✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी !

र
राजु भारतीय यांनी
Wed, 10/30/2013 - 20:06  ·  लेख
लेख
माझी पार्श्वभूमी : १) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण. २) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली. ३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय. ४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती. ५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे . ६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब. राम मंदिर हे आंदोलन अनावश्यक असून देशाचा घात करणारे आहे असा सुरुवाती पासून राष्ट्रीय अधिका-याशी मतभेद होता. बाबरी उध्वस्त करण्याने देशाचे अपरिमित नुकसान झाले अशी भावना- जे सत्य आहे. संघाची ती अत्यंत क्रूर- केवळ-राजकीय खेळी होती. काम करत असताना बरेच न पटणारे मुद्दे येत होते. पण सगळे आपल्याला वाटते ते तसेच व्हावे असे नव्हे - असे स्वत:ला समजावत पुढे गेलो …. राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल. सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा. त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे. सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही. अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची. समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते. संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत. भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धर्म
इतिहास
समाज
राजकारण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
सद्भावना
अनुभव
मत
शिफारस
सल्ला
माहिती
मदत

प्रतिक्रिया द्या
41767 वाचन

💬 प्रतिसाद (275)

प्रतिक्रिया

.

उद्दाम
गुरुवार, 10/31/2013 - 12:22 नवीन
भाजपेयी , मोदी, संघाचे फुकटे ब्रह्मचारी स्वयंसेवक आधी यांची लग्ने तरी लावा. मग बाकीच्यांच्या ३ पोरांचं बघूया. --------------- एकमेव पोरीचा बाप असलेला पं. उद्दामलाल महामेरु

का पेटताय एवढे जर वैस दमानी

बलि
गुरुवार, 10/31/2013 - 12:26 नवीन
का पेटताय एवढे जर वैस दमानी घ्या … :)
↩ प्रतिसाद: उद्दाम

@ बलि....

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 12:39 नवीन
जावूद्या हो... त्यांचे हे नेहमीचेच आहे... विषय समजावून घेता काहीतरी लिहीत बसतात.सिक्क्षनाचे असे पण परीणाम... बाकी उद्दाम साहेब हे १००% हिंदू आहेत असेच मला वाटते.त्यांचा हिंदू धर्माचा अभ्यास सुरु आहे.
↩ प्रतिसाद: बलि

.

उद्दाम
गुरुवार, 10/31/2013 - 12:45 नवीन
आता यात मी चुकीचे काय बोललो? तेच बोलले ३ पोरं काढा म्हणून. मग आधी त्यांच्या लोकांची लग्नं तरी लागायला नकोत का? इतकेच तर मी बोललो.
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

@ उद्दाम

अनिरुद्ध प
गुरुवार, 10/31/2013 - 13:07 नवीन
आपला मुद्दा योग्यच आहे पण ईतक्यातच आपण हा मुद्दा काढल्याने,वैचारिक नसबन्दीचा गळा घोट्ला जातोना,मग धागा ३००+ कसा होईल तुम्ही अशी हवा काढुन घेतल्यावर?
↩ प्रतिसाद: उद्दाम

उद्दाम साहेब एखादा नेता

बलि
गुरुवार, 10/31/2013 - 13:07 नवीन
उद्दाम साहेब एखादा नेता अविवाहित आहे म्हणजे पूर्ण संघटना अविवाहित असेल असा पोरकट विचार का करताय . अविवाहित आहेत म्हणून त्यांना फुकटे म्हणणे तुमच्या सारख्यांना शोभा देत नाही . ज्यांना परवडत असेल ते काढतील ३ पोरं . तुम्ही थंड घ्या कि जरा :)
↩ प्रतिसाद: उद्दाम

@ बलि...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 13:18 नवीन
"उद्दाम साहेब एखादा नेता अविवाहित आहे म्हणजे पूर्ण संघटना अविवाहित असेल असा पोरकट विचार का करताय." अहो ते नेहमीच असे उच्च विचार करतात...
↩ प्रतिसाद: बलि

हुच्च????

टवाळ कार्टा
गुरुवार, 10/31/2013 - 17:01 नवीन
हुच्च???? :)
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

.

उद्दाम
गुरुवार, 10/31/2013 - 13:33 नवीन
पूर्ण संघटना अविवाहित आहे, असे मी लिहिलेलेच नाही. जे अविवाहीत आहेत, त्यांची लग्णं तरी लावा आधी, इतुकेच म्या लिहिले. संघाचे स्वयंसेवक वार लावून जेवतात, असे ऐकून आहे.
↩ प्रतिसाद: बलि

मिपावर बरेच जण ते लहान असताना

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/31/2013 - 14:33 नवीन
मिपावर बरेच जण ते लहान असताना शाखेत जात असे म्हणतात. त्याना विचारले पाहीजे की तेव्हा ते वारावर जेवत होते का ते.
↩ प्रतिसाद: उद्दाम

हो

आनन्दा
गुरुवार, 10/31/2013 - 17:15 नवीन
आणि ते घर सोडून समाजासाठी पूर्णवेळ राबतात.. त्यांच्या राबण्यासमोर वारावर जेवण्यासाठी मालकाला येणारा खर्च नगण्य आहे. जरा ८ दिवस असे बाहेर राहुन बघा.. म्हणजे कळेल.
↩ प्रतिसाद: उद्दाम

@ आनंदा....

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 20:20 नवीन
+ १ रात्रं दिवस उन्हा तान्हात राबतात ते दिसत नाही. आमच्या कडे प्रचारक जेवायला यावा म्हणून आम्ही अजून पण जीवाचा आटा-पिटा करतो. ४ दिवसांत त्यांना ४०० बोलावणी असतात.जावू दे, संघाचा प्रचारक , ही काय गोष्ट आहे, हे त्यांना कधीच समजणार नाही.
↩ प्रतिसाद: आनन्दा

.

उद्दाम
Fri, 11/01/2013 - 09:19 नवीन
कोंचं गाव हो? आमच्याकडची शाखा २० वर्शापूर्वीच बंद पडली.
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

आमच्या झुमरीतलैय्या बुद्रुकला

ध्यानस्थ बगळा
Fri, 11/01/2013 - 17:36 नवीन
आमच्या झुमरीतलैय्या बुद्रुकला शाखा चालू असते... प्रचारकाला आधी कोन जेवायला घालणार यावरुन दंगल पेटते.
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+१

कॅप्टन जॅक स्पॅरो
Sat, 11/02/2013 - 23:34 नवीन
+१ अहो खांग्रेस च्या पिल्लावळीला काय कळणार संघमहात्म्य? :).
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

असेल बुवा. आम्ही तर कधी

श्रीगुरुजी
गुरुवार, 10/31/2013 - 20:27 नवीन
असेल बुवा. आम्ही तर कधी असल्या अफवा ऐकल्या नाहीत. समजा हे खरं असलं तरी आपल्या संघटनेतल्या इतर स्वयंसेवकांकडे जेवण्याने देशाच्या तिजोरीवर भार येत नाही किंवा करदात्यांचा पैसा वापरला जात नाही. साधी सर्दी झाली तरी जनतेच्या खर्चाने विमानाच्या प्रथम वर्गातून अमेरिकेत जाऊन उपचार घेऊन वर त्यागमूर्ती म्हणून मिरविण्यापेक्षा वार लावून जेवणे हे कितीतरी पटीने चांगले.
↩ प्रतिसाद: उद्दाम

तुम्हाला आहे ना एक मुलगी,

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 11/02/2013 - 15:02 नवीन
तुम्हाला आहे ना एक मुलगी, द्या एखाद्या होतकरू संघ स्वयंसेवकाला… नाही तरी तुम्हाला त्यांच्या (संघ वाल्यान्च्या) लग्नाची इतकी चिंता आहेच… एका दगडात दोन पक्षी !!!
↩ प्रतिसाद: उद्दाम

च्यायला पेटलेत विमे.

मृत्युन्जय
Wed, 11/06/2013 - 18:03 नवीन
च्यायला पेटलेत विमे.
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

अहो ते एका आयडी चे असतील तर

चेतनकुलकर्णी_85
Wed, 11/06/2013 - 16:59 नवीन
अहो ते एका आयडी चे असतील तर खरा पत्ता व नाव सांगणार ना =))
↩ प्रतिसाद: उद्दाम

मिपा

तिमा
गुरुवार, 10/31/2013 - 12:41 नवीन
मिपा प्रशासनाने अशा विषयांना बंदी घालावी. कारण एखाद्याने जरी अतिरेकी प्रतिसाद दिला तरी आपले प्रिय संस्थळ संकटात येईल अशी मला भीति वाटते.

भोंदू

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 10/31/2013 - 13:29 नवीन
राSSSSSSSSSSजू राजूSSS कहाँ गया तू.. अत्यंत डुप्लिकेट लेख वाटतो आहे. राजू वरच्या प्रश्नांस उत्तर द्यावेसे वाटत नाही का? थोडावेळ टेलेब्रँडची जाहीरात पाहील्यासारखे वाटत होते. आधी असे असे अमूक अमूक होत होते आणि आता कसे ते सोडल्यावर चान चान आहे.

वाचले ....भावना पोचल्या ...

सुहास..
गुरुवार, 10/31/2013 - 13:44 नवीन
वाचले ....भावना पोचल्या ....योग्य ठिकाणी पोचवाण्याची व्यवस्था करा .....

@@वरील विचार मंथन हे राजू

यसवायजी
गुरुवार, 10/31/2013 - 13:49 नवीन
@@वरील विचार मंथन हे राजू भारतीय ह्यांच्या बरोबर होत असल्याने, मुद्दाम गहन विचार करणार्‍यांनी मध्येच तोंड खूपसू नये, ही विनंती. >> फक्त राजू भारतीय यांच्याबरोबर चर्चा करायची असल्यास खफ किंवा व्यनी आहेच की. *SCRATCH*

.

उद्दाम
गुरुवार, 10/31/2013 - 13:55 नवीन
ते तरी कशाला? स्वप्नात दृष्टाम्त द्यायचे एकमेकाना.
↩ प्रतिसाद: यसवायजी

@ यसवायजी....

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 14:00 नवीन
त्यांनी धागा इथे काढल्याने इथे चर्चा...अहो हे असे साधे सरळ लॉजीक बर्याच मुद्दाम गहन विचार करणार्‍यांना समजत नाही...का तुम्ही पण त्यातलेच?
↩ प्रतिसाद: यसवायजी

@ मुद्दाम गहन विचार करणार्

यसवायजी
गुरुवार, 10/31/2013 - 14:26 नवीन
@ मुद्दाम गहन विचार करणार्‍यांना समजत नाही समजलं.. मग चालु द्या. मला वाटलं की तुमचं परत 'त्या' सारखं इथं पण काही सिक्रेट आहे ;) @का तुम्ही पण त्यातलेच >> नाही हो.. गहन विचार कुठला? आत्ता कुठं शींपल विचार करायला शिकायचा प्लान आहे.. बघु फ्युचरमधे जमलं तर..
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

@ एस वाय जी....

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 20:26 नवीन
सॉरी, पण त्यांनी धागा काढला म्हणून. बाकी ते रेकी किंवा अन्य माध्यमातून भेटले असते तरी चालले असते.
↩ प्रतिसाद: यसवायजी

अरे ओ राजु

वेताळ
गुरुवार, 10/31/2013 - 13:59 नवीन
आग लावुन कुठे गेला रे तु ?

आहे

राजु भारतीय
गुरुवार, 10/31/2013 - 15:46 नवीन
थोडी कळ काढा !
↩ प्रतिसाद: वेताळ

संघाचा उपाय हा रोगापेक्षाही

श्रीगुरुजी
गुरुवार, 10/31/2013 - 14:45 नवीन
संघाचा उपाय हा रोगापेक्षाही भयंकर आहे. त्यावर योग्य उपाय काढण्यासाठी आधी मूळ रोग समजून घेतला पाहिजे. मुस्लिमांमध्ये जननदर खूप जास्त असल्याने त्यांची संख्या वेगाने वाढते आहे व काही काळातच इतकी संख्या वाढेल की इतरांसाठी व देशासाठी नवीन समस्या निर्माण होतील हा मूळ रोग आहे. जिथे मुस्लिम अल्पसंख्य असतात तिथे ते लोकशाही, घटना, कायदेशीर हक्क इ. पुढे करून स्वतःचे वेगळे अस्तित्व व वेगळे कायदे मिळवितात. काही काळाने संख्या वाढली की आमच्यावर अन्याय होत आहे असा कांगावा करून स्वत:चे वेगळे राज्य, वेगळा देश मागायला सुरूवात करतात. त्यासाठी नंतर अतिरेकी कारवाया सुरू होतात. कालांतराने वेगळे राज्य, देश मिळविले की तिथून प्रथम इतरधर्मियांची हकालपट्टी करतात किंवा त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या मागे लागतात. शेवटी तिथे शरियत आणून कुराणावर आधारीत एक संपूर्ण मुस्लिम राष्ट्र तयार होते. पाकिस्तान व काश्मिरचा प्रवास असाच झालेला आहे. आता काश्मिरचे पाकिस्तान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फिलिपाइन्स, ब्रह्मदेश, चेचन्या इ. ठिकाणी मुस्लिमांचे वेगळे राज्य मागण्याच्या चळवळी सुरू आहेत. बोस्निया हा वेगळा मुस्लिम देश करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेतच. इंग्लंडलाही ही समस्या भविष्यकाळात भेडसावणार आहे. फ्रान्स, स्वित्झर्लँड, जपान, नॉर्वे इ. देशांनी ही समस्या ओळखून आतापासून पावले टाकावयास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही संख्या प्रमाणाबाहेर वाढली तर देशविभाजन, अतिरेकी हल्ले, सशस्र दंगली इ. गंभीर समस्या निर्माण होतात हे ओळखून सर्वांनाच १ मुलापेक्षा जास्त मुले होउ न देणे हे सक्तीचे केले पाहिजे. हिंदूंनी ३ मुले जन्माला घालणे हा अत्यंत चुकीचा उपाय आहे.

१०० % सहमत....

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 14:53 नवीन
"त्यामुळे ही संख्या प्रमाणाबाहेर वाढली तर देशविभाजन, अतिरेकी हल्ले, सशस्र दंगली इ. गंभीर समस्या निर्माण होतात हे ओळखून सर्वांनाच १ मुलापेक्षा जास्त मुले होउ न देणे हे सक्तीचे केले पाहिजे. " समान नागरी कायद्याच्या मसूद्यात हे पण येतेच.
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बघ मुवि, काहीही गुंता न होऊ देता

संजय क्षीरसागर
गुरुवार, 10/31/2013 - 15:28 नवीन
पहिले छूटच मी उपाय सांगितला होता!
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बेंबट्याचं नाव घेते माझा'च'

प्यारे१
Fri, 11/01/2013 - 14:57 नवीन
बेंबट्याचं नाव घेते माझा'च' नंबर 'नेहमीच' पहिला'च'! ;)
↩ प्रतिसाद: संजय क्षीरसागर

पहिल्या पानावर पाहा

संजय क्षीरसागर
Sat, 11/02/2013 - 00:35 नवीन
आता यात स्वतःला त्रास करुन घेण्यासारखं काय आहे?
↩ प्रतिसाद: प्यारे१

अत्यन्त टोकाचि निष्ठा आणि

बुडबुडा
गुरुवार, 10/31/2013 - 14:50 नवीन
अत्यन्त टोकाचि निष्ठा आणि अत्यन्त टोकाचा द्वेश हा फक्त सन्घाच्याच लोकान्कडुन होवु शकतो याचेच हे उदाहरण आहे. सुरुवातीला सन्घाच काम केल्यावर सुद्धा किती टोकाचि मते तयार होतात !!!

ज्याला, संघाची स्थापना का झाली?

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 14:54 नवीन
हे माहीत आहे, त्याची मते टोकाची होत नाहीत.
↩ प्रतिसाद: बुडबुडा

+१००

विटेकर
गुरुवार, 10/31/2013 - 15:27 नवीन
सहमत !
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तद्दन फालतू लेख

विटेकर
गुरुवार, 10/31/2013 - 15:14 नवीन
नसबंदी संघ विचारांची नसून तुमची स्वतःची झाली आहे. संघाचे काम करण्यासाठी तुमच्यावर कोणी जबरदस्ती केली होती का ? मग कशाला गळा काढताय ? काहीतरी बकून लोकांची सहानुभुती मिळवायची चीप ट्रिक आहे ही! आणि धागा काढून कुठे गायब झाला ? यातच सारे काही आले.. (बघा ना हो .. माझ्या आजीला मारले .. माझ्या वडिलांचापण खून झाला... असो. तशातलाच हा प्रकार आहे झालं!)

आहे !

राजु भारतीय
गुरुवार, 10/31/2013 - 15:41 नवीन
व्यस्त होतो काहि काळ त्यामुळे उत्तरे देता आलि नाहीत. विटेकर, प्रष्न जबरदस्तीचा कुठाय ? मला जे दिसलं, दिसतंय, त्याच्या विषयी मी लिहीलं आहे ! आणि सहानुभुती तुम्ही मला कशी देणार ? वैचारीक नसबंदी चा अर्थ सरासार विचार न करता !!
↩ प्रतिसाद: विटेकर

घरात हिंदु, घरात मुसलमान, समाजात फक्त भारतीय !!

मुक्त विहारि
गुरुवार, 10/31/2013 - 15:48 नवीन
पण हे असे विचार फक्त हिंदूंनीच करायचे की, मुस्लीम बांधवांनी पण करायचे.
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

अहो पण तुम्ही कितीतरी

पिशी अबोली
Mon, 11/04/2013 - 16:51 नवीन
अहो पण तुम्ही कितीतरी प्रश्नांना उत्तरं देणं टाळताय की हो... खरोखर स्वयंसेवक होता का तुम्ही कधी हे सांगा ना...
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

मुळात संघ ही एकच संघटना फ़्यासिस्ट आहे

अवतार
गुरुवार, 10/31/2013 - 15:58 नवीन
आणि इतर सर्व समाज हा पुरोगामी आहे असा समज करून घेणे हे सोयीस्कर असले तरी हितावह खचितच नव्हे. कोणताही फ़्यासिस्ट विचार हा मानसिक असुरक्षिततेतून जन्माला येतो. स्वत:च्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले की सगळी तत्वज्ञाने खुंटीला टांगली जातात. सामान्य जनतेच्या ह्याच मानसिक स्थितीचा फायदा उठवणे हेच प्रत्येक समाजातील प्रस्थापित वर्गाचे लक्ष्य असते. ह्या देशात आधीच अस्तित्वात असलेल्या चातुर्वर्ण्य आणि जातीभेदामुळे हे काम अजूनच सोपे झाले आहे. संघ काय करतो आणि काय नाही यापेक्षा एक समाज म्हणून आपण आपल्या भूतकाळातील दुष्कृत्यांची आणि त्या कृत्यांविषयीच्या वर्तमानातील अभिमानाची सामुदायिक जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहोत का हे अधिक महत्वाचे आहे. हिंदूंचे संख्याबळ हिंदू समाज हा अल्पसंख्य होईल अशी हाकाटी करण्याआधी हिंदू म्हणजे नेमके कोण ह्या प्रश्नाचे उत्तर मिळणे हे अत्यावश्यक आहे. जर हिंदू हा एक धर्म असेल तर पितृभू आणि पुण्यभू ही वांशिक आणि भौगोलिक बंधने स्वत:च्याच धर्माला घालणे म्हणजे स्वत:च्याच धर्माच्या प्रसाराला पायबंद घालणे नव्हे काय? ऐतिहासिक काळापासून विचार करायचा झाला तर ह्या देशात मुस्लिमांची संख्या मुख्यत: धर्मांतराच्या आधारे वाढली आहे. जन्मदराच्या आधारावर नव्हे. जर अल्पसंख्य होण्याची इतकीच धास्ती वाटत असेल तर स्वत:च्या धर्माचा प्रसार करून इतर धर्मियांना स्वधर्मात घेणे हा अधिक चांगला मार्ग असू शकत नाही का? इथे धर्मांतर करणे म्हणजे छळाने किंवा कपटाने असा अर्थ अपेक्षित नाही. बौद्ध धर्म हा ह्याच भूमीत उगम पावून सर्व आशिया खंडात पसरला तो काही छळ-कपट करून नव्हे. जे याच भूमीत निर्माण झालेला बौद्ध धर्म करू शकतो ते आजचा हिंदू धर्म का करू शकत नाही? हे नक्कीच होऊ शकते. परंतु त्यासाठी धर्म आणि वांशिकता ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत आणि त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही हे समजून घेणे गरजेचे आहे.

ते आजचा हिंदू धर्म का करू शकत

पुष्कर जोशी
Wed, 11/06/2013 - 17:49 नवीन
ते आजचा हिंदू धर्म का करू शकत नाही?
प्रयत्न चालू आहे आपल्या मदतीची अपेक्षा . . http://lalmirchi-anilsaumitra.blogspot.in/2011/01/blog-post_7016.html
↩ प्रतिसाद: अवतार

आणखीन काही दुवे http://www

पुष्कर जोशी
Wed, 11/06/2013 - 17:54 नवीन
आणखीन काही दुवे http://www.maayboli.com/node/21086
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी

http://webcache

पुष्कर जोशी
Wed, 11/06/2013 - 17:57 नवीन
http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:9HjUtRcLC34J:www.loksatta.com/daily/20050922/edt.htm+&cd=4&hl=mr&ct=clnk&gl=in&client=opera
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी

हे जे काही चालले आहे

अवतार
Wed, 11/06/2013 - 23:53 नवीन
त्याला प्रचार म्हणण्यापेक्षा पश्चातबुद्धी म्हणणे योग्य होईल. जे आदिवासी आपल्याच देशात हजारो वर्षे राहत आहेत त्यांच्यापर्यंत बाहेरचे मिशनरी अगोदर पोचतात आणि मग आम्हाला जाग येते? ह्याचा अर्थ काय? जर हे मिशनरी आदिवासींपर्यंत पोचले नसते तर हे कार्यक्रम झाले असते काय? प्रत्येक वेळी कोणीतरी आक्रमण केल्याशिवाय आम्हाला आमच्याच धर्माचा प्रचार करण्याची आठवण का होऊ नये? ह्याचे मुख्य कारण असे आहे की ह्या धर्माकडे स्वत:चे असे एकच निश्चित तत्वज्ञान नाही. त्यामुळे प्रचार नेमका कशाचा करायचा ह्याचे उत्तर मिळणे अवघड होऊन बसते. गेल्या हजार वर्षांचा इतिहास चाळून पाहिला तर असे दिसते की आशिया खंडात जिथे जिथे हिंदू धर्म पसरलेला होता तिथे आज इतर धर्मांनी आपापले बस्तान बसवले आहे. हे अल्पसंख्य होण्याचे भय इतर धर्मांना न वाटता केवळ हिंदू धर्मियांनाच का वाटावे? कायम कोणत्यातरी धर्माच्या आक्रमणाला प्रतिक्रिया म्हणूनच जर हिंदू धर्माचा प्रचार होणार असेल तर गेल्या हजार वर्षांत जे घडले त्यापेक्षा फार काही वेगळे येत्या हजार वर्षांत घडेल असे वाटत नाही.
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी

पुष्कर जोशी, तुम्ही घात केला !!

राजु भारतीय
गुरुवार, 11/07/2013 - 11:03 नवीन
पुष्कर जोशी : आपण अगदी शोधून नेमके चुकीची उदाहरणे आणि चुकीच्या लिंका दिल्या आहेत. कदाचित आपण दिलेले उदाहरण त्यातल्या त्यात आदर्श असू शकते ! स्वामी असिमानंद यांच्या शबरी कुंभा विषयी आपण लिहीले आहे ती डायरेक्ट मिशन-यांना आव्हान देणारी खेळी होती. पण आपण असे म्हणू शकता की असेच काही प्रयत्न करून धर्मांतर रोखता येऊ शकते आणि त्याचे आपण समर्थन करू शकता. गरज आहे ती त्या भागात म्हणजे डांग, पेठ, कळवण, डहाणू, इत्यादी भागात आदिवासींच्या ( संघाच्या भाषेत वनवासींच्या ) सामाजिक उत्थानाची ! धार्मिक कार्यक्रम करून लोकांना जोडता येते ही अत्यंत वेडपट संकल्पना आहे. त्यांचे शिक्षण,आरोग्य या विषयी आदिवासींना निश्चिंत असण्याची गरज आहे आणि कार्यक्रम तसे दिले पाहिजेत. हो, हो तुम्ही मला कदाचित असे सांगाल की कल्याण आश्रमाच्या आश्रम शाळा आहेत, औषधे पुरविण्याची व्यवस्था आहे वगैरे - पण गेल्या एकसष्ट वर्षात ( कल्याण आश्रमाची स्थापना १९५२ ची ) काय आणि किती परिणामकारकता साधली आहे याचे आकडे आतल्या गोटातल्या लोकांना विचारा ! परिणामकारकता साधली असती - तर बाहेरच्यांकरीता एकच मोजपट्टी पुरेशी आहे - चोपन्न वर्षांच्या कल्याण आश्रमाच्या कामानंतर धर्मांतर रोखण्यासाठी असिमानंदना डांग मध्ये धार्मिक कार्यक्रम करून आदिवासींना वश करावे लागले आणि इतर धर्म प्रसाराकांसाठी शक्ती प्रदर्शन करावे लागले. एकसष्ट वर्षात - शहाणे करून सोडावे सकळ आदिवासी- हे कल्याण आश्रमाला आणि पर्यायाने संघाला जमले नाही. याचे एकमेव कारण तसा प्रामाणिक उद्देशच नाही. केवळ संघटने साठी संघटना बांधून त्याच्या जाहिराती इतर ठिकाणी वापरून संघटन शाबूत ठेवणे या पलीकडे आजवर तिकडे काही घडत नाही. बरे यासाठी मी आपण घात केला असे म्हणालो नाही. ज्या लिंका आपण दिल्या आहेत त्या मध्ये स्वामी असिमानंदांची ( नबकुमार बिभूतीभूषण सरकार : मूळ गांव कमरपुकार, जिल्हा हुगळी, प. बंगाल ) गोडवी हिंदूंचे तारणहार म्हणून गाईली आहे. पण हे असिमानंद बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्याखाली गेली अनेक वर्षे जेल मध्ये आहेत. हे असिमानंद फ़ेमस यासाठी आहेत की त्यांनी अटक झाल्या झाल्या काही अवधीतच त्यांच्या सगळ्या सहका-याची नावे पटापट सांगून टाकली! ( नकारात्मक कमीटमेंट ही नाही ) या देशात ठीकठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून निष्पाप लोकांचे बळी घेणा-या लोकांचा आपण उदोउदो करणार असाल ( ते कोणत्याही जाती धर्माचे असोत ) तर ते जबाबदार भारतीयाचे लक्षण नव्हे. मी ही ( जन्माने आणि वैयक्तिक आचारणात) हिंदू आहे पण मला अशा देशद्रोही ढोंगीलोकांची लाज वाटते.
↩ प्रतिसाद: पुष्कर जोशी

>>> पण हे असिमानंद बॉम्ब

श्रीगुरुजी
गुरुवार, 11/07/2013 - 14:35 नवीन
>>> पण हे असिमानंद बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्याखाली गेली अनेक वर्षे जेल मध्ये आहेत. हे असिमानंद फ़ेमस यासाठी आहेत की त्यांनी अटक झाल्या झाल्या काही अवधीतच त्यांच्या सगळ्या सहका-याची नावे पटापट सांगून टाकली! ( नकारात्मक कमीटमेंट ही नाही ) या देशात ठीकठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून निष्पाप लोकांचे बळी घेणा-या लोकांचा आपण उदोउदो करणार असाल ( ते कोणत्याही जाती धर्माचे असोत ) तर ते जबाबदार भारतीयाचे लक्षण नव्हे. स्वामी असीमानंद, साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहीत व इतर ६-७ जणांना तद्दन खोट्या आरोपांखाली अडकवून ठेवले. ते ऑक्टोबर २००८ पासून विनाजामीन अटकेत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास सुरवातीला महाराष्ट्र पोलिस, नंतर महाराष्ट्र एटीएस, नंतर एसआयटी क्र. १, नंतर सीबीआय, त्यानंतर एसआयटी क्र. २ व नंतर एनआयए अशा विविध तपाससंस्थांनी करून व त्यांच्याविरूद्ध पुरावा तयार करण्यासाठी जंगजंग पछाडून सुद्धा कणभरही पुरावा तयार करता आलेला नाही. त्यामुळे त्यांना पकडून ५ वर्षे होऊनसुद्धा आजतगायत न्यायालयात आरोपपत्र दाखल झालेले नाही. या सर्वांचा कबुलीसाठी अनन्वित छळ करण्यात आला. प्रज्ञासिंगला अश्लील व्हिडिओ दाखविणे, अन्नात मांस मिसळणे असेही प्रकार केले. तिला कॅन्सर झाल्याचे तपासणीत उघड झाल्यावरसुद्धा उपचारासाठी १ मिनिटही सोडलेले नाही. तिच्या वडीलांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा तिला सोडले नव्हते. असीमानंदांचा अनन्वित छळ करून खोटा कबुलीजबाब लिहून घेण्यात आला. कारगिल युद्धात लढलेल्या कर्नल पुरोहीतांना सुद्धा यात विनाकारण अडकविले आहे. भाजपला बॅकफूटवर नेण्यासाठी २००९ च्या निवडणुकीच्या तोंडावर या सर्वांवर खोटे आरोप लावून त्यांना पकडले व नंतर इतके आटोकाट प्रयत्न करूनसुद्धा आरोपपत्र दाखल करण्याएवढासुद्धा पुरावा मिळालेला नाही. पुरावा मिळणारच नाही कारण मुळातच आरोप खोटे आहेत. तुम्हाला यातील धादांत खोटेपणा लक्षात आला नाही याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही.
↩ प्रतिसाद: राजु भारतीय

तुम्हाला यातील धादांत खोटेपणा

कॅप्टन जॅक स्पॅरो
गुरुवार, 11/07/2013 - 14:39 नवीन
तुम्हाला यातील धादांत खोटेपणा लक्षात आला नाही याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही.
:) :) :) :)....गुरुजींचा सिक्सर!! +१
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आठवल म्हणुन

जेपी
गुरुवार, 10/31/2013 - 16:37 नवीन
भाग मिल्खा भाग या चित्रपटात लहान मिल्खाला आणी ईतर लोकांना निर्वासीत छावणीत जेवण देणारे संघ कार्यकर्ते दाखवलेत . आठवत नसल तर बघा पिक्चर
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा