Skip to main content

सुचना + चर्चा = आमंत्रण कट्ट्याचं

लेखक ५० फक्त यांनी बुधवार, 04/01/2012 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मागच्या कट्ट्याच्या रिपोर्टात लिहिल्याप्रमाणे इथं एक जाहीर धागा काढत आहे, ब-याच वेळेस काही जणांना कळवता येतनाही किंवा उशीरा कळवलं जातं, नंतर ऐकुन घ्यावं लागतं, त्यासाठी हा खटाटोप. येत्या रविवारी ८ तारखेला पुण्यात कट्टा करायचे ठरत आहे, त्या बद्दल हॉटेल आणि वेळ याबद्दल आपल्या सुचना मिळाव्यात आणि चर्चा होउन सात तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत सर्व फायनल करावे असे ठरले आहे. सध्या विचार करत असलेली हॉटेल शिवाजीनगरच्या आसपासची आहेत, म्हणजे हॉटेल सापडणं अन येणं जाणं सग़ळंच सोपं होईल सगळ्यांना, अर्थात इतर ठिकाणं सुद्धा चालतील, प्रत्येक ठिकाणी कुणाची तरी गैरसोय होणार आहे, तरी कमीत कमी लोकांची कमीत कमी गैरसोय व्हावी असा विचार आहे. ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~ दिनांक ८/१/१२ रविवार च्या कट्यात सहभागी होणार्‍या सर्व मि.पा.करांना कळविण्यात येते की,बनियन ट्री हॉटेल ही जागा कट्यासाठी नक्की करण्यात आलेली आहे...इथे सर्व कट्टेकर्‍यांनी संध्याकाळी ६;३० पर्यंत जमायचे आहे...पुण्याच्या कोणत्याही भागातून येथे कसे पोहोचावे यासाठी खाली दिलेल्या पत्याप्रमाणे यावे...अथवा ५०फक्त यांच्या मो.नं.वर येणार्‍यांनी संपर्क साधावा... सदर कट्टा व्हेज-नॉन व्हेज असून 'कोरडा'च असेल याची संबंधितांनी नोंद घ्यावी. ठिकाण-बनियन ट्री हॉटेल...कट्याची वेळ-सायंकाळी ६:३० वाजता कर्वे नगर,नदी रस्त्यावर... डेक्कन.नळ स्टॉप कडुन येणार्‍यांसाठी-कर्वे नगर-ताथवडे उद्यानापर्यंत पोहोचावे-तिथुन ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे... स्वारगेट-सिंहगडरोड वरुन येणार्‍यांसाठी-राजाराम पुलापर्यंत पोहोचावे- तिथुनही ५मिनिटाच्या अंतरावर सदर ठिकाण आहे... मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी ५० फक्त आणि अत्रुप्त आत्मा किंवा वल्ली यांना व्यनि करावा. .

वाचने 25453
प्रतिक्रिया 137

प्रतिक्रिया

In reply to by मी-सौरभ

जाऊ दे रे! का बिचार्‍याला पिळतो आहेस? त्याने डॉन्याचे शिष्यत्व घेतलेले दिसतेय कारणे सांगण्याचे ;) पण ते अस्सल 'वायदेआजम' आहेत, त्याची सर स्पावड्याला नाही. - (रोखठोक) सोकाजी

In reply to by मी-सौरभ

२०११ मध्ये पहिला, तिसरा आणि पाचवा शनिवार रविवार होता, आता २०१२ मध्ये दुसरा आणि चवथा आहे.

In reply to by स्पा

@-प्रेषक स्पा Wed, 04/01/2012 - 15:39. कट्ट्याला शुभेच्छा निषेध :evil: निषेध :evil: निषेध :evil: निषेध :evil: निषेध :evil: @-मागील वर्षभरात आपण या व्यतिरिक्त केलंय तरी काय?>>> वपाडाव यांचेशी पूर्ण सहमती... (मि.स्पा यांचेवर नाराज होऊन चिडलेला) :evil: अत्रुप्त आत्मा

याला हजेरी लावणं जमणार नाही ब्वॉ. एखादा फेब्रुवारी मधे करणार असाल तर नक्कीच जमेल. कट्टा करुनही बरेच दिवस झालेत. :)

In reply to by सोत्रि

असू दे रे!आपण बसू ना १३-१४ ला हे म्हणजे प्रत्यक्ष द्रव्य महागुरुंसोबतच साधनेला बसण्‍याचा चान्स आहे. ;-) नक्कीच बसू. :)

In reply to by यकु

थम्स अप - ऑन द रॉक्स घेणारे आणि चकणा संपवणारे चालत असतील तर व्यनि करा.... ;-)

In reply to by यकु

द्रव्य महागुरुंसोबतच साधनेला बसण्‍याचा चान्स बिल्कुल नाही. :p :-p :tongue: त्यासाठी वेगळा कट्टा आयोजीत करावा लागेल.

बाटलीची सोय असलेलं ठिकाण बघा रे.. आपसुक भरपूर वेळ गप्पा मारायला बसू दिलं जाईल. :) बारामतीला जाणं रद्द झालं तर मी आहेच. :)

In reply to by धमाल मुलगा

कसली बाटली हवी आहे आपल्याला?? बाकी बारामतीकरांनी मूळ मुद्द्याला हात घातल्याबद्दल त्यांचे आभार

In reply to by श्रावण मोडक

म्हणजे?? नऊवारी नेसून येणार्‍याला सोत्रि बाटली देतात ? तसं असेल तर नकोच येवू बाबा, असा बालगंधर्व बघवणार नाही. :D

In reply to by श्रावण मोडक

मोडक, ते इथे नाही, संक्रांतीच्या हळदीकुंकवाला मिळण्याची शक्यता आहे ;) असो, तुम्ही माझा पार 'विजय माल्ल्या' करून टाकायचा विचार केलेला दिसतोय ;) - (लिकर किंग) सोकाजी

In reply to by खुन्खार अकिब

अरे चिच्या, लेकिन आप आओगे तो बाकी सब भाग नही जाएंगे? जरा अपना नाम तो देख लो| ८ तारखेच्या कट्ट्याला आमची उपस्थिती शाकाहारी नी कोरडी असेल असे विणम्रपणे जाहिर करतो.

In reply to by प्यारे१

आमची उपस्थिती शाकाहारी नी कोरडी असेल
- (आळीमिळी गुपचीळी केलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

आयला, कुण्णी कुण्णी विश्वास ठेवत नाहीये. :( बघ प्यार्‍या लेका काय हे तुझे रेपुततिओन. :|

In reply to by पियुशा

आपल्याला यायला नाही का जमणार :( . . . . . . . . अवांतरः कोण रे तो हा (पियुशा) डु. आय डी आहे अशी शंका घेतोय??

In reply to by मी-सौरभ

अवांतरः कोण रे तो हा (पियुशा) डु. आय डी आहे अशी शंका घेतोय?? कोण आहे कोण तो ?;)

कट्ट्याला शुभेच्छा एक विनंति कटटा सा़जरा जरुर करा. मस्त पैकि गप्पा करा. मस्तपैकि खा . पण फक्त दारु पियु नका दारु चे पैसे वाचतिल ते एखाद्या अनाथ आश्रमाला दान द्या. कदाचित तुमच्या दारुच्या बिलात त्या अनाथ आश्रमातिल मुलांच एका महिन्याच जेवण नीघेल. मि व माझे मित्र बर्‍याच वेळा असच करतो . कृपा करुन राग मानु नये. परत एकदा कट्ट्याला शुभेच्छा

In reply to by निश

मी काय म्हणतो, मग ते हाटेलात जाउन जेवण तरी कशाला करायचे? त्याचे वाचलेले पैसे पण अनाथ आश्रमात नाही का देता येणार?

मी काय म्हणतो, मग ते हाटेलात जाउन जेवण तरी कशाला करायचे? त्याचे वाचलेले पैसे पण अनाथ आश्रमात नाही का देता येणार? >>>>. हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा

कट्ट्यासाठी हार्दिक शुभेच्छा! नंतर फोटोंसहित वृत्तांत टंकायला विसरु नका. स्वाती

कट्ट्याला शुभेच्छा! कधी नव्हे ते हजेरी लावणार असे ठरवले होते. पण ८ तारखेला जमणे अशक्यच. तेंव्हा पुढच्या वेळेस. तोवर वृत्तांतावरच समाधान!

In reply to by प्यारे१

हॅ हॅ हॅ.. मला वाटले ब्रीच प्रेझेंटेशन आहे की काय? म्हणून म्हटले अडवणूक सोडवावी.

In reply to by प्यारे१

@कशाला सिझेरीयन केलंत गवि? ;-) नैसर्गिक झाली असती ना?>>> त्यांना मुहुर्त चांगला वाटला असेल... ;-)

मोबाईलवरुन संपर्क साधणयासाठी ५० फक्त आणि अत्रुप्त आत्मा किंवा वल्ली यांना करावा. . व्यनि ....म्हण्जे काय?