✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फिल्म इन्स्टिट्यूटचा पेच

आ
आशु जोग यांनी
Tue, 07/07/2015 - 21:39  ·  लेख
लेख
फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आपला वर्ग(शिक्षणाचे ठिकाण) सोडून वर्गाबाहेर आंदोलने करायची ? वास्तविक या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती कुठल्यातरी धरणे, आंदोलने यामधून नव्हे तर त्यांच्या कलाकृतीमधून दिसून यावी ही देशाची अपेक्षा आहे. आजच्या अध्यक्षांबाबत काही मुद्दे पुढे केले जात असले तरी यापूर्वी अत्यंत नामवंत चित्रकर्मींनाही विद्यार्थ्यांनी काम करणे अशक्य करून सोडले होते. त्यामुळे त्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. सध्या एक मुद्दा चर्चेत आहे राजकीय पार्श्वभूमी. पण इथे अध्यापक म्हणून काम केलेल्या सईद मिर्झा यांनी तर मोदी पंतप्रधान बनू नयेत यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती. हे सारे पाहता असे दिसते की अलिकडच्या सत्ताबदलामुळे अनेक छावण्यांमधे अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्यामुळे आजही आपली उपद्रव क्षमता कमी झालेली नाही हे दाखवण्याचाही या छावण्यांचा प्रयत्न असावा, असा एक अंदाज आहे. सुरुवातीला येथील आंदोलकांनी आमच्या मागे कोणताही पक्ष, कोणताही गट नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जे एन यू मधून पाठिंबा मिळाल्यावर मात्र हे आंदोलन कुठल्या गटाचे आहे हे स्पष्ट व्हायला लागले आहे. .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
29920 वाचन

💬 प्रतिसाद (214)

प्रतिक्रिया

खरंच विश्वासू माहिती असल्यास

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 07/08/2015 - 14:11 नवीन
खरंच विश्वासू माहिती असल्यास ती स्वतंत्र धागा काढून द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

जरूर डॉक्टरसाहेब, माझे काही

संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 15:08 नवीन
जरूर डॉक्टरसाहेब, माझे काही मित्र माजी विद्यार्थी आहेत तिथले. त्यामुळे अंतर्गत वातावरणाची माहिती आहे. फक्त एवढंच आता म्हणू शकतो की पारंपरिक शिक्षणसंस्थांसारखी ही संस्था नाही आहे. इथे विद्यार्थ्यांचा खूप होल्ड आहे. कारण इथे विद्यार्जन म्हणजे पुस्तकी शिक्षण किंवा शिक्षकांकडून विद्यार्थीकडे असं पारंपरिक पद्धतीचं नाही. आपण ढोबळमानाने असं म्हणू शकतो की ही अशी एक जागा जिथे फिल्मजगतात असणार्‍या विविध कामांचे मूलभूत शिक्षण, प्रत्यक्ष प्रशिक्षण, स्वयंशिक्षण अत्युच्च तंत्रज्ञानाने होते. सिनीयर, ज्युनियर्स आणि शिक्षक यांचं एक अपारंपरिक व अनौपचारिक जग आहे. बरेच विद्यार्थी वयाच्या पस्तीवाव्या वर्षीही इथे प्रवेश घेतात. काहींचा बरेच वर्ष प्रयत्न करून नंबर लागतो. प्रवेश परिक्षाही आयएएस परिक्षेपेक्षा कमी दर्जाची नाही. प्रत्येक अभ्यासक्रम पदव्यत्तर असून फक्त १०-१२ जागा आहेत. देशभरातून चित्रपटसंबंधी करीअर करू इच्छिणार्‍यांची ही संस्था पंढरी आहे. प्रत्यक्ष फिल्डशी कनेक्टेड अशी ही एकमेव सरकारी संस्था असावी. कारण इथल्या विद्यार्थ्यांवर त्यांच्या विद्याकालातच फिल्मजगतातले मान्यवर लोक लक्ष ठेवून असतात. व्यवसायाच्या संधी थेट उपलब्ध असतात. इंडस्ट्रीशी कायम संवाद असतो. वारकर्‍यांना पंढरपूर जेवढे प्रिय त्याचप्रमाणे इथले आजी-माजी विद्यार्थी ह्या संस्थेला मानतात. सर्वसामान्यांना हे माहिती नसते म्हणून या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तुच्छ संबोधण्याची चूक करू शकतात. बाकी सविस्तर लिहिन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

छान माहिती! अनेक पूर्वग्रह मिटले.

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 07/08/2015 - 16:16 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

धन्यवाद !

डॉ सुहास म्हात्रे
Fri, 07/10/2015 - 00:09 नवीन
धन्यवाद ! भारतात एकतरी उच्चशिक्षणसंस्था अशी आहे की दिले जाणारे शिक्षण आणि त्याच्यातून निर्माण होणारे व्यवसाय हे घनिष्टरित्या संलग्न आहेत, हे कळले. सविस्तर लेख जरूर लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

@वारकर्‍यांना पंढरपूर जेवढे

अत्रुप्त आत्मा
Fri, 07/10/2015 - 00:40 नवीन
@वारकर्‍यांना पंढरपूर जेवढे प्रिय त्याचप्रमाणे इथले आजी-माजी विद्यार्थी ह्या संस्थेला मानतात. सर्वसामान्यांना हे माहिती नसते म्हणून या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला तुच्छ संबोधण्याची चूक करू शकतात.>> हे तर खरच..पण माहीत आता माहीत झालं किंवा असलं,तरी अजेंडा वाली लोकं स्वार्थापोटि उलट लिहित रहणारच. ह्या माहिती बद्दल अनेक धन्यवाद. @बाकी सविस्तर लिहिन...>> वाट पाहतोय. नक्की लिहा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

खरं म्हणजे इथे आपण काय चर्चा

खटासि खट
गुरुवार, 07/16/2015 - 13:43 नवीन
खरं म्हणजे इथे आपण काय चर्चा करतो यामुळे ती संस्था, संपकरी विद्यार्थी आणि सरकार यांना काहीच फरक पडणार नाही. त्यामुळं तथ्य काय आहे यालाच महत्व असावं. तथ्याला कुणाच्या अनुमोदन्याची गरज नसते. एफटीआयआय चे चेअरमन हे नाममात्र पद असल्याचा समज काही प्रतिसादांमधून होतो आहे. वस्तुस्थिती काय आहे ? http://www.ftiindia.com/management.html एफटीआयआय या संस्थेच्या संस्थळावर दिलेली माहीती पाहता चेअरमन हे अनेक समित्यांचे अध्यक्ष आहेत असं दिसतंय. अरुण जेटली यांना संपक-यांचं शिष्टमंडळ भेटायला गेलं होतं तेव्हां फाईव्ह पॉईण्ट प्रोग्रामवर चर्चा झाली. त्यामुळं चर्चा न करताच संप चालू आहे या म्हणण्यात तथ्य नाही. पूर्णवेळ म्हणून चौहान यांची तयारी होती या कारणामुळे त्यांची निवड झाली हा जेटली यांचा युक्तीवाद आणि बेनेगल यांचं सहा महीन्यातून एकदा की दोनदा व्हिजिट एव्हढंच काम असल्याचं म्हणणं यात तफावत आढळतेय. या विषयावर खालील लिंक वर गजेंद्र चौहान सहीत विद्यार्थ्यांचं मत ऐकता येईल. https://youtu.be/B_vOORnQNJg रणवीर किंवा इतरांचं मत http://indianexpress.com/article/india/india-others/rishi-kapoors-advice-to-ftii-chairman-gajendra-chauhan/ विनोद खन्ना यांच्या याच पदावर झालेल्या नियुक्तीबद्दल वाद झालेला नाही. कुणाला संधी द्यायची याचे ठोकताळे व्यवहारात असतातच. केआरके - कमाल खान, वीणा मलिक किंवा बिग बॉस मधली वादग्रस्त आणि सुमार व्यक्तीमत्त्व या पदावर बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्याविरोधात भगवे, लाल, हिरवे, निळे यापैकी कुणाच्याही पाठींब्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं तरी त्याला पाठिंबाच राहील. अशा लोकांशी विद्यार्थ्यांनी चर्चा करण्य़ाचा संबंधच येत नाही. ज्याने नेमणूक केली त्यांच्याशीच चर्चा होऊ शकते. http://indianexpress.com/article/india/india-others/rishi-kapoors-advice-to-ftii-chairman-gajendra-chauhan/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

...

आशु जोग
गुरुवार, 08/20/2015 - 00:39 नवीन
Image removed. 'एफटीआयआय'च्या विद्यार्थ्यांकडून मानसिक छळ'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

...

आशु जोग
Wed, 07/08/2015 - 13:44 नवीन
संदीप डांगे भाव प्रभात फिल्म कंपनी, दामले फत्तेलाल, शांतारामा, प्रभात रोड, जया भादुरी, गिरीश कर्नाड, मोहन आगाशे, सईद मिर्झा आणि त्यांची मोदींविरुद्ध सह्यांची मोहीम, शत्रुघ्न सिन्हा, शबाना आझमी, भास्कर चंदावरकर, रविंद्र साठे हे माहीत आहे. आपल्याला अधिक काही माहिती असेल तर आम्हालाही सांगा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सईद मिर्झा आणि त्यांची

संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 13:55 नवीन
सईद मिर्झा आणि त्यांची मोदींविरुद्ध सह्यांची मोहीम
तुमचा रोख फक्त इथेच आहे असं दिसतंय. त्याच्याशिवायही अजून बरंच काही आहे. पण आत्ता नको.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

काका

आशु जोग
गुरुवार, 07/09/2015 - 23:10 नवीन
काका तुम्ही तेवढच कोरून काढलंत ह्यात आमचा काय दोष
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

दोन गोष्टी आहेत.

सव्यसाची
Wed, 07/08/2015 - 11:58 नवीन
दोन गोष्टी आहेत. १. सरकारने अश्या संस्था चालवाव्यात का? २. जर प्रश्नाचे उत्तर हो असेल, तर मग चालवायच्या कश्या? मला वाटते कि सरकारने या गोष्टी चालवणे सोडून द्यावे आणि त्याचा ताबा चित्रपट जगताकडे देऊन टाकावा. जर तसे होणार नसेल तर IIT, Indian Statistical Institute सारखी पद्धती अवलंबावी ज्या योगे स्वायत्तता आणि दैनदिन बाबींमध्ये सरकार हस्तक्षेप करू शकणार नाही. त्यासाठी सरकारने संसदेमध्ये विधेयक पारित करावे ज्यायोगे पुढे येणारे सरकार सुद्धा त्या कायद्याला धरून वागेल. हे सर्व झाले भविष्याच्या बाबतीत. पण सध्याचा पेचप्रसंग कसा सोडवायचा? कुठल्याही दृष्टीने असे वाटत नाही कि सरकार या नियुक्तीवर मागे सरकेल. आधीच सरकार इतक्या सगळ्या प्रकरणात व्यस्त आहे कि या अजून एका प्रकरणात मागे जाणे सरकार पसंत करेल असे वाटत नाही. २-३ दिवसांपूर्वी अरुण जेटली यांच्याबरोबर झालेल्या बैठकीतही काहीच निर्णय झालेला नाही. उलट त्या बैठकीतून बाहेर आल्यावर विद्यार्थ्यांनी असे म्हटले कि सरकार खाजगीकरणाचा विचार करते आहे, तर सरकार म्हणते आहे कि आम्ही तसे काहीच नाही म्हणालो. विद्यार्थीही कदाचित हि संस्था चित्रपटजगताने चालवावी या मताचे नाहीत. आम्हीही स्वायत्त संस्थांमध्ये शिकलो आहे. परंतु आमच्या आवडीचा संचालक आम्हाला द्या असे कधीच पाहिले नाही. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवर वाद असला तरी कमीत कमी काम सुरु करण्याची संधी द्यावी. जर काम वाईट सुरु असेल तर परत ४-५ महिन्यांनी विरोधाची सर्व हत्यारे आहेतच की. उलट त्यावेळी पुरावा असेल कि हा माणूस चांगले काम करू शकत नाही वगैरे. दुसरा मुद्दा हा आहे कि त्यांच्या भाजपा सदस्य असण्याचा. मुळातच हा मुद्दा लोकांनी आणायला नको होता. गजेंद्र चौहान यांच्या क्षमतेवरच जर लोकांनी त्यांना तसा विरोध केला असता तर तो विरोध खूपच फोकस्ड असता. परंतु, पक्षाशी निगडीत आहे असा जेव्हा आरोप होतो तेव्हा मग क्षमता आणि संस्थेची स्वायत्तता यावरुन चर्चा दुसर्याच रुळावर जाते आणि मग विषयाला फाटे फुटतात. IIT,IIM,ICHR,नालंदा अश्या अनेक ठिकाणी चर्चा फिरून येतात. मुद्दा बाजूला राहतो आणि चर्चा मग विचार, तत्वज्ञान अश्या गोष्टींमध्ये जाते जिथून सध्या सुरु असलेल्या मुद्द्याचे उत्तर मिळणे दुरापास्त होते.
  • Log in or register to post comments

हम्म

माईसाहेब कुरसूंदीकर
Wed, 07/08/2015 - 12:36 नवीन
वाचतेय.त्या लिहिलेल्या पत्रावरून विद्यार्थ्यांना पद्मश्री वगैरे बक्षिसे मिळवलेला,बर्लिन्,मॉस्कोला चित्रपट प्रदर्शीत करणारा संचालक म्हणून हवाय.कर्नाड्,अदूर्,आनंद पटवर्धन,गुलझार वगैरे मंडळी त्या व्याख्येत फीट बसतात. गजेंद्र त्या व्याख्येत बसत नाही ही वस्तुस्थिती. पण कितीही थोर संचालक असला तरी आपल्या शि़क्षणावर खरोखरच होतो का? ह्याचा विद्यार्थ्यांनीही विचार करायला हवा. ह्यांचा सल्ला- अमिताभ बच्चन ह्यांची नियुक्ती व्हावी.पारितोषिके अगदी डझनावारी आहेत व भाजपाचेही मित्र आहेत. कुणालाच आक्षेप असणार नाही.
  • Log in or register to post comments

कितीही थोर संचालक असला तरी

संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 12:41 नवीन
कितीही थोर संचालक असला तरी आपल्या शि़क्षणावर खरोखरच होतो का? फरक पडतो माईसाहेब. जेजे कला संस्था हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. जेजेची अधोगती होण्यामागे संचालकांची अकार्यक्षमता आहे हे वारंवार सिद्ध झाले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: माईसाहेब कुरसूंदीकर

हो, पण चांगला आर्टिस्ट 'च'

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 12:55 नवीन
हो, पण चांगला आर्टिस्ट 'च' चांगला संचालक होवू शकतो असं तुम्हाला म्हणायचंय का? ते जे जे चे सर्व संचालक अकार्यक्षम असतील ही पण गजेंद्र चौहान हे अकार्यक्षम आहेत हे कुठे सिद्ध झालंय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

कार्यक्षम आणि पदास योग्य आहेत

संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 13:07 नवीन
कार्यक्षम आणि पदास योग्य आहेत हे तरी कुठे सिद्ध झालंय? पक्षसेवेचे बक्षिस म्हणून त्यांना ते पद बहाल करण्यात आलंय. त्यांच्यापेक्षा कैक पटीने योग्य आणि कार्यक्षम उमेदवार अजून इंडस्ट्रीत आहेत. आत्ता आपण चर्चा करतोय ती संस्था (सवंग अशी प्रतिमा असलेल्या) फिल्मजगताशी संबंधित आहे म्हणून तेवढे गांभिर्य वाटत नसेल पण हेच इस्रो सारख्या किंवा रॉ सारख्या ठिकाणी झालं असतं तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

आत्ता आपण चर्चा करतोय ती

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 13:34 नवीन
आत्ता आपण चर्चा करतोय ती संस्था (सवंग अशी प्रतिमा असलेल्या) फिल्मजगताशी संबंधित आहे म्हणून तेवढे गांभिर्य वाटत नसेल पण हेच इस्रो सारख्या किंवा रॉ सारख्या ठिकाणी झालं असतं तर?
मूर्ख पणाचं झालं असतं. आणि तिथे माझा विरोधच असता. पण सरकार ला काहीच कळत नाही असं समजून वागणं पण बरोबर नाही. सरकारनं इस्रो सारख्या किंवा रॉ सारख्या ठिकाणी अशी नेमणूक केलेली नाही. सरकारचा जर काही शंकास्पद हेतू असता तर त्यांनी ते सुद्धा केलं असतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सरकारला काय कळतं किंवा नाही

संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 13:48 नवीन
सरकारला काय कळतं किंवा नाही हे सरकार कोणत्या पक्षाचं आहे यावर ठरतं बहुतेक... नाही का? असो. तुम्ही संस्थेला तुच्छच म्हटल्याने आता काय बोलून उपयोग नाहीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

सरकारला काय कळतं किंवा नाही

नाव आडनाव
Wed, 07/08/2015 - 13:50 नवीन
सरकारला काय कळतं किंवा नाही हे सरकार कोणत्या पक्षाचं आहे यावर ठरतं बहुतेक क्या बात ! पर्फेक्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

सरकारला काय कळतं किंवा नाही

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 14:14 नवीन
सरकारला काय कळतं किंवा नाही हे सरकार कोणत्या पक्षाचं आहे यावर ठरतं बहुतेक... नाही का?
हो ना. मागच्या घटना अशा आहेत: A bureaucrat, rather than a film personality, has headed the school for the last 15 years — and critics insist civil servants with limited tenures cannot be committed to far-reaching changes. In 2012, The Indian Express had accessed documents of a governing council meeting that showed only five out of 15 members present, with many having been granted “leave of absence”. This included Raghvendra Singh, Joint Secretary (Films), and C Viswanath, Additional Secretary and Financial Advisor, both from the I&B Ministry. The last film person to head the institute as its director was Mohan Agashe, who ironically, had to go following students’ protests over his attempt to restructure some courses. तेव्हा तर कोणी बोंबाबोंब केली नव्हती. म्हणजे तेव्हा बोंबाबोंब न करणारे सरकारच्या शहाण पानावर विश्वास ठेवून होते असंच ना? फक्त आता बीजेपी सरकार असल्याने असे प्रश्न उठतात. नाही का?
तुम्ही संस्थेला तुच्छच म्हटल्याने आता काय बोलून उपयोग नाहीच.
तुमची मर्जी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

गजेंद्र चौहान

कपिलमुनी
Wed, 07/08/2015 - 12:42 नवीन
या पदासाठी जी नावे "शॉर्टलिस्ट‘ केली गेली होती, त्यात प्रतिभावान कवी गुलझार आणि ज्येष्ठ चित्रपट निर्माते श्‍याम बेनेगल, तसेच अदूर गोपालकृष्णन यांचा समावेश होता. पण यांची पात्रता नसल्याने थोर अभिनेते आणि समाजसेवक गजेंद्र चौहान यांची या पदासाठीए निवड केली आहे. गुलजार किंवा बेनेगल यांच्या पेक्षा ते या माध्यमाला अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेतील असे सरकारला वाटते. त्यांचे आजवरचे योगदान बघता अशी अपेक्षा करू या .
  • Log in or register to post comments

हे म्हणजे

कपिलमुनी
Wed, 07/08/2015 - 12:48 नवीन
माईंना संपादक केल्यासारखा झालाय :)
  • Log in or register to post comments

इतकी वर्षं कपिलमुनी चं संपादक

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 12:59 नवीन
इतकी वर्षं कपिलमुनी चं संपादक होते. आता माईंना संपादक केल्यावर कपिलमुनी ना वाईट वाटायचं काय कारणं? भले कपिलमुनीनी लिहिली असतील १५ काव्ये आणि १० लेख पण संचालक पदासाठी लेखन क्षमता नाही, तर एडमिनिस्ट्रेटॆव्ह क्षमता लागते त्यात कपिलमुनी तेवढेच हुशार असतील असं थोडंच आहे? फक्त कपिलमुनिच सर्व विषयात हुशार आणि बाकीचे सर्वच विषयात ढ असं तर त्यांना म्हणायचं नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

वाइट

कपिलमुनी
Wed, 07/08/2015 - 13:07 नवीन
वाइट विद्यार्थांना वाटत आहे. आणि एडमिनिस्ट्रेटॆव्ह क्षमता म्हणाल तर ती गजेंद्र यांनी कुठे दाखवली आहे ? या संस्थेचा अध्यक्ष कराण्यासाठी गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत हे सांगाल का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

होना? मग अरविंद केजरीवाल नी

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 13:31 नवीन
होना? मग अरविंद केजरीवाल नी तरी ती कुठे दाखवली होती? कुठल्या कायदा बनवणार्या संवैधानिक पदावर ते आधी आरूढ झालेले होते? एका ग्रामपंचायतीचा कारभार तरी त्यांनी पाहिला होता का? का त्यांना हे प्रश्न विचारले गेले नाहीत? एखादा माणूस साध्या आमदार पदाचा अनुभव नसताना डायरेक्ट मुख्यमंत्री बनू शकतो पण एक सामान्य माणूस फक्त तो भाजप चा सदस्य आहे म्हणून एका तुच्छ संस्थेचा (ज्याचा समाज जीवनाशी किंवा राष्ट्रहिताशी काही संबंधच नाही) त्याचा संचालक बनू शकत नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

इकडे-तिकडे फिरू नका

कपिलमुनी
Wed, 07/08/2015 - 13:37 नवीन
या संस्थेचा अध्यक्ष कराण्यासाठी गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत हे सांगाल का ? या धाग्यावर याच विषयावर चर्चा करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

मुनीश्वर, जसं तुम्ही माई ना

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 13:47 नवीन
मुनीश्वर, जसं तुम्ही माई ना संपादक बनवण्याबद्दल उपहास केला होता, तद्वतच मी केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री बनवण्याच्या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तुम्ही का इकडे तिकडे फिरलात, मुनीश्वर? बाकी मी विषयापासून तसूभरही ढळलेला नाही. जर केजरीवाल मुखमंत्री बनू शकतात तर चौहान संचालक का नाही हा लॉजिकल प्रश्न आहे. यात इकडे तिकडे कुठे फ़िरलं गेलंय? आजची सही: तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म, राधासुता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

पहाडराव

dadadarekar
Wed, 07/08/2015 - 13:54 नवीन
केजरीवाल हा निवडुन आलेला होता. तिथे जास्त मताधिक्य मिळवणे इतकाच क्रायटेरिया असतो. पण फिल्म इन्स्टिट्य्ट्मधील पद हे सर्व इच्छुक उमेदवारांचा अनुभव व ज्ञान यांचा विचार करुन मग भरायचे असते. इलेक्शन व सिलेक्शन यात फरक असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

हितेश राव, ती पूर्ण दिल्लीची

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 14:21 नवीन
हितेश राव, ती पूर्ण दिल्लीची सत्ता आहे, ही तर फक्त एक इन्स्टिट्युट आहे.
जास्त मताधिक्य मिळवणे इतकाच क्रायटेरिया असतो
पण फिल्म इन्स्टिट्य्ट्मधील पद हे सर्व इच्छुक उमेदवारांचा अनुभव व ज्ञान यांचा विचार करुन मग भरायचे असते.
तुमच्या बोलण्यातला विनोद तुम्हाला कळतोय ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

यात विनोद काय आहे ?

dadadarekar
Wed, 07/08/2015 - 14:28 नवीन
एक इलेक्शन आहे. दुसरे सिलेक्शन आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

अहो एक जनतेनं निवडून दिलेल्या

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 14:33 नवीन
अहो एक जनतेनं निवडून दिलेल्या सरकारनं केलेलं आहे तर दुसरं जनतेनं केलेलं आहे. आपल्या कडे रिप्रेझेण्टेटिव्ह डेमोक्रासी आहे. सगळी कामं जनता करू शकत नाही म्हणून तर सरकार आहे. सरकारचे निर्णय हे जनतेनं दिलेल्या पाठिम्ब्यावर तर घेतले जातात. तेव्हा सिलेक्शन हे इल्लिगल कसं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

सिलेक्शन इल्लिगल नाही

कपिलमुनी
Wed, 07/08/2015 - 15:19 नवीन
हे सिलेक्शन इल्लिगल नाही हे बरोबर आहे फक्त हे सिलेक्शन चुकीचा आहे. त्या पदासाठी बरेच इतर चांगले ऑप्शन असताना त्यांना डावलून केलेला आहे . लादलेला आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत?

कपिलमुनी
Wed, 07/08/2015 - 14:08 नवीन
या संस्थेचा अध्यक्ष कराण्यासाठी गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत हे सांगाल का ? केजरीवालासाठी दुसरा धागा काढा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

...

आशु जोग
Wed, 07/08/2015 - 20:24 नवीन
केजरीवालासाठी दुसरा धागा काढा आता बास की. २०१४ सालीच हौस भागली नाही का...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

हौस

कपिलमुनी
गुरुवार, 07/09/2015 - 14:35 नवीन
काळा पहाड यांनी केजरीवालना या धाग्यात घुसवला . हौस त्यांना आहे मला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

होय

आशु जोग
Fri, 07/10/2015 - 00:01 नवीन
होय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

एका तुच्छ संस्थेचा (ज्याचा

संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 13:41 नवीन
एका तुच्छ संस्थेचा (ज्याचा समाज जीवनाशी किंवा राष्ट्रहिताशी काही संबंधच नाही) वा वा वा! टाळ्या! मग एवढ्या तुच्छ संस्थेच्या तुच्छ विद्यार्थ्यांनी केलेल्या तुच्छ आंदोलनावर एवढी आगपाखड का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

जोरदार टाळ्या +

नाव आडनाव
Wed, 07/08/2015 - 13:48 नवीन
जोरदार टाळ्या +
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

चौहान बीजेपी चे सदस्य

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 13:49 नवीन
चौहान बीजेपी चे सदस्य असल्याबाबत एवढी आगपाखड चाललीय म्हणूनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

साध्या आमदार पदाचा अनुभव

नाव आडनाव
Wed, 07/08/2015 - 13:47 नवीन
साध्या आमदार पदाचा अनुभव नसताना डायरेक्ट मुख्यमंत्री बनू शकतो हेच मोदींच्या बाबतीत सुध्धा म्हणता येईल. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेंव्हा, जितकं मला माहित आहे आमदार नव्हते. तसंच अजून एक - "साध्या खासदार पदाचा अनुभव नसताना डयरेक्ट पंतप्रधान बनू शकतो" :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

तुम्ही माझ्या मुद्ध्याला

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 14:17 नवीन
तुम्ही माझ्या मुद्ध्याला पाठिंबा देताय हे तुमच्या लक्षात येतंय का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाव आडनाव

:) ;) + १

मृत्युन्जय
Wed, 07/08/2015 - 14:41 नवीन
:) ;) + १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

मी कुठे म्हणतोय मी तुम्हाला

नाव आडनाव
Wed, 07/08/2015 - 15:15 नवीन
मी कुठे म्हणतोय मी तुम्हाला विरोध करतोय? पाठिंबा / विरोधाचं काही नाही साहेब. तुम्ही बोलला तसंच दुसरं उदहरण दिलं एव्ह्ढंच :) एखादा माणूस डायरेक्ट मुख्यमंत्री / पंतप्रधान झाला तर ती त्याची लायकी होती म्हणूनच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

ह्या न्यायाने असे अजून काही प्रतिसाद काढण्याची विनंती करता येईल.

बबन ताम्बे
Wed, 07/08/2015 - 15:37 नवीन
उदा. " हे खरं तर असं वाचता येईल: शरद पवारचा एफटीआयआय च्या जागेवर डोळा आलेला आहे. आणि त्यानं आपले केंद्रातले संबंध वापरून त्याबद्दल प्रयत्न सुरू केले आहेत. थोड्याच दिवसात तिथे कोलते पाटिल किंवा अविनाश भोसले चा बोर्ड दिसू लागेल." काहीही!! उचलली जीभ, लावली टाळ्याला. विषय फिल्म इन्स्टीट्युट आणि गजेंद्र चौहान यांचा चाललाय. खरेच शरद पवार एव्ह्ढे भ्रष्ट आहेत का हो? की केवळ काही शरद पवार द्वेष्ट्यांनी हा धुरळा उडवलाय? एक वेगळा धागा होऊनच जाऊ द्या ह्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

शरद पवार द्वेष्ट्यांनी हा धुरळा उडवलाय? एक वेगळा धागा होऊनच जाऊ

होबासराव
Wed, 07/08/2015 - 15:43 नवीन
अरे काय चाललय काय :( पुर्वि दुरदर्शन वर मराठि तमाशापट असायचे..त्यात काहि तरि असेच असायचे..सवाल-जवाब का काय्..त्यात म्हणायचे .... होउन जाउद्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बबन ताम्बे

पॉप क्विझ:

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 14:08 नवीन
पॉप क्विझ: The students at FTII have sharply questioned Mr. Chauhan’s “creative credentials” and whether he has the requisite vision in guiding the institute that has been earlier helmed by internationally-renowned luminaries such as Adoor Gopalakrishnan, Girish Karnad, U.R. Ananthamurthy, and Shyam Benegal, who have graced Indian theatre, cinema and literature. चला आता गुगल न करता सांगा बघू अदूर गोपाल्क्रीश्णन काय आहेत आणि त्यांनी काय निर्माण केलंय.
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
Wed, 07/08/2015 - 14:24 नवीन
धर्मराजाने काय निर्माण केलेय हे तर गुगलूनही मिळणार नाही. फार्फार तर गुगल पोखरून एखादा उंदीर मिळेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

हितेश राव, मग मला सांगा अदूर

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 14:29 नवीन
हितेश राव, मग मला सांगा अदूर गोपालाक्रीश्णन चांगले का आणि धर्मराज का वाईट? दोघेही जर कुणी न बघणार्या पिक्चर शी संबंधित आहेत तर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

आपण जे कोणी आहात ..

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 07/08/2015 - 16:28 नवीन
कृपया, धर्मराज याच्यात ओढू नका. त्या माणसाचे नाव गजेंद्र चव्हाण आहे. तेव्हा उगाच महाभारतातील व्यक्तिरेखांवर काड्या टाकू नका. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

गुगल

कपिलमुनी
Wed, 07/08/2015 - 14:31 नवीन
ते मल्याळम चित्रपट निर्माते , दिग्दर्शक आहेत. एवढी तोंडओळख आता तुम्ही अदूर गोपाल्क्रीश्णन आणि गजेंद्र चौहान यांना गुगलून बघा आणि कोण लायक आहे ते सांगा !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

मुनीश्वर, तिथं पिक्चर काढायचा

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 14:59 नवीन
मुनीश्वर, तिथं पिक्चर काढायचा नाही हो. स्ट्रेटेजि ठरवणे, सरकारबरोबर को-ओर्डिनेट करणे, बजेट वाढवून घेणे, सुव्हिधा वाढवणे, नवीन टेक्नोलॉजी आणण्याबद्दल विचार करणे, विद्द्यार्थ्यांच्य रोजी रोटी ची सोय होईल (क्रूड लिहितोय थोडंसं) असं पहाणे अशी कामं असतात. मला सांगा, अदूर साहेबांनी या सगळ्यात प्राविण्य मिळवलंय का हो? नाही, कारण विद्यार्थी तो एक मुद्दा उचलतायत. भले चौहान साहेबांना हे येत असेल किंवा नसेल, अदूर साहेबांना किंवा बाकीच्यांना हे येतंय का? दुसरा मुद्दा म्हणजे, शरद पवारांना क्रिकेट किती येतं? मग तिथे ही बोंबाबोंब का होत नाही बरं?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा