Skip to main content

मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२

लेखक प्रास यांनी रविवार, 15/07/2012 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
॥ जालिंदरबाबा की जय ॥
जुन्या-जाणत्या, वृद्धानुभवी मिपाकरांच्या आशीर्वादाने आणि नव्या-जाणत्या, होतकरू-तरुण मिपाकरांच्या पुढाकाराने
मिसळपाव धर्म वाढवावा। अवघा हलकल्लोळ करावा॥
या इराद्याने यंदाचे 'मिसळपाव मान्सून संम्मेलन - २०१२' मुंबईच्या पश्चिम दृतगती मार्गावर आयोजित केलेले आहे. सदर सम्मेलनासाठी हे स्थान निश्चित करण्यात आलेले असून दिनांक २२ जुलै २०१२ रोजी सांध्याकाळी ५:३० वाजण्याच्या सुमुहूर्तावर इथे येण्याचे आमंत्रण या अनुषंगाने सर्व मिसळपाव सदस्यांना देत आहोत. या मिषाने जुन्या-नव्या मिपाकरांमध्ये मैत्रीचे नवे धागे गुंफणे शक्य होईल आणि त्याचप्रमाणे आंतरजालिय व्यक्तिमत्त्वांच्या भेटीद्वारे आपला अभ्यास वाढवणेही शक्य होईल अशी आशा आहे. कार्य सिद्धीस नेण्यास सर्व मिसळप्रेमी समर्थ आहेतच तरी उपरोल्लेखित कार्यक्रमामध्ये अधिकाधिक मिपाकरांनी हजेरी लावावी अशी विनंती आहे. दाराज् धाबा मध्ये मिळणार्‍या पदार्थांचा मेन्यू आंतरजालावर उपलब्ध आहे आणि भोजनाचा दरडोई खर्च (सुमारे) रु. ५००/- (रुपये पाचशे फक्त) अपेक्षित आहे. मिपाकर आगत्ये येऊन 'मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२' यशस्वी करतील अशी खात्री व्यक्त करतो. प्रतिसादांच्या माध्यमातून मिपाकरांनी आपली उपस्थिती कळवल्यास मंडळ आभारी राहील. तेव्हा आता २२ तारखेला भेटूच!
जय हिन्द । जय महाराष्ट्र । जय मिसळपाव ।

वाचने 15619
प्रतिक्रिया 79

प्रतिक्रिया

In reply to by मितभाषी

जरूर देऊ शकता की. कुठलीही चांगली गोष्ट करायला अजिबात आडकाठी नाही. त्याचे काय आहे ना, कधी कधी काही समाजकंटक सदृश घटक अनावश्यक वाद निर्माण करू शकतात, मग उगाच कटकट होते. ते टाळावे म्हणून अत्यंत नाईलाजाने हे उद्धट वाक्य लिहावे लागले. कुणाचे मन दुखावले असल्यास दिलगीर आहे.

In reply to by स्पा

स्पाकाकांनी केवळ आंतरजालिय धन्यवादावर बोळवण करू नये. विमेकाकांची बोळवण प्रत्यक्ष धन्यवाद देऊन करावी ही विनंती. __________________________ कोण म्हणतो टॅब्ब दिला.......

अरे कुणीतरी त्या प्रभुमास्तराना किडनॅप ( मास्तर आणि किड कसे ते विचारू नये) करून आणा रे. कुठं भटकत असतात कोण जाणे

पुन्हा सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देण्यासाठी धागा वर आणत आहे. ज्यांना शक्य होईल त्यांनी जरूर सम्मेलनास भेट देऊन आपली घोषणा सार्थक करावी -
मिसळपाव धर्म वाढवावा । अवघा हलकल्लोळ करावा ॥

कट्ट्याला शुभेच्छा! गवि, लाइव्ह अपडेट्ससाठी ऑनलाईन असणार आहे. नक्की अपडेट्स टाका! - (चेन्नैस्थित असल्याने हे सम्मेलन मिस करणारा) सोकाजी :(