मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विवाह जुळवताना पत्रिकेला किती महत्व देता?

प्रकाश घाटपांडे ·
कुणाच्याही आयुष्यात विवाह ही मोठी घटना असते. एखादे स्थळ आल्यावर हा निर्णय घेताना ती व्यक्ती व कुटुंब अनेक बाबी विचारात घेते. त्यापैकी पत्रिका जुळणे हा एक मुद्दा असतो. आपण स्वत:च्या किंवा मुलामुलीच्या नातेवाईकांच्या लग्नात पत्रिकेला किती महत्व देतो हे जाणुन घेणे हा उद्देश या कौलाचा आहे.पोल ची सुविधा इथे आता अस्तित्वात नाही. पण खालील पर्याय निवडू शकता १) पत्रिका पहायचीच आहे २) आम्हाला पत्रिका पहायची नाही.परंतु समोरच्यांना पहायची असल्यास आमची ना नाही ३) आम्हाला पत्रिका पहायची नाही व समोरच्यांनाही पहायची नाही असे स्थळ हवे आहे. ४) आम्हाला जुजबी पत्रिका पहायची आहे.

तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?

राजेश घासकडवी ·
एका बाजूला आपल्याला धर्माचा वरचष्मा सामाजिक जीवनात वाढताना जाणवतो. पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला अनेकांच्या वैयक्तिक आयुष्यात धर्माचं स्थान कमी होताना दिसतं. त्यातलं समाजात दिसणारं चित्र आपल्याला देवळांच्या रांगा, गणेशोत्सवातली गर्दी, बातम्या यांमधून दिसत असतं. वैयक्तिक बाबतीत मिपाकरांमध्ये काय चित्र आहे हे जाणून घेण्यासाठी हा कौल घेण्याचा प्रयत्न. या कौलातून निघणारे निष्कर्ष हे अर्थातच मर्यादित सॅंपलमुळे सर्व समाजाला लागू होणार नाही, पण तरीही एका छोट्या समाजगटाचं का होईना, पण प्राथमिक चित्र निर्माण होईल अशी आशा आहे. धार्मिकता, आस्तिकता, श्रद्धा या गोष्टी मोजायला सोप्या नाहीत.