तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?
In reply to या सगळ्या गोष्टीन्चा आणि by कवितानागेश
In reply to वरील दोन्ही प्रतिसादांशी by कैलासवासी सोन्याबापु
देवकडे डिमांडनोट सरकवणाऱ्या पब्लिक चे विधी
यासाठी खास टाळ्या ! In reply to वरील दोन्ही प्रतिसादांशी by कैलासवासी सोन्याबापु
In reply to वरील दोन्ही प्रतिसादांशी by कैलासवासी सोन्याबापु
देवकडे डिमांडनोट सरकवणाऱ्या पब्लिक चे विधी जास्त वाटतातपर्फेक्ट!!
धर्म, श्रद्धा आणि रुढीप्रियता ह्यां सर्वात फरक आहे, असे वाटते.
या सगळ्या गोष्टीन्चा आणि श्रद्धेचा काही संबंध नाही हो.हे आक्षेप योग्य आहेत. सश्रद्ध, धार्मिक मन आणि पाळल्या जाणाऱ्या रुढी यांच्यात थोडंफार कोरिलेशन असेल, पण रुढीप्रियता म्हणजेच धार्मिकता नाही हे उघड आहे. मला अनेक उदाहरणं माहीत आहेत, जिथे 'माझी आई पूजा आपली प्रथा म्हणून करायची, पण देवावर तिचा फारसा विश्वास नव्हता. ते तिच्यासाठी एक करण्याचं काम होतं' असं म्हटलेलं आहे. त्यामुळे मी दिलेल्या निकषांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं तरी काही हरकत नाही. ते वापरा म्हणण्यापेक्षा 'या या गोष्टींचा तुम्हाला विचार करता येईल' या स्वरूपाची मदत म्हणून होते. मुलांनी आपल्या आईवडिलांबरोबर इतका वेळ घालवलेला असतो की त्यांना आपल्या आईवडिलांचा स्वभाव, त्यांची विचार करण्याची पद्धत, वागण्याची पद्धत हे व्यवस्थित माहीत असतं. स्वतःविषयीही तेच. त्यामुळे आईवडिलांशी स्वतःची तुलना ही बऱ्यापैकी बरोबर असेल अशी आशा आहे. तेव्हा तुम्ही नक्की कुठचे निकष वापरता हे महत्त्वाचं नाही. कदाचित वेगवेगळे निकष लावून तुम्ही आत्तापर्यंत निष्कर्ष काढलेलाही असेल. तो सरळ वापरला तरीही चालेल.
In reply to धर्म, श्रद्धा आणि रुढीप्रियता by राजेश घासकडवी
In reply to ठीक आहे, तरीही, by यशोधरा
In reply to ओक सरांची आठवण आली. by प्यारे१
In reply to काहीही हं, प्यारे१ by राजेश घासकडवी
In reply to बस्स काय मालक? या विषयावर by प्यारे१
In reply to म्हणजे तुम्हाला शंभरात एक लेख by राजेश घासकडवी
In reply to ठीक आहे, तरीही, by यशोधरा
In reply to यशोशी अगदी सहमत! by अजया
In reply to आमची कॅटेगरी दिसत नाही, by जेपी
In reply to प्रचलित असलेले मात्र by सतिश गावडे
In reply to प्रचलित असलेले मात्र by सतिश गावडे
In reply to परिवार गरजेपुरते धार्मिक आहे by जेपी
त्यापैकी तुमचे पालक कुठे बसतात व तुम्ही कुठे बसता हे सांगा.
१. तुमच्या यादीत वर अनेकांनी म्हटल्याप्रमाणे नास्तिक आणि अज्ञेयवादी यांचा समावेश हवा.
२. अजून एक, यादीत "काय म्हाय्त नाय बुवा" यांनाही स्थान दिले पाहिजे.
वास्तवात माणूस या यादीतल्या कोणत्या एका जागेवर बसलेला असण्यापेक्षा परिस्थिती ढकलून नेईल तिकडे, परिस्थिती नेईल तसा इकडून तिकडे भटकत असतो... कधी मनापासून, कधी दुसरे काही सुचले नाही म्हणून तर कधी तिथे बसलेले "दिसणे" सोईस्कर आहे म्हणून :) ;) In reply to त्यापैकी तुमचे पालक कुठे by डॉ सुहास म्हात्रे
In reply to त्यापैकी तुमचे पालक कुठे by डॉ सुहास म्हात्रे
वास्तवात माणूस या यादीतल्या कोणत्या एका जागेवर बसलेला असण्यापेक्षा परिस्थिती ढकलून नेईल तिकडे, परिस्थिती नेईल तसा इकडून तिकडे भटकत असतो...हे काहींना लागू होते त्यामुळे सहमत.
कधी मनापासून, कधी दुसरे काही सुचले नाही म्हणून तर कधी तिथे बसलेले "दिसणे" सोईस्कर आहे म्हणून :) ;)हे काहींना लई येळा लागू होते म्हणून लई येळा सहमत.
In reply to आई १, म्या अन वडील ३ by सत्याचे प्रयोग
In reply to मला या "देव नसतो" वाल्या by काळा पहाड
In reply to प्रकाशाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने जाणार्या गोष्टी आहेत, तोपर् by सत्याचे प्रयोग
In reply to वर अनेक लोकांनी 'नास्तिक व by राजेश घासकडवी
देवळात जायला नकार देत नाही, प्रथा म्हणून कोरडेपणे हातही जोडतो.मी तर देवळात जाऊनही नमस्कार करत नाही. मस्त रांगेत उभा राहतो. मुर्ती न्याहाळतो. भक्तीभावाने देवापुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांकडे कौतुकाने पाहतो. आणि तसाच बाहेर पडतो. मी देवाला नमस्कार न करताच रांगेत सरकत आहे हे जर कुणाच्या लक्षात आले तर ती व्यक्ती मात्र माझ्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहते. एकदा निवांत दिवशी पंढरपूरला जाऊन डोळे भरून विठोबाला पाहायचे आहे. :)
In reply to देवळात जायला नकार देत नाही, by सतिश गावडे
एकदा निवांत दिवशी पंढरपूरला जाऊन डोळे भरून विठोबाला पाहायचे आहे. :)
निवांत ???!!! डोळे भरून ???!!! गर्दी नसतानाही भाविकांना पुढे सरकवण्यासाठी धक्काबुक्की करणार्या (माझ्या मते केवळ सवयीने गुंडगिरी करणार्या... हे मी त्यांना तोंडावर सांगितले आहे) मंदिरातील तथाकथित सिक्युरिटि/सेवकांशी भांडण करण्याच्या तयारीने जा ! ;) :)In reply to एकदा निवांत दिवशी पंढरपूरला by डॉ सुहास म्हात्रे
मंदिरातील तथाकथित सिक्युरिटि/सेवकांशी भांडण करण्याच्या तयारीने जा !हे मी पूर्वी आळंदीच्या मंदिरात करत असे. गेले ते दिवस. राहिल्या त्या आठवणी. ;)
In reply to देवळात जायला नकार देत नाही, by सतिश गावडे
In reply to +१ by खटपट्या
मला दूर, एकदम शांततेत असलेली देवळे/प्रर्थनास्थळे आवडतात. तीथली शांतता मनाला भावते. कधी कधी एखादी गुहा जीथे पीनड्रॉप सायलेन्स असतो तीही देवळासारखीच भासते.श्री. वल्ली उर्फ मा. प्रचेतस सर यांच्याशी संपर्क साधावा.
In reply to मला दूर, एकदम शांततेत असलेली by सतिश गावडे
In reply to देवळात जायला नकार देत नाही, by सतिश गावडे
मी तर देवळात जाऊनही नमस्कार करत नाही. मस्त रांगेत उभा राहतो. मुर्ती न्याहाळतो. भक्तीभावाने देवापुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांकडे कौतुकाने पाहतो. आणि तसाच बाहेर पडतो.खिक्क... आपलं सामान बघायला आमीबी हे करायचो लय मज्या यायची. सतत लक्ष सामानाकडंच असल्याने भक्तीभावाने देवापुढे नतमस्तक होणाऱ्या लोकांकडे कौतुकाने पहायला मात्र वेळ मिळायचा नाही. तुम्ही लै नशीबवान.
मी देवाला नमस्कार न करताच रांगेत सरकत आहे हे जर कुणाच्या लक्षात आले तर ती व्यक्ती मात्र माझ्याकडे खाऊ की गिळू अशा नजरेने पाहते.ह्म्म.. हे मात्र अनुभवलं आहे. आम्ही आमच्या सामानासाठी मंदीरात आलो होतो त्या एकनीश्ठेची बाकीच्या लोकांना साली किंमतच नसते :(
एकदा निवांत दिवशी पंढरपूरला जाऊन डोळे भरून विठोबाला पाहायचे आहे. :)पाहुन झाल्यावर जर भक्तीभावाने त्याच्यापुढे नतमस्तक झाला नाहीत... भलेही तुम्हाला कौतुकाने पहाणारा कोणीही तिथे नसेल तर बात कुच जमी नही असेच खेदाने म्हणावे लागेल. पुन्हा प्रयत्न करायचा. विठठल जरा लाजाळु दैवत आहे.. त्याला आर्जव करावे लागते पण एकदा ते झाले की तो त्याच्या अरतीत म्हटल्या परमाने जिवलग झालाच म्हणून समजा.
In reply to मी तर देवळात जाऊनही नमस्कार by द-बाहुबली
In reply to वर अनेक लोकांनी 'नास्तिक व by राजेश घासकडवी
In reply to माफ करा राजेशजी कदाचित व्यक्तीगत वाटेल तुम्हाला पण ... by मारवा
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by काळा पहाड
त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत.
जर कोणी स्वतःच्या प्रयोगशीलतेतुन चिंतनातुन अनुभवातुन प्रगल्भ होत उत्क्रांत न होता ती अप्प दिपो भवीय प्रोसेस टाळुन रेडीमेड संस्कारबध्द्दतेच्या बाबागाडीत बसुन आस्तिक बनला असेल तर ती आस्तिकता कणा नसलेली आस्तिकता तकलादु आणि व्यर्थ असते.
तशीच आणि तितकीच
जर कोणी स्वतःच्या प्रयोगशीलतेतुन चिंतनातुन अनुभवातुन प्रगल्भ होत उत्क्रांत न होता ती अप्प दिपो भवीय प्रोसेस टाळुन रेडीमेड संस्कारबध्द्दतेच्या बाबागाडीत बसुन नास्तिक बनला असेल तर ती नास्तिकता देखील कणा नसलेली नास्तिकता तकलादु आणि व्यर्थ असते
हेच म्हणायच होत
एका विवेकी पालकाने मुलांना दोन्ही बाजु तिसरी बाजु अधिकाधिक बाजु केवळ परीचीत करुन दिल्या पाहीजेत.
डेटा देऊन मागे व्हायला हवं अस माझ व्यक्तीगत मत आहे इतकचं
बाकी तुम्ही जे नास्तिंकावर आक्षेप घेतले आहेत ते प्राचीन च आहेत आशा आहे तुम्हाला त्याचा प्रतिवाद माहीत असेल
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by काळा पहाड
In reply to आदर्शवादी मुद्दा आहे की नाही by स्वप्नांची राणी
In reply to आदर्शवादी मुद्दा आहे की नाही by स्वप्नांची राणी
In reply to सगळ्यात जास्त जीव? by बॅटमॅन
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by काळा पहाड
१) आणि असं जर असेल तर ते अर्थातच चुकीचं पण आहे. त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत.हेच तुम्ही आस्तिक वातावरणात मुलं वाढवणाऱ्या; मुलांना 'देव असतो' असं शब्दांनी आणि कृतींनी सांगणाऱ्या पालकांना सांगता का?
खर्या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतंयाला काही आधार नाही. अमेरिकेत गेल्या पंचवीस वर्षांत नास्तिकता वाढली आहे, धार्मिकता कमी झालेली आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांचं प्रमाणही प्रचंड प्रमाणावर घटलेलं आहे. भारतातच होणाऱ्या धार्मिक दंगली पाहिल्या तर धार्मिक लोकं गुन्हे करायला कचरतात यावर विश्वास बसत नाही.
सर्व शक्यता थकल्या की माणूस देवावर हवाला सोडून बसतो. कारण तसं करणं हे एक प्रकारच्या मानसिक सेफ्टी व्हॉल्व्ह चं काम करतं. नास्तिक माणसांना हा आधार नाही.लहानपणापासूनच कुबड्या न वापरण्याची सवय ठेवली त्याचे पाय बळकट होतील असा विचार त्यामागे आहे. आपल्याला कोणी वाचवायला येणार नाही, आपणच आपल्यावर येणाऱ्या संकटांतून मार्ग काढायचा ही जाणीव निर्माण होणं मला महत्त्वाचं वाटतं.
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by राजेश घासकडवी
हेच तुम्ही आस्तिक वातावरणात मुलं वाढवणाऱ्या; मुलांना 'देव असतो' असं शब्दांनी आणि कृतींनी सांगणाऱ्या पालकांना सांगता का?नाही. कारण देव ही एक खरी की खोटी माहिती नाही पण चांगली संकल्पना आहे. आपल्यातल्या चांगुलपणाचं देव हे एक प्रतिक आहे. पण ही संकल्पना अमूर्त असल्यामुळे, किंवा एकूणच जीवनातल्या अनुभवामुळे बरेच आस्तिक लोक नंतर नास्तिक होतातही. तुमचा स्वतःशी संवाद "देव आहेच" या संकल्पने नंतर "तो खराच आहे का" अशा प्रकारे सुरू होतो. कारण त्याला कुणीच पाहिलेलं नाही. पण "देव नाहीच" या संकल्पने मध्ये मनावर पडदा टाकला जातो आणि स्वतःशी संवाद होतच नाही. जिथे कठोर मतं असतात तिथे संवाद होत नाही. मध्यपूर्वेमध्ये उगम पावलेल्या एका धर्माबद्दल ("बाकीचे काफीरच") आपण ते पाहतोच, नाही का?
याला काही आधार नाही. अमेरिकेत गेल्या पंचवीस वर्षांत नास्तिकता वाढली आहे, धार्मिकता कमी झालेली आहे. त्याचबरोबर गुन्ह्यांचं प्रमाणही प्रचंड प्रमाणावर घटलेलं आहे. भारतातच होणाऱ्या धार्मिक दंगली पाहिल्या तर धार्मिक लोकं गुन्हे करायला कचरतात यावर विश्वास बसत नाही.गुन्ह्याचं स्वरूप भयंकर प्रमाणात बदललेलं आहे असं मला वाटतं. दुर्योधन तेव्हाही होता. पण निर्भयाची केस पाहिली तर दुर्योधन म्हणजे अगदी मवाळ वाटायला लागतो. बाकी धार्मिक दंगली या फक्त आस्तिकच करतात असा काय पुरावा आहे? नास्तिक हे देवावर श्रद्धा न ठेवणारे पण धर्माचा अभिमान असणारे असू शकतात.
लहानपणापासूनच कुबड्या न वापरण्याची सवय ठेवली त्याचे पाय बळकट होतील असा विचार त्यामागे आहे. आपल्याला कोणी वाचवायला येणार नाही, आपणच आपल्यावर येणाऱ्या संकटांतून मार्ग काढायचा ही जाणीव निर्माण होणं मला महत्त्वाचं वाटतं.ठीक आहे. ज्याचा त्याचा विचार. पण समाजातले बहुतांशी 'जन' मनाने दुर्बळ असतात. त्यांच्याकडे हा वैचारिक प्रगल्भ पणा असेलच असं नाही. समाजातला प्रत्येक घटक तेवढा प्रगल्भ होईपर्यंत देवाचा प्लासिबो वाईट नाही असं मला वाटतं.
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by काळा पहाड
१) आणि असं जर असेल तर ते अर्थातच चुकीचं पण आहे. त्याची मतं त्यानं बनवली पाहिजेत. कारण देव नसतोच हे काही वैश्विक सत्य नव्हे (जसं देव असतो हे ही नव्हे. त्या दोन्हीपैकी सत्य अजून पुढे यायचं आहे).देव मानायचा की नाही हे वैयक्तिक मत होऊ शकेल.
२) शिवाय कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक सामान्य माणूस जसा देवाला का होईना घाबरून काही गोष्टी करणार नाही, तसं त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा धाक नसेल. आता तुम्ही याच्या विरोधात कितीही मुद्दे मांडलेत तरी ते आदर्शवादी असतील आणि खर्या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं.इथे तुम्ही जनरलायझेशन करत आहात. कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं जर तुम्हाला वाटत नसेल तर तो तुमचा विचार चुकीचा आहे. चांगलं आणि वाईट वागणं हा मानवी स्वभाव आहे. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही स्वभावाची माणसं आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही प्रकारात आढळतील.
३) त्याचबरोबर त्याला कुठल्याही मानसिक आधार नसेल. देव हा आपली गरज आहे. ते आपलं अल्टीमेट सेफ्टी नेट आहे. सर्व शक्यता थकल्या की माणूस देवावर हवाला सोडून बसतो. कारण तसं करणं हे एक प्रकारच्या मानसिक सेफ्टी व्हॉल्व्ह चं काम करतं. नास्तिक माणसांना हा आधार नाही.नास्तिक माणसाला असल्या आधाराची गरजच नसते. असली अज्ञात शक्ती त्याच्या दृष्टीने अस्तित्वातच नसल्याने कुठल्याही अतिंद्रिय शक्तींवर तो मदतीसाठी अवलंबून राहत नाही. किंबहुना जे काही करायचे आहे ते आपल्यालाच करायचे ही खुणगाठ मनाशी पक्की असल्याने तो मानवी आवाक्यात जे जे शक्य असेल ते ते करतो.
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by सतिश गावडे
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by सतिश गावडे
देव मानायचा की नाही हे वैयक्तिक मत होऊ शकेल.वैयक्तिक मत हे अनुभवातून येतं. इतक्या लहान वयात वैयक्तिक मत असेल असं मला वाटत नाही. या वयात आपली मतं आपण आई वडिलांवरूनच ठरवतो. आईवडिलांचा कल बघून आपलं मत ठरवायला मुलं शिकतात. म्हणून टीनएजर्स होईपर्यंत पालकांचे आणि त्यांचे खटके उडत नाहीत. एकदा बाहेरचं वारं लागलं की मगच महायुद्ध सुरू होतं. तेव्हा एक मुद्दा म्हणून मी माझं वेगळं मत मांडलं. बाकी मोठ्या माणसांच्या बाबतीत हे ठीकच आहे. पण लहान मुलांना थोडं देव, भुतं, पर्या वगैरे जगात राहू द्यावं असं माझं मत आहे. उगीच त्यांना जगातल्या भीषण गोष्टींची जाणीव करून द्यायची काय घाई आहे?
इथे तुम्ही जनरलायझेशन करत आहात. कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं जर तुम्हाला वाटत नसेल तर तो तुमचा विचार चुकीचा आहे. चांगलं आणि वाईट वागणं हा मानवी स्वभाव आहे. चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही स्वभावाची माणसं आस्तिक आणि नास्तिक अशा दोन्ही प्रकारात आढळतील.दारू पिवू नये असं माझ्या पालकांचं मत आहे. त्यांचं मॉरल दडपण माझ्यावर असल्यामुळे मी दारू पीत नाही. नाहीतर मी प्यालोच असतो. हे फक्त उदाहरण म्हणून. दारू चांगली की वाईट हा मुद्दा नाही. मुद्दा हा आहे, की देव हा फॅक्टर माणसाच्या स्वच्छंदीपणावर नियंत्रण ठेवणारा फॅक्टर आहे. कशाची तरी भिती आहे म्हणून माणूस स्वतःवर बर्याचदा नियंत्रण ठेवतो. मानवी स्वभाव वगैरे आहेच. पण जिथे to be or not to be असा बॉर्डरलाईन वरचा प्रश्न असतो तिथे देव हा घटक चांगलं वागण्याच्या बाबतीत निर्णायक ठरत असावा असं मानायला बरीच जागा आहे.
नास्तिक माणसाला असल्या आधाराची गरजच नसते. असली अज्ञात शक्ती त्याच्या दृष्टीने अस्तित्वातच नसल्याने कुठल्याही अतिंद्रिय शक्तींवर तो मदतीसाठी अवलंबून राहत नाही. किंबहुना जे काही करायचे आहे ते आपल्यालाच करायचे ही खुणगाठ मनाशी पक्की असल्याने तो मानवी आवाक्यात जे जे शक्य असेल ते ते करतो.हे बोलायला ठीक आहे. मानवी मन हे मशीन नव्हे. "मानवी आवाक्यात जे जे शक्य असेल" हा इथे मुद्दा आहे. तो आवाका संपला की माणूस कोसळतो. अशा वेळी मनावरचं अतिप्रचंड दडपण आस्तिक कदाचित त्या सेफ्टी व्हॉल्व्ह मुळे सहन करील. नास्तिक लोकांना ती संधी नाही. जे काही करायचे आहे ते करून झाल्यावर काय?
In reply to १) आणि असं जर असेल तर ते by काळा पहाड
२) शिवाय कट्टर नास्तिक माणसाला कशाचंही मॉरल दडपण असेल असं मला वाटत नाही. म्हणजे एक सामान्य माणूस जसा देवाला का होईना घाबरून काही गोष्टी करणार नाही, तसं त्याच्यावर एखाद्या गोष्टीचा धाक नसेल. आता तुम्ही याच्या विरोधात कितीही मुद्दे मांडलेत तरी ते आदर्शवादी असतील आणि खर्या जगात देवाचं तथाकथित आस्तित्व बर्याच गुन्ह्यांना आळा घालत असावं असं मला वाटतं.
याचा सर्वात प्राथमिक प्रतिवाद एक माणुस धार्मिक आहे म्हणुनच फक्त तो रेप हत्या करत नाही अस म्हणणं म्हणजे त्याला मुलभुत संवेदनशीलता च नाहीये असा होतो. उद्या धर्माने आज्ञा दिल्यावर तो हे सर्व बिनदिक्कत करेल. यात मानवी संवेदनशीलतेच मुलभुत अस्तित्व नाकारण झाल. संवेदनशीलता जीने एक माणुस दुसरया माणसाच्या सफरींग वा वेदनेशी रीलेट करतो ती.
एखाद्या बेटावर एखाद्या मुलाला पुर्ण गॉडलेस वातावरणात वाढवलं तर तो ईश्वराविषयी प्रश्न विचारणार नाही पण तो अस्तित्व विषयक प्रश्न नक्कीच उपस्थित करेल. मी कोण आहे ? माझ्या सभोवतालाचा माझ्या अस्तित्वाशी काय संबंध आहे ? माझ्या जगण्याच प्रयोजन काय आहे ? इ.
तो मुलगा कुठल्याही देवाने धर्माने आज्ञा जरी दिली नाही तरी त्याच्या मित्राला सहकारयाला पुर्ण मानवी कारणांनी प्रेरणांनी नैतिक प्रतिसाद देइल.
एक प्रयोग सर्व्हे घेऊन पीटर सींगर आणि मार्क हॉसर यांनी केलाय तो वाचण्यासारखा आहे. तीन वेगवेगळ्या मोराल सिच्युएशन्स त्यांनी धार्मिक व नास्तिक लोकांना दिल्या व त्याची उत्तरे देण्यास सांगितले त्यात आस्तिक व नास्तिक असल्यामुळे उत्तरात फरक पडलेला नाही असे आढळुन आले.
डिटेल इथे वाचता येईल.
१-http://www.utilitarianism.net/singer/by/200601--.htm
फ्रान्स डे वाल यांचे नैतिकतेच्या उत्क्रांती वरील संशोधन Primates and Philosophers: How Morality Evolved हे एक अप्रतिम पुस्तक धार्मिकतेच्या हि अगोदर अस्तित्वात असलेली मानवी अंगभुत नैतिकता कशी उत्क्रांत होत गेली.In reply to नास्तिकतेचे लढ़े..... by स्वप्नांची राणी
In reply to मुलीचे लग्न जुळावे म्हणून by मांत्रिक
In reply to अहो मांत्रिकबुवा, जसं तुम्ही by स्वप्नांची राणी
In reply to नास्तिकतेचे लढ़े..... by स्वप्नांची राणी
विरोध होतोच पण तरिही माझे छोटे छोटे लढे मी लढतेच आणि चक्क जिंकतेही. कसलेही उपास, व्रते ई. मी करत नाहीच.तुमच्या पुढच्या लढ्यांसाठी शुभेच्छा.
In reply to माझे मत by सह्यमित्र
In reply to नास्तिकतेपेक्षा लॉजिकल by स्वप्नांची राणी
In reply to नास्तिकतेपेक्षा लॉजिकल by स्वप्नांची राणी
In reply to नैतिकतेचा आणि आस्तिक व नास्तिक असण्याचा काही संबंध नाही by मारवा
In reply to नैतिकतेचा आणि आमचा फार संबंध by प्यारे१
In reply to "नैतिकतेचा आणि आमचा फार संबंध by स्वप्नांची राणी
In reply to या कौलावर आस्तिक विरुद्ध by राजेश घासकडवी
In reply to हे 'सपाटीकरण' वर दिलं असतंत by प्यारे१
In reply to मूळ लेखात लिहिलंय हो थोडं. पण by राजेश घासकडवी
In reply to या कौलावर आस्तिक विरुद्ध by राजेश घासकडवी
In reply to फुरो...वगैरे... by स्वप्नांची राणी
In reply to भोत कंफूजन हय by पैसा
In reply to मी कसल्याच व्याख्या करत by राजेश घासकडवी
In reply to मग कसं हो! by पैसा
व्याख्या नसतील तर तुम्हाला काय अभिप्रेत आहे ते मला कसं कळणार?तुमची स्वतःची व्याख्या वापरलीत तर एकाच निकषावर तुम्ही व तुमचे आईवडील जोखले जातील. यातून अॅब्सोल्यूटली पूर्वीची पिढी कशी होती, यापेक्षा पूर्वीच्या पिढीपेक्षा आजची पिढी या दिशेला झुकली आहे, त्या दिशेला की जैसे थे आहे याबद्दल निश्चित विधानं करता येतात.
इंटरनेट वापरणारे मराठी लोक कितीसे आहेत? त्यावरून संपूर्ण मराठी लोकच नव्हे तर भारतीय लोकांबद्दल तुम्ही अंदाज लावू पहात असाल तर ते फारच अपुरे निरीक्षण ठरेल.हा सर्वे सर्व लोकांसाठी नाहीच. 'भारतात धार्मिकता वाढते आहे का' यापेक्षा 'भारतातल्या सुशिक्षित, बुद्धिजीवी, कॉंप्युटर सॅव्ही, उच्चमध्यमवर्गीयांत काय परिस्थिती आहे' हे जोखण्याचाच प्रयत्न आहे. आणि तसंही हे निष्कर्ष काही मी एखाद्या समाजशास्त्रीय जर्नलमध्ये पब्लिश करू शकण्याइतके रिगरस नाहीतच. पण आपल्या संस्थळावरचे इतर कसे वाढले, त्यांच्यात काय बदल झाला याचं चित्र आपल्यापुढेच उभं राहील अशी आशा आहे.
तसे पाहिले तर धार्मिकता एकूण वाढलेली दिसते. त्यासाठी फार खोलात जायची गरज नाही.तीच तर गंमत आहे. धर्माचं स्तोम आत्ता वाढलं असं म्हणतो आपण, पण मी ज्या चाळीत राहायचो तिथे उत्सवांना मोठ्ठा कर्णा लावून ढाणढाण गाणी उशीरापर्यंत लावली जायचीच. आणि हे प्रत्येक बिल्डिंगमध्ये, वाडीमध्ये - उत्सवांना, लग्नाला व्हायचं. त्याकाळी गर्दी कमी होती म्हणून आवाजही किंचित कमी असेल. पण आजकाल दहा वाजता आवाज बंद करण्याचे नियम त्याकाळी नसायचेच किंवा पाळले जायचे नाहीत. सामाजिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्य यात फरक असतो हे मान्यच. फक्त एका विशिष्ट गटाचं धार्मिकतेच्या अवडंबराबद्दलचं प्रेम कमी होत चाललं आहे. आणि हा गट झपाट्याने वाढतो आहे. हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
In reply to व्याख्या नसतील तर तुम्हाला by राजेश घासकडवी
In reply to तुमची स्वतःची व्याख्या by मांत्रिक
- मी जाहीर रीत्या फोरमवर्,ऑफीसात , मित्रमंडळीत अगदी पुरोगामी ( छ्या देव बिव काही नसतो नसती थेरं आहेत ही सनातन्याची अशी नेमस्त पिंक टा॑कत असेन आणि प्रत्यक्षात नित्य नेमाने सकाळी संध्याकाळी देवाला नमस्कार करणार्यांचा विनाकारण उपहास्/तिरस्कार्/हेटाळणी करीत असेल तर मी नक्की कोण ? पुरोगामी,अनिस का देव नाहीच आहे आणि हे स्गळे अज्ञ आहेत "याच पोथीला" चिकटून्/कवटाळून बसलेला नव प्रतीगामी?
- श्रीमंत जशी ही सापेक्ष आणि व्य्क्तीनुरूप बदलणारी व्याख्या आहे म्हणजे २ वेळेची भ्रांत असलेल्याला कायम नोकरीवाला श्रीमंर वाटतो. कायम नोकरीतला देशी बाबू परदेशीला श्रीमंत समजतो. परदेशी वाला चार ठिकाणी पान तीन वर आलो की आणि विचारवंताचे नामावळीत्/प्रभावळीत नाव आलेल्यांना श्रीमंत सम्जतो. तसेच काहीसे श्रद्धेचे/आस्तीकतेचे नाही का?
रबडी-बासुंदीत
रूपांतर होणार नाही हे उच्च्भ्रू विचारवंतांना माहीत नाही काय? अगदी "ढ"गोळा प्रत्येक श्रद्धाळूला आंधळेपणाने विरोध कराय्लाच पाहीजे असा तिरपागडा बुद्धीभेद नसलेला,काहीसा गांवढळ, मीच तो दुसरा कोण? नाखुसIn reply to काही चिल्लर आणि फुटकळ by नाखु
In reply to कर्मकांड, भक्ती आणि आपण. by प्रभाकर पेठकर
त्यामुळे, घासकडवी साहेब, मला वाटतं असा कौल कधीच अचूक असू शकणार नाही.अचूकतेचा दावा इथे नाहीच. अचूकता ही फारच ओव्हररेटेड संकल्पना आहे. आपण उद्या जीवंत असू की नाही हेही अचूकपणे सांगता येत नाही, तिथे बाकीच्या अचूकतेला काय अर्थ राहातो? पण म्हणून आपण आसपासचं जग काय आहे, आत्ता काय चित्र दिसतं आहे, याचा अंदाज बांधायचे थांबत नाही. हे अंदाजही बऱ्याच वेळा चुकतात. पण तरीही आपण त्या चुकांतूनही शिकतो. या कौलाचा हेतू अचूक अंदाज बांधण्यापेक्षा प्राथमिक चित्र मांडणं हा आहे. आपल्या आईवडलांच्या मानाने आपण अधिक धार्मिक आहोत की नाहीत हे सर्वसाधारण माणसाला सांगता येतं. कारण त्यात त्याच्या व्याख्या, त्याचे निकष असतात. असं जर शेकडो लोकांनी केलं तर काहीनाकाही उत्तरं दिसून येऊ शकतात. आता तुम्ही रेस्टॉरंट व्यवसायात आहात म्हणून समांतर उदाहरण देतो. धार्मिकतेप्रमाणेच 'चांगली चव' हीही व्याख्या करायला कठीण आहे. पण जर तुम्ही काल शेफ बदललात आणि तुमच्या जाणकार खवैय्यांना विचारलंत, की बाबा परवा तुम्ही खाल्लंत आणि आज खाताहात, त्यातल्या चवीच्या फरकाबद्दल तुमचं काय मत आहे? प्रत्येकाची चवीची जाण, पारख वेगळी असली तरी शंभरपैकी पंच्याऐशी लोकांनी तुम्हाला सांगितलं की 'हो, आजची चव मला जास्त आवडली' तर याचा अर्थ नवीन शेफ काहीतरी जास्त चांगलं करतो आहे - तुमच्या कस्टमरांसाठी. हे उत्तर अचूक आहे का? नाही. कदाचित तुमचे कस्टमर नसलेले इतर हजार लोक म्हणतील की परवाची चव जास्त चांगली होती. पण आपल्याला हे सर्वे घ्यावे लागतात, आणि त्यातून मर्यादित का होईना अर्थ काढावे लागतात. आणि असे मर्यादित अर्थ पुरेशा वेळेला एकमेकांना समान निघाले की ते सत्य म्हणून स्वीकारावं लागतं. आजची पिढी कालच्या पिढीपेक्षा कमी धार्मिक आहे का? हा असाच अनेक अंगं असलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर विशिष्ट गटासाठी वेगळं तर दुसऱ्या गटासाठी वेगळं असू शकेल. पण म्हणून हा प्रश्न गटागटाला विचारूच नये असं नाही.
In reply to तुमचा एकंदरीत प्रतिसाद by राजेश घासकडवी
In reply to आस्तिकता याच्याइतकी भोंगळ आणि by विजुभाऊ
In reply to आस्तिकता याच्याइतकी भोंगळ आणि by विजुभाऊ
In reply to आस्तिकता याच्याइतकी भोंगळ आणि by विजुभाऊ
" आम्ही देवाला मानतो म्हणजे तुम्हीसुद्धा मानलेच पाहिजे" हा जिहादी माजोरडेपणा ज्या दिवशी संपेल त्यादिवशी जगातली सगळी अधर्मयुद्धे संपतील.आम्ही देवाला मानतो पण तुम्ही मानत नाही म्हणून आमच्या देवाला मानण्याची थट्टा उडवु नका हे कळकळीचे सांगणे ज्या दिवशी माजोरड्या नास्तिकांना पटेल त्या दिवशी जगातील सर्व आस्तीक-नास्तीक सुखाने नांदतील.
In reply to " आम्ही देवाला मानतो म्हणजे by द-बाहुबली
In reply to आस्तिक - नास्तिक. by प्रभाकर पेठकर
In reply to आस्तिक - नास्तिक. by प्रभाकर पेठकर
In reply to पेठकरकाका " माजोरडेपणा " हा by विजुभाऊ
In reply to पेठकरकाका " माजोरडेपणा " हा by विजुभाऊ
पेठकरकाका " माजोरडेपणा " हा शब्द मलाही खटकतो. आस्तिकतेला किंवा त्यांच्या आग्रहाला माजोरडेपणा हा शब्द अयोग्य आहे. मात्र माझा आक्षेप होता तो श्री/श्रीमती काळापहाड महोदया यांच्या http://misalpav.com/comment/741834#comment-741834 या विधाना संदर्भात.माझ्या मते बहुतांश तथाकथित आस्तिकांना उगीचच 'देव दाखव नाहीतर नास्तिक हो' प्रकारचे खेळ खेळायची आवड नसते. ते त्यांच्या देवकार्यात मग्न वगैरे असतात. बहुतांश तथाकथित नास्तिकांना ती आवड, वेळ वगैरे सगळं असतं. (मुख्य म्हणजे जर आस्तिक हिंदू असेल तर मुसलमान, ख्रिश्चन, दलित, बौद्ध, ब्रिगेडी आणि तत्सम लोक जरी ते त्यांच्या तथाकथित देवाला मानत असतील तरी केवळ हिंदूंशी वाद करण्याकरिता त्यात उडी घेतात, ते वेगळंच). मुख्य म्हणजे देव कसा नाही हा वादविवाद आस्तिक कधीच जिंकू शकत नाहीत कारण एकतर त्यांना पुरावा देता येत नाही, आणि दुसरं म्हणजे त्यांच्याकडे प्रतिगामी म्हणून बघितलं जातं. तथाकथित नास्तिक लोकांच्यात तथाकथित पुरोगामी, समाजवादी, साम्यवादी आणि वर उल्लेख केलेल्या सगळ्यांचा भरणा असल्यानं आस्तिकांशी वाद करताना तो माजोरडेपणा जाणवतोच. आणि इथे माजोरडे पणा ला दुसरा शब्दच नाही. खास करून हिंदूंच्या श्रद्धांवर हल्ला करण्यासाठी लॉजिकचा आसरा घेणार्यांना दुसरं काय म्हणायचं ते सांगा मग. बाकी दाभोळकरांचं उदाहरण घेवू. आस्तिक लोक दाभोळकरांना तुम्ही आस्तिक व्हा म्हणून मागे लागले होते का हो? अनंतमूर्तींनी मूर्तीवर मूत्र विसर्जन करायला काही हरकत नाही असं म्हणताना आस्तिक लोकांवर जो मानसिक हल्ला केला त्या मध्ये माजोरडं कोण होतं?
ज्याप्रमाणे इतराना अमुक एक ठिकाणी गेल्याने सर्व कामे पूर्ण होणार आहेत असा आग्रह धरताना लोक पहातो तद्वत बुद्धीप्रामाण्यवादी उगाच स्वतः होऊन मूर्ती तोडत बसणार नाही. किंबहुना तो त्या मूर्तीतील सौंदर्य शोधेल.उगीच कुणाला आस्तिक करण्यात कुणालाही इंटरेस्ट असेल असं मला वाटत नाही. ती मनाची अवस्था आहे. ती जबरदस्तीनं बदलता येत नाही. जसं देव नाही हे जबरदस्तीनं पटवता येत नाही तसंच.
घरात ठरावीक देवाचीच पूजा व्हावी असा दुराग्रह धरणारे लोक इतर देवतंचा प्रसादही घेत नाहीत.एका धर्मात बाळ कृष्णाची पूजा केली जाते तेथे कृष्ण हा मोठा झाल्यावरचे कार्यच अमान्य करन्यात येते हा किती विरोधाभास म्हणायचा. तेच लोक गणपतीच्या आरतीला अमान्य ठरवतात, सत्यनारायणाच्या पूजेचा प्रसाद नाकारताना पाहिले आहेत.तुम्ही नक्की कुणाबद्दल बोलताय माहिती नाही पण एखाद्या घरात फक्त शिवाला मानणारे किंवा विष्णूला मानणारे असू शकतात. बहुतांश आस्तिक लोक असं करतील असं वाटत नाही पण तसं न करणं ही चुकीचं नाही. श्रद्धा ही गोष्ट विज्ञानाच्या आणि लॉजिकच्या चौकटीत बसवता येत नाही. त्यांना वाटतं, ते करतात. तुम्ही का त्यांना जबरदस्तीनं प्रसाद देताय?
अशा लोकाना अडमुठे म्हणायचे नाही तर दुसरे काय म्हणायचे. स्वतःचे म्हणणे तेच बरोबर दुसर्यानी सुद्धा तेच अंगीकारावे असे म्हणणारात आणि औरंगजेबात फरक तो काय. त्याने तलवारीच्या बळावर केले हे लोक इतराना भावनीक ब्लॅकमेल करत करतात इतकाच.पुन्हा एकदा. डॉक्टर लागू म्हणतायत की देवाला रिटायर करा. आस्तिक लोक त्यांना पूजा करायला सांगतायत का? नक्की कोण कुणाच्या श्रद्धांवर हल्ला करतोय एकदा तपासून पहा.
In reply to पेठकरकाका " माजोरडेपणा " हा by काळा पहाड
In reply to श्रद्धा आणि अतिरेक. by प्रभाकर पेठकर
In reply to उत्तम प्रतिसाद. by राजेश घासकडवी
एकमेकांना न ओरबाडता शांत चर्चा होऊ शकेल अशी आशा वाटते.म्हणजे चर्चा करायची तयारी आहे तर...
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
म्हणजे या तीन कॅटेगिरी अत्यंत चुकीच्या गृहितकावर आधारून केलेल्या आहेत. म्हणजे अस्तिक माणूस आणि पूजापाठ करणारा, स्तोत्रे म्हणणारा या दोन गोष्टी इंटरचेन्जेबली वापरलेल्या आहेत.तशा त्या असतातच याला आधार काय? गणपती उत्सवात लाऊडस्पीकरवर कोकलणारी माणसे, अमक्यातमक्या देवाच्या जयंतीच्या दिवशी धांगडधिंगा घालणार्या माणसांना ते लोक सगळ्या गोष्टी 'देवासाठी' करतात म्हणून तुम्ही अस्तिक जरूर म्हणाल.पण अनेकदा सगळ्यात चोर माणसे असे देवदेव करतात आणि आपल्या मनातील अपराधीपणाची भावना कुठेतरी कमी करायचा प्रयत्न म्हणून या सगळ्या सो कॉल्ड धार्मिक गोष्टी करतात. अशा लोकांना तुम्ही जरूर अस्तिक म्हणाल पण मी अशा चोरांना देवाचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करणारे ढोंगी माणसे म्हणेन. आणि लोक गैरवापर करतात म्हणून 'देव' हा प्रकारच रद्दड आहे असे नास्तिक लोक नक्कीच म्हणतात पण कुठल्याही चांगल्या गोष्टीचा चुथडा करणे हा मनुष्यस्वभाव झाला.त्यामुळे चुथडा झाला म्हणजे मुळातली गोष्टच बेकार आहे असे अजिबात म्हणता येणार नाही. एकूणच माझ्यासारख्यांची नेहमी पंचाईत होते.याचे कारण म्हणजे मी अस्तिक आहे असे म्हटले तर कर्मकांडवाले मला त्यांच्यातलाच एक समजतात आणि मी कर्मकांडांच्या विरोधी आहे असे म्हटले की स्वयंघोषित बुध्दीप्रामाण्यवादी मला त्यांच्यातलाच एक समजतात.अहो असं नाही काय, एखादा डॉ.चुकला निदानात/उपचारात आणि त्याचा गंभीर परिणाम झाला तर वैद्यकशात्रच फालतू/फडतूस आहे असे म्हणने म्हणजे पुरोगामीत्व धरले जात नाही पण रस्त्यावरच्या धांगडदिग्याला, घरात शांतपणे कुणालाही त्रास न होता (आणि आप्ल्या जबाबदार्या-कर्तव्ये पार पाडून) केलेल्या जपालाही एकाच तागडीत टाकून मिपावर हेटाळणी प्रतीसाद दिला की तुम्ही पुरोगामी झालाच म्हणून समजा.
मी करतो तीच श्रद्धा, बाकीच्यांची ती अंधश्रद्धा इतकीच पोथी उराशी कवटाळली म्हणजे झाले.मुकाट नाखु
In reply to पंखा by नाखु
मी करतो तीच श्रद्धा, बाकीच्यांची ती अंधश्रद्धा इतकीच पोथी उराशी कवटाळली म्हणजे झाले.मुकाट का झालात नाखु ? अपल्या मित्राची आठवण आली का हो टुम्हाला ? ;)
In reply to मुकाट नाखु by प्रसाद गोडबोले
In reply to पंखा by नाखु
मी करतो तीच श्रद्धा, बाकीच्यांची ती अंधश्रद्धा इतकीच पोथी उराशी कवटाळली म्हणजे झाले.यासंदर्भात "आमचा तो शास्त्रीय दृष्टीकोन आणि इतरांची ती अंधश्रद्धा" असे कुठेतरी वाचले होते. मला तरी ते वाक्य भलतेच आवडले होते.
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
In reply to +११११११११ by बॅटमॅन
नास्तिक असणं ही अभिमान बाळगण्याची गोष्ट आहेहा हा हा.
गर्व से कहो सारखे हेही असते हे माहीत नव्हते ब्याट्या....
पण असायला प्रत्यवाय नसावा. नाही का!
एकुणातच चर्चा गंडत चाललीय्ये. आस्तिक असण्याचा कर्मकांडाशी संबन्ध का जोडला जातो? बहुतेक कर्मकांडाच्या शोऑफ शिवाय आस्तिकतेचा ट्यार्पी कमी पडत असावा.In reply to नास्तिक असणं ही अभिमान by विजुभाऊ
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
In reply to समजले नाही by गॅरी ट्रुमन
In reply to समजा तुमचा देवात by ऋतुराज चित्रे
म्हणजे या तीन कॅटेगिरी अत्यंत चुकीच्या गृहितकावर आधारून केलेल्या आहेत. म्हणजे अस्तिक माणूस आणि पूजापाठ करणारा, स्तोत्रे म्हणणारा या दोन गोष्टी इंटरचेन्जेबली वापरलेल्या आहेत.तशा त्या असतातच याला आधार काय? गणपती उत्सवात लाऊडस्पीकरवर कोकलणारी माणसे, अमक्यातमक्या देवाच्या जयंतीच्या दिवशी धांगडधिंगा घालणार्या माणसांना ते लोक सगळ्या गोष्टी 'देवासाठी' करतात म्हणून तुम्ही अस्तिक जरूर म्हणाल.पण अनेकदा सगळ्यात चोर माणसे असे देवदेव करतात आणि आपल्या मनातील अपराधीपणाची भावना कुठेतरी कमी करायचा प्रयत्न म्हणून या सगळ्या सो कॉल्ड धार्मिक गोष्टी करतात. अशा लोकांना तुम्ही जरूर अस्तिक म्हणाल पण मी अशा चोरांना देवाचा स्वत:च्या स्वार्थासाठी वापर करणारे ढोंगी माणसे म्हणेनआपण सगळ्यांना एकाच प्रवर्गात टाकल्याबद्दल आपले जाहीर अभिनंदन. आता पुढील ग्रुहितिइके लिहून आम्हाला कृतकृत्य करा ही विनंती. घरात गुमान जप करणार्या-पूजा करणार्या आस्तीकास (देव भोळ्या नाही):
- रस्त्यातला मंडपाचा त्रास होत नाही.
- तो वर्गणी-झुंडशाहीला घाबरत नाही.
- त्याला धार्मीक स्थ्ळांची ठिकाणची अनागोंदी आणी अस्वच्छता आवडते
In reply to समजा तुमचा देवात by ऋतुराज चित्रे
In reply to योग्य प्रतिसाद, पण फोकस by बॅटमॅन
In reply to आपण by नाखु
In reply to योग्य प्रतिसाद, पण फोकस by बॅटमॅन
वैचारिक माज असा फिजिकली दिसत नाही म्हणून तो निरुपद्रवी वाटतो इतकेच.नेमके आणि मार्मिक, आवडले.
'देवबाप्पा पाप देईल'देवबाप्पा पाप देतो ? अहो पाप पुण्य आपण करतो . देवबाप्पा शिक्षा किवा बक्षीस देतो .
माझ्या आईने सर्व सणवार, रोजची पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास केले. म्हातारपणी (का कोण जाणे पण..) ते सर्व व्यर्थ होते अशी तीची भावना होत गेली आणि सर्व उपास तिने सोडून दिले.हे सर्व करून देव अप्रसन्न होत नसेल पण प्रसन्न होतो का ?लोक वरच्या सगळ्या गोष्टी करतात पण कर्मांचं काय ? कितीही पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास केले तरी त्याची फलं चांगल्या वाईट कार्मान्नुसारच मिळणार आहेत . आयुष्याच्या शेवटी मरणापूर्वी संपूर्ण आयुष्याचा पट एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यांपुढे उघडून दाखवला जातो .पाप पुण्याची यादी दाखवली जाते . आणि मग आयुष्यभर जे केलं ते चांगलं होतं कि वाईट , पाप होतं कि पुण्य , अर्थपूर्ण होतं कि निरर्थक ह्याचा उलगडा होतो . पण सावरण्याची वेळ निघून गेलेली असते
In reply to मी धार्मिक नाही पण अध्यात्मिक by तुडतुडी
In reply to आई .. बाबा .. पोर =एष .. by अत्रुप्त आत्मा
एष .. धर्म: .. टन्ना टन:मस्त प्रतिसाद ! अवांतर : बाकी परवा हॉटेल समाधानला मटन भाकरी आवडली की नाही ते सांगितलेच नाही तुम्ही . ह्या धाग्यावर लिहायचे होते ना काहीतरी ...
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
In reply to मी धार्मिक नाही पण अध्यात्मिक by तुडतुडी
देवबाप्पा शिक्षा किवा बक्षीस देतो .देवबाप्पा शिक्षाही देत नाही अन बक्षीस ही देत नाही .... नमस्यामो देवान्ननु हतविधेस्तेऽपि वशगा विधिर्वन्द्यः सोऽपि प्रतिनियतकर्मैकफलदः । फलं कर्मायत्तं यदि किं अमरैः किं च विधिना नमस्तत्कर्मभ्यो विधिरपि न येभ्यः प्रभवति । । ९४ । । भर्तृहरिनीतिशतकम्
In reply to मी धार्मिक नाही पण अध्यात्मिक by तुडतुडी
आयुष्याच्या शेवटी मरणापूर्वी संपूर्ण आयुष्याचा पट एखाद्या चित्रपटासारखा डोळ्यांपुढे उघडून दाखवला जातो
तुडतुडी जी
हा चित्रपट कोण दाखवतो ?In reply to तुडतुडी जी हा चित्रपट कोण दाखवतो ? by मारवा
In reply to रामसे बंधु by जेपी
In reply to :D by अत्रुप्त आत्मा
In reply to रामसे बंधु by जेपी
In reply to आई-वडील २, मी ३.५ by मराठे
थोडक्यात खाजगी जीवनात कर्मकांडांचं महत्व कमी होत जाताना दिसतं (सार्वजनिक जिवनात मात्र उलटं होत आहे असं वाटतं)असं दिसतंय खरं. कदाचित वेगळ्या डेमोग्राफिक्समध्ये हा प्रवास वेगळा असेल. इथे जे चित्र दिसतंय ते सुशिक्षित मध्यम किंवा उच्चमध्यमवर्गीय, कॉंप्युटर/इंटरनेट सॅव्ही, बहुतांश शहरी अशा लोकांचं आहे. मात्र हे डेमोग्राफिक जर आज दहा टक्क्यांचं असेल तर दहापंधरा वर्षांनी वीस टक्क्यांचं होऊ शकेल. आकडे निश्चित नाही, पण वाढणार हे मात्र खरं आहे.
In reply to बरोब्बर, मला काय म्हणायचं आहे by राजेश घासकडवी
In reply to आँ. by प्रभाकर पेठकर
तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात ?याचे उत्तर तुम्ही पहिल्यांदा द्यायला हवे, ते तुमचे उत्तर काय ?? तुमच्याघरची याबाबतची परिस्थीती काय आहे ?? कारण धागा तुम्ही टाकलाय, लोकांकडून असली माहिती घेण्याअगोदर आपल्याला त्याबद्दल काय वाटते हे प्रथम आपण लोकांना सांगितले पाहिजे.
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं.म्हणजे नेमक काय हे जरा अधिक विस्ताराने सांगाल का ?? बरे, तुमची धर्माची व्याख्या काय ?? धर्म म्हणजे तुम्ही नेमके काय समजता ?? या विषयावर धागा काढण्याचा व काथ्याकूट घडवून आणण्यामागचा तुमचा मुख्य हेतु काय ?? हे मला पडलेले प्रश्ण.....!!!
In reply to तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध by विनोद१८
याचे उत्तर तुम्ही पहिल्यांदा द्यायला हवे, ते तुमचे उत्तर काय ?? तुमच्याघरची याबाबतची परिस्थीती काय आहे ?? कारण धागा तुम्ही टाकलाय, लोकांकडून असली माहिती घेण्याअगोदर आपल्याला त्याबद्दल काय वाटते हे प्रथम आपण लोकांना सांगितले पाहिजे.उत्तर दिलेलं आहे हो. या प्रतिसादात.
बरे, तुमची धर्माची व्याख्या काय ?? धर्म म्हणजे तुम्ही नेमके काय समजता ?? या विषयावर धागा काढण्याचा व काथ्याकूट घडवून आणण्यामागचा तुमचा मुख्य हेतु काय ?? हे मला पडलेले प्रश्ण.....!!!आता मला तुम्हाला पुन्हा पुन्हा तेच तेच सांगायला नको वाटतं, पण प्लीज, जरा प्रतिसाद वाचा हो. मूळ लेखात जे स्पष्ट झालेलं नाही, त्याचं स्पष्टीकरण मी वेगवेगळ्या पद्धतींनी दिलेलं आहे. असं करा, कंट्रोल एफ दाबून त्यात या धाग्यातच 'राजेश' असं सर्च करा, म्हणजे माझे प्रतिसाद एकामागून एक दिसतील. त्यात दिलेली आहेत हो उत्तरं. प्लीज, जरा वाचा एकदा.
तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?यातल्या "आहात?" चं उत्तर मिळत आहे/मिळेल. मी "असतात का?" ,याचं उत्तर सांगून टाकतो. मी गेली १७वर्ष पौरोहित्य करताना जे जवळून पाहिलेलं आहे,त्या आधारावर हे उत्तर आहे. किशोर वयापासून ते विवाहपूर्व वयापर्यंत बहुसंख्य मुलं पालकांच्या दबावा खाली पूजेला बसत असतात. स्वत: हौसेनी पूजेला बसणाय्रा मुलांचं प्रमाण २० टक्क्या पेक्षा जास्त नाही. पण हे सर्व पालकांच्या क्रुपा छत्राखाली जगत असतानाचं वर्तन आहे..जेंव्हा मुलं कॉलेज संपवून नोकरी शोधणे,लागणे.. या स्वत:च्या स्व'तंत्र आणि हरेक प्रकारची जबाबदारी अंगावर-पडणाय्रा विश्वात शिरतात तेंव्हा ही नास्तिकांची आस्तिक बनलेली दिसली आहेत , आणि वीस टक्के हौशींपैकी बरीच जणं नास्तिकतेकडे वळलेली पहायला मिळालेली आहेत. आता हे सगळं स्टेडी केंव्हा होतं? तर ते होतं विवाहानंतर. मग मात्र मजा मजा पहायला मिळालेली आहे.. त्याला मी तरी कुठल्याही प्रकारचं "लेबल" लावायचं धाडस करणार नाही. कारण हीच ती मुलं असतात जी विवाहपूर्व आयुष्याच्या दोन टप्प्यात दोन बदल घेउन जगलेली असतात. ती एकाच वेळी नास्तिकंही असतात आणि आस्तिकंही! हे अनिर्णित अवस्थेतलं प्रमाण ८० टक्के आहे. उरलेल्या २० टक्क्यांमधे डायरेक दोन टोकं आहेत. १) कट्टर सनातनी (म्हणजे आंम्ही ज्यांना टनाटनी म्हंन्तो,त्ये एष धर्म: टन्नाटन्न: वादी.. जे धर्माचा स्वयंलिप्त अर्थ-काढून त्यातून आपलं टन्नाटन्नी जीवण जगतात. ) २) पुरोगामी सेक्युलर ( म्हणजे व्यवहारात - फुर्रोगामी फेक्युलर..ह्यांचं प्रमुख लक्षण म्हणजे हे स्वत:चा वैयक्तिक {शिल्लक असलेला} धर्म सोडून बाकिच्यांच्या धर्मांबाबत अगदी भयंकर निरपेक्ष असतात. एष धर्म: टन्ना टन्न: वाद्यांचे हे सावत्र भाऊच जनू!!! ) ===================== आता यातूून तुम्माला काय घ्यायचा त्यो शोधबोध घ्या हो... घासूकाका! ;)
In reply to चला, आता घासू गुर्जींचं by अत्रुप्त आत्मा
In reply to चला, आता घासू गुर्जींचं by अत्रुप्त आत्मा
किशोर वयापासून ते विवाहपूर्व वयापर्यंत बहुसंख्य मुलं पालकांच्या दबावा खाली पूजेला बसत असतात.................... आता हे सगळं स्टेडी केंव्हा होतं? तर ते होतं विवाहानंतर.
ते स्टेडी होणं असतं की पालकांच्या दबावाखालून निघून बायकोच्या दबावाखाली गेल्यामुळे बदललेलं मत असतं ???
बुवा, करा पुढचा स्टडी याच्यावर ;) :)
In reply to किशोर वयापासून ते विवाहपूर्व by डॉ सुहास म्हात्रे
In reply to चला, आता घासू गुर्जींचं by अत्रुप्त आत्मा
हे अनिर्णित अवस्थेतलं प्रमाण ८० टक्के आहे. उरलेल्या २० टक्क्यांमधे डायरेक दोन टोकं आहेत.आणि तिसरं एक टोकं आम्हाला माहीत आहे ३) स्वमतांध दांभिक म्हणजे स्वतःच्या फायद्या करिता जे लोकं कर्मकांडं करतात अन नंतर अगदी त्याच्या विरुध्द मत मांडुन आपणच कसे शहाणे ह्याचा प्रचार करतात ... हे म्हणजे अगदी स्वतः नळ्या ओढत , तांबडा पांढरा रसा ओरपायचा अन नंतर अहिंसा परमो धर्मः , भूतदया वर प्रवचन देत मीच कसा शहाणा म्हणत डिंडोरा पिटत फिरतात !! =))
In reply to हे अनिर्णित अवस्थेतलं प्रमाण by प्रसाद गोडबोले
In reply to @३) स्वमतांध दांभिक म्हणजे by अत्रुप्त आत्मा
In reply to अररर लैच स्वार्थी हाय की हा by प्यारे१
In reply to अजून एक स्वमतांध प्रतिवाद. by अत्रुप्त आत्मा
In reply to अजून एक स्वमतांध प्रतिवाद. by अत्रुप्त आत्मा
In reply to आणि औषध घ्यायला जात नाही तर by प्यारे१
तुम्हांला रुढीप्रिय म्हणायचं