ओंकारशेठ,
सुंदर लेख रे! मना घडवी संस्कार आणि ती मालिका छानच होती. मोहन जोशींनी त्यात छान काम केलं होतं!
मुलामुलांचीऽऽऽ
मजेमजेचीऽऽऽ
बालचित्रवाणी
फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ
फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ
बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी
मस्तच आहे हे गाणं! :)
त्या गोट्याची भूमिका करणार्या मुलाचे नाव गाव काही ठाऊक नाही पण आज ती व्यक्ती मनात कायम एक कोपरा निर्माण करून बसली आहे.
गोट्याचं काम करणार्या त्या मुलाचं आडनांव घाणेकर का काहीसं होतं एवढं मला आठवतंय.
'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात'
हे माझंदेखील अतिशय आवडतं गाणं. आम्ही मित्रमंडळी जेव्हा घरगुती मैफल जमवतो तेव्हा पुष्कळदा हे गाणं मी गातो. कधी पुण्याला आलो तर एखाद-दुसरा पेग पिऊन तुलाही हे गाणं भर हाटेलात ऐकवीन! :)
ह्याचे शब्द खालीलप्रमाणे -
'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत,
कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात'
बिजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ,
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात!
असो..
आपला,
(माळरानातला) तात्या.
गोट्याचे नाव जॉय घाणेकर.
या सगळ्यांत 'संस्कार' ही मालिका मला सर्वाधिक आवडायची.
देव सर, कीर्तने मॅडम सगळी मंडळी ओळखीचीच वाटायची. मोहन जोशींची हेडमास्तरांची अतिशय सुंदर भूमिका. मुलांनीसुद्धा छान कामे केली होती. आणि या सगळ्याची पार्श्वभूमी असलेली शारदाश्रम विद्यामंदिर, भवानी शंकर रोड. बर्याच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. असो.
संस्कार मालिकेचे शीर्षकगीतही मस्त. गायन-संगीत श्रीधर फडके चूभूद्याघ्या.
तेजस्पर्शाने दूर हो अंधार
जैसा मुळांचा वृक्षा असे आधार
शिल्पास जैसा आकारी शिल्पकार
मना घडवी संस्कार
(सुसंस्कृत)बेसनलाडू
ॐकार,
छान आठवण करून दिली. माझी शाळा दुपारची असायची. आणि बालचित्रवाणी कार्यक्रम सव्वा अकरा ला सुरू व्हायचा. ११:१५ ते ११:३५/४० मग ११:४० ते १२:०० अशा दोन लहान भागात तो कार्यक्रम दाखवायचे.
तो कार्यक्रम बघता बघताच मी जेवण करायचो, मग शाळेला जायचो.
त्यातील एक कथा नेहमी आठवते. ती बाहुल्या वापरून दाखवलेली. एक मुलगी दुसर्या मुलाला स्वच्छतेचे महत्व सांगत असते. त्यात त्या मुलाला शिंक आल्यावर ती मुलगी (दोन्ही बाहुल्याच) स्वतःचा रूमाल देते. तो मुलगा नाक शिंकरून तसाच रूमाल परत देतो. तर ती मुलगी म्हणते: "शीऽऽऽऽऽऽ घाणेरडाऽऽऽऽऽऽ" मग त्याला ती रूमाल धूवून देण्यास सांगते. वगैरे वगैरे.
संस्कार हेही छानच होते. संस्कारमधील नेमके सर्व भाग आठवत नाहीत. पण सर्व मुले परीक्षेत बघून लिहिण्याची परवानगी मागतात ते आठवते. तेव्हा मुख्याध्यापक त्यांना परवानगी देतात. आता बघूनच लिहायचे म्हणून ते अभ्यासच करत नाही.पुस्तकाला हातच न लावल्याने नेमके परिक्षेच्या वेळी कुठल्या प्रश्नाचे उत्तर कोठे शोधावे हे ही त्यांना समजेनासे होते.
गोट्या मधील च ची भाषा व दोन वजा म्हणजे एक अधिक प्रमाणे दोन नकार म्हणजे एक होकार असा लावलेला अर्थ अजूनही मस्तच वाटतो.
आणखी ही भरपूर आठवणी आहेतच.
घरी केलेली मिसळ व पाव खाण्यास गेल्याने प्रतिसाद अर्ध्यातच सोडावा लागला ;)
सध्या मी बाबुराव अर्नाळकरांचे 'धनंजय' हे पुस्तक वाचतोय. ते वाचताना डोळ्यासमोर 'परमवीर'-कुलदीप पवार व 'हॅलो इन्स्पेक्टर'- रमेश भाटकरच समोर येताहेत. 'धनंजय' ची भूमिका कोणी केली होती हो? त्यातील 'छोटू' बहुधा विजय गोखलेंनी साकार केला होता.
अगदी ११ वी १२ वी पर्यंत बाघितली ;-) ११ वाजता कॉलेज असताना सकाळी १० वाजता जेवणाचं ताट टीव्हीसमोर बसून बालचित्रवाणी आणि यूजीसी चे फिजिक्स्/मॅथ्स चे क्लासेस बघायचो.
ससा रे ससा तो कापूस जसा
त्याने कासवाशी पैज लाविली
वेगे वेगे धावू नी डोंगरावर जाऊ
ही शर्यत रे आपुली...
हे गाणे म्हणणारी चष्मीस मुलगी आणि सोबतचे लहानगे वादक अजूनही आठवतात.
ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित
प्रतिक्रिया
हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ!
जॉय घाणेकर
आठवण
आणखी
धनंजय
वाटलेच,
बालचित्रवाणी