Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by ५० फक्त on Wed, 01/04/2012 - 08:23
नमस्कार, मागच्या कट्ट्याच्या रिपोर्टात लिहिल्याप्रमाणे इथं एक जाहीर धागा काढत आहे, ब-याच वेळेस काही जणांना कळवता येतनाही किंवा उशीरा कळवलं जातं, नंतर ऐकुन घ्यावं लागतं, त्यासाठी हा खटाटोप. येत्या रविवारी ८ तारखेला पुण्यात कट्टा करायचे ठरत आहे, त्या बद्दल हॉटेल आणि वेळ याबद्दल आपल्या सुचना मिळाव्यात आणि चर्चा होउन सात तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व फायनल करावे असे ठरले आहे. सध्या विचार करत असलेली हॉटेल शिवाजीनगरच्या आसपासची आहेत, म्हणजे हॉटेल सापडणं अन येणं जाणं सग़ळंच सोपं होईल सगळ्यांना, अर्थात इतर ठिकाणं सुद्धा चालतील, प्रत्येक ठिकाणी कुणाची तरी गैरसोय होणार आहे, तरी कमीत कमी लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी असा विचार आहे. ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ दिनांक ८/१/१२ रविवार च्या कट्यात सहभागी होणार्‍या सर्व मि.पा.करांना कळविण्यात येते की,बनियन ट्री हॉटेल ही जागा कट्यासाठी नक्की करण्यात आलेली आहे...इथे सर्व कट्टेकर्‍यांनी संध्याकाळी ६;३० पर्यंत जमायचे आहे...पुण्याच्या कोणत्याही भागातून येथे कसे पोहोचावे यासाठी खाली दिलेल्या पत्याप्रमाणे यावे...अथवा ५०फक्त यांच्या मो.नं.वर येणार्‍यांनी संपर्क साधावा... सदर कट्टा व्हेज-नॉन व्हेज असून 'कोरडा'च असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. ठिकाण-बनियन ट्री हॉटेल...कट्याची वेळ-सायंकाळी ६:३० वाजता कर्वे नगर,नदी रस्त्यावर... डेक्कन.नळ स्टॉप कडुन येणार्‍यांसाठी-कर्वे नगर-ताथवडे उद्यानापर्यंत पोहोचावे-तिथुन ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे... स्वारगेट-सिंहगडरोड वरुन येणार्‍यांसाठी-राजाराम पुलापर्यंत पोहोचावे- तिथुनही ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे... मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी ५० फक्त आणि अत्रुप्त आत्मा किंवा वल्ली यांना व्यनि करावा. .
  • Log in or register to post comments
  • 25336 views

प्रतिक्रिया

Submitted by आगाऊ कार्टा on Wed, 01/04/2012 - 11:33

Permalink

येत आहे

मी पण येत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 01/04/2012 - 11:42

Permalink

/-/

बस जगह और वक्त बताइये बंदा हाजिर है....
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 01/04/2012 - 17:54

In reply to /-/ by वपाडाव

Permalink

बंदा रुपाया का ?? न्हाई,

बंदा रुपाया का ?? न्हाई, करन्सी कंची म्हनं ??
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Wed, 01/04/2012 - 18:01

In reply to /-/ by वपाडाव

Permalink

हाजिर हो

तेवढ येताना सुरवार कुडता, लोकरी टोपी, डोळ्यात काजळ, कानात अत्तराचा फाया आणि तोंडात पान असा वेष करुन आलास तर ओळखायला बरं पडेल ;)
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on Wed, 01/04/2012 - 11:49

Permalink

म्हात्रे पूल ते राजाराम पूल

म्हात्रे पूल ते राजाराम पूल याच्यामध्ये बनियान ट्री आहे. उत्तम हॉटेल. मल्टि स्पाइसला गेलात तर क्रिस्पी पॉटेटॉ नक्की ट्राय करा आणि बनियान ट्री मध्ये शाही टुकडा. :) कट्ट्याला शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 01/04/2012 - 12:45

Permalink

अरे हो एक लिहायचं राहिलं वर

अरे हो एक लिहायचं राहिलं वर धाग्यात, किती जण होतील त्यानुसार संत्रा बर्फी किंवा रम बॉल वगैरेची सोय करायची आहे, त्यामुळं लवकर कळालं तर बरं होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Wed, 01/04/2012 - 17:52

In reply to अरे हो एक लिहायचं राहिलं वर by ५० फक्त

Permalink

एक विनंती

जास्तीस्त लोकांनी नावं नोंदवावीत. संत्रा बर्फी कमी पडलेले चालणार नाही. ती उरणार नाही याची काळजी घेतली जैल चिंता नसावी.
  • Log in or register to post comments

Submitted by गणेशा on Wed, 01/04/2012 - 13:04

Permalink

कुठे आहे ते कळवा, येण्याचा

कुठे आहे ते कळवा, येण्याचा प्रयत्न करेन.. (रविवारी, बाहेर जाण्याचा प्लॅन होता, त्यामुळे १०० % नाहि सांगु शकत )
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Wed, 01/04/2012 - 14:10

Permalink

सूचनेचा विचार करून त्यावर

सूचनेचा विचार करून त्यावर अंमल केल्याबद्दल धन्यवाद, ५० भाऊ :-) येण्याचा प्रयत्न केला जाईल. सप्ताहांत सुरु होईतोवर कळवेन.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Wed, 01/04/2012 - 14:20

Permalink

मी येईन..

फक्त किती वाजता यायचे / कुठे यायचे ते डीट्टेल मध्ये सांगा. मोदक.
  • Log in or register to post comments

Submitted by उदय के'सागर on Wed, 01/04/2012 - 15:02

Permalink

एक उत्तम संधि आहे सर्व मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याचि !

पुण्यातच राहत असल्यामुळे हि एक उत्तम संधि आहे सर्व मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याचि. येण्याचा व संधिचा फायदा घेण्याचा नक्कि प्रयत्न केला जाईल. "बाय द वे" = एफ.सी. रोडवर (ज्ञानेश्वर पादुका चौका जवळ) छान 'मल्टिकुसिन' हॉटेल पण तिथे बसायला फार जागा आहे कि नाहि ह्या बद्दल जरा साशंक आहे. **आजुन थोडे सिटी मधे चालत असेल तर ... कलिंगा - कर्वे रोड, शारदा सेंटर समोर गिरीजा - कर्वे रोड (आणि बाकि ईतर शाखा देखिल) करी ऑन द रुफ - प्रभात रोड ऑलिविया - दशभुजा समोर ११ ई-स्ट्रीट - ई-स्ट्रीट,कॅम्प १०००(thousand) ओक - ई-स्ट्रीट,कॅम्प (बाकि कल्याणि नगर, कोरेगांव-पार्क आणि नगर रोड वर तर खच पडलाय हॉटेल्सचा (फाईन डायनिंग)... अति महागडे)... **बाकि मग आपले एफ.सी. रोडवरील खालिल पर्याय निवांत बसण्यासाठी केंव्हाहि भारीच आहेत :) वाडेश्वर पेपिनोस हॉर्न-ओके-प्लिझ गुड-लक (रुपालि, वैशालि "माज" आणि "गर्दि"वाले पर्याय आहेत).... **जे.एम. रोड : पांचालि गंधर्व शिव-सागर सुभद्रा मथुरा सोहम उपहार गृह सध्या तरी जवळपासच्या एरीयामधले एवढेच आठवताय....hope it helps :)
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 01/04/2012 - 17:09

In reply to एक उत्तम संधि आहे सर्व मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याचि ! by उदय के'सागर

Permalink

शिवसागरचं रिनोवेशन चाल्लय.

शिवसागरचं रिनोवेशन चाल्लय. नका जाऊ.
  • Log in or register to post comments

Submitted by एक तारा on गुरुवार, 01/05/2012 - 17:35

In reply to एक उत्तम संधि आहे सर्व मिपाकरांना प्रत्यक्ष भेटण्याचि ! by उदय के'सागर

Permalink

बार्बेक्यु नेशन

R Deccan ला उघडतंय. पण नक्कि केव्हा ते माहित नाही. Coming soon आहे आणि पाटी पण लागली आहे.
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Wed, 01/04/2012 - 15:08

Permalink

उजवा हात वर!

हजर!
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 01/04/2012 - 15:20

In reply to उजवा हात वर! by नावातकायआहे

Permalink

---

उजवा हात वर!
आपण आणखी काय काय वर करता !!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Wed, 01/04/2012 - 15:33

In reply to --- by वपाडाव

Permalink

@आपण आणखी काय काय वर करता

@आपण आणखी काय काय वर करता !!!>>> :-D राम कृष्ण हरी...!मेलो साफ..!
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Wed, 01/04/2012 - 15:54

In reply to --- by वपाडाव

Permalink

भेटी अंती कळेलच!

भेटी अंती कळेलच! :-)
  • Log in or register to post comments

Submitted by चिमी on Wed, 01/04/2012 - 15:19

Permalink

सुकान्ता

मलापन यायचय .... पन्........
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Wed, 01/04/2012 - 15:22

Permalink

मला सुद्धा यायला आवडेल.....

मला सुद्धा यायला आवडेल.....
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 01/04/2012 - 15:35

Permalink

एक विनंती, जे सदस्य

एक विनंती, जे सदस्य पहिल्यांदाच येत आहेत त्या सर्वांना विनंती की मला / वल्लीला व्यनि करुन फोन नंबर द्यावेत. बहुदा मार्चच्या कट्ट्याला सगळे हाय फाय झालेले असतील, टॅब बिब असतील सगळ्यांकडे, मग शेवटपर्यंट ऑन लाईन राहता येईल पण तो पर्यंत तरी फोन वरच भागवावे लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 01/04/2012 - 15:39

Permalink

कट्ट्याला शुभेच्छा

कट्ट्याला शुभेच्छा :)
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 01/04/2012 - 16:41

In reply to कट्ट्याला शुभेच्छा by स्पा

Permalink

---

मागील वर्षभरात आपण या व्यतिरिक्त केलंय तरी काय? (तु म्हणुन सांगतोय.... हलकेच घे)
  • Log in or register to post comments

Submitted by स्पा on Wed, 01/04/2012 - 16:43

In reply to --- by वपाडाव

Permalink

ह्या ह्या दुसर्या किंवा

ह्या ह्या :) दुसर्या किंवा चवथ्या शनवारी करा कि कट्टा :)
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Wed, 01/04/2012 - 17:44

In reply to ह्या ह्या दुसर्या किंवा by स्पा

Permalink

असं का???

पुणे गेट च्या वेळी काय झालं होत रे??
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Wed, 01/04/2012 - 18:02

In reply to असं का??? by मी-सौरभ

Permalink

;)

जाऊ दे रे! का बिचार्‍याला पिळतो आहेस? त्याने डॉन्याचे शिष्यत्व घेतलेले दिसतेय कारणे सांगण्याचे ;) पण ते अस्सल 'वायदेआजम' आहेत, त्याची सर स्पावड्याला नाही. - (रोखठोक) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Wed, 01/04/2012 - 19:13

In reply to ;) by सोत्रि

Permalink

आता काय बोलायचं

स्पाडु : सोत्रि नी तुला वाचवलं नाहि तर . . . . . . . . . . दुसर्‍या कुणीतरी वाचवल असतं :)
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 01/04/2012 - 18:02

In reply to असं का??? by मी-सौरभ

Permalink

२०११ मध्ये पहिला, तिसरा आणि

२०११ मध्ये पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवार रविवार होता, आता २०१२ मध्ये दुसरा आणि चवथा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 01/04/2012 - 21:24

In reply to २०११ मध्ये पहिला, तिसरा आणि by ५० फक्त

Permalink

खिक्क!!

खिक्क!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on गुरुवार, 01/05/2012 - 00:23

In reply to कट्ट्याला शुभेच्छा by स्पा

Permalink

स्पा महाराजांचा निषेध असो...!

@-प्रेषक स्पा Wed, 04/01/2012 - 15:39. कट्ट्याला शुभेच्छा निषेध :evil: निषेध :evil: निषेध :evil: निषेध :evil: निषेध :evil: @-मागील वर्षभरात आपण या व्यतिरिक्त केलंय तरी काय?>>> वपाडाव यांचेशी पूर्ण सहमती... (मि.स्पा यांचेवर नाराज होऊन चिडलेला) :evil: अत्रुप्त आत्मा
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Wed, 01/04/2012 - 16:35

Permalink

कट्याला शुभेच्छा.

कट्टे-बिट्टे जोरात होऊद्या. :) -दिलीप बिरुटे (शुभेच्छुक)
  • Log in or register to post comments

Submitted by मराठमोळा on Wed, 01/04/2012 - 16:44

Permalink

याला हजेरी लावणं जमणार नाही

याला हजेरी लावणं जमणार नाही ब्वॉ. एखादा फेब्रुवारी मधे करणार असाल तर नक्कीच जमेल. कट्टा करुनही बरेच दिवस झालेत. :)
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Wed, 01/04/2012 - 17:07

Permalink

अरारा! मी 13-14 जाने. रोजी

अरारा! मी 13-14 जाने. रोजी पुण्‍यात असेल. त्यापूर्वी यायला जमणार नाहीय. त्यामुळे शुभेच्छा व एंजॉय. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Wed, 01/04/2012 - 17:21

In reply to अरारा! मी 13-14 जाने. रोजी by यकु

Permalink

:)

असू दे रे! आपण बसू ना १३-१४ ला ;) - (ओल्या बैठकीचा चाहता) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by यकु on Wed, 01/04/2012 - 17:55

In reply to :) by सोत्रि

Permalink

असू दे रे!आपण बसू ना १३-१४

असू दे रे!आपण बसू ना १३-१४ ला हे म्हणजे प्रत्यक्ष द्रव्य महागुरुंसोबतच साधनेला बसण्‍याचा चान्स आहे. ;-) नक्कीच बसू. :)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 01/05/2012 - 13:32

In reply to असू दे रे!आपण बसू ना १३-१४ by यकु

Permalink

थम्स अप - ऑन द रॉक्स घेणारे आणि चकणा संपवणारे

थम्स अप - ऑन द रॉक्स घेणारे आणि चकणा संपवणारे चालत असतील तर व्यनि करा.... ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by चिंतामणी on Sat, 01/07/2012 - 11:43

In reply to असू दे रे!आपण बसू ना १३-१४ by यकु

Permalink

संपादीत विषय पुन्हा एकदा बघा.

द्रव्य महागुरुंसोबतच साधनेला बसण्‍याचा चान्स बिल्कुल नाही. :p :-p :tongue: त्यासाठी वेगळा कट्टा आयोजीत करावा लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 01/04/2012 - 17:10

Permalink

आता काय उपयोग.

आता काय उपयोग.:(
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Wed, 01/04/2012 - 17:13

Permalink

हात वर केला आहे....!!

हात वर केला आहे....!!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Wed, 01/04/2012 - 17:16

Permalink

जमल्यास.... नक्की!

जमल्यास.... Image removed. नक्की!
  • Log in or register to post comments

Submitted by विनोद१८ on Wed, 01/04/2012 - 17:59

Permalink

कट्टा...२०१२.

..सर्वान्ना कट्टा २०१२ च्या शुभेच्छा...!! विनोद१८
  • Log in or register to post comments

Submitted by धमाल मुलगा on Wed, 01/04/2012 - 18:06

Permalink

बेष्ट!

बाटलीची सोय असलेलं ठिकाण बघा रे.. आपसुक भरपूर वेळ गप्पा मारायला बसू दिलं जाईल. :) बारामतीला जाणं रद्द झालं तर मी आहेच. :)
  • Log in or register to post comments

Submitted by विवेक मोडक on Wed, 01/04/2012 - 19:03

In reply to बेष्ट! by धमाल मुलगा

Permalink

स्पष्टीकरण हवे आहे

कसली बाटली हवी आहे आपल्याला?? बाकी बारामतीकरांनी मूळ मुद्द्याला हात घातल्याबद्दल त्यांचे आभार
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Wed, 01/04/2012 - 19:11

In reply to स्पष्टीकरण हवे आहे by विवेक मोडक

Permalink

व्वा!!

धमु तूच खरा कट्टेकरी...
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on गुरुवार, 01/05/2012 - 08:55

In reply to बेष्ट! by धमाल मुलगा

Permalink

धम्या माझ्यातर्फे तुला एक

धम्या माझ्यातर्फे तुला एक बाटली तर नक्कि आहे रे !!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 01/06/2012 - 19:43

In reply to बेष्ट! by धमाल मुलगा

Permalink

नऊवारी

नऊवारी नेसून ये. बाटली मिळेल. का हो सोत्रि?
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Fri, 01/06/2012 - 23:14

In reply to नऊवारी by श्रावण मोडक

Permalink

म्हणजे?? नऊवारी नेसून

म्हणजे?? नऊवारी नेसून येणार्‍याला सोत्रि बाटली देतात ? तसं असेल तर नकोच येवू बाबा, असा बालगंधर्व बघवणार नाही. :D
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Sat, 01/07/2012 - 00:54

In reply to नऊवारी by श्रावण मोडक

Permalink

=))

मोडक, ते इथे नाही, संक्रांतीच्या हळदीकुंकवाला मिळण्याची शक्यता आहे ;) असो, तुम्ही माझा पार 'विजय माल्ल्या' करून टाकायचा विचार केलेला दिसतोय ;) - (लिकर किंग) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीरंग on Wed, 01/04/2012 - 19:06

Permalink

मी पण नक्की येईन या वेळी.

मी पण नक्की येईन या वेळी.
  • Log in or register to post comments

Submitted by स्मिता. on Wed, 01/04/2012 - 19:21

Permalink

शुभेच्छा!

कट्ट्याला आमच्या शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभो on Wed, 01/04/2012 - 19:34

Permalink

करा रे मस्त कट्टा!!!

करा रे मस्त कट्टा!!! फेबुरवारीत भारतात परतलो की अजून करू कट्टे :)
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com