणजे सगळे रिकामटेकडेच दिसताय की... आता काय बोलणार ?
> सेल्फ एक्सप्रेशन ने कुटंबाची ओळख करुन द्यायला पुर्ण वाव देणारा धागा आहे. <
बरोबर आहे.
या धाग्यावर काय लिहावे ते घरी विचारुन मग लिहीन. :)
--(एक्सप्रेसिव) लिखाळ.
तात्यांनी हा धागा सुरू करण्यापूर्वीच आम्ही आमच्या लग्नाचे, संसाराचे, परिचयोत्तर विवाहाचे, साथ-साथ विवाह अभ्यास मंडळातल्या अनुभवांचे, कन्येबाबतच्या (म्हणजे ती झाल्यानंतरच्या! ती होण्याबाबतच्या नव्हे! चावट!!) अनुभवांचे "दुकान' यापूर्वी अनेकदा इथे लावले आहे. अधून-मधून ब्लॉगवरच्या तपशीलवार वर्णनाचे संदर्भही दिले आहेत. बायकोच्या डोहाळजेवणाच्या वेळी केलेल्या भोचक आणि आगाऊ काव्याचा रसास्वादही मिपाकरांना घडविला आहे. त्याचा त्यांनी किती आनंद घेतला आणि कुणाकुणाच्या पोटात मळमळले, याची कल्पना नाही. तर ते असो. आता तात्यांनी पुन्हा एकदा संधी दिल्याने, आमचे हे दुकान!
लग्नाच्या बाजारात साधारपणपणे सत्ताविसाव्या वर्षी उतरलो, पण लग्न जमता जमत नव्हतं. जगात आपणच एकमेव "मोस्ट एलिजिबल बॅचलर' असल्याचा फुगा फुटायला सहा महिने हात पोळून घ्यावे लागले. चहा-पोहे कार्यक्रमांचे हे अनुभव भीषण होते. (त्याविषयी नंतर कधीतरी!) एकतर मूळचा रत्नागिरीकर असल्याने "पुणेकर' मुलींना भेटताना जशी माझ्या मनात एक अढी होती, तशीच त्यांच्याही मनात होती. आई-वडिलांच्या दृष्टीने अगदी "आखूडशिंगी, बहुदुधी' (हा योग्य आणि समर्पक शब्द आहे. कृपया "कोटी'सम्राटांनी त्यावरून टिंगल-टवाळी करू नये!) असलेली मुलगी मी का नाकारतो, हे त्यांच्या दृष्टीने कल्पनेपलीकडले होते. असो. त्यातून हर्षदाशी माझी भेट झाली.
म्हणजे, तसे मी तिला आधी ओळखत होतो आणि पाहिलेही होते. आमच्याच संस्थेच्या कर्मचारी पतपेढीत ती कामाला होती. पाहण्यात येणाऱ्या प्रत्येक मुलीकडे मी "संभाव्य बायको' याच दृष्टिकोनातून पाहत असल्याने, तीदेखील त्या "स्कॅनर'खालून गेली होती. पण आधी नापास झाली होती. (त्यावेळी मी स्वतःला अभिषेक बच्चन समजत होतो!) एका ज्येष्ठ सहकाऱ्यांनी तिचे नाव मला सुचविले होते. पण मी नाकारले होते. माझ्या दृष्टीने "माझी बायको' या कॅटॅगरीत तिचा विचारही मी करू शकत नव्हतो!
नंतर सहा महिन्यांनी माझे विमान बऱ्यापैकी जमिनीवर नव्हे, तर जमिनीच्या दोन दशांगुळे खालीच उतरल्याने, आधी नाकारलेल्या मुलींचा नव्याने विचार करू लागलो होतो. त्यातून हर्षदाचे नाव पुन्हा दुसऱ्या एका सहकाऱ्याने मला सुचविले. "भेटून, बोलून तर बघायला काय हरकत आहे,' असा विचार करून आम्ही दोघे भेटलो. बोललो. पहिल्या भेटीत बऱ्यापैकी "ये हृदयीचे ते हृदयी' झाले. "साथ-साथ'च्या परंपरेला जागायची खाज असल्याने "देहभान' नाटक दोघांनी एकत्र पाहिले. त्यावर चर्चा केली. तिची मते आवडली. निदान, वेगळ्या विचारांची, (किंबहुना स्वतःचे विचार असलेली! कारण आधी भेटलेल्या अनेक "आखूडशिंगी' मुलींकडे हा पैलूच नव्हता!) आहे, हे लक्षात आले. मग आम्ही तीन-चारदा भेटलो. बऱ्याच विषयांवर बोललो. आपलं जमू शकेल, असं वाटलं आणि मग पक्कं करून टाकलं. नंतर आई-वडिलांना कळवलं. दोघांनीही!
असो. तर असं आमचं हे रामायण.
आता भांडणांविषयी!
भांडणाचा प्रमुख मुद्दा म्हणजे अर्थातच मातीचा अभिमान!
मी रत्नागिरीचे गोडवे गायचे आणि तिनं पुण्याचे. ती काही तथाकथित "स्वाभिमानी (आणि अर्थातच आडमुठेपणा असलेली) पुणेकर' नाही. पण भाषेवरून वाद झडतात नित्यनेमाने. ती मांजर की ते मांजर, ती लसूण की तो लसूण, ते फरसाण की तो फरसाण, हे वादाचे प्रमुख विषय. बाकी, घरातल्या पतीच्या जबाबदाऱ्या (भांडीधुणी, पाल्याची शी-शू काढणे, कपडे वाळत घालणे, बायकोचे पाय (धरणे) आणि जमल्यास दाबून देणे, वगैरे.) हाही प्रमुख विषय असतो. "मी घरात राबराब राबते आणि तुला इकडची काडी तिकडे करायला होत नाही,' हे तर समस्त भारतीय विवाहितांचं राष्ट्रीय घोषवाक्य आहे! तर ते असो.
"मिपा'वरूनही अनेकदा भांडणं होतात.
घरीही इंटरनेट असल्याने (आणि ऑफिसात फुकटात इंटरनेट वापरण्याचे जास्त सुख आम्हाला नसल्याने) अनेकदा संगणकाचा उंदीर आणि आमचा हात नकळत "मिपा'कडे वळतो. तेव्हा शिव्या खाव्या लागतात. घरातली कामे सोडून या लष्कराच्या भाकऱ्या कशाला? "नस्ते उकिरडे फुंकायला सांगितलेत कुणी' वगैरे सुविचार ऐकून घ्यावे लागतात.
असो.
आलीया (नवऱ्याच्या) भोगासी, असावे सादर!
- अभिजित.
(अवांतर :
मांजर आणि नवरा : कुठेही नेऊन सोडला, तरी संध्याकाळी घरीच परत येतो!)
----
सगळ्यात महत्त्वाचे ः लग्नाच्या निर्णयाबद्दल आतापर्यंत एकदाही खेद वाटलेला नाही! अतिशय सुखी आहे! लग्नापूर्वी 58 किलो होतो, आता 82 किलो झालोय, यावरून काय ते ओळखा! मात्र, पत्नीची जाहीर तारीफ करायची नाही, असा अलिखित नियम आहे. म्हणून हे सगळ्यात शेवटी लिहिले आहे. असो!
अनेकदा संगणकाचा उंदीर आणि आमचा हात नकळत "मिपा'कडे वळतो. तेव्हा शिव्या खाव्या लागतात. घरातली कामे सोडून या लष्कराच्या भाकऱ्या कशाला? "नस्ते उकिरडे फुंकायला सांगितलेत कुणी' वगैरे सुविचार ऐकून घ्यावे लागतात.
मस्त..:)
लग्नाचा प्रकार : घरच्यानी ठरवून ....
आमची माहिती खाली दिली आहे..जाड अक्षरातली माहिती ही मि.पा. च्या सुनेची, तर कमी जाड अक्षरातली माहिती माझी..
मी ती
नाव : अबक कबअ
गाव : कोल्हापूर नाशिक
फुल : मोगरा सर्व
फळ : कोणतेही कोणतेही
व्यवसाय : संगणक अभियंता होमियोपाथिक डॉक्टर
गोड पदार्थ : गुलाबजाम सोडून काहिही फक्त गुलाबजाम
तिखट : सर्व सर्व (पण थोडे कमी तिखट)
अभिनेता : शाहरूख तर अजिबात नाही फक्त शाहरूख
अभिनेत्री : बहुतेक सर्व माधुरी आणि मधुबाला
टि व्ही : विनोदी मालिका आणि खेळ सर्व मालिका...मराठी सारेगमा..
वाचनाची आवड : खुप माझ्यामानाने खुपच कमी
हिंडण्याची आवड : खुपच कमी भरपूर
आवडती खरेदी : खाण्याच्या गोष्टी, electronic gadgets कपडे, ग्रुहपयोगी वस्तू
संगणक खेळ : अतिशय प्रिय अप्रिय
चित्रपट आवड : विनोदी, गुढ आणि रहस्य विनोदी, प्रेम, त्याग यांनी ओतप्रत भरलेले..
कला : थोडीफार पेटी वाजवतो चित्रकला
वरील आवडीनिवडी वरुन आमच्यात किती कमी (?) भांडण होत असेल याची आपणास कल्पना यावी. मि.पा. वरून एकदाही भांडण झाले नाही, मात्र एकदा (चुकुन) मि.पा. च्या स्त्री सहकारीशी संवाद साधण्याचे प्रकट विचार तोंडातून आल्याने मार पडला होता.
खादाडमाऊ
... जेवण झाल्यानंतर थेट संगणकाकडे पावले वळतात तेव्हा बायकोच्या शिव्या खाणे नेहमीचे ... ( इथे आवरायला मदत कोण करणार?)
लेख पूर्ण करण्यासाठी आज मला मिपा उघडणं अत्यावश्यक आहे असं बायकोला पटवून देऊन ( थोडक्यात बर्यापैकी भांडून वगैरे झाल्यावर ) मी मिपा उघडलं आणि त्यावेळी नेमके संकेतस्थळ विश्रांतीअवस्थेत आहे, रात्री बारानंतर चालू होईल असा बोर्ड दिसला... तो पाहून माझा चेहरा पडला आणि बायकोने विकट हास्य केल्याचे आठवते....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
तात्यांच्या प्रश्नाबरहुकूम माझी उत्तरपत्रिका...
१. ओळखीचे स्वरूप - एका ऐतिहासिक सिरीयलच्या पायलट च्या शूटींग दरम्यान भेट झाली. तो दिग्दर्शक मी कॉश्च्यूम.
२. विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? - पिरेमातूनच. माझं शिक्षण चालू होतं. एम ए (नाट्य) त्यामुळे लग्नाचं बघणं असं काही सुरूच केलं नव्हतं. दरम्यान मी परदेशात शिकायला जायचंही ठरलं त्यामुळे आईवडिलांच्या डोक्यात लग्नाचा विषय मागे ढकलला गेला आणि तितक्यात मी घरी हा बॉम्ब टाकून अमेरीकेला शिकायला जी निघून गेले ती मधे १ महिना सुट्टी सोडता एकदम ३ वर्षांनीच परत आले.
३. जोडीदाराच्या आवडीनिवडी, - कामाचे व्यसन, साध्या साध्या गोष्टी आवडतात, खाण्यापिण्याच्या बाबतीत नखरे असे नाहीत पण माश्यांवर प्रेम प्रचंड. एकुणातच सर्व कोकणी गोष्टींवर प्रेम. एकटे रहायला आवडते. लिखाण किंवा इतर कुठल्याही कलेत व्यक्ततेमधे प्रामाणिकपणा आवडतो. महत्वाचा असतो. रिकाम्या वेळात पार्टीतल्या दंगा मस्ती, धिंगाणा इत्यादी पेक्षा शांतपणे रहायला आवडते. मी आवडते अजूनही (लग्नाला साडेसहा वर्ष झालीत!)
४. एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्या, - भरपूर आहेत की. त्याशिवाय मज्जाच नाही. सुरूवात करायची तर हनिमूनला गेलेलो असताना चित्रपटासाठी लोकेशन हंटींग करण्यावरून झालेलं आणि अजूनही चालू असलेलं भांडण आहेच की. बाकी छोटीमोठी अनेक उदा: - मला नाचायला आवडतं त्याला नाही, त्याला तांदळाची भाकरी आवडते मला नाही, मला प्रत्येक गोष्ट त्याच्याशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही आणि त्याला असं हागल्यापादल्या प्रत्येक गोष्ट माझ्याशी बोलणं जमत नाही... पण हीच तर गंमत आहे.
५. एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? - मिपावर एवढी पडीक नसते मी. नेटवर असते अधून मधून. पण कामं रखडतील एवढी नाही. पण कधी कधी येतो नेटबद्दल नाराजीचा सूर. मग थोडा वाद घालायचा. पण मी नेट व्यसनी आहे हे मला माहितीये त्यामुळे वाद घालणं माझ्या बाजूने फुसकं असतं.
एक नक्की ह्या माणसाला 'टिपिकल नवरा' टाईप वागताच येत नाही तो माझा सुहृदच असतो. त्यासाठी मी देवाचे आभार मानू की स्वतःच्या निवडीवर स्वतःची पाठ थोपटू हे मात्र मला माहित नाही.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
तात्या नी हा लेख लिहिला
आपल्या जोडीदाराविषयी
याला सर्व प्रथम अजुक्का ताई या॑नी चा॑गल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
तात्या अजुक्का ताईचा प्रथम क्रमा॑क . =D> =D> =D> =D> =D>
मैत्री ही करायची नसते कारण मैत्री ही होत असते
मैत्री ही तोडायची नसते कारण मैत्री ही जपायची असते.
( सर्
विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून?
घरच्यांनी पाहून नाही.
जोडीदाराच्या आवडीनिवडी
माझ्याहून वेगळ्या आहेत. माझ्या मते खरी एकच गोष्ट आवडते - वाद घालायला.
एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्या
ते काय विचारायला हवे का?
एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
नाही, कारण दोघेही पडिक असतो.
विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून? अर्थात पिरेमातून. ओळख गेली बाराएक वर्ष असेल पण तेव्हा "हिच्याशी/याच्याशी" काय बोलणार मी?", असं होतं. पुढे मी थोडी जास्त म्याड झाले आणि तो थोडा माणसाळला, तेव्हा बोलायला सुरुवात झाली.
जोडीदाराच्या आवडीनिवडी, बर्यापैकी वेगळ्या, थोडथोड्या बदलत जाणार्या, पण दोघांसाठीही वाचन एक नंबरवर. मला खेळायला आवडतं, त्याला फारसं नाही. पण अधूनमधून बायकोची कटकट सहन करण्यापेक्षा तो बाहेर पडतो. मी त्याच्यासाठी कुठल्यातरी टेकडीवर जायला हो म्हणते. आणि हो, दोघांनाही स्कूटर, गाडी चालवायला अजिबात आवडत नाही.
एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्या, मारामारी केली तर मीच जिंकेन म्हणून मारामारी होत नाही! ;-) पण वाद, भांडणं होतात, बाकीच्यांच्या तुलनेत काही फार जास्त होत असतील असं नाही वाटत.
एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का? फारशी नाही. "तू तुला आवडणारं काम कर मी माझं काम करते", यामधे दोघंजण समाधानी आहोत. घरातली कामं दोघंही जण वाटून घेऊन करतो आणि दोघांनाही हातातलं काम टाकून टाईमपास आवडत नाही, त्यामुळे चालतं.
जोडीदाराचा फोटूही येथे टाकल्यास उत्तमच, परंतु आग्रह अर्थातच नाही..
त्याला कॅमेर्याच्या समोर पकडणं कठीण असतं, त्यामुळे सध्या हाच फोटू मिळाला!
दोस्त लोकांना त्यांच्या पिरेमप्रकर्णात मदत करणारे, निरनिराळ्या टिप्स देणारे आणि सेटिंग लावून देणारे अस्मादिक, जे दोस्तांना सांगायचे, 'प्रेमात पडायचं तर पड, पर्वा इल्ले, पण साल्या अडकू नकोस...गळ्यात बांधून घेऊ नकोस..." आणि असंच एक दिवस आत्तेभावाच्या कॉलेजात त्याला भेटायला गेलो असताना, त्याची एक ज्युनियर समोर आली...बस्स्स.....
एकदम फिल्मी श्टाईलीत ब्याकग्राऊंडाला सतारबितार (सतारच असतं नाहो ते, हिरो हिरव्हीन एकमेकांना पहिल्यांदा भेटतात तेव्हा वाजतं ते ;) ) वाजायला लागले, डोक्यात चर्चची बेल, मंदीरातल्या घंटा, देवघरातला शंख, माझ्या गाडीचा हॉर्न, रिक्षाचा भोंगा......सगळं एकदम ठणठणायला लागलं...मला आधी वाटलं मायग्रेनचा ऍटॅकच आलाय की काय, पण तिची ओळख करुन दिल्यावर ती जे हसली.....हाऽऽऽय!!! आपुन साला एकदम फिनिश! दुनिया सगळी एकदम गारेगार वाटायला लागली :)
नंतर त्याचदिवशी पुढे साधारण ४ एक तास गप्पा मारत बसलो तिच्याशी, लय भारी वाटत होतं राव..(नंतर तीनं सांगितलं की घरी गेल्यावर माझ्या बडबडीपायी तिचं इतकं डोकं उठलं होतं की ती डोकेदुखीच्या गोळ्या घेऊन, कपाळावर अमृतांजन चोपडून झोपुन गेली!)
त्याच संध्याकाळी बाकीच्या मैतरीणींना फोनाफोनी करुन रीतसर तीची सगळी माहिती काढली..तीचं कोणाशीच प्रेमप्रकरण चालु नाहीय्ये ना, बा काय करतो, भाऊ आहे का? (हे दोन मोठ्ठे प्रश्न!) असल्यास लहान की मोठा? काय करतो.. इ.इ.इ. रात्री अकरा वाजेपर्यंत सगळा इंटेल डेटा ताब्यात. ताबडतोब आमच्या म्हातारीला फोन लावला, म्हणलं, "तयार रहा, लवकरच तुझ्या भावी सुनेला घेऊन येईन घरी"
दुसर्यादिवसापासुन पध्दतशीरपणे जाळं पसरवायला सुरु केलं ;) डॉट्ट सातव्या दिवशी विचारलं, "माझ्याशी लग्न करशील?" संध्याकाळी उत्तर होकारार्थी! आयला! एकदम छह दिन लडकी इन???
पुढे तब्बल ४ वर्षं बोंबलत हिंडलो, शेवटी दोघांच्या घरचे हातापाया पडायला लागले, म्हणाले, बाबांनो, निदान आतातरी लग्न करा... आणि अशा रितीनं आम्ही पारतंत्र्यात गेलो :)
लग्नाला आपली मिपाकर मंडळी हजर होतीच!
आवडीनिवडी: मी उत्तरध्रुव, ती दक्षिणध्रुव :)
मला तिखट आणि झणझणीत प्रचंड प्रिय, ती एक नंबरची गोडघाशी!
मी नॉनव्हेजचा वेडा तर ती म्हणजे, ५ फुटावरुन अंडं दाखवलं तर आंघोळ करुन येईल अशी..
मी नॉनस्टॉप बडबड तर ती म्हणजे गुपचुप गुपचुप.
मी निर्लज्ज तर ती एक नंबरची लाजाळू
मला वाचनाची आवड तिला प्रचंड कंटाळा...
मला एक रेघ सरळ मारता येईल तर शपथ, तर तीची चित्रकला उत्तम!
मला डोंगरदर्यातुन भटकायची आवड तिला शॉपिंग मॉलमधून :(
हां, दोघांना माणसं गोळा करायचा मात्र छंद आहे. :)
एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्या:
१. ती अट्टल सदाशीवपेठी पुणेकर, मी गावाकडचा गावंढळ! त्यामुळे "तुम्ही साले पुणेरी..."अशी माझ्या वाक्यांची सुरुवात, तर "तुमच्यासारख्या बाहेरुन आलेल्यांनीच आमचं पुणं बिघडवलं" असा तिचा समारोपाचा स्टान्स :)
२. माझी आंघोळ! च्यायला, काय असेल ते असेल, विकांताला उशीरा आंघोळ करण्यामध्ये काय सुख असतं हे माझ्या बायकोला कधीही कळलेलं नाही...सकाळी उठल्यापासून सारखं, "अरे जा ना...आंघोळ करुन घे..." पालुपद चालु असतं..अर्थात आज्ञाधारक आहे मी तसा त्यामुळे तिचं ऐकतोच, पण दुपारी चारनंतर ;)
३. महागदारोळः माझी सिगारेट! ह्या विषयावर नो कॉमेंट्स!
४.मी कोणत्या पँटवर कोणता शर्ट घालावा: ह्यात वाद घालण्यासारखं काही आहे का? नाही ना? पण (फक्त) आपल्या(च) नवर्याला ड्रेसिंगसेन्स नाही, आणि ती जबाबदारी आपली आहे असं हिला वाटतं. त्यामुळे मी अंगावर चढवलेले कपडे "शी: कै च्या कै काय घालतो रे तू...शर्ट बदल आधी...हा घाल!" ह्या वाक्यानं माझ्या अंगावरुन कपाटात परत जातात... पण हेच जर मी तिला तिच्या कपड्यांबाबत बोललो तर....तोबा तोबा तोबा....ग ह ज ब!!!!
५...६...७..८...चिल्लर चिल्लर बर्याच गोष्टी :)
एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
कोण्या एके काळी व्हायची, पण आता तिलाच मिपाचं सदस्यत्व घ्यायला लाऊन तो प्रश्नच निकालात काढलाय ;)
आपण बारामतीचे हौत म्हणलं, कसा एकदम राजकीय डावपेच लढवला की नाही?
जोडीदाराचा फोटूही येथे टाकल्यास उत्तमच,
आमच्या लग्नाचे काही फोटु तात्यांनी मिपावर टाकले आहेतच. शिवाय अभिरुची कट्ट्याच्या फोटोतही आहेच की ती!
ह्म्म .... आम्ही जोडावी का काही पुरवणी या जोडप्याबद्दल ??
जाउद्या .. आपल्याला या धाग्यापेक्षा आपले विकांताचे गोड धोड प्यारे हाय !!
अगदी सहमत आहे.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे-मराठमोळे वॉलपेपर
धमे,
तुझ्या "का "पुढे जेवढे प्रश्न चिन्ह आले आहेत तेवढ्या सिगारेट ओढतो का ग हा एका दिवसात.
तरी आमची धमी आहे म्हणुन ठीक धम्या, नाही तर...
भेटल्यावर बोलुच ;)
सकाळी उठल्यापासून सारखं, "अरे जा ना...आंघोळ करुन घे..." पालुपद चालु असतं..अर्थात आज्ञाधारक आहे मी तसा त्यामुळे तिचं ऐकतोच, पण दुपारी चारनंतर
=))
=))
धम्या आणि धमी..... या दांपत्याला पाहताक्षणीच ते "मेड फॉर इच अदर" असल्याची खात्री पटते....
धम्याने वर उल्लेखलेल्या माहितीतला शब्द न शब्द खरा आहे...
धम्या आणि धमी २ ध्रुवांवरचे जरी असले, तरी दोघांत एक..गोष्ट कॉमन आहे.. ती म्हणजे
"मित्र परिवाराला ( मिपावर्च्या) अगत्याने बोलावुन त्यांचा मस्त पाहुणचार करणे,सगळ्यांना उत्तमोत्तम रेसिपी'ज करून , त्या खायला घालुन तृप्त करणे....
विविध पाककृती करुन (नेहमीच हसतमुखाने) अतिथींना यथेच्छ खायला घालण्यात धमीचा (सौ. श्रीया धमाल चा)हात कोणीही धरु शकणार नाही.
या दोघांच्या एकत्रित जोडीचा मी नेहमीच आदर करते....
:)
चला या नीमित्ताने तरी आमचे मिपा वर काही खरडणे होईल...
आता आमच्या बद्द्लः
अर्थातच आमचा प्रेम विवाह झालाय. आम्ही एकाच कॉलेज मध्ये शिकत होतो. तुमचा जावई कमर्शियल आर्टिस्ट तर मी फाईन आर्टिस्ट. नन्तर एकाच हापीसात दोघान्ना ही नोकरी मिळाली. नशिबाने दोन्ही घरुन काहीच विरोध झाला नाही. प्रेमात पडल्या नन्तर तब्बल नऊ वर्षानी आमचे शुभमन्गल झाले. एव्हाना लग्नाला चार वर्स होऊन पण गेली आहेत. आता वादविवाद-भांडणाच बोलाल तर यान्च्या शिवाय मजाच नाही बुवा..... ती आपली होतच असतात्...(काहीही कारण चालतात आम्हाला :))
आवडीनिवडी सान्गायच्या तर त्याला चित्रपट पाहण्याची भरपूर आवड. आणि हो वेगवेगळे पदार्थ खाण्याची खुप खुप आवड, खास करून नॉनव्हेज. आणि सगळ्यात मह्त्वाचे म्हणजे तो अतीशय चान्गले जेवण बनवू शकतो... बास्स... या एका गुणावर त्याच्या बाकी चुका आरामात माफ होतात :)
>>>आणि सगळ्यात मह्त्वाचे म्हणजे तो अतीशय चान्गले जेवण बनवू शकतो... बास्स... या एका गुणावर त्याच्या बाकी चुका आरामात माफ होतात
आरती,
अगदी लाख बोललीस..
नव-याला जेवण बनविता येणे खुप छान गोष्ट असते. :)
याला मी ही सहमत!! नवर्याला जेवण बनवता येणे, आणि ते आपण करतो त्यापेक्षाही टेस्टी असणे यासारखं सुख नाही!
बाकी, निनाद आणि माझं लग्न; तसं घरच्यांनी बघूनच झालं... आधी भाऊ,बहीण भेटले.. मी त्याला आधी वेबकॅमवर आणि नंतर कित्येक महीन्यांनी प्रत्यक्ष बघितलं.. :) ऑफीसच्या नसलेल्या सुट्ट्यांची कृपा.. ! सो, पूर्णपणे ऍरेंज्ड मॅरेज नाही म्हण्ता येणार... आमचं लग्न म्हणजे एक किस्साच आहे!! असो..
आवडीनिवडी : त्याला खाणं,झोपणं,पिक्चर पाहणं प्रचंड आवडतं.. मला पुस्तकांचे(आता साईट्सचे म्हणायचे) व्यसन.. दोघांनाही खेळ,लाँग ड्राईव्हला जाणे, एकंदरीतच भटकंती आवडते..
वादविवादः होतात की.. त्याशिवाय काय मजा.. मेन मुद्दा असतो तो अतीअतीअती व्यवस्थितपणा X अळमटळम करणे. यातली मी दुसरी हे साहजिक... बाकी फार भांडणं नाही करत, समजुतदार आहे खूप(तो!)..
मिपामु़ळे भांडणं?? आईग.. सतत! :) वाईट्ट वैतागतो तो.. पण पिडाकाकांकडचा कट्टा झाल्यापासून त्यालाही उत्साह आलाय मिपाबद्दल... माझ्यासारखा तित्का टाईमपास करत नसल्याने अजुन तो मिपावर आला नाही. मी एकटी पुरते मिपावरच्या / इतर संस्थळावरच्या घडामोडी कळवायला... :)
बाकी फोटो मिपाकरांनी पाहीलाच आहे कट्ट्याच्या फोटोंत..
हा धागा सहीए पण! मस्त वाटत आहे लोकांचे किस्से वाचायला! :)
http://bhagyashreee.blogspot.com/
हा धागा सहीए पण! मस्त वाटत आहे लोकांचे किस्से वाचायला!
अगं करशील काय! संस्थळ चालवायचंय. अश्या काही ना शकला लढवाव्या लागतात! मिपा आज उगाच नाय म्हराटीतलं लंबर वन संस्थळ आहे!
कं बोल्ते? :)
आपला,
(भाग्यश्रीचा मित्र) तात्या.
मला प्रत्येक गोष्ट त्याच्याशी बोलल्याशिवाय चैन पडत नाही आणि त्याला असं हागल्यापादल्या प्रत्येक गोष्ट माझ्याशी बोलणं जमत नाही... पण हीच तर गंमत आहे.
हे मात्र खर आहे.माझ्या बायकोचे दररोज हेच टुमणे असते की आज दिवसभर तुम्ही माझ्याशी काहिच बोलला नाही,तेव्हा आता आपण बोलत बसु.आता बोलणार तर काय? बायकांचा नवर्याशी बोलायचा आवडता विषय म्हणजे दुसर्या बायकाचे उणेदुणे काढणे,नवी खरेदी काय करायची किंवा फिरायला कुठे जायचे. ह्याशिवाय दुसरे काही नाही.तसे आमचे लग्न ठरवुन झाले आहे.ती मिपा वापरत नाही.पण माझ्या संगणक प्रेमाचा ती सवतीमत्सरातुन तिरस्कार करते.बाकी लग्नाआधीचे माझे सर्व वर्णन आपला अभिजित ने अगदी व्यवस्थित केले आहे ते वाचा.लग्नानंतर माझ्या जीवनात विशेष असा फरक पडला नाही फक्त मी जरा आळशी झालो आहे. वजन म्हणाल तर माझे ६५ किलो होते व आहे.(लग्नाला ४ वर्षे झाली)४ वर्षातील बराचसा वेळ भांडणातच गेला व जातो आहे. :T फोटो निवांतपणे टाकतो.
अदिती फोटो पण काय मस्त टाकला आहेस. उजेडात मॉनीटर नेला तरी काहीच कळले नाही. =))
वेताळ
>>बायकांचा नवर्याशी बोलायचा आवडता विषय म्हणजे दुसर्या बायकाचे उणेदुणे काढणे,नवी खरेदी काय करायची किंवा फिरायला कुठे जायचे. ह्याशिवाय दुसरे काही नाही.<<
छे हो काहीतरीच काय? एकदा वेळ देउन बघा ना बायकोशी बोलायला, ओझं म्हणून नाही मनापासून. ह्यापलिकडे बरंच काही असतं. असं झटकू नका हो.
आणि बादवे.. माझा नवरा टिपिकल नसल्याने माझ्याशी गप्पा मारायला, मी जे बोलेन ते ऐकायला माझ्या त्याची काही हरकत नसते. त्यावर चर्चा करायलाही हरकत नसते पण स्वतःच्या मनात आलेलं काही उठसूठ आणि आपणहून शेअर करणं जमत नाही. सवय नाही इतकंच.
बाकी राजकारणापासून अस्तित्ववादापर्यंत, रेम्ब्रॉ पासून माजिदीपर्यंत कशावरही आम्ही दोघंच भरपूर गप्पा मारतो.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
तात्या एकदम मस्त धागा काढला राव तुम्ही..... :)
आता तुमच्या सगळ्या प्रशांची उत्तरं द्यायचा प्रयत्न करतो -
विवाह पिरेमातून झाला की घरच्यांनी पाहून?
अर्थातच प्रेम विवाह..... तसा मी तिच्या कॉलेजमधला नाही...ती आर्टस ची तर मी कॉमर्सचा.... तिच्या पेक्षा ४ वर्षांनी सिनियर.....एका मित्राच्या कॉलेज ग्रुप मधली ती....त्याच्याच ओळखीतुन हिच्याशी ओळख झाली.....ती कॉलेजची टॉपर तर मी तसा सर्वसाधारण......तिला शास्त्रीय संगिताची प्रचंड आवड आणि शास्त्रीय नृत्य शिकलेली असल्यानी तिकडे जास्त ओढा असलेली आणि मी मात्र त्यातला दगड......पण तरीही एकत्र आलो आणि तब्बल ४ वर्ष फिरल्यानंतर विवाह बंधनात अडकलो.......
जोडीदाराच्या आवडीनिवडी,
वर सांगितल्याप्रमाणे तिला शास्त्रीय संगित आणि नृत्याची आवड ....आणि मला माझ्या हापिसात बसुन काम करण्याची प्रचंड आवड. हो पण दोघांनाही वाचनाचे प्रचंड आवड आहे....मित्र - मैत्रिणींना भेटणे...आणि खांद्यावर सॅक टाकुन मनसोक्तपणे भटकंती करणे.....
एकमेकातले वादविवाद-भांडणं मारामार्या,
खुप होतात, कारण एकच मी सतत हापिसात असणं.....तिला मी वर्कहॉलिक वाटतो...पण कितीही राग आला तरी पटकन सगळं विसरते ती.....
एका पार्टनरच्या सतत मिपावर पडिक असल्यामुळे काही भांडणं होतात का?
नाही कारण आम्ही दोघंही मिपावर पडीक असतो....त्यामुळे तो प्रश्नच येत नाही.... उलट जर एखाद्या दिवशी आमच्या दोघांपैकी कोणाला जमलं नाही मिपावर यायला तर आवर्जुन विचारतो आज काय विशेष मिपावर ते :)
आणि पार्टनरचा फोटो द्यायला काहिच हरकत नाही पण तो तिनी आधिच दिला आहे माथेरानच्या धाग्यावर ....... :)
प्रतिक्रिया
अवांतर
हा हा हा!
तात्या
माझ्यासार
मी एकदा
किती पिशव्या
एकच
अवांतर
-)
ओळखी करून
माझ्या
आणखी काय म्हणणार आता ?
स्वप्नातीला राजकुमार, राजकुमारी बद्दल ही लिहिता येईल.
नको!!!!!
आणि काही
एक्स्प्रेशन
> सेल्फ
हो
कोणीच
प्रपंच करावा `नेट'का!
अनेकदा
मीच सुरूवात करतो...
गोड पदार्थ
मिपावरून भांडणे...
माझी उत्तरपत्रिका!
उत्तम
आता मला
प्रथम प्रतिक्रिया
टॅग बंद
ह्या
फोटो
हम्म
विवाह
आमची कहाणी
ह्म्म
+१
.
वाचन
धमीला पाठिंबा..
सकाळी
सहमत
असेच म्हणतो
अभिनंदन धमु/धमी
तात्या उत्तम धागा सुरु केलात की तुम्ही!
सहमत.
याला मी ही
हा धागा
अज्जुका
>>बायकांचा
तात्या