चिंम्प्स शिकार करतात हो, अगदी सजातीय प्राण्यांची म्हणजे छोट्या माकडांची शिकार तर प्राधान्याने करतात. छोट्या माकडांचे वसतीस्थान हेरून आधी आसपासची सारी झाडे पकडून बसतात, जणू वेढाच घालतात. नि मग मुख्य नर मधल्या झाडांवरील माकडांवर हल्ला चढवतो. आजूबाजूचे त्यांना दुसर्या झाडावर उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न करताना रोखतात किंवा शिकार करतात. मग आता माणूस स्वजनाहारी (कॅनिबल) झाला तर योग्य ठरेल का हो?
याशिवाय काही लहानसहान प्राण्यांची शिकारदेखील करतात. चिम्प्स मुळीच शाकाहारी नाहीत. बाकीचे शाकाहार/मांसाहार वगैरेचे कवित्व आमच्या विट्रेंस्टचे नसल्याने तुमचे चालू द्या.
शाकाहार नक्कीच चांगला आहे.
पण शरीराच्या प्रथिनांच्या गरजेच्या पूर्ततेसाठी रोजच्या जेवणात कडधान्ये असावीत. कडधान्यातून प्रथिने मिळतात पण त्यांना 'अपूर्ण प्रथिने' म्हणतात ती शरीरात पूर्णपणे शोषली जात नाहीत. त्यासाठी त्या बरोबर कार्बोहायड्रेट्स असावेत. जसे, भात, भाकरी इ. म्हणूनच आपल्याकडे वरण भात, मुगाच्या डाळीची आणि तांदूळाची खिचडी खायची पद्धत आहे, तांदूळ+उडीदाची डाळ असलेली इडली अशा पदार्थांचा आहारात समावेश जास्त असावा.
मांसाहारी पदार्थात प्रथिने अधिक असतात आणि ती 'पूर्ण' प्रथिने ह्या सदरात मोडतात आणि शरीरात पूर्णपणे शोषली जातात.
आयुष्यभर शरीराला प्रथिनांची कमतरता भासली तर म्हातारपणी काही विशिष्ट आजार (पाय असह्य दुखणे इ.इ.) होऊ शकतात. माझ्या आईला ह्याचा त्रास झाला होता. पूर्ण शाकाहारी व्यक्तींमध्ये ह्याचे प्रमाण अधिक आहे.
मांसाहारी पदार्थात प्रथिने अधिक असतात आणि ती 'पूर्ण' प्रथिने ह्या सदरात मोडतात आणि शरीरात पूर्णपणे शोषली जातात.
सहमत.
पूर्ण शाकाहारी व्यक्तींमध्ये ह्याचे प्रमाण अधिक आहे.
असहमत.मला वाटते हा संशोधनाचा विषय आहे.
आणि काका मला शाकाहार चांगला किं मांसाहार चांगला या वादात पडायचे नाहि आहे.हा ज्याचा त्याचा व्ययक्तिक प्रश्न आहे.
-------------------
जय आदिवासी.
मला वाटते हा संशोधनाचा विषय आहे.
माझ्या आईच्या आजारपणात तज्ज्ञ फिजिशियन कडून ही माहिती मिळाली. त्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात शिकविले जाते त्या अर्थी कांही तरी तथ्य असावे असे मला वाटते. बाकी ह्या विषयावर मी जास्त अधिकारवाणीने बोलू/लिहू शकत नाही.
मटण खाणाऱ्या व्यक्तींना कर्करोग होण्याची शक्यता अधिक असल्याचा दावा "ग्लोबल ऍग्रीकल्चरल इन्फॉर्मेशन नेटवर्क'ने (ग्लोबोकॅन) प्रसिद्ध केलेल्या अहवालात केला आहे.
ही महिती आजच्या सकाळ मधिल आहे.
http://www.esakal.com/esakal/20120704/5665452963893279664.htm
निरिक्षण १ - चिम्स हे केवळ मांसाहारीच नव्हे तर, स्वजातभक्षीदेखिल आहेत, हे वर ररांनी सांगितलेच आहे. तेव्हा हा मुद्दा बाद.
निरिक्षण २ - मनुष्य कच्चे मांस खात नाही. सबब, त्याला तीक्ष्ण दातांची वा सुळ्यांची आवश्यकता नाही. हा मुद्दादेखिल बाद.
निरिक्षण ३ - मुद्दा नीट समजला नाही. मनुष्य मांसाहारदेखिल चावूनच खातो, गिळून नव्हे :)
निरिक्षण ४ - मानवी शरीरातील एक हल्ली वापर होत नसलेला भाग यातच सगळे आले, नाही का?
निरिक्षण ५ - काय पण तुलना? बालक कोंबडीचे पिल्लू कसे खाईल? त्याऐवजी सफरंचंद आणि मस्त भाजलेली चिकन तंदूरी ठेवा आणि मग बघा, ते बालक काय करते ते ;)
थोडक्यात, ज्याला जे हवे, ते त्याने खावे. नसती कारणमिमांसा देत बसू नये :)
निरिक्षण २ - मनुष्य कच्चे मांस खात नाही. सबब, त्याला तीक्ष्ण दातांची वा सुळ्यांची आवश्यकता नाही. हा मुद्दादेखिल बाद.
अनेक भाज्या, धान्येही आधुनिक मनुष्य कच्च्या खात नाही, बर्याच प्रक्रिया करून खातो. कच्ची पीठं खाल्ल्यास अनेकांना पोटदुखी इत्याही होतात. (निदान कणीक भिजवल्यावर आई अशी तंबी देतेच देते.)
ज्याला जे हवे, ते त्याने खावे. नसती कारणमिमांसा देत बसू नये
मनोबांचा धागा ग्रेट, आणी पेठकर काकांचे एकाहुन एक मुहतोड जबाब त्याहुन ग्रेट...!
व्वा..! चर्चा व्हावी तर ती अशी. शिवाय आयुर्वेदातले उल्लेखही बारकावे हेरणारे आहेत. मला तर असं वाटतं की हा अख्खा धागाच एका छोट्याश्या पुस्तकात रुपांतरीत करुन(आणखि आवश्यक भर घालुन) हे पुस्तक शाकाहारी आणी मांसाहारी अश्या दोन्ही प्रकारच्या लोकांना मोफत लस म्हणुन वाटावे. कारण दोघांमधेही त्या त्या मताचा व्हायरस असतोच..!
प्राण्यांच्या उत्क्रांती प्रक्रियेचा वर वर अभ्यास केला तर असे लक्ष्यात येते कि प्रत्येक प्राणीमात्रात त्याच्या उदरभरणासाठी लागणारे अन्न मिळवण्यासाठी स्वयम्भूत साधने असतात. मांसाहारी प्राण्यान्जवळ नखे, सुळे अशी शिकारीची साधने असतात. मनुष्यामध्ये अशी साधने नाहीत ह्यांचे कारण मानव हा शाकाहारी घडविला गेला आहे. त्याने नंतर बुद्धीचा वापर करून काठी, बाण,सापळा व इतर बाह्य साधनांचा वापर करून शिकार करावयास सुरुवात केली आणि ह्यामुळे तो मांसाहारी होऊ शकला, बाकी नैसर्गिक पणे तो शाकाहारीच घडला आहे.
i-lA~रमेशचे अनेक अर्थ आथवले मला.
असो.
महोदय!
तुम्ही 'वर वर' अभ्यास केला तर मी तुम्हाला, 'खाली खाली' हाका मारीन. अन प्रश्न विचारीन.
हे 'वर वर अभ्यास' काय आहे?
तुमच्या उदरात उंदीर भरला अन गवत भरले, तर उंदराने जिवंत रहाल की गवताने?
खाली खाली विचार केला तर गवत पचवता येत नाही. त्यातले ना क्लोरोफिल पचते, ना सेल्युलोज. (सेल्युलोज ही एक प्रकारची 'साखर' असते हे आपणास अथवते का?) या उलट उंदरातील बरेच काही पचते.
उगंच काहीतरी आथवले म्हनून काहीतरी टंकले असे करू नये, ही णम्र इणंटी.
ध चा मा करणारया एक आनंदीबाई रघुनाथराव होवून गेल्या. आता आणखी एक आनंदीबाई अवतरल्या आहेत असे वाटते. लेखनात सभ्यपणा वापरण्याची शिकवण या नवीन आनंदीबैना मिळालेली नाही असे दिसते. या बाबत गोपाळराव यांस विचारावयास हवे.
आपण सरपंचां कडे तक्रार केलीत, इतपत माझ्या प्रतिक्रीयेने दुखावलात, हेच जर मला उलट प्रश्न करून विचारले असतेत, तर समजवून सांगितले असते.
उत्क्रांतीच काय तर कोणत्याही जीवशास्त्रीय विषयांचा तुमचा अभ्यास शून्य आहे असे साडेतीन रुपयांची पैज लाऊन इथे सांगतो. (माझी ऐपत तितकी आहे. म्हणून तितकी पैज.)
आनंदी अन गोपाळ याचे स्पष्टीकरण जरा माझी स्वाक्षरी पहाल तर समजेलच.
प्राण्यांच्या उत्क्रांती प्रक्रियेचा वर वर अभ्यास केला तर असे लक्ष्यात येते कि प्रत्येक प्राणीमात्रात त्याच्या उदरभरणासाठी लागणारे अन्न मिळवण्यासाठी स्वयम्भूत साधने असतात.
उत्क्रांती प्रक्रिया ही स्वत:च ती साधने बनविते. ती 'असत' नाहीत.
मांसाहारी प्राण्यान्जवळ नखे, सुळे अशी शिकारीची साधने असतात. मनुष्यामध्ये अशी साधने नाहीत ह्यांचे कारण मानव हा शाकाहारी घडविला गेला आहे. त्याने नंतर बुद्धीचा वापर करून काठी, बाण,सापळा व इतर बाह्य साधनांचा वापर करून शिकार करावयास सुरुवात केली आणि ह्यामुळे तो मांसाहारी होऊ शकला, बाकी नैसर्गिक पणे तो शाकाहारीच घडला आहे.
बुद्धी नावाचे शस्त्र उत्क्रांतीतून मिळाल्यावर इतर सगळी शस्त्रे क्षुल्लक व कुचकामी ठरली, सबब त्यागली गेली. अक्कल वापरून अन्न मिळविणे जास्त सोपे होते. उगा धारदार सुळे अन बळकट बाहू कशाला हवेत? आम्ही प्राणी पाळू लागलो अन शेती करताना झाडेही पाळू लागलो.
उत्क्रांतीचा 'वरवर' नाही नुसता ८वी यत्तेइतका अभ्यास केला असतात, किंबहुना वर्गात शिक्षक बोलले ते थोडे जागेपणी ऐकले असतेत, तरी इतके समजले असते. उगा प्रतिसाद टंकताना 'अमुक शास्त्राचा 'वरवर' अभ्यास केला असता असे दिसून येते' स्टाईल वाक्ये टंकून स्वतःच्या अज्ञानाला वजन देण्याचा प्रयत्न केलात तर माझ्या सारखे लोक मी टंकले तसे खडूस प्रतिसाद लिहीणारच. ती मिपाची प्रकृती आहे.
या विषयावर मी लिहिले आहे त्याची आणि माझ्या ज्ञानाची टर न उडवता आपण मला अधिक माहिती द्यावयास सांगितले याबद्दल धन्यवाद. निरोगी चर्चा हि अशीच असावयास हवी असे माझे मत आहे.
मिपाच्या संपादक मंडळींचेही असेच मत आहे असे मी मानतो.
खाली दिलेल्या धाग्यावर मानवाची शरीर रचना आणि त्याची पचन प्रक्रिया हि शाकाहारी प्राण्यांसारखी आहे आणि मांसाहारी प्राण्यांच्या सारखी नाही हे पटवून दिले आहे.
http://www.stevepavlina.com/blog/2005/09/are-humans-carnivores-or-herbivores-2/
तुम्ही दिलेला दुवा तद्दन गल्लाभरू छाप आहे हे माहिती असूनदेखील तिकडे दुर्लक्ष करून "आशया"कडे जातो. तो जो "आशय" दिलेला आहे, त्याशी मानवजातीचा इतिहास सुसंगत नाही. शेतीचा शोध लागण्याआधी माणूस अगदी खुंदल खुंदल के शिकार करून खात होता. त्यावेळी बरा आला नाही त्याला कुठलाही प्रॉब्लेम? माणसाचे अतिशय जवळचे जेनेटिक बांधव चिंप्स देखील नॉनव्हेज खातात. इतकेच नव्हे तर वैदिक वाङ्मय, महाभारत, आयुर्वेद, इ. ठिकाणी देखील मांसाहाराचे वर्णन खूप ठिकाणी येते. त्याचा निषेध हा देखील खूप नंतरच्या काळातील आहे. भारतच का, उर्वरित जगातदेखील मांसाहार खूप जोरात केला जायचा आणि आत्तादेखील जातो.
हे सर्व आणि इतरही बरेच मुद्दे या चर्चेत ऑलरेडी बहुत वेळेस आलेले आहेत. ते थोडे तरी पहा, त्यातल्या विसंगती स्पष्ट करा आणि मग बोला. कुठल्याही बाजूने चिक्कार लिंका मीपण देऊ शकेन आत्ताच्या आत्ता. पण त्याला काही अर्थ नाही.
आपल्या मतांचा आदर आहेच. परंतु, कुठले, कोणाचे वैचारिक विश्लेषण वाचून आपले मत बनविण्यापेक्षा योग्य प्रमाणात मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार घेणार्या वेगवेगळ्या समुदायाचे अल्पायुष्य आणि दीर्घायुष्य ह्या मोजपट्टीवर मापन केले (तसा विदा उपलब्ध असेल तर) तर जे निष्कर्ष समोर येतील ते जास्त विश्वासार्ह म्हणावे लागतील.
योग्य प्रमाणात घेतलेला मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार कितपत आरोग्यदायी ठरतो ह्याचे काही सर्वमान्य पुरावे उपलब्ध असतील तर चर्चेला दिशा मिळेल. नाहीतर तिन्ही आहार पद्धतींचे समर्थन आणि खंडन करणारे अनेक जणं असतात त्यामुळे जगाच्या अंतापर्यंत ही चर्चा चालू शकेल.
योग्य प्रमाणात घेतलेला मांसाहार, शाकाहार आणि मिश्राहार कितपत आरोग्यदायी ठरतो ह्याचे काही सर्वमान्य पुरावे उपलब्ध असतील तर चर्चेला दिशा मिळेल. नाहीतर तिन्ही आहार पद्धतींचे समर्थन आणि खंडन करणारे अनेक जणं असतात त्यामुळे जगाच्या अंतापर्यंत ही चर्चा चालू शकेल.
एग्जॅक्टलि!!! थोडेसे गुगलून पाहिले असता एक पेपर सापडला. यात त्यांनी व्हेजवाले आणि हेल्थ कॉन्शस नोनव्हेजवाले यांची तुलना करून निष्कर्ष काढले ते त्यांच्याच शब्दांत देतो.
शीर्षकः Vegetarian diets, chronic diseases and longevity.
सारांशः प्युअर व्हेजवाल्यांच्या मते व्हेज खाण्यामुळे आयुर्मान वाढते, विविध रोगांची रिस्क कमी होते, इ.इ. पण युरोपमधील सर्वांत जास्त हेल्दी लोक उदा. स्कँडेनेव्हियन्स..ते तर लै मांस खातात. व्हेज खाण्यामुळे लट्ठपणा कमी होतो, तसेच हृदयरोगाची रिस्क कमी होते, पण विविध प्रकारच्या कॅन्सर बद्दलची रिस्क आजिबात कमी होत नाही. शिवाय नॉनव्हेज खाण्यामुळे हिंसक स्वभाव बनतो असे जे अडाणचोट विधान आहे त्याला दुजोरा देणारी कसलीही माहिती आजपर्यंत पुढे आलेली नाही. आणि अलीकडच्या खादाड समाजात व्हेज म्हणजे एक प्रकारचे आहारनियमनच असल्यामुळे त्याचा काही अंशी फायदा होतो. व्हेजमध्ये फळे वैग्रे खा ल्ल्यामुळे फायदा होतो, निव्वळ मांस न खाल्ल्यामुळे नाही. पान क्र. २ वर पहावे, आईसलँड मधील आहाराच्या सवयी खुंदल खुंदल के नॉनव्हेज वाल्या असूनदेखील त्यांचे आयुर्मान जास्त आहे. हेल्थ कॉन्शस नॉनव्हेजवाले आणि व्हेजवाले यांची तुलना केल्यास बर्याच प्रचलित समजुतींना तडा जाऊ शकतो हे या ४ पानी पेपरावरुनदेखील सिद्ध होते.
अनेक शाकाहारी पदार्थ आणि सगळे मांसाहारी पदार्थ प्रक्रिया केल्याशिवाय खाणे आजमितीस तरी अशक्य आहे. एकेकाळी माणूससुद्धा कच्चे मांस खात असेल पण उत्क्रांतीच्या प्रक्रियेत अन्न शिजवून खाण्याच्या सवयीमुळे कदाचित पचनशक्ती दुबळी होत गेली असावी असे वाटते.
शारिरिक दृष्ट्या मानवाला प्रामुख्याने शाकाहार हाच सुटेबल् ठरतो.
ज्यांना अधिक शारिरीक उर्जेची गरज असते असे लोक जसे - फुटबॉलर, अॅथलीट, बॉक्सर अशांचा मांसाहाराशिवाय निभाव लागणार नाही असे वाटते. अनेक दुबळ्या, अशक्त किंवा क्षयासारख्या आजारातून उठलेल्या माणसांना अंडी , चिकन सूप किंवा तत्सम आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. याउलट हार्ट पेशंट, अति लट्ट माणसे, कोलेस्टेरॉल जास्त असणारे लोक यांना सक्तीने शाकाहार घेण्याचा आणि मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. तेंव्हा मानवी शरीराला मांसाहार योग्य किंवा शाकाहार योग्य असा सरसकट इन्फरन्स कसा काढणार ?
फक्त मांसाहार सेवन करण्याची सक्ती केलीत, तर बघाल की त्याचे शरीर हे सहन करु शकत नाही.
प्रत्येकाच्या शरीराला कोणत्या अन्नाची सवय आहे यावर बरेच काही अवलंबून आहे. दररोज मांस खाणारा माझा एक किरिस्ताव मित्र मी पाहिलेला आहे. अनेक वंगबंधू, कोळी समाजाचे लोकं हे दररोज मांसाहार करतच असतात. माझ्या जुन्या ऑफिसातला एक मित्र त्याच्या डब्यामध्ये 'फॉर अ चेंज' व्हेज आणत असे. तेंव्हा माणसाचे शरीर कायम मांसाहार करु शकत नाही हेदेखील तितकेसे पटत नाही.
कलेच्या प्रांतात पारंपारिक (अर्थात पाश्चात्य पारंपारिक) वास्तववादी कलेचे समर्थक आणि आधुनिक कलेचे समर्थक एकमेकांना वाट चुकलेली कोकरे समजून आपल्या विचारसरणीचा बाप्तिस्मा देऊन आपल्या कळपात ओढू बघत असतात, तसेच शाका-मासा. चे होत असतेसे दिसते. :)
शाकाहारी आणि मांसाहारी
पारंपरिक कलासमर्थक आणि आधुनिक कलासमर्थक
मार्क्सवादी आणि हिंदुत्ववादी
अँटी-पुणे आणि पुण्याचे वकील
निवासी आणि अनिवासी
वेगवेगळ्या आब्राहमिक धर्मांचे अनुयायी
अशी ही थोडीशी मोठी लिस्ट आहे ;)
धाग्याचं शीर्षक वाचूनच त्यातले मुद्दे आणि आणि पुढचे प्रतिसाद काय येणार ह्याचा अंदाज आला होताच. आणि अगदी "जे जे वांछील तो ते खावो" हे कंक्लूजनसुद्धा कळलं होतं. पण जसे फिक्स केलेल्या मॅच मध्येदेखील काही एक्साइटिंग गोष्टी घडतातच - तसे, पेठकरकाकांचे प्रतिसाद, मनोबाचे मुद्दे, आयुर्वेदातले दाखले, अदिती वि. आनंदी गोपाळचं "बॅटल विदिन अ बॅटल"..... शेवट माहित असलेली सास-बहू सीरियल बघतोय असं वाटलं.
अर्थात ज्ञानात भर पडली - मतांत फरक (अर्थातच्) पडला नाही.
(आज रात्री मटण सूप पिण्याची इच्छा असलेला)
जे पी
गुडघेदुखी ही चाळीशीच्या पुढील स्त्रियांमधे विशेषतः भारतात फार आढळते. युरोपात अगदी म्हातार्या (गोर्या) स्त्रियासुद्धा अगदी टुणटुणीत, स्लिम असलेल्या दिसतात, तर तेथील अगदी तरूण हबशी स्त्रियासुद्धा भलत्याच लठ्ठ असतात, (असे माझे निरिक्षण आहे, चू.भू.द्या.घ्या.) या गोष्टीचा आहाराशी काय संबंध आहे, हे तज्ञांनी स्पष्ट करावे.
त्याचा आहाराशी फार काहि संबंध नाहि. काळ्या अफ्रिकन लोकांच्या जीन्स मधे चरबी साठवुन ठेवणारे हार्मोन्स नसतात. त्यामुळे चरबी कंट्रोल करणारे हार्मोन्स पण नसतात. जर एखादं हायब्रीड प्रॉडक्ट ( उदा. काळं + पांढरं )असेल आणि त्यात पांढर्याकडुन चरबी साठवणारे हार्मोन्स आले तर त्यांना अडवणारे एण्टी चरबी हार्मोन्स च्या अभावामुळे ते बेहिसाब लठ्ठ होतात.
ढिशक्लेमर :
१) हि सर्व ऐकिव माहिती आहे. संदर्भ देणे, ऑथेण्टीक माहितीचे दुवे लक्षात ठेवणे अश्या भानगडीत आम्हि पडत नाहि
२) जीन्स, हार्मोन्स वगैरे शब्द प्रतिसादाला केवळ भारदस्तपणा येण्यासाठी वापरले आहेत. "केमीकल लोचे" या एकाच पिशवीत हि मंडई निपटता येईल.
अर्धवटराव
"केमीकल लोचे" या एकाच पिशवीत हि मंडई निपटता येईल.
एखाद्या चित्रपटात, समुहनृत्यात नायिकेपेक्षा, समुहातली एकदम मागची, एखादी दुय्यम नर्तिका अतिशय गोड दिसत असावी आणि आपल्या नृत्य कौशल्याने नायिकेपेक्षा स्वतःकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असावी तसे हे, डिस्क्लेमरच्या अगदी शेवटच्या कोपर्यातलं, वाक्य फार आवडलं.
प्रतिक्रिया
मोठ्ठा गैरसमज हो
माणसाने शाकाहारी असावे की
नक्कीच चांगला...
मांसाहारी पदार्थात प्रथिने
डॉक्टरांचे मत.
मटण खाणाऱ्या व्यक्तींना
निरिक्षणे बाद
शिवाय
मनोबांचा धागा ग्रेट, आणी
मानव शाकाहारिच
रमेश!
गोपाळा,,,हसवुन हसवुन मारलस रे
आनंदीबाई
महोदय,
प्राण्यांच्या उत्क्रांती
आथवले साहेब
मानव शाकाहारीच
मानव फक्त शाकाहारीच नाहीच मुळी
प्रत्युत्तर
तुम्ही दिलेला दुवा तद्दन
सबब त्याची मते ग्राह्य मानता
समर्थन-खंडन....
योग्य प्रमाणात घेतलेला
अनेक शाकाहारी पदार्थ आणि सगळे
+१. हा तिसरा मुद्दा ढोंगी
http://www.veganathlete.com/v
कला आणि शाकाहार
@आपल्या विचारसरणीचा
शाकाहारी आणि
बॅटमॅनचा स्पायडरमॅन झाला
तुमच्या स्मायल्यांचा स्रोत
च्यायला ! तुम्ही आधी प्रतिसाद
आमच्या जवळा भाकर्या आणी
मॅच फिक्सिंग होतं ह्या धाग्यात !
नव्यानं
...
संपलं सगळं..!
जियो गवि.
+१
सरेआम भावना चाळवल्याबद्दल
गुडघेदुखी आणि आहार
केमीकल लोचे...
आवडलं.