Skip to main content

" आज मराठी भाषा- दीन ! "

लेखक विदेश यांनी सोमवार, 27/02/2012 08:30 या दिवशी प्रकाशित केले.
धरला मी अभिमान मनीं "आज मराठीभाषा-दिन " मी मराठी तू मराठी बोलू सारे आज सुदिन ! सुरेख उत्तम वा वा छान म्हणत वाहवा करू - जमेल तेथे मायमराठी आपण जवळ करू ! मराठी निवेदक वदला- हाऊ नाईस ! मराठी अभिनेता कण्हला- गुड आयडिया ! मराठी नटी किंचाळली- वॉव फॅंटॅस्टिक ! मराठी परीक्षक ओरडला- ब्राव्हो सुपर्ब ! मराठी नेता गरजला- व्हेरी गुड ! मराठी जनता म्हणाली- गुड, छान ! भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी जगास मराठी शिकवीन - मजला पुरते कळून चुकले, " आज मराठीभाषा- दीन ! "
काव्यरस

वाचने 3270
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा शक्य असेल तिथे आपण मराठीत लिहू , मराठीत बोलू अमोल केळकर

माझ्या मराठी ची काय बोलू कवतीके परी अमृता ते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवीन - संत ज्ञानेश्वर माऊली अमृत

मराठी भाषा दिनाच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा @विदेश - दिन - दिवस ह्या अर्थी असेल तर पहिली वेलांटी द्यावी. दुसरी वेलांटी (दीन) दिली तर दीन दुबळा , गरीब बिचारा असा अर्थ होतो.

In reply to by पक्या

अहो त्यांना दीन च अपेक्षित आहे. कविता परत एकदा वाचा राव नीट.

In reply to by पक्या

सो यु नो व्हॉट्स द डिफरन्स बीटवीन दिन अँड दीन! दॅट्स ग्रेट. कीप इट अप ड्यूड ;)

In reply to by अन्या दातार

हाहा.. पक्या'जी आणि अन्या.दा.जी... दीन आणि दिन यातील फरक 'विदेश' यांना माहित असल्यामुळेच मराठीची सध्याची दीनवाणी स्थिती दर्शवण्यासाठीच मुदामहून मराठी 'दिन' ऐवजी "दीन" असे सम्बोधून उपहासात्मक अलन्कार केला आहे... असे वाटते. ...बाकी मराठी दिनाच्या शुभेच्छा!!. . मी मराठी.. झी मराठी.. ई मराठी.... सह्याद्री.... :)

काही अभिव्यक्ती इ॑ग्रजीतच परिणाम कारक वाटतात असे वाटते. गुड आयडिया, वॉव फॅंटॅस्टिक वगैरे. पण अशा मराठीतही आहेतच की ज्या॑चे इ॑ग्रजी रुपा॑तर होऊच शकत नाही. यावर एक नवीन धागा बनावावासा वाटतोय...

आज मराठीभदीन''दीन'च म्हणायला हवं. एखाद्या कार्याच्या जेवणावळीकडे पहात दाराशी उभ्या असलेल्या भिकारणीसारखी मंत्रालयाच्या दारात बापुडवाणी मराठी सरकारी उपकाराच्या चार दमड्या पदरी पडाव्या म्हणून उभी असताना तिला श्रीमंत म्हणायला कसं धाजावू? "ए सॉरी हं तुम्हाला, लेटच झाला मला", "मी संडेला तुझ्याकडे येताना ग्रीन कलरचा ड्रेस घेऊन येईन, मग आपण पार्कमध्ये जाऊ" वगैरे अस्स्खलीत मराठी बोलणारी प्रगल्भ पिढी लाभलेल्या आजच्या मराठीला संपन्न कसं म्हणू? वर कवितेत उल्लेखलेल्या निवेदक्/अभिनेते वगैरेंच्या उकिरडा झालेल्या मातृभाषेची गत काय वर्णावी?
भ्रमिष्ट ठरलो मी अभिमानी जगास मराठी शिकवीन - मजला पुरते कळून चुकले, " आज मराठीभाषा- दीन ! "
हेच खरं!