रा. स्व. संघाची वैचारीक नसबंदी !
माझी पार्श्वभूमी :
१) शाखेत गेला नाही तर रात्री जेवेण नाही अशा गल्लीत, वाड्यात, वातावरणात जन्म आणि बालपण.
२) वयाच्या नवव्या वर्षापासून शाखेत. नंतर महाविद्यालयात व्यावसाईक शिक्षण घेताना वसतिगृहात रहाताना कॅम्पस वर शाखा सुरु केली. नियमित चाळीस तरुणांची शाखा चालवली.
३) संघ योजनेतून परिवारातल्या एका संघटनेची मोठी जबाबदारी वयाच्या एकोणीसाव्या वर्षी दिली गेली. सुरुवातीला जिल्हा स्तरावर नेतृत्व करून त्या जिल्ह्यात नसलेलं काम उभे केलं आणि दीड वर्षात प्रांतस्तरीय ( राज्यस्तरीय ) जबाबदारी आली, नंतर राष्ट्रीय.
४) स्थानिक, जिल्हा, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावरील बैठका, आतल्या गोटातल्या बैठका, अभ्यासवर्ग, चिंतन शिबिरे, बौद्धिके यांना नियमित अपेक्षित आणि उपस्थिती.
५) स्थानिक ते राष्ट्रीय स्तरावरील अधिकारी आणि नेते यांच्याशी परिचय मैत्री संवाद पत्रव्यवहार वगैरे .
६) सध्या संघ आणि परिवारापासून लांब. राम मंदिर हे आंदोलन अनावश्यक असून देशाचा घात करणारे आहे असा सुरुवाती पासून राष्ट्रीय अधिका-याशी मतभेद होता. बाबरी उध्वस्त करण्याने देशाचे अपरिमित नुकसान झाले अशी भावना- जे सत्य आहे. संघाची ती अत्यंत क्रूर- केवळ-राजकीय खेळी होती. काम करत असताना बरेच न पटणारे मुद्दे येत होते. पण सगळे आपल्याला वाटते ते तसेच व्हावे असे नव्हे - असे स्वत:ला समजावत पुढे गेलो …. राम मंदिर हे कधीच राष्ट्रीय आंदोलन नव्हते आणि नाही. या देशातल्या समस्त हिंदूंची ती भावना नव्हे - काही लोकांची असेल.
सद्य विषय : अलीकडे संघ अधिका-यांनी हिंदुनी तीन मुले होऊ द्यावीत अशी व्यक्त केलेली विधाने. संघाने भारता मध्ये आधीच एक दुभंग निर्माण केलाय - हिंदू आणि अन्य असा. त्या दुभंगला खत पाणी घालण्यासाठी अशी विधाने आणि आचरण संघ करत असतो. लव्ह जिहाद वगैरे.दुभंग हे राष्ट्रीय पाप आहे. सामान्य स्वयंसेवकांच्या डोक्यात, मनात, रक्तात हा भेद इतका पक्का रुजलाय की त्यांना आपण करू तीच देशभक्ती, आपण करू तेच सामाजिक काम आणि आपले सामाजिक प्रकल्प हेच फक्त देश पुढे ढकलण्याचे इंधन आहे - असा पक्का समज आहे. या विषयावर त्यांना अन्य कांही ऐकणे सोसवतच नाही.
अन्य महत्वाचे : या देशाला संघाची / संघ कामाची आवश्यकताच नाही. संघ या देशाच्या प्रगती मधला एक मोठा अडसर आहे.- कारण संघाकडून प्रस्थापित राजकीय व्यवस्थे मध्ये दोष आहेत हे संमोहन पद्धतीने पटवून देऊन समांतर व्यवस्था उभी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो. वास्तविक आवश्यकता आहे ती लोकशिक्षणातून प्रस्थापित व्यवस्थे मध्ये सुधारणा घडवून आणण्याच्या प्रयत्नाची. समांतर व्यवस्थेमधले संघाचे सामाजिक, राजकीय ( भाजप ), शैक्षणिक, आर्थिक प्रकल्प हे तद्दन सत्ता केन्द्री, मनुष्य केन्द्री आणि बहुतांशी आतबट्ट्यातले आहेत. ज्या सामाजिक प्रकल्पांचा मुखवटा धारण करून संघ आपला ढोल बडवतो त्या सामाजिक प्रकल्पांचे वेगवेळ्या निकषांवर ऑडीट केल्यास सत्य समोर येऊ शकते.
संघाची शक्ती : प्रत्यक्ष काम न करणारे, कट्ट्यावर बसून मत व्यक्त करणारे, कधीतरी उत्सवाला जाणारे, एखाद्या संघ प्रकल्पाला भेट देऊन आलेले म्हणजे वरवरचे लोक ही आणि हीच संघाची पहिली मोठी शक्ती आहे. या सर्वांचा संघ हा लिळा चरीत्रातल्या आंधळे आणि हत्ती यांच्या कथे सारखा आहे. कुणा शेपूट, कुणाला सोंड हे अवयवच हत्ती आहे असे वाटते. संघाची दुसरी शक्ती संघाचे अत्यंत भाबडे, फार विचार न करू शकणारे पण पोपटपंची करणारे कार्यकर्ते / स्वयंसेवक आहेत. ही जनता प्रेमाचा संसर्ग झालेल्या टीनेजर सारखी असते. स्वत:चा एकवेळ "एक दुजे के लिये " होऊ देतील पण काही ऐकून घेणार नाहीत. अशी जनता आसाराम बापूंच्या कळपात पण असते आणि अन्य ब-याच ठिकाणी. संघाची तिसरी शक्ती आहे ते प्रत्यक्ष संघात आणि संपूर्ण संघ परिवारात असणारी भोंदू मंडळी किंवा सत्ता केंद्रे. प्रचंड मोठ्यावर भोंदुगिरी येथे चालते. ज्याच्यावर आपली श्रद्धा आहे, ज्यांच्या बौद्धीकांनी आपण आपले घरदार सोडून राष्ट्राय स्वाहा करायला निघालो आहोत त्याचे पाय मातीचे आहेत हे भाबड्या जमातीला कधीच कळत नाही. भाजपच नव्हे सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक प्रकल्पांमध्ये ही सत्ता केंद्रे आहेत, भोंदुगिरी आहे आणि विचारद्रोही लोक आहेत.
भारतीय समाज एकसंधच असावा अशी माझी प्रामाणिक तळमळ आहे. हिंदू आणि मुसलमान या केवळ राजकीय स्वार्थासाठी पाडलेल्या रेषा आहेत - विशेषत: १९४७ नंतर. त्या पुसल्या जाऊ शकतात आणि त्या पुसल्या पाहिजेत. ४७ च्या आधीच्या जखमा वखवखत आणि भळभळत ठेवल्या जातात, मुद्दाम - त्या मागे स्वार्थ आहे, कपट आहे आणि देशाचे अतोनात नुकसान आहे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्म्म
एकंदर संघ म्हणजे ठराविक लोकांना' सायकोलॉजिकल एडव्हांटेज 'मिळावा यासाठी जगवलेली संघटना आहेमना वीट मानू नको बोलण्याचा .....त्यांच्या शाखेत मुस्लिम यायचे
@ ग्रे.थि.
जरा चश्मा काढा
प्रार्थनेत " त्वया हिन्दुभूमे …" असे का म्हणतात ?कारण अनादी कालापासून ही हिण्दुभूमी आहे म्हणून ! हिमालय्स्मारभ्यं याव हिण्दुसरोवरम | तं देव निर्मितं देशं हिण्दुस्थान प्रच़क्षते ( शुद्ध लेखन चु भु द्यावी घ्यावी)मुसलमानांची बाबरीमुसलमानांची बाबरी??? सर , जरा इतिहासाचा अभ्यास वाढ्वा . ते प्रभु रामचंद्राचे जन्मस्थान आहे !त्यावर बाबराने आक्रमण केले.. याला प्राज्ञ मराठीत चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात.मुसलमानांची बाबरी त्यांना विश्वासात घेऊन का पाडली ?अनेक वेळा चर्चा घडली आणि बिघडली.. नपुंसक सरकारने काही ही केले नाही. प्रभु रामचंद्र हा भारताचा राष्ट्र्पुरुष आहे आणि रामजन्मभूमी हा करोडो हिंदुंच्या अस्मितेचा प्रश्न होता. अनेक कारणांनी नाकरल्याच्या संतप्त भावनेचा उद्रेक हा बाबरी पतनाला कारणीभूत ठरला. विहिंप चे आंदोलन हे फक्त तात्कालिक कारण ठरले !मुसलमानांची बाबरी त्यांना विश्वासात घेऊन का पाडली ?तुम्हाला हिंदू शब्दाचा अर्थच समजला नाही. "हिंदू" आणि "कडवा" हे परस्पर विरोधी शब्द आहेत ! हिन्दू शब्दात मुसलमान च काय पण अखिलमानव जातिला सामावून घेण्याची शक्ती आहे.संघाचे ( भाजपचे नव्हे ) किती पदाधिकारी, किती प्रचारक मुसलमान आहेत ? मुसलमानांना जर संघ आपले म्हणतो तर मुसलमानांचा एखादा तरी सण संघ साजरा करतो का ?संघाचे पदाधिकारी अथवा प्रचारक मुसल्मान नाहीत कारण त्यांची उपासना पद्दह्ती ते मान्य करणार नाही! त्यांचेच अन्य बांधव त्यांना जगणे मुष्किल करतील ! ईश्वर अल्ला तेरे नाम " हे म्हणण्यासाठी जी सहिष्णुता लागते , ती दुर्दैवाने त्यान्च्या उपासना पद्द्ध्तीत समाविष्ट होऊ शकत नाही ! पण त्या मर्यादेत राहून अनेक मुस्ल्मान संघाचे हितचिंतक आहेत च की! आणि सण साजरा करण्यासंदर्भात - संघ ही हिंदूचे सारे सण साजरे करत नाहीच , ज्यामुळे आपला विजिगिषु इतिहास आणि दिव्य परंपरांचे आणि पराक्रमी महापुरुषांचे स्मरण होते अश्याच सणांची संघात पद्ध्त आहे. रच्याकने तुम्ही कोणते मुस्लिम सण तुमच्या घरात साजरे करता ? (प्रामाणिक उत्तर अपेक्षित आहे )फार मुसलमानांचा पुळका येउन जर आपण संघविश्वात वावरलात तर बहिष्कृत व्हाल.कैच्या कै ! एक अनाहूत सल्ला - अश्या बहिष्कृतांची संघट्ना आपण बांधावी. शुभस्य शीघ्रम !कैच्या कै ! एक अनाहूत सल्ला -
दोन गोष्टी करा.
शिरखुर्मा... आरेएसेसवाले
ग्रेट थिन्कर
.
सगळ्या धोब्यांना हा शाप
.
तादाद बढाओ कौम खतरे मे है
.
@ उद्दाम
.
तुमच्या
२२४ आणखी एक.... २२५
आयला या धाग्याची नसबंदी करा
ना बट्ट्मण्ण़ ना
च्यामारी
तुम्ही तेच "उद्दाम " का हो?
.
.
ऑ ?????
वाचनमात्र
या धाग्यावर आता कोणतीही विधायक चर्चा न होता फक्त उखाळ्यापाखाळ्या काढणे सुरू झाल्याने वाचनमात्र करत आहोत.