✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

सुचना + चर्चा = आमंत्रण कट्ट्याचं

५
५० फक्त यांनी
Wed, 01/04/2012 - 08:23  ·  लेख
लेख
नमस्कार, मागच्या कट्ट्याच्या रिपोर्टात लिहिल्याप्रमाणे इथं एक जाहीर धागा काढत आहे, ब-याच वेळेस काही जणांना कळवता येतनाही किंवा उशीरा कळवलं जातं, नंतर ऐकुन घ्यावं लागतं, त्यासाठी हा खटाटोप. येत्या रविवारी ८ तारखेला पुण्यात कट्टा करायचे ठरत आहे, त्या बद्दल हॉटेल आणि वेळ याबद्दल आपल्या सुचना मिळाव्यात आणि चर्चा होउन सात तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व फायनल करावे असे ठरले आहे. सध्या विचार करत असलेली हॉटेल शिवाजीनगरच्या आसपासची आहेत, म्हणजे हॉटेल सापडणं अन येणं जाणं सग़ळंच सोपं होईल सगळ्यांना, अर्थात इतर ठिकाणं सुद्धा चालतील, प्रत्येक ठिकाणी कुणाची तरी गैरसोय होणार आहे, तरी कमीत कमी लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी असा विचार आहे. ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ दिनांक ८/१/१२ रविवार च्या कट्यात सहभागी होणार्‍या सर्व मि.पा.करांना कळविण्यात येते की,बनियन ट्री हॉटेल ही जागा कट्यासाठी नक्की करण्यात आलेली आहे...इथे सर्व कट्टेकर्‍यांनी संध्याकाळी ६;३० पर्यंत जमायचे आहे...पुण्याच्या कोणत्याही भागातून येथे कसे पोहोचावे यासाठी खाली दिलेल्या पत्याप्रमाणे यावे...अथवा ५०फक्त यांच्या मो.नं.वर येणार्‍यांनी संपर्क साधावा... सदर कट्टा व्हेज-नॉन व्हेज असून 'कोरडा'च असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. ठिकाण-बनियन ट्री हॉटेल...कट्याची वेळ-सायंकाळी ६:३० वाजता कर्वे नगर,नदी रस्त्यावर... डेक्कन.नळ स्टॉप कडुन येणार्‍यांसाठी-कर्वे नगर-ताथवडे उद्यानापर्यंत पोहोचावे-तिथुन ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे... स्वारगेट-सिंहगडरोड वरुन येणार्‍यांसाठी-राजाराम पुलापर्यंत पोहोचावे- तिथुनही ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे... मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी ५० फक्त आणि अत्रुप्त आत्मा किंवा वल्ली यांना व्यनि करावा. .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
25336 वाचन

💬 प्रतिसाद (137)

प्रतिक्रिया

पुण्यात कुठेही ठरवा, आम्ही

प्रचेतस
Wed, 01/04/2012 - 08:42 नवीन
पुण्यात कुठेही ठरवा, आम्ही असूच.
  • Log in or register to post comments

असाच म्हनतो सायबा ! -मालोजी

मालोजीराव
Wed, 01/04/2012 - 15:50 नवीन
असाच म्हनतो सायबा ! -मालोजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सुचना _ चचच

प्रसन्न शौचे
गुरुवार, 01/05/2012 - 06:47 नवीन
रिकामटेकड्या मिपकराना गप्पाचा भारी शोक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शोक नाही हो, शौक म्हणा. बादवे

प्रचेतस
गुरुवार, 01/05/2012 - 09:06 नवीन
शोक नाही हो, शौक म्हणा. बादवे तुम्ही शौकीन दिसत नाही हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न शौचे

@-रिकामटेकड्या मिपकराना

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2012 - 09:28 नवीन
@-रिकामटेकड्या मिपकराना गप्पाचा भारी शोक>>>गप्पा रिकाम्या टेकड्यांवरच होतात ;-) , नुसत्याच भरलेल्या टेकड्यांवर होतात ती-प्रेमप्रकंरंणं :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न शौचे

गुरुजी

मी-सौरभ
गुरुवार, 01/05/2012 - 10:21 नवीन
गप्पांमधे टेकड्यांबद्दल पण चर्चा होत असतेच :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

तुमचे नाव प्रसन्न की

विश्वनाथ मेहेंदळे
गुरुवार, 01/05/2012 - 10:51 नवीन
तुमचे नाव प्रसन्न की प्राजक्ता ???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसन्न शौचे

नाव प्राजक्ताच असावे. शौचाला

मृत्युन्जय
गुरुवार, 01/05/2012 - 11:39 नवीन
नाव प्राजक्ताच असावे. शौचाला जाउन आल्यवर प्रसन्न वाटते म्हणुन त्यांनी प्रसन्न शौचे असा आयडी घेतला असावा. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

ठ्यॅ ......

सोत्रि
गुरुवार, 01/05/2012 - 12:00 नवीन
मृत्युन्जय, मेल्या, सांडलो ना खुर्चीतून... Image removed.Image removed.Image removed. - (स्मायलीप्रमाणेच लोळणारा) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

नाव प्राजक्ताच असावे. शौचाला

स्पा
गुरुवार, 01/05/2012 - 12:34 नवीन
नाव प्राजक्ताच असावे. शौचाला जाउन आल्यवर प्रसन्न वाटते म्हणुन त्यांनी प्रसन्न शौचे असा आयडी घेतला असावा आईचा भेंडी.... मेलो ... आवरा रे मृतून्जय साहेबांना कोणीतरी =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ठ्ठो..!!!!!!

मोदक
गुरुवार, 01/05/2012 - 13:27 नवीन
ठ्ठो..!!!!!! खपल्या गेलो आहे.. मोदक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

हो

अनुराग
गुरुवार, 01/05/2012 - 17:19 नवीन
मजाच आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अहो विमें,

प्रास
गुरुवार, 01/05/2012 - 11:41 नवीन
असं काय करताय? त्यांचं नाव प्राजक्ता शौचे आणि त्या नेहमी प्रसन्न असतात ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

@-त्यांचं नाव प्राजक्ता शौचे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 01/05/2012 - 12:02 नवीन
@-त्यांचं नाव प्राजक्ता शौचे आणि त्या नेहमी प्रसन्न असतात ;-) >>> राम राम राम राम बाजार उठला कि हो शौच्यांचा..! अक्षरशः चौघात मिळून खांदा दिल्यागत वाट्टय... ;-) फक्त त्याचं अशौचं*** आंम्हाला नाई पाळायला लागलं मंजे झालं ;-) अशौचं---सुतक :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

मुद्दाम

५० फक्त
Sat, 01/07/2012 - 08:06 नवीन
नविन प्रतिसाद हुडकावा लागु नये म्हणुन इथं देत आहे... घागा संपादित केल्याबद्दल मा. संपादकांचे अतिशय आभार आत्तापर्यंत येतो आहोत, असं कळवलेल्या सदस्यांची नावं इथं देत आहे, अजुन सुद्धा येणा-यांचं स्वागतच आहे, ही यादी म्हणजे 'आता बास' यासाठी नसुन,' एवढे आहेत मग तुम्ही का मागे या की तुम्ही पण ' या साठी आहे. जमल्यास / अ‍ॅडजेस्ट करुन येणा-यांची यादी केलेली नाही. (आचारसंहिता लागु झालेली असल्यानं, खालील सर्व नावांपुढे श्री. मा. लिहिलेले आहे असे समजावे अन वाचावे ही विनंती) वल्ली, मालोजीराव, मन१, वपाडाव, अतृप्त आत्मा, सौरभ्, अनुराग, सोत्रि, अविनाश कुलकर्णी, विवेक मोडक, आगाउ कार्टा, मोदक, अधाशी उदय, नावात काय आहे, चिमी, पक पक पक, बिपिन कार्यकर्ते, धमाल मुलगा, श्रीरंग, प्यारे१, टिवटिव, शशिकांत ओक, किसन शिंदे, धनाजीराव, मी. या सर्वांना तसेच जमल्यास क्लास मधले अजुन काही अशा सर्व सदस्यांना एसेमेस करेनच, पण तरीही श्री. अविनाश कुलकर्णी व श्री. बिपिन कार्यकर्ते यांचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही, त्यांना एसेमेस मिळण्याची पर्यायी व्यवस्था करत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे वा. बरीच मंडळी जमली आहेत

प्रचेतस
Sat, 01/07/2012 - 09:54 नवीन
अरे वा. बरीच मंडळी जमली आहेत आता. कट्टा जोरदार होणार तर. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

म्याप

विवेक मोडक
Sat, 01/07/2012 - 10:41 नवीन
त्या बनियन ट्रि चा एक नकाशा टाकला तर बरं होइल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हा गूगल म्याप घ्या. म्हात्रे

मृत्युन्जय
Sat, 01/07/2012 - 11:25 नवीन
हा गूगल म्याप घ्या. म्हात्रे पूलावरुन राजाराम पूलावर जाणार्‍या रस्त्यावर सुर्यनंदा लॉन्स च्या अलीकडे डाव्या बाजूला बनियान ट्री आहे. गूगल मॅप वर ते मार्क केलेले नाही. पण ते म्हात्रे पूलापेक्षा राजाराम पूलापासुन जवळ आहे. क्रमाने ही हॉटेल्स लागतील (म्हात्रे पूलावरुन आल्यास): १. हार्वेस्ट क्लब - डावीकडे २. त्याच्या समोरच मल्टी स्पाईस (उजवीकडे) ३. घरकुल लॉन्स (याचे हॉटेल पण आहे. नाव विसरलो. बहुधा रॉयल गार्डन का तत्सम काहितरी असावे) (डावीकडे) ४. हॉटेल आमची. (उजवीकडे) ५. बनियान ट्री (डावीकडे) बादवे बनियान ट्री फायनल हाय काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेक मोडक

बादवे बनियान ट्री फायनल हाय

प्रचेतस
Sat, 01/07/2012 - 11:46 नवीन
बादवे बनियान ट्री फायनल हाय काय?
व्हय व्हय. बनियान ट्रीच फैनल हाय. (ड्रेस कोड बनियान आणि चट्ट्यापट्ट्याचा लेंगा असा ठेवावा काय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

ड्रेस कोड बनियान आणि

स्पा
Sat, 01/07/2012 - 11:52 नवीन
ड्रेस कोड बनियान आणि चट्ट्यापट्ट्याचा लेंगा असा ठेवावा काय? सर्व माननीय सदस्यांना या अवतारात असल्याची कल्पना केली आणि अमळ मौज वाटली :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ड्रेस कोड बनियान आणि

मृत्युन्जय
Sat, 01/07/2012 - 12:12 नवीन
ड्रेस कोड बनियान आणि चट्ट्यापट्ट्याचा लेंगा असा ठेवावा काय भोकं असणे अपेक्षित आहे काय? असेल तर किती आणि कुठे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

किती भोके असावीत यासाठी 'द

प्रचेतस
Sat, 01/07/2012 - 13:33 नवीन
किती भोके असावीत यासाठी 'द अंग्रेज' मधील इस्माईल भाईचा बनियन पहावा. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

आणि लेंग्याला ???

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 01/07/2012 - 19:53 नवीन
आणि लेंग्याला ??? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भोकं असणे अपेक्षित आहे काय?

अत्रुप्त आत्मा
Sat, 01/07/2012 - 14:21 नवीन
भोकं असणे अपेक्षित आहे काय? असेल तर किती आणि कुठे ? :-D ह्हा ह्हा ह्हा ह्हा जाळीचा बनियन घालुन आलं तरी चालेल.... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

मृत्युन्जय

चिंतामणी
Sat, 01/07/2012 - 20:04 नवीन
ठ्ठो. =)) (खूर्चीतुन खाली पडलेला) चिंतामणी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

(ड्रेस कोड बनियान आणि

गणपा
Sat, 01/07/2012 - 14:28 नवीन
(ड्रेस कोड बनियान आणि चट्ट्यापट्ट्याचा लेंगा असा ठेवावा काय?)
नशिब इथवरच थांबलात. वडा/पिंपळाची पानं नेसुन यावं का ? असं नाही विचारलत. ;) आवांतर : कट्ट्याला शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

भारतीय संस्कृतीतल्या

प्रचेतस
Sat, 01/07/2012 - 17:08 नवीन
भारतीय संस्कृतीतल्या सभ्यशुचितेच्या संकल्पनांचा पगडा अजूनही असल्यामुळे इथवरच थांबावे म्हटले. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

कट्ट्याला शुभेच्छा!

पैसा
Sat, 01/07/2012 - 17:27 नवीन
तुमच्या ड्रेसकोडमुळे बहुधा पुण्यातल्या मिपा महिला आघाडीच्यी कार्यकर्त्या दिसत नाहीयेत, (एक चिंगी सोडून).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ड्रेसकोड जाहिर करण्याआधी तरी

सूड
Sat, 01/07/2012 - 17:48 नवीन
ड्रेसकोड जाहिर करण्याआधी तरी कुठे कोण होत्या म्हैला आघाडीवाल्या ? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

त्याच्या कारणांपैकी एक इथे

विश्वनाथ मेहेंदळे
Sat, 01/07/2012 - 19:52 नवीन
त्याच्या कारणांपैकी एक इथे लिहिले असते. पण नको, काही संवेदनशील लोकांवर मनाच्या परिणाम होईल. मग ते धावत धावत जाऊन तक्रार करतील, मग आम्हाला लाल रंगातले प्रेमपत्र येईल (काय दिवस आलेत. एकेकाळी प्रेमापत्राचा रंग गुलाबी होता) त्यामुळे सध्या गप्प बसायचे ठरवले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लिखांणातली संवेदनशीलता हळूहळु

सूड
Sat, 01/07/2012 - 20:34 नवीन
लिखांणातली संवेदनशीलता हळूहळु मनापर्यंत पोचतेच म्हणा, असो बहुत काय बोलणे. सुज्ञांसि सांगणे न लगे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

पैसा- चुकीचे अनुमान काढले आहे.

चिंतामणी
Sat, 01/07/2012 - 20:01 नवीन
>>>सदर कट्टा व्हेज-नॉन व्हेज असून 'कोरडा'च असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. या वाक्यामुळे पाठ फिरवीली असे माझे मत आहे. :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

=))

पैसा
Sat, 01/07/2012 - 20:39 नवीन
भारीच ब्वॉ तुम्ही मनकवडे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

वड पिंपळाची पाने...

मन१
Sun, 01/08/2012 - 11:53 नवीन
नुसतीच वड पिंपळाची पाने नेसून यावयास हरकत नसावी. पण रस्त्यात उगीच एखदे भुकेले अस्सल " शाकाहारी" बोकड/बकरी/गाय्-बैल/मैस-रेडा/घोडा ह्यापैकी चतुष्पाद भेटले तर अनावस्था प्रसंग येउ शकेल त्याचे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणपा

हात वर..! हजर सर..

अत्रुप्त आत्मा
Wed, 01/04/2012 - 08:49 नवीन
हात वर..! हजर सर.. :-)
  • Log in or register to post comments

गुरूजी प्रॉक्सी

लीलाधर
Wed, 01/04/2012 - 09:12 नवीन
गुरूजी प्रॉक्झी अटेंडन्स लावाल लावाल काय त्याचं काय आहे ना नेमकी माझी ऑफीसची ट्रीप आहे हो ७ आणि ८ ला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

येतोय....

मन१
Wed, 01/04/2012 - 10:30 नवीन
मी येतोय.... मला वाडेश्वर(FC road, गुडलक कॅफेजवळ) चैतन्य पराठा (fc road, ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळ) समुद्र (नळ स्टॉप, पंजाबी स्टाइल) स्वामी(उत्तम व्यवस्था, पंजाबी स्टाइल) मथुरा ( j m road) बालगंधर्व शेजारचे उद्यान ही सगळी ठिकाणं आवडतील. मस्त भेटून गप्पा मारत बसण्यासारख्या जागा आहेत.
  • Log in or register to post comments

मला वाडेश्वर(FC road, गुडलक

विजुभाऊ
Wed, 01/04/2012 - 18:23 नवीन
मला वाडेश्वर(FC road, गुडलक कॅफेजवळ) चैतन्य पराठा (fc road, ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळ) समुद्र (नळ स्टॉप, पंजाबी स्टाइल) स्वामी(उत्तम व्यवस्था, पंजाबी स्टाइल) मथुरा ( j m road) या सर्व जागा कुपेयपानास वर्जीत आहेत. अतीअवांतर : टिळक रोडवरचे बादशाही कसे वाटतेय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

बादशाही??

मी-सौरभ
Wed, 01/04/2012 - 19:09 नवीन
पाट्या वाचण्यात एक तास गेला बाइ! मी नाइ कट्टा केला! असं गाण म्हणत बाहेर याव लागेल....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

बादशाही? सुंदर पण........

मन१
Wed, 01/04/2012 - 20:05 नवीन
बादशाही सुंदरच आहे. पण त्याचे रूप पडले एक तुफ्फान चालणार्‍या खानावळीसारखे. लगोलग एकास खेटून एक असे बसणे, भराभर वाढले जाणे, आणि पान संपल्यावर फार वेळ थांबता न येणे हे एरव्ही शिस्त म्हणून ठिक असले तरी सदस्य संख्या अधिक असताना तिथे जाणे सोयीचे होणे नाही. मी स्वतः तिथे सतत मागचे वर्षभर तरी जातोय, मला ते प्रचंड आवडतेही; पण ८-१० तिथे बसून गप्पा मारणे शक्य नाही. त्या तुलनेत वरची ठिकाणे उचित वाटतात. किम्वा पब्लिक म्हटली तसं ओला कट्टा केल्यास जागचे उठायची घाई कुणीच करणार नाही. मोठ्या संख्येचा कोरडा कट्टा आयोजित करायचा झाल्यास चोखीदाणी* हे ही ठिकाण उत्तम ठरावे, पण भांबुर्डा अन् F C पासून दूर पडते, म्हणून त्याचे नाव घेतले नाही. ओला कट्टा करायचा झाल्यास ऐन जंगली महाराज मंदिराच्या समोरच्या गल्लित आतल्या बाजूला असणारे bamboo house हे गार्डन रेस्टॉरंट हा एक चांगला पर्याय वाटू लागला आहे. पिणारे बर्‍याचदा F C रोड वरील apache चेही नाव घेतात, मात्र ते कधीही पाहिले नसल्याने सुचवले नाही. * फार पूर्वी अभिरूची ला झालेला सात्विक कट्टा अगदि हिट्ट झाला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

पूनम

सोत्रि
Wed, 01/04/2012 - 20:38 नवीन
ओला कट्टा करायचा झाल्यास
असे असल्यास पूनम (डेक्कन बस डेपोजवळ ) एकदम उत्तम ठिकाण होऊ शकेल. बांबू हाऊस भलतेच महागडे आहे आणि कॉकटेल्स एकदम हुकलेली बनवतात :( - (कट्टेकरी) सोकाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

क्षमस्व....

मन१
Wed, 01/04/2012 - 20:56 नवीन
गुरुवर्य, साक्षात आपण मिपासोमरसबृहस्पती, ओलशिक्षक उपलब्ध आहात हे क्षणभर विसरून आम्ही थेट आमच्या ऐकण्यातले नाव टंकले. पिणे पाजणे ह्यातील आमचा अनुभव हा शून्य असल्याने ऐकीव माहिती टंकली व आपल्या स्पेशालिटित नाक खुपसण्याचा उद्योग केला. कोरडा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

बांबू हाऊस:कॉकटेल्स एकदम

गवि
गुरुवार, 01/05/2012 - 12:06 नवीन
बांबू हाऊस:कॉकटेल्स एकदम हुकलेली बनवतात
+१०० लाँग आयलंड आईस्ड टी ऐवजी कोकाकोला तोही गोल बुडाच्या चषकात घालून दिला. पण बाकी सुरमई /पापलेट तुकडे वगैरे चांगले घसघशीत आणि चविष्ट होते..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सोत्रि

म्हात्रे पुला जवळ..मल्टी

अविनाशकुलकर्णी
Wed, 01/04/2012 - 10:07 नवीन
म्हात्रे पुला जवळ..मल्टी स्पाईस हॉटेल छान आहे.. जागा भरपुर..पदार्थ ठिक..कितिहि वेळ बसा.. हर्वेस्ट क्ल्ब च्या समोर.. दिनानाथ ची मागची बाजु..
  • Log in or register to post comments

मी पण

मी-सौरभ
Wed, 01/04/2012 - 10:48 नवीन
हात वर केला आहे!! फायनल ठिकाण शुक्रवार संध्याकाळ पर्यंत ठरवून टाकुया...
  • Log in or register to post comments

शिवाजीनगरसाठी +१

सोत्रि
Wed, 01/04/2012 - 10:56 नवीन
आम्ही आहोतच! - (कट्टेकरी) सोकाजी
  • Log in or register to post comments

हात वर केला आहे!!

अनुराग
Wed, 01/04/2012 - 11:17 नवीन
हात वर केला आहे!!
  • Log in or register to post comments

जागा आणि वेळ नक्कि करा. मी

विवेक मोडक
Wed, 01/04/2012 - 11:28 नवीन
जागा आणि वेळ नक्कि करा. मी आहेच
  • Log in or register to post comments

जागा आणि वेळ नक्कि करा. मी

सुहास..
Wed, 01/04/2012 - 11:32 नवीन
जागा आणि वेळ नक्कि करा. मी आहेच >>>> वयोवृध्द, जेष्ठ नागरिकांनी , थंडी-गारठ्याच घरातच बसावे हा फुकटचा सल्ला ;)
  • Log in or register to post comments

तुमच्यासाठी ही एक फुकटचा

मराठी_माणूस
Wed, 01/04/2012 - 11:48 नवीन
तुमच्यासाठी ही एक फुकटचा सल्ला , आयडी "चिरंजीव" करुन घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा