" आज मराठी भाषा- दीन ! "
धरला मी अभिमान मनीं
"आज मराठीभाषा-दिन "
मी मराठी तू मराठी
बोलू सारे आज सुदिन !
सुरेख उत्तम वा वा छान
म्हणत वाहवा करू -
जमेल तेथे मायमराठी
आपण जवळ करू !
मराठी निवेदक वदला- हाऊ नाईस !
मराठी अभिनेता कण्हला- गुड आयडिया !
मराठी नटी किंचाळली- वॉव फॅंटॅस्टिक !
मराठी परीक्षक ओरडला- ब्राव्हो सुपर्ब !
मराठी नेता गरजला- व्हेरी गुड !
मराठी जनता म्हणाली- गुड, छान !
भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी
जगास मराठी शिकवीन -
मजला पुरते कळून चुकले,
" आज मराठीभाषा- दीन ! "
वाचने
3259
वाचनखूण
प्रतिक्रिया
8
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना
मार्मिक
मराठी भाषा दिनाच्या सर्वांना
In reply to मराठी भाषा दिनाच्या सर्वांना by पक्या
अहो त्यांना दीन च अपेक्षित
In reply to मराठी भाषा दिनाच्या सर्वांना by पक्या
वॉव
In reply to वॉव by अन्या दातार
हाहा.. पक्या'जी आणि
मराठीची कौतुके..
खरंय देवा!