✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

वजन कमी करणारा आहार

ब
बाबा पाटील यांनी
Wed, 03/04/2015 - 20:48  ·  लेख
लेख
वजन कमी करणारा आहार १) सकाळी १ कप चहा/ काफी/ दुध (साय काधलेले )साखर ( शुगर फ्री) कमी घालुन घेणे. २) सकाळचा नाश्ताः ९ ते ११ वाजता १ गव्हाचा फुलका, १ चहाचा चमचा, साजुक तुप, २ चहाचे चमचे कोण्तीही चटणी. ३) दुपारचे जेवण ; जेवणपुर्वी १ ते २ ग्लास वरणाचे नुसते पाणी/ कोमट पाणी प्यावे,३ गव्हाचे फुलके, १ नैवेद्याची वाटी कोणतीही भाजी (बटाटा सोडुन),१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको,काकडी ,गाजर,कोवळा मुळा, टोमटो, बीट, कांधाची पात,सॅलेड पान , कोबीची कोंशिबीर वाटेल तेवढे खाल्ले तरी चालते भात बंद करावा. ४) संध्याकाळ नाश्ताः४ वाजता १ कप चहा /कोफी /दुध (साय काडुन) कमी साखर (शुगर फ्री) घालुन घेणे. ५) रात्रीचे जेवण ; दुपार प्रमाणेच घ्यावे. ६) जेवणात गोड पदार्थचा समावश करु नये. तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत.चाकलेट्स बेकरी प्राडक्टस ,शितपेय, फास्ट फुड, होटेलींग, मिठाई बंद करावी. ७) योग्य आहाराला योग्य व्यायाम व आयुवेदीक औषधीची जोड दिल्यास दर आढवडयाला एक ते दिड किलो वजन कमी होते व पुन्हा वाढत नाही तसेच शरीराचे कु्ठल्याही प्रकारचे नुकसान होत नाही. ८)जेवणात मिठ कमी घ्यावे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
समाज
जीवनमान
राहणी
औषधोपचार
लेखनप्रकार (Writing Type)
लेख
अनुभव
शिफारस
सल्ला

प्रतिक्रिया द्या
67238 वाचन

💬 प्रतिसाद (108)

प्रतिक्रिया

धन्यवाद !!!

राघवेंद्र
Wed, 03/04/2015 - 20:53 नवीन
खुप सोप्या शब्दात माहिती दिली. योग्य आहाराला योग्य व्यायाम हा कसा ठरवायचा ?
  • Log in or register to post comments

अतिशय सोपे उपाय...

तुषार काळभोर
Wed, 03/04/2015 - 20:53 नवीन
यातले काही उपाय पाळून जानेवारी २०१३ ते मार्च २०१४ १०किलो कमी केले होते. (९२ ते ८२ ; उंची १८२सेमी) व्यायामाची जोड नव्हती. आता ८३-८५ स्थिर आहे. ७५ पर्यंत जायची मनाची इच्छा आहे, पण शरीराची नाही ;)
  • Log in or register to post comments

"तसेच चिंकु, केळी, द्राक्ष

प्रज्ञाताई
Wed, 03/04/2015 - 20:57 नवीन
"तसेच चिंकु, केळी, द्राक्ष,आंबा ही फळे सोडुन बाकी सर्व फळे खावीत" बाबाबा! असं काही नसतं हो. वेट लॉस करायचा असला तरी ही फळं सुद्धा तुम्ही खाऊ शकता. फक्त कोणत्या वेळी आणि किती हे महत्वाचे..
  • Log in or register to post comments

ब्रुहण द्रव्य..

बाबा पाटील
Wed, 03/04/2015 - 21:00 नवीन
ही फळे वजण वाढवण्याकरिता उपयुक्त आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रज्ञाताई

+१

कॅप्टन जॅक स्पॅरो
Wed, 03/04/2015 - 21:29 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

यथा शक्ती व्यायाम...

बाबा पाटील
Wed, 03/04/2015 - 20:58 नवीन
घाम निघेल इतका आणी स्वतःला सहन होइल इतका जो आवडतो तो व्यायाम प्रकार करावा,जसे चालणे,पोहणे,पळणे,खेळणे.इत्यादी.
  • Log in or register to post comments

हम्म...

जेपी
Wed, 03/04/2015 - 21:11 नवीन
हम्म...
  • Log in or register to post comments

१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी,

सूड
Wed, 03/04/2015 - 21:20 नवीन
१ फुलपात्र वरणाच्यावरील पाणी, डाळ अजीबात नको
काही विशेष कारण?
  • Log in or register to post comments

अगदि

माझीही शॅम्पेन
Wed, 03/04/2015 - 21:43 नवीन
अगदि +१ चांगला लेख आहे पण प्रोटीन्स कुठून मिळणार ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Wed, 03/04/2015 - 21:26 नवीन
या उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद. मी गेल्या दिड महिन्यापासून आहारातील साखरेचा समावेश १००% थांबवला आहे. चहा व कॉफीमध्ये साखर घालणे दोन वर्षांपूर्वीच थांबवले होते. वजनाचा फारसा प्रश्न नसला तरी ठरवून कमी करण्याची वेळ न येऊ देणे हे एक उद्दीष्ट आहे. दुसरे महत्वाचे उद्दीष्ट म्हणजे कॉलेस्टरॉलचे प्रमाण कमी करणे. त्यासाठी बेकरी उत्पादने व तळलेले पदार्थ खाणे जवळ जवळ बंद केले आहे (सदर पदार्थ महिन्यातून एखाद्यावेळेस थोडेसे खातो). नियमीत व्यायाम करणे शक्य नसल्याने हापिसातील जिन्याचा वापर ५ मजले चढून जाण्यासाठी नियमीतपणे करतोय. साखरेबाबत असे मार्गदर्शन मिळाले आहे की, कृत्रिम साखर शरीराला अजिबात आवश्यक नसते. शरीराला ग्लुकोज हवे असते जे शरीर आपल्या आहारातील इतर पदार्थांपासून बनवते अन फळांमधील नैसर्गिक ग्लुकोज शरीराला उपयुक्त असते. ज्यांना गोड पदार्थ खाणे थांबवणे अवघड आहे पण गरजेचेही आहे ते साखरेऐवजी शुभ्र न केलेल्या गुळाचा वापर करू शकतात. टीप: मी या बाबतीतला कुठल्याही अंगाने तज्ञ नाही. माहिती म्हणून मी करत असलेल्या प्रयोगांबाबत लिहिले आहे.
  • Log in or register to post comments

तुम्हाला मधुमेह वैगेरेचा

संदीप डांगे
Wed, 03/04/2015 - 23:27 नवीन
तुम्हाला मधुमेह वैगेरेचा त्रास नसेल तर दिर्घकाळासाठी साखर अजिबात वर्ज्य करणे जरा चुकीचे वाटते. इतर अन्नघटकांतून मिळणारी साखर ही शरीराची तातडीची गरज भागवण्यास असमर्थ ठरते. मेंदूला जाणार्‍या रक्तात योग्य प्रमाणात साखर नसेल तर घेरी येणे, अस्वस्थ वाटणे असे प्रकार घडू शकतात आणि त्याचा दुरगामी परिणाम होऊ शकतो. त्यामुळे साखर तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बंद केली असेल तर ठिक आहे, अन्यथा आधी सल्ला घ्या. स्वत:च्या आगाऊपणाने केलेले साखरेचे प्रयोग माझ्या अंगलट आले होते म्हणून अनुभवी सल्ला. बाकी रोजच्या आहारात कृत्रिम साखर २ चमचे पुरेसे. पाश्चात्त्य वैद्यांनी साखरेला बदनाम करण्याचे कारण त्यांच्या आहारात (फास्ट्फूड, केक्स, शितपेये) तिचा बेसुमार वापर. तेवढी काही साखर असलेले आपण भारतीय खात नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Wed, 03/04/2015 - 23:39 नवीन
सुदैवाने मधुमेहाचा त्रास नाहीये. साखर पूर्ण बंद केल्यावर पहिले दोन तीन दिवस जरा वेगळे वाटले त्यानंतर शरीराला सवय झाली. आठवड्यातून पाच दिवस हापिसातल्या दुपारच्या जेवणात भरपूर फळे खात असतो. त्यातुनही ग्लुकोजचा पुरवठा होतोच. शीतपेये वगैरेंचे सेवन वर्षातून एकदोनदा करत असेन. अर्थात हे प्रयोग म्हणूनच आहे. काही महिन्यांनी वैद्यकिय तपासण्या करणार आहे तेव्हा डॉक्टरांबरोबर चर्चा करीनच. तसेच क्वचित एखादे वेळेस साखरेचे पदार्थही खाणार आहेच जसे हापिसात कुणी स्वहस्ते बनवून आणलेला केक किंवा गोड पदार्थ खाण्याची संधी असेल तेव्हा. तुमचा अनुभव लिहिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

हम्म.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 03/04/2015 - 21:36 नवीन
छान. पण, नुसत्या गव्हाच्या एका फुलक्यावर आणि दोन फुलक्यावर आपलं जमु शकत नाही. मला तर वेड लागल्यासारखंच होईल. भुक खुप हावरटासारखी असते. आवर आवर म्हटलं तरी उरकत नाही. डॉक्टर साहेब, सतत पोट भरल्याचा फिल आला पाहिजे, असं काही आहे का ? पण, मी अनुभवलंय नियमित फिरणं आणि खेळ (ब्याडमिंटन) याने तुम्ही सुडौल होऊ शकता. (पोटाचा घेर कमी होत नाही) - दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मला तर वेड लागल्यासारखंच होईल

जडभरत
गुरुवार, 07/23/2015 - 13:14 नवीन
मला तर वेड लागल्यासारखंच होईल. भुक खुप हावरटासारखी असते. आवर आवर म्हटलं तरी उरकत नाही. डॉक्टर साहेब, सतत पोट भरल्याचा फिल आला पाहिजे, असं काही आहे का ?
खूप मजेशीर प्रतिसाद आहे. बराच वेळ हसलो. लेख पण सोपा व माहितीपूर्ण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान. रुग्णालयासाठी शुभेच्छा.

अप्पा जोगळेकर
Wed, 03/04/2015 - 21:37 नवीन
छान. रुग्णालयासाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

"योग्य आहाराला योग्यं

मनीषा
Wed, 03/04/2015 - 22:28 नवीन
"योग्य आहाराला योग्यं व्यायामाची जोड दिल्यास ... " हे महत्वाचे . फक्तं आहार नियंत्रित करून अथवा कसली औषधे घेऊन वजन कमी होत नाही हे नक्की. उत्तम सल्ल्यासाठी आभार !
  • Log in or register to post comments

वर दिलेल्या प्रतिसादांतून

वेल्लाभट
Wed, 03/04/2015 - 22:42 नवीन
वर दिलेल्या प्रतिसादांतून अनेक ओळखीचे गैरसमज भेटले. ! :) छान !
  • Log in or register to post comments

आय आणि व्यय याची सांगड घालणे

सुबोध खरे
Wed, 03/04/2015 - 22:51 नवीन
आय आणि व्यय याची सांगड घालणे महत्त्वाचे आहे. एक कॅलरी म्हणजे एक कॅलरी. कशी आली आणि कशी गेली यापेक्षा खाल्लेल्या कॅलरी पेक्षा जाळलेल्या कॅलरी जास्त असतील तर वजन कमी होईल अन्यथा नाही. हे जर मूलतत्व विसरलात तर कितीही चांगला डॉक्टर किंवा आहार तज्ञ असेल तरी वजन कमी होणार नाही.
  • Log in or register to post comments

क्र. २ आणि ८ व व्यायामाचा

रेवती
Wed, 03/04/2015 - 22:51 नवीन
क्र. २ आणि ८ व व्यायामाचा सल्ला भयंकर आवडलेत. आभार.
  • Log in or register to post comments

शुगरफ्री ची जाहिरात नको......

आयुर्हित
Wed, 03/04/2015 - 22:52 नवीन
आधी शुगरफ्री किंवा तत्सम पदार्थामध्ये काय काय हानीकारक घटक आहत हे जाणून घ्या. Artificial Sweeteners:Sugar free but not risk free बाकी वरचा आहार म्हणजे फक्त (बेड रेस्ट सुचविलेल्या) आजारी माणसासाठी अत्यंत योग्य आहे.
  • Log in or register to post comments

अवघड आहे.

अर्धवटराव
Wed, 03/04/2015 - 22:59 नवीन
असा आहार घेणं आपल्याला (पक्षी मला स्वतःला) शक्य नाहि. त्यामुळे वजन कमि करण्याचा एक फॉर्म्युला वाया गेला म्हणायचा :( इतर डायेट प्लॅन्सच्या तुलनेत यात काहि विसंगती आहेत. बाकी सगळे लोक्स न्याहारी एकदम हेव्ही करायला सांगतात आणि रात्रिचे जेवण दुपारच्या जेवणापेक्षा बरेच कमि. शिवार मोड आलेलं कडधान्य आणि प्रोटीन्सचा भरण अधिक असतो त्यात.
  • Log in or register to post comments

प्रथिनांचे प्रमाण अत्यंत कमी आहे

आजानुकर्ण
गुरुवार, 03/05/2015 - 01:56 नवीन
वजन कमी करणारा आहार हा आरोग्यदायी असतोच असे नाही. तुमच्या आहारसुचवणीत प्रथिनांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. जी थोडीफार प्रथिने डाळींमधून मिळतील तिचेही फक्त पाणी प्यावे असे सांगितले आहे. असा आहार दीर्घकालीन वजननियंत्रणासाठी फारसा उपयोगी ठरेल असे वाटत नाही. १ चमचा साजूक तूप वगळता इतर स्निग्ध पदार्थ नाहीत त्यामुळे निव्वळ पिष्टमय पदार्थ खाऊन भुकेले पोट कितपत शांत राहील याचीही शंका वाटते. इतके कमी स्निग्ध पदार्थसेवन शरीराला निश्चितच हानीकारक आहे. बाकी शेंगदाणे, खोबरे, बदाम (वगैरे सुकामेवा) यांचा अजिबात अंतर्भाव नाही हेही खटकते आहे.
  • Log in or register to post comments

+१

नगरीनिरंजन
गुरुवार, 03/05/2015 - 04:57 नवीन
वजन कमी म्हणजे वजन काट्यावर आकडा कमी दिसला पाहिजे एवढ्याच उद्देशाने 'डिझाईन' केलेला आहार दिसतोय हा. याने वजन १०-१२ किलो झपाट्याने कमी होईल पण पुन्हा नेहमीचे जेवण चालू केले की उसळी मारुन पहिले पाढे पंचावन्न. त्यापेक्षा दिवसातून चार-पाच वेळा पण भुकेपेक्षा कमी खाणे आणि व्यायाम करणे हा सल्ला मला पटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आजानुकर्ण

बरोबर.......

चौकटराजा
गुरुवार, 03/05/2015 - 08:52 नवीन
त्यापेक्षा दिवसातून चार-पाच वेळा पण भुकेपेक्षा कमी खाणे आणि व्यायाम करणे हा सल्ला मला पटतो. माझे ही असेच मत आहे. पण व्यायामास वेळ मिळत नाही ही सबब बरी नव्हे. त्यासाठी पहाटे पाच वाजता उठले पाहिजे. वजन वाढणे हे अनेक बाबींवर अवलंबून आहे. जसे मानसिक ताण, व्यायामाचा अभाव , अतिगोड पदार्थ व फळे यांचे सेवन, अनुवांशिकता, काही आजार उदा. थायरॉईड चे विकार , रजोनिवृती , पुरूष त्यात भारतीय पुरूष असणे ई.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+१...

स्वप्नांची राणी
गुरुवार, 03/05/2015 - 08:56 नवीन
+१... या आहारात प्रोटीन्स जवळ जवळ नाहितच. वजन नक्कीच कमी होईल, त्याबरोबरच स्टॅमिना आणि ईम्युनिटी पण. प्रोटीन्स शरीराच्या चलन-वलनासाठी अत्यंत आवश्यक घटक आहे. हीमोग्लोबीन हे पण एक महत्त्वाचे प्रोटीनच आहे. यशिवाय रोगप्रतिकारशक्ती असे ज्याला म्हटले जाते त्या अन्टीबॉडीज ही प्रोटिन्सनेच बन्लेल्या असतात. चयापचय, पचनसंस्था आणी रक्तशर्करेची रक्तातील घनता या सगळ्या साठी प्रथिनं हा आवश्यक घटक असतो. प्रथिनं ब्लड क्लॉटिंग साठीही आवश्यक असतात. सातत्याने असा लो प्रोटिन आहार घेतला तर बी वर्गातील विटामीन्सची कमतरता निर्माण होते. आणि या सगळ्याचा परिणाम ईव्हेन्चुअली शरिराच्या ईम्युन सिस्टीम वर होतो. आयुर्वेद रुग्णालयासाठी शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

आयुर्वेद रुग्णालयासाठी

नगरीनिरंजन
Fri, 03/06/2015 - 18:41 नवीन
आयुर्वेद रुग्णालयासाठी शुभेच्छा
हा खवचटपणा इथे अनुचित आहे. शुभेच्छा द्यायच्या असतील तर त्या धाग्यावर द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

मी कुठे काय करायचं हे मला आणी

स्वप्नांची राणी
Sat, 03/07/2015 - 15:11 नवीन
मी कुठे काय करायचं हे मला आणी संम ला ठरवू द्या...धन्यवाद!! आपलाही प्रतिसाद तसा निरर्थकच आहे ह्या धाग्यावर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

धन्यवाद!

नगरीनिरंजन
Sat, 03/07/2015 - 15:27 नवीन
धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

+१

कपिलमुनी
Tue, 03/10/2015 - 14:36 नवीन
हा खवचटपणा इथे अनुचित आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नगरीनिरंजन

+१

प्राची अश्विनी
Tue, 03/10/2015 - 13:19 नवीन
+१ आयुर्वेद रुग्णालयासाठी शुभेच्छा!! +१११११११११११११११अगदी सहमत!:):):):)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वप्नांची राणी

बाबा ,

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 03/05/2015 - 08:12 नवीन
बाबा , अहो मी मीठ लैच कमी खातो (इतके की पंधरवड़ा अगोदर हातपाय दुखाया लागले म्हणुन डॉक्टर कड़े गेलो तर म्हणाला मीठ खा बीपी लो झाले आहे) चिवड़ा लाडवं असले आइटम बी खात नाही च्या बी ग्रीन टी तो बी बिना एक कण साखर घालता तरीही वजन काही ८० च्या खाली येना !! मटन पण महिन्यात एक टाइम होते फ़क्त
  • Log in or register to post comments

ओ लष्करवालं कशापै चिंता करु

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 03/05/2015 - 08:36 नवीन
ओ लष्करवालं कशापै चिंता करु र्‍हायले? लष्करवाल्या बाप्यानी कसं ध्ष्टपुष्ट पैजे...मी स्वतः कितीही आदळआपट केली तरी ८० च्या खाली येउ शकत नाही. सांगाडा जड आहे त्याला काय करणार... =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कैलासवासी सोन्याबापु

कॅजॅ स्पैरो खरंय पण मेंनलॅंड

कैलासवासी सोन्याबापु
गुरुवार, 03/05/2015 - 10:07 नवीन
कॅजॅ स्पैरो खरंय पण मेंनलॅंड ड्यूटी मधे जास्त सुटलो तर फुड वर डोंगरत लै त्रास व्हनार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कॅप्टन जॅक स्पॅरो

ब्राउन राइस

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 03/05/2015 - 08:30 नवीन
वर लिहायचे राहिले. एक महिन्यापासून मी नेहमीच्या तांदळापासून बनवलेल्या भाताऐवजी ब्राउन राइस वापरून बनवलेला भात खात आहे.
  • Log in or register to post comments

माझ्याम्ते आपले आईवडील साधारण

पिलीयन रायडर
गुरुवार, 03/05/2015 - 11:18 नवीन
माझ्याम्ते आपले आईवडील साधारण पणे जे आणि ज्या ज्या वेळेला खात होते ते खावं.. सकाळी नाश्ता, दुपारी पोळी-भाजी-वरण-भात-कोशिंबीर-ताक वगैरे.. संध्याकाळी काहीतरी उगाच.. आणि रात्री खिचडी वगैरे हलकं जेवण.. आई अध्ये मध्ये इडली-डोसा, अळुवड्या, कधीतरी गोड बासुंदी, पुरण वगैरे करायची.. भेळ वगैरे पण घरीच व्हायची शक्यतो.. सगळंच पोटात जात होतं.. क्वचित बाहेर खायचो.. दणकुन खेळायचो.. आणि आईवडीलांनी कधी रॅटरेस मध्ये पळावलं नाही पण शिस्तीत अभ्यास करायची सवय लावली.. त्यानंतर जे मिळेल त्यात आनंदी! साधारण हेच आपण करु शकलो (घरचं खाणं - व्यायाम - समाधानी आयुष्य) तर वजन आटोक्यात रहायला हरकत नाही असे मला वाटते. मी जेवताना इतका विचार करुन.. चिकित्सा करुन.. म्हणजे थोडक्यात त्यातला आनंद मारुन खाऊ नाही शकत.. तसंही घरंच खाऊन कसलाच त्रास होत नसतो हे माझं ठाम मत आहे.. त्यामुळे डाएट वगैरेच्या फंदात सुखी माणसाने पडू नये..
  • Log in or register to post comments

सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद.

बाबा पाटील
गुरुवार, 03/05/2015 - 11:32 नवीन
तुलनात्मदृष्ट्या सद्य परिस्थीत स्व आरोग्याविषयी जागरुकता वाढिस लागली आहे. वरील आहार हा फक्त सुरुवातीच्या काळास वजन कंट्रोल करण्यासाठी आहे,जेंव्हा पोटाचा गणपती झाला असेल तेंव्हाच. एकदा पहिल्या दोन महिण्यात वजन ८-१० किलोने कमी झाले तुमच्या तुमच्या वैद्यांकडुन अथवा आहारच्या डॉक्टरांकडुन तुमच्या शरिरास पोषक आहार विचारकरुन घ्यावा. काही आजारांमुळे भारवृद्धी असेल तर मात्र वैद्यकिय सल्ल्याशिवाय आहारात बदल करु नयेत.
  • Log in or register to post comments

पोटाचा गणपती

मराठी_माणूस
गुरुवार, 03/05/2015 - 12:26 नवीन
पोटाचा गणपती
ह्या बाबतीत एक असे ऐकले आहे की पोटाच्या स्नायुंचे टोनींग (आतड्यांना धरुन ठेवण्यांची क्षमता) बिघडले असेल तर पोट सुटलेले दिसते. ह्यावर काही उपाय आहे का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाबा पाटील

पहिल्याने आडवे झोपून पहा कि

सुबोध खरे
गुरुवार, 03/05/2015 - 12:52 नवीन
पहिल्याने आडवे झोपून पहा कि पोट गरगरीत आहे( चरबीने भरलेले) कि सुरकुतलेले (बाळंतीणी सारखे) आणी आत जाते आहे. पहिली परिस्थिती असेल तर पळवाट शोधण्यापेक्षा ताबडतोब आहारावर नियंत्रण आणी व्यायामाला सुरुवात करा. दुसरी परिस्थिती असेल तर पोटाच्या व्यायामाला सुरुवात करा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठी_माणूस

डॉक्टरसाहेब, आडवे म्हणजे

संदीप डांगे
गुरुवार, 03/05/2015 - 13:10 नवीन
डॉक्टरसाहेब, आडवे म्हणजे पाठीवर उताणे झोपून ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

होय साहेब

सुबोध खरे
गुरुवार, 03/05/2015 - 13:15 नवीन
होय साहेब
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संदीप डांगे

त्यातून कुणाला शंका असेल तर

सुबोध खरे
गुरुवार, 03/05/2015 - 13:17 नवीन
त्यातून कुणाला शंका असेल तर माझ्या दवाखान्यात या पोटावरील चरबीच्या थराची जाडी सोनोग्राफीने मोजून मिळेल. (ती सुद्धा मिपाकरांना फुकट). हि जाहिरात नाही
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

अरेवा. असे पण अस्ते का? ऐकावे

संदीप डांगे
गुरुवार, 03/05/2015 - 15:18 नवीन
अरेवा. असे पण अस्ते का? ऐकावे ते नवलच. ऑफरसाठी धन्यवाद. भेटू जरूर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

पोटाचा प्रश्न सुटला कि

सुबोध खरे
गुरुवार, 03/05/2015 - 12:20 नवीन
पोटाचा प्रश्न सुटला कि "सुटलेल्या" पोटाचा प्रश्न चालू होतो. आमच्या माहितीतील एका आहारतज्ञाना एका विशाल महिलेने प्रश्न विचारला होता कि डॉक्टर तुम्ही हा सगळा डाएट लिहून दिला आहे हा जेवण अगोदर घ्यायचा कि जेवणानंतर?
  • Log in or register to post comments

सहमत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 03/05/2015 - 13:42 नवीन
>>>> पोटाचा प्रश्न सुटला कि "सुटलेल्या" पोटाचा प्रश्न चालू होतो. हो ना. मला तर मळलेल्या पिठाच्या उंड्यासारखं दोन्ही साईडने हातात चरबीचा उंडा धरता येतो. :( डॉक्टर साहेब, काही तरी चांगला उपाय सुचवाच. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

चालते व्हा

कपिलमुनी
गुरुवार, 03/05/2015 - 14:23 नवीन
भरपूर चाला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्या माहितीतील एका

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 03/05/2015 - 15:32 नवीन
आमच्या माहितीतील एका आहारतज्ञाना एका विशाल महिलेने प्रश्न विचारला होता कि डॉक्टर तुम्ही हा सगळा डाएट लिहून दिला आहे हा जेवण अगोदर घ्यायचा कि जेवणानंतर?
:))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

आमच्या माहितीतील एका

रुस्तम
गुरुवार, 03/05/2015 - 15:34 नवीन
आमच्या माहितीतील एका आहारतज्ञाना एका विशाल महिलेने प्रश्न विचारला होता कि डॉक्टर तुम्ही हा सगळा डाएट लिहून दिला आहे हा जेवण अगोदर घ्यायचा कि जेवणानंतर?
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

बिरूटे साहेब

मनिमौ
गुरुवार, 03/05/2015 - 14:37 नवीन
पोटाचा घेर कमी करण्यासाठी पोहणं हा अतिशय उत्तम व्यायाम आहे.
  • Log in or register to post comments

कै च्या कै...

ब़जरबट्टू
गुरुवार, 03/05/2015 - 16:01 नवीन
असे असते तर सगळे मासे "सुक्कट बोंबिल" असते पाण्यातून काढल्यावर... व देवमास्याने माणसाची शिकार केली असती चरबी मिळावी म्हणून.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनिमौ

वरच्या आहार तक्त्यात भाजी

हसरी
गुरुवार, 03/05/2015 - 15:24 नवीन
वरच्या आहार तक्त्यात भाजी फक्त एक नैवेद्याची वाटी भरून आणि वरणाचे फक्त पाणीच हे काही झेपले नाही. म्हणजे जे पोटात जायला पाहिजे ते जातच नाहीये.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा