✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फिल्म इन्स्टिट्यूटचा पेच

आ
आशु जोग यांनी
Tue, 07/07/2015 - 21:39  ·  लेख
लेख
फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आपला वर्ग(शिक्षणाचे ठिकाण) सोडून वर्गाबाहेर आंदोलने करायची ? वास्तविक या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती कुठल्यातरी धरणे, आंदोलने यामधून नव्हे तर त्यांच्या कलाकृतीमधून दिसून यावी ही देशाची अपेक्षा आहे. आजच्या अध्यक्षांबाबत काही मुद्दे पुढे केले जात असले तरी यापूर्वी अत्यंत नामवंत चित्रकर्मींनाही विद्यार्थ्यांनी काम करणे अशक्य करून सोडले होते. त्यामुळे त्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. सध्या एक मुद्दा चर्चेत आहे राजकीय पार्श्वभूमी. पण इथे अध्यापक म्हणून काम केलेल्या सईद मिर्झा यांनी तर मोदी पंतप्रधान बनू नयेत यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती. हे सारे पाहता असे दिसते की अलिकडच्या सत्ताबदलामुळे अनेक छावण्यांमधे अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्यामुळे आजही आपली उपद्रव क्षमता कमी झालेली नाही हे दाखवण्याचाही या छावण्यांचा प्रयत्न असावा, असा एक अंदाज आहे. सुरुवातीला येथील आंदोलकांनी आमच्या मागे कोणताही पक्ष, कोणताही गट नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जे एन यू मधून पाठिंबा मिळाल्यावर मात्र हे आंदोलन कुठल्या गटाचे आहे हे स्पष्ट व्हायला लागले आहे. .
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मांडणी
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
29920 वाचन

💬 प्रतिसाद (214)

प्रतिक्रिया

आत्ताची नवीन बातमी: केंद्र

काळा पहाड
Tue, 07/07/2015 - 21:56 नवीन
आत्ताची नवीन बातमी: केंद्र सरकारने हे इन्स्टिट्युट बंद करायचा किंवा ते पुण्याला हलवण्याचा विचार सुरू केला आहे. तसा प्रस्ताव मांडला गेला आहे. हे खरं तर असं वाचता येईल: शरद पवारचा एफटीआयआय च्या जागेवर डोळा आलेला आहे. आणि त्यानं आपले केंद्रातले संबंध वापरून त्याबद्दल प्रयत्न सुरू केले आहेत. थोड्याच दिवसात तिथे कोलते पाटिल किंवा अविनाश भोसले चा बोर्ड दिसू लागेल.
  • Log in or register to post comments

* मुंबई ला हलवण्याचा विचार.

काळा पहाड
Tue, 07/07/2015 - 21:56 नवीन
* मुंबई ला हलवण्याचा विचार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

बंद नाही! उलटे आहे

विकास
Wed, 07/08/2015 - 00:21 नवीन
Govt plans to bring FTII at par with IITs, IIMs, allowed to grant degrees
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

व्यापम घोटाळ्यात साहेबांचा

खटासि खट
Wed, 07/08/2015 - 09:26 नवीन
व्यापम घोटाळ्यात साहेबांचा हात असल्याच्या आरोपावरून त्यांचा राजीनामा ( कशाचा ते नका विचारू) अजून कुणीच कसा बरं नाही मागितला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

बाकी जमीन हडपण्याची बातमी खरी

खटासि खट
Wed, 07/08/2015 - 09:28 नवीन
बाकी जमीन हडपण्याची बातमी खरी असेल तर अध्यक्ष म्हणून अचूक व्यक्ती हुडकण्याच्या शक्कलेला दाद द्यावी लागेल. नाहीतरी बारामतीत साज-या झालेल्या व्हॅलेंटाईन डे च्या आणाभाका जनता अजून विसरलेली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

.

dadadarekar
Tue, 07/07/2015 - 22:38 नवीन
अरे वा ! येऊ दे मुम्बैला. बाजपेयींच्या कविता वाचल्या की फेणाणीला पद्मश्री मिळते... मग भाजपाचा प्रसार केल्यावर युधिष्ठिराला असे पद लाभले तर त्यात आस्चर्य ते काय !
  • Log in or register to post comments

आणि आयएसआय ची कामं केली की

काळा पहाड
Tue, 07/07/2015 - 23:05 नवीन
आणि आयएसआय ची कामं केली की दावूद ला पाकिस्तानात सिक्युरिटी मिळतेच की. तुम्ही कधी घेताय लाभ तुमच्या कर्मभूमीच्या ऑफर चा? का घरवापसी करायचा विचार आहे? नाही, तसं सुद्धा आम्ही ते घडवणारच आहोत म्हणा. बघा जाताय का ते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

.

dadadarekar
Wed, 07/08/2015 - 08:04 नवीन
शांती ! पवित्र महिना सुरु आहे. ( आमची घरवापसी झाली.. जन्मल्यापासून सुमारे चार दशके चुकीच्या घरात होतो. आता मजेत आहे. सध्या उपवास सुरु आहेत. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

आकाशातला

नाखु
Wed, 07/08/2015 - 08:59 नवीन
देव तुम्हाला सुबुद्धी देवो. डाल्डा द रेकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

@ डाल्डा द रेकर >> ठठो! :

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/08/2015 - 09:36 नवीन
@ डाल्डा द रेकर >> ठठो! :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाखु

..

dadadarekar
Tue, 07/07/2015 - 22:43 नवीन
https://moifightclub.wordpress.com/2015/06/14/an-open-letter-to-gajendra-chauhan-from-an-ftii-student/
  • Log in or register to post comments

तगडी हिम्मत आहे पोरांमध्ये!

अनिरुद्ध.वैद्य
Tue, 07/07/2015 - 23:21 नवीन
आम्हाला त कोणी विचारलं पण नव्हत कोणते सर हवे ... जे येणार त्यांकडून शिकून घ्यायचं! हे नवच नाटक सुरुये :D बाकी सरकारनी फिल्म शिक्षण देणाऱ्या शाळा कशाला चालवायला हव्यात? इथ सरकारी इंजीनरिंग मेडिकल कॉलेजस चालत नाहीयेत आणि मंडळी फिल्म इन्स्टिट्यूटवर कोणालातरी नेमल तर ह्या बोंबा मारत सुटलीय! बंद केलं तर फारच चांगल!
  • Log in or register to post comments

कैच्या काय

कपिलमुनी
Wed, 07/08/2015 - 12:16 नवीन
सरकारी इंजीनरिंग मेडिकल कॉलेजस चालत नाहीयेत
कोणता सरकारी इंजिनीयरींग , मेडिकल कॉलेज चालत नाहीत ? २-४ नावे द्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध.वैद्य

काय शिकवतात म्हणे इथं?

सूड
Tue, 07/07/2015 - 23:48 नवीन
काय शिकवतात म्हणे इथं?
  • Log in or register to post comments

माझी मते...

विकास
Wed, 07/08/2015 - 00:16 नवीन
सर्व प्रथमः गजेंद्र सिंग चौहान हे नाव माझ्या लेखी केवळ महाभारतापुरतेच मर्यादीत आहे. तसं म्हणायचे तर युधिष्ठीर ही काही माझी आवडती व्यक्तीरेखा नाही. त्यामुळे त्याने केलेले काम कसे होते वगैरे काही असले तरी त्याचा माझ्यावर परीणाम घडलेला नाही... त्या व्यतिरीक्त या कलाकाराचे कुठलेही चित्रपट मी पाहीलेले नाहीत. एफ टी आय आय अथवा अजून कुठलीही संस्था असेल तेथे सरकारकडून व्यक्ती नियुक्त होत असताना ती अनुभवी असणे (good qualification) महत्वाचे आहे. तसेच जर ती जागा ही प्रशासकीय सेवेतली नसेल तर त्यासाठी योग्य अशी इंटरव्ह्यू प्रोसेस असणे बंधनकारक असले पाहीजे असे वाटते. मग त्याजागी चौहान असोत, बेनेगल असोत अथवा कर्नाड असोत. त्यांना त्या प्रोसेस मधनंच घेणे महत्वाचे असले पाहीजे.... या अर्थाने आणि एकूणच मर्यादीत अनुभव असलेली व्यक्ती म्हणून चौहान यांची नियुक्ती केली नसती तर बरे झाले असते. ज्यांच्यावर आक्षेप करता येणार नाही असे अनेक कलाकार मिळू शकले असते... अर्थात तरी देखील जर सरकारला हक्क असेल आणि आजपर्यंतच्या सर्व सरकारांनी तो वापरला असेल तर त्यावर आत्ता कोणी आक्षेप घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतके तेल नमनाला वापरून झाल्यावर आता वर उल्लेखलेल्या An Open Letter To Gajendra Chauhan From An FTII Student या निनावी पत्राचा आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या वर्तनाचा विचार करूयात. एफटीआयआय चे चेअरमन (चौहान) जरी मोदी सरकारने आत्ता नियुक्त केले असले तरी त्यांच्या पाठोपाठचे डायरेक्टर पद असलेले डि. जे. नारायन हे युपिए सरकारने नियुक्त केलेलेच आहेत. हे नारायन महाशय रॉक बँड सिंगर आहेत. (गंमत म्हणजे नावाचे इनिशिअल डिजे आहे!). पत्रामधे संस्थेच्या Freedom of thought, Freedom of speech, Individuality and unbridled self-expression, Justice and fairness in all areas to all sections of society, या तत्वांवर भर दिला आहे. सगळी तत्वे आदर्शच आहेत. पण ती केवळ "मला हवी तशी वापरली तरच" असे पत्र वाचल्यावर वाटले. म्हणजे असे की "‘Khuli Khidki’ isn’t exactly cinema" असे टोमणा मारणारे विधान केले जाते. मग तेथे Freedom of thought, Freedom of speech, कुठे बोंबलायला गेले? मध्यंतरी चौहान यांच्या काही चित्रपटातील शरीर संबंध दाखवणार्‍या दृश्यांची फित तयार करून हा कलाकार कसली कामे करतो असे दाखवण्यात आले होते. आता यातील कुठलाच चित्रपट मला बघायाला आवडला नसता / आवडणार नाही, तरी असे दाखवत एक उदात्त पणा दाखवण्याचा जो काही प्रयत्न केला ते बघताना फारच करमणूक झाली. म्हणजे असे की उठताबसता सेक्स या विषयाशी संबंधीत बोलणार, कोणी विरोध केला तर उजव्या विचारसरणीचा, मागासलेला म्हणून हिणावणार पण मग स्वतःला हवे तेंव्हा अशाच आंबट दृश्यांचा विरोधासाठी वापर करणार! हे पटणारे नाही. पण असे ते वागले याचा धक्का अर्थातच बसला नाही! बरं या पत्रात विरोध करताना दोन-तीन वेळेस परत परत हे व्यक्तीगत नाही म्हणणार, तरी देखील ही संस्था काय आहे ते तुम्हाला माहीत नसेल म्हणून खिजवणार -- हे असले विद्यार्थी उद्या जर निर्माते झाले तर खिचडीच काढणार का काय असे वाटले! मुलांना विरोध करायचा असेल तर ते त्यांचे मर्यादीत का होईना पण स्वातंत्र्य आहे असे मी म्हणेन. मर्यादीत अशासाठी की ही सरकारी संस्था आहे आणि इथले शिक्षण हे इतर सरकारी संस्थांसारखेच प्रचंड प्रमाणात सब्सिडाईझ्ड आहे. त्यामुळे करदात्याच्या पैशाने होत आहे. उगाच संस्था बंद करून विरोध करणे मान्य होत नाही. बरं एफटीआयआयशी आधी संलग्न असलेली अथवा विद्यार्थी असलेली व्यक्तीच अध्यक्ष व्हावी हा हट्ट अतिरेकी वाटतो. त्या व्यतिरीक्त जर प्रस्थापित पद्धती-नियमांनुसार नियुक्ती झाली असेल तर त्या व्यक्तीला वेळ देणे महत्वाचे वाटते. केवळ लायकी काढणे, बौद्धीक कुवत वगैरे शब्द वापरणे हे सुसंस्कृतपणाचे लक्षण वाटत नाही. (यात " सुसंस्कृत" म्हणजे "decency" या अर्थाने घ्यावात. संस्कृती या शब्दाशी संबंधीत म्हणून नाही...!) थोडक्यात, जरी चौहान मान्य नसले तरी हा विरोध हा राजकीय हेतूंनी प्रेरीत आहे असे वाटते. हे असले टाळायचे असेल तर माझ्या लेखी एक उपाय आहे जो भारतीय मनाला (आणि मुख्यत्वे सवयीला) पटणार नाही... या संस्था निमसरकारी करा. त्यावरील नियुक्त्या करण्यासाठी एक विशिष्ठ पद्धती आणि नियम तयार करून वापरा. कदाचीत तरी देखील सरकारी मदत लागेल पण ती कमी करता येईल. त्याच बरोबर विद्यार्थ्यांना देखील जास्त पैसे द्यावे लागतील. पण एकदा का संस्था ही बाहेरच्या (कायदेशीर) पैशावर अधिक अवलंबून झाली की कुठल्याही सरकारचा आग्रह चालवून घेण्याचे बंधन रहाणार नाही.
  • Log in or register to post comments

.

dadadarekar
Wed, 07/08/2015 - 05:53 नवीन
चौहान हे अ‍ॅडल्ट पोर्नो फिल्मात काम करत होते. खुली खिडकी , जंगल लव्ह ... इ ई सिनेमे आहेत. संस्था सरकारी असो वा निमसरकारी , उपलब्ध उमेदवारांतून योग्य उमेदवार निवडावा असा दंडक असतोच. या जागेसाठी इच्छउक असलेले इतर कलाकारही दिग्गजच होते. विद्यार्थ्यानी मुकाट्याने शाळा शिकावी हे मान्य. पण सरकार अशा पदांवर आपल्या मर्जीतील लोक घुसडत असतेल तर विद्यार्थी विरोध करु शकतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

विद्यार्थी बघा ते

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 07/08/2015 - 07:08 नवीन
बाप्ये वाटत होते ... ४ ४ ५ ५ वर्ष एकाच वर्गात बसतात म्हणे. येवढा त्रास आहे तर द्यावी सोडून ... २ वर्षाचा अभ्यासक्रमाला ५ वर्षे घेणारे विद्यार्थी म्हणे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

सरकार अशा पदांवर आपल्या

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 10:29 नवीन
सरकार अशा पदांवर आपल्या मर्जीतील लोक घुसडत असतेल तर विद्यार्थी विरोध करु शकतात.
सरकार वरच जर उमेदवार नेमणुकीची जबाबदारी असेल तर सरकार आपल्याच मर्जीचा माणूस घुसावेल ना.. किंबहुना सरकार नेमणूक करणारा माणूस हा सरकारी मर्जीतालाच असणार. तिथं कपिल सिब्बल ला टाकेल का सरकार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

कपिल सिब्बल पेक्षा क्वालिफाईड

खटासि खट
Wed, 07/08/2015 - 10:46 नवीन
कपिल सिब्बल पेक्षा क्वालिफाईड मिनिस्टर आहे की सध्या त्यांच्या खात्याला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

तुम्ही पण ना राव! समजतच नाही

संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 13:14 नवीन
तुम्ही पण ना राव! समजतच नाही तुम्हाला. असेल कपिल सिब्बल ने ढिगभर डिग्र्या आणि डोंगरभर अनुभव मिळवलेला पण मंत्री म्हणून खात्याचं काम कार्यक्षमतेनीच करेल असं सिद्ध कुठं झालंय? माननीय आजी मंत्र्यांकडे अचूक योग्यता आहे ज्याला डीग्री अनुभवाची गरजच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटासि खट

आपल्याच मर्जीचा माणूस घुसावेल ?

कपिलमुनी
Wed, 07/08/2015 - 13:18 नवीन
जे काँग्रेसने केला तेच भाजपाने करायचा का ? बदल घडवला पाहिजे . ही घुसवा घुसवी थांबली पाहिजे आणि योग्य माणसांना पुढे आणला पाहिजे ,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

+११

अनिरुद्ध.वैद्य
Wed, 07/08/2015 - 14:08 नवीन
पण हे शहाणपण सरकार दाखवण शक्य नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आपण पाहिलेत वाटतं. लिंक टाका.

जडभरत
Sun, 07/12/2015 - 06:59 नवीन
आपण पाहिलेत वाटतं. लिंक टाका. आम्ही पण कलात्मक आस्वाद घेऊ या चित्रपटांचा.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

सरकारनं सनी लिओनीला विचारुन

प्यारे१
Wed, 07/08/2015 - 06:50 नवीन
सरकारनं सनी लिओनीला विचारुन बघावं. तिनं पद स्वीकारलं तर असाच विरोध होईल काय????
  • Log in or register to post comments

मग

नाखु
Wed, 07/08/2015 - 09:02 नवीन
गर्दी+दर्दी हटवायला पोलीस बोलवावे लागतील!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

सन्नीताईंना सेन्सॉर बोर्डाचं

खटासि खट
Wed, 07/08/2015 - 10:48 नवीन
सन्नीताईंना सेन्सॉर बोर्डाचं किंवा सांस्कृतिक महामंडळाचं अध्यक्षपद योग्य राहील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

यापूर्वी पण संप झालेत ना ?

खटासि खट
Wed, 07/08/2015 - 09:44 नवीन
यापूर्वी पण संप झालेत ना ? त्या वेळी एफटीआयच्या विद्यार्थ्यांना झोडपल्याचं आठवत नाही. भाजपशी संबंधित निर्णयांना विरोध सहन न होणं हे मूळ दुखणं आहे का ?
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Wed, 07/08/2015 - 10:03 नवीन
Image removed. हलवून खुंटी बळकट करणार हे आंदोलक
  • Log in or register to post comments

क्रिकेट कंट्रोल बोर्डावरच्या

मराठी_माणूस
Wed, 07/08/2015 - 10:14 नवीन
क्रिकेट कंट्रोल बोर्डावरच्या लोकांचे क्रिकेट मधले योगदान, अनुभव काय असतो ?
  • Log in or register to post comments

प्रशासकीय कामांसाठी गजेंद्र

मृत्युन्जय
Wed, 07/08/2015 - 11:05 नवीन
प्रशासकीय कामांसाठी गजेंद्र चौहानच्या जागी जितेंद्र आव्हाडांची निवड झाली असती तरी त्यामुळे काही बिघडले नसते. तर मग चौहानांच्या निवडणुकीला नक्की काय आक्षेप? त्यांच्या जागी शत्रुघ्न सिन्हांची निवड झाली असती तर देखील सॅफ्रनायझेशन ठरले असते काय? विरोध सॅफ्रनायझेशनला आहे की गुणवत्तेला? बोंबलणारे दोन्ही गोष्टींवर बोंबलत आहेत. दोन्ही गोष्टींवर बोंबलण्याचा त्यांना अधिकार आहे असे वाटत नाही. त्यांनी एक काय तो मुद्दा निवडावा,
  • Log in or register to post comments

निर्णय सरकारच्या कित्तिही

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/08/2015 - 11:14 नवीन
निर्णय सरकारच्या कित्तिही हातात असला,तरी लायक व्यक्तीला न नेमता "आपल्याला हवा तोच" माणूस नेमणं अत्यंत अयोग्य आहे. आणि सदर व्यक्ति पदाला लायक नाही,हे ही तितकच खरं आहे. शिवाय मोदि सर्वत्र आपला वचक ठेवल्या शिवाय काहीही पुढे सरकू देत नाहित, हे ही लक्षात घेण्यासारखं आहे. अराजक आणि हुकुमाशाहिची सध्या चाललेली टिका योग्यच वाटते ,असं काही पाहिल्यावर.
  • Log in or register to post comments

...

आशु जोग
Wed, 07/08/2015 - 11:23 नवीन
इथे मोदी कुठून आले. इतक्या छोट्या गोष्टीत कशाला लक्ष घालतील. काहीही. अमेरीका, मंगोलिया, चीन पुरेसे आहे ना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@ इथे मोदी कुठून आले. इतक्या

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/08/2015 - 13:45 नवीन
@ इथे मोदी कुठून आले. इतक्या छोट्या गोष्टीत कशाला लक्ष घालतील. काहीही.>> न घालायला काय झालं ? आणि त्यांचा फ़ौजफ़ाटा डावे उजवे "हात" त्याच साठी तैयार केलेत त्यांनी हे तर जगजाहिर आहे. अर्थात नमोरुग्णांना हे सगळं माहीत असतच! त्या शिवाय का ते इतक्या साध्या गोष्टिम्वर अकांड तांडव करतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

...

आशु जोग
Wed, 07/08/2015 - 13:52 नवीन
मी मोदी म्हटलं... फौजफाटा वगैरे तुम्ही पघून घ्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मंत्रिमंडळ/सैन्याची जबाबदारी

अत्रुप्त आत्मा
Wed, 07/08/2015 - 14:24 नवीन
मंत्रिमंडळ/सैन्याची जबाबदारी राजावरच असते, प्रजेनि कित्तिही झिडकारलि तरी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आशु जोग

नसती थेरं

llपुण्याचे पेशवेll
Wed, 07/08/2015 - 11:24 नवीन
खरंतर विद्यार्थ्याना आपला शिक्षक कोण हवा हे ठरवण्याचा अधिकार तेव्हाच असतो जेव्हा ते पैसे भरून शिक्षण घेत असतील. इथे आमचे पैसे उडवून शिकतात आणि फुकटचा माज करतात. मोडून काढा आंदोलन यांचे.
  • Log in or register to post comments

पैसे उडवणे

कपिलमुनी
Wed, 07/08/2015 - 12:44 नवीन
तसे तुमचे पैसे राष्ट्रवादीच्या टग्यांनी पण उडवले पण तिथे काही बोलले की अवघड झाले असते. ही पोरा गरीब आहेत .. काढा मोडून :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

हा हा हा ... गरीब? कैच्याकै.

llपुण्याचे पेशवेll
Wed, 07/08/2015 - 14:28 नवीन
हा हा हा ... गरीब? कैच्याकै.. जर राष्ट्रवादीवाले गुंडगिरी या अर्थाने टगे असतील तर ही मुले किंवा कमीतकमी त्याना हाकणारी ताकत ही अन्य अर्थाने टगेगिरीच करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

.

dadadarekar
Wed, 07/08/2015 - 13:08 नवीन
जनता जो ट्याक्स भरते त्यातूनच जनतेला सअरकार सुविधा पुरवते. ही लोकशाही आहे , कुणाच्या उपकारावर जगायला ही पेशवाई नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

सदर धागालेखक व प्रतिसादकर्ते

संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 11:40 नवीन
सदर धागालेखक व प्रतिसादकर्ते यांना प्रस्तुत संस्थेचा इतिहास, कार्यपद्धतींबद्दल फारशी माहिती नाही असे दिसत आहे.
  • Log in or register to post comments

आपण सांगून उपकृत करावे

dadadarekar
Wed, 07/08/2015 - 11:45 नवीन
..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

भाजपने आपला माणुस तिथे बसवला,

संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 11:52 नवीन
भाजपने आपला माणुस तिथे बसवला, त्याला विरोध करतायत विद्यार्थी. त्या विद्यार्थ्यांना भाजपविरोधी आहेत असा रंग देणारा हा धागा आणि काही प्रतिसाद आहेत. रंगांधळ्यांना काहीही समजावून फरक पडत नाही हे आपण स्वतःच चांगले जाणता. तस्मात... चलु द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: dadadarekar

१. वाइट एक्टर = वाइट संचालक

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 12:14 नवीन
१. वाइट एक्टर = वाइट संचालक असं काही असतं का? २. बीजेपीचा माणूस म्हणजे काय? तो काही जेकेएलएफ चा सदस्य आहे का? की फक्त लेफ़्ट आणि कोन्ग्रेस चेच लोक तिथे असावेत असा नियम आहे? मुख्य म्हणजे ही संस्था पुण्यात, कोथरूड मध्ये आहे, जिथे भाजप चे सर्व आमदार आहेत. पटना किंवा कोलकता मध्ये नाही. त्यांनी रहायचं तर रहावं नाही तर फ़ुटावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माझा पहिला प्रतिसाद परत एकदा

संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 12:36 नवीन
माझा पहिला प्रतिसाद परत एकदा वाचा. संस्था पुण्यात आहे म्हणजे पुण्याची मालमत्ता नाही. ती देशाची संस्था आहे. इतर स्वायत्त संस्थांमधे आणि या संस्थेत बर्‍याच बाबतीत खूपच फरक आहे. ते एक वेगळं जग आहे आणि त्यासंबंधी इथे चर्चा करणार्‍यांना काहीच माहिती नाही असे दिसत आहे. शिवाय फार गुंतागुंतीचं राजकारण आहे. त्यामुळे शून्य माहितीवर डोकं ताणून तर्क लढवणार्‍यांना खुशाल लढवू द्या. हेच कॉंग्रेसच्या राज्यात झालं असतं तर असेच प्रतिसाद आले असते का याचं कुतूहल आहे. म्हणूनच म्हटलं.. चलु द्या...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

संस्था पुण्यात आहे म्हणजे

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 12:52 नवीन
संस्था पुण्यात आहे म्हणजे पुण्याची मालमत्ता नाही. ती देशाची संस्था आहे.
थोडक्यात, देशाच्या जनतेनं निवडून दिलेल्या सरकारनं अधिकृत रीतीनं नेमलेला संचालक असल्यामुळे त्याबद्दल वाद उठवायचा या विद्द्यार्थ्यांना अधिकार नाही. कारण संस्था देशाची आहे. मग बीजेपी चा माणूस असो, वा आरएसएस चा. कारण ती नेमणारं सरकार हे देशासाठी निवडलं गेलंय.
इतर स्वायत्त संस्थांमधे आणि या संस्थेत बर्‍याच बाबतीत खूपच फरक आहे. ते एक वेगळं जग आहे आणि त्यासंबंधी इथे चर्चा करणार्‍यांना काहीच माहिती नाही असे दिसत आहे. शिवाय फार गुंतागुंतीचं राजकारण आहे. त्यामुळे शून्य माहितीवर डोकं ताणून तर्क लढवणार्‍यांना खुशाल लढवू द्या.
उलट तुम्हाला जास्त माहिती असेल तर तुम्ही ती सांगायला पाहिजे. लोक तसंही मोदी कसे धोका देतायत आणि अर्थव्यवस्था का उभारी घेत नाहीये यावर माहित नसताना चर्चा करतातच. लोक त्यांना जे दिसतं त्याचा विचार करतात. तेव्हा तुम्ही या बाबत अधिक लिहिलत तर जास्त बरं.
शिवाय फार गुंतागुंतीचं राजकारण आहे.
सरकार राजकारण करणारच. विद्यार्थ्यांना ते करायला मनाई असावी. खास करून सरकारी संस्थेत.
हेच कॉंग्रेसच्या राज्यात झालं असतं तर असेच प्रतिसाद आले असते का याचं कुतूहल आहे.
हेच कॉंग्रेसच्या राज्यात झालं असतं तर या विद्यार्थ्यांनी असाच दंगा केला असता का याचं कुतूहल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

माहिती तर भरपूर आहे हो.

संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 13:01 नवीन
माहिती तर भरपूर आहे हो. पण इथं अशा रंगपंचमीच्या वातावरणात आत्ता देऊन काय उपयोग नाही. जरा धुरळा बसूंदेत. मग बघू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: काळा पहाड

पण इथं अशा रंगपंचमीच्या वातावरणात आत्ता देऊन काय उपयोग नाही.

होबासराव
Wed, 07/08/2015 - 14:09 नवीन
एक्झॅक्टली. हा प्रश्ण विद्यार्थि आणि त्यांच्यावर लादलेला संचालक ह्यांचा आहे, त्याला राजकिय रंग देण थांबवल पाहिजे. विद्यार्थ्यांचा विरोध चौहान ला आहे, त्याना सरकार कुठल्या पार्टिच आहे ह्याच्याशि काहिहि देण्-घेण नाहि. जे जे कॉलेज सारखिच हि सुद्धा एक क्रिएअटिव्ह संस्था आहे, पण ज्या तर्‍हेचे प्रतिसाद आता येताहेत त्याना यात हि मोदि, हिंदुत्व, राहुल गांधि, सिब्बल हे घुसवायचे आहेत त्यामुळे इथे न बोललेच बर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

यात हि मोदि, हिंदुत्व, राहुल

संदीप डांगे
Wed, 07/08/2015 - 14:31 नवीन
यात हि मोदि, हिंदुत्व, राहुल गांधि, सिब्बल हे घुसवायचे आहेत त्यामुळे इथे न बोललेच बर. सहमत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

नाही इतका साधा रंग नाही हा..

llपुण्याचे पेशवेll
Wed, 07/08/2015 - 14:32 नवीन
नाही इतका साधा रंग नाही हा.. या विद्यार्थ्यांनी राहूल सोलापूरकरांवरही संघाशी संबंधित असल्यावरून अनावश्यक टिप्पणी केली आहे. राहूल सोलापूरकर माझ्या मते एक चांगले कलाकार आहेत. पुण्यात अनेक कार्यक्रमात त्यांनी केलेले उत्कृष्ठ सूत्रसंचाल ऐकले आहे. मग संघाशी संबंधित असण्यावरून त्यांच्यावर टीका होत असेल तर तो राजकीय रंग नाही? या आंदोलनाला योगेंद्र यादव यांचा पाठींबा कुठला 'अ'राजकीय होता?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: होबासराव

How has the controversy

काळा पहाड
Wed, 07/08/2015 - 15:18 नवीन
How has the controversy thickened? Apart from Mr. Chauhan’s appointment, students and progressive filmmakers have looked askance at the choice of the reconstituted FTII panel where four of the eight are RSS propagandists. These include Anagha Ghaisas, who has made several documentary films of Prime Minister Narendra Modi; Narendra Pathak, a former president of the Maharashtra ABVP; Pranjlal Saikia, an office bearer of an RSS-linked organisation; and Rahul Solapurkar, who is intimately associated with the BJP. Who are backing the students’ fight? The battle has brought the ideological contest between the right and the left into sharp relief, with left-wing students’ organisations like the All India Students’ Association (AISA), the Kolkata-based Satyajit Ray Film Institute and students at the Jawaharlal Nehru University (JNU) all coming out strongly in support of the striking students.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा