शैतान सिनेमा आणि १०८ कन्यादान
बरेच दिवस झाले थिएटरात गेलो नव्हतो, काल अजय देवगणचा शैतान पाहून आलो. कथा, सादरीकरण, चित्रीकरण वगैरे ठीकठाक आहे; पैसे खर्च करून मुद्दाम जाऊन बघण्यासारखा काही नाही. OTT वर पाहिला तर ठीक आहे.
हिंदी सिनेमांतून सातत्याने केली जाणारी हिंदू धर्म, श्रद्धा, परंपरा, उपासनापद्धती यांची हेटाळणी हिंदूंना इतकी अंगवळणी पडली आहे कि आजकाल त्यात फारसे कुणाला काही वावगे वाटत नाही. इतर असंख्य हिंदी सिनेमांप्रमाणे हा सिनेमा देखील हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अपमान करतो.
चित्रपटात वनराज नावाचा खलनायक आणि कबीर व त्याचे कुटुंब अशी पात्रे आहेत. कबीरच्या तरुण मुलीला वनराज वशीकरणाद्वारे कह्यात घेतो.
मिसळपाव