Skip to main content

रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी !

लेखक राजु भारतीय यांनी बुधवार, 30/10/2013 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
माझी पार्श्वभूमी : १) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण. २) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली. ३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय. ४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती. ५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे . ६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब. राम मंदिर हे आंदोलन अनावश्यक असून देशाचा घात करणारे आहे असा सुरुवाती पासून राष्ट्रीय अधिका-याशी मतभेद होता. बाबरी उध्वस्त करण्याने देशाचे अपरिमित नुकसान झाले अशी भावना- जे सत्य आहे. संघाची ती अत्यंत क्रूर- केवळ-राजकीय खेळी होती. काम करत असताना बरेच न पटणारे मुद्दे येत होते. पण सगळे आपल्याला वाटते ते तसेच व्हावे असे नव्हे - असे स्वत:ला समजावत पुढे गेलो …. राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल. सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा. त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे. सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही. अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची. समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते. संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत. भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.

वाचने 42307
प्रतिक्रिया 275

प्रतिक्रिया

आपण संघभक्तापासून संघद्वेषी कसे झालात? रास्व संघातले लोक बरेचदा टोकाची भूमिका घेतात असं निरीक्षण आहे. संघाला विटलेल्या माणसाने थेट दुसरं, पण टोकच गाठावं हे संघाचं बाळकडू अंगी मुरल्याचंच लक्षण आहे.

आता यापुढे संघर्ष हिदू वा मुस्लीम असा असणारच नाही. मुक्त अर्थव्यवस्थेचे काही फायदे व पुष्कळसे भयानक परिणाम दिसू लागले की आर्थिक वर्गयुद्ध सुरू होणारच ! २१ व्या शतकात प्रथम धर्म भावनेचा नंतर देश भावनेचा नंतर फार काही शतकानी देव भावनेचा अंत होईल. फक्त सर्व्हाईव्हल हाच मुद्दा राहील व त्यात बुदद्धीचा विजय होऊन श्रमाचा पराभव होईल. (आता इमारतीची स्लॅब किती पटकन घालून होते पहा ... नो मजूर ....नो डिले ) .

In reply to by चौकटराजा

ते तर अगोदरच सुरु झालय... आणि त्यात धर्म भावनेच्या हत्याराचा बेमालूम वापर देखील सिद्ध झालाय. याचे पुढले अध्याय किती भयंकर गुंतागुंतीचे आणि कन्फ्युसींग असतील याची कल्पना देखील करवत नाहि.

दुभंग होऊ नये म्हणता… समोरच्या बाजूने पण असा विचार व्हायला हवा, निदान एकदा... पुसटसा तरी … आजवर झाला नाही. कुठल्याही संघटने मध्ये काम करणारे , अधिकार आला कि स्वत:चे नियम लावणारे, नुसतेच बाता मारणारे लोक असतातच त्यावरुन पूर्ण संघटना कशी आहे ठरत नाही, वरील सर्व विषय - हे तुमचे वैयक्तिक मत आहे असे प्रथम वाटले पण मत तुम्ही लादायचा प्रयत्न करताय …असो. आमचा न कुणाला विरोध न अंधळा पाठींबा - आपल्याला वाटते म्हणून असेच आहे असे नसते- मत प्रामाणिक असावे - जळजळ नसावी. दोरीला साप म्हटल्या बिगर गर्दी होत नाही भौ... वरील विचार मंथन हे राजू भारतीय ह्यांच्या बरोबर होत असल्याने, मुद्दाम गहन विचार करणार्‍यांनी मध्येच तोंड खूपसू नये, ही विनंती.- मुक्त विहारि ह्यांच्या मताशि सहमत

या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो
हे तुम्ही कुठल्या आधारावर म्हणत आहात? उदाहरणादाखल मुद्दे, आकडेवारी इ. देवून स्पष्ट करा की हे केवळ तुमचे वैयक्तिक मत आहे?
प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे
ह्या विधानातून एक प्रकारचे सरसकटीकरण जाणवते आहे. असो, तुम्ही स्वतः बराच काळ स्वयंसेवक होता, त्यामुळे तुमची माहिती जास्त असेल :)

सध्या संघ आणि परिवारापासून लांब.
कारणे कळाली तर बरे होईल .
४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
देशाचे नुकसान होत आहे, मान्य . पण म्हणून एकट्या संघ परिवारास जबाबदार ठरवणे कितपत योग्य वाटते ? आणि तसही हिरव्या दहशतवादापेक्षा भगवी 'क्रूरता' म्हणा हवं तर , तीच बरी . .

रा स्व संघाच्या कुठल्याही वादग्रस्त विधानावर जेवढ्या लगेच धागा निघतो तेवढ्या लगेच डिग्गीराजाच्या विधानावर निघत नाही हे आश्चर्य (डिग्गीराजाचे विधान = वादग्रस्त विधान. त्यामुळे परत वादग्रस्त हा शब्द टाकुन पुनरुक्ती टाळली). असो. संघाचे विधान वादग्रस्त आहे हे नक्कीच. पण ही संघाची पॉलिसी आहे की एक वैयक्तिक विधान आहे. म्हणजे असे काही होते का की संघाच्या शाखांमध्ये संस्कार शिबिरांमध्ये मुलांना "प्रत्येकी ३-४ मुले जन्माला घालाच" अश्या प्रकारचे काही शिक्षण दिले जाते का? संघाने ते त्यांचे ध्येय बनवले आहे का? संघाच्या सगळ्या शाखांमध्ये याचा जाहीर प्रचार केला जातो का? संघाच्या मिशन किंवा अजेंड्यामध्ये (मराठी प्रतिशब्द आठवले नाहित) याचा समावेश आहे का? नसेल तर मग हे एक वैयक्तिक प्रतिवादन म्हणुन सोडुन दिले पाहिजे. आता मूळ संघाकडे वळु. संघ ही एक हिंदु संघटना आहे जशी मुस्लिम लीग ही एक मुसलमानांची संघटना आहे. त्या अनुषंगाने काही अभियाने काही प्रचार ते करतातच. त्यांचे काही विचार आणि काही कृती चुकत असतीलही. चुका न करणारी व्यक्ती किंवा संघटना मला तरी माहिती नाही. राजू भारतीयांनी आपले पुर्ण नाव गाव पत्ता जाहीर न करता एकेकाळी संघाचे समर्थक आणि आता विरोधक असण्याचे प्रतिपादन करणे पटत नाही. उद्या कोणीही उठुन असेच म्हणेल - " मी एकेकाळी कॉग्रेसी होतो....", "मी एकेकाळी गांधी निष्ठावंत होतो....." , " मी एकेकाळी मुस्लिम लीगचा सतर्क कार्यकर्ता होतो........." वगैरे. त्यात फारसे तथ्य नाही. श्री राजु भारतीयांनी आपले पुर्ण नाव गाव पत्ता जाहीर केल्यास तद्नुषंगाने अजुन चर्चा करता येइल

भाजपेयी , मोदी, संघाचे फुकटे ब्रह्मचारी स्वयंसेवक आधी यांची लग्ने तरी लावा. मग बाकीच्यांच्या ३ पोरांचं बघूया. --------------- एकमेव पोरीचा बाप असलेला पं. उद्दामलाल महामेरु

In reply to by बलि

जावूद्या हो... त्यांचे हे नेहमीचेच आहे... विषय समजावून घेता काहीतरी लिहीत बसतात.सिक्क्षनाचे असे पण परीणाम... बाकी उद्दाम साहेब हे १००% हिंदू आहेत असेच मला वाटते.त्यांचा हिंदू धर्माचा अभ्यास सुरु आहे.

In reply to by मुक्त विहारि

आता यात मी चुकीचे काय बोललो? तेच बोलले ३ पोरं काढा म्हणून. मग आधी त्यांच्या लोकांची लग्नं तरी लागायला नकोत का? इतकेच तर मी बोललो.

In reply to by उद्दाम

आपला मुद्दा योग्यच आहे पण ईतक्यातच आपण हा मुद्दा काढल्याने,वैचारिक नसबन्दीचा गळा घोट्ला जातोना,मग धागा ३००+ कसा होईल तुम्ही अशी हवा काढुन घेतल्यावर?

In reply to by उद्दाम

उद्दाम साहेब एखादा नेता अविवाहित आहे म्हणजे पूर्ण संघटना अविवाहित असेल असा पोरकट विचार का करताय . अविवाहित आहेत म्हणून त्यांना फुकटे म्हणणे तुमच्या सारख्यांना शोभा देत नाही . ज्यांना परवडत असेल ते काढतील ३ पोरं . तुम्ही थंड घ्या कि जरा :)

In reply to by बलि

"उद्दाम साहेब एखादा नेता अविवाहित आहे म्हणजे पूर्ण संघटना अविवाहित असेल असा पोरकट विचार का करताय." अहो ते नेहमीच असे उच्च विचार करतात...

In reply to by मुक्त विहारि

हुच्च???? :)

In reply to by बलि

पूर्ण संघटना अविवाहित आहे, असे मी लिहिलेलेच नाही. जे अविवाहीत आहेत, त्यांची लग्णं तरी लावा आधी, इतुकेच म्या लिहिले. संघाचे स्वयंसेवक वार लावून जेवतात, असे ऐकून आहे.

In reply to by उद्दाम

मिपावर बरेच जण ते लहान असताना शाखेत जात असे म्हणतात. त्याना विचारले पाहीजे की तेव्हा ते वारावर जेवत होते का ते.

In reply to by उद्दाम

आणि ते घर सोडून समाजासाठी पूर्णवेळ राबतात.. त्यांच्या राबण्यासमोर वारावर जेवण्यासाठी मालकाला येणारा खर्च नगण्य आहे. जरा ८ दिवस असे बाहेर राहुन बघा.. म्हणजे कळेल.

In reply to by आनन्दा

+ १ रात्रं दिवस उन्हा तान्हात राबतात ते दिसत नाही. आमच्या कडे प्रचारक जेवायला यावा म्हणून आम्ही अजून पण जीवाचा आटा-पिटा करतो. ४ दिवसांत त्यांना ४०० बोलावणी असतात.जावू दे, संघाचा प्रचारक , ही काय गोष्ट आहे, हे त्यांना कधीच समजणार नाही.

In reply to by मुक्त विहारि

कोंचं गाव हो? आमच्याकडची शाखा २० वर्शापूर्वीच बंद पडली.

In reply to by मुक्त विहारि

आमच्या झुमरीतलैय्या बुद्रुकला शाखा चालू असते... प्रचारकाला आधी कोन जेवायला घालणार यावरुन दंगल पेटते.

In reply to by मुक्त विहारि

+१ अहो खांग्रेस च्या पिल्लावळीला काय कळणार संघमहात्म्य? :).

In reply to by उद्दाम

असेल बुवा. आम्ही तर कधी असल्या अफवा ऐकल्या नाहीत. समजा हे खरं असलं तरी आपल्या संघटनेतल्या इतर स्वयंसेवकांकडे जेवण्याने देशाच्या तिजोरीवर भार येत नाही किंवा करदात्यांचा पैसा वापरला जात नाही. साधी सर्दी झाली तरी जनतेच्या खर्चाने विमानाच्या प्रथम वर्गातून अमेरिकेत जाऊन उपचार घेऊन वर त्यागमूर्ती म्हणून मिरविण्यापेक्षा वार लावून जेवणे हे कितीतरी पटीने चांगले.

In reply to by उद्दाम

तुम्हाला आहे ना एक मुलगी, द्या एखाद्या होतकरू संघ स्वयंसेवकाला… नाही तरी तुम्हाला त्यांच्या (संघ वाल्यान्च्या) लग्नाची इतकी चिंता आहेच… एका दगडात दोन पक्षी !!!

मिपा प्रशासनाने अशा विषयांना बंदी घालावी. कारण एखाद्याने जरी अतिरेकी प्रतिसाद दिला तरी आपले प्रिय संस्थळ संकटात येईल अशी मला भीति वाटते.

राSSSSSSSSSSजू राजूSSS कहाँ गया तू.. अत्यंत डुप्लिकेट लेख वाटतो आहे. राजू वरच्या प्रश्नांस उत्तर द्यावेसे वाटत नाही का? थोडावेळ टेलेब्रँडची जाहीरात पाहील्यासारखे वाटत होते. आधी असे असे अमूक अमूक होत होते आणि आता कसे ते सोडल्यावर चान चान आहे.

@@वरील विचार मंथन हे राजू भारतीय ह्यांच्या बरोबर होत असल्याने, मुद्दाम गहन विचार करणार्‍यांनी मध्येच तोंड खूपसू नये, ही विनंती. >> फक्त राजू भारतीय यांच्याबरोबर चर्चा करायची असल्यास खफ किंवा व्यनी आहेच की. *SCRATCH*

In reply to by यसवायजी

त्यांनी धागा इथे काढल्याने इथे चर्चा...अहो हे असे साधे सरळ लॉजीक बर्याच मुद्दाम गहन विचार करणार्‍यांना समजत नाही...का तुम्ही पण त्यातलेच?

In reply to by मुक्त विहारि

@ मुद्दाम गहन विचार करणार्‍यांना समजत नाही समजलं.. मग चालु द्या. मला वाटलं की तुमचं परत 'त्या' सारखं इथं पण काही सिक्रेट आहे ;) @का तुम्ही पण त्यातलेच >> नाही हो.. गहन विचार कुठला? आत्ता कुठं शींपल विचार करायला शिकायचा प्लान आहे.. बघु फ्युचरमधे जमलं तर..

आग लावुन कुठे गेला रे तु ?

In reply to by वेताळ

थोडी कळ काढा !

संघाचा उपाय हा रोगापेक्षाही भयंकर आहे. त्यावर योग्य उपाय काढण्यासाठी आधी मूळ रोग समजून घेतला पाहिजे. मुस्लिमांमध्ये जननदर खूप जास्त असल्याने त्यांची संख्या वेगाने वाढते आहे व काही काळातच इतकी संख्या वाढेल की इतरांसाठी व देशासाठी नवीन समस्या निर्माण होतील हा मूळ रोग आहे. जिथे मुस्लिम अल्पसंख्य असतात तिथे ते लोकशाही, घटना, कायदेशीर हक्क इ. पुढे करून स्वतःचे वेगळे अस्तित्व व वेगळे कायदे मिळवितात. काही काळाने संख्या वाढली की आमच्यावर अन्याय होत आहे असा कांगावा करून स्वत:चे वेगळे राज्य, वेगळा देश मागायला सुरूवात करतात. त्यासाठी नंतर अतिरेकी कारवाया सुरू होतात. कालांतराने वेगळे राज्य, देश मिळविले की तिथून प्रथम इतरधर्मियांची हकालपट्टी करतात किंवा त्यांचे जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या मागे लागतात. शेवटी तिथे शरियत आणून कुराणावर आधारीत एक संपूर्ण मुस्लिम राष्ट्र तयार होते. पाकिस्तान व काश्मिरचा प्रवास असाच झालेला आहे. आता काश्मिरचे पाकिस्तान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. फिलिपाइन्स, ब्रह्मदेश, चेचन्या इ. ठिकाणी मुस्लिमांचे वेगळे राज्य मागण्याच्या चळवळी सुरू आहेत. बोस्निया हा वेगळा मुस्लिम देश करण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेतच. इंग्लंडलाही ही समस्या भविष्यकाळात भेडसावणार आहे. फ्रान्स, स्वित्झर्लँड, जपान, नॉर्वे इ. देशांनी ही समस्या ओळखून आतापासून पावले टाकावयास सुरूवात केली आहे. त्यामुळे ही संख्या प्रमाणाबाहेर वाढली तर देशविभाजन, अतिरेकी हल्ले, सशस्र दंगली इ. गंभीर समस्या निर्माण होतात हे ओळखून सर्वांनाच १ मुलापेक्षा जास्त मुले होउ न देणे हे सक्तीचे केले पाहिजे. हिंदूंनी ३ मुले जन्माला घालणे हा अत्यंत चुकीचा उपाय आहे.

In reply to by श्रीगुरुजी

"त्यामुळे ही संख्या प्रमाणाबाहेर वाढली तर देशविभाजन, अतिरेकी हल्ले, सशस्र दंगली इ. गंभीर समस्या निर्माण होतात हे ओळखून सर्वांनाच १ मुलापेक्षा जास्त मुले होउ न देणे हे सक्तीचे केले पाहिजे. " समान नागरी कायद्याच्या मसूद्यात हे पण येतेच.

अत्यन्त टोकाचि निष्ठा आणि अत्यन्त टोकाचा द्वेश हा फक्त सन्घाच्याच लोकान्कडुन होवु शकतो याचेच हे उदाहरण आहे. सुरुवातीला सन्घाच काम केल्यावर सुद्धा किती टोकाचि मते तयार होतात !!!

नसबंदी संघ विचारांची नसून तुमची स्वतःची झाली आहे. संघाचे काम करण्यासाठी तुमच्यावर कोणी जबरदस्ती केली होती का ? मग कशाला गळा काढताय ? काहीतरी बकून लोकांची सहानुभुती मिळवायची चीप ट्रिक आहे ही! आणि धागा काढून कुठे गायब झाला ? यातच सारे काही आले.. (बघा ना हो .. माझ्या आजीला मारले .. माझ्या वडिलांचापण खून झाला... असो. तशातलाच हा प्रकार आहे झालं!)

In reply to by विटेकर

व्यस्त होतो काहि काळ त्यामुळे उत्तरे देता आलि नाहीत. विटेकर, प्रष्न जबरदस्तीचा कुठाय ? मला जे दिसलं, दिसतंय, त्याच्या विषयी मी लिहीलं आहे ! आणि सहानुभुती तुम्ही मला कशी देणार ? वैचारीक नसबंदी चा अर्थ सरासार विचार न करता !!

In reply to by राजु भारतीय

अहो पण तुम्ही कितीतरी प्रश्नांना उत्तरं देणं टाळताय की हो... खरोखर स्वयंसेवक होता का तुम्ही कधी हे सांगा ना...

आणि इतर सर्व समाज हा पुरोगामी आहे असा समज करून घेणे हे सोयीस्कर असले तरी हितावह खचितच नव्हे. कोणताही फ़्यासिस्ट विचार हा मानसिक असुरक्षिततेतून जन्माला येतो. स्वत:च्या अस्तित्वाबद्दल प्रश्न निर्माण होऊ लागले की सगळी तत्वज्ञाने खुंटीला टांगली जातात. सामान्य जनतेच्या ह्याच मानसिक स्थितीचा फायदा उठवणे हेच प्रत्येक समाजातील प्रस्थापित वर्गाचे लक्ष्य असते. ह्या देशात आधीच अस्तित्वात असलेल्या चातुर्वर्ण्य आणि जातीभेदामुळे हे काम अजूनच सोपे झाले आहे. संघ काय करतो आणि काय नाही यापेक्षा एक समाज म्हणून आपण आपल्या भूतकाळातील दुष्कृत्यांची आणि त्या कृत्यांविषयीच्या वर्तमानातील अभिमानाची सामुदायिक जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहोत का हे अधिक महत्वाचे आहे. हिंदूंचे संख्याबळ हिंदू समाज हा अल्पसंख्य होईल अशी हाकाटी करण्याआधी हिंदू म्हणजे नेमके कोण ह्या प्रश्नाचे उत्तर मिळणे हे अत्यावश्यक आहे. जर हिंदू हा एक धर्म असेल तर पितृभू आणि पुण्यभू ही वांशिक आणि भौगोलिक बंधने स्वत:च्याच धर्माला घालणे म्हणजे स्वत:च्याच धर्माच्या प्रसाराला पायबंद घालणे नव्हे काय? ऐतिहासिक काळापासून विचार करायचा झाला तर ह्या देशात मुस्लिमांची संख्या मुख्यत: धर्मांतराच्या आधारे वाढली आहे. जन्मदराच्या आधारावर नव्हे. जर अल्पसंख्य होण्याची इतकीच धास्ती वाटत असेल तर स्वत:च्या धर्माचा प्रसार करून इतर धर्मियांना स्वधर्मात घेणे हा अधिक चांगला मार्ग असू शकत नाही का? इथे धर्मांतर करणे म्हणजे छळाने किंवा कपटाने असा अर्थ अपेक्षित नाही. बौद्ध धर्म हा ह्याच भूमीत उगम पावून सर्व आशिया खंडात पसरला तो काही छळ-कपट करून नव्हे. जे याच भूमीत निर्माण झालेला बौद्ध धर्म करू शकतो ते आजचा हिंदू धर्म का करू शकत नाही? हे नक्कीच होऊ शकते. परंतु त्यासाठी धर्म आणि वांशिकता ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत आणि त्यांचा परस्परांशी काहीही संबंध नाही हे समजून घेणे गरजेचे आहे.

In reply to by अवतार

ते आजचा हिंदू धर्म का करू शकत नाही?
प्रयत्न चालू आहे आपल्या मदतीची अपेक्षा . . http://lalmirchi-anilsaumitra.blogspot.in/2011/01/blog-post_7016.html

In reply to by पुष्कर जोशी

त्याला प्रचार म्हणण्यापेक्षा पश्चातबुद्धी म्हणणे योग्य होईल. जे आदिवासी आपल्याच देशात हजारो वर्षे राहत आहेत त्यांच्यापर्यंत बाहेरचे मिशनरी अगोदर पोचतात आणि मग आम्हाला जाग येते? ह्याचा अर्थ काय? जर हे मिशनरी आदिवासींपर्यंत पोचले नसते तर हे कार्यक्रम झाले असते काय? प्रत्येक वेळी कोणीतरी आक्रमण केल्याशिवाय आम्हाला आमच्याच धर्माचा प्रचार करण्याची आठवण का होऊ नये? ह्याचे मुख्य कारण असे आहे की ह्या धर्माकडे स्वत:चे असे एकच निश्चित तत्वज्ञान नाही. त्यामुळे प्रचार नेमका कशाचा करायचा ह्याचे उत्तर मिळणे अवघड होऊन बसते. गेल्या हजार वर्षांचा इतिहास चाळून पाहिला तर असे दिसते की आशिया खंडात जिथे जिथे हिंदू धर्म पसरलेला होता तिथे आज इतर धर्मांनी आपापले बस्तान बसवले आहे. हे अल्पसंख्य होण्याचे भय इतर धर्मांना न वाटता केवळ हिंदू धर्मियांनाच का वाटावे? कायम कोणत्यातरी धर्माच्या आक्रमणाला प्रतिक्रिया म्हणूनच जर हिंदू धर्माचा प्रचार होणार असेल तर गेल्या हजार वर्षांत जे घडले त्यापेक्षा फार काही वेगळे येत्या हजार वर्षांत घडेल असे वाटत नाही.

In reply to by पुष्कर जोशी

पुष्कर जोशी : आपण अगदी शोधून नेमके चुकीची उदाहरणे आणि चुकीच्या लिंका दिल्या आहेत. कदाचित आपण दिलेले उदाहरण त्यातल्या त्यात आदर्श असू शकते ! स्वामी असिमानंद यांच्या शबरी कुंभा विषयी आपण लिहीले आहे ती डायरेक्ट मिशन-यांना आव्हान देणारी खेळी होती. पण आपण असे म्हणू शकता की असेच काही प्रयत्न करून धर्मांतर रोखता येऊ शकते आणि त्याचे आपण समर्थन करू शकता. गरज आहे ती त्या भागात म्हणजे डांग, पेठ, कळवण, डहाणू, इत्यादी भागात आदिवासींच्या ( संघाच्या भाषेत वनवासींच्या ) सामाजिक उत्थानाची ! धार्मिक कार्यक्रम करून लोकांना जोडता येते ही अत्यंत वेडपट संकल्पना आहे. त्यांचे शिक्षण,आरोग्य या विषयी आदिवासींना निश्चिंत असण्याची गरज आहे आणि कार्यक्रम तसे दिले पाहिजेत. हो, हो तुम्ही मला कदाचित असे सांगाल की कल्याण आश्रमाच्या आश्रम शाळा आहेत, औषधे पुरविण्याची व्यवस्था आहे वगैरे - पण गेल्या एकसष्ट वर्षात ( कल्याण आश्रमाची स्थापना १९५२ ची ) काय आणि किती परिणामकारकता साधली आहे याचे आकडे आतल्या गोटातल्या लोकांना विचारा ! परिणामकारकता साधली असती - तर बाहेरच्यांकरीता एकच मोजपट्टी पुरेशी आहे - चोपन्न वर्षांच्या कल्याण आश्रमाच्या कामानंतर धर्मांतर रोखण्यासाठी असिमानंदना डांग मध्ये धार्मिक कार्यक्रम करून आदिवासींना वश करावे लागले आणि इतर धर्म प्रसाराकांसाठी शक्ती प्रदर्शन करावे लागले. एकसष्ट वर्षात - शहाणे करून सोडावे सकळ आदिवासी- हे कल्याण आश्रमाला आणि पर्यायाने संघाला जमले नाही. याचे एकमेव कारण तसा प्रामाणिक उद्देशच नाही. केवळ संघटने साठी संघटना बांधून त्याच्या जाहिराती इतर ठिकाणी वापरून संघटन शाबूत ठेवणे या पलीकडे आजवर तिकडे काही घडत नाही. बरे यासाठी मी आपण घात केला असे म्हणालो नाही. ज्या लिंका आपण दिल्या आहेत त्या मध्ये स्वामी असिमानंदांची ( नबकुमार बिभूतीभूषण सरकार : मूळ गांव कमरपुकार, जिल्हा हुगळी, प. बंगाल ) गोडवी हिंदूंचे तारणहार म्हणून गाईली आहे. पण हे असिमानंद बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्याखाली गेली अनेक वर्षे जेल मध्ये आहेत. हे असिमानंद फ़ेमस यासाठी आहेत की त्यांनी अटक झाल्या झाल्या काही अवधीतच त्यांच्या सगळ्या सहका-याची नावे पटापट सांगून टाकली! ( नकारात्मक कमीटमेंट ही नाही ) या देशात ठीकठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून निष्पाप लोकांचे बळी घेणा-या लोकांचा आपण उदोउदो करणार असाल ( ते कोणत्याही जाती धर्माचे असोत ) तर ते जबाबदार भारतीयाचे लक्षण नव्हे. मी ही ( जन्माने आणि वैयक्तिक आचारणात) हिंदू आहे पण मला अशा देशद्रोही ढोंगीलोकांची लाज वाटते.

In reply to by राजु भारतीय

>>> पण हे असिमानंद बॉम्ब स्फोटाच्या गुन्ह्याखाली गेली अनेक वर्षे जेल मध्ये आहेत. हे असिमानंद फ़ेमस यासाठी आहेत की त्यांनी अटक झाल्या झाल्या काही अवधीतच त्यांच्या सगळ्या सहका-याची नावे पटापट सांगून टाकली! ( नकारात्मक कमीटमेंट ही नाही ) या देशात ठीकठिकाणी बॉम्ब स्फोट घडवून निष्पाप लोकांचे बळी घेणा-या लोकांचा आपण उदोउदो करणार असाल ( ते कोणत्याही जाती धर्माचे असोत ) तर ते जबाबदार भारतीयाचे लक्षण नव्हे. स्वामी असीमानंद, साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल पुरोहीत व इतर ६-७ जणांना तद्दन खोट्या आरोपांखाली अडकवून ठेवले. ते ऑक्टोबर २००८ पासून विनाजामीन अटकेत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास सुरवातीला महाराष्ट्र पोलिस, नंतर महाराष्ट्र एटीएस, नंतर एसआयटी क्र. १, नंतर सीबीआय, त्यानंतर एसआयटी क्र. २ व नंतर एनआयए अशा विविध तपाससंस्थांनी करून व त्यांच्याविरूद्ध पुरावा तयार करण्यासाठी जंगजंग पछाडून सुद्धा कणभरही पुरावा तयार करता आलेला नाही. त्यामुळे त्यांना पकडून ५ वर्षे होऊनसुद्धा आजतगायत न्यायालयात आरोपपत्र दाखल झालेले नाही. या सर्वांचा कबुलीसाठी अनन्वित छळ करण्यात आला. प्रज्ञासिंगला अश्लील व्हिडिओ दाखविणे, अन्नात मांस मिसळणे असेही प्रकार केले. तिला कॅन्सर झाल्याचे तपासणीत उघड झाल्यावरसुद्धा उपचारासाठी १ मिनिटही सोडलेले नाही. तिच्या वडीलांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा तिला सोडले नव्हते. असीमानंदांचा अनन्वित छळ करून खोटा कबुलीजबाब लिहून घेण्यात आला. कारगिल युद्धात लढलेल्या कर्नल पुरोहीतांना सुद्धा यात विनाकारण अडकविले आहे. भाजपला बॅकफूटवर नेण्यासाठी २००९ च्या निवडणुकीच्या तोंडावर या सर्वांवर खोटे आरोप लावून त्यांना पकडले व नंतर इतके आटोकाट प्रयत्न करूनसुद्धा आरोपपत्र दाखल करण्याएवढासुद्धा पुरावा मिळालेला नाही. पुरावा मिळणारच नाही कारण मुळातच आरोप खोटे आहेत. तुम्हाला यातील धादांत खोटेपणा लक्षात आला नाही याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला यातील धादांत खोटेपणा लक्षात आला नाही याचे अजिबात आश्चर्य वाटत नाही.
:) :) :) :)....गुरुजींचा सिक्सर!! +१

भाग मिल्खा भाग या चित्रपटात लहान मिल्खाला आणी ईतर लोकांना निर्वासीत छावणीत जेवण देणारे संघ कार्यकर्ते दाखवलेत . आठवत नसल तर बघा पिक्चर

In reply to by जेपी

हायला गंमतच आहे. मागच्या पानावर मी शिनेमाचे उदाहरण दिले तर आयुष्य षिनेमा नव्हे, असे मला संघी डोस दिले. आता हेच संघाचे काम शिकायला षिनेमा बघायला सांगतात. :)

गेली ८८ वर्षे वर्धिष्णु होणार्या एका जगन्मान्य संघटनेबद्दल आपण ही विधाने केली आहेत. कृपया आपण आपला वकूब सांगावा.असे अधिकाराने म्हणावे अशी आपण आपली काय क्षमता सिद्ध केली आहे ? हे ध्यानात घ्यावे की, सुर्याजी पिसाळाने फितुरी केली म्हणून शिवप्रभुनां कमीपणा येत नाही ! या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे हे जरा उलगडून सांगाल का ? संघ कामाची आवश्यकता का आहे, त्याबाबत संघाची भूमिका काय आहे ? या विषयातील तुमचे आकलन काय आहे ? ते तुम्हाला नीट समजले आहे का ? "एके पूछ् देखीली तो म्हणे हत्ती झाडू सारखा" हा वस्तुस्थितीचा नसून त्याच्या वकूबाचा भाग असतो. अशी जाहीर विधाने करण्यापूर्वी एकदा आरश्यात तोंड बघायचे होते !आणि म्हणून मी तुम्ही स्वतः ची नसबंदी करुन घेतली आहे असे म्हणालो. प्रष्न जबरदस्तीचा कुठाय ? जबरदस्ती नव्हती ना , मग काही दिवस सातत्याने काम करताना, केन्द्रातील कार्यकर्त्यांशी संपर्क करताना तुमची बुद्धी काय ** खात होती का ? की एका रात्रीत संघकामाचा उपयोग नाही असा साक्षात्कार झाला ?
माध्यांनीं थुंकितां सूर्यावरी| तो थुंका पडेल आपणांच वरी |दुसऱ्यास चिंतितां अंतरीं| आपणास घडे ||२७|| द्शक ९ समास ३

In reply to by विटेकर

...सम्पुर्ण सहमत....विटेकर तुमच्याशी. राजू भारतीय जरा याचा प्रतिवाद करावा..आपण स्वताला 'कोणे एकेकाळचे स्वयम्सेवक' म्हणवता याचीच शन्का येते, पटत नाही. जे कधीच प्रत्यक्ष सन्घात गेले नाहीत केवळ कुठेतरी काहीतरी वाचुन आपली मते व्यक्त करतात आणि 'विचारवन्ताचा' आव आणतात अशापैकी एकाने लिहीलेला लेख वाटतो तुमचा. इतकी वर्षे सन्घात जाउनही सन्घाचे आकलन झाले नाही असे दिसते. विनोद१८

In reply to by विनोद१८

संघाचे आकलन एकदा निवासी शिबीर केले ( कळत्या वयात ) कि लगेच होते .... मला वाटत नाही " राजू भारतीय " ह्यांनी साधे निवासी शिबीर केले असेल ...

उद्दाम नावाचा एक भयानक विनोदी डु.आय.डी. जन्माला आला आहे ह्याचा साक्षात्कार झाला. खरा आय.डी. असेल तर इतका बिंडोक माणूस मी दुसरा पाहिला नाही इतकेच म्हणेन.

In reply to by आदिजोशी

अहो फार गहन विचार कर्रुन लिहीणारे पण एक जण आहेत.त्यांचे पण असेच काहीसे अहंमन्य विचार असतात.आजकाल ते नसतात इथे,बहूदा ते नथुचुर्ण घेत असावेत.

चर्चा वाचतोय. कडाक्याची चर्चा होऊ द्या. फक्त व्यक्तिगत रोख आणि भाषेतील शब्दांचा तोल सांभाळावा, एवढेच म्हणेन. बाकी, हम दो हम तीनचा नारा पटणारा नाही. (आता हम दो हमारे बारा कसे चालतात तो वेगळा मुद्दा) बाकी, शांततेने चर्चा चालू द्या. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या नथुचुर्ण घेण्यात मग्न असल्याने, चिंता नसावी. आता कुणीतरी अहंमन्यपणे आणि हेकेखोरपणे आपलेच घोडे पुढे दामटत असेल तर काय करणार?