✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२

प
प्रास यांनी
Sun, 07/15/2012 - 22:42  ·  लेख
लेख
॥ जालिंदरबाबा की जय ॥
जुन्या-जाणत्या, वृद्धानुभवी मिपाकरांच्या आशीर्वादाने आणि नव्या-जाणत्या, होतकरू-तरुण मिपाकरांच्या पुढाकाराने
मिसळपाव धर्म वाढवावा। अवघा हलकल्लोळ करावा॥
या इराद्याने यंदाचे 'मिसळपाव मान्सून संम्मेलन - २०१२' मुंबईच्या पश्चिम दृतगती मार्गावर आयोजित केलेले आहे. सदर सम्मेलनासाठी
दाराज् धाबा, पश्चिम दृतगती मार्ग, घोडबंदर रोड, मिरा रोड (पूर्व)
हे स्थान निश्चित करण्यात आलेले असून दिनांक २२ जुलै २०१२ रोजी सांध्याकाळी ५:३० वाजण्याच्या सुमुहूर्तावर इथे येण्याचे आमंत्रण या अनुषंगाने सर्व मिसळपाव सदस्यांना देत आहोत. या मिषाने जुन्या-नव्या मिपाकरांमध्ये मैत्रीचे नवे धागे गुंफणे शक्य होईल आणि त्याचप्रमाणे आंतरजालिय व्यक्तिमत्त्वांच्या भेटीद्वारे आपला अभ्यास वाढवणेही शक्य होईल अशी आशा आहे. कार्य सिद्धीस नेण्यास सर्व मिसळप्रेमी समर्थ आहेतच तरी उपरोल्लेखित कार्यक्रमामध्ये अधिकाधिक मिपाकरांनी हजेरी लावावी अशी विनंती आहे. दाराज् धाबा मध्ये मिळणार्‍या पदार्थांचा मेन्यू आंतरजालावर उपलब्ध आहे आणि भोजनाचा दरडोई खर्च (सुमारे) रु. ५००/- (रुपये पाचशे फक्त) अपेक्षित आहे. मिपाकर आगत्ये येऊन 'मिसळपाव मान्सून सम्मेलन - २०१२' यशस्वी करतील अशी खात्री व्यक्त करतो. प्रतिसादांच्या माध्यमातून मिपाकरांनी आपली उपस्थिती कळवल्यास मंडळ आभारी राहील. तेव्हा आता २२ तारखेला भेटूच!
जय हिन्द । जय महाराष्ट्र । जय मिसळपाव ।
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
धोरण
संस्कृती
जीवनमान
राजकारण
शिक्षण
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
बातमी
शिफारस
माहिती
वाद
आस्वाद
प्रतिभा
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
15544 वाचन

💬 प्रतिसाद (79)

प्रतिक्रिया

जमल्यास नक्की येणार..

मुक्त विहारि
Sun, 07/15/2012 - 22:52 नवीन
जमल्यास नक्की येणार..
  • Log in or register to post comments

>>दाराज् धाबा मध्ये

मराठमोळा
Mon, 07/16/2012 - 07:52 नवीन
>>दाराज् धाबा मध्ये मिळणार्‍या पदार्थांचा मेन्यू आंतरजालावर उपलब्ध आहे आणि भोजनाचा दरडोई खर्च (सुमारे) रु. ५००/- (रुपये पाचशे फक्त) अपेक्षित आहे. (परा मोड) गरीबांसाठी काही सवलत आहे का? असल्यास विचार केला जाईल. आधीच मंदी आलीये आणि त्यात हुच्चभ्रु लोकं संम्मेलनं करताहेत. देशाची वाट लागलेली असताना लोकं अशा पार्ट्या करताना पहुन एक मिपाकर म्हणून शरम वाटली. (/परा मोड) अवांतरः मजा करा लेको.. शुभेच्छा आणि फोटू टाकायला विसरु नका. एक दोघांना बुकलुन काढायचे आहे, ते येणारेत असे दिसले की व्यनीतून मिपा पैलवानांना सुपारी दिली जाईल. ;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद रे ममो.

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/16/2012 - 11:06 नवीन
कष्ट वाचवलेस बरेच माझे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. (लेखकाशी आदर राखून)
दाराज् धाबा मध्ये मिळणार्‍या पदार्थांचा मेन्यू आंतरजालावर उपलब्ध आहे आणि भोजनाचा दरडोई खर्च (सुमारे) रु. ५००/- (रुपये पाचशे फक्त) अपेक्षित आहे.
अशा ओळी आल्या की आम्हाला 'सार्वजनिक हळदी कुंकू , भोंडला, मंगळागौरी किंवा गेला बाजार बायकांच्या भिशीची' आठवण येते. 'मला न्यायला आणि सोडायला कोणी आहे का ?' अशा प्रश्नाने सुरुवात करायची. टेबलला बसल्या बसल्या दिसतील त्यांना चार चार शिव्या घालायच्या, जे आले नसतील त्यांच्या गैरहजेरीवरुन अफवा पसरवायच्या.. हे सगळे झाले की पुढचे तास दोन तास मनसोक्त खान पानाचा आनंद लुटायचा. जमेल तेवढे 'मनाचे श्लोक' सांगायचे, दुसर्‍याची खेच खेच खेचायची.. आणि बिल आले की किरंगळी वर करून तोंड काळे करायचे ही आहे आमची कट्ट्याची व्याख्या. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे ज्या माणसासाठी कट्टा भरवला आहे, त्यालाच घरुन निघेपर्यंत कुठे जायचे आहे हे माहिती नसणे आणि कट्टेकरी घरून निघाले की प्रवासात शेवटी एकदाची कट्याची जागा ठरणे ह्या सारखी मजा नाही. ;) आणि शेठ तुम्ही मान्सून वैग्रेची काळजी करू नका हो. सच्चे मिपाकर जमले की तिथे आपोआप सगळे ऋतु फुलतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

हॅ हॅ हॅ..

गवि
Mon, 07/16/2012 - 11:13 नवीन
घरुन निघेपर्यंत कुठे जायचे आहे हे माहिती नसणे ..
हॅ हॅ हॅ.. आणि कट्टेकरी कट्ट्यावरुन परत निघाले की घर कुठे आहे हे माहीत नसणे .. ते विसरलेत का हो? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

हा हा हा

परिकथेतील राजकुमार
Mon, 07/16/2012 - 11:24 नवीन
हॅ हॅ हॅ.. आणि कट्टेकरी कट्ट्यावरुन परत निघाले की घर कुठे आहे हे माहीत नसणे .. ते विसरलेत का हो?
ते कसे विसरीन गवि ? म्हणून 'न्यायला आणि सोडायला कोण येणार ?' हा प्रश्न मी आधी सोडवून घेतो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

अगदी अगदी!... काही हडळी आणि

बिपिन कार्यकर्ते
Mon, 07/16/2012 - 11:24 नवीन
अगदी अगदी!... काही हडळी आणि मुज्यांना घरी (त्यांच्या त्यांच्या) सोडायला आम्हालाच जावे लागते! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

मिसळपाव आणि संमेलन याबद्दल

५० फक्त
Mon, 07/16/2012 - 07:58 नवीन
मिसळपाव आणि संमेलन याबद्दल खात्री आहे, मान्सुन बद्दल काय ? अर्थात येत आहोच..
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

नंदन
Mon, 07/16/2012 - 08:08 नवीन
संमेलनाला शुभेच्छा! कट्टा दणक्यात होणार यात काही शंका नाही. वृत्तांत (जमल्यास लाईव्ह) आणि फोटू नक्की टाका.
  • Log in or register to post comments

अरेच्च्या!!

किसन शिंदे
Mon, 07/16/2012 - 08:14 नवीन
पावसाळी सम्मेलनाच ठिकाण बदललं कि काय.? :O असो. हजेरी लावल्या जाईलच. :)
  • Log in or register to post comments

वोक्के.

गणपा
Mon, 07/16/2012 - 08:17 नवीन
वोक्के. :)
  • Log in or register to post comments

गणपा भौ,

किसन शिंदे
Mon, 07/16/2012 - 08:22 नवीन
वोक्के.
या शब्दाचा अर्थ कळाला नाही. वोक्के नेमकं कशासाठी..?? :) पावसाळी सम्मेलनालासाठी वोक्के कि जे ठिकाण ठरवलंय त्या ठिकाणासाठी वोक्के.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

पावसाळी सम्मेलनालासाठी वोक्के

गणपा
Mon, 07/16/2012 - 12:34 नवीन
पावसाळी सम्मेलनालासाठी वोक्के कि जे ठिकाण ठरवलंय त्या ठिकाणासाठी
दोन्हींसाठी. हजेरी लावल्या जाईल. ठिकाणही माहितीचे असल्याने फार शोधाशोध करावी लागणार नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

समस्त कट्ट्याला जाणार्‍या

मराठमोळा
Mon, 07/16/2012 - 12:48 नवीन
समस्त कट्ट्याला जाणार्‍या मिपाकरांनो, गणपा तिथे येणार आहे त्यामुळे ५०० रुपये वगैरे खर्च करायची गरज पडणार नाही. या व्यक्तीला किडनॅप करुन हवे ते पदर्थ करुन घेणे, इकडे थोडेसे जेवण पार्सल करुन देणे. सुपारी व्यनीतून न देता हे जाहीर टेंडर काढण्यात आले आहे याची नोंद घ्यावी. इकडे जेवण पोहोचताच किडनॅपर ला योग्य बक्षीस देण्यात येईल. लावा बोली. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

प्रकाटाआ

सूड
Mon, 07/16/2012 - 14:34 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

शुभेच्छा.

प्रचेतस
Mon, 07/16/2012 - 09:06 नवीन
शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

व्वा व्वा... हजेरी लावण्याचा

सुहास झेले
Mon, 07/16/2012 - 11:09 नवीन
व्वा व्वा... हजेरी लावण्याचा नक्की प्रयत्न केल्या जाईल :) :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा !!

सूड
Mon, 07/16/2012 - 11:37 नवीन
शुभेच्छा !!
  • Log in or register to post comments

काही शंका..

सस्नेह
Mon, 07/16/2012 - 12:00 नवीन
१. हे आमंत्रण स्त्री सदस्यांना ही आहे काय ? असल्यास, २. वेळापत्रक ? ३. वाहनव्यवस्था ?
  • Log in or register to post comments

काही उत्तरं....

प्रास
Mon, 07/16/2012 - 13:48 नवीन
१. हे आमंत्रण स्त्री सदस्यांना ही आहे काय ?
निदान आमच्यापुरते आम्ही 'जेन्डर बायस्ड' नसल्याने स्त्री सदस्यांचा वेगळा उल्लेख टाळतो हे सूज्ञांच्या लक्षात आलेलं असेलंच तरी वैयक्तिक निमंत्रणा ऐवजी धागा हेच निमंत्रण मानून स्त्री सदस्यांनीही आगत्ये येणं करावं ही पुन्हा एकदा विनंती.
असल्यास,
आता नक्कीच स्पष्ट झालं असावं....
२. वेळापत्रक ?
सम्मेलनस्थानी पोहोचण्याची वेळ संध्याकाळी ५:३० अशी ठरवलेली आहे. आपापल्या गन्तव्य स्थानानुसार सम्मेलनस्थानावरून परतण्याची वेळ प्रत्येकाने स्वतः ठरवावी ही अपेक्षा आहे.
३. वाहनव्यवस्था ?
अशा सम्मेलनांसाठी कोणत्याही ठीकाणावरून वाहन व्यवस्था करणं कठीण होतं परंतु सम्मेलनस्थान हे पश्चिम दृतगती मार्गावरील प्रसिद्ध ठीकाण असल्याने मिरा रोड अथवा भाईन्दर रेल्वे स्थानकापासून रीक्षाने गाठणे सोपे आहे. या व्यतिरिक्त ठाण्याहून बोरीवलीला येणार्‍या आणि बोरीवलीतून ठाण्याला जाणार्‍या बससेवेचा 'दाराज् धाबा' हा थांबा आहे. या दोन्ही ठीकाणांवरून येणार्‍यांना हे सोयीचे होईल असं वाटतं. धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

धन्यवाद.

सस्नेह
Mon, 07/16/2012 - 17:06 नवीन
सर्व उत्तरांबद्दल आणि आमंत्रणाबद्दल धन्यवाद. येण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

शुभेच्छा..

मन१
Mon, 07/16/2012 - 12:05 नवीन
जोरदार(की मान्सून असल्यानं "धुवांधार" ? ) होउ द्यात.
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

सर्वसाक्षी
Mon, 07/16/2012 - 12:17 नवीन
संमेलनास शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

बिझ्झी...सिझन...!

अत्रुप्त आत्मा
Mon, 07/16/2012 - 12:41 नवीन
बिझ्झी...सिझन...! त्यामुळे...पास...आणी शुभेच्छा :-)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा!

स्मिता.
Mon, 07/16/2012 - 14:13 नवीन
मान्सून संमेलनास आमच्या शुभेच्छा! नंतर डिट्टेलवार वृत्तांत आणि फोटो टाकायला विसरू नका.
  • Log in or register to post comments

कट्ट्याला

sneharani
Mon, 07/16/2012 - 14:15 नवीन
शुभेच्छा!! गणपाभाऊ येताहेत म्हणल्यावर कट्टा जोरदार...!! :)
  • Log in or register to post comments

शुभेच्छा

जाई.
Mon, 07/16/2012 - 14:35 नवीन
शुभेच्छा
  • Log in or register to post comments

धाबा

विनायक प्रभू
Mon, 07/16/2012 - 15:23 नवीन
दारा(वा)ज धाबा का? चान चान.
  • Log in or register to post comments

भरपुर शुभेच्छा...

आत्मशून्य
Mon, 07/16/2012 - 17:05 नवीन
मस्त वृत्तांताच्या प्रतिक्षेत.
  • Log in or register to post comments

मान्सून सम्मेलन मुद्दाम मुंबई

शित्रेउमेश
Mon, 07/16/2012 - 20:46 नवीन
मान्सून सम्मेलन मुद्दाम मुंबई मध्ये ठेवले आहे. १. पुण्यातल्या मिपा करांना जळवायला. आणि, २. पुण्यात अजुन मान्सून अवतरला नाहिये. ;) - १ मिपा प्रेमी, पुणेकर (नविन सभासद)
  • Log in or register to post comments

नावावरून हे ठिकाण शहराबाहेरील

विश्वनाथ मेहेंदळे
Mon, 07/16/2012 - 20:51 नवीन
नावावरून हे ठिकाण शहराबाहेरील एखादा धाबा वाटत असेल तर तसे काही नाही. हे family restaurant आहे, ते ही शहराच्या मधोमध, भर वस्तीत. त्यामुळे कुणीही (विशेषत: महिला वर्गाने) त्या कारणाने न येण्याचे ठरवू नये. मागील वेळेप्रमाणे यंदाही कट्टा कोरडा असेल. मान्सून आणि धाबा अशामुळे उगाच गैरसमज नको. कट्टेकरी सहकार्य करतीलच. एक अति महत्त्वाची सूचना :- जे या कट्ट्याला येण्याची शक्यता आहे त्यांनीच या धाग्यावर वरील पैकी कुठल्याही बाबतीत मत/सूचना व्यक्त करावी ही नम्र विनंती. तात्विक चर्चेसाठी सरळ दुसरा धागा काढावा. (सरळसोट) विमे लाडू :-)
  • Log in or register to post comments

अर्थातच विमेकाकांना अनुमोदन

प्रास
Tue, 07/17/2012 - 11:05 नवीन
अर्थातच विमेकाकांना अनुमोदन आहे. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

माझंही विमेला अनुमोदन.

गवि
Tue, 07/17/2012 - 11:33 नवीन
माझंही विमेला अनुमोदन. सर्वांना विशेषतः ओळखीच्या / अनोळखी अशा सर्व स्त्री सदस्यांना कट्ट्यावर कंफर्टेबल वाटणं या गोष्टीला सर्वोच्च प्राधान्य आहे. शिवाय अत्यंत इनोसंट निष्पाप सदस्यांकरिता "कोरडा कट्टा" म्हणजे "मद्यपान नसलेला कट्टा" असं सोपं शब्दरुपांतर करतो. कोणाला असं वाटायला नको की मागच्या वेळी फार पाऊस पडल्याने ओल्यात अथवा गळक्या जागी बसावं लागलं, आणि यंदा मात्र कोरड्या जागेची सोय केली आहे.. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

>>एक अति महत्त्वाची सूचना :-

सूड
Tue, 07/17/2012 - 11:14 नवीन
>>एक अति महत्त्वाची सूचना :- जे या कट्ट्याला येण्याची शक्यता आहे त्यांनीच या धाग्यावर वरील पैकी कुठल्याही बाबतीत मत/सूचना व्यक्त करावी ही नम्र विनंती. तात्विक चर्चेसाठी सरळ दुसरा धागा काढावा. हे काय विमेकाका, हा प्रतिसाद टाकलात ? आता चाळीतल्या नळांवरती वडाची साल पिंपळाक लावणार्‍या बायकांसारखे जे प्रतिसाद आले असते ते वाचण्याची मजा हिरावून घेतलीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

+५०५

स्पा
Tue, 07/17/2012 - 11:29 नवीन
हे काय विमेकाका, हा प्रतिसाद टाकलात ? आता चाळीतल्या नळांवरती वडाची साल पिंपळाक लावणार्‍या बायकांसारखे जे प्रतिसाद आले असते ते वाचण्याची मजा हिरावून घेतलीत. अरेरे काय दिवस आलेत.. सूड काकांशी सहमत व्हाव लागतंय असो.. कट्ट्याला शुभेच्छा :) .......................................................... सध्या आमचे येथे दुसर्याच्या खवट (खवत) जाऊन तीसर्याबद्दल गॉसिप करण्याचे संवत्सर सुरु असलेने कोणाचाही उघड अपमान करणे टाळत आहोत(मागून मारणे सोप्पे असते ), त्यामुळे आमच्यात सात्विक बदल वैगरे झाल्याचा गैरसमज करुन घेऊ नये. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काल तुम्हा दोघांची प्रकर्षाने

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 07/17/2012 - 11:56 नवीन
काल तुम्हा दोघांची प्रकर्षाने आठवण आली होती रे. यायचे जमवा ना राव :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मेल्या स्पावड्या, तू रे कशाला

गवि
Tue, 07/17/2012 - 12:13 नवीन
मेल्या स्पावड्या, तू रे कशाला शुभेच्छा देतोयस? न येण्याचा विचार आहे की काय? हे पहा, स्पष्टच सांगतो, प्रासादि बलदंड व्यक्ती येऊन तुला उचलून नेण्यापेक्षा स्वतःच्या पायांनी ये हे उत्तम..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

कट्टा जाम मिसणार आहे.

सूड
Tue, 07/17/2012 - 16:22 नवीन
न येण्याची शक्यता ९०% आहे, त्यातही येनकेनप्रकारेण जमलं तर नक्की कळवतो. बा द वे स्पावड्याची नवी स्वाक्षरी माझ्या स्वाक्षरीच्या चालीवर रचली असली तरी छान आहे. :) @मकमावशी, गप्प बसायचे ठरविले आहे ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ता चाळीतल्या नळांवरती वडाची

मस्त कलंदर
Tue, 07/17/2012 - 11:50 नवीन
ता चाळीतल्या नळांवरती वडाची साल पिंपळाक लावणार्‍या बायकांसारखे जे प्रतिसाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

सूड ने ते अत्यंत नाईलाजाने

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 07/17/2012 - 19:41 नवीन
सूड ने ते अत्यंत नाईलाजाने लिहिले असणार. मनात आले ते सभ्यतेच्या चौकटीत बसणारे नसेल म्हणून ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मस्त कलंदर

होय तर.. भरपुर रिकाम्या वेळात

मराठमोळा
Tue, 07/17/2012 - 19:49 नवीन
होय तर.. भरपुर रिकाम्या वेळात सगळे लेख वाचून फक्त ठराविक ठिकाणी शब्दांचे खेळ करणे सगळ्यांनाच थोडीच जमते.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पुण्यात कधी ?

डावखुरा
Mon, 07/16/2012 - 22:08 नवीन
पुण्यात कधी ?
  • Log in or register to post comments

आम्ही दर वीकांताला भेटत असतो...

मोदक
Tue, 07/17/2012 - 12:27 नवीन
आम्ही दर वीकांताला भेटत असतो... मुंबईकरांसारखे चेंगटपणे ३ / ४ महिन्यातून एकदा भेटत नाही. काडी लावण्यात आली आहे. :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डावखुरा

मुंबईकर होण्यासाठी मुंबईचा

गवि
Tue, 07/17/2012 - 12:31 नवीन
मुंबईकर होण्यासाठी मुंबईचा जाज्वल्य अभिमान असलाच पाहिजे अशी अट मुळीच नाही. ती अट पुण्याला. -श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

कंपू.. कंपू..

मोदक
Tue, 07/17/2012 - 12:37 नवीन
विमेंच्या सुचनेला लावलेली काडी गविंनी का विझवावी??? :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

फरक आहे ना राव. आम्ही राजरोस

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 07/17/2012 - 13:03 नवीन
फरक आहे ना राव. आम्ही राजरोस धागे काढून कट्टे करतो. छुप्या (invitation only) भेटी नाही करत. काडी लावून घेण्यात आली आहे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

शुभेच्छा!

सुनील
Mon, 07/16/2012 - 23:42 नवीन
शुभेच्छा!!
  • Log in or register to post comments

हजेरी लावण्याचा प्रयत्न आहे.

मनोज श्रीनिवास जोशी
Tue, 07/17/2012 - 01:16 नवीन
हजेरी लावण्याचा प्रयत्न आटोकाट प्रयत्न आहे.
  • Log in or register to post comments

एक शंका!

कापूसकोन्ड्या
Tue, 07/17/2012 - 23:23 नवीन
तिथे मटार उसळ आणि शिक्रण पोळी मिळेल का?
  • Log in or register to post comments

प्रत्यक्ष येऊन स्वदृष्टीने

प्रास
Wed, 07/18/2012 - 11:40 नवीन
प्रत्यक्ष येऊन स्वदृष्टीने पाहून शंका-समाधान करून घेणं चांगलच, नै का? आता त्यासाठी का होईना, कट्ट्याला या, राव! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कापूसकोन्ड्या

दाराज ढाब्यात शिक्रण ? म्हणजे

गवि
Wed, 07/18/2012 - 11:55 नवीन
दाराज ढाब्यात शिक्रण ? म्हणजे मालवण किनारा मधे पास्ता? हायवे गोमांतकमधे साबुदाणा खिचडी ? तांबे आरोग्यभुवनात मटणपॅटिस? पिझ्झा हट मधे मिसळ? के एफ सी मधे थालीपीठ? स्वाद थाळी मधे सुक्की वजडी? हां... मटार उसळी ऐवजी आलू मटर मिळेल हो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा