Skip to main content

सुचना + चर्चा = आमंत्रण कट्ट्याचं

लेखक ५० फक्त यांनी बुधवार, 04/01/2012 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मागच्या कट्ट्याच्या रिपोर्टात लिहिल्याप्रमाणे इथं एक जाहीर धागा काढत आहे, ब-याच वेळेस काही जणांना कळवता येतनाही किंवा उशीरा कळवलं जातं, नंतर ऐकुन घ्यावं लागतं, त्यासाठी हा खटाटोप. येत्या रविवारी ८ तारखेला पुण्यात कट्टा करायचे ठरत आहे, त्या बद्दल हॉटेल आणि वेळ याबद्दल आपल्या सुचना मिळाव्यात आणि चर्चा होउन सात तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व फायनल करावे असे ठरले आहे. सध्या विचार करत असलेली हॉटेल शिवाजीनगरच्या आसपासची आहेत, म्हणजे हॉटेल सापडणं अन येणं जाणं सग़ळंच सोपं होईल सगळ्यांना, अर्थात इतर ठिकाणं सुद्धा चालतील, प्रत्येक ठिकाणी कुणाची तरी गैरसोय होणार आहे, तरी कमीत कमी लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी असा विचार आहे. ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ दिनांक ८/१/१२ रविवार च्या कट्यात सहभागी होणार्‍या सर्व मि.पा.करांना कळविण्यात येते की,बनियन ट्री हॉटेल ही जागा कट्यासाठी नक्की करण्यात आलेली आहे...इथे सर्व कट्टेकर्‍यांनी संध्याकाळी ६;३० पर्यंत जमायचे आहे...पुण्याच्या कोणत्याही भागातून येथे कसे पोहोचावे यासाठी खाली दिलेल्या पत्याप्रमाणे यावे...अथवा ५०फक्त यांच्या मो.नं.वर येणार्‍यांनी संपर्क साधावा... सदर कट्टा व्हेज-नॉन व्हेज असून 'कोरडा'च असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. ठिकाण-बनियन ट्री हॉटेल...कट्याची वेळ-सायंकाळी ६:३० वाजता कर्वे नगर,नदी रस्त्यावर... डेक्कन.नळ स्टॉप कडुन येणार्‍यांसाठी-कर्वे नगर-ताथवडे उद्यानापर्यंत पोहोचावे-तिथुन ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे... स्वारगेट-सिंहगडरोड वरुन येणार्‍यांसाठी-राजाराम पुलापर्यंत पोहोचावे- तिथुनही ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे... मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी ५० फक्त आणि अत्रुप्त आत्मा किंवा वल्ली यांना व्यनि करावा. .

वाचने 25413
प्रतिक्रिया 137

प्रतिक्रिया

In reply to by प्रसन्न शौचे

@-रिकामटेकड्या मिपकराना गप्पाचा भारी शोक>>>गप्पा रिकाम्या टेकड्यांवरच होतात ;-) , नुसत्याच भरलेल्या टेकड्यांवर होतात ती-प्रेमप्रकंरंणं :-p

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

नाव प्राजक्ताच असावे. शौचाला जाउन आल्यवर प्रसन्न वाटते म्हणुन त्यांनी प्रसन्न शौचे असा आयडी घेतला असावा. :)

In reply to by मृत्युन्जय

नाव प्राजक्ताच असावे. शौचाला जाउन आल्यवर प्रसन्न वाटते म्हणुन त्यांनी प्रसन्न शौचे असा आयडी घेतला असावा आईचा भेंडी.... मेलो ... आवरा रे मृतून्जय साहेबांना कोणीतरी =))

In reply to by प्रास

@-त्यांचं नाव प्राजक्ता शौचे आणि त्या नेहमी प्रसन्न असतात ;-) >>> राम राम राम राम बाजार उठला कि हो शौच्यांचा..! अक्षरशः चौघात मिळून खांदा दिल्यागत वाट्टय... ;-) फक्त त्याचं अशौचं*** आंम्हाला नाई पाळायला लागलं मंजे झालं ;-) अशौचं---सुतक :-D

In reply to by प्रचेतस

नविन प्रतिसाद हुडकावा लागु नये म्हणुन इथं देत आहे... घागा संपादित केल्याबद्दल मा. संपादकांचे अतिशय आभार आत्तापर्यंत येतो आहोत, असं कळवलेल्या सदस्यांची नावं इथं देत आहे, अजुन सुद्धा येणा-यांचं स्वागतच आहे, ही यादी म्हणजे 'आता बास' यासाठी नसुन,' एवढे आहेत मग तुम्ही का मागे या की तुम्ही पण ' या साठी आहे. जमल्यास / अ‍ॅडजेस्ट करुन येणा-यांची यादी केलेली नाही. (आचारसंहिता लागु झालेली असल्यानं, खालील सर्व नावांपुढे श्री. मा. लिहिलेले आहे असे समजावे अन वाचावे ही विनंती) वल्ली, मालोजीराव, मन१, वपाडाव, अतृप्त आत्मा, सौरभ्, अनुराग, सोत्रि, अविनाश कुलकर्णी, विवेक मोडक, आगाउ कार्टा, मोदक, अधाशी उदय, नावात काय आहे, चिमी, पक पक पक, बिपिन कार्यकर्ते, धमाल मुलगा, श्रीरंग, प्यारे१, टिवटिव, शशिकांत ओक, किसन शिंदे, धनाजीराव, मी. या सर्वांना तसेच जमल्यास क्लास मधले अजुन काही अशा सर्व सदस्यांना एसेमेस करेनच, पण तरीही श्री. अविनाश कुलकर्णी व श्री. बिपिन कार्यकर्ते यांचा मोबाईल नंबर माझ्याकडे नाही, त्यांना एसेमेस मिळण्याची पर्यायी व्यवस्था करत आहे.

In reply to by ५० फक्त

त्या बनियन ट्रि चा एक नकाशा टाकला तर बरं होइल

In reply to by विवेक मोडक

हा गूगल म्याप घ्या. म्हात्रे पूलावरुन राजाराम पूलावर जाणार्‍या रस्त्यावर सुर्यनंदा लॉन्स च्या अलीकडे डाव्या बाजूला बनियान ट्री आहे. गूगल मॅप वर ते मार्क केलेले नाही. पण ते म्हात्रे पूलापेक्षा राजाराम पूलापासुन जवळ आहे. क्रमाने ही हॉटेल्स लागतील (म्हात्रे पूलावरुन आल्यास): १. हार्वेस्ट क्लब - डावीकडे २. त्याच्या समोरच मल्टी स्पाईस (उजवीकडे) ३. घरकुल लॉन्स (याचे हॉटेल पण आहे. नाव विसरलो. बहुधा रॉयल गार्डन का तत्सम काहितरी असावे) (डावीकडे) ४. हॉटेल आमची. (उजवीकडे) ५. बनियान ट्री (डावीकडे) बादवे बनियान ट्री फायनल हाय काय?

In reply to by मृत्युन्जय

बादवे बनियान ट्री फायनल हाय काय?
व्हय व्हय. बनियान ट्रीच फैनल हाय. (ड्रेस कोड बनियान आणि चट्ट्यापट्ट्याचा लेंगा असा ठेवावा काय?)

In reply to by प्रचेतस

ड्रेस कोड बनियान आणि चट्ट्यापट्ट्याचा लेंगा असा ठेवावा काय? सर्व माननीय सदस्यांना या अवतारात असल्याची कल्पना केली आणि अमळ मौज वाटली :)

In reply to by प्रचेतस

ड्रेस कोड बनियान आणि चट्ट्यापट्ट्याचा लेंगा असा ठेवावा काय भोकं असणे अपेक्षित आहे काय? असेल तर किती आणि कुठे ?

In reply to by मृत्युन्जय

भोकं असणे अपेक्षित आहे काय? असेल तर किती आणि कुठे ? :-D ह्हा ह्हा ह्हा ह्हा जाळीचा बनियन घालुन आलं तरी चालेल.... ;-)

In reply to by प्रचेतस

(ड्रेस कोड बनियान आणि चट्ट्यापट्ट्याचा लेंगा असा ठेवावा काय?)
नशिब इथवरच थांबलात. वडा/पिंपळाची पानं नेसुन यावं का ? असं नाही विचारलत. ;) आवांतर : कट्ट्याला शुभेच्छा :)

In reply to by प्रचेतस

तुमच्या ड्रेसकोडमुळे बहुधा पुण्यातल्या मिपा महिला आघाडीच्यी कार्यकर्त्या दिसत नाहीयेत, (एक चिंगी सोडून).

In reply to by सूड

त्याच्या कारणांपैकी एक इथे लिहिले असते. पण नको, काही संवेदनशील लोकांवर मनाच्या परिणाम होईल. मग ते धावत धावत जाऊन तक्रार करतील, मग आम्हाला लाल रंगातले प्रेमपत्र येईल (काय दिवस आलेत. एकेकाळी प्रेमापत्राचा रंग गुलाबी होता) त्यामुळे सध्या गप्प बसायचे ठरवले आहे.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

लिखांणातली संवेदनशीलता हळूहळु मनापर्यंत पोचतेच म्हणा, असो बहुत काय बोलणे. सुज्ञांसि सांगणे न लगे.

In reply to by पैसा

>>>सदर कट्टा व्हेज-नॉन व्हेज असून 'कोरडा'च असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. या वाक्यामुळे पाठ फिरवीली असे माझे मत आहे. :bigsmile:

In reply to by गणपा

नुसतीच वड पिंपळाची पाने नेसून यावयास हरकत नसावी. पण रस्त्यात उगीच एखदे भुकेले अस्सल " शाकाहारी" बोकड/बकरी/गाय्-बैल/मैस-रेडा/घोडा ह्यापैकी चतुष्पाद भेटले तर अनावस्था प्रसंग येउ शकेल त्याचे काय?

In reply to by अत्रुप्त आत्मा

गुरूजी प्रॉक्झी अटेंडन्स लावाल लावाल काय त्याचं काय आहे ना नेमकी माझी ऑफीसची ट्रीप आहे हो ७ आणि ८ ला :)

मी येतोय.... मला वाडेश्वर(FC road, गुडलक कॅफेजवळ) चैतन्य पराठा (fc road, ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळ) समुद्र (नळ स्टॉप, पंजाबी स्टाइल) स्वामी(उत्तम व्यवस्था, पंजाबी स्टाइल) मथुरा ( j m road) बालगंधर्व शेजारचे उद्यान ही सगळी ठिकाणं आवडतील. मस्त भेटून गप्पा मारत बसण्यासारख्या जागा आहेत.

In reply to by मन१

मला वाडेश्वर(FC road, गुडलक कॅफेजवळ) चैतन्य पराठा (fc road, ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळ) समुद्र (नळ स्टॉप, पंजाबी स्टाइल) स्वामी(उत्तम व्यवस्था, पंजाबी स्टाइल) मथुरा ( j m road) या सर्व जागा कुपेयपानास वर्जीत आहेत. अतीअवांतर : टिळक रोडवरचे बादशाही कसे वाटतेय?

In reply to by विजुभाऊ

बादशाही सुंदरच आहे. पण त्याचे रूप पडले एक तुफ्फान चालणार्‍या खानावळीसारखे. लगोलग एकास खेटून एक असे बसणे, भराभर वाढले जाणे, आणि पान संपल्यावर फार वेळ थांबता न येणे हे एरव्ही शिस्त म्हणून ठिक असले तरी सदस्य संख्या अधिक असताना तिथे जाणे सोयीचे होणे नाही. मी स्वतः तिथे सतत मागचे वर्षभर तरी जातोय, मला ते प्रचंड आवडतेही; पण ८-१० तिथे बसून गप्पा मारणे शक्य नाही. त्या तुलनेत वरची ठिकाणे उचित वाटतात. किम्वा पब्लिक म्हटली तसं ओला कट्टा केल्यास जागचे उठायची घाई कुणीच करणार नाही. मोठ्या संख्येचा कोरडा कट्टा आयोजित करायचा झाल्यास चोखीदाणी* हे ही ठिकाण उत्तम ठरावे, पण भांबुर्डा अन् F C पासून दूर पडते, म्हणून त्याचे नाव घेतले नाही. ओला कट्टा करायचा झाल्यास ऐन जंगली महाराज मंदिराच्या समोरच्या गल्लित आतल्या बाजूला असणारे bamboo house हे गार्डन रेस्टॉरंट हा एक चांगला पर्याय वाटू लागला आहे. पिणारे बर्‍याचदा F C रोड वरील apache चेही नाव घेतात, मात्र ते कधीही पाहिले नसल्याने सुचवले नाही. * फार पूर्वी अभिरूची ला झालेला सात्विक कट्टा अगदि हिट्ट झाला होता.

In reply to by मन१

ओला कट्टा करायचा झाल्यास
असे असल्यास पूनम (डेक्कन बस डेपोजवळ ) एकदम उत्तम ठिकाण होऊ शकेल. बांबू हाऊस भलतेच महागडे आहे आणि कॉकटेल्स एकदम हुकलेली बनवतात :( - (कट्टेकरी) सोकाजी

In reply to by सोत्रि

गुरुवर्य, साक्षात आपण मिपासोमरसबृहस्पती, ओलशिक्षक उपलब्ध आहात हे क्षणभर विसरून आम्ही थेट आमच्या ऐकण्यातले नाव टंकले. पिणे पाजणे ह्यातील आमचा अनुभव हा शून्य असल्याने ऐकीव माहिती टंकली व आपल्या स्पेशालिटित नाक खुपसण्याचा उद्योग केला. कोरडा

In reply to by सोत्रि

बांबू हाऊस:कॉकटेल्स एकदम हुकलेली बनवतात
+१०० लाँग आयलंड आईस्ड टी ऐवजी कोकाकोला तोही गोल बुडाच्या चषकात घालून दिला. पण बाकी सुरमई /पापलेट तुकडे वगैरे चांगले घसघशीत आणि चविष्ट होते..

म्हात्रे पुला जवळ..मल्टी स्पाईस हॉटेल छान आहे.. जागा भरपुर..पदार्थ ठिक..कितिहि वेळ बसा.. हर्वेस्ट क्ल्ब च्या समोर.. दिनानाथ ची मागची बाजु..

हात वर केला आहे!! फायनल ठिकाण शुक्रवार संध्याकाळ पर्यंत ठरवून टाकुया...

जागा आणि वेळ नक्कि करा. मी आहेच >>>> वयोवृध्द, जेष्ठ नागरिकांनी , थंडी-गारठ्याच घरातच बसावे हा फुकटचा सल्ला ;)

बस जगह और वक्त बताइये बंदा हाजिर है....

In reply to by वपाडाव

तेवढ येताना सुरवार कुडता, लोकरी टोपी, डोळ्यात काजळ, कानात अत्तराचा फाया आणि तोंडात पान असा वेष करुन आलास तर ओळखायला बरं पडेल ;)

म्हात्रे पूल ते राजाराम पूल याच्यामध्ये बनियान ट्री आहे. उत्तम हॉटेल. मल्टि स्पाइसला गेलात तर क्रिस्पी पॉटेटॉ नक्की ट्राय करा आणि बनियान ट्री मध्ये शाही टुकडा. :) कट्ट्याला शुभेच्छा.

अरे हो एक लिहायचं राहिलं वर धाग्यात, किती जण होतील त्यानुसार संत्रा बर्फी किंवा रम बॉल वगैरेची सोय करायची आहे, त्यामुळं लवकर कळालं तर बरं होईल.

In reply to by ५० फक्त

जास्तीस्त लोकांनी नावं नोंदवावीत. संत्रा बर्फी कमी पडलेले चालणार नाही. ती उरणार नाही याची काळजी घेतली जैल चिंता नसावी.

कुठे आहे ते कळवा, येण्याचा प्रयत्न करेन.. (रविवारी, बाहेर जाण्याचा प्लॅन होता, त्यामुळे १०० % नाहि सांगु शकत )

सूचनेचा विचार करून त्यावर अंमल केल्याबद्दल धन्यवाद, ५० भाऊ :-) येण्याचा प्रयत्न केला जाईल. सप्ताहांत सुरु होईतोवर कळवेन.

फक्त किती वाजता यायचे / कुठे यायचे ते डीट्टेल मध्ये सांगा. मोदक.

पुण्यातच राहत असल्यामुळे हि एक उत्तम संधि आहे सर्व मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याचि. येण्याचा व संधिचा फायदा घेण्याचा नक्कि प्रयत्न केला जाईल. "बाय द वे" = एफ.सी. रोडवर (ज्ञानेश्वर पादुका चौका जवळ) छान 'मल्टिकुसिन' हॉटेल पण तिथे बसायला फार जागा आहे कि नाहि ह्या बद्दल जरा साशंक आहे. **आजुन थोडे सिटी मधे चालत असेल तर ... कलिंगा - कर्वे रोड, शारदा सेंटर समोर गिरीजा - कर्वे रोड (आणि बाकि ईतर शाखा देखिल) करी ऑन द रुफ - प्रभात रोड ऑलिविया - दशभुजा समोर ११ ई-स्ट्रीट - ई-स्ट्रीट,कॅम्प १०००(thousand) ओक - ई-स्ट्रीट,कॅम्प (बाकि कल्याणि नगर, कोरेगांव-पार्क आणि नगर रोड वर तर खच पडलाय हॉटेल्सचा (फाईन डायनिंग)... अति महागडे)... **बाकि मग आपले एफ.सी. रोडवरील खालिल पर्याय निवांत बसण्यासाठी केंव्हाहि भारीच आहेत :) वाडेश्वर पेपिनोस हॉर्न-ओके-प्लिझ गुड-लक (रुपालि, वैशालि "माज" आणि "गर्दि"वाले पर्याय आहेत).... **जे.एम. रोड : पांचालि गंधर्व शिव-सागर सुभद्रा मथुरा सोहम उपहार गृह सध्या तरी जवळपासच्या एरीयामधले एवढेच आठवताय....hope it helps :)

In reply to by उदय के'सागर

R Deccan ला उघडतंय. पण नक्कि केव्हा ते माहित नाही. Coming soon आहे आणि पाटी पण लागली आहे.

In reply to by नावातकायआहे

उजवा हात वर!
आपण आणखी काय काय वर करता !!!

एक विनंती, जे सदस्य पहिल्यांदाच येत आहेत त्या सर्वांना विनंती की मला / वल्लीला व्यनि करुन फोन नंबर द्यावेत. बहुदा मार्चच्या कट्ट्याला सगळे हाय फाय झालेले असतील, टॅब बिब असतील सगळ्यांकडे, मग शेवटपर्यंट ऑन लाईन राहता येईल पण तो पर्यंत तरी फोन वरच भागवावे लागेल.