मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२३ व्या शतकातील धर्म आणि हिंदू धर्म

मंदार कात्रे ·
इसवी सन २२५० साली धर्म आणि हिंदू धर्माचे स्वरूप आणि मानवी जीवनातील स्थान काय असेल याबाबत काही विचार मनात आले.... त्याबद्दल आपली मते अपेक्षित आहेत... १. ह्युंमनोईड रोबोट आणि मानव यांचे संबंध आणि याबाबत तत्कालीन धर्माचे काय मत असेल? २. अस्ट्रॉइड बेल्ट आणि मंगळ इत्यादी ग्रहावरील वसाहतीतील लोकं कोणता धर्म पाळत असतील व त्यांच्या आयष्यात धर्माचे काही स्थान असेल का व असल्यास काय? ३. मानवी लैंगिक संबंध आणि प्रजोत्पादन याबाबत तत्कालीन धर्म नियम काय असतील? कारण बहुधा सर्व प्रजोत्पादन यांत्रिक असणार... असे अनेक प्रश्न मनात आले... आपणास काय वाटते???

घरपरती आणि त्यातील अडथळे

उपयोजक ·
भारतात पहिला ख्रिश्चन धर्मोपदेशक इ.स.५२ साली केरळात आला. पहिले मुस्लिम आक्रमण इ.स.७११ मधे झाले. तेव्हापासून या धर्मियांकडून भारतात जबरदस्तीने किंवा पैशाचं आमिष दाखवून किंवा भ्रामक गोष्टी सांगून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे यथाशक्ती प्रयत्न सुरु आहेत. ऐतिहासिक काळात मुस्लिम शासकांनी प्रामुख्याने तलवारीच्या जोरावर दहशत पसरवून तर ख्रिश्चनांनी तलवार,बंदूक आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांमधे गायीची चरबी लावलेले पाव टाकून कितीतरी हिंदूंचे धर्मांतर केले. याव्यतिरिक्त हिंदू धर्मातील जातीच्या पिरॅमिडमधे सर्वात तळाशी असणार्‍यांना तुम्हाला हिंदू धर्मात सन्मानाची वागणूक मिळत नाही; आमचा धर्म दयाळू आहे.

धार्मिक फसवणूक - एक गैरसमज

arunjoshi123 ·
http://www.misalpav.com/node/42032 या धाग्यावर खालील प्रतिसाद आलेला. त्याच्या उत्तरार्थ हा धागा आहे. गंमत म्हणून वाचा.
गर्दी, त्याचा तुच्छतादर्शक 21 Feb 2018 - 3:15 pm | बिटाकाका गर्दी, त्याचा तुच्छतादर्शक उल्लेख याबतीतील मुद्दा इतर उदाहरणामुळे पटला. त्यामुळे ते नास्तिकांचं एक राहू देतो. ------------------------------------------- पण धार्मिक स्थळी ते ज्या देवाला मानतात त्याचे काही सेकंदासाठी दर्शन घेण्यासाठी जी रेटारेटी, फसवणूक (स्वतःची आणि दुसऱ्यांची) चालते, हे कसे समर्थनीय आहे? देव चराचरात आहे हि शिकवण सर्व ईश्वरवाद्यांना का मान्य नसावी?

मागचा जन्म!

उपयोजक ·
काही वेळा आपण आपल्या जीवनात येणार्‍या समस्यांसंदर्भात ज्योतिषीय मार्गदर्शन घेताना ज्योतिषांकडून मागच्या जन्माचा संदर्भ बर्‍याचदा वापरला जातो.ज्योतिषशास्त्रावरच्या बर्‍याचशा पुस्तकांमधेदेखील या पूर्वजन्माचा उल्लेख बर्‍याचदा असतो. बरेच प्रयत्न करुनही जातकाला एखाद्या गोष्टीत हवं तसं यश मिळत नसेल किंवा जातकाचं अपत्य अपंग असेल,अपत्य कटकटी असेल किंवा एखादा गंभीर आजार असेल तर "मागील जन्मातल्या इच्छा अपूर्‍या राहिल्या असल्याने किंवा मागील जन्मी काहीतरी पाप केल्यामुळे आताच्या जन्मात हा त्रास भोगावा लागतोय" हे कारण बर्‍याचदा सांगितलं जातं.शिवाय ही पूर्वजन्माची थेअरी बरेच ज्योतिषी मानतात.काही ज्य

‘सलाफी’इझम – आक्रमक इस्लाम की तात्विक इस्लाम?

रणभोर ·
२०१४ च्या जून मध्ये पूर्वीच्या इस्लामिक स्टेट नावाच्या एका संघटनेनी ‘अबू बक्र अल-बगदादी’ याच्या नेतृत्वाखाली इराक आणि सीरियाच्या मोठ्या प्रदेशावर खिलाफत स्थापन केली. सुरवातीच्या काळात खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी अमेरिकी शास्त्रांच्या आधारे विजयसुद्धा मिळवले. जगातली दोन मोठ्या खनिज तेलाच्या विहिरी त्यांच्या ताब्यात होत्या. मोठ्या प्रमाणावर बिगर मुसलमानांच्या कत्तली, धर्मांतरं, बलात्कार त्यांनी केले. ‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरीया’ने स्थापन केलेली खिलाफत हा जगासमोरचा एक मोठा प्रश्न बनला होता.

समाजामध्ये कमी माहिती जैन समाजाबद्दल ?

निओ१ ·
आपल्या समाजामध्ये जैन समाजाबद्दल खूप कमी माहिती आहे का ? दिगंबर जैन का आहेत? त्याची गरज का आहे? ते दिगंबर का आहेत ? जर आपल्याला एका धर्माबद्दल माहिती नसेल तर आपण आपले मत व्यक्त करताना थोडी माहिती का शोधू नये? काही लोकांनी "ते नागडे" इत्यादी प्रकारे उपहास केला आहे. त्याना धर्माची माहिती घेणे गरजेचे आहे असे का वाटत नाही? जैन धर्म मधील प्रत्येक व्यक्ती हिंदू-जैन असे लिहितो, तुम्हीच जर असे लिहले किंवा विरोध केला तर त्याचा परिणाम काय होइल याचा देखील विचार करणे गरजेचे आहे.

अर्जुन आणि कर्ण

साहना ·
महाभारताच्या युद्धात सूतपुत्र कर्णाचा आरामात वध केल्याने युद्धानंतर अर्जुनाला खूप गर्व झाला. त्याने ही गोष्ट कृष्णासमोर बोलून दाखवली तेव्हा कृष्ण हसू लागला. काही वेळाने कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की युद्धात जे झालं ते तुला समजलेलं दिसत नाही. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं की : कर्णाने आपले अपराजित कवच आणि कुंडले, जी जन्मजात त्याच्या शरीराला जोडलेली होती, ते ब्राम्हणाच्या रूपातील इंद्राला देऊन टाकले, कारण इंद्राला माहिती होते की असे केल्याशिवाय कर्णाला पराभूत करणे अशक्य आहे.

शनीशिंगणापूरातून ग्रामस्थांनी बाहेर पडावे काय

खटासि खट ·
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी दुसरी बाजू न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात " स्वामी अस्वस्थानंद रसवंती" हे नाव चर्चेत येत आहे . स्वामीजींची भेट झाली. त्यांच्याबद्दल नेटवर वैयक्तिक जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे. त्यांनी चर्चेत खालील मुद्दे उपस्थित केले. शनीच्या चौथर्‍यावर जाणाराने सहा महीने कुठल्याही महिलेशी संपर्क करणे निषिद्ध आहे. शास्त्राप्रमाणे हा कालावधी सहा वर्षे आहे.

डॉ. सदानंद मोरे यांची महाराष्ट्राची लोकयात्रा

माहितगार ·
डॉ. सदानंद श्रीधर मोरे (देहूकर) (जन्म : २५ जून, १९५२) यांची मराठी विकिपीडियावर सध्या नमुद ओळखीनुसार ते मराठी लेखक, कवी, नाटककार, समीक्षक, इतिहास संशोधक, प्रवचनकार आणि कीर्तनकार आहेत. संत साहित्याचे (विशेषतः तुकारामांचे) ते अभ्यासक आहेत. २०१५ साली पंजाब मधील घुमान येथे २०१५ साली झालेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यांचे साप्ताहीक सकाळमध्ये महाराष्ट्राची लोकयात्रा नावाचे सदर चालू आहे. ते मी अधून मधून वाचत असतो. बरीच माहिती मिळते.

मोहरम : माहिती हवी आहे

दत्ता जोशी ·
आजपासून मोहरम सुरु झाला. मोहरम हा एक अत्यंत महत्वाचा इस्लामिक सण / उत्सव असावा असे वाटते. अनेक वर्षे मध्यपूर्वेत काम करताना तिथे कधी लोकांना हा उत्सव करतांना पहिले नाही. तिथे दोन ईद, प्रेषित मुहम्मद जन्मदिन, इस्लामिक नव वर्ष इतक्याच इस्लामिक सणांना सरकारी सुटी असायची. इथे दिसतात त्याप्रमाणे मोहरमच्या मिरवणुका वगैरे कधी दिसल्या नाहीत. म्हणून या उत्सवाविषयी थोडे कुतूहल जागृत झाले. या उत्सवाचे औचित्य काय? तो भारतातच का केला जातो? यामागे काही धार्मिक भावना आहे, इतिहास कि फक्त सामाजिक उत्सव उर्मी? याविषयी कृपया माहिती द्यावी.