मुलामुलांचीऽऽऽ
मजेमजेचीऽऽऽ
बालचित्रवाणी
फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ
फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ
बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी
तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती.... स्वप्नी आले काही , एक मी गाव पाहिला बाई', 'स्वप्नामध्ये आम्ही पाहिला नवलाईचा गाव, वेशीवरती पाटी होती मोठ्ठ्यांना मज्जाव', 'एकतरी झाड लाऊया हो, एकतरी झाड जगवूया! रंगीत रंगीत फुलाफुलांनी परिसर अपुला सजवुया' अशी गाणी कानात आणि मनात रुंजी घालू लागली. २०-२५ मिनिटांच्या या कार्यक्रमावर मी मनापासून प्रेम केलं.
गाणी, हस्तकला , चित्रकला, खेळ, गप्पा, गणित , विज्ञान, इतिहास, भूगोल अशा अनेक विषयांवर अगदी बालमनाचा ठाव घेणार्या छोटेखानी कार्यक्रमांची ही लळा लावणारी जंत्री. अजुनही लहान व्हावसं वाटतं आणि बालचित्रवाणी बघायची इच्छा अनावर होते.
बालचित्रवाणिसोबतच इतर आवडीच्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे गोट्या. आजही मानसी मागीकर यांना पडद्यावर पाहिले की गोट्याची माई हीच प्रतिमा डोळ्यासमोर येते ( माझ्या स्मरणशक्तीप्रमाणे ह्यांनीच गोट्याच्या माईची भूमिका केली होती). त्या गोट्याची भूमिका करणार्या मुलाचे नाव गाव काही ठाऊक नाही पण आज ती व्यक्ती मनात कायम एक कोपरा निर्माण करून बसली आहे.
मना घडवी संस्कार, मना आकार संस्कार असे सुस्वर शब्द कानी पडले की मी अगदी आवर्जून टी.व्ही. समोर येऊन बसायचो. संस्कार मालिकेतून कळत-नकळत झालेले संस्कार आजही साथ-सोबत देतात. अश्या मालिकांचे आज वावडे का?
'बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बीयाणे माळरानी गवतात' , 'बंदिनी - स्त्री ही बंदिनी. हृदयी पान्हा, नयनी पाणी, जन्मोजन्मीची कहाणी' , 'परमवीर - जो करे जीवाची होळी, छातीवर झेलून गोळी...' , 'हॅलो हॅलो हॅलो...हॅलो इन्स्पेक्टर ' अशी कितीतरी शीर्षकगीते मनात घर करून आहेत. पण ह्या सर्वांत मनात घर केलं ते बालचित्रवाणीने ते मात्र कायमचं. आज तात्यांचा लेख वाचून त्याची आठवण आली आणि लिहावसं वाटलं इतकचं...
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
8126
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ!
जॉय घाणेकर
In reply to हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ! by विसोबा खेचर
आठवण
आणखी
In reply to आठवण by देवदत्त
धनंजय
In reply to आणखी by देवदत्त
वाटलेच,
In reply to धनंजय by बेसनलाडू
बालचित्रवाणी