गणेशचतुर्थीच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
भटकंतीच्या निमित्ताने लेणी, मंदिरे फिरता फिरता आढळलेल्या गणेशमूर्ती आज येथे देत आहे.
ह्या मूर्ती निवडतांना मुद्दामच प्राचीन काळातील निवडलेल्या आहेत. साधारण ८व्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंतच्या ह्या मूर्ती. राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार ते यादव या राजवटींमधील ह्या मूर्ती. त्या काळी गणेशदेवतेला मुख्य देवतांत स्थान नव्हते म्हणूनच ह्या काळात गणेशमूर्ती मुख्य गर्भगृहांत कधीही नव्हत्या. त्या कोरलेल्या असायच्या मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांतील गणेशपट्टीवर किंवा सप्तमातृकांपटांमध्ये.
१. सप्तमातृकांसह असलेला वेरूळच्या कैलास लेणीतील यज्ञशाळेतील हा गणेश. शेजारीच आहे सर्वभक्षक काल.
२. वेरूळच्याच २१ व्या क्रमांकाच्या रामेश्वर लेणीतील हा सप्तमातृकांसह असलेला गणेश
३. वेरूळ लेणी क्र. १७ मधील हाती असलेल्या मोदकपात्रातील मोदक (का लाडू?) खात असलेला गणेश.
४. अंजनेरीच्या भग्न जैन मंदिरातील ही गणेश प्रतिमा
५. अंजनेरीतीलच गणेशाची अजून एक भग्न प्रतिमा. ह्या गणेशाने त्याच्या पत्नीला (रिद्धी/सिद्दी) पैकी एकीला आपल्या मांडीवर बसवले आहे.
६. गोंदेश्वर शिवपंचायतनातील एक गणेशमूर्ती
७. गोंदेश्वर मुख्य शिवमंदिराच्या स्तंभावरील गणेशप्रतिमा
८. पाटेश्वर येथील आगळावेगळा गणेश
९. पाटेश्वर येथीलच स्त्रीरूपी गणेश अथवा गणेशिनी अथवा विनायकी
१०. भुलेश्वर येथील स्त्रीरूपी गणेश अथवा गणेशिनी अथवा विनायकी
११. पेडगाव येथील भग्न बाळेश्वर मंदिरातल्या सभामंडपातील स्तंभावर असलेला गणांसह नृत्यमग्न गणेश
१२. तिथल्याच बाह्य भिंतीवर असलेला अजून एक नृत्यमग्न गणेश
१३. पेडगाव येथीलच अजून एका भग्न मंदिरातील गणेशमूर्ती
१४. पिंपरी दुमाला येथील प्राचीन मंदिरातील गणेशप्रतिमा
१५. पिंपरी दुमाला येथीलच महावीरांसह असलेली गणेश प्रतिमा
१६. पांडेश्वरच्या यादवकालीन शिवमंदिरातीच्या बाह्य भिंतीवर असलेला गणेश
१७. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या बाह्य भिंतीवर असलेली भव्य गणेशप्रतिमा
१८. खिद्रापूरच्या मंदिरातील सप्तमातृकापट. डवीकडे वीरभद्र शिव मध्ये सप्तमातृका आणि शेवटी उजवीकडे गणेश
९. पाटेश्वर येथीलच स्त्रीरूपी गणेश अथवा गणेशिनी अथवा विनायकी
१०. भुलेश्वर येथील स्त्रीरूपी गणेश अथवा गणेशिनी अथवा विनायकी
११. पेडगाव येथील भग्न बाळेश्वर मंदिरातल्या सभामंडपातील स्तंभावर असलेला गणांसह नृत्यमग्न गणेश
१५. पिंपरी दुमाला येथीलच महावीरांसह असलेली गणेश प्रतिमा
१६. पांडेश्वरच्या यादवकालीन शिवमंदिरातीच्या बाह्य भिंतीवर असलेला गणेश
१७. खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या बाह्य भिंतीवर असलेली भव्य गणेशप्रतिमा
विशेष
वाचने
43199
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरेख
मस्तच
+1
+1
In reply to +1 by स्पा
kalekshan ek number!!!!
समयोचीत.>+१असेच म्हणतो
मस्त!
+१ असेच म्हणतो
In reply to मस्त! by पैसा
भन्नाट रे!
आयला कुठुन कुठुन शोधुन मिळवले
प्रत्येक मंदिरावर सविस्तर लेख
In reply to आयला कुठुन कुठुन शोधुन मिळवले by मृत्युन्जय
काही प्रश्न
काही उत्तरे
In reply to काही प्रश्न by चित्रगुप्त
ही सगळी उत्तरे वाचून ....
In reply to काही उत्तरे by प्रचेतस
सही सुरुवात....!
|| श्री गजानन जय गजानन ||
टाळ्या...............!!!
अफलातुन
सातीआसरा ह्या
In reply to अफलातुन by झकासराव
आसरा
In reply to सातीआसरा ह्या by प्रचेतस
धन्यवाद.
In reply to आसरा by पैसा
लज्जागौरी
In reply to धन्यवाद. by प्रचेतस
माहितीपुर्ण प्रतिसाद पैसाताइ
In reply to आसरा by पैसा
आसरा कंदी बगितल्यात का ?
In reply to आसरा by पैसा
करा तयारी!
In reply to आसरा कंदी बगितल्यात का ? by जेपी
मस्तच
छान शिल्पे. फक्त
हा गणपती नाही वाटला, हत्ती
In reply to छान शिल्पे. फक्त by llपुण्याचे पेशवेll
सुरेख !
सुंदर छायाचित्रे आणि माहिती सुद्धा
अतिशय सुंदर शिल्पे.
सुंदर संकलन!
स्त्रीरूपी गणेश / विनायकी हे
यातली बहूतेक शिल्पे
सुरेख शिल्पे.
गणेशाच्या आकृतिबंधातच डौल आहे
In reply to सुरेख शिल्पे. by सस्नेह
दाद्या यज्ञवराहमूर्ती जशी
In reply to गणेशाच्या आकृतिबंधातच डौल आहे by अभ्या..
गणेशाची सर्व शिल्पचित्रे
जबरी धागा रे!!
अप्रतिम
+१
In reply to अप्रतिम by सुमीत भातखंडे
वा..
खिद्रापूर वाला आपला फेव्हरेट
स्त्रीरुप गणेश पाहुन चाट पडले
+१
In reply to स्त्रीरुप गणेश पाहुन चाट पडले by स्पंदना
सुंदर
रा. चिं. ढेरे
रेखाचित्र रोचक आहे.
In reply to रा. चिं. ढेरे by पैसा
मातृका
In reply to रेखाचित्र रोचक आहे. by प्रचेतस
अप्रतिम !
+१
In reply to अप्रतिम ! by कंजूस