स्पर्शगंधाने फुललेल्या वाटेवरती
तव हाताचा स्पर्श लाजरा होता
हिरव्या सतेज वृक्षांमधुनी
प्रेमाचा निर्झर खळाळत होता
हलक्याच मोहक मिठीत
तव ओढणीचा तोल ढळलेला
स्पर्शांच्या मोहक संगतीत
देह चैतन्यात भिजला होता
तितक्यात कातरवेळी आकाशाने
रंगीत अलवार पदर सोडलेला
(मुठा) नदीच्या रम्य काठावरती
सूर्य नाजुक निजला होता
गंधाळलेल्या बेभान रात्री
तारकांचा लख्ख पहारा
परतीच्या निशब्द वाटेवरती
चुंबनांचा सडा सांडला होता
--- शब्दमेघ (१६ सप्टेंबर २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ)
२. स्वप्नमेघातील चांदणं : http://www.misalpav.com/node/18888
१. पहिल्या भेटीचा सुगंध : http://www.misalpav.com/node/18628
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4703
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुंदर!!!
धन्यवाद
In reply to सुंदर!!! by michmadhura
सुरेख!!
सुरेख
गंधाळलेल्या बेभान
मस्त रे
वल्ली ही मुठा नदी .
In reply to मस्त रे by प्रचेतस
गणेशा परवा येऊन गेला
In reply to वल्ली ही मुठा नदी . by गणेशा
ओ वल्ली, उगा जळताय का ते
नाय हो
In reply to ओ वल्ली, उगा जळताय का ते by ५० फक्त
छान शब्दकळा
खूपच छान .वा !! आवडली .....
खूपच छान .वा !! आवडली .....
अंहं ????
नशिल्या स्पर्शगंधाने
लग्ना नंतर अजुन आशय गर्भ
छान,
गंधाळलेल्या बेभान