Skip to main content

पंतांच्या पगडीचे प्रवासवर्णन

लेखक पुष्कर यांनी शुक्रवार, 11/07/2008 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले. पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्‍या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला. पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला. पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले. पंतांना परमेश्वरच पावला! -( पटकथा - पुष्कर)

वाचने 4985
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

'प'चा पार्ट पसंत पडला! ('प'प्रेमी) पिंट्या ;)

तुमची प्रतिभा एकदम पाप आय मीन बाप आहे

पुष्करला पंतांचा परमेश्वर पावला. पुष्करने पंतांना पुरंदरला पाठवले पण पुष्कर पावमिसळवर पहाटे पासून पासरला...(ह्.घे.) मस्त आहे वर्णन.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

पटकथाकार पुष्करनी पंत, पोलीस, पंकजला पळवुन पळवुन पब्लीकला पार पिडलं. पाचकळपणा पुरे. ;-)

In reply to by सहज

हे मात्र मनापासून पटलं. याबाबतीत आमची प्रतिभा जरा कमीच पडली. छोटी चिंगी, मिरमिर्‍या, प्राजू आणि सहज, मनापासून आभार..

मस्त लिहिलं आहे, मौज वाटली! :)

प -प -प प !!! पुष्कर !! पूरे !! पण!!! प्याक!!! म्हणजे झ्याक!!!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

प्रतिभावंतांच्या प्रेमळ प्रतिसादांमुळे प्रेरित! -पुष्कर

पुढचा पार्ट प्रकाशितोय पहा.