एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !
एका गारुड्याची गोष्ट १ : पुण्याचे पत्ते - माझा छंद !
एका गारुड्याची गोष्ट २ : विद्यार्थी बनतो सापवाला !
एका गारुड्याची गोष्ट ३ : सर्पोद्यान चे कॉल म्हणजे काय रे भाऊ...फक्त राजाभाऊ !
एका गारुड्याची गोष्ट ४: साप पकडणे !
एका गारुड्याची गोष्ट ५: सापांची ओळख- नाग.
एका गारुड्याची गोष्ट ६: नागपंचमी चे विदारक सत्य !
एका गारुड्याची गोष्ट ७: नाग: अंधश्रद्धेचा बळी !
मनातलं एका गारुड्याची गोष्ट ८: नाग: माझे कॉलचे अनुभव
एका गारुड्याची गोष्ट ९: मण्यार: पडद्यामागचे कलाकार !
आपल्या मध्ये जसे (जाती-)जमाती प्रकार असतो,तसाच सापांमध्ये पण असतो. (अजून साप आपल्या एवढे प्रगत नाही म्हणून त्यांच्या मध्ये जाती नसतात.) नेपाळी गुरखा म्हणले की कसे "शलाम साब" डोळ्यासमोर उभे राहते, अंबानी म्हणले की "बिजिनेस" ऐकू येते आणि "गांधी" ऐकले की "राजकारण" दिसते, तसेच सापांचे पण असते.
नाग हा "येलापिडे (Elapidae)" या ("सौथ इंडियन अण्णा") कुटुंबातील असतो, यामध्ये चष्मा नाग, राज नाग (किंग कोब्रा) ते आफ्रिकन मंबा आणि शेवटी मण्यार पर्यंत अनेक विषारी साप येतात. या सर्व बंधू भावांची वर्तणूक, त्यांचे विषाचे परिणाम साधारण पणे सारखेच असतात. पुण्यात जसे "घराच्या पत्त्यावरून" त्या कुटुंबाच्या स्वभावाचा किंवा वर्तनाचा अंदाज लावता येतो तसेच एकदा का 'येलापिडे' सापडला की पुढचे अंदाज बांधता येतात. म्हणूनच आधीच्या दोन्ही लेखात मी नाग आणि मण्यारची ओळख करून दिली आहे.
त्याच प्रमाणे घोणस आणि फुरसे हे एकाच कुटुंबातील जत्रेत हरवलेले करन- अर्जुन आहेत (जमात: व्हायपरीडे-Viperidae) त्यामुळे त्यांचे दोघांचे स्वभाव,(हो सापांना पण स्वभाव असतात.) त्यांच्या दंश करण्याच्या पद्धती, लुक्स जवळपास सारखेच असते.
घोणसाला, एका स्कॉटिश फिरंग संशोधकाने शोधून काढले म्हणून त्याला त्याचे नाव 'रसेल व्हायपर' (Patrick रसेल) दिले गेले.
हा साप म्हणजे "अमेरिकन अपाची" हेलिकॉप्टर सारखा..सगळ्या अस्त्रांनी सज्ज आणि लपून राहण्यात पटाईत.
खात्या पित्या घरचा साप, ग्राईप वाटर च्या जाहिरातीमधल्या बाळासारखा गुटगुटीत असतो. उगाचच झाडावर चढ,छपरात घूस असे उरफाटे प्रकार हा करत नाही. आपला गप गवतात लपून राहतो आणि डब्बा उडवायला कोणी आला की 'इस्टोप' करून टाकतो. अंगावरील नक्षी ही त्याला निसर्गाने दिलेले बर्थडे गिफ्ट आहे, त्यामुळे पिवळ्या पडलेल्या गवतामध्ये असला तर कधी कधी पाय पडे पर्यंत दिसत नाही.
हा साप नागासारखा जंटलमन असल्याने, आधी वार्निंग द्यायला प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा खर्जातला सूर लावतो. त्या सुरात इतकी बेक्कार वार्निग असते की, जो तो सूर ऐकतो त्याला डायरेक्ट ए.मे.सी.बी च्या ट्रान्सफोर्मार वरची कवटी दिसते.
"माझ्या सुरवातीच्या काळात, एका बांधकामाच्या कामचलाऊ गोदामात दोन घोणस असल्याचा कॉल होता. राजाभाऊंनी एक घोणस पकडून पिशवीत टाकला होता आणि मी दुसरा शोधात होतो. प्रेशर कुकर च्या शिट्टी सारखा आवाज येत होता आणि इतक्यात कोणीतरी गोदामाच्या छताचा सांधा हलवला आणि आख्खे छत खाली आले. धुराळा उठला, त्याच अंधारात मी टारझन सारखे दोन्ही हाताने छत पकडले. त्या धुराळ्यात तो प्रेशर कुकर चा आवाज येत होता पण मला काहीच दिसत नव्हते. तेंव्हा भीती वाटून पण उपयोग नव्हता, त्यांमुळे त्या आवाजाचा मी आध्यात्मिकपातळीवर ;) आनंद घेतला. नंतर तो आवाज हळू हळू कमी होत गेला, मग माणसे आली, छत उचलले वगैरे. पुढे आयुष्यात असे (घोणस बरोबरचे)एकांतातील क्षण फार कमी आले.(भाग ४) "
इंजेक्शनच्या सुई सारखे पोकळ, १६ एम.एम. चे दोन विषाचे दात हे घोणसाचे मुख्य अस्त्र ! हे दात हायपो-डर्मिक सुई सारखे पोकळ असून विष ग्रंथिना जोडलेले असतात. (मोसादच्या) बेरेत्ता पिस्तुलातील म्यागझीन सारख्या याच्या जबड्यात ५-६ दाताच्या जोड्या असतात, एक फायर झाली की दुसरा तयार. त्यातून ते दात फोल्डिंग चे असतात, म्हणजे छत्रीत गुप्ती ठेवतो ना तसे...काम तमाम झाले की गुप्ती छत्रीच्या दांड्यात !
पहिला फोटो घोणसाचे विष काढतानाचा आणि दुसरा त्याच्या डोक्याची रचना दाखवणारा.
नाग हा फण्याच्या समोरच्या बाजूला म्हणजे साधारण पणे १८० अंशात हल्ला करू शकतो तर घोणस ३६० अंशात कुठे पण हल्ला करू शकतो....म्हणजे दिवाळी मध्ये भुईनाळा फेल गेला ही कसा फिरतो, तसाच हल्ला करताना घोणस फिरतो.
त्यामुळे तुम्ही पहिले असेल तर, नागांचे चुंबन घेणारे खूप लोकं असतात पण घोणसाच्या वाटेला जात नाही.(जगात चुंबन घ्यायला एवढ्या सुंदर गोष्टी असताना, लोकं इंटर-स्पेसियल रिलेशन मध्ये का पडतात कोण जाणे?) गारुडी, थाईलंडवाले सापवाले पण घोणसाच्या खेळापासून जास्त करून दूरच राहतात.
डोळ्याची पापणी लवते न लवते तो पर्यंत जीवा महाला ५ हातावरचे लिंबू पट्ट्याने उडवून जागेवर यायचा,याच कुळीतला घोणस असतो. १/३ सेकंदात: "तोंड उघडून -विषदंत बाहेर काढून -दंश करून -विष सोडून - दात मिटून -परत जागेवर".. या सगळ्या क्रिया होतात.( मला हे वाक्य लिहायला पण ३० सेकंद लागली.) हा व्हिटेकर सर्पतज्ञांचा व्हिडिओ बघा: घोणसाचा हल्ला. .हाय-स्पीड कॅमेरा मध्ये त्यांनी घोणसाचा हल्ला चित्रित केला आहे. )
वरती लिहिल्याप्रमाणे या जमातीचे विषपण नागापेक्षा वेगळ्या प्रकारचे म्हणजे हिमो-टोक्सिक असते. साधरण पणे १३० ml तो २५० ml म्हणजे पाउण ते आख्या (कुकिंग) कप एवढे विष टोचू शकतात, त्यातले माणसाला पाव कप विष ढगात पोचवायला पुरेसे असते.
हे विष मुख्य करून रक्ताभिसरण संस्थेवर (तर नागाचे मज्जासंस्थेवर) हल्ला करते, थोडक्यात म्हणजे रक्ताचे पाणी करते. रक्ताची गुठळ्या करायची क्षमता गंडल्यामुळे शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागतो. पहिल्यांदा हिरड्या मधून रक्त चालू होते,नंतर मिळेल त्या भागातून रक्त पडू लागते...रक्त दाब कमी होऊ लागतो आणि शेवटी किडनी फेल होऊन रुग्ण दगावतो. अमेरिकन झोंबी हा (हिडीस) प्रकार पहिल्या वर मला घोणस चावलेला आणि अगदी शेवटच्या स्टेज मध्ये असलेला माणूस आठवला होता.
त्यातला घोणस म्हणजे सैन्यातील "स्नायपर" !(enemy at the gates मधला व्हासिली आठवा.)घोणस (विषारी): सोनेरी-बदामी रंगावर काळपट ठिपक्यांची वेलबुट्टी, जसा काही पैठणीचा पदर काठ. तळपता बाण डोक्यावर रेखलेला आणि कॉलेज मधल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारे हार्ट-शेप डोके.

ज्यांना हा साप चावला आहे त्यांच्या भाषेत,"उकळते तेल शरीराच्या आत मध्ये इंजेक्शन ने टोचायचे- म्हणजे घोणसाचा चावा !"माणूस वाचला तरी, ज्या जागी घोणस चावतो तिकडचे टिशू जळून जातात. अशी घोणसाची कृपा झाली की त्याची परिणीती हाता-पायाची बोटं किंवा हात-पाय गमावण्यात होते. लान्सेत या मेडिकल जर्नलच्या मते जी कोणी माणसे घोणस चावून वाचतात, त्यातील २६% लोकांची पिटूटरी ग्यांडची वाट लागते आणि मग त्यांचा हार्मोनल-लोचा होतो. घोणस चावून वाचलेला माणूस जर कधी पहिला पहिला तर हे डिस्कवरी प्रेरित सर्पमित्र कधी सापाशी खेळ करायची हिम्मत करणार नाहीत. हा व्हिडिओ बघा: विषाचे रक्तावर परिणाम "कूच डाग भी अच्छे होते है!" याच चालीवर हे घोणसाचे विष मेडिकल क्षेत्रात खूप ठिकाणी वापरले जाते. "Dilute Russell's viper venom time (dRVVT)" ही पद्धत हॉस्पिटल मध्ये वापरून रक्ताची गुठळ्या करण्याची क्षमता तपासली जाते. २००५ सालची एक सकाळ...मी सर्पोद्यान मध्ये एक स्नेक-पिट साफ करत होतो, इतक्यात एक माणूस पळत आला, त्याने डोक्यावर दोन्ही हाताने साप पकडला होता (लावणीवाली बाई पदर पकडते तसा !)..."अहो अजगराचे पिल्लू पकडून आणले आहे, कुठे सोडू ?" मी दृश्य बघताच, हादरलो...३ फुटी चकचकीत घोणस त्याने हातात डोक्याजवळ पकडला होता, चावला असता तर औषध द्यायला पण वेळ मिळाला नसता. मी आधी त्याच्या पासून लांब झालो आणि त्याला, जमिनीवर त्या अजगराला (घोणसाला!) टाकायला सांगितले. (नंतर स्नेक स्टिक ने नीट उचलून त्याला घोणसाच्या पिट मध्ये टाकले.)..."काय हो, तुम्ही एवढे सर्पोद्यान चे असून अजगराला घाबरता , बारामती ला एसटी मध्ये चढलो या बेन्याला (अजगराला) घेऊन, मध्ये मध्ये पोत्यांमधून डोके काढायचा ...की द्यायचो एक टप्पू ठेवून, असाच आणला याला इकडे स्वारगेट वरून .... मी काहीच बोललो नाही,मला फक्त राजाभाऊंचे (मूळ वाक्य:जिम कार्बेट) वाक्य आठवले "अज्ञानात नेहमीच सुख असते ! " पुढच्या लेखात फुरसे ... (या लेखातले सर्व फोटो अंतरजालावरून आणि चिराग रॉय कडून घेतले आहेत.त्यांना कुठल्या पद्धतीने बदलण्यात आले नाही.)
Book traversal links for एका गारुड्याची गोष्ट १०: घोणस: गवतात लपलेला स्नायपर !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
@स्वॅप्स -
लेखनशैली खूप आवडली. माहिती
क
वीदीओ ज ब र द स्त आहेत.
वीदीओ ज ब र द स्त आहेत.
जब्राट
धन्यवाद्!
मस्त.. शेवटचा प्रसंग तर फारच
घोणस...
माझ्या अनुभवाची भर घालतो,