✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

अनाहिता ठाणे कट्टा

भ
भावना कल्लोळ यांनी
गुरुवार, 12/26/2013 - 14:23  ·  लेख
लेख
नमस्कार, आजच्या ठळक बातम्या ……… तर दिनांक २२ डिसेंबर २०१३ रोजी अतिचर्चित आणि दर वेळे प्रमाणे फाटे न फुटता खूप वेळेपासून गाजत असलेला अनाहिताचा पहिला वाहिला कट्टा हा ठाणे येथील स्वाद उपहारगृहामध्ये नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा का होईना पार पडला. परदेशी वास्तव्यास असलेल्या आमच्या काही मिपा अनाहिता अनाहुतपणे भारतवारी करण्यास आल्या होत्या आणि त्या आपसुकच या आमच्या कट्ट्या मध्ये गवसल्या. या कट्ट्याचे सर्वेसर्वा लिमाउजेट उर्फ माऊ यांनी अनाहितावर धागा काढला आणि बाकी सर्वं अनाहिताना पिंगवले. ज्या ज्या अनाहिता पिंगा घालत घालत कट्ट्यात सामील झाल्या होत्या त्याची नावे पुढील प्रमाणे : सानिकास्वप्नील, सविता ००१, पद्मश्री चित्रे, दुर्गावी, मीच मधुरा, भावनाकल्लोळ, सूर, अजया, लिमाउजेट, दिपालीकिरण. तसेच आपापल्या आयांचे प्रतिनिधित्व करत तीन छोट्या अनाहिता पण या कट्ट्यात सामील झाल्या होत्या. मीच मधुरा यास कडुन स्विनी तर सूर यास कडुन आर्या व फक्त ४ महिनाच्या अनन्या यांनी या कट्ट्यात सामील होत सर्वांत लहान मिपाकर होण्याचा मान मिळवला. तर यांच्या बाललीलांनी कट्ट्याला अधिकच समृद्ध केले. तर कट्ट्याचा वृतांत पुढील प्रमाणे. . काही मुंबईकर व परदेशी वास्तव्यास असणाऱ्या आमच्या काही अनाहीतानी संगनमत करून रविवारचा दिवस कट्ट्यासाठी आखला. त्याप्रमाणे मजल दरमजल करत सर्वं अनाहिता पैकी सगळ्यात पहिली हजेरी अजया यांनी वेळेआधी लावली. पण त्यांनी या वेळेचा सदउपयोग स्वतःला एक छान साडी घेऊन केला आणि लवकर आल्याचा स्वतःलाच स्वतः भुर्दंड पाडून घेतला.हा खर्च त्या उशिरा आलेल्या अनाहिताकडून करून घेणार असल्याचा मानस त्यांनी कट्ट्या दरम्यान बोलून दाखवला हि पण नंतर रंगलेल्या गप्पानी त्यांना याचा विसर पाडला. (हे बाकी आमच्या बायकाचे बाकी बरे असते, गप्पा मध्ये महत्वाचे विसरूनच जातो, असो शेवटी फायदा बाकी अनाहिताचा झाला). मग फोनाफोनी करून सगळ्या नक्की आल्या आहेत न यांची खात्री करून घेण्यात आली. सगळ्याजणी १०-१५ मिनिटांच्या अंतराने इच्छित जागी पोहचल्या. a मग स्वाद मधल्या बेसमेंट मध्ये ठाण मांडण्यात आले. अस्मादिकाना मात्र वसई विरार परिवहन यांच्या रविवारच्या सुस्त सेवेपोटी इच्छित जागी पोहचण्यास १ तासाचा विलंब लागला. पण स्वाद मध्ये जाताच कोणीही खाद्य म्हणुन आपला फडशा पडू नये उशिरा आल्यामुळे म्हणुन दरवाजा उघडून आत शिरताच "समुद्रामध्ये मोती शोधणे सोपे पण हे हॉटेल शोधणे महाकठीण असा शेरा हास्य वदनाने देत शामिल झाले". (काय करणार सगळ्या भुकेलेल्या वाघिणी होत्या न आणि उशिरा आलेली मीच एक म्हणुन हा खटाटोप). पण सगळ्यानी हसत हसत मला अनुमोदन दिले आणि स्थापन्न होताच समोर रुचकर घरगुती जेवणाची चव असलेली स्वादची मर्यादित थाळी ठेवली गेली. a (आमच्यापेक्षा हॉटेल मालकालाच खुप घाई होती म्हणुन आमच्या अन्नपुरवठ्याकडे जास्त लक्ष दिले जात होते, काय करणार बाहेर माणसे ताटकळत उभी होती आणि आम्ही मात्र निवांत पणे गप्पा टप्पा मारत जेवण करत होतो). . तर असे जास्त वैचारिक देवाणघेवाण न करता मस्त पैकी एकमेकांची शाळा घेत जेवण उरकले. जेवणातर गुलाबजाम आणि बासुंदी वर यथेच्छ ताव देत मेजवानी फस्त केली. . तिथे उभ्या असलेल्या (मालक कि मेनेजर?) कोण जाणे याच्या चेहऱ्यावर बायांनो आता खण आणि नारळ हवे तर घेऊन येतो पण या दहा जागा खाली करा ग असे काहीसे भाव पाहुन आम्ही बाहेर पडलो. पण हॉटेल बाहेर येताच एकमेकीचे भ्रमण ध्वनी क्रमांक घेत पुढचा कट्टा हा हॉटेल मध्ये न करता एका अनाहितेच्या घरी करण्याचे ठरवुन एक छानसे समुहचित्र टिपले गेले. मग प्रत्येकजणीने टाटा बाय बाय म्हणत या कट्ट्याची सांगता केली. . या बरोबरच कट्ट्याचा वृतांत संपला, पुन्हा भेटुया नवीन कट्ट्याचा वृतांता सोबत. तो पर्यंत याच कट्ट्याच्या वृतांतावर समाधान माना. नमस्कार. छायाचित्रकार सानिकास्वप्नील/ अजया सोबत वार्ताहर भावनाकल्लोळ ठाणे येथुन.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
हे ठिकाण
इतिहास
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
बातमी
माहिती
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
24815 वाचन

💬 प्रतिसाद (139)

प्रतिक्रिया

अरे वा कट्टा उत्तम झाला

सुबोध खरे
गुरुवार, 12/26/2013 - 14:28 नवीन
अरे वा कट्टा उत्तम झाला पण गुलाबजाम आणि बासुंदी चा फोटो बघून जळजळ होत आहे
  • Log in or register to post comments

जळजळ?

पेस्तन काका
गुरुवार, 12/26/2013 - 15:11 नवीन
गुलाबजाम आणि बासुंदी खाउन आजीबात जळजळ होते हे अजीबात खरे नाही. दोघेही आतिशय शीत मिष्टान्न आहेत. बाकी वृतांत फक्कड जमलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

वा..!!!

प्रचेतस
गुरुवार, 12/26/2013 - 14:42 नवीन
वा..!!! खुसखुशित वृत्तांत. स्वादच्या आमच्या कट्ट्याची आठवण झाली आणि मोदकाने संपवलेल्या बासुंदीच्या वाट्यांची. =))
  • Log in or register to post comments

अरे वा तुमचा कट्टा कधी झाला

माझीही शॅम्पेन
Sun, 12/29/2013 - 22:36 नवीन
अरे वा तुमचा कट्टा कधी झाला म्हणायचा , मागे आम्ही , गवि , रामदास काका , स्पा , विमे , माउ, सूड आणि बाकी काही ह्याचा पावसाळ्यात स्वाद मध्ये एक जबरा कट्टा झाला होता.. आनाहिता कट्टा पण छान झाला अस दिसतोय , वृतांत आवडला आणि पु-क-शु :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

जरा थांबा.

सूड
गुरुवार, 12/26/2013 - 14:50 नवीन
मुकटा नेसून येतो हो प्रतिसाद द्यायला!! ;)
  • Log in or register to post comments

बायकांचा कट्टा. एव्हढा काही

राही
गुरुवार, 12/26/2013 - 16:12 नवीन
बायकांचा कट्टा. एव्हढा काही सोवळा झाला नसावा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अभिनंदन.

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 12/26/2013 - 14:51 नवीन
ज्जे बाSSत. हार्दिक अभिनंदन. उपहारगृहाच्या मालकाचे (किंवा मॅनेजरचे) टेन्शन घेऊ नये. दर अर्ध्या तासाने तो कांही सांगायला आला की एखाद दुसरा चहा मागवावा. बिचारा, मुकाट परत जातो. पुढील कट्ट्यास अनेकानेक शुभेच्छा..!
  • Log in or register to post comments

व्वा!!!!

मुक्त विहारि
गुरुवार, 12/26/2013 - 14:59 नवीन
छानच झालेला दिसतोय कट्टा....
  • Log in or register to post comments

अनाहिता रॉक्स!

यशोधरा
गुरुवार, 12/26/2013 - 15:01 नवीन
मस्त वृत्तांत आणि फोटो! :)
  • Log in or register to post comments

वृत्तान्ताची इष्टाईल आवल्डी!

ऋषिकेश
गुरुवार, 12/26/2013 - 15:04 नवीन
:) वृत्तान्ताची इष्टाईल आवल्डी! :)
  • Log in or register to post comments

उत्तम वृत्तांत!!

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 15:06 नवीन
उत्तम वृत्तांत!!
  • Log in or register to post comments

जियो !!!! लै भारी अजुन भरवा

पियुशा
गुरुवार, 12/26/2013 - 15:10 नवीन
जियो !!!! लै भारी अजुन भरवा कटटे होउ दे खर्च मिपा आहे घरच ;)
  • Log in or register to post comments

वृत्तांत आवडला !

मदनबाण
गुरुवार, 12/26/2013 - 15:11 नवीन
वृत्तांत आवडला ! जाता जाता :- माउ ताईचा गाल प्रत्येक नव्या फोटुत अजुनच फुगीर कसा दिसतो ? ते आज बासुंदी व गुलाबजाम पाहुन लक्षात आले. :P
  • Log in or register to post comments

अरे, मी हसले की तसं दिसतं...

कवितानागेश
गुरुवार, 12/26/2013 - 15:41 नवीन
अरे, मी हसले की तसं दिसतं... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण

वा वा ! मस्तच झालेला दिसतोय

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 12/26/2013 - 15:11 नवीन
वा वा ! मस्तच झालेला दिसतोय कट्टा !!
  • Log in or register to post comments

आमच्या गप्पा बघून खरोखरच मालक

कवितानागेश
गुरुवार, 12/26/2013 - 15:13 नवीन
आमच्या गप्पा बघून खरोखरच मालक टेन्शन्मध्ये होते बिच्चारे. एक आजोबा सविताला विचारत होते की हा कुठला ग्रुप आहे तुमचा? पण तिनी पत्ता लागू दिला नाही! ;) आमचं सोवळ्यातलं असतं ना सगळं.... =)) मिस कल्लोळ, सानिकानी आपल्यासाठी खाउ आणला होता हे सांगितलच नाहीस गं. :)
  • Log in or register to post comments

"सानिकानी आपल्यासाठी खाउ आणला होता......"

मुक्त विहारि
गुरुवार, 12/26/2013 - 15:20 नवीन
ह्या वाक्याने मात्र जळजळ झाली आहे.... जळवा तिच्यायला.... ओके...ठीक आहे.... पेठकर काका पुढच्या महिन्यात येत आहेत.... तेंव्हा ह्या वाक्याचे साग्रसंगीत उट्टे काढल्या जाईल.... (आपले काय जाते, (खरोखरच्या) हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायला.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

पेठकर काका आमच्यासाठी पण

त्रिवेणी
गुरुवार, 12/26/2013 - 15:32 नवीन
पेठकर काका आमच्यासाठी पण आणणार आहेत खाऊ. होय की नी हो पेठकर काका?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सर्वे ऽ पि सुखिनं संतु...

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 12/26/2013 - 21:09 नवीन
सर्वसाक्षींना भेटा. मागिल कट्ट्याचे वृत्तांत मिळतील. असो. सर्व कट्टोपासक सदस्यांना जाहिर निमंत्रण मिळेलच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: त्रिवेणी

काका

मी-सौरभ
Fri, 12/27/2013 - 22:47 नवीन
खाऊ नाही पिऊ आणा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सर्वांत प्रथम सानिकाची माफी

भावना कल्लोळ
गुरुवार, 12/26/2013 - 15:49 नवीन
एवढा आठवणीने आमच्या साठी खाऊ आणला आणि मी विसरले वृत्तांता मध्ये लिहण्यास, (जोहार मायबाप जोहार), काय करणार वृत्तांत लवकर लिहीण्याच्या घाईत. (जाऊ दे लहान बहिण समजून माफ कर हो सानिका ;) ) आणि हो माऊताई एवढ्या गोंधळात कळलेच नाही त्या आजोबांनी कधी विचारले ते. राहिले थाळी साधी असण्याचे तर मिपाबंधुनो जसा विचार तसा आहार…… आम्ही साऱ्याचजणी तश्या सोज्वळ, सात्विक म्हणून रविवार असूनही साधी थाळीच. ( घरी जाऊन बापुशी आणि नवरोबाने केलेले मस्त पैकी कोंबडी रस्सा आणि भात हाणला तेव्हा रविवार कुठे तरी सार्थकी लागला हे कोणास सांगणे न लागे). तश्या आम्ही खुपच साध्या बाई …. हो कि नाही ग गर्ल्स्स ….
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

(जोहार मायबाप जोहार) ??????

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 12/26/2013 - 16:30 नवीन
(जोहार मायबाप जोहार) ??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भावना कल्लोळ

तो अभिवादनार्थ वापरला जाणारा

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 16:57 नवीन
तो अभिवादनार्थ वापरला जाणारा वाक्प्रचार आहे. क्षमायाचनेसाठी नव्हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

तू गप रे. तुझे लग्न झाले आहे

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 12/27/2013 - 13:25 नवीन
तू गप रे. तुझे लग्न झाले आहे का? नाही ना. मग जोहारच बरोबर !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

(No subject)

नित्य नुतन
Fri, 12/27/2013 - 13:54 नवीन
*ROFL* *HAPPY* *new_russian* *clapping* *wink*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

आयमाय स्वारी हां विमेकाका

बॅटमॅन
Fri, 12/27/2013 - 14:23 नवीन
आयमाय स्वारी हां विमेकाका =)) आता जालीय जोहारच करतो, कसें ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

लय भारी............

जेपी
गुरुवार, 12/26/2013 - 15:18 नवीन
लय भारी............
  • Log in or register to post comments

मस्तच...

ब़जरबट्टू
गुरुवार, 12/26/2013 - 15:22 नवीन
मस्त वृत्तांत आणि फोटो! बा़की सोहळा एवढा मोठा, पण थाळी त्या मानाने साधी की हो... ( पळायचा रस्ता शोधलेला आहे.. :) ) जाता जाता.. :- या कधीतरी आमच्या पुण्याच्या दुर्वांकूर ला :))
  • Log in or register to post comments

अरे पण ह्यातल्या

दिपक.कुवेत
गुरुवार, 12/26/2013 - 15:25 नवीन
कोण कुठल्या अनाहिता ते नावानीशी सांगा कि. एक माउतै सोडली तर (ते सुध्दा तीच्या गाल आणि बॉबकट मुळे) बाकि काय ओळखु येई ना.
  • Log in or register to post comments

मस्त वृत्तांत!

पैसा
गुरुवार, 12/26/2013 - 15:28 नवीन
तुम्ही मुंबैकर आणि पुणेकर खरे तर "महा" कट्टा भरवू शकता असाच!
  • Log in or register to post comments

तुम्ही मुंबैकर आणि पुणेकर खरे तर "महा" कट्टा भरवू शकता ......

मुक्त विहारि
गुरुवार, 12/26/2013 - 15:35 नवीन
काय बोलणार? आता तुम्ही काडी टाकलीच आहे, मी पण एक काडी टाकतो.... इ,ए. साक्षी आहेत. मुंबईकर कट्टा करायचे ठरवतात आणि ऐनवेळी कित्तीही संकटे आली तरी पार पाडतात.लोकेशन बदलले,वेळ बदलली, तरी मुंबईकर मागे हटत नाहीत.हे पुणेकरांचे मात्र काही खरे नसते. आता येतात सगळे पुणेकर अंगावर...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

बस का मुविकाका..जेमतेम २/३

प्रचेतस
गुरुवार, 12/26/2013 - 15:38 नवीन
बस का मुविकाका..जेमतेम २/३ तासांत कट्टा ठरवून सुद्धा १० जण जमले होते आणि ते पण वर्किंग डे ला आणि ते पण ठिकाण आधी फिक्स नसताना. =)) एक्का काका साक्षी आहेतच. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+१

बॅटमॅन
गुरुवार, 12/26/2013 - 15:39 नवीन
सहमत =)) अन असे कितीक कट्टे झालेत, अन होतही राहतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

बा़की सोहळा एवढा मोठा, पण

त्रिवेणी
गुरुवार, 12/26/2013 - 15:29 नवीन
बा़की सोहळा एवढा मोठा, पण थाळी त्या मानाने साधी की हो... >>>>>>>>>>>> थाळी सुद्धा आम्हा अनहितासारखीच साधी, सरळ आहे. लय भारी गं अनहितानो.
  • Log in or register to post comments

भावना.. खाली इनोची पाकीटं

पिलीयन रायडर
गुरुवार, 12/26/2013 - 15:37 नवीन
भावना.. खाली इनोची पाकीटं लावायचीस ग धाग्याला.. आणि एक तीट पण.. !!
  • Log in or register to post comments

मस्तच गो हेमा

सविता००१
गुरुवार, 12/26/2013 - 16:13 नवीन
लै जबरी लिवलंय! खरचच भन्नाट मज्जा आली. पहिल्यांदाच सगळ्या जणींना भेटत असूनही असा काही गप्पांचा फड जमला होता की बास. त्या हॉटेल मॅनेजर/ मालकाचा चेहरा आठवतोय अजुन. बिचारे दर वेळी यायचे आणि या काही एवढ्यात जात नाहीत याची खात्री पटून अधिकाधिक कष्टी व्हायचे. होतील नाहीतर काय! हॉटेलबाहेर ही रांग लागलेली आणि आम्ही उठायचं नाव घेत नव्हतो. बाकी जे आजोबा विचारत होते नं, की कुठला ग्रूप तुमचा? ते दोघे (आजोबा-आजी)खरच आमचं एकत्र येणं आणि दंगा करणं जाम एन्जॉय करत होते. एकदम नॉस्टॅल्जिक झाले होते बहुतेक. दोघं जाम गोड हसत होती आमच्याकडे बघून. सांगणार तरी काय त्यांना? पहिल्यांदा भेटलोय आज म्हणून???????????
  • Log in or register to post comments

दंगा

सखी
गुरुवार, 12/26/2013 - 21:45 नवीन
दंगा आणि मजा मस्तच केलेली दिसतेय पोरींनो....अनाहीतावरपण आजी+आजोंबाबद्द्ल वाचुन एका चांगल्या कट्ट्याला येता आले नाही याची हळहळ वाटलीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

आताच १००० इनो पाकिटाची ऑडर

भावना कल्लोळ
गुरुवार, 12/26/2013 - 16:13 नवीन
आताच १००० इनो पाकिटाची ऑडर दिली आहे आणि हे घे . लावले आहे…. पिरे तेरे लिये कुछ भी यार ….
  • Log in or register to post comments

खुसखुशीत

राही
गुरुवार, 12/26/2013 - 16:16 नवीन
खुसखुशीत वृत्तांत आवडला.
  • Log in or register to post comments

काय खाउ आणला होता?

युगन्धरा@मिसलपाव
गुरुवार, 12/26/2013 - 16:18 नवीन
काय खाउ आणला होता?
  • Log in or register to post comments

चोकलेट, हि एवढी एवढी मोठाली

भावना कल्लोळ
गुरुवार, 12/26/2013 - 16:21 नवीन
चोकलेट, हि एवढी एवढी मोठाली पाकीट आणली होती.
  • Log in or register to post comments

चॉकोलेट्स

सविता००१
गुरुवार, 12/26/2013 - 16:21 नवीन
खूप खूप चॉकोलेट्स आण्ली होती सानिकाने. जामच खूश सगळ्या जणी. आणि ती पॅकेट्स पाहिल्यावर छोट्या बाहुल्यांचे चेहरे तर केवळ सुंदर, अप्रतिम :)
  • Log in or register to post comments

+१,

भावना कल्लोळ
गुरुवार, 12/26/2013 - 16:35 नवीन
हो तर सवे … माझा चेह्ऱ्यावरचा आनंद हि किती ओसांडून वाहत होता न, बादवे … आमच्याकडचे पाकीट संपवण्यातहि आलेले आहे. कोणी ते विचारू नये…. खिक .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सविता००१

स्टेशनवर आल्यावर एकमेकींना

अजया
गुरुवार, 12/26/2013 - 16:28 नवीन
स्टेशनवर आल्यावर एकमेकींना ओळखायचे कसे? याचे उत्तर माऊताईने दिले होते ,जिथे काही मुली अतिशय आनंदाने जोरजोरात गप्प मारताना दिसतील तो ग्रुप.हॉटेलमध्ये भेटल्यावर आम्ही तिचे उत्तर खर्या अर्थाने सार्थक केले.थाळी गप्पा मारता मारता कधी रिकामी झाली ते कळले नाही मग गोड खायचे टुम निघाली.ते बर्यापैकी उशिराने येउनही गप्पांची भूक काही भागेना,मग माऊताईच्या निमित्ताने चहा घ्यायचे पण चालले होते पण हॉटेलमालकांनी खरच खणानारळांनी ओटी भरुन ,हाताला धरुन बाहेर काढले असते म्हणुन आवरावे लागले पण हॉटेलबाहेर परत गप्पासत्र चालु!!
  • Log in or register to post comments

स्टेशनवर आल्यावर एकमेकींना

अजया
गुरुवार, 12/26/2013 - 16:28 नवीन
स्टेशनवर आल्यावर एकमेकींना ओळखायचे कसे? याचे उत्तर माऊताईने दिले होते ,जिथे काही मुली अतिशय आनंदाने जोरजोरात गप्प मारताना दिसतील तो ग्रुप.हॉटेलमध्ये भेटल्यावर आम्ही तिचे उत्तर खर्या अर्थाने सार्थक केले.थाळी गप्पा मारता मारता कधी रिकामी झाली ते कळले नाही मग गोड खायचे टुम निघाली.ते बर्यापैकी उशिराने येउनही गप्पांची भूक काही भागेना,मग माऊताईच्या निमित्ताने चहा घ्यायचे पण चालले होते पण हॉटेलमालकांनी खरच खणानारळांनी ओटी भरुन ,हाताला धरुन बाहेर काढले असते म्हणुन आवरावे लागले पण हॉटेलबाहेर परत गप्पासत्र चालु!!
  • Log in or register to post comments

बाकी सोवळ्यातल्या

अजया
गुरुवार, 12/26/2013 - 16:40 नवीन
बाकी सोवळ्यातल्या अनाहितांच्या कट्ट्याचा ओवळ्यातला व्रुत्तांत खूप आवडला,भावना . :)
  • Log in or register to post comments

झकास वृतांत

स्पा
गुरुवार, 12/26/2013 - 16:54 नवीन
झकास वृतांत बाकी "गॉसिप" काय झाले तेही येउंद्यात :D
  • Log in or register to post comments

आलंय की.

कवितानागेश
गुरुवार, 12/26/2013 - 17:06 नवीन
आलंय की. पण त्यो धागा "हिकडं" न्हाय! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

गॉसिप्,इथे नाही!!

अजया
गुरुवार, 12/26/2013 - 17:42 नवीन
आमचं म्हणुन काय तरी आहे ना पेशल,अनाहितावर;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

@स्पा -

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 12/26/2013 - 23:46 नवीन
@स्पा - बाकी "गॉसिप" काय झाले तेही येउंद्यात>>> =)) पांडू अता तूझं Image removed. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा