Skip to main content

आईटी(सर्विस) क्षेत्रामधील सर्वसाधारण अभियंते

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 19/02/2015 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
अ : काय हिरो , काय काय . जोब कसा चालू आहे ब . काय नाय निवांत . जोब मस्त . सध्या टीम लीड झालो आहे त्यामुळे फक्त दुसर्याचे काम चेक करतो . फारसे टेक्निअल काम करत नाही हल्ली अ : मजा आहे कि मग .आता अजून ३-४ वर्षात मेनेजर झाल्यावर मग तर पूर्ण इमेल आणि एक्सेल आणि फोन एवडेच वापरावे लागेल ब . हो ना यार . मेनेज्मेण्ट मध्ये गेलेले बरे असतंय रे वरचे अ आणि ब ६-९ वर्षे अनुभव असलेले आईटी(सर्विस) क्षेत्रामध्ये एक सर्वसाधारण अभियंते.सर्वसाधारण म्हणण्याचे म्हणजे प्रत्तेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे , स्वत:चे काम आवडत असणारे , नवीन संकल्पना पुढे आणणारे असे लोक असतातच पण हे लोक सर्व साधारण या गटात येत नाहीत तर अपवाद या गटात येतात . त्यामुळे खालील लिखाण/प्रश्न हे बहुसंख्य सर्वसाधारण लोकांना डोळ्यासमोर धरून पडलेले आहेत तर सांगायचा मुद्दा हा कि आईटी क्षेत्रामध्ये माणूस फ्रेशर म्हणून लागला कि सर्वसाधारणपणे ५ वर्षात त्याला आपले प्रोमोशन झाले नाही तर तर अपराधी असल्याची भावना येते आणि लवकरात लवकर मेनेजर बनून त्याला टेक्निअल काम बंद करायचे असते . पण हे असे अजून किती वर्षे चालणार ? १. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ? आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ? २.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ? साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ? ३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ? सध्या तरी आईटी मधला एवेरेज वय साधारण ३० च्या आसपास असेल असे मानले तरी यातले सगळेच लोकांना काही दर वर्षी ५-२० टक्के पगार वाढ , दर ३-४ वर्षांनी प्रोमोशन मिळणार नाही . तर अजून २०-३० वर्षांनी आईटी चे चित्र कसे असेल ? आईटी मधील लोकांना रिटायर होने नशिबात असेल का ? ४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ? तुम्हाला काय वाटते ?

वाचने 38173
प्रतिक्रिया 166

प्रतिक्रिया

In reply to by खटपट्या

सहमत ! गोष्टी आता १५-२० वर्षांनी बदलत नाहीत. बद्लण्याचा काळ आता ५-६ वर येऊन थांबलाय. ९०- २००० च्या दशकात आयटी क्षेत्र बाल्यावस्थेत होतं , तिकडून इकडे बिझिनेस आणणारे उत्तर अमेरिकेतले लोकं पण ऑफ शोअर च्या खाचा खो चा शिकत होते. आता फ्रेशर्सना आणि मिड लेव्हलच्या लोकांना मिळणारा पगार बघत त्यांच्या गुंतवणुकीचा परतावा कमी झालाय. हेच लोकं खरे डिलीव्हरेबल्स देतात बाकी मॅनेजमेंट आणि एच आर वगैरे खरं तर ओव्हर हेडच असतात. हे सगळं बघता भारतामध्ये पुर्ण प्रॉ डक्ट तयार करणं हे व्ही. सी. ज ना जास्त किफायतशीर वाटतंय कारण भारतात कौशल्य आहे आणि आता इंडस्ट्री अगदी योग्य प्रगल्भ स्थितीवर आहे जिथे ते एक पुर्ण प्रॉडक्ट बनवू शकतील. आत्ता एक तर स्वतः एखादी प्रॉडक्ट ची कल्पना तयार ठेवोन त्यासाठी गुंतवणूक्दार शोधणे अथवा अशा एखाद्या कंपनी मध्ये काम करणे हे जास्त चांगलं आहे. राहता राहिली स्किल सेट अपडेट करण्याची गोष्ट. एक तर फकत आमची इंडस्ट्री नाही जिथे हे करावं लागतं. वैद्यकीय क्षेत्रातले लोक हे सातत्याने करत असतात. ज्या त्या व्यवसायाची ती गरज आहे. दुसरी गोष्ट अशी की नवीन टेक्नोलॉजी आली म्हणून जुनं लगेच जात नाही. अनेकदा नव्या कंपन्या ज्यांना बूटस्ट्रॅपिंग करून कंपनी चालू करावी लागली आहे ते एक जनरेशन जुन्या टेक्नॉलोजी नी सुरु करतात आणि ग्राहक मिळाले की रीव्हॅम्प करतात कारण बर्याचदा प्रॉडक्ट परवडणार्या लोकांना घेऊन आणि परव डणार्‍या टेक्नॉलॉजी ने आधी बाजारात आणावं लागतं. साधारण हेल्थ केअर ,ई लर्निंग, ई रेक्रुटींग (एच आर एम एस ) वाले आधी प्रॉडक्ट बाजारात आणण्याला महत्त्व देतात कारण त्यांचा ग्राहक जो हे रोज च्या रोज वापरणार असतो तो मध्यम ते उत्तम रित्या एक्सेल वर प्रभुत्त्व असणार ग्रूप असतो आणि त्यांना पडद्यामागच्या टेक्नॉलॉजीपेक्षा किती सहजतेने हे वापरता येतंय याची जास्त फिकीर असते.

In reply to by स्रुजा

मॅनेजमेंट आणि एच आर वगैरे खरं तर ओव्हर हेडच असतात. वरील वाक्याने ड्वाळे पाणावले. अशा बेसलेस स्टेटमेंटस मुळे खरे तर हसावे की रडावे तेच कळले नाही त्यामुळे डोळ्यात पाणी नक्की कशाने आले हेच कळलं नाही.

In reply to by योगी९००

कसं काय बेसलेस ? मॅनेजर च्या पो झिशन ला घेतलं तरी हॅन्ड्स ऑन आता सगळी क डे जरुरी झालंय. नुसता मॅनेजमेंट चा अनुभव असलेल्या अनेकांना नोकरि बदलताना मर्यादा येतात. हल्ली आय सी ( Individual contributor) चं महत्त्व अतोनात वाढलंय. जे मॅनेजर्स ओव्हरहेड नसतात ते हॅन्ड्स ऑन करतात म्हणून नसतात . आणि मी बरेचदा ओव्हर हेड असतात अशा अर्थाने ते वाकय टाकलं आहे तुमचे डोळे पाणवले तर पुसा.

In reply to by स्रुजा

पण मॅनेजमेंट आणि HR यांचे काम काय असते याची पुर्ण कल्पना असल्याने मला वाद घालायची इच्छा नाही. बाकी हॅन्डस ऑन म्ह्णजे नक्की काय हे जरा विस्तार करून सांगू शकाल काय?

In reply to by योगी९००

त्यांना काम नसते असं माझं पण मत नाहीये. पण पुर्ण प्रोजे़क्ट/ प्रॉड्क्ट ची डिलिव्हरी लक्षात घेता खरे डिलीव्हरेबल्स ते जे कोड पूर्ण करून अंतिम प्रॉडक्ट ग्राहकाला विकण्याच्या स्थिती पर्यंत आणतात. आता हे होण्यासाठी जी पोषक परिस्थिती लागते ऑफ शोअर मध्ये ती एच आ र आणि इतर सगळे घटक पुरवतात म्हणजे एच आर च नसली तर लोकं भरती करणं वेळखाऊ होणार , पर्यायाने अंतिम निकाल उशिरा लागणार वगैरे. हे सगळं मान्यच आहे. पण ते सगळं पुरक आहे, मुख्य उद्देश्य ग्राहकाला माल देणं आहे. कुठलाही डेव्ह मॅनेजर अथवा टेस्टींग चा मॅनेजर यांना हल्ली टेक्निकल टच असेल आणि स्वतः कोडींग करायची किंवा ऑटोमेशन करायची तयारी असेल आणी तसा अनूभव असेल तर प्राधान्य देतात. माझा मुख्य भर हा सेर्व्हिस बेस्ड वर नसून प्रॉड्क्ट बेस्ड वर आहे. पण सर्व्हिस बेस्ड दोन कंपन्यांमधला माझा अनुभव देखील हाच आहे. एक तर खुद्द क्लायंटकडून मागणी असायची की मॅनेजर नी स्वतः प्रत्यक्ष काम करायला हवं , तशी तयारी आणि नजिकच्या काळात त्यांचा त्यात सराव असावा. चार वर्षांपुर्वी कोडींग केलं होतं या कारणापायी काही लोकं त्यांनी नाकारले होते या पोस्टसाठी. मॅनेजर कडून त्यांना मॅनेजमेंट अशी फक्त तांत्रिक अपेक्षित होती. लोकं मॅनेज करायला कुणी नको होतं. ४० पैकी १६ - २० तास तरी मॅनेजर कडून प्रत्यक्ष काम अपेक्षित होतं. आणि अशा अजून ३ टीम्स होत्या. आधी मॅनेजर म्हणजे लोकांकडून काम करून घेणे हा पण एक भाग असायचा कामाचा. हळूहळू तो कमी होतोय, काही ठिकाणी तो गेलाय. त्या जागी आता या लोकांनी काही डिलीव्हरीज देण्याची अपेक्षा वाढलीये. माझ्या इथल्या अनुभवावरून सांगते, मॅनेजर म्हणून माझी जबाबदारी टेस्टिंग साठी वातावरण, प्रोसेसेस बनवणं , सगळ्या घटकांना ( डेव्ह , सपोर्ट, बिझिनेस टिम ई) त्या पाळण्याचं महत्त्व पटवणं आणि वेळेचा अंदाज देणं एवढीच प्रामुख्याने येते. पण याही इतकीच किंबहुना जास्त माझी जबाबदारी आय. सी. म्हणून प्रत्यक्ष टेस्टिंगची आहे. ऑटोमेशनची आहे. त्या अनुषंगाने मग स्कोप ठरवणं , तसे प्लान्स बनवणं या सगळ्या तांत्रिक बाबी त्यात येतात. हॅन्ड्स ऑन म्हणजे हे सांगायचं आहे. आता हे थोडं विस्कळीत झालंय कारण मराठी ईंग्रजी सगल्याची पार भेळ केलीये मी. पण भा पो झाल्या तरी पुष्कळ

In reply to by स्रुजा

हो आणि अजून एक राहिलं की हे सगळं मोठ्या कंपन्यां मध्ये सरसकट लागू नाहीये याची पण मला कल्पना आहे पण या सगळ्याचं (हॅन्ड्स ऑन वगैरे)लक्षणीय प्रमाण आहे आणि ते दखल घेण्याजोगं आहे.

In reply to by अत्रन्गि पाउस

आमच्या कंपनी मधे एकाने पीएमपी केले, आणि तो डिप्लोमा केलेल्या मॅनेजर ला रिपोर्ट करतो . मी सुद्धा एम टेक केलेले आहे आणि माझा मॅनेजर तोच डिप्लोमा होल्डर आहे . त्याने पीएमपी सर्टिफिकेशन साठी रियिमबर्समेंट मागितले तर सांगण्यात आले कि 'बाहेरच्या सर्टिफिकेशन' चे पैसे देत नाही म्हणून. मुद्दा हा कि इथे डिग्री ला कोणी विचारात नाही तीत सर्टिफिकेशन च काय ? ते तर काही काळा पुरते वॅलिड असतात , नंतर तुम्हाला परत अपीयर व्हाव लागत् अश्या ही काही एमेंसी कंपञीया आहेत ज्या पीएमपी सर्टिफिकेशन ला मनात नाही

In reply to by अत्रन्गि पाउस

pmp वगैरे भम्पक असेल मग तुमच्या मते
अतिशयच भंपक! - (आयटी हमाल) सोकाजी

In reply to by आदूबाळ

Project Manager Professional असं गूगल केल्यावर दिसलं. आता मी देखील आयटीत काम करतोय गेले ७ वर्ष. पण ही टर्म पहिल्यांदाच ऐकली आज. हपिसला जाताना रस्त्यातल्या बोर्डावर अनेक कंपन्यांच्या जाहिराती दिसतात. त्यातल्या निम्याहून अधिक टर्म्स मी कधी ऐकलेल्याही नसतात. त्यामुळे आपण आयटी मध्ये काम करतो का नक्की हा प्रश्न पडतो बर्‍याचदा. :D

In reply to by टवाळ कार्टा

माझ्या ऐकण्यात खरच ही टर्म आलेली नाही कधीही. मी एका प्रॉडक्ट कंपनीत काम करतो. बहुदा सर्वीस बेस्ड कंपनीतली टर्म असेल.

In reply to by टवाळ कार्टा

ह्म्म... पीएमपी म्हणजे काय ते आयटीवाल्यांना माहित असायला हवे ते ठीक, पण फ्लोअरवर काम करताना सुद्धा बाजुच्या लाइन मधे कोण बसतो ते सुद्धा कळत नाही. प्रत्येक आयटी टर्म / कोर्स हा माहित असायलाच हवा असे काही नाही. असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?

In reply to by अनुप ढेरे

Project Manager Professional हे फक्त आयटी साठी नाही कोणत्याही प्रकल्पीय व्यवस्थापनाशी संलग्न आहे ... ITIL prince२ वगैरे सारखे नाही..;)

In reply to by अत्रन्गि पाउस

हो, माझाही तसाच काहीसा समज आहे. माझ्या माहितीचे एक गृहस्थ अपस्ट्रीम ऑईल कंपनीत आहेत. तेही पीएम्पीचं बिरुद मिरवतात.

In reply to by अत्रन्गि पाउस

एका कंपनी मध्ये PMP असलेला manager २ वर्ष office मध्ये येताच नव्हता .. HR शी सेटिंग होती. पाठदुखीचे निमित करून घरून काम. आणि याचे काम काय तर रिपोर्ट बनवणे फक्त. ते पण हा स्वत न बनवता टीम लीड ला बनवायला सांगायचा. तेच नंतर वरती पाठवायचे. थोडक्यात फुकट पगार खात होता. सुट्ट्या कधीच पास न करणे हेच त्याचे काम. एक दिवस सर्व टीम ने ( ८ लोक ) एकदम राजीनामा फेकला. तेव्हा हायर management जागी झाली आणि त्याला कामावरून काढला.

In reply to by स्रुजा

>>आता फ्रेशर्सना आणि मिड लेव्हलच्या लोकांना मिळणारा पगार बघत त्यांच्या गुंतवणुकीचा परतावा कमी झालाय. हेच लोकं खरे डिलीव्हरेबल्स देतात बाकी मॅनेजमेंट आणि एच आर वगैरे खरं तर ओव्हर हेडच असतात. सत्तरच्या दशकातल्या कामगार नेत्याचे वाक्य वाटते आहे. :)

In reply to by नितिन थत्ते

हाहा, वाटतंय खरं तसं. म्हणायचा उद्देश हा की मुळात ऑफशोअर व्यवस्था बघता बघाता वाढली कारण कामं करायला भरपूर लोकं आणि अगदी १५- २० हजारात पण मिळत होती. आता आपल्याला चालेल का? क्लायंटला आधी वाटायचं ३००-४०० $ मध्ये काम होतंय. आता तसं होत नाही, आणि ते बरोबरच आहे. आलं का या दशकात वाक्य? :)

In reply to by स्रुजा

आलं का या दशकात वाक्य?
नै हो. मला वाटतं, त्यांचा मुख्य रोख तुमच्या दुसर्‍या वाक्यकडे होता'
हेच लोकं खरे डिलीव्हरेबल्स देतात बाकी मॅनेजमेंट आणि एच आर वगैरे खरं तर ओव्हर हेडच असतात
हे ते वाक्य.

In reply to by सुनील

कुठल्याही ... -हॉटेलात आचारी काय ते काम करतात आणि थोडेफार वेटर्स ..बाकी ओव्हरहेड -एयर लाईन मध्ये वैमानिक आणि क्र्यू काय ते काम करतात आणि थोडेफार लोडर्स ..बाकी ओव्हरहेड असे म्हटल्यासारखे वाटते ...

In reply to by खटपट्या

भडंगकाका या लिखाणावरून तुम्ही आयटी हमाल नाही आहात हे जाणवून येते. किंवा फारच नवशिके आहात. आयटी हे एक जेनेरीक टर्म आहे. मुळातआयटी सर्व्हिसेस आणि इंजिनीअरिंग सर्व्हिसेस यांची आपण का गल्लत करतो कोण जाणे. निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग ही फारच कमी दर्जाची कामे आहेत. फ्रेशर्स साठी एन्ट्री लेव्हल जॉब्ज म्हणाना. खरे तर आयटी सर्व्हिसेस देण्यासाठी ग्राहकांच्या अपेक्षा समजण्यासाठी योग्य अनुभव असलेले लोक गरजेचे असतात. तसे बनण्यासाठी वेळ जावा लागतो. तेवढा वेळ दिल्यानंतर अनुभवी व्यक्तीनी कोडिंग सारख्या प्राथमिक कामाकडून रीक्वायरमेंट अ‍ॅनालिसीस वगैरेसारख्या कामांकडे वळणे यात गैर ते काय. प्रोजेक्ट डिलीव्हर करणे हे काम नवशिक्या लोकानी करणे यामुळे काय होते याचा अनुभव घेवुन बर्‍याच कम्पन्यानी हात पोळून घेतलेले असतात.

In reply to by विजुभाऊ

निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग ही फारच कमी दर्जाची कामे आहेत. फ्रेशर्स साठी एन्ट्री लेव्हल जॉब्ज म्हणाना. खरे तर आयटी सर्व्हिसेस देण्यासाठी ग्राहकांच्या अपेक्षा समजण्यासाठी योग्य अनुभव असलेले लोक गरजेचे असतात. तसे बनण्यासाठी वेळ जावा लागतो. तेवढा वेळ दिल्यानंतर अनुभवी व्यक्तीनी कोडिंग सारख्या प्राथमिक कामाकडून रीक्वायरमेंट अ‍ॅनालिसीस वगैरेसारख्या कामांकडे वळणे यात गैर ते काय.
विजुभाऊ, मी अर्थ काढायला चुकत नसेन तर "निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग ही फारच कमी दर्जाची कामे आहेत." या वाक्याला असहमती तसेच तीव्र आक्षेप. हा भारतातला बर्याच ठिकाणी ऐकलेला दृष्टीकोन आहे आणि म्हणूनच बरेच पब्लिक टीएल, पीएल अशा मिळवायला बघते. हे खूपच चूक आहे. आपल्याकडे यातही एकप्रकारची जातिव्यवस्था तयार केली आहे आणि ती गोष्ट कोडींगची कलात्मकता आपल्याकडे कधी वाढू देत नाही असे वाटते. उदाहरण द्यायचं तर कोडींग म्हणजे "दगड तासणे". मग तुम्ही पाटा-वरवंटा बनवण्यातच धन्यता मानत असाल तर आजू-बाजूला तेच ओबड-धोबड दिसणार ना. तिच छिन्नी आणि हतोडा वापरून लेणी कोरली जातात, नवीन मूर्त्या, आश्चर्ये पण तयार केली जातात. बाकी "रीक्वायरमेंट अ‍ॅनालिसीस" पासून ते "टेस्टींग"च्या आधी स्वतः "टेस्ट" करुन कोड "टेस्टींग"ला देण्यापर्यंतचा भाग इतका पण कमी समजला जातो हे वाटले नव्हते. आपला देश या इंडस्ट्रीत इतका काळ असून पण गेला बाजार एकही नोंद घेण्याजोगे टूल (प्रोडक्ट) किंवा संशोधन जगाला देऊ शकला नाहीये त्याचे मूळ अशा विचारसरणीतच असावे कदाचित. (२५-३० वर्षे कोडर म्हणून काम केलेल्या सहकार्‍यांसोबत काम करण्यात अभिमान बाळगणारा)

In reply to by हाडक्या

"निव्वळ कोडिंग किंवा टेस्टिंग ही फारच कमी दर्जाची कामे आहेत." या वाक्याला असहमती तसेच तीव्र आक्षेप.
घ्या बॉ आक्षेप. आक्षेप घ्यायला कोणाचीच हरकत नसावी. तुमच्या भावनांचा आदर करतो. मी सुद्धा सध्या एका टेस्टिंग प्रोजेक्ट वर काम करतोय. माझे बरेचसे टीम मेट्स टेस्टिंग प्रोजेक्टचेच काम केलेले आहेत. त्यांच्या मते म्यान्यूअल टेस्टिंग हे काम सर्वोच्च आहे. मात्र कधीकधी इंटर्व्ह्यू घेताना आठ दहा वर्ष टेस्टिंगमधील अनुभव असलेल्याना सुद्धा फंक्षनल ज्ञान नसते हे जाणवते. त्यांचे बिझनेस प्रोसेस चे ज्ञान अत्यल्प असते. हे अवलोकन आहे. टेस्टिंग म्हणजे पूर्ण असे म्हणत नाही मात्र इम्प्लिमेम्टेशन प्रोजेक्ट च्या तुलनेत टेस्टिंग हे थोडे कमी दर्जाचेच आहेत. क्लायंटला सोल्यूशन हवे असते. नुसते टेस्टिंग करताना तुम्ही काही सोल्यूशन देत नसता . एखाद्या इंप्लिमेंटेशन प्रोजेक्ट मधे टेस्टिंग हा केवळ २ ते ३ % भाग असतो. इंप्लिमेंटेशन प्रोजेक्ट हे सम्पुर्ण सोल्युशन असते. टेस्टिंग हा स्वतन्त्र प्रोजेक्ट नसतो तो एखाद्या मुख्य प्रोजेक्टचा २% ते ३ % भाग असतो. अर्थात हे माझेच नव्हे तर अच्यूत गोडबोल्यांचेदेखील मत आहे.

In reply to by विजुभाऊ

टेस्टींगबद्दल इतकीही माहिती नाही की प्रतिवाद करु धजेन पण तुम्ही कोडींग बद्दलपण त्याबरोबर बोललात म्हणून जो प्रतिसाद दिलाय तो कोडींग संदर्भातच दिलाय. तुम्ही मात्र त्यावर बोलताना टेस्टींगबद्दल बोलताय, हे संत्री नि सफरचंद झाले. बाकी इथे कोणी टेस्टर असतील तर ते जास्त प्रकाश टाकतीलच.

In reply to by विजुभाऊ

कपाळावर हात मारलेली स्मायली/>कपाळावर हात मारलेली स्मायली/>कपाळावर हात मारलेली स्मायली/> विजूभौ, तुमचे दोन्ही प्रतिसाद अतिशय हुकलेले आहेत हे जाता जाता नम्रपणे नमूद करतो! - (आयटीतले कुठलेही काम हे दर्जेदारच असते ह्यावर विश्वास असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

सोत्री भौ कामाचा दर्जा आणि कामामुळे क्लायंटच्या बिझनेस मधे होणारी व्हॅल्यू अ‍ॅडिशन या अर्थाने दर्जेदार काम म्हणतोय. प्रतिसाद "हुक"लेले असतील कदाचित . पण मला सांगा मस्त उंचीवर आलेला बाउन्सर " हुक" केला नाहीतर तो बाउन्सरचा अपमान असतो म्हणे

In reply to by सोत्रि

आयटीतले कुठलेही काम हे दर्जेदारच असते ह्यावर विश्वास असलेला यापेक्षा कामाचा दर्जा ते काम करणार्यावर अवलंबून असतो हे जास्त बरोबर नाही का?

In reply to by विजुभाऊ

जौंद्या हो विजुभाऊ. प्रोग्रॅम लिहिणारे बरेच लोक (फंक्शनल) कन्सल्टंट होण्याची स्वप्नं पाहतात. असू द्या.

In reply to by हाडक्या

बाकी "रीक्वायरमेंट अ‍ॅनालिसीस" पासून ते "टेस्टींग"च्या आधी स्वतः "टेस्ट" करुन कोड "टेस्टींग"ला देण्यापर्यंतचा भाग इतका पण कमी समजला जातो हे वाटले नव्हते. आपला देश या इंडस्ट्रीत इतका काळ असून पण गेला बाजार एकही नोंद घेण्याजोगे टूल (प्रोडक्ट) किंवा संशोधन जगाला देऊ शकला नाहीये त्याचे मूळ अशा विचारसरणीतच असावे कदाचित.
हे अगदी खरे असावे. माझ्या सॉफ्ट्वेअर इंजिनीअर मेव्हण्याला प्रायोगिक तत्वावर मोबाइल अ‍ॅप विकसित करण्याबद्दल विचारले होते. तो टेस्टिंग करतो. मी ते करत नाही असे सांगून मोकळा. प्रयत्न करतो किंवा आव्हानात्मक आहे, करुन बघुया, मजा येइल वैगेरे काही नाही. कदाचित ह्याच विचारसरणीमुळे नविन काही करण्याची इच्छा होत नसावी.

In reply to by टवाळ कार्टा

कोडरच होता तो पूर्वाश्रमीचा... म्ह्णून विचारले होते. त्या क्षेत्रातली पदवी आहे त्याच्याकडे आणि करिअरची सुरुवात कोडर म्हणूनच केली होती. बाकी माझा एक मित्र जो एमेफए झालेला म्हणजे फाइन आर्टीस्ट आहे, तो बरेच कोडींग शिकून मला वेबसाइट बनवण्यासाठी मदत करतो. त्याने कधीच अरे मी आर्टीस्ट आहे कोडींग करू शकत नाही म्हणून सांगीतले नाही. माझा मूळ मुद्दा मनातल्या काहीतरी अचाट आणि वेगळे करून पाहण्याच्या इच्छाशक्तीबद्दलचा आहे. ती आपल्या अभियंत्यामध्ये (तेवढ्या प्रमाणात) दिसत नाही असे वाटते. आयायटी मध्ये जाण्यासाठी मरमर करणारी जन्ता फक्त गलेलठ्ठ पगार आणि निर्धास्त आयुष्य याच्यासाठीच उत्सुक असते. मूलभूत संशोधन करण्यामध्ये आयायटी चा जगात कितवा नंबर आहे हे सगळे जाणतातच. त्यामागे तुम्ही उल्लेखलेली विचारसरणीच आहे. पार रक्तात खोलवर रुजलेली. बादवे, कोडर आणी टेस्टर मधे असा काय फरक असतो आणि टेस्टर कोडिंग नाही करू शकत का ठरवले तर? म्हणजे पुरुष गरोदर राहू शकत नाही असे काही आहे का?

In reply to by संदीप डांगे

बादवे, कोडर आणी टेस्टर मधे असा काय फरक असतो आणि टेस्टर कोडिंग नाही करू शकत का ठरवले तर? म्हणजे पुरुष गरोदर राहू शकत नाही असे काही आहे का?
*unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *unknw* *DONT_KNOW* *UNKNOWN* :HZ: :hz: *smile* :-) :) +) =) :smile: *smile* :-) :) +) =) :smile: असे काही नसावे बहुतेक.

In reply to by संदीप डांगे

निर्धास्त आयुष्य ?? कुठल्या जगात आहात भौ ? आम्हाला कोणत्याही क्षणी लाथ बसण्याची शक्यता असते आणि भांडायला युनियन पण नसतात.

In reply to by कपिलमुनी

तुम्ही आयआयटीयन आहात का...? बाकी मूलभूत संशोधन व संकल्पना विकास यासाठी खरंच कुणी आयआयटीत जात असेल तर त्याला साष्टांग दंडवत. आजमितिस आयआयटी म्हणजे हमखास चांगला जॉब मिळवण्यासाठी प्रवेश घेण्याची जागा एवढीच जनमानसात प्रतिमा आहे.

In reply to by संदीप डांगे

आयायटी मध्ये जाण्यासाठी मरमर करणारी जन्ता फक्त गलेलठ्ठ पगार आणि निर्धास्त आयुष्य याच्यासाठीच उत्सुक असते.
ही टिप्पणी केल्याशिवाय बाकीचा प्रतिसाद सार्थ ठरत नाही.

In reply to by संदीप डांगे

डांगे साहेब, आपले विचार जुळतात. मला स्वतःला एक ओएस डेव्हलप करायची इच्छा आहे. काँप्लेक्स अल्गॉरिदम्स (उदा: स्वार्म लिहायचे आहेत) दुर्दैवाने वेळ मिळत नाही.

In reply to by काळा पहाड

खरंच करा हो... माझ्या शुभेच्छा. मागच्या महिन्यात एका जागतिक कंपनीच्या नाशिक इथल्या पोलाद पाईप्स कारखान्याच्या आयटी हेडशी कामानिमित्ताने ओळख झाली. त्यांचे वय ५० चे आसपास. पोलाद कारखान्यात रोज तसे काही काम नाही आयटीला. त्यामुळे फुकटचा पगार खातोय अशी भावना मनात होती म्हणे. काय करावे अशा विचारात असतांना त्यांना एक समस्या आढळली. त्यांच्याकडे उत्पादनसंबंधी शेकडो रिपोर्ट्स आणि तक्ते रोज तयार होत असतात. त्यांच्या योग्य समन्वय व व्यवस्थापनासाठी सॅप प्रणाली वापरली जाते. परंतु महिनाअखेर हे सगळे हजारो रिपोर्ट्स संकलित करून अंतिम प्रिंटेबल रिपोर्ट बनवायला सॅप ऑपरेटरला ४ दिवस लागायचे. त्या प्रणालीत ह्यांना हवे तसे काहीतरी नसावे. म्हणून या उच्चपदस्थ आयटी हेड ने सहा महिने स्वतः खपून कंपनीत कुणालाही सहज वापरता येइल असा एमएस एक्सेल चा प्रोग्राम लिहिला. फक्त सगळ्या फाईल्स असलेल्या फोल्डरमधे जायचे आणि ctrl+M दाबायचा. हा M त्यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून ठेवला म्हणे. तर त्या फोल्डर मधे असलेल्या फाईल्स आधिच निर्धारित केलेल्या फॉरमॅटमधे आपोआप अक्षरशः काही मिनिटांत तयार होऊन अंतिम रिपोर्ट हातात मिळतो. चार दिवसांचे कंटाळवाणे हाताने फार लक्ष देऊन करायचे काम चार तासांवर आणले, कंपनीचे पर्यायाने देशाचेही हजारो तास वाचवले. तेही कुणालाही वापरता येईल असे, म्हणजे ऑपरेटर सुट्टीवर असला तर थांबायला नको. तेही कुणीही न सांगता स्वतःहून कंपनीसाठी केले. तेही त्या वयात आणि परिस्थितीत जिथे नविन आव्हाने घ्यायला, पुरी करायला मन तयार नसते. हे सर्वच वा़खाणण्यासारखे आहे. कंपनीने त्यांना ५०% पगारवाढ आणि इतर सोयी पण तत्काळ लागू केल्या. आता त्यांना हा प्रोग्राम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकवायचा आहे. उद्देश हा की गरिब होतकरू मुलांची ह्या निमित्ताने काही पोटा-पाण्याची सोय होईल. अशी उदाहरणे पाहीली की हुरूप येतो. (मी तिथे फक्त त्या प्रोग्रामचे प्रात्यक्षिक पाहिले. सॅप प्रणाली बद्दल अजिबात माहीती नाही. त्यामुळे... )

In reply to by संदीप डांगे

फक्त सगळ्या फाईल्स असलेल्या फोल्डरमधे जायचे आणि ctrl+M दाबायचा. हा M त्यांच्या नावाच्या आद्याक्षरावरून ठेवला म्हणे. तर त्या फोल्डर मधे असलेल्या फाईल्स आधिच निर्धारित केलेल्या फॉरमॅटमधे आपोआप अक्षरशः काही मिनिटांत तयार होऊन अंतिम रिपोर्ट हातात मिळतो
त्यासाठी मॅक्रो लिहिला तर ते सहज होइल.एक्सेल फाईल मधे मॅक्रो रन करता येतो. सॅप ऑपरेटरला मॅक्रो येत असेल असे नाही. सॅप वापरणारा आयटी एक्स्पर्ट असेलच असे नाही. मी सध्या असाच एक एक्सेल मधे मॅक्रो प्रोग्राम वापरतो. त्यात खूप अवघड असे काही नाही

In reply to by विजुभाऊ

तेच म्हटले मी विजू भाऊ, मी काही सॉफ्टवेअर इंजिनीअर नाही त्यामुळे अवघड किंवा सोपे ह्यावर भाष्य करू शकत नाही. त्यांच्या विशिष्ट समस्यांवर त्यांनी तो उपाय स्वतः शोधला. त्यांना हव्या असलेल्या रिपोर्ट्सची अगडबंब संख्या, गुंतागुंत आणि वेळेचा अपव्यय बघितला. त्यामुळे त्यांचे काम कौतुकास्पद वाटले. दुसर्‍या कोणी तेच काम ऑउट्सोर्स करून वर कमिशन खाल्ले असते. आणि त्यात त्यांना विचारणारे कुणी नाही.

मला वाटते भारतीय सॉफ्टवेयर उद्योग सुद्धा उत्क्रांत होईल, आधी फ़क्त कोड बेस्ड आउटसोर्सिंग असणारा हा व्यवसाय होता, इंफोसिस फिनाकल घेऊन आले तेव्हा पासुन बहुदा "प्रोडक्ट" बेस्ड सॉफ्टवेयर डेवलपमेंट सुरु झाली, आजमितिस भारताचा सॉफ्टवेयर धंदा हा "कोड updating" अन कोड एनहांसमेंट चा होता तो आता ओरिजिनल सोर्स कोड्स मेकिंग पर्यंत जाईल असे वाटते (मी सरकारी नोकर आहे साधा, माझे अंदाज हे एका प्रतितयश सॉफ्टवेयर कंपनी मधे सीनियर सॉफ्ट असलेल्या एका मित्राच्या व्यु वर आधारले आहेत, ते बरोबर असावेतच असा आग्रह नाही जाणकार लोकांनी मला चुकलो तिथे दुरुस्त करावे)

१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ? आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ?
सर्व्हायवल ऑफ द फिटेस्ट. तुम्ही मॅनेजर झालात म्हणुन शिकायचं बंद थोडीचं होणारे? लागणारी कौशल्यं बदलतील. प्रत्यक्ष टेक्निकल कामामधे लागणार्‍या गोष्टींची त्या त्या मॅनेजरला माहिती हवीचं. मी एका दुसर्‍या धाग्यावर एच.आर. विषयी एक प्रतिसाद लिहिला होता तोचं इथे लिहितो. जर तुम्हाला तुमच्या हाताखालच्या किंवा सहकारी लोकांकडुन नेमकं काय अपेक्षित असेल आणि ते काम कसं करायचयं हेचं माहिती नसेल तर तो मॅनेजर एक चांगला "लीडर" होउचं शकतं नाही. आय.टी. विषयी माहिती नाही जास्तं पण बहुतेक हे सर्वचं क्षेत्रांना लागु पडावं.
२.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ? साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ?
णो आयडीया. आयटीवाला नसल्याने आयटी क्षेत्रामधल्या पगार सोडुन बाकीच्या गोष्टींची माहिती नाही =))
४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ?
स्पर्धा सगळ्याचं क्षेत्रात आहे. जर अजुन स्पर्धा निर्माण झाली तर आयटी हमालांचं पण शोषण चालु होईल ह्यात काही शंका नाही. कमी पगारात राबवुन घ्यायचा जो फंडा (तु नही तो कोई और काम करेगा इस्से कम दाम मे दृष्टीकोन) मेकॅनिकल इंडस्ट्रीमधे गेल्या काही वर्षांमधे सुरु झालाय तोचं तिकडेही सुरु होईल बहुधा.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

स्पर्धा सगळ्याचं क्षेत्रात आहे. जर अजुन स्पर्धा निर्माण झाली तर आयटी हमालांचं पण शोषण चालु होईल ह्यात काही शंका नाही
म्हणजे तुझ्यामते आयटी हमालांचं अजून शोषण चालू झालेले नाही??? :(

In reply to by टवाळ कार्टा

माहित नाही रे. माझे आयटीवाले मित्र तर कायम खुश असतात. कमीत कमी कटकटी तरी करतं नाहीत. सो आय्ड्या नै बॉ!!!

In reply to by टवाळ कार्टा

शोषण सध्या चालू नसले तरी आधी बर्याच सवलती होत्या त्या हळू हळू काही हॊउ लागतील . सध्या शनिवार - रविवार सुट्टी असते पण काही काळाने हे बंद होईल . कामाचे तास वाढतील ( ओफ़िशिअल ), हा आत काही लोकांना हे शोषण वाटू शकेल

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

१. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ? हे प्रत्येकालाच शक्य होइल असे नाही ! प्रत्येकाची परिस्थीती ही वेगळी असते आणि त्यामुळे एखाद्याला जी गोष्ट जमेल ती दुसर्‍याला देखील जमेल असे नाही. अनेक वर्ष सातत्याने ताणात / हायपर टेंशन मधे काम करण्याने तसेच शिफ्ट मधे काम केल्याने प्रचंड प्रमाणात मेमरी लॉस होतो,तसेच फिजीकल फिटनेस राहत नाही याचा सुद्धा परिणाम नविन टेक्नॉलॉजी शिकताना होतो. २.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ? अजुनही आपल्या इथे बरेचसे काम हे सपोर्ट चे होते. परंतु हे ठेवुन सुद्धा इतर अनेक क्षेत्र आहेत जिथे प्रचंड वाव आहे. हिंदूस्थानच्या आयटी इंडस्ट्रीला ४० पेक्षा जास्त वर्ष पूर्ण झाली आहेत आणि अ‍ॅव्हरेज आयटी हमालाचे वय हे ३५ आहे. त्यामुळे सध्याच्या काळात ही इंडस्ट्री वयस्य हमालांनी त्रस्त आहे ! कॉल सेंटर / बीपीओ नंतर आयटी इंडस्ट्रीत वयाचा क्रायटेरिया, जॉब बदलण्याचा ट्रेंड हा वेगवान आहे. येणारा काळ लक्षात घेता अनेक आयटी प्रोफेशनल्स वरती {ज्यांचे वय ३५ आणि अधिक आहे } पिंक स्लीपची तलवार चालवली जाईल असे वाटते ! यात मुख्यत्वे दोष कोणाचा ? कंपन्या त्यांच्या नफा पाहणारच ! परंतू त्यांनी नफा पाहताना त्यांच्या कंन्स्ल्टंट साठी काही विशेष मेहनत घेतली आहे असे फार कमी वेळा आणि ठराविक कंपन्यां मधेच हे झालेले दिसुन येइल. येणारा काळ हा डेटा मॅनेजमेंट / इन्फरमेशन मॅनेजमेंटचा असेल. ३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ? अत्यंत कठीण प्रश्न ! मुळात तो रिटायर होइ पर्यंत त्याला कंपनीने कामावर ठेवलेले असेल का ? हा मुख्य प्रश्न आहे ! ४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ? मुळात आपल्या कंपन्यांनी विदेशी कंपन्यांना तुम्ही द्याल त्या पेक्षा कमी किंमतीत कामे करुन देउ ही घाणेरडी सवय इतके वर्ष लावुन ठेवली आहे. आम्ही दर्जेदार काम करु आणि त्या दर्जानेच पेमेंट केले जावे आणि दर्जा उत्तम ठेवल्यास तुमचे काम हिरावुन घेण्याचा धोका नक्कीच कमी होइल. आयटी इंडस्ट्रीला त्यांचा माईंड सेट आधी बदलण्याची गरज आहे ! @ स्पॅरो मामा जर तुम्हाला तुमच्या हाताखालच्या किंवा सहकारी लोकांकडुन नेमकं काय अपेक्षित असेल आणि ते काम कसं करायचयं हेचं माहिती नसेल तर तो मॅनेजर एक चांगला "लीडर" होउचं शकतं नाही. आय.टी. विषयी माहिती नाही जास्तं पण बहुतेक हे सर्वचं क्षेत्रांना लागु पडावं. पूर्णपणे सहमत, परंतु उत्तम स्कील सेट असणार्‍याकडे उत्तम मॅनेजमेंट स्कील असेलच असे नाही हे देखील लक्षात ठेवायला हवे. आयटी हमालांचं पण शोषण चालु होईल ह्यात काही शंका नाही. कमी पगारात राबवुन घ्यायचा जो फंडा (तु नही तो कोई और काम करेगा इस्से कम दाम मे दृष्टीकोन) मेकॅनिकल इंडस्ट्रीमधे गेल्या काही वर्षांमधे सुरु झालाय तोचं तिकडेही सुरु होईल बहुधा. आयटी हमालांचे शोषण अनेक वर्ष चालु आहे, परंतु या क्षेत्राला "युनियचे" संरक्षण नाही ! कामाच्या ताणाने / स्वरुपाने आयटी प्रोफेशनल्सच्या पर्सनल लाईफची आणि हेल्थची पार वाट लागली आहे ! हाय ब्लड प्रशर, हार्ट प्रॉब्लेम, मेंटल डिसऑर्डर तसेच ड्र्ग्स अ‍ॅडिक्शन मधे अडकणे आहेच. आयटी प्रोफेशनल्सचा पगार अनेक जणांना जास्त वाटतो, परंतु ज्या पटीत ते कंपनीला कमवुन देत असतात त्या मानाने तो काहीच नसतो... निदान सध्याच्या काळात तरी हेच चित्र आहे. बरेचसे आयटीवाले अगदी रोबोटिक लाइफ जगतात ! राहत्या जागेच्या भाड्यापोटी महिन्याला १२-१५ हजार तसेच खाण्या-पिण्यावर खर्च धरल्यावर हातात उरणारा पगार हा फारच कमी असतो. काही वाचनिय दुवे :- Once the preserve of youth, IT staffing enters middle age A New Trend of Suicides in India Why Bangalore is India's suicide capita India: High Tech Mirage ‘डिजिटल अंधार युग’ येणार?

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?

In reply to by मदनबाण

@मदनभाचा: सहमत. पण जर फायनान्शिअल स्टेबिलीटी, ग्रोथ आणि जॉब सिक्युरिटीचा विचार केला तर आयटी सारखं क्षेत्र नाही. ह्यापैकी जॉब सिक्युरिटी हा मुद्दा हल्ली डळमळीत व्हायला लागलाय हे खरं, पण अगदी गाळं क्वालिटी, कशीबशी पास झालेली, कंपनीमधे दुसर्‍याकडुन कामं बिनदिक्कतं करुन घेणारी लोकंसुद्धा आयटीमधे जाउन ऐटीतं रहातात. आणि त्यांच्या मुळे चांगले आणि डिझर्व्हींग उमेदवार मागे पडतात. हे थोडं अवांतर झालं बाकी एक घटना व्यनि करुन सांगीन किंवा आपल्या गृपावर टाकतो. हा द रा ल!!!

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ह्यापैकी जॉब सिक्युरिटी हा मुद्दा हल्ली डळमळीत व्हायला लागलाय हे खरं, पण अगदी गाळं क्वालिटी, कशीबशी पास झालेली, कंपनीमधे दुसर्‍याकडुन कामं बिनदिक्कतं करुन घेणारी लोकंसुद्धा आयटीमधे जाउन ऐटीतं रहातात. आणि त्यांच्या मुळे चांगले आणि डिझर्व्हींग उमेदवार मागे पडतात. काही अंशी सहमत... परंतु मागच्या फायनॅनशिअल क्रायसिस नंतर आयटी इंड्रस्ट्रीची पुंगी वाजली ती अजुन तशीच आहे ! दुसर्‍या कडुन काम करुन घेणे हे सुद्धा स्कील सेट आहे बरं का ! ;) पण काही काळाने ते अंगाशी येउ शकते.कंपन्याना आता आयटी हमाल नकोत तर आयटी माथाडी कामगार हवेत ! त्यामुळे गाळं क्वालिटी भरली गेली तर जवाबदार कंपनीच नाही का ? ती घटना इथे टाका बिनधास्त ! वरती एक्का काका आहेच काय झाल तर प्रतिसाद संपादित करायला तप्तर ! :) बाकी हल्ली आयटीचा विषय आला की काय ठावूक मला माझ्याशी मोकळेपणाने गप्पा मारणारे एक गॄहस्थ { माझ्याच कंपनीतले एक मॅनेजर } आठवतात ! अगदी कमी वयात ब्रेन हॅमरेज ने गेले ते ! :( Dr P Satish Chandra is the director of India’s National Institute of Mental Health and Neurosciences. He says the pressures on young IT workers can sometimes become intolerable. “Expectations from the young professionals are very high - the demands from their jobs is very high. In the early years, they may be able to handle the challenge but as the time passes their needs are different, their family needs are different; with this in mind, what happens is, the pressure mounts.”

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?

In reply to by मदनबाण

आयटी हमालांचे शोषण अनेक वर्ष चालु आहे, परंतु या क्षेत्राला "युनियचे" संरक्षण नाही ! Layoffs in IT companies: Is it time for trade unions to come into play? मदनबाण..... आजची स्वाक्षरी :- Infosys defers salary hikes till July; no job cuts planned IT cos had firing list ready 5 years back Techie, and worried about layoffs? These 20 skills can help you stay relevant

अर्थाचे दोन प्रकार आहेत १. मुख्य अर्थ २. गौण अर्थ मुख्य अर्थ म्हणजे जिथे संपत्ती निर्माण होते असे निर्माण करण्याचे काम... प्रत्यक्ष वस्तु उत्पन्न होतात ..शेती अथवा वस्तुंचे उत्पादन गौण अर्थ म्हणजे उत्पादित वस्तूंचे अथवा शेतीमालाचे कृत्रिम रित्या मूल्यवर्धन ! दलाली , सेवा या गोष्टी म्हणजे गौण अर्थ होय. मुख्य अर्थ निर्माण करनारी यंत्रणा कायमस्वरुपी आणि जगाच्या हिताची असते . गौण अर्थ बाजारपेठ मध्यवर्ती ठेऊन निर्माण होत असतो. बाजारपेठ ही सतत बदलणारी असते आणि म्हणूनच गौण अर्थ हा सतत खाली- वर होत असतो. काही दिवस वकिलांची चलती होती .. मग मेक्यानिकल इन्जिनीयर आणि आता आय टी ... चालायचेच ! फक्त मुख्य अर्थ वाल्यांना जगात मरण नाही ! .

In reply to by विटेकर

मुंबई मधल्या ज्या कापड गिरण्या बंद झाल्या तिथे पण वस्तु उत्पादन होत होते . त्या पण काळाच्या मागे बंद पडल्या . जास्त ऑटोमेशन मुले कामगार लोकांची गरज कमी झाली त्यामुळे मुख्य अर्थ किव्वा गौण अर्थ असा काही नसेल पण ज्या वेळी ज्या क्षेत्राची चलती आहे तिथे जास्त पैसा मिळणार . प्रत्तेक क्षेत्रामध्ये चढ उतार असणारच . बेंक , टेलेकोम कंपनी , विमा क्षेत्र , माल वाहतूक हे तुमच्या म्हणण्या प्रमाणे गौण अर्थ मध्ये येत असतील पण सध्या ग्लोबल एकोनोमि आणि मुक्त व्यापार व्यवस्थेमध्ये हि क्षेत्रे फार महत्वाची आहेत . म्हणजे समजा भारतात टोमेतो चे उत्पादन बरेच होते आणि ते निर्यात करायचे असतील तर वाहतूक , साठवण , कस्टमर मिळवणे या गोष्टी वर बराच खर्च येऊ शकतो ....म्हणजे मरण सगळ्यांना आहे मुख्य अर्थ किव्वा गौण अर्थ असा काही नाही

आयटीवाले आणि नॉन आयटीवाले हा सध्याचा सर्वात मोठी जातीभेद आहे.

मला वाटते आता यापेक्षा वेगळे क्रांतिकारक असे सॉफ्टवेअर निर्माण होण्याचे दिवस संपले आहेत. उत्पादन क्षेत्रात सी एन सी च्या रूपाने आणखी काही काळ काहीतरी बाहेर येत राहील त्याला योग्य असे सॉफ्टवेअर बनत राहील. पण जी क्षेत्रे केवळ सॉर्ट, सेपरेट अशा वर अवलंबून आहेत त्यातील स्कोप संपलेला असेल. काळजी खरी अशी आहे की येत्या काही वर्षात सुतार, शिंपी. सोनार हे धंदे पार लयाला जातील.

In reply to by चौकटराजा

सद्ध्याही सी.एन.सी. टेक्नॉलॉजी जवळजवळ मॅचुअर लेव्हलला पोचली आहे. टुलआता माझ्या मते सायमल्टेनिअस मशिनिंग मधे जास्तं शोधं लागायला हवेत. पाथ ऑप्टिमायझेशन आणि स्मार्ट मशिनिंग मधे जे काय बदल होतील तेवढेचं. आणि ३-डी प्रिंटर मधे सुद्धा.

वायटू के नंतरची भारतीय आयटी इंडस्ट्री काही तुरळक अपवाद वगळता प्रामुख्याने 'बॉडी शोपिंग'ह्याच प्रकाराची होती. क्लायंटला जसे कुशल प्रोग्रामर्स लागतील तसे ते पुरवायचे, असे सोप्पे मॉडेल होते. त्यात अनुभव गाठीशी आल्यावर 'मॅनेज्ड सर्व्हिसेस' असे ऑनसाईटवरच काम घेणे सुरू झाले. १९९९-२००० च्या डॉटकॉम बबलच्या बुडबुड्यातल्या झीलीयन डॉलर्सच्या नुकसानीनंतर 'ऑफशोअर' मोडेल तेजीत आले, तसे ते चालूच होते पण त्यातला फायदा आता 'अर्थ'पूर्ण झाला होता. इथून 'मॅनेजर' ही जमात भारतीय आयटी इंडस्ट्रीत तयार झाली. सुरुवातीला हे मॅनेजर्स हॅन्ड्स ऑन असावे लागायचे पण कालांतराने त्याची गरज उरली नाही आणि एका मोठ्या क्रायसिसची मुहुर्तमेढ रोबली गेली. सॉफ्टवेयर बांधणीच्या क्षेत्रात यायचे आकर्षण तर सर्वांना खुणवू लागले पण 'मॅनेजर' हे पद जास्त भुरळ पाडू लागले कारण कोडींग करायची जरजच उरली नाही मॅनेजर्सना. कसली मज्जा ना! सॉफ्टवेयर बांधणीच्या उद्योगात जायचे पण सॉफ्टवेयर बांधणीचे कामच करायचे नाही! पण जसे जसे बाजारपेठेला सॉफ्टवेयर बांधणीच्या उद्योगाची कल्पाना येऊ लागली तसा ग्राहक जागरूक होऊन कमी किमतीत सॉफ्टवेयर बांधणीची मागणी करू लागला. स्पर्धाही वाढत गेली आणि प्रॉफिट मार्जिन कमी होऊ लागले. ह्याच्यात आयटी उद्योगाने शहाणे होण्याऐवजी 'फ्रेशर्स भरती' हा स्वस्त मनुष्यबळाचा मार्ग पकडला. ह्यामुळे 'मॅनेजर' हे प्रस्थ आणखिणच गब्बर झाले. ह्या सर्वामुळे भारतीय आयटी इंडस्ट्री ही खर्‍या अर्थाने 'अ‍ॅक्चुअल सॉफ्टवेयर बांधणी'च्या विभागात पुढे गेलीच नाही (काही तुरळक अपवाद वगळता). त्यामुळे भारतीय आयटी इंडस्ट्री 'टॉप हेवी' होऊन ओव्हरहेड्स वाढत गेले. मोड्यूल लीड, टीम लीड, प्रोजेक्ट लीड, मॅनेजर, सिनीयर मॅनेजर, ग्रुप मॅनेजर... हे काय आहे? कोडींग कोण करणार? अनुभव वाढला की कोडींग करण्याची मॅच्युरीटी वाढते पण इथे मॅनेजर बनून कोडींग करायचेच नाहीयेय, अशी आजची स्थिती आहे! आता परदेशी कंपन्यांना भारतातच सॉफ्टवेयर बांधणीचे दुकान उघडणे सोपे वाटू लागल्याने त्या तसे करू लागल्या आहेत. त्यांना मॅनेजर्स 'नको असतात' आणि घेतले तरी ही ते हॅन्डस ऑन हवे असतात कारण त्यांनी भारतात दुकान सॉफ्टवेयर बांधणीसाठी उघडलेले असते न की 'बनियागीरी करायला'. तमाम मॅनेजर्स आणि नॉन हॅन्ड्स ऑन मंडळींसाठी (३५-४० च्या वयातील) हा 'वेकअप कॉल' समजावा. TCS चे नुकतेच झालेले ले ऑफ्स हे फक्त ट्रेलर होते. - (हॅन्ड्स ऑन) सोकाजी

In reply to by सोत्रि

++११११११११११११११११११११११११ १ निरिक्षण...जर ३०+ वय असूनसुध्धा कोडींगचे काम मागितले तर लगेच शिक्का मारतात रिस्पाँसिबीलीटी नकोय :(

In reply to by सोत्रि

अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण प्रतिसाद. मी नेहमी म्हणतो की इतके जर आपले आयटी वाले हुशार तर एक साधी ओएस का नाही बनवली आज्पतुर... बनवली असल्यास सांगावे. मला तरी म्हाइत नाही.