व्वा..फारच सुरेख...वाचण्यात दंग होऊन गेलो...
पुढच्या भागाची वाट पाहतो आहे..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
बिप्पीन भौ .. सगळा सौदीचा इतिहास चक्क फोटूंसकट .. भाषा उकल.. ती मुस्सु नावं लिहीने .. जबरा आहे ..
एक कळत नाय .. इतके दिवस वाचनमात्र का होतात? तुम्ही वाचनमात्र असल्यामुळे तुम्हाला पुन्हा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ... आणि एवढं प्रॉपर लिहील्याबद्दल अनखिन थोड्या वाढदिवसाच्या शुभेच्छा :)
शेवटी ते खोबार काय ते समजलं.. नाय तर डोक्याचं खोबरं व्हायची पाळी आलेली
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
मस्त लिहिल आहे.
बिप्पीन भौ, मागच्या भागाची जशी लिंक दिलीत तसच त्यातली शेवटची काही वाक्य परत दिल्यास वाचायला बरे पडेल.
>>>आपणही मजूरच. पोटासाठी, चार पैसे जास्त मिळतील म्हणूनच तर चाललो आहोत ना? तर व्हा तयार, काढले कपडे आणि राहिलो उभा रांगेत. यथावकाश सगळे सोपस्कार पार पडले आणि तो व्हिसा पडला हातात.
हे काही कळाले नाही.
व्हिसा प्रोसेसिंग मधे 'मेडिकल टेस्ट' हा एक अतिशय जबरा प्रकार असतो. पूर्ण (म्हणजे पूर्ण) तपासणी करतात. एक्स्-रे वगैरे काढताना शर्ट वगैरे काढावा लागतो तो संदर्भ आहे इथे.
बिपिन.
>>>आपणही मजूरच. पोटासाठी, चार पैसे जास्त मिळतील म्हणूनच तर चाललो आहोत ना? तर व्हा तयार, काढले कपडे आणि राहिलो उभा रांगेत. यथावकाश सगळे सोपस्कार पार पडले आणि तो व्हिसा पडला हातात.
=)) =)) =))
टुकुल्याने अर्थाचा अनर्थ केला ;)
आग्ग्यायायायाअयाअ ..
>>>आपणही मजूरच. पोटासाठी, चार पैसे जास्त मिळतील म्हणूनच तर चाललो आहोत ना? तर व्हा तयार, काढले कपडे आणि राहिलो उभा रांगेत. यथावकाश सगळे सोपस्कार पार पडले आणि तो व्हिसा पडला हातात.
=)) =)) =)) =)) =))
आयला हे आमच्या नजरेतनं कसं सुटलेलं ? बेक्कार .. अब बिप्पिन भौ .. हत् मेल्या म्हणो या और कुच .. नो जवाब .. इट्स हिट विकेट
- ( टारझन ऊर्फ खवीस )
नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा
टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
मिष्टर कार्यकर्ते ,
वाचायला लागलो आणि गुंगून गेलो राव. फारच सुरेख वर्णने. वरती प्रमोदकाकांनी अचूक म्हण्टलंय. च्यामारी छुपे रुस्तुम निघालात राव :-)
यावेळचा क्रमशः जास्त बोचला. एकदम रंगून गेलो होतो आणि खटकन "क्रमशः". :-(
असो. तुम्ही वेळात वेळ काढून लिहिताय; ते जतन करण्याच्या लायकीचे बनते आहे !
तुमचं प्रवासवर्णन तर मस्तच चाललंय...
पण सौदी अरेबियाविषयी मनात काही मूलभूत शंका आहेत.....
तुम्ही तुमच्या लिखाणात तेथे वास्तव्य करायला लागा, मग विचारतो.....
:)
बीपीन,
सौदीच्या प्रवासात आपल्याबरोबर आम्हीही वावरतोय असे वाटत आहे. सुरेख माहिती, सुरेख वर्णन.
खोबार काय आहे, त्याचा प्रश्न सुटला :)
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
उ त्त म!!!!
अगदी माहितीपूर्ण लेख .. वा वा वा..
आधीचा भाग अनुभवप्रधान तर हा माहितीपूर्ण अशीच सरमिसळ असणार आसेल तर वाचायलाही मजा येईल आणि माहितीही मिळत जाईल...
मुक्तराव म्हणतात त्याप्रमाणे लेख संग्राह्य होणारसं दिसतंय :)
शुभेच्छा! वेळ होईल तसं क्रमशः निवांत झालं तरी मला चालेल :)
-(क्रमशः) ऋषिकेश
वा बिपिनराव,
मस्त लिहीलय. अभिनंदन.
ओमान (मस्कत) मध्येही 'वहेबी' जमात (टोळी) आहे. ते वरच्या दर्जाच्या टोळ्यांमध्ये गणले जातात.
लायला = रात्र मस्कत मध्ये 'लैल' म्हणजे रात्र. 'लैला' हा शब्द त्यातूनच तयार झाला असावा.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
धन्यवाद काका. लायला आणि लैल एकच (माझा उच्चार चुकला आसेल कदाचित). (बिल्लैल = रात्री - मी रात्री येतो).
हे वहाबी हे एक तत्वज्ञान आहे. जबरी कट्टर, त्याना सलाफी असंही म्हणतात आणि ते सुन्नी पंथिय आहेत. ओमानी हे बहुतकरुन इबाधी आहेत. इबाधी ही शिया / सुन्नी सारखीच अजून एक शाखा आहे इस्लामची. एवढे जहाल नसतात.
बिपिन.
उच्चार चुकीचा नसेल. अरबस्थानात वेगवेगळ्या प्रांतात्/देशात एकाच शब्दाचे वेगवेगळे उच्चार आढळतात. त्याचा परिणाम असावा.
खरं आहे, ओमनी, युएई वाले अरब सौदी अरबांइतके जहाल नाहीत.
'इबादत' म्हणजे 'पुजा' असा अंधूकसा अर्थ मला माहित आहे. 'इबाधी' म्हणजे 'पुजारी' असा अर्थ असावा. पण हिन्दू धर्मात 'पुजा' आणि 'पुजारी' इतका स्वच्छ अर्थ नसला तरी 'हाजी' च्या खालोखाल अर्थ असावा.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
जुने संदर्भ आठवत होतो. आजकाल विकिबाबा आणि गूगलबाबा च्या कृपेने बरेचसे संदर्भ रेडीमेड मिळतात. हे पहा http://en.wikipedia.org/wiki/Ibadi . अजून एक 'ट्रिविआ'... ओमानी लोक हे अरबस्तानातले, इस्लामचा स्वीकार करणारे सगळ्यात शेवटचे लोक, आणि पैगबरांच्या मृत्यूनंतर इस्लामविरुद्ध बंड करणारे पण ते सगळ्यात पहिले लोक. खूप मोठं सैन्य पाठवून ते बंड शमवलं गेलं आणि ओमान मधे इस्लाम जिवंत राहिला. त्या बंडाचीच परिणती म्हणजे हा 'इबादिझ्म'....
बिपिन.. सौदीचा इतिहास मस्त सांगितला आहेस. माहितीच नव्हतं हे काही.
आणि संपूर्ण लेखाला एक प्रकारच फ्लो आहे ज्यामुळे कंटाळवाणा कुठेही होत नाही. नविन देशाबद्दल बरीच माहिती मिळत आहे. पुढचा भाग वाचण्या उत्सुक.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
बिपीन भो !!!
एकदम बढीया !!!!
मस्त सफर चालू आहे आमचीही तुमच्या बरोबर !!!!
येउ द्यात पूढील भाग ही लवकर !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
फार सुरेख लिखाण.एव्हढे दिवस का बरं लिहीलं नसेल असा प्रश्न पडला.
(पण परदेशात काम फार असणार त्यामुळे वेळ कमी पडत असेल असा खुलासा माझा मी करून घेतला. )
आता रोज तुमच्या लिखाणची वाट बघणार हे नक्की.
बाकी विशेषणं सगळ्यांनी वापरली आहेतच, मी त्याचाच पुनरुच्चार करणं म्हणजे बासी ईद होईल.
शुभेच्छा.
जनाब बिपीनमियाँ,
क्या कहने? अलबत, आपका यह बयाँ-ए-सफ़र, काबिल-ए-तारिफ है|
इसे पढ़ के सा'उदी के अतित के बारें में बडी खु़ब जानकारी हासिल हुई|
त्यातच घरवाली पोटूशी होती. आता परत कधी भेटणार, कसं होणार हेही विचार मनात होतेच.
या परवरदिगार... हमारी भाभीजान इन हालात में थी और आपको ऐसेही जाना पडा? तौबा तौबा| क्या गुज़री होगी आप पें|
और भी लिख्खो हज़रत, इत्मिनान से लिख्खो, ऍहेतरामसे लिख्खो....
आपका,
धमाल कोहीस्तानी
इस इज्ज़त आफजाई के लिये शुक्रिया धमाल मियाँ. वल्लाह, आपकी उर्दू के क्या कहने... हम तो फिदा है. लेकिन आपने वह 'अतित' जैसा हिंदी लफ्ज़ क्यूं इस्तेमाल किया? खालिस उर्दू मे उसे 'माझी़' (माझी नही, गौर फर्माइयेगा) कहते है. :)
बिपिन.
इस गुस्ताखी़ के वास्ते मुआफी चाहुंगा|
हमजैसे उर्दुके नौसिखीये की इस नादानी को सम्हाल लिजे| और हौसला अफजाई के लिये तह-ए-दिल से शुक्रिया|
(स्वगत: 'माझी़' ...हम्म...एक शब्द आणखी मिळाला :) )
रीचार्ड एफ बर्टन या लेखकाने अरेबियन नाइट्स सर्वप्रथम इंग्रजीत आणल्या.
त्यासाठी तो अरबी भाषा शिकला. त्याला अशीयायी / युरोपीयन , अफ्रिकन खंडातल्या प्रमुख आणि बोली अशा एकूण एकोणतीस भाषा येत होत्या.
भाषा शिकण्यासाठी एक सोपी युक्ती त्याच्या कडे होती. तो एखादी भाषा शिकण्यासाठी त्या भाषीक स्त्रीशी संधान जुळवायचा.
अवांतरः मी सध्या बहाशा मलेशिया शिकतोय
रिचर्ड बर्टन हा एक अतिशय अवलिया वल्ली होता. मक्का मदिने ला जाऊन जिवंत परत आलेला पहिला नॉन्-मुस्लिम. नुसता तिथे गेलाच नाही तर तर चोरून तिथली रेखाटनं केली. अरबी भाषेत अतिशय पारंगत असल्याने तो एका श्रीमंत अफगाणी व्यापार्याचा वेष घेऊन जाऊ शकला. आफ्रिकेतली त्याची भटकंतीही तितकीच थरारक आहे. डहोमी (आताचे घाना / आयव्हरी कोस्ट वगैरे देश) वगैरे देशात तो ब्रिटनच्या राणीचा प्रतिनिधी म्हणून गेला होता. तिथल्या सम्राटाने बाळगलेले स्त्रियांचे सैन्य, तिथे चालणारी सामुहिक हत्याकांडं या बद्दल त्याने खूप लिहिले आहे. खूप मनस्वी असलेला हा भटक्या एक वादळी जीवन जगला. भारतात पण बरेच वास्तव्य केले त्याने. अरेबियन नाईट्स आणि भारतातील काही 'विशिष्ट' पुस्तके यांचे भाषांतर त्याने केले आहे. नविन भाषा शिकत असताना, तो त्या भाषेतील शिव्या प्रथम शिकत असे. त्याचे इंग्लंड मधले थडगे पण एका तंबूच्या आकाराचे आहे.
शाळेत असताना, रिचर्ड बर्टन वर बाळ सामंतांनी लिहिलेआणि(नाव आठवत नाहिये पटकन) आणि मौज प्रकाशनाने (बहुतेक) प्रसिध्द केलेल्या पुस्तकाची पारायणं केली होती. त्याची आठवण करुन दिल्या बद्दल विजुभाऊंचे आभार (चुकून शुभेच्छा म्हणणार होतो... ;) )
ते पुस्तक कोणाकडे उपलब्ध असल्यास कळेल का?
बिपिन.
डॉ., हे पुस्तक 'आउट ऑफ प्रिंट' होते. मला ओळखीने नविन प्रत नुकतीच मिळाली आहे. परत चाळतो आहे, बर्याच दिवसांनी. रिचर्ड बर्टनच्या अरेबियन नाईट्सची प्रत मिळेल का? तुमच्या कडची प्रत ही मूळ आहे की संपादित. कृपया जरूर कळवणे.
बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया
व्वा..फारच
एएएएएएएएए नंबर
अजुन येवु द्यात...
व्हिसा
हा हा हा
हात्
आग्गायायाया ....
बिपिनदा...
खुपच
झकास!
सुरेख
+१
त्याल
हीरीत
पुढचा भाग
फारच उत्तम !
हेच म्हणतो....
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
छान!!
झकास !!!
माहितीपूर्ण लेख
उत्तम....
अरब
बिपिनकाका,
मस्तच
मस्तच
इतिहास
मस्त वर्णन...
धन्यवाद
चुक नाही....
इबादी
मस्त
माहितीपूर्ण आणि ललित
बिपीन भो
मा. बिपीन,
माशाल्लाह!!!
शुक्रिया...
मुआफी!
माझी..
स्वातीताई,
मस्त...
रंजक
छान
रस..
तरूण तुर्क
रीचार्ड एफ बर्टन
रिचर्ड बर्टन
'शापित
परचुरे
डॉ., हे