Skip to main content

फिल्म इन्स्टिट्यूटचा पेच

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 07/07/2015 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको. प्रश्न हा आहे की विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा की आपला वर्ग(शिक्षणाचे ठिकाण) सोडून वर्गाबाहेर आंदोलने करायची ? वास्तविक या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती कुठल्यातरी धरणे, आंदोलने यामधून नव्हे तर त्यांच्या कलाकृतीमधून दिसून यावी ही देशाची अपेक्षा आहे. आजच्या अध्यक्षांबाबत काही मुद्दे पुढे केले जात असले तरी यापूर्वी अत्यंत नामवंत चित्रकर्मींनाही विद्यार्थ्यांनी काम करणे अशक्य करून सोडले होते. त्यामुळे त्यांना आपला कार्यकाल पूर्ण करता आला नव्हता. सध्या एक मुद्दा चर्चेत आहे राजकीय पार्श्वभूमी. पण इथे अध्यापक म्हणून काम केलेल्या सईद मिर्झा यांनी तर मोदी पंतप्रधान बनू नयेत यासाठी सह्यांची मोहीम घेतली होती. हे सारे पाहता असे दिसते की अलिकडच्या सत्ताबदलामुळे अनेक छावण्यांमधे अस्वस्थता दाटून आलेली आहे. त्यामुळे आजही आपली उपद्रव क्षमता कमी झालेली नाही हे दाखवण्याचाही या छावण्यांचा प्रयत्न असावा, असा एक अंदाज आहे. सुरुवातीला येथील आंदोलकांनी आमच्या मागे कोणताही पक्ष, कोणताही गट नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना जे एन यू मधून पाठिंबा मिळाल्यावर मात्र हे आंदोलन कुठल्या गटाचे आहे हे स्पष्ट व्हायला लागले आहे. .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 30097
प्रतिक्रिया 214

प्रतिक्रिया

माईंना संपादक केल्यासारखा झालाय :)

In reply to by कपिलमुनी

इतकी वर्षं कपिलमुनी चं संपादक होते. आता माईंना संपादक केल्यावर कपिलमुनी ना वाईट वाटायचं काय कारणं? भले कपिलमुनीनी लिहिली असतील १५ काव्ये आणि १० लेख पण संचालक पदासाठी लेखन क्षमता नाही, तर एडमिनिस्ट्रेटॆव्ह क्षमता लागते त्यात कपिलमुनी तेवढेच हुशार असतील असं थोडंच आहे? फक्त कपिलमुनिच सर्व विषयात हुशार आणि बाकीचे सर्वच विषयात ढ असं तर त्यांना म्हणायचं नाही ना?

In reply to by काळा पहाड

वाइट विद्यार्थांना वाटत आहे. आणि एडमिनिस्ट्रेटॆव्ह क्षमता म्हणाल तर ती गजेंद्र यांनी कुठे दाखवली आहे ? या संस्थेचा अध्यक्ष कराण्यासाठी गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत हे सांगाल का ?

In reply to by कपिलमुनी

होना? मग अरविंद केजरीवाल नी तरी ती कुठे दाखवली होती? कुठल्या कायदा बनवणार्या संवैधानिक पदावर ते आधी आरूढ झालेले होते? एका ग्रामपंचायतीचा कारभार तरी त्यांनी पाहिला होता का? का त्यांना हे प्रश्न विचारले गेले नाहीत? एखादा माणूस साध्या आमदार पदाचा अनुभव नसताना डायरेक्ट मुख्यमंत्री बनू शकतो पण एक सामान्य माणूस फक्त तो भाजप चा सदस्य आहे म्हणून एका तुच्छ संस्थेचा (ज्याचा समाज जीवनाशी किंवा राष्ट्रहिताशी काही संबंधच नाही) त्याचा संचालक बनू शकत नाही?

In reply to by काळा पहाड

या संस्थेचा अध्यक्ष कराण्यासाठी गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत हे सांगाल का ? या धाग्यावर याच विषयावर चर्चा करा.

In reply to by कपिलमुनी

मुनीश्वर, जसं तुम्ही माई ना संपादक बनवण्याबद्दल उपहास केला होता, तद्वतच मी केजरीवाल यांच्या मुख्यमंत्री बनवण्याच्या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तुम्ही का इकडे तिकडे फिरलात, मुनीश्वर? बाकी मी विषयापासून तसूभरही ढळलेला नाही. जर केजरीवाल मुखमंत्री बनू शकतात तर चौहान संचालक का नाही हा लॉजिकल प्रश्न आहे. यात इकडे तिकडे कुठे फ़िरलं गेलंय? आजची सही: तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म, राधासुता?

In reply to by काळा पहाड

केजरीवाल हा निवडुन आलेला होता. तिथे जास्त मताधिक्य मिळवणे इतकाच क्रायटेरिया असतो. पण फिल्म इन्स्टिट्य्ट्मधील पद हे सर्व इच्छुक उमेदवारांचा अनुभव व ज्ञान यांचा विचार करुन मग भरायचे असते. इलेक्शन व सिलेक्शन यात फरक असतो.

In reply to by dadadarekar

हितेश राव, ती पूर्ण दिल्लीची सत्ता आहे, ही तर फक्त एक इन्स्टिट्युट आहे.
जास्त मताधिक्य मिळवणे इतकाच क्रायटेरिया असतो
पण फिल्म इन्स्टिट्य्ट्मधील पद हे सर्व इच्छुक उमेदवारांचा अनुभव व ज्ञान यांचा विचार करुन मग भरायचे असते.
तुमच्या बोलण्यातला विनोद तुम्हाला कळतोय ना?

In reply to by dadadarekar

अहो एक जनतेनं निवडून दिलेल्या सरकारनं केलेलं आहे तर दुसरं जनतेनं केलेलं आहे. आपल्या कडे रिप्रेझेण्टेटिव्ह डेमोक्रासी आहे. सगळी कामं जनता करू शकत नाही म्हणून तर सरकार आहे. सरकारचे निर्णय हे जनतेनं दिलेल्या पाठिम्ब्यावर तर घेतले जातात. तेव्हा सिलेक्शन हे इल्लिगल कसं?

In reply to by काळा पहाड

हे सिलेक्शन इल्लिगल नाही हे बरोबर आहे फक्त हे सिलेक्शन चुकीचा आहे. त्या पदासाठी बरेच इतर चांगले ऑप्शन असताना त्यांना डावलून केलेला आहे . लादलेला आहे.

In reply to by काळा पहाड

या संस्थेचा अध्यक्ष कराण्यासाठी गजेंद्र चौहान हे कसे लायक आहेत हे सांगाल का ? केजरीवालासाठी दुसरा धागा काढा

In reply to by आशु जोग

काळा पहाड यांनी केजरीवालना या धाग्यात घुसवला . हौस त्यांना आहे मला नाही.

In reply to by कपिलमुनी

होय

In reply to by काळा पहाड

एका तुच्छ संस्थेचा (ज्याचा समाज जीवनाशी किंवा राष्ट्रहिताशी काही संबंधच नाही) वा वा वा! टाळ्या! मग एवढ्या तुच्छ संस्थेच्या तुच्छ विद्यार्थ्यांनी केलेल्या तुच्छ आंदोलनावर एवढी आगपाखड का?

In reply to by काळा पहाड

साध्या आमदार पदाचा अनुभव नसताना डायरेक्ट मुख्यमंत्री बनू शकतो हेच मोदींच्या बाबतीत सुध्धा म्हणता येईल. ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेंव्हा, जितकं मला माहित आहे आमदार नव्हते. तसंच अजून एक - "साध्या खासदार पदाचा अनुभव नसताना डयरेक्ट पंतप्रधान बनू शकतो" :)

In reply to by काळा पहाड

मी कुठे म्हणतोय मी तुम्हाला विरोध करतोय? पाठिंबा / विरोधाचं काही नाही साहेब. तुम्ही बोलला तसंच दुसरं उदहरण दिलं एव्ह्ढंच :) एखादा माणूस डायरेक्ट मुख्यमंत्री / पंतप्रधान झाला तर ती त्याची लायकी होती म्हणूनच.

In reply to by होबासराव

उदा. " हे खरं तर असं वाचता येईल: शरद पवारचा एफटीआयआय च्या जागेवर डोळा आलेला आहे. आणि त्यानं आपले केंद्रातले संबंध वापरून त्याबद्दल प्रयत्न सुरू केले आहेत. थोड्याच दिवसात तिथे कोलते पाटिल किंवा अविनाश भोसले चा बोर्ड दिसू लागेल." काहीही!! उचलली जीभ, लावली टाळ्याला. विषय फिल्म इन्स्टीट्युट आणि गजेंद्र चौहान यांचा चाललाय. खरेच शरद पवार एव्ह्ढे भ्रष्ट आहेत का हो? की केवळ काही शरद पवार द्वेष्ट्यांनी हा धुरळा उडवलाय? एक वेगळा धागा होऊनच जाऊ द्या ह्यावर.

In reply to by बबन ताम्बे

अरे काय चाललय काय :( पुर्वि दुरदर्शन वर मराठि तमाशापट असायचे..त्यात काहि तरि असेच असायचे..सवाल-जवाब का काय्..त्यात म्हणायचे .... होउन जाउद्या.

पॉप क्विझ: The students at FTII have sharply questioned Mr. Chauhan’s “creative credentials” and whether he has the requisite vision in guiding the institute that has been earlier helmed by internationally-renowned luminaries such as Adoor Gopalakrishnan, Girish Karnad, U.R. Ananthamurthy, and Shyam Benegal, who have graced Indian theatre, cinema and literature. चला आता गुगल न करता सांगा बघू अदूर गोपाल्क्रीश्णन काय आहेत आणि त्यांनी काय निर्माण केलंय.

In reply to by काळा पहाड

धर्मराजाने काय निर्माण केलेय हे तर गुगलूनही मिळणार नाही. फार्फार तर गुगल पोखरून एखादा उंदीर मिळेल.

In reply to by dadadarekar

हितेश राव, मग मला सांगा अदूर गोपालाक्रीश्णन चांगले का आणि धर्मराज का वाईट? दोघेही जर कुणी न बघणार्या पिक्चर शी संबंधित आहेत तर?

In reply to by dadadarekar

कृपया, धर्मराज याच्यात ओढू नका. त्या माणसाचे नाव गजेंद्र चव्हाण आहे. तेव्हा उगाच महाभारतातील व्यक्तिरेखांवर काड्या टाकू नका. धन्यवाद.

In reply to by काळा पहाड

ते मल्याळम चित्रपट निर्माते , दिग्दर्शक आहेत. एवढी तोंडओळख आता तुम्ही अदूर गोपाल्क्रीश्णन आणि गजेंद्र चौहान यांना गुगलून बघा आणि कोण लायक आहे ते सांगा !

In reply to by कपिलमुनी

मुनीश्वर, तिथं पिक्चर काढायचा नाही हो. स्ट्रेटेजि ठरवणे, सरकारबरोबर को-ओर्डिनेट करणे, बजेट वाढवून घेणे, सुव्हिधा वाढवणे, नवीन टेक्नोलॉजी आणण्याबद्दल विचार करणे, विद्द्यार्थ्यांच्य रोजी रोटी ची सोय होईल (क्रूड लिहितोय थोडंसं) असं पहाणे अशी कामं असतात. मला सांगा, अदूर साहेबांनी या सगळ्यात प्राविण्य मिळवलंय का हो? नाही, कारण विद्यार्थी तो एक मुद्दा उचलतायत. भले चौहान साहेबांना हे येत असेल किंवा नसेल, अदूर साहेबांना किंवा बाकीच्यांना हे येतंय का? दुसरा मुद्दा म्हणजे, शरद पवारांना क्रिकेट किती येतं? मग तिथे ही बोंबाबोंब का होत नाही बरं?

In reply to by कपिलमुनी

ते कसे नालायक आहेत आणि बाकीचे कसे लायक आहेत ते सांगा आधी. मगाचपासून हेच दुसर्या तर्हेनं विचारतोय काय समजत नाहीये का?

In reply to by काळा पहाड

बाकीच्यांना कमीत कमी चित्रपट क्षेत्रामधला निर्मिती,लेखन, दिग्दर्शन यांचा अनुभव आहे. या लोकांच्या कलाकृती देशात , जगात गाजल्या आहेत आणि यांना बर्‍याच प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. जास्त माहितीसाठी इथे पहा श्याम बेनेगल यांनी इथेच शिकवले आहे. त्यामुळे ते विद्यार्थांशी जास्त चांगले कनेक्ट होउ शकतात . गिरिश कर्नाड हे ऊतम अभिनेते , लेखक , दिग्दर्शक आहेत He served as director of the Film and Television Institute of India (1974–1975) and chairman of the Sangeet Natak Akademi, the National Academy of the Performing Arts (1988–93). यांना या व अशाच पदाचा अनुभव आहे. वरील दोन्ही उमेदवार राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले आणि कलेची जाण असलेले म्हणून ओळखले जातात आता २ वाक्ये चौहान यांच्यवर लिहा .

In reply to by कपिलमुनी

मुनीश्वर, एडमिनिस्ट्रेटिव्ह गोष्टी वेगळ्या आणि आर्ट स्किल्स वेगळी. श्याम बेनेगलांबद्दल माझं काही म्हणणं नाही paN हे बाकीचे कन्नड आणि केरळी चेहरे म्हणजे सभ्य चेहृयातले कम्युनिस्ट आहेत. कर्नाड सतत कसले ना कसले वाद ओढवून घेतात. http://indiafacts.co.in/girish-karnad-medicine/ http://indiafacts.co.in/how-girish-karnads-plays-distort-indian-culture… खालील लिंक्स पहा: १. रविंद्रनाथ टागोर सेकंड रेट प्ले रायटर आहेत: http://timesofindia.indiatimes.com/india/Rabindranath-Tagore-a-second-r… २. अनंत मूर्ती बद्दल http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-karnataka/karnad-ur… ३. नॉय पॉल बद्दल http://blogs.hindustantimes.com/medium-term/?p=547 ४. Calling the move to introduce the Bhagavad Gita in primary schools across the State another step in “cultural terrorism”, Jnanpith award winner Girish Karnad lambasted the State Government for this “communal” proposal here on Friday. http://www.thehindu.com/todays-paper/tp-national/tp-karnataka/bhagavad-… http://www.patheos.com/blogs/drishtikone/2012/11/girish-karnad-ahmednij… त्यातून हे आर्टीस्ट्स म्हणजे भडक डोक्याचे प्राणी. तेव्हा कर्नाड सारख्याला तिथे आणून ठेवलं तर तिथे एफटीटीआय आणि त्यांचं पुरस्कृत सरकार यांच्यात भांडण सुरू झालंच म्हणून समजा.

In reply to by काळा पहाड

आता २ वाक्ये चौहान यांच्यवर लिहा . हा मुद्दा सोडून दुसरेच लिहित आहात. दुसरा किती वाईट यावर चौहानांचा चांगलेपणा आहे का ? गजेंद्र चौहान हे वादातीत उत्तम कलाकार किंवा एडमिनिस्ट्रेटर असतील तर सांगा , सर्वजण आनंदाने मान्य करतील.

In reply to by काळा पहाड

पवारांना मध्ये आणल्याबद्दल निषेध निषेध!!! बर ते सोडा … ह्या गजेंद्र भाऊंनी किती पिक्चरे गेल्या ५ वर्षात केलीत? त्याचं सध्याच्या तंत्रज्ञानाबद्दल काय मत आहे? वगरे वगरे सांगू शकाल का? त्यांनी काय व्यवस्थापन केलाय आधी हे तरी सांगा? नाही म्हणजे गल्ली निवडणुकांच व्यवस्थापन आणि FTII च व्यवस्थापन … काही तर फरक असेल ?

In reply to by काळा पहाड

शरद पवार कंट्रोल बोर्डावर निवडून आले होते. गजेंद्रला आणून बसवलाय. ते क्रिकेट कंट्रोल बोर्ड आहे. ही शिक्षण संस्था आहे. शरद पवार नॅशनल क्रिकेट अ‍ॅकेडमीचे अध्यक्ष नव्हते. आता कुठलेही लॉजिक कुठेही लागायला सुरू झालंय. :)

त्या संस्थेचे जे माजी विद्यर्थी आहेत व ज्यांनी त्यांच्या क्षेत्रात काही भरीव काम केले आहे अशांची सा़क्ष काढावी असे ह्यांचे मत. संस्थेचे काही प्रसिद्ध माजी विद्यार्थी- मिथुन चक्रवर्ती,जया बच्चन,राजकुमार हिरानी,रझा मुराद,शत्रुग्न सिन्हा,ओम पुरी,संजय लीला भंसाळी.. https://en.wikipedia.org/wiki/Film_and_Television_Institute_of_India ह्यांच्या करियरमध्ये तत्कालीन संचालकांचा सहभाग/वाटा किती ह्यावर मत मिळाले की मग पुढचे बघता येईल.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ज्जे बात, मला वाटते हा प्रतिसाद अतिशय योग्य आहे. अवांतरः आयुष्यात कधी माईशी सहमत व्हावेसे वाटेल असे वाटले नव्हते,

In reply to by संदीप डांगे

संचालक हवा तर.म्हणूनच तर हे सगळे चालू आहे. पण तत्कालीन संचालकांचा माजी विद्यार्थ्यांवर काय प्रभाव पडला,त्यावेळच्या संचालकांनी कोणते धाडसी निर्णय घेतले,त्यांचा अभ्यासक्रमांतला हस्त़क्षेप....हे जर मुद्दे पुढे आले तर सरकारला विरोध करताना काही अर्थ राहील. संस्था मोठी आहे,तिच्यातून लोकप्रिय्,करमणूकप्रधान हलके फुल्के सिनेमे देणारे लोक तयार होतात हे ही मान्य पण गजेंद्र चौहान ह्यानी बर्लिन्,कान्समध्ये जाऊन चेहरा रंगवला नाही म्हणून ते संस्था चांगल्या तर्हेने चालवू शकणार नाहीत हा अजब तर्क झाला असे ह्यांचे मत.

कायतर शिणेमा संस्थेच्या तमाशाचे मिपावर नाटक (वस्त्रहरण) झाले आहे.
सरकार : तू फक्त हो म्हण+कुणी तरी आहे तिथं विद्यार्थी : मला मुक्त व्हायचय+मला उत्तर हवय मिपाकर :सगळीकडे बोंबाबोंब्+सौजन्याची ऐशी तैशी+केले तुका झाले माका.
पिटातील प्रेक्षक नाखु

In reply to by नाखु

+१११११११११११

भक्तांचा नंगानाच बघून डोळे पाणावले. उद्या भाजपाप्रणीत नेमणूकीत राखी सावंत जरी निवडून आली तरी तिलाच सपोर्ट करतील हे वेगळे सांगणे न लगे.

In reply to by बॅटमॅन

तिलाच सपोर्ट करतील तिच्यामागे उभे राहतील असे तुम्हाला म्हणायचे आहे का... बाकी सगळं छान मराठी लिहीलंत पण तेवढंच इंग्रजी लिहीलंत म्हणून एक शंका... !

http://www.misalpav.com/comment/709519#comment-709519 http://www.misalpav.com/comment/691072#comment-691072 http://www.misalpav.com/comment/607658#comment-607658 जरा आरशात बघा..इतरांच्या धाग्यांना आपण वर्तमानत्री धागे म्हणता.

गजेन्द्र चौहान यांच्या आधी त्या पदावर कोण होते? आणि त्यांच्या आधी? ते लोक पण चित्रपट क्षेत्रातले नामवंत होते का? जाणकारांनी कृपया माहिती द्यावी.

मी काय म्हणतो अडवाणी, जेठमलानी, कंदाहार फेम माजी मंत्री इत्यादींपैकी कुणालाही बनवलं असतं तरी चाललं असतं की, भाजप खासदार धडकेशमालिनी पण चालल्या असत्या आणि गरम धरम~, शॉटगन सिन्हा यांनी काय पाप केलं होतं ? विनय सहस्त्रबुद्धे , समीर धर्माधिकारी किंवा किरण खेर यांचे पतीदेव पण चालले असते. नाहीतर निवडणुकीत मोदींसाठी न्यूड फोटो दिलेली ती कुठली बया यांचा पण विचार करायला पायजेल होता. जाऊ द्या आता हत्तीचं वाहन तर हत्तीचं वाहन.

In reply to by dadadarekar

खासदार रामदास आठवले यांनी चौहान यांच्या नेमणुकीवरून होणारा प्रचंड विरोध पाहता त्यांनी तातडीने संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे. रिपब्लिकन पक्षाच्या चित्रपट शाखेचे उद्घाटन झाल्यानंतर आठवले यांनी ही मागणी केली. सविस्तर वृत्त येथे पहा

ए-दिले-नादां तुझे हुआ क्या आखिर इस दर्द कि दवा क्या है

नका रे अशी माझ्या नावावर चिखलफेक करु ! आपल्या एका मिपाबंधूची भुमिका केलेल्या नटाला एवढ्या मोठ्या पदाचा मान मिळालाय तर मिपाकरांनी खुश नको का व्हायला ? शांत व्हा. नायतर भीमार्जुनाला पाठवू काय ? नको, त्यापेक्षा कृष्णालाच पाठवतो. कृष्णनितीशिवाय हा पेच सुटायचा नाही.

इंद्राचा गज आणि गजेंद्र यात फरक आहे ना रे बेटा

विद्यार्थ्यांनी संचालकांच्या नियुक्ती वर आक्षेप म्हणजे त्यांच्या फिल्मी भाषेत सांगायचे तर तिसर्‍या फळीतील दिग्दर्शकाने पटकथा व नायकाच्या भूमिकेसाठी त्यांची मते विचारात न घेण्याच्या निषेधार्थ संप पुकारण्याचा सारखे आहे. महत्त्वाचा प्रश्न असा आहे किं अमिताभ रजनी ह्यांच्याकडे ह्या संस्थे कडे द्यायला वेळ आहे का आणि त्यांची ह्या पदाच्या साठी होकार होता का हा प्रश्न प्रसार माध्यमांनी न विचारता शिमगा सुरु केला.

In reply to by dadadarekar

दुसरीच नावे
पहीलं नाव तुमचं होतं वाटतं... मग बरोबर आहे... असो विनोद बाजूला राहू द्या. पण याद्या बनवणारेही तेच आणि अंतिम निवड करणारेही तेच... काय बोलणार

सुरुवातीला विरोधकांनी मोदींवरही अशीच प्रचंड टिका केली होती. त्यातूनच ते मोठे होत गेले... गजेंद्र यशस्वी होणार असे दिसतेय

In reply to by आशु जोग

व... रीकामटेकडेपण या निकषवर निवड करणार का ? http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=48037730&section=pune-h… राखी सावंत , सलमा आगा , हेमंत बिर्जे हेही विरोध करणार आहेत.

In reply to by आशु जोग

फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियातील (एफटीआयआय) एक किस्सा ऐकून सुन्न झालो. गोष्ट जरा जुनी आहे, रसूल पोकुट्टी यांना ध्वनिलेखनासाठी मानाचा ऑस्कर पुरस्कार जाहीर झाला तेव्हाची. "स्लमडॉग मिलिनेअर‘चे संगीतकार ए. आर. रहमान यांनाही "जय हो‘ गाण्यासाठी ऑस्कर जाहीर झाले होते. या दुहेरी यशामुळे सारे भारतीय कलाक्षेत्र आनंदात न्हाऊन निघाले होते. रसूल हे एफटीआयआयचे माजी विद्यार्थी. त्यामुळे तेथील अध्यापक, विद्यार्थ्यांना आनंद होणे स्वाभाविकच; पण विद्यार्थ्यांना जरा जास्तच कैफ चढला होता. कॅम्पसमध्ये रस्त्यावर पार्ट्या रंगल्या. कोणी ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. एकच कल्ला. शिक्षकांचेही कोणी मनावर घेत नव्हते... बातमी इथे पहा