✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वजन कमी करणारा आहार

ब
बाबा पाटील यांनी
Wed, 03/04/2015 - 20:48  ·  लेख
लेख
वजन कमी करणारा आहार १) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. २) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी. ३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा. ४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री) घालुन घेणे. ५) रात्रीचे जेवण ; दुपार प्रमाणेच घ्यावे. ६) जेवणात गोड पदार्थचा समावश करु नये. तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत.चाकलेट्स बेकरी प्राडक्टस ,शितपेय, फास्ट फुड, होटेलींग, मिठाई बंद करावी. ७) योग्य आहाराला योग्य व्यायाम व आयुवेदीक औषधीची जोड दिल्यास दर आढवडयाला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही तसेच शरीराचे कु्ठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. ८)जेवणात मिठ कमी घ्यावे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
औषधोपचार
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
शिफारस
सल्ला

प्रतिक्रिया द्या
67238 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

नुसता तोंडावर (बोलणे आणि खाणे

सूड
गुरुवार, 03/05/2015 - 15:46 नवीन
नुसता तोंडावर (बोलणे आणि खाणे दोन्ही बाबतीत)ताबा ठेवून उपयोग नाही. वर्कआऊट हवाच असं 'मला' वाटतं!! नेहमीच्या व्यायामानंतर दोरीउड्यांचे (२००*३) असे सेट परिणामकारक ठरतात. सुरुवात २०*३ पासून करावी आणि रोज १० उड्या जास्त मारता येतीलशा बघाव्या. २०० कधी जायला लागतात ते आपलं आपल्यालाही कळत नाही.
  • Log in or register to post comments

+१

बॅटमॅन
गुरुवार, 03/05/2015 - 15:49 नवीन
दोरीउड्या लय भारी. तरी चालणे वा पळणे हे त्यापेक्षाही सरस असं आपलं मला वाटतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

+१

सामान्य वाचक
Fri, 03/06/2015 - 18:22 नवीन
पळणे आणि पोहणे हे सगळ्यात जास्त परिणामकारक व्यायाम प्रकार आहेत १० १५ मित्र मैत्रिणी + स्वतः च्या उदाहरणावरून हा निष्कर्ष काढला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

+२

अत्रुप्त आत्मा
Fri, 03/06/2015 - 19:30 नवीन
@ असं आपलं मला वाटतं.>>> असच 'मलाही' वाटतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पळणं अशक्य असतं ...गुडघे

असंका
Mon, 03/09/2015 - 11:52 नवीन
पळणं अशक्य असतं ...गुडघे दुखतात ,झिजतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मॅराथॉन सांगत नाय ओ कुणी. रोज

बॅटमॅन
Mon, 03/09/2015 - 13:07 नवीन
मॅराथॉन सांगत नाय ओ कुणी. रोज १ किमी बास आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

नाय खरंय तुमचं. पळण्यामुळे

असंका
Mon, 03/09/2015 - 13:43 नवीन
नाय खरंय तुमचं. पळण्यामुळे जसं वजन कमी झालं होतं तसं इतर कशानेच कधी झालं नव्हतं माझंही. आपण या क्षेत्रातले तज्ज्ञ आहात काय? रोज एक किमी पळल्याने गुडघ्यांना काहीही धोका नाही हे खरं आहे का? (जेन्युइन शंका....या क्षेत्रातील कुणाही व्यावसायिकाने सांगावे..)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

मी कसला तज्ञ? पण मला वाटतं की

बॅटमॅन
Mon, 03/09/2015 - 17:33 नवीन
मी कसला तज्ञ? पण मला वाटतं की तसा धोका नसावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

चालणे उत्तम.

प्रभाकर पेठकर
Tue, 03/10/2015 - 10:13 नवीन
वजन जास्त असेल (१००+) तर धावण्याने गुडघ्यांवर नक्कीच विपरीत परिणाम होतो. हे माझे नाही अस्थितज्ञांचे मत आहे. त्यापेक्षा नियमितपने द्रूतगतीने चालणे + पोहणे + आहारावर योग्य नियंत्रण ह्याने वजन कमी होते आणि गुडघ्याचे कार्टिलेजीस झिजण्याची शक्यताही नसते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असंका

हो ना. आणि ती दुखणी फारच चिकट

असंका
Tue, 03/10/2015 - 10:24 नवीन
हो ना. आणि ती दुखणी फारच चिकट. शेवटी सरळ चार पाच लाख घालून गुडघे रीप्लेस करायचे. त्यापेक्षा चालणे ठीक. फार फायदा नाही तरी फार तोटाही नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पटले नाय....

ब़जरबट्टू
गुरुवार, 03/05/2015 - 16:23 नवीन
साधारण एका व्यक्तीला दिवसाला अंदाजे २००० कॅलरीज हव्या असतात, वजन कमी करायचे म्हणून १६५० गृहीत धरतो. , आता बाबासाहेबांनी दिलेला आहार बघुया :- कॅलरीज :- www.livestrong.com आधारावर :- १) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. :- ६० कॅ, २) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका - ७२ कॅ, १ चहाचा चमचा, साजुक तुप,- १२० कॅ, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी.- १५० कॅ (नारळाची) ३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे - ५० कॅ ,३ गव्हाचे फुलके - २१६ कॅ , १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन) - १३५ कॅ ,१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको - ५० कॅ, काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते (?) - १५० कॅ, भात बंद करावा. = अंदाजे ६०० कॅ ४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री) घालुन घेणे. - ६० कॅ, ५) रात्रीचे जेवण ; दुपार प्रमाणेच घ्यावे. - अंदाजे ६०० कॅ ६) जेवणात गोड पदार्थचा समावश करु नये. तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत.चाकलेट्स बेकरी प्राडक्टस ,शितपेय, फास्ट फुड, होटेलींग, मिठाई बंद करावी. ७) योग्य आहाराला योग्य व्यायाम व आयुवेदीक औषधीची जोड दिल्यास दर आढवडयाला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही तसेच शरीराचे कु्ठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. - (-) २०० कॅ ( दररोज २ किमी धावणे ) ८)जेवणात मिठ कमी घ्यावे.- बरोबर सगळे मिळुन दिवसाला फक्त १४५० कॅलरीज येतील, कदाचित कमीच, ते सुध्दा मी किमान घेतलेय . वर यामध्ये कार्बोदके, प्राथिने व वसा ? ( Carb, Protein, Fat ) संतुलन नाही . Protein इतके कमी घेतल्यास वजन तर कमी होईल, पण ते फक्त मसल्स मास असेल, म्हणजे चरबी जैसे थे. वर शरीर धड खायला भेटत नाहीये म्हणून सुस्त होईल. :)
  • Log in or register to post comments

माझ्या आजीने दिलेल्या काही

क्रेझी
गुरुवार, 03/05/2015 - 16:59 नवीन
माझ्या आजीने दिलेल्या काही हेल्थ-टीप्स इथे देते. मी या सल्ल्यानुसार गेली ७वर्षे माझं वजन कायम राखण्यात यश मिळवलं आहे (उंची १६५सेमी, वजन ५५). दिवसाचा आहार रिव्हर्स पिरॅमिड सारखा असावा रिव्हर्स पिरॅमिड म्हणजे - दिवसाच्या सुरूवातीला सर्वात जास्त आहार घ्यावा म्हणजे हेवी नाश्ता, दुपारचं जेवण त्यामानाने कमी आणि रात्रीचं जेवण त्याहूनही कमी. ह्या तिनही आहारांमधे तळलेल्या पदार्थांचं प्रमाण कमीत-कमी असावं, नसल्यास उत्तम. १) हिरव्या पालेभाज्या, शक्यतो घट्ट वरण (तुरडाळ,मूगडाळ) यांचं प्रत्येकी १ वाटी प्रमाण आवश्यकच. २) ह्याचबरोबर बीटरूट, गाजर, काकडी, मुळा ह्यापैकी सर्व किंवा ऋतूमानानुसार उपलब्ध असलेले सॅलड निदान एक वाटी असावे. ३) पोळी/ भाकरी आवडीनुसार पण प्रमाण शक्यतो भाजीच्या मानाने कमी.म्हणजे जर १ वाटी भाजी असेल आणि नेहमी तुम्ही त्यासोबत ३ पोळ्या जेवत असाल तर १ पोळी कमी करा. ४) फलाहार शक्यतो सकाळी न्याहारीसोबत किंवा दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या तासानंतर करावा, शक्यतो संध्याकाळची फळे खाणं टाळा. ५) चहा, कॉफी चं प्रमाण कमीतकमी १ आणि जास्तीतजास्त २ कप दिवसाला असं ठेवावं. ६) भूक लागली पण खायला वेळ नाही अशावेळेस चहा, कॉफी घेऊन भूक मारू नका त्यामुळे शरीराची हानी होऊ शकते ( कित्येक वेळा अ‍ॅसिडीटीचा त्रास ह्यामुळे सुरू होऊ शकतो ). ह्यावरती उपाय म्हणून मूठभर शेंगदाणे-गुळ खावा किंवा दाण्याची चिक्की खावी. सुकामेवा आवडत आणि परवडत असल्यास तो खाल्ला तरी उत्तम. सुकामेव्यामधे शक्यतो काजू आणि पिस्ते यांचा वापर करू नये. सुके अंजीर, काळ्या मनूका, बदाम (पण प्रमाणात), अक्रोड यांचा समावेश जास्त असावा. ७) जर चिवडा,शेव असे चटपटीत पदार्थ खायची इच्छा रोजच होत असेल तर त्याला पर्यात म्हणून बाजारात तयार मिळणा-या ज्वारी, बाजरीच्या लाह्या, गव्हाचे तिखट-मीठ लावलेले मुरमुरे असे पदार्थ खावेत. ह्यामुळे शरीरासाठी हानिकारक मैदा जाणार नाही. ८) उपवासाच्या दिवशी साबुदाणा हा पदार्थ अजिबात खाऊ नये. शक्यतो फलाहार सेवन करावा पण शक्य नसल्यास वरईचे तांदूळ खावे.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद वाचुन भुख लागली..

जेपी
गुरुवार, 03/05/2015 - 17:14 नवीन
प्रतिसाद वाचुन भुख लागली..
  • Log in or register to post comments

प्रतिसाद वाचुन भुख लागली..

सूड
गुरुवार, 03/05/2015 - 17:32 नवीन
प्रतिसाद वाचुन भुख लागली..
भुख लागणं थांबून भूक लागेल तेव्हा काहीतरी खाऊन घ्या!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

मग

चौकटराजा
गुरुवार, 03/05/2015 - 19:19 नवीन
मग मुवि ला कोन्टॅक्ट करा..... कट्टा ठरवा !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

डॉक्टर साहेब,

विटेकर
गुरुवार, 03/05/2015 - 17:14 नवीन
डॉक्टर साहेब, मी १० दिवस नर्मदेवर परिक्रमेला गेलो तेव्हा एकूण १७७ किमी चाललो. म्हणजे रोज अंदाजे १७ किमी. या दहा दिवसात माझे वजन ७ किलो कमी झाले ( ९४ पासून ८७ झाले) पण पुढच्या एका महिन्यात ब्याकलॉग भरून निघाला. असे होऊ नये म्हणून मी परत आल्यावर आठवड्यात ५ दिवस रोज ५ कि.मी.चालतो. पण वाढलेले वजन आता अजिबात कमी होत नाही प्रश्न १ - फक्त चालण्याने ( आहार तोच ठेऊन ) खरेच वजन कमी होते का ? प्रह्न २- माझा असा समज झाला आहे की व्यायाम बेतास बात केला तरी चालेल पण खाण्यावर स्ट्रीक्ट कन्ट्रोल असायला हवा... कारण नर्मदेवर जेव्हा वजन कमी झाले तेव्हा चालणे ही भरपूर असे आणि तशी खाण्याची आबाळ होत असे. प्रशन ३ - वजन कमी होण्यासाठी नेमके किती किमी चालायला हवे ( आहार आहे तेवढाच ठेऊन ) प्रश्न ४- ताशी किती किलोमिटर चालणे आणि किती वेळ चालणे हे व्यायाम म्हणून ठीक राहील. नक्की काय ? खाणे की चालणे की दोन्ही की दोन्ही नाही ??
  • Log in or register to post comments

विटेकर साहेब.

बाबा पाटील
गुरुवार, 03/05/2015 - 19:10 नवीन
जवळ पासच्या डॉक्टरांचा सल्ला घेवुन डायट ,व्यायाम व उपचार ठरवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

कार्डीओ व्हस्क्युलर व्यायाम

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 07/23/2015 - 13:02 नवीन
मी मध्ये काही वाचले होते त्याचा सारांश काहीप्रमाणात लागू पडेल … अर्थात हे माझे मत आहे … आणि मी काही ह्यातला तज्ञ नाही :) चालणे, फिरणे प्रकार कार्डीओ व्हस्क्युलर प्रकारात मोडतो. हे व्यायाम आपल हृदय मजबूत करत असत. जर हे व्यायामप्रकार वजन कमी करण्यासाठी करायचे असतील तर आपण किती वेळ व्यायाम करतो आणि किती तीव्रतेने करतो ते महत्वाचे असते. जेव्हा चालणे फिरणे आपण सुरु करतो तेव्हा सगळ्यांच वजन कमी व्हायला सुरुवात होते. साधारण ३ ४ व्यवस्थित वजन कमी होत. पण नंतर हळू हळू लक्षात येत की वजन कमी होतच नाही आहे. मग अजून जास्त चालायला सुरवात होते, वजन परत थोडसंच कमी होत पण नंतर काहीही फरक पडत नाही. जवळपास सगळ्यांनीच असे अनुभवलेले असते. ह्याच मुख्य कारण व्यायामाची तीव्रता आपण वाढवत नाही. फिरायला सुरुवात केली की हृदयाला सवय होई पर्यंत वजन कमी होत. एकदा का सवय झाली की पुन्हा वजन कमी होण थांबत. सबब, सतत तीव्रता वाढवत न्यावी लागते. सुरुवातीला चालणे, मग जोरयात चालणे, हळू पळणे, व्यवस्थित वेगाने धावणे अशा स्टेप्समध्ये तीव्रता वाढवत गेल्यास फरक नक्कीच आणि भरपूर दिसेल. पण एकाच स्पीडनी भरपूर वेळ चालत राहिलात तर जास्त फरक पडणार नाही. तुम्ही नर्मदा परिक्रमेत रोज जवळपास १७ - १८ किमी चाललात. त्यामुळे तुमची क्षमता बऱ्यापैकी वाढली. पण नंतर त्या क्षमतेच्या तुलनेत कमी तीव्रतेचा व्यायाम करत राहिलात. म्हणून वजन काही कमी झाले नाही. उलट कमी झालेले वाढले, म्हणजे वॉटर लॉस भरून निघाला आणि नंतर जो वेट लॉस झाला तोही काही प्रमाणात भरून निघाला असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विटेकर

अपयशी प्रयत्न चालू आहेत.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 03/05/2015 - 17:37 नवीन
वजन कमी करणारा आहार १) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. - २ ते ३ बिनसाखरेचा चहा होतो. २) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी. - १ प्लेट इडली किंवा पोहे किंवा सांजा किंवा उपमा असा असतो. ३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा. - २ फुलके, भाजी, आम टी, ताक असे असते दुपारचे जेवण. भात नसतो ४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री) घालुन घेणे. - १ कप चहा बिना साखर. दुध बदलावे लागेल., ५) रात्रीचे जेवण ; दुपार प्रमाणेच घ्यावे. - २ फुलके, भाजी. ६) जेवणात गोड पदार्थचा समावश करु नये. तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत.चाकलेट्स बेकरी प्राडक्टस ,शितपेय, फास्ट फुड, होटेलींग, मिठाई बंद करावी. - ह्यापैकी कसली सवय नाही. ७) योग्य आहाराला योग्य व्यायाम व आयुवेदीक औषधीची जोड दिल्यास दर आढवडयाला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही तसेच शरीराचे कु्ठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. - रोज ४ किमी चालतो (आठवड्यात १-२ दांड्या होतात.) ८)जेवणात मिठ कमी घ्यावे. - कमी असतं शिवाय वरून घेत नाही. ह्या व्यतिरिक्त उकडलेल्या अंड्यातील पांढरे, भाजलेले शेंगदाणे, आठवड्यातून २ पेग व्हिस्की (कंपनी असेल तर) उकडलेले पांढरे चणे. महिन्यातील १ - २ दिवस नो डाएट. वय ६० वर्षे आणि वजन ११७ किलो. वजन कमी करण्याचे अपयशी प्रयत्न चालू आहेत.
  • Log in or register to post comments

पेठकर काका,एकंदरीत भारीय प्रकरण तुमच..

बाबा पाटील
गुरुवार, 03/05/2015 - 19:07 नवीन
वेळ मिळाला तर भेटुन जा. डिटेल केस स्टडी करुन उपाय करुयात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

नक्की.

प्रभाकर पेठकर
Sat, 03/07/2015 - 15:22 नवीन
नक्कीच भेटेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

एकदम

चौकटराजा
गुरुवार, 03/05/2015 - 19:23 नवीन
एकदम वजन कमी करण्याचे अपरात्री प्रयत्न चालू आहेत असे वाचले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

खिक....

प्रभाकर पेठकर
Sat, 03/07/2015 - 15:25 नवीन
वय वर्षे ६० वाचले नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

कुंभ रास का हो तुमची

कॅप्टन जॅक स्पॅरो
Fri, 03/06/2015 - 12:28 नवीन
कुंभ रास का हो तुमची माझ्यासारखी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

चंद्ररास..

प्रभाकर पेठकर
Sat, 03/07/2015 - 15:26 नवीन
चंद्रराशी 'कर्क'.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

वय ६० वर्षे आणि वजन ११७ किलो.

स्वप्नांची राणी
गुरुवार, 03/05/2015 - 18:57 नवीन
वय ६० वर्षे आणि वजन ११७ किलो....पण उंची किती आहे..??
  • Log in or register to post comments

६ फूट...

प्रभाकर पेठकर
Sat, 03/07/2015 - 15:28 नवीन
पूर्वी ६ फूट १ इंच होती. आता कौलं उडाली आहेत, त्यामुळे ६ फूट फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

बजरबटटू

मनिमौ
Fri, 03/06/2015 - 18:32 नवीन
त्याच पाण्यात whale पण राहतात जे हत्ती च्या तिपटीने मोठे असतात हे आपण विसरलेले दिसता. प्रतिसाद द्यायचा म्हणून काहीही लिहीत जाऊ नका
  • Log in or register to post comments

ब्वार्र !!

ब़जरबट्टू
Tue, 03/10/2015 - 08:24 नवीन
म्याव... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ

रोज चालण्यासारखा व्यायाम नाही

ज्योति अळवणी
Sat, 03/07/2015 - 17:00 नवीन
रोज चालण्यासारखा व्यायाम नाही. किमान 1 तास चालण्याने वजन कमी होण्यास आणि मेंटेन होण्यास खूप उपयोग होतो.
  • Log in or register to post comments

आपण त्यांच्या समान व्हावे !..

विजयकुमार भवारि
Sun, 03/08/2015 - 20:59 नवीन
आपण त्यांच्या समान व्हावे !...
  • Log in or register to post comments

=))

स्पा
Mon, 03/09/2015 - 11:30 नवीन
=)) रोचक चर्चा -सडसडीत (स्पा)
  • Log in or register to post comments

हस ले हस ले :-)

श्रीरंग_जोशी
Mon, 03/09/2015 - 17:46 नवीन
स्पावड्या मित्रा, काही वर्षांपूर्वी मी पण असाच हसायचो डायट करणार्‍यांना. हा काय पालापाचोळा खाताय म्हणून हिणवायचो. कधी आपण या किनार्‍यावरून त्या किनार्‍यावर पोचतो कलत बी नाय. ते एका नव्या पक्षाचे लोक इंग्रजीमधला कोट बोलते ना, की पयले इग्नोर मारतील, मंग हसतील अन मंग शिरेसली घेतील. ह्ये बी तसंच हाय... ;-).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

+१११११११११११११

बॅटमॅन
Mon, 03/09/2015 - 17:57 नवीन
कोणे एके काळी आमीबी अशेच सडसडीत होतो पण अता मात्र नाही. अता डाएट केले पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

जोशी तुमच्या तोंडात सुगर फ्री

स्पा
Mon, 03/09/2015 - 17:58 नवीन
जोशी तुमच्या तोंडात सुगर फ्री पडो बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

:-)

श्रीरंग_जोशी
Mon, 03/09/2015 - 19:10 नवीन
:-) नको नको त्यापेक्षा मध किंवा गोड फळे चालतील ;-) .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

खरं सांगू का बाबा पाटिल, या

स्पंदना
Mon, 03/09/2015 - 12:56 नवीन
खरं सांगू का बाबा पाटिल, या अश्या मॉड फॅडां ऐवजी तुम्ही आयुर्वेदवर आधारित काही सांगाल अशी अपेक्षा होती. जसे की जवसाचा आहारात समावेश, भाज्या फळं आणि मध यांचे उपयोग. डाळीचे पाणी काही झेपले नाही, आणि स्किम मिल्क तर अजिबात नाही आवडत. डाळ ही प्रोटिनयुक्त असते. अन प्रोटिन आपल्या आहारात अतिशय गरजेचे. तसेच ताज्या भाज्या अन कोशिंबीरी, शेंगदाणे हे सगळच तुम्ही सुचवु शकत होता.
  • Log in or register to post comments

माझे थोडे वेगळेच मत आहे..

आनन्दा
Mon, 03/09/2015 - 17:29 नवीन
माझे थोडे वेगळेच मत आहे.. काही गाड्या खूप फ्युएल एफिशिअंट असतात. त्यांना इंधन जपून वापरायची सवय असते. काही गाड्या मात्र उधळ्या असतात. तसंच मेटेबॉलिझमचे असते असे मला वाटते. आता मेटॅबॉलिझमला उधळपट्टीची सवय कशी लावायची ते मात्र मला माहीत नाही. त्यावर विचार सध्या चालू आहे.
  • Log in or register to post comments

वजन ही गोष्ट 'फिटनेस' वरही

वेल्लाभट
Mon, 03/09/2015 - 20:16 नवीन
वजन ही गोष्ट 'फिटनेस' वरही 'भारी' पडते.... :) काय रे बाबा
  • Log in or register to post comments

लैचं वेळा वजन कमी केल्यानी

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/10/2015 - 09:00 नवीन
लैचं वेळा वजन कमी केल्यानी अनुभवाचा सल्ला देतो. रोज ५ मिनिट जॉगिंग, ५ मिनिट सायकलिंग आणि ५ मिनिट क्रॉसस्टेपर/ इलिप्टीइकल पासुन सुरुवात करायची. दररोज एक मिनिट प्रत्येक प्रकारात वाढवत जायचं. प्रत्येकी ३० मिनिट (९० मिनिट कार्डिओ रोज) प्रत्येकी पर्यंत साधारणपणे दिड महिन्यामधे पोहोचता येतं. प्रत्येक व्यायामप्रकारानंतर इलेक्ट्राल वॉटरचे २-३ घोट घ्यायचे २ ते ५ मिनिट रिलॅक्स व्हायचं (बसायचं नाही. हळु हळु इकडुन तिकडे चालायचं. लागलेला दम कमी झाला की पुढच्या व्यायाम प्रकाराकडे वळायचं) हा व्यायाम झाला की ५ मिनिट ब्रिदिंग एक्सरसाईजेस करायचे जेणेकरुन रक्तामधली ऑक्सीजनची पातळी योग्य प्रमाणात येते. गुढगेदुखी वाल्यांनी एवढा व्यायाम टाळा. त्यांनी त्याऐवजी रोज जलद चालणे (६ कि.मी. प्रतितास) हा व्यायामप्रकार दोन ४५ मिनिटांच्या सेशनमधे करुन बघा. ज्यांना दमा आणि फिट्स चा वगैरे त्रास आहे त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय व्यायाम करु नये. हे झालं की रोज एक किंवा दोन अवयवांच मसल ट्रेनिंग करायचं. साधारणपणे ८ व्यायामप्रकार प्रत्येकी ३ सेट १०-१२-१५ च्या रिपिटेशनप्रमाणे (आपली क्षमता लक्षात घेऊन आणि ट्रेनरच्या सल्ल्याने). दोन व्यायामप्रकार करणं मला जास्त फायदेशिर दिसतं. आहार म्हणाल तर, उठल्या उठल्या एक मोठ्ठा ग्लास गरम पाणी. व्यायाम सुरु करायच्या आधी एक ग्लास कच्च गायीचं दुध+ बोर्न्व्हिटा अर्धा चमचा साखर घालुन. व्यायाम झाल्यावर १ अंड+ कॉफी+ १ प्लेट मोड आलेली कडधान्य+ १ छोटी प्लेट उपमा, पोहे किंवा एक फळ २. जेवणामधे ३ पोळ्या+ भाजी+ सॅलड आणि एक वाटी ताक हिंग घालुन (बैठं काम असणार्‍यांनी ३ ऐवजी २ पोळ्या) भात मी आवडत नाही म्हणुन खात नाही. प्यायला कोमट पाणी लिंबु पिळुन. ३. जेवण झाल्यावर तीन तास अजिबात काही खायचं नाही. ४. ३ तासानी परत एखादं फळ किंवा एखादी पोळी आणि चहा/ कॉफी वगैरे साखर घालुन. ५. नंतर परत २-३ तासाने अगदी नियमानी ३०० मि.ली. लिंबु पाणी साखर प्रमाणात घालुन ६. रात्रीचं जेवणं म्ह्णजे २ पोळ्या+ भाजी/ आमटी+ मोठी डिशभरुन परत कडधान्यं. जेवण झालं की परत कमीत कमी अर्धा तास चालुन येणं (आमच्याकडे वेगळं जायला लागत नाही, कुत्र्याला फिरवतानाचं ह्याच्याहुन जास्त चालणं होतं) ७. आठ ते साडेआठ तास झोप अनिवार्य. कमी झोपलात तर आदल्या दिवशीची झिज अजिबात भरुन येणार नाही आणि वजन कमी व्हायच्या ऐवजी अजुन मसल टिअर वगैरे दुष्परिणाम दिसतील. एवढा व्यायाम मला झेपतो म्हणुन तुम्ही थेट करायला जाउ नका. हळु हळु सुरुवात करा भले एवढ्या व्यायामापर्यंत पोचायला २ वर्ष लागली तरी चालतील. आणि आठवड्यातुन एक दिवस आळशी व्हायचं. अजिबात व्यायाम करायचा नाही. पण तोंडावर मात्र नियंत्रण ठेवायचं. मद्यपान, धुम्रपान वगैरे करणार्‍या मंडळींनी हे दोन्ही प्रकार बंद करायचे. काही अडचण आल्यास नक्की विचारा. (लोका सांगे ब्रम्हज्ञान...सद्ध्या व्यायाम बंद आहे) कॅजॅस्पॅ.
  • Log in or register to post comments

वरच्या व्यायामांना बरोब्बर

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/10/2015 - 09:03 नवीन
वरच्या व्यायामांना बरोब्बर अडीच ते पावणेतीन तास लागतात. त्यानंतर स्ट्रेचिंग एक्सरसाईजेस मस्ट. व्यायामानंतर अंगावर वारा बसु देउ नका. गरम पाण्यानी अंघोळ करा. २ आठवड्यामधे फरक दिसायला लागेल. एकदा गोडी लागली की स्वतःहुन व्यायाम केला जातो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

समतोल अनुभवी सल्ला.

प्रभाकर पेठकर
Tue, 03/10/2015 - 10:20 नवीन
सल्ला समतोल वाटतो आहे. सर्व कळतं, प्रयत्नही करतो पण सातत्य राहात नाही. पण सततच्या प्रयत्नांनी वजन कमी झालं नाही तरी आहे तिथे स्थिर आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कॅप्टन,

वेल्लाभट
Tue, 03/10/2015 - 12:22 नवीन
कॅप्टन, अ‍ॅरोबिक अ‍ॅनारोबिक चं प्रमाण चुकतंय माझ्या दृष्टीने तुमच्या सल्ल्यात. वेट ट्रेनिंग अधिक असावं. तसंच कार्डिओ रोजच्यारोज करणं श्रेयस्कर नाही. वाचलेली माहिती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

प्रत्येकाच्या शरिराप्रमाणे

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/10/2015 - 13:45 नवीन
प्रत्येकाच्या शरिराप्रमाणे बदलतं...वेट ट्रेनिंग दुय्यम ठेवायचं कारण असं की मला मसल बिल्ट अप करायची हौस नाही. मला अ‍ॅरोबिक चा फायदा जास्त होतो. एक म्हणजे शरीर हालचालींमधे रहात दुसरं म्हणजे ताजतवानं वाटतं दिवसभर\.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

चुकताय

वेल्लाभट
Tue, 03/10/2015 - 14:17 नवीन
मला मसल बिल्ट अप करायची हौस नाही.
अतिशय चुकीचा समज. तुम्ही जो अ‍ॅरोबिक व्यायाम करता, किंवा ज्या दैनंदिन हालचाली करता त्या करायला मसल्स, जॉइंत्स, लिगामेंट्स बळकट असणे अनिवार्य आहे, त्यात हौसेचा भाग नाही. उद्या इतक्या कार्डियोला जोड पुरेशा स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंगची नसेल तर सांधे, अवयव दुखायला सुरुवात होऊ शकते. होते. असेच आपापले समज करून घेऊन त्यानुसार आपणच चांगला वाईट व्यायाम ठरवून करणारे अनेक असतात. तसं नको. तेंव्हा या गैरसमजाचा पुनर्विचार करा असा आग्रह करतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

अतिशय चुकीचा समज. तुम्ही जो अ

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/10/2015 - 15:54 नवीन
अतिशय चुकीचा समज. तुम्ही जो अ‍ॅरोबिक व्यायाम करता, किंवा ज्या दैनंदिन हालचाली करता त्या करायला मसल्स, जॉइंत्स, लिगामेंट्स बळकट असणे अनिवार्य आहे, त्यात हौसेचा भाग नाही. उद्या इतक्या कार्डियोला जोड पुरेशा स्ट्रेन्ग्थ ट्रेनिंगची नसेल तर सांधे, अवयव दुखायला सुरुवात होऊ शकते. होते.
खरं आहे. मी मसल ट्रेनिंग पुरेश्या प्रमाणात करतो. सद्ध्या स्पायनल इंज्युरीमुळे व्यायाम बंद आहे एवढचं. नाहीतर एकमेकांना पुरक प्रमाणामधे दोन्ही व्यायामप्रकार केले जातात. दिवाळी पर्यंत पुन्हा फिट टु वर्काउट होईन त्यावेळेला परत शुन्यामधुन सुरुवात करायची आहे. :( त्यावेळेस तु म्हणतोय्स तसही करुन पाहिन. उपयोग झाला तर बेष्टचं की :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

काही दिवसांपूर्वी मी एका

वेल्लाभट
Tue, 03/10/2015 - 16:32 नवीन
काही दिवसांपूर्वी मी एका पुस्तकाबद्दलचा धागा टाकला होता. तो बघा. ते पुस्तक वाचा जमल्यास दिवाळी पर्यंत. ही त्यातलीच वाचीव माहिती आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

+१ !

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 07/23/2015 - 13:12 नवीन
सहमत! चालणे फिरणे नंतर नंतर त्रासदायक होत गेल्याची उदाहरणे पाहिली आहेत :) स्नायू मजबूत नसतील तर काहीच शक्य नाही, त्यामुळे आधी स्नायू मजबूत करून मगच फिरणे, धावणे प्रकार सुरु :D (अर्थात, नॉर्मली सगळ्यांचे स्नायू चालण्यासाठी मजबूत असतातच :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेल्लाभट

एक ग्लास गायीचं कच्च दुध

आयुर्हित
Tue, 03/10/2015 - 13:41 नवीन
कच्च दुध घेणे अतिशय धोकादायक आहे. दुधात क्षय रोगाचे विषाणू असू शकतात, जे तापविल्यानंतर मरतात. त्यामुळे कच्चे नकोच. गायीचे दुध घेतांना ती देशी (खोंड असलेली) गाय आहे हे तपासून पहा. आजकाल पिशवीत जे दुध मिळते ते जर्शीचे असते, ते अतिशय हानिकारक आहे ज्याने ऑटीझम, कॅन्सर, मधुमेह सारखे आजार सुरु होणे कारणीभूत ठरत आहे. त्यापेक्षा म्हशीचे तापवून साय काढलेले दुध कधीही चांगले!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

कच्चं दुध म्हणजे पाश्चराईज्ड

कॅप्टन जॅक स्पॅरो
Tue, 03/10/2015 - 13:47 नवीन
कच्चं दुध म्हणजे पाश्चराईज्ड हो. पिशवी फोडल्यावर गारच्या गार प्यायचं. मला उकळवलेल्या दुधाचा वास सहन होत नाही त्यामुळे मी कच्च पितो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आयुर्हित
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा