✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

माझं खोबार... भाग २

ब
बिपिन कार्यकर्ते यांनी
Sun, 10/05/2008 - 05:08  ·  लेख
लेख

Book traversal links for माझं खोबार... भाग २

  • ‹ माझं खोबार... भाग १
  • Up
  • माझं खोबार... भाग ३ ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
34052 वाचन

💬 प्रतिसाद (58)

प्रतिक्रिया

म
मदनबाण Sun, 10/05/2008 - 05:23 नवीन

व्वा..फारच

व्वा..फारच सुरेख...वाचण्यात दंग होऊन गेलो... पुढच्या भागाची वाट पाहतो आहे.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 10/05/2008 - 05:30 नवीन

एएएएएएएएए नंबर

बिप्पीन भौ .. सगळा सौदीचा इतिहास चक्क फोटूंसकट .. भाषा उकल.. ती मुस्सु नावं लिहीने .. जबरा आहे .. एक कळत नाय .. इतके दिवस वाचनमात्र का होतात? तुम्ही वाचनमात्र असल्यामुळे तुम्हाला पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ... आणि एवढं प्रॉपर लिहील्याबद्दल अनखिन थोड्या वाढदिवसाच्या शुभेच्छा :) शेवटी ते खोबार काय ते समजलं.. नाय तर डोक्याचं खोबरं व्हायची पाळी आलेली -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
ट
टुकुल Sun, 10/05/2008 - 05:49 नवीन

अजुन येवु द्यात...

मस्त लिहिल आहे. बिप्पीन भौ, मागच्या भागाची जशी लिंक दिलीत तसच त्यातली शेवटची काही वाक्य परत दिल्यास वाचायला बरे पडेल. >>>आपणही मजूरच. पोटासाठी, चार पैसे जास्त मिळतील म्हणूनच तर चाललो आहोत ना? तर व्हा तयार, काढले कपडे आणि राहिलो उभा रांगेत. यथावकाश सगळे सोपस्कार पार पडले आणि तो व्हिसा पडला हातात. हे काही कळाले नाही.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 10/05/2008 - 18:08 नवीन

व्हिसा

व्हिसा प्रोसेसिंग मधे 'मेडिकल टेस्ट' हा एक अतिशय जबरा प्रकार असतो. पूर्ण (म्हणजे पूर्ण) तपासणी करतात. एक्स्-रे वगैरे काढताना शर्ट वगैरे काढावा लागतो तो संदर्भ आहे इथे. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
आ
आनंदयात्री Mon, 10/06/2008 - 14:36 नवीन

हा हा हा

>>>आपणही मजूरच. पोटासाठी, चार पैसे जास्त मिळतील म्हणूनच तर चाललो आहोत ना? तर व्हा तयार, काढले कपडे आणि राहिलो उभा रांगेत. यथावकाश सगळे सोपस्कार पार पडले आणि तो व्हिसा पडला हातात. =)) =)) =)) टुकुल्याने अर्थाचा अनर्थ केला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/06/2008 - 15:25 नवीन

हात्

हात् मेल्या... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ट
टारझन Mon, 10/06/2008 - 22:38 नवीन

आग्गायायाया ....

आग्ग्यायायायाअयाअ .. >>>आपणही मजूरच. पोटासाठी, चार पैसे जास्त मिळतील म्हणूनच तर चाललो आहोत ना? तर व्हा तयार, काढले कपडे आणि राहिलो उभा रांगेत. यथावकाश सगळे सोपस्कार पार पडले आणि तो व्हिसा पडला हातात. =)) =)) =)) =)) =)) आयला हे आमच्या नजरेतनं कसं सुटलेलं ? बेक्कार .. अब बिप्पिन भौ .. हत् मेल्या म्हणो या और कुच .. नो जवाब .. इट्स हिट विकेट - ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
फ
फटू Sun, 10/05/2008 - 05:51 नवीन

बिपिनदा...

सफर ए सौदी अरेबिया मस्त चाललीय... सौदी अरेबियाच्या हीश्ट्री जाग्रपीचा सचित्र धावता आढावा तर मस्तच... पुढचा भाग लवकरच येउद्या... आमची "जाणून घेण्याची ईच्छा" आम्ही तुर्तास काबूत ठेवतो... सतीश गावडे आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
  • Log in or register to post comments
श
शितल Sun, 10/05/2008 - 06:20 नवीन

खुपच

मस्त लिहिले आहे. फोटो ही आवडले. :) लवकर लिहा,वाचत आहे आणी पुढच्या भागाची वाट पहात आह.
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Sun, 10/05/2008 - 08:32 नवीन

झकास!

इतिहास,भूगोल आणि वर्तमानाची झकास सांगड.
  • Log in or register to post comments
स
सहज Sun, 10/05/2008 - 08:36 नवीन

सुरेख

असेच म्हणतो. बिपिनभाय, हा भाग देखिल सुंदर झालाय. पुढच्या भागची वाट पहातोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव
च
चित्रा Mon, 10/06/2008 - 05:53 नवीन

+१

छान लिहीले आहे. पुढच्या भागांबद्दल उत्सुकता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज
स
सुक्या Sun, 10/05/2008 - 08:50 नवीन

त्याल

पावनं .. लय भारी लिवलय. सौदीला हीरीत त्याल सापडतं यवडं आमाला म्हाइत व्हतं. तुमच्या लेखात लय नवीन गोस्टी म्हायती झाल्या. आमच्या गावचं मास्तर, तेला बी यवढं म्हाइत नाय. यक कळलं न्हाय. हीरीत त्याल सापडतं तर हे लोक पानी कुठनं आनत्यात? आमची आपली योक शंका हो. बाकी समदं झ्याक. सुक्या (बोंबिल)
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 10/05/2008 - 18:11 नवीन

हीरीत

हीरीत त्याल सापडतं तर हे लोक पानी कुठनं आनत्यात? कळेलच हळू हळू. :) आणि मला कळलं होतं तेव्हा मी जसा थक्क झालो होतो तसे तुम्ही पण व्हाल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या
र
रेवती Sun, 10/05/2008 - 08:58 नवीन

पुढचा भाग

लवकर येऊ द्या. आत्ताचा भाग छानच! रेवती
  • Log in or register to post comments
म
मुक्तसुनीत Sun, 10/05/2008 - 08:58 नवीन

फारच उत्तम !

मिष्टर कार्यकर्ते , वाचायला लागलो आणि गुंगून गेलो राव. फारच सुरेख वर्णने. वरती प्रमोदकाकांनी अचूक म्हण्टलंय. च्यामारी छुपे रुस्तुम निघालात राव :-) यावेळचा क्रमशः जास्त बोचला. एकदम रंगून गेलो होतो आणि खटकन "क्रमशः". :-( असो. तुम्ही वेळात वेळ काढून लिहिताय; ते जतन करण्याच्या लायकीचे बनते आहे !
  • Log in or register to post comments
म
मनिष Mon, 10/06/2008 - 14:59 नवीन

हेच म्हणतो....

वाचतो आहे, अजून लिहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्तसुनीत
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 10/05/2008 - 09:38 नवीन

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मस्त लिहिलं आहेत म्हणून नाही तर छोटा भाग लिहून क्रमशः टाकलं आहेत म्हणून! लवकर टाका पुढेचे भाग.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 10/05/2008 - 10:05 नवीन

छान!!

तुमचं प्रवासवर्णन तर मस्तच चाललंय... पण सौदी अरेबियाविषयी मनात काही मूलभूत शंका आहेत..... तुम्ही तुमच्या लिखाणात तेथे वास्तव्य करायला लागा, मग विचारतो..... :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 10/05/2008 - 10:47 नवीन

झकास !!!

बीपीन, सौदीच्या प्रवासात आपल्याबरोबर आम्हीही वावरतोय असे वाटत आहे. सुरेख माहिती, सुरेख वर्णन. खोबार काय आहे, त्याचा प्रश्न सुटला :) पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 10/05/2008 - 12:30 नवीन

माहितीपूर्ण लेख

उ त्त म!!!! अगदी माहितीपूर्ण लेख .. वा वा वा.. आधीचा भाग अनुभवप्रधान तर हा माहितीपूर्ण अशीच सरमिसळ असणार आसेल तर वाचायलाही मजा येईल आणि माहितीही मिळत जाईल... मुक्तराव म्हणतात त्याप्रमाणे लेख संग्राह्य होणारसं दिसतंय :) शुभेच्छा! वेळ होईल तसं क्रमशः निवांत झालं तरी मला चालेल :) -(क्रमशः) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
ब
बापु देवकर Sun, 10/05/2008 - 15:20 नवीन

उत्तम....

बिपीनराव्.....तुमचे विमान मस्तच उड्तय.... चालु द्या... मी बरोबर आहेच..
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 10/05/2008 - 15:28 नवीन

अरब

http://vipravani.wordpress.com/ चांगला लेख. बाकी बि.का. अरब तेलांच्या विहिरिवर खुप प्रेम करतात.
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 10/05/2008 - 16:48 नवीन

बिपिनकाका,

बिपिनकाका, तुमच्या सचित्र प्रवासवर्णनामुळे मजा आली राव! सुंदर फोटू आहेत... येऊ द्या अजूनही.... तात्या.
  • Log in or register to post comments
स
स्वप्ना हसमनीस Sun, 10/05/2008 - 18:04 नवीन

मस्तच

मस्त वर्णन ! पुढचे भाग लवकर येऊ द्यात !वाचायला उत्सुक आहोत
  • Log in or register to post comments
ज
जयवी Sun, 10/05/2008 - 18:19 नवीन

मस्तच

आमच्याही सौदी वास्तव्याच्या आठवणी जाग्या झाल्या :) फोटो, माहिती फारच सुरेख !!
  • Log in or register to post comments
म
मृदुला Sun, 10/05/2008 - 21:17 नवीन

इतिहास

मस्त लेख. सौदी आणि वहाबी चा संक्षिप्त इतिहास आवडला. अनुभवकथन उत्तम. तुम्हाला लिहायला लवकर आणि भरपूर सवड मिळो अशी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Sun, 10/05/2008 - 21:47 नवीन

मस्त वर्णन...

वा बिपिनराव, मस्त लिहीलय. अभिनंदन. ओमान (मस्कत) मध्येही 'वहेबी' जमात (टोळी) आहे. ते वरच्या दर्जाच्या टोळ्यांमध्ये गणले जातात. लायला = रात्र मस्कत मध्ये 'लैल' म्हणजे रात्र. 'लैला' हा शब्द त्यातूनच तयार झाला असावा. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 10/05/2008 - 22:06 नवीन

धन्यवाद

धन्यवाद काका. लायला आणि लैल एकच (माझा उच्चार चुकला आसेल कदाचित). (बिल्लैल = रात्री - मी रात्री येतो). हे वहाबी हे एक तत्वज्ञान आहे. जबरी कट्टर, त्याना सलाफी असंही म्हणतात आणि ते सुन्नी पंथिय आहेत. ओमानी हे बहुतकरुन इबाधी आहेत. इबाधी ही शिया / सुन्नी सारखीच अजून एक शाखा आहे इस्लामची. एवढे जहाल नसतात. बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्रभाकर पेठकर Mon, 10/06/2008 - 08:56 नवीन

चुक नाही....

उच्चार चुकीचा नसेल. अरबस्थानात वेगवेगळ्या प्रांतात्/देशात एकाच शब्दाचे वेगवेगळे उच्चार आढळतात. त्याचा परिणाम असावा. खरं आहे, ओमनी, युएई वाले अरब सौदी अरबांइतके जहाल नाहीत. 'इबादत' म्हणजे 'पुजा' असा अंधूकसा अर्थ मला माहित आहे. 'इबाधी' म्हणजे 'पुजारी' असा अर्थ असावा. पण हिन्दू धर्मात 'पुजा' आणि 'पुजारी' इतका स्वच्छ अर्थ नसला तरी 'हाजी' च्या खालोखाल अर्थ असावा. तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/06/2008 - 12:48 नवीन

इबादी

जुने संदर्भ आठवत होतो. आजकाल विकिबाबा आणि गूगलबाबा च्या कृपेने बरेचसे संदर्भ रेडीमेड मिळतात. हे पहा http://en.wikipedia.org/wiki/Ibadi . अजून एक 'ट्रिविआ'... ओमानी लोक हे अरबस्तानातले, इस्लामचा स्वीकार करणारे सगळ्यात शेवटचे लोक, आणि पैगबरांच्या मृत्यूनंतर इस्लामविरुद्ध बंड करणारे पण ते सगळ्यात पहिले लोक. खूप मोठं सैन्य पाठवून ते बंड शमवलं गेलं आणि ओमान मधे इस्लाम जिवंत राहिला. त्या बंडाचीच परिणती म्हणजे हा 'इबादिझ्म'....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर
प
प्राजु Sun, 10/05/2008 - 22:10 नवीन

मस्त

बिपिन.. सौदीचा इतिहास मस्त सांगितला आहेस. माहितीच नव्हतं हे काही. आणि संपूर्ण लेखाला एक प्रकारच फ्लो आहे ज्यामुळे कंटाळवाणा कुठेही होत नाही. नविन देशाबद्दल बरीच माहिती मिळत आहे. पुढचा भाग वाचण्या उत्सुक. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 10/06/2008 - 00:17 नवीन

माहितीपूर्ण आणि ललित

तोल मस्त सांभाळला आहे... छुपे रुस्तुम - आणखी लिहाच!
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 10/06/2008 - 08:50 नवीन

बिपीन भो

बिपीन भो !!! एकदम बढीया !!!! मस्त सफर चालू आहे आमचीही तुमच्या बरोबर !!!! येउ द्यात पूढील भाग ही लवकर !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
र
रामदास Mon, 10/06/2008 - 11:46 नवीन

मा. बिपीन,

फार सुरेख लिखाण.एव्हढे दिवस का बरं लिहीलं नसेल असा प्रश्न पडला. (पण परदेशात काम फार असणार त्यामुळे वेळ कमी पडत असेल असा खुलासा माझा मी करून घेतला. ) आता रोज तुमच्या लिखाणची वाट बघणार हे नक्की. बाकी विशेषणं सगळ्यांनी वापरली आहेतच, मी त्याचाच पुनरुच्चार करणं म्हणजे बासी ईद होईल. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Mon, 10/06/2008 - 14:08 नवीन

माशाल्लाह!!!

जनाब बिपीनमियाँ, क्या कहने? अलबत, आपका यह बयाँ-ए-सफ़र, काबिल-ए-तारिफ है| इसे पढ़ के सा'उदी के अतित के बारें में बडी खु़ब जानकारी हासिल हुई|
त्यातच घरवाली पोटूशी होती. आता परत कधी भेटणार, कसं होणार हेही विचार मनात होतेच.
या परवरदिगार... हमारी भाभीजान इन हालात में थी और आपको ऐसेही जाना पडा? तौबा तौबा| क्या गुज़री होगी आप पें| और भी लिख्खो हज़रत, इत्मिनान से लिख्खो, ऍहेतरामसे लिख्खो.... आपका, धमाल कोहीस्तानी
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/06/2008 - 15:24 नवीन

शुक्रिया...

इस इज्ज़त आफजाई के लिये शुक्रिया धमाल मियाँ. वल्लाह, आपकी उर्दू के क्या कहने... हम तो फिदा है. लेकिन आपने वह 'अतित' जैसा हिंदी लफ्ज़ क्यूं इस्तेमाल किया? खालिस उर्दू मे उसे 'माझी़' (माझी नही, गौर फर्माइयेगा) कहते है. :) बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 10/06/2008 - 15:50 नवीन

मुआफी!

इस गुस्ताखी़ के वास्ते मुआफी चाहुंगा| हमजैसे उर्दुके नौसिखीये की इस नादानी को सम्हाल लिजे| और हौसला अफजाई के लिये तह-ए-दिल से शुक्रिया| (स्वगत: 'माझी़' ...हम्म...एक शब्द आणखी मिळाला :) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
स्वाती दिनेश Mon, 10/06/2008 - 15:57 नवीन

माझी..

माझी... याने पास्ट.. बिता हुआ..(संदर्भ-इजाजत) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ध
धमाल मुलगा Mon, 10/06/2008 - 16:18 नवीन

स्वातीताई,

स्वातीताई, धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
स
स्वाती दिनेश Mon, 10/06/2008 - 14:12 नवीन

मस्त...

दोन्ही भाग वाचले आत्ताच.. मस्त लिहिले आहेस.. पुढे वाचायला उत्सुक, स्वाती
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 10/06/2008 - 14:35 नवीन

रंजक

बिपिनभौ !! रंजक आहे लिखाण तुमचे. सौदी बद्दलची माहिती आवडली !!
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Mon, 10/06/2008 - 14:40 नवीन

छान

छान लिहिलंएस बिपीन. सौदी अरेबिया बद्दल माहिती नसलेली बरीच माहिती मिळतीये. पुढचा भाग येउदेत. मनस्वी
  • Log in or register to post comments
र
राम दादा Mon, 10/06/2008 - 14:41 नवीन

रस..

वाचण्यात रस येत आहे. खुपच छान.. .पुढील भागाची वाट पहात आहे.. राम दादा..
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 10/06/2008 - 15:49 नवीन

तरूण तुर्क

तुम्ही फारच तरूण आहात असं कळ्ळं, म्हणून वाढदिवसाच्या तुर्की शुभेच्छा! अदिती
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Mon, 10/06/2008 - 15:52 नवीन

रीचार्ड एफ बर्टन

रीचार्ड एफ बर्टन या लेखकाने अरेबियन नाइट्स सर्वप्रथम इंग्रजीत आणल्या. त्यासाठी तो अरबी भाषा शिकला. त्याला अशीयायी / युरोपीयन , अफ्रिकन खंडातल्या प्रमुख आणि बोली अशा एकूण एकोणतीस भाषा येत होत्या. भाषा शिकण्यासाठी एक सोपी युक्ती त्याच्या कडे होती. तो एखादी भाषा शिकण्यासाठी त्या भाषीक स्त्रीशी संधान जुळवायचा. अवांतरः मी सध्या बहाशा मलेशिया शिकतोय
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/06/2008 - 16:13 नवीन

रिचर्ड बर्टन

रिचर्ड बर्टन हा एक अतिशय अवलिया वल्ली होता. मक्का मदिने ला जाऊन जिवंत परत आलेला पहिला नॉन्-मुस्लिम. नुसता तिथे गेलाच नाही तर तर चोरून तिथली रेखाटनं केली. अरबी भाषेत अतिशय पारंगत असल्याने तो एका श्रीमंत अफगाणी व्यापार्‍याचा वेष घेऊन जाऊ शकला. आफ्रिकेतली त्याची भटकंतीही तितकीच थरारक आहे. डहोमी (आताचे घाना / आयव्हरी कोस्ट वगैरे देश) वगैरे देशात तो ब्रिटनच्या राणीचा प्रतिनिधी म्हणून गेला होता. तिथल्या सम्राटाने बाळगलेले स्त्रियांचे सैन्य, तिथे चालणारी सामुहिक हत्याकांडं या बद्दल त्याने खूप लिहिले आहे. खूप मनस्वी असलेला हा भटक्या एक वादळी जीवन जगला. भारतात पण बरेच वास्तव्य केले त्याने. अरेबियन नाईट्स आणि भारतातील काही 'विशिष्ट' पुस्तके यांचे भाषांतर त्याने केले आहे. नविन भाषा शिकत असताना, तो त्या भाषेतील शिव्या प्रथम शिकत असे. त्याचे इंग्लंड मधले थडगे पण एका तंबूच्या आकाराचे आहे. शाळेत असताना, रिचर्ड बर्टन वर बाळ सामंतांनी लिहिलेआणि(नाव आठवत नाहिये पटकन) आणि मौज प्रकाशनाने (बहुतेक) प्रसिध्द केलेल्या पुस्तकाची पारायणं केली होती. त्याची आठवण करुन दिल्या बद्दल विजुभाऊंचे आभार (चुकून शुभेच्छा म्हणणार होतो... ;) ) ते पुस्तक कोणाकडे उपलब्ध असल्यास कळेल का? बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ
म
मेघना भुस्कुटे Mon, 10/06/2008 - 20:38 नवीन

'शापित

'शापित यक्ष' - बाळ सामंत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
ड
डॉ.प्रसाद दाढे Mon, 10/27/2008 - 17:25 नवीन

परचुरे

परचुरे प्रकाशन. अप्रतिम पुस्तक अवा॑तरः माझ्याकडे बर्टन लिखित अरेबियन नाईट्स आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
ब
बिपिन कार्यकर्ते Mon, 10/27/2008 - 17:44 नवीन

डॉ., हे

डॉ., हे पुस्तक 'आउट ऑफ प्रिंट' होते. मला ओळखीने नविन प्रत नुकतीच मिळाली आहे. परत चाळतो आहे, बर्‍याच दिवसांनी. रिचर्ड बर्टनच्या अरेबियन नाईट्सची प्रत मिळेल का? तुमच्या कडची प्रत ही मूळ आहे की संपादित. कृपया जरूर कळवणे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा