Skip to main content

आईटी(सर्विस) क्षेत्रामधील सर्वसाधारण अभियंते

लेखक अज्ञात यांनी गुरुवार, 19/02/2015 02:46 या दिवशी प्रकाशित केले.
अ : काय हिरो , काय काय . जोब कसा चालू आहे ब . काय नाय निवांत . जोब मस्त . सध्या टीम लीड झालो आहे त्यामुळे फक्त दुसर्याचे काम चेक करतो . फारसे टेक्निअल काम करत नाही हल्ली अ : मजा आहे कि मग .आता अजून ३-४ वर्षात मेनेजर झाल्यावर मग तर पूर्ण इमेल आणि एक्सेल आणि फोन एवडेच वापरावे लागेल ब . हो ना यार . मेनेज्मेण्ट मध्ये गेलेले बरे असतंय रे वरचे अ आणि ब ६-९ वर्षे अनुभव असलेले आईटी(सर्विस) क्षेत्रामध्ये एक सर्वसाधारण अभियंते.सर्वसाधारण म्हणण्याचे म्हणजे प्रत्तेक क्षेत्रामध्ये उत्तम काम करणारे , स्वत:चे काम आवडत असणारे , नवीन संकल्पना पुढे आणणारे असे लोक असतातच पण हे लोक सर्व साधारण या गटात येत नाहीत तर अपवाद या गटात येतात . त्यामुळे खालील लिखाण/प्रश्न हे बहुसंख्य सर्वसाधारण लोकांना डोळ्यासमोर धरून पडलेले आहेत तर सांगायचा मुद्दा हा कि आईटी क्षेत्रामध्ये माणूस फ्रेशर म्हणून लागला कि सर्वसाधारणपणे ५ वर्षात त्याला आपले प्रोमोशन झाले नाही तर तर अपराधी असल्याची भावना येते आणि लवकरात लवकर मेनेजर बनून त्याला टेक्निअल काम बंद करायचे असते . पण हे असे अजून किती वर्षे चालणार ? १. स्वत: ला सारखे अपडेट ठेवणे सगळ्यांना शक्य होईल का ? आईटी मधले स्किल हे साधारण ३-४ वर्षात पूर्ण बदलत असते . जी लोक सो कॉल्ड मेनेज्मेण्ट मध्ये नसतील त्यांना जर नोकरी टिकवायची असेल तर रिटायर होऊ पर्यंत सतत अभ्यास करावा लागणार . सतत नवीन शिकावे लागणार . ३०-४० पर्यन्त नवीन स्किल आत्मसात करणे जमू शकेल पण ४५+ नंतर हे शक्य होईल का ? २.अजून १५-२० वर्षांनी भारतीय आईटी(सर्विस) कंपनी वर परिणाम कसा होईल आणि त्या तो कसा हाताळतील ? साधारण पणे भारतीय आईटी(सर्विस) कंपनी या ओफशोर वरच्या २-७ वर्ष अनुभव असलेल्या लोकामुलेच फायदा कमवत असतात आणि एखादी वेळ अशी येईल कि कंपनीमधले बरेच लोक १५-२०् वर्षे अनुभव असलेलो साधारण लोक असतील . एक तर कंपनी त्यांचा पगार कमी करेल नाही तर कामावरून काढून टाकेल . पण काहीही झाले तरी नुकसानी मध्ये धंदा करणार नाही , त्यावेळचे चित्र कसे असेल ? ३ आईटी मधला रिटायर झालेला माणूस कसा असेल ? सध्या तरी आईटी मधला एवेरेज वय साधारण ३० च्या आसपास असेल असे मानले तरी यातले सगळेच लोकांना काही दर वर्षी ५-२० टक्के पगार वाढ , दर ३-४ वर्षांनी प्रोमोशन मिळणार नाही . तर अजून २०-३० वर्षांनी आईटी चे चित्र कसे असेल ? आईटी मधील लोकांना रिटायर होने नशिबात असेल का ? ४. सध्या तरी आईटी ओफशोरिंग मध्ये भारत बाप आहे . पण फिलिपिन्स , मलेशिया पोलंड , चाइना , स्लोवाकिया सारखे देश पण सध्या बराच मार्केट मारत आहेत . या देशाकडून स्पर्धा चालू झाली कि भारत कसा रीस्पोंड करेल ? हि स्पर्धा एकदम तीव्र झाली तर वरचे सगळेच प्रश्न इनव्हेलीड होतील का ? तुम्हाला काय वाटते ?

वाचने 38173
प्रतिक्रिया 166

प्रतिक्रिया

In reply to by सोत्रि

कधीही वीटांवर वीटा ठेवुन भिंत बांधली नसलेला सिव्हिल इंजिनियर सुपरवायझर म्हणुन चालु शकतो. ते कसे काय?

In reply to by संदीप डांगे

तसेच कधीही कोडींग नाही केलेला माणुस मॅनेजर म्हणुन चालायला काहीच हरकत नाही. अवांतर - गवंडीकाम बरेच अवघड असते. कोडींग साठी आयटी आय काढल्या पाहीजेत, ग्रॅज्यएशन ची काही गरज नाही.

In reply to by प्रसाद१९७१

कोडींग साठी आयटी आय काढल्या पाहीजेत, ग्रॅज्यएशन ची काही गरज नाही.
कोडिंग कशासाठी करताय हे महत्वाचे. पे-रोल सिस्टिम बनवायला साधे कोडिंग चालेल.ट्रेडिंग सिस्टिम्,जिथे मिलिसेकंद महत्वाचा असेल तिथे कोडिण्ग पलिकडे अनेक गोष्टी माहित पाहिजेत.

In reply to by प्रसाद१९७१

इंजिनियर पोरं येउन गलिच्छ कोड लिहितात, iti काढले तर ... कल्पनेनेच शहारे आले ! अर्थात चांगलं कोडिंग साठी डिग्री पेक्षा चांगला intuition जास्त आवश्यक आहे, हे माझं मत. (http://www.paulgraham.com/knuth.html) ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती जमते असे नाही.ज्यांना नाही जमत ते लवकरात लवकर मॅनेजर होण्याच्या घाईत असतात.

In reply to by sagarpdy

ती एक कला आहे, सगळ्यांनाच ती जमते असे नाही.ज्यांना नाही जमत ते लवकरात लवकर मॅनेजर होण्याच्या घाईत असतात.
प्रचंड सहमत...पण त्यापेक्षा महत्वाचे आहे सोल्यूशन डिझाईनींग साले ८०% लोक ठिगळे लावण्यात धन्यता मानतात

In reply to by टवाळ कार्टा

हि कला आहे हे सत्यच बरेच लोक मान्य करत नाहीत ..त्यामुळे रचतात विटेवर वीट ...उडाला तर पक्षी ..बुडाला तर बेडूक .सोल्युशन डिझाईन ह्यासाठी आपल्या लोकांना नं वेळ नं धीर ...अर्थात सकाळी रुपया गुंतवला तर संध्याकाळी सव्वा रुपया निघाला नाही तर 'समदा घाटा' ह्या मानसिकते मधे व्यवसाय करणाऱ्यांना ह्यात फार वावगे वाटत नाही ... अर्थात हे फक्त आयटी नाही बरे का ... रस्ते/ बिल्डिंगा /कुठलीही सिस्टीम घ्या हे असेच दिसेल ... साधे उदाहरण घ्या ठाण्याचा माजिवडे नाका ते कॅडबरी सिग्नल हा पट्टा बघा ... १. माजिवडे नाक्याला मुंबई कडे जातांना जी वळणे घ्यावी लागतात ती अतिशय संतापजनक आहेत ...ती वळणे घेऊन हायवे ला लागावे तर उजवीकडून येणारा फ्लायओव्हरवरून येणारी वाहने कडकडून भेटायला आल्यासारखी ... २. पलीकडे ज्युपिटर हॉस्पिटल, एका बाजूला उच्चभ्रू हॉटेल दुसर्या बाजूला प्रचंड व्हीव्हीयाना मॉल ...ह्या सगळ्या इमारतीतील मिनिटाला डझनावारी वाहने आतबाहेर करतात ती इवल्याश्या सर्व्हिस रोड वर...एखादी अम्ब्युलन्स अडकली कि अडकली ... जाऊ देत उगीच डोक फिरवून घेण्यात अर्थ नाही ...:(

In reply to by अत्रन्गि पाउस

ठाण्याचा माजिवडे नाका ते कॅडबरी सिग्नल हा पट्टा बघा ... १. माजिवडे नाक्याला मुंबई कडे जातांना जी वळणे घ्यावी लागतात ती अतिशय संतापजनक आहेत ...ती वळणे घेऊन हायवे ला लागावे तर उजवीकडून येणारा फ्लायओव्हरवरून येणारी वाहने कडकडून भेटायला आल्यासारखी ... २. पलीकडे ज्युपिटर हॉस्पिटल, एका बाजूला उच्चभ्रू हॉटेल दुसर्या बाजूला प्रचंड व्हीव्हीयाना मॉल ...ह्या सगळ्या इमारतीतील मिनिटाला डझनावारी वाहने आतबाहेर करतात ती इवल्याश्या सर्व्हिस रोड वर...एखादी अम्ब्युलन्स अडकली कि अडकली ... जाऊ देत उगीच डोक फिरवून घेण्यात अर्थ नाही ...:( अगदी ! पेव्हर ब्लॉकचे रस्ते म्हणजे तुमच्या सुंदर रस्त्यांच्या स्वप्नाला लागलेला शाप आहे ! शरीरातली हाडं आणि हाड हलण म्हणजे काय ? याचा अनुभव घ्यायचा असेल तर इथे अवश्य यावे. या हायवेजवर लोकांसाठी स्कायवॉक जवळपास कुठेच नाही. लोकांना हायवे क्रॉस करताना पाहताना हल्ली फारच भिती वाटते... सर्व वयोगटातील लोक असा जीव घेणा प्रकार रोज करतात ! मला रोजचा हा प्रवास म्हणजे रोजचा मॄत्युशी लढाच वाटतो. रस्ते कसे बांधतात याची कप्लनाच इथल्या राज्यकर्त्यांना ठावूक नाही आणि ती सामान्य जनतेला ते अनभवु देखील देणार नाहीत.हिंदूस्थानात उत्तम पद्धतीचे नुसते रस्ते जरी बांधलेत तरी सुद्धा देशाची उत्तम प्रगती होउ शकते... असो...

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Jiya Re... - { Jab Tak Hai Jaan }

In reply to by मदनबाण

सहमत ! पण, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा जनता केवळ स्वतःच्याच प्रगतीतच रस असलेल्या राजकारण्यांना सोडून देशाच्या प्रगतीत रस असलेल्या राजकारण्यांना मते द्यायला सुरुवात करेल.

In reply to by नितिन थत्ते

थांबा, थांबा साहेब. तुमचे घोडे आताच उधळवून नका. इतकी घिसाडघाई करणे हा आमचा स्वभाव नाही जनतेने नक्की योग्य प्रकारे मत दिले की नाही हे भविष्यच ठरवेल. कारण... "भूतकाळात सतत अपेक्षाभंग झालेला असताना आंधळेपणे कोणाचीही पाठराखण करण्यापेक्षा किंवा कोणाचाही सतत आंधळा विरोध करण्यापेक्षा निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांवर काय कारवाई होत आहे आणि त्याचे योग्य कार्यकालात योग्य ते परिणाम झाले की नाही हे उघड्या डोळ्यांनी पाहून आपले मत ठरवणेच शहाणपणाचे असते." असे आमचे ठाम मत आहे. या सर्वामधे पक्ष आणि व्यक्ती गौण असतात... जमिनीवरचे वट्ट काम महत्वाचे असते. आम्हाला कोणताही रंग अथवा झूल पेहेनण्याचा शोक नाही हे तुमच्या ध्यानात आलेले दिसत नाही... तेव्हा असो. :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

सहमत.. त्याचबरोबर.. दिलीत ना मतं ? "मग आता भोगा फळं" किंवा "आता गप्प बसा आणि त्यांना काम करु द्या" हे दोन्ही गजर मान्य नाहीत. मतं देऊन कर्तव्य संपलं किंवा मत दिलय म्हणून त्यांनाच समर्थन द्यायची नैतिक जबाबदारी वगैरे देखील मान्य नाही. थोडक्यात, या सर्वामधे पक्ष आणि व्यक्ती गौण असतात... जमिनीवरचे वट्ट काम महत्वाचे असते.
आम्हाला कोणताही रंग अथवा झूल पांघरण्याचा शोक नाही हे तुमच्या ध्यानात आलेले दिसत नाही... तेव्हा असो.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

>>जनतेने नक्की योग्य प्रकारे मत दिले की नाही हे भविष्यच ठरवेल. कारण... म्हंजे, मत देताना योग्य की अयोग्य ठरवायचा मार्गच नाही म्हण्टा? नेहमीच ट्रायल एरर..

In reply to by नितिन थत्ते

थत्ते साहेब, पूर्वानुभव म्हणूनही काही गोष्ट असतेच, तो चांगला अथवा वाईट कसाही असू शकतो. मानवाने आपली बुद्धी वापरून त्याचा उपयोग पुढची कृती ठरवण्यासाठी करायचा असतो, हे विसरून कसं चालेल ? शिवाय, कधी कधी निवड करताना, "दगडापेक्षा वीट मऊ" हा वाक्प्रचार कामी येतो. पण तरीही, वस्तुस्थितीमध्ये, भविष्यातला दर अनुभव "भूतकालातला चांगला अनुभव भविष्यात तसेच घडेल अशी शास्वती देत नाही." अश्या लिखीत-अलिखीत संवैधानिक इशार्‍यासह येतो. त्यामुळे अगदी पूर्ण विश्वास ठेऊन मत दिले असले तरी, निवडलेल्या नेत्याचे प्रामाणिक परिक्षण चालू ठेवायचे असतेच, किंबहुना तो पक्ष्/नेता आपला अगदी आवडीचा असला तरी आणि अगदी तो पक्ष/नेता शतकभर अथवा जास्त आस्तित्वात असला तरी ! हे न केल्यास लोकशाही संपून सरंजामशाही सुरू होते याची पैशाला पासरी उदाहरणे दिसतील... फक्त फक्त डोळे उघडून आजूबाजूला प्रामाणिकपणे पाहण्याची गरज आहे... बस्स ! लोकशाहीतसुद्धा कोणत्याही पक्ष/नेत्याच्या पायावर आपली सर्व बुद्धी अर्पण करून आंधळेपणाने वागायचे नसते ही समज काहींना असते, काहींना नसते. नसल्यास, असे लोक आपला मार्ग चुकला हे ध्यानात आल्यावरही ते नाकारत राहतात, पूर्वीचाच हट्ट चालू ठेवतात, माझा (चुकलेला) मार्गच बरोबर आणि इतर सर्व झूट आहे असे म्हणत राहतात. याला मानसशास्त्रात "डिनायल मोड" असे म्हणतात. अर्थात तुमचे पूर्वीचे लिखाण बघता तुम्हाला हे सगळे पटेलच असे नाही. पण तरीही मी "अत्यंत आशावादी" असल्याने वरचा संवैधानिक इशारा जितका राजकारणात लागू पडतो तितकाच माणसाच्या व्यक्तीगत गैरसमजूतींनाही लागू पडतो असे मानतो. म्हणूनच केवळ हा खटाटोप ! इतकेच. बाकी चालूद्या ! या धाग्यात झाले तितके अवांतर खूप झाले.

In reply to by मदनबाण

एकदम अ‍ॅग्रीच म्हणजे. विवियाना ला परवानगीच कशी दिली कळत नाही. असो. ठाण्यात कुठेशी आपण? सहज हं. मी नौपाड्याचा.

In reply to by वेल्लाभट

विवियाना ला परवानगीच कशी दिली कळत नाही
आम्ही विवियाना मध्ये पडीक असतो त्यामुळे आम्हाला हि नाही आवडत अस कोणी विचारलं कि :) अम्बुलंस जुपिटर मध्ये घुसण्याची जबाबदारी जुपिटर वर पण आहे , त्यांना मागच्या बाजूने सहज गेट उघडू शकतात पण ते तस करत नाहीत दुसरी गोष्ट जुपिटर दुचाकी वाहनांना काही अतर्क्य कारणाने प्रवेश नाकारते (पार्किंग साठी) ते सर्व दुचाकी वाले विवियाना मध्ये पार्क करतात तिसरी गोष्ट साधारण उच्च मध्यम वर्गासाठी असलेल हे इस्पितळ बाहेरच्या चारचाकी वाहनांना फार कमी प्रमाणात पार्किंग करून देत , ते सर्व विवियाना पैसे मोजून पार्किंग करतात , तेंव्हा आमच्या विवियानाच्या नावाने बोंबलू नका :)

In reply to by टवाळ कार्टा

५००००% सहमत रे टका. खरं तर चुका ह्या दुरुस्तं केल्या पाहिजेत. हल्ली सगळ्यांचा कल त्या झाकुन ठेउन वरवरच्या गोष्टी चकाचक ठेवण्यावर असतो. वेळ मिळाला तर एक जिलबी होंडाच्या व्हाईट अटायर पॉलिसीवर टाकीन. तुमच्या कपड्यावर शॉप फ्लोअर वर ऑईल चा डाग दिसला तर कुठेतरी काहीतरी चुकतयं. ती गोष्ट दुरुस्तं केल्याशिवाय पुढे कामं होतं नाहीत.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

बराय तिथे खालील वाक्ये म्हणणारे कुणी एतद्देशीय नाहीत .. -चाय्यला एक डाग पडला तर काय झाले -साला आता तो जप्पू पिडेल ..@#$त प्रोदक्षान चा @#$@#...साला xxxx लाखचा नुकसान -तो डाग पडला म्हणजे ३ मिली ओईल वेस्ट ..साला नुकसान...तुझ्या बापाने आणला का रे वेस्ट करायला ओईल .. -हा साला मालक पण xत्या आहे .. ऑटोमोबाईल प्रोडक्सन लाईन मध्ये कवा सफेद कपडा घालते के ?? -साला कलसे एक स्पेयार शर्ट रखो रे बाबा ऐसा कूच हुअवा तो फटाफट बदली कर ने ...वो सस्ता गिरेगा... . . . . ये जपानी प्रोसेस वाले साले बेपारी लोग ला लय सतावते ...

In reply to by टवाळ कार्टा

उत्तम सोल्यूशन डिझाईनींग... "वापरण्यासाठी कमीत कमी प्रशिक्षणाची जरूरी असलेली आणि कमीत कमी श्रम, वेळ व वित्त खर्च करून वापरणार्‍याला जास्तीत जास्त अपेक्षित साध्य साधून देणारी प्रणाली म्हणजेच उत्तम संकल्पना असलेली प्रणाली (well-designed solution). उत्तम संकल्पना असलेल्या प्रणालीच्या मागे किती का किचकट तंत्रज्ञान असेना, त्याचा वापरणार्‍याला त्रास व्हायला नको, किंबहुना ते त्याला दिसले/समजले नाही तरच बेहत्तर !" (A well-designed solution is the one that allows user to extract the highest level of the expected benefits after the least amount of training; and with the least expense of time, effort and money. A well-designed solution does not bother or even expose the user to the technological excellence and efforts that may have been employed to construct it.) अर्थातच, उत्तम संकल्पना असलेली प्रणाली तयार करणे येरागबाळ्याचे काम नोहे !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मधे कधीतरी अ‍ॅपल आयपॅड्बद्दल एक कथा ऐकली होती. खरंखोटं माहित नाही. अ‍ॅमेझॉनच्या जंगलतील आदिवासींच्या ५-६ वर्षाच्या मुलांना - ज्याना आधुनिक तंत्रज्ञानाचा अजिबात गंध नाही - आयपॅड्स खेळायला हातात दिली. पाच मिनिटाच्या आत सर्व मुलं त्यावर गेम्स खेळू लागली होती.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

हे अमेरिकन काहीही पिल्लू सोडुन देतात आणि जग त्यावर आंधळा विश्वास ठेवतं. पहील्यांदा हाती घेतल्यावर काहीच माहीत नसतांना कुठलीही प्रणाली लिलया हाताळणं हे अचाट बुद्धिचे काम आहे. असं असतं तर सामान्य वयस्कर मंडळींना अजिबात कष्ट न पडते ते शिकायला.

In reply to by संदीप डांगे

अमेरिकन लोक पिल्लू सोडण्यात हुशार अस्तात हे मान्य पण...
असं असतं तर सामान्य वयस्कर मंडळींना अजिबात कष्ट न पडते ते शिकायला.
लहान मुलाला काही नविन नवीन गोष्ट दाखवायला गेलो की ती वस्सकन बोलत नाहीत "ह्या...ठेव तो तुझा आयपॅड-फायपॅड बाजूला...आयपॅड नस्ताना सुध्धा आम्ही संसार केलेच ना....कुठे काही अडलं?" मुद्दा इतकाच की लहान मूल जे शिकवाल ते शिकते कारण त्यांच्यात इगो, मानापमान याची जाणिव नस्ते या जाणीवा जशा जशा वाढतात तशी तशी शिकण्याची कुवत कमी होत जाते :)

In reply to by टवाळ कार्टा

अगदी सहमतं. शिवाय लहान मुलांना नवीन गोष्ट म्ह्णलं की आधी त्यांची उत्सुकता जागी झालेलीचं असते. त्यातं मग जर संगणक किंवा तत्सम वस्तु असेल तर मग विचारायलाचं नको.

In reply to by टवाळ कार्टा

लहान मूल जे शिकवाल ते शिकते हाच मुद्दा आहे टकाभाऊ, प्रश्न आयपॅड कित्ती उपभोगकर्ताभिमुख (user friendly) आहे याचा टेंभा मिरवण्याचा आहे. त्यासाठी ते उदाहरण देतात आदिवासी मुलांचे. म्हणजे त्यांचा मेंदू शहरी लोकांच्या तुलनेत तंत्रज्ञान वापरण्याच्या बाबतीत कमी आहे हा एक यांचा अहंगंड. तर 'त्यांनाही' आमचे आयपॅड वापरता येते म्हणजे बघा कित्ती कित्ती सोपे आहे. त्या मुलांना टेपरेकॉर्डर पासून बंदूकीपर्यंत, सायकलपासून रणगाड्यापर्यंत काही दिले तरी ते पाच मिनिटांत चालवायला शिकतील. आमच्या शेजारच्या चार वर्षाच्या चिमुरड्याने घरासमोर उभी असलेली गॅससीलेंडरची तीनचाकी गाडी उभ्याउभ्या पाच मिनिटांत सुरु करून चांगली ६०-७० फूट पळवली ते स्वत:च्या डोळ्यांनी पाहीले आहे. दुसरा वयाचा प्रश्न. सामान्यतः विशिष्ट वयापुढे गेल्यावर शिकण्याचा उत्साह (जीवन-मरणाचा प्रश्न नसेल तर) कमी होतो. हीच आयपॅड झिडकारणारी पिढी त्यांच्या बाल्यावस्थेत, तरुणपणी रेडीओ आणि तत्कालिन तंत्रज्ञानाशी (वापरायला लवकर शिकता यावे यासाठी) कशी झटापट करत होती हे त्यांना आठवतच असेल. प्रत्येक नव्या पिढीला नवे नवे शिकायला आणि शोधायला भन्नाट आवडते. हेच सत्य, बाकी सारे मार्केटींग.

In reply to by संदीप डांगे

तुम्ही "god must be crazy" बघाच...एखादी गोष्ट आदिवासी जर ५ मिनीटांमधे शिकत असतील...ते सुध्धा त्यांचा आधुनिक जगाशी काहीही आणि कधीही संपर्क नसताना...तर ती वस्तु उपभोगकर्ताभिमुख (user friendly) आहे

In reply to by टवाळ कार्टा

तुम्ही "god must be crazy" बघाच..
टका.. __/|\__ तुझे धन्यवाद कसे मानू राव..! तुला कल्पनाही नसेल तू किती मोठी मदत केली आहेस.! मी हा चित्रपट कोणाच्या तरी पाहुणा म्हणून गेलो व्हीसीआर वर थोडासा पाहिला होता लहान असताना. खूप आवडला होता. लहान असल्याने आणि व्हीसीआरचा रिमोट कोणा दुसर्‍याच्या हातात असल्याने पुरा पाहू शकलो नव्हतो. नव्वदीच्या दशकात जेव्हा माहिती मिळणे अवघड होते तेव्हा मी गेली कित्येक वर्षे अनेक दुकानांत, चित्रपटप्रेमी मित्रांना या चित्रपटातले प्रसंग वर्णन करून विचारत होतो हा कोणता चित्रपट आहे म्हणून. अगदी गूगलत पण होतो. पण जास्त काही आठवत नसल्याने सापडत नव्हता. ही लिंक सहज म्हणून उघडली आणि बालपणीच्या त्या आठवणींतले प्रसंग पाहून कसला खुश झालोय मी यार. कधीही तेव्हा मी विचार केला नव्हता की मला हा चित्रपट परत पहायला मिळेल म्हणून. परत परत आभार.!!

In reply to by हाडक्या

हेहे :) त्यात काय मोठे इतके आभार वगैरे मानण्याइतके...कट्ट्याला १ प्लेट भजी खाउ घाला...हाकानाक :) :)

In reply to by टवाळ कार्टा

लहान मुलाला काही नविन नवीन गोष्ट दाखवायला गेलो की ती वस्सकन बोलत नाहीत "ह्या...ठेव तो तुझा आयपॅड-फायपॅड बाजूला...आयपॅड नस्ताना सुध्धा आम्ही संसार केलेच ना....कुठे काही अडलं?" मुद्दा इतकाच की लहान मूल जे शिकवाल ते शिकते कारण त्यांच्यात इगो, मानापमान याची जाणिव नस्ते या जाणीवा जशा जशा वाढतात तशी तशी शिकण्याची कुवत कमी होत जाते
प्रचंड पटेश !

In reply to by संदीप डांगे

ही कथा खरी आहे का खोटी हे माहित नाही असं मी लिहीलेलच आहे पण या स्पेसिफिक गोष्टीमध्ये उगीच अमेरिकन लोकांना नावं ठेवण्यात काही अर्थ नाही. पहील्यांदा हाती घेतल्यावर काहीच माहीत नसतांना कुठलीही प्रणाली लिलया हाताळणं हे अचाट बुद्धिचे काम आहे. असहमत. असं असतं तर जगातले कोट्यावधी लोक जे आधुनिक तंत्रज्ञान वापरतात त्यांना अचाट बुद्धीचे म्हणावे लागेल तुमच्या व्याख्येप्रमाणे. जाता जाता अ‍ॅपलचे प्रॉडक्ट्स अतिशय यूझर फ्रेंडली आणि अत्यंत विचारपूर्वक डिझाईन केलेले असतात याबद्दल वादच नाही.

In reply to by अमेरिकन त्रिशंकू

पाच मिनिटाच्या आत सर्व मुलं त्यावर गेम्स खेळू लागली होती. "पाच मिनिटाच्या आत" ही जरा जास्तच अतिशयोक्ती झाली :) पण काही दिवस संगणक हातात आला तर पूर्वी संगणकाचा काहीही संपर्क नसलेली मुलेही कोणत्याही मदतीशिवाय त्याचा यशस्वीपणे मूलभूत वापर करू शकतात हे डॉ सुगत मित्रा नावाच्या एका भारतीय शास्त्रज्ञाने सिद्ध केले आहे. ते संशोधन Hole-in-the-wall या नावाने प्रसिद्ध आहे. इ स १९९९ मध्ये दिल्लीतील त्यांचे ऑफिस आणि कालकाजी या झोपडपट्टीमध्ये असलेल्या कुंपणाच्या भिंतीत एक छिद्र पाडून त्यातून त्यांना एक संगणक टच-स्क्रीनच्या सहाय्याने वापरता येईल अशी सोय केली. काही दिवसातच त्या झोपडपट्टीतील लहान मुले तो संगणक वापरायला शिकली. हा प्रयोग नंतर अनेक ठिकाणी यशस्वीपणे केली गेला आहे. यासाठी त्यांना TED सन्मान दिला गेला आहे. अधिक माहिती इथे मिळेल.

In reply to by प्रसाद१९७१

गवंडी कामामध्ये विटा ठेवणे हे काम फारसे बदलत नाही . इमारत दवाखाना आहे का सुलभ शौचालय का एस टी बसस्थानक आहे यामध्ये विटा वर विटा ठेवायची पद्धत तीच असते . त्यामुळे तिथे एखादा सिव्हिल इंजिनियर सुपरवायझर म्हणून पूर्ण इमारत बघू शकतो . आईटी मध्ये असे जनरल काम थोड्या वर्षात नक्की येईल कि कामाचे स्वरूप अजीबात बदलणार नाही

In reply to by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)

गवंडी कामात कष्ट असतात साहेब आणि ते करुन जे बनते त्याचा खरोखरच काही उपयोग असतो. आयटी मधे गेल्या ७-८ वर्षात खरे खुरे उपयोगी असे नविन काही ही घडले नाहीये. शेवटची उपयोगी गोष्ट म्हणजे ऑनलाईन पेमेंटचे गेटवे असावी. गेले काही वर्ष नुस्तीच रंगरंगोटी चालू आहे. स्वता आयटीत फक्त पैश्यासाठी असलेला आणि भारतीय आयटी बद्दल पूर्ण अनादर असलेला प्रसाद.

In reply to by प्रसाद१९७१

बरेचशे लोक बराचश्या ठिकाणी फक्त पैश्यासाठीच असतात.आणि कष्ट प्रत्तेक जन आपल्या क्षमते प्रमाणे करतच असतो . गवंडी पण आपण फार काय निर्माण करतोय असे मनात ठेवून काम करत नसावा . आणि आदर म्हणालात तर नक्कीच आहे . जी इंडस्ट्री हजारो लोकांना नवीन जोब देते त्याबद्दल आदर ठेवायला काय हरकत आहे?

In reply to by प्रसाद१९७१

७-८ वर्षात ?? २००७ पासून लिनक्स बेस्ड अँड्रॉइड सिस्टम वापरणे सुरू झाले . क्लाऊड तंत्रज्ञान प्रगत झाले . गूगल ग्लास सारखे तंत्रज्ञान वापरात आले स्मार्ट फोन हा प्रकार रुजला. तंत्रज्ञान 'सोशल' झाले. आणि छोटे कितीतरी बदल झाले.

In reply to by कपिलमुनी

२००७ पासून लिनक्स बेस्ड अँड्रॉइड सिस्टम वापरणे सुरू झाले . क्लाऊड तंत्रज्ञान प्रगत झाले . गूगल ग्लास सारखे तंत्रज्ञान वापरात आले स्मार्ट फोन हा प्रकार रुजला. तंत्रज्ञान 'सोशल' झाले.
एक एंड युसर म्हणुन मला काय फरक पडला. क्लाऊड किंवा अँड्रोइड नसते आले तर काय फरक पडला असता. त्यापूर्वी पण सर्व सिस्टीम चालतच होत्या की. स्मार्ट फोन हा प्रकार मला स्वताला आवडत नाही.

In reply to by प्रसाद१९७१

क्लाऊड आल्याने मला तरी फरक पडला बुवा. आता फ्लॉप्यांचा माहीम हलवा आणि यूएसब्यांचे फाफडे जवळ बाळगावे लागत नाहीत. २००७ पासून मला यूजर म्हणून पडलेले फरकः - सोपं फाईल शेअरिंग - बर्‍याचशा इंटरनेटमध्ये आता युनिकोड वापरता येतं - क्रॉस-डिवाईस सुलभीकरण - स्काईप, गूगल हँगाऊट्स सारख्या सहजी उपलब्ध सेवा - पेपाल सारख्या ई-वॉलेट सुविधा "सिस्टिम चालणे" हा मला यूजर म्हणून फार दरिद्री बेंचमार्क वाटतो.

In reply to by आदूबाळ

"सिस्टिम चालणे" हा मला यूजर म्हणून फार दरिद्री बेंचमार्क वाटतो. सहजपणे फार भारी बोलून गेलात ! *ok* जसे : आधुनिक मानव अगदी गेल्या ८०-९०,००० वर्षांपासून करतच आला आहे. पण पहिला पायाने, मग घोड्यावरून, मग घोड्याच्या गाडीतून, मग यांत्रिक गाडीने (तिची तर इतकी व्हर्शन्स झाली की सांगू नका), मग रेल्वे आली, मग विमाने उडायला लागली, आणि आतातर रॉकेट वापरून माणसाला चंद्र व मंगळावर रहायला जायची स्वप्ने पडताहेत... तसं बघायला गेलं तर ह्या सगळ्या "ट्रान्स्पोर्टेशन सिस्टीम्स"च आहेत नाही का ? पण, एकीपेक्षा तिच्या पुढची कितीतरी फरकाने वेळ-श्रम-आरामाचा फायदा करून देतात यात कोणाला संशय आहे का ? "मानवी जीवनाच्या कित्येक सर्वसामान्य गोष्टींचे झालेले ई-एनेबल्मेंट" ही मानवाच्या इतिहासातली सर्वात मोठी आणि सर्वात जलद झालेली क्रांती आहे *... फक्त ती आपल्या डोळ्यासमोर इतकी जलद झाली आहे की आपण तिला गृहीत धरतो आहोत आणि तिची व्याप्ती सहज ध्यानात येत नाही... जसे आपल्या रोज डोळ्यासमोर असणार्‍या बालकाची वाढ आपल्या ध्यानात येत नाही पण दोन-चार वर्षांनी भेट देणारा पाहुण्याच्या तोंडी, "किती मोठा झालाय हा दोनेक वर्षांत?" असे वाक्य येते ! ================== * संगणक क्रांतीपूर्वीची जागतिक मानवी जीवनावर सर्वांगीण परिणाम करणारी क्रांती-- जिला आपण "औद्योगिक क्रांती" म्हणतो-- इ स १७६० ते १८४० अशी १८० वर्षे चालू होती आणि तिने जगाच्या केवळ १०% टक्के लोकजीवनात फरक पडला होता. त्याविरुद्ध, संगणकाने आपल्या जीवनात किती फरक पडला आहे हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकाने; अ) संगणकाचा तडक अथवा दुरान्वयाने संबंध नसणार्‍या किती गोष्टी आपल्या आजूबाजूला आहेत ? आणि आ) त्या गोष्टी रोजच्या जीवनातून काढून टाकल्या तर काय होईल ? या फक्त दोनच प्रश्नांचीच उत्तरे शोधावीत !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

"मानवी जीवनाच्या कित्येक सर्वसामान्य गोष्टींचे झालेले ई-एनेबल्मेंट" ही मानवाच्या इतिहासातली सर्वात मोठी आणि सर्वात जलद झालेली क्रांती आहे *
मला नेहमी आवडनार म्हणजे इनकम टॅक्स रिटर्न आणि रेल्वे टिकिट. फार जुनी नाही पण २००3/४ मधली गोष्ट असेल रेल्वे टिकिट काढायला केवढी मोठी लाइन लागत होती. त्यातल्या त्यात मधेच लिंक मिळत नव्हती म्हणजे बोंबला. आज हेच काम घर बसल्या होते तरीही मी irctc ला शिव्या घालतो. सरल यायच्या आधी इनकम टॅक्स भरायला सीएच लागायचा. सरल आल्यानंतर फॉर्म भरता येउ लागला पण जमा करायला त्रास व्हायचा आज सारच काम ऑनलाइन होत.

In reply to by मित्रहो

टॅक्स रिटर्न आणि रेल्वे टिकिट. खरयं टॅक्स रिटर्नचा ऑनलाईन वापर सुखद आहे, परंतु रेल्वे, महावितरण आणि एमटीएनएल यांचे बुकिंक /बिल भरताना पेमेंट गेटवेचा एरर त्रास दायक ठरत आहे.congestion issues हा मुख्य दोष. २०१३ मधे IRCTC ने अपग्रेडसाठी ११ कोटींची गुंतवणुक केली होती. पण ऑनलाईन बुकींची वेगाने वाढणारी संख्या पाहता टिकीट बुकींगची समस्या अनेकांना येत आहे.पैसे अकाउंट मधुन डेबिट होतात आणि तिकीट मात्र बुक होत नाही ! हाच त्रास महावितरणचे बिल भरताना देखील होतो.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- HTTP/2 finished, coming to browsers within weeks HTTP/2 Frequently Asked Questions

In reply to by मदनबाण

कधी कधी येतात, डोक भडकत मग शांत विचार केला की पटते चार तास उन्हात लाइन मधे उभे राहून टिकीट काढण्यापेक्षा हे नक्कीच सुखावह आहे. त्या काळात स्टेशनवर आतासारखे मार्बल नव्हते, ना अशा खिडक्या होत्या, पंखे असले तरी चालत नव्हते. अरे मोबाइलमधले टिकिट दाखवून प्रवास करु शकता अजून काय पाहीजे. पुढची पायरी टीटीइ टिकीट चेक करायलाही येनार नाही तुम्ही ट्रेनमधे चढताच टिकीट चेकींग आपोआप होउन जाइल. रात्री अकरा वाजता येउन टिकीट दाखवा म्हणून कोणी झोप मोड करनार नाही. असो हा काही मूळ लेखाचा विषय नाही.

In reply to by मदनबाण

ग्राहकांना येणार्‍या समस्यांच्या मागे तंत्रज्ञानाच दोष नसून संगणकीय सेवा व्यवहारात आणण्यासाठी जबाबदार असलेल्या लोकांचा/संस्थांचा दोष आहे. सद्या संगणकशास्त्र/तंत्र इतके विकसित आणि इतके स्वस्त झाले आहे की, एखादी संगणकीय (ई-एनेब्ल्ड) सेवा व्यवहारात आणण्यातले सर्वात मोठे दोन अडथळे (अ) "वैचारीक प्रतिभादौर्बल्य (lack of imagination)" आणि (आ) "प्रस्थापित गैर हितसंबंधाना (vested interests) येणारी बाधा" हेच आहेत. महावितरण ज्याला अभिमानाने "आधुनिक संगणकीकरण" म्हणते तिचे व्यवहारातले सत्यरूप "एका ऑफिसमधून दुसरीकडे सीडीवर डेटा नेण्याची गरज असलेली आणि इंटरनेटवर बिल भरण्याची मंद वेगाची सेवा" असे आहे. इंटरनेटवर बिले भरण्याच्या त्यांच्या पानावरही ग्राहकांची त्यांना "इतकी काळजी" आहे की त्यावर; (अ) "BU* म्हणजे SUB/DIVISION" हे ग्राहकाने महावितरणचा कर्मचारी असल्यासारखे पटकन ओळखावे" आणि (आ) त्यातल्या ड्रॉपडाऊन लिस्टमधले आपले ठिकाण त्याच्या नावावरून नाही तर महावितरणने ठिकाणाला दिलेल्या क्रमांकावरून (जे क्रमांक ग्राहकाला अगम्य असतात आणि माहित असण्याची अजिबात गरज नाही) शोधून काढावे" अशी त्यांची अपेक्षा आहे ! So much for user friendliness ! (क्षमस्व, मराठीत इतका चपखल वाक्प्रचार न सुचल्याने इंग्लिशमध्ये लिहीले आहे.) बंद केलेल्या वीज-जोडाची सुरक्षाठेव परत देण्यासाठी महावितरण कमीत कमी सहा महिने तरी लावते. त्यासंबंधात महावितरणच्या एका वरिष्ठ कार्यकारी अधिकार्‍याशी नुकतेच थोडे परखड बोलणे झाले. तेव्हा इतर वेळेचा कडक इस्त्री फिरवलेला चेहरा बदलून गालातल्या गालात हसत "राजकीय इच्छाशक्ती (?!)" ला दोष देत त्यांनी मान डुलवली. हे राजकारण कसले हे वेगळे सांगण्याची गरज नसावी :)

In reply to by प्रसाद१९७१

एक एंड युसर म्हणुन मला काय फरक पडला.
बाकी सर्व जाउद्या, इथे अभिव्यक्तीच्या पिंका टाकता येण्यापेक्षा दुसरा मोठा फायदा/उपयोग क्लाऊड/वेब २.० कुठला नाही हे तर मान्य करता येइल? - (स्मार्ट फोन वापरून स्मार्ट झालेला) सोकाजी

In reply to by प्रसाद१९७१

एक एंड युसर म्हणुन मला काय फरक पडला.
तुम्हाला फरक पडला नाही कारण तुम्ही यूजर झालाच नाहीत. ज्यांनी यूज केलं त्यांना फरक पडला.

In reply to by प्रसाद१९७१

स्वता आयटीत फक्त पैश्यासाठी असलेला आणि भारतीय आयटी बद्दल पूर्ण अनादर असलेला प्रसाद.
"जिस थीली मे खाना उसी मे ..." ह्या असल्या वृत्तीनेच भारतीय सर्विस इंडस्ट्रीचा बट्याबोळ होत/होणार आहे! - (रोजी-रोटी देणार्‍या भारतीय आयटी इंडस्ट्रीबद्दल पूर्ण आदर असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

जाऊद्या हो सोकाजीराव, कुणाशी वाद घालताय... राणीच्या नोकरांचे पगार एक्सेल शीटसमधे भरण्याला चुकून सॉफ्टवेअर इंडस्ट्री समजलेत ते. :D चांगला परफॉर्मन्स दीला तर मग गवंडीकामाच्या वरचं जरा बरं काम पण मिळू शकतं. ;) असल्या पिंका टाकणे दोनच प्रकारच्या लोकांकडून होते, आपल्या नाकर्तेपणाचा भयानक न्युनगंड आलेले नैतर बाहेरच्या देशात उंदीर मारण्याच्या विभागात काम मिळाल्याचा अहंगंड बाळगणारे. माफ करा त्यांना. ;)

In reply to by थॉर माणूस

अग्गायाया .. थॉर माणूस, डेटा मायनिंग मध्ये हायसा काय ?? नाय म्हंजे हे लई जुनं खोदून खोदून काढलंय म्हणून विचारतोय.. ;)

In reply to by हाडक्या

तो ड्वायलॉकच असला भारी मारलाय त्या साहेबांनी की या जन्मात तरी त्यांना तो विसरता येणार नाही. वाचनखूण साठवण्याजोगा प्रतिसाद आहे तो. :D

In reply to by सोत्रि

सोत्रि हि खालचि तुमचि वाक्ये कय आदर दखवतत ? तुमच्या खलिल वाक्यशि पुर्ण सहमत .. ------------------------------------------------------------------------------------ ह्या सर्वामुळे भारतीय आयटी इंडस्ट्री ही खर्‍या अर्थाने 'अ‍ॅक्चुअल सॉफ्टवेयर बांधणी'च्या विभागात पुढे गेलीच नाही (काही तुरळक अपवाद वगळता). त्यामुळे भारतीय आयटी इंडस्ट्री 'टॉप हेवी' होऊन ओव्हरहेड्स वाढत गेले. मोड्यूल लीड, टीम लीड, प्रोजेक्ट लीड, मॅनेजर, सिनीयर मॅनेजर, ग्रुप मॅनेजर... हे काय आहे? कोडींग कोण करणार? अनुभव वाढला की कोडींग करण्याची मॅच्युरीटी वाढते पण इथे मॅनेजर बनून कोडींग करायचेच नाहीयेय, अशी आजची स्थिती आहे!

In reply to by प्रसाद१९७१

'सिव्हिल इंजिनियर' सुपरवायझर म्हणुन चालु शकतो कारण त्याला भिंत बांधायला त्या विटा नेमक्या कशा रचायच्या ह्याचे शास्त्रोक्त ज्ञान असते. त्यामुळे गवंडी नेमक्या कशा वीटा रचतोय हे त्याला कळू शकते! त्याच्याऐवजी जर इलेक्ट्रॉनिक्स इंजीनीयर सुपरवायझर म्हणुन नेमला भिंत बांधायला तर चालणार नाही! - (भिंतं चालवणारा*) सोकाजी * फेसबुकवर ;)

In reply to by सोत्रि

एकदम खरे !! एका नामवंत कंपनीत ३० / ४० हेड दिसतात (कमितकमि ) ..इतके खरेच गरजेचे आहेत काय ? सेंटर हेड, बिझनेस हेड, प्राकटीस हेड , solution हेड, ग्लोबल हेड, Delivery हेड, ग्रुप हेड .. हा पण काय प्रकार आहे कळत नाही. LTITL

In reply to by सोत्रि

वाक्या वाक्याशी सहमत. नेमकं हेच लिहिणार होतो. तमाम मॅनेजर्स आणि नॉन हॅन्ड्स ऑन मंडळींसाठी (३५-४० च्या वयातील) हा 'वेकअप कॉल' समजावा. TCS चे नुकतेच झालेले ले ऑफ्स हे फक्त ट्रेलर होते. १०००% खरं आमच्या हापिसात पण सध्या तीच परिस्थिती आहे. मॅनेजर जास्त पण एकही धड चांगला टेक्निकल अर्किटेक्ट नाही. कस्ट्मर तिकडे बोंबा मारतो आणि इथे मॅनेजर हात वर करुन मो़कळा होतो, "I don't have the required resource available". पिरॅमिड उलटा झाला आहे. इथुन पुढे मी फक्त मॅनेजर आहे माझा फारसा टेक्नॉलॉजीशी संबंध येत नाही असं कोणी म्हणालं तर त्याची नोकरी धोक्यात आहे हे नक्की.