Skip to main content

३. स्पर्शगंध ..

लेखक गणेशा यांनी बुधवार, 12/10/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्शगंधाने फुललेल्या वाटेवरती तव हाताचा स्पर्श लाजरा होता हिरव्या सतेज वृक्षांमधुनी प्रेमाचा निर्झर खळाळत होता हलक्याच मोहक मिठीत तव ओढणीचा तोल ढळलेला स्पर्शांच्या मोहक संगतीत देह चैतन्यात भिजला होता तितक्यात कातरवेळी आकाशाने रंगीत अलवार पदर सोडलेला (मुठा) नदीच्या रम्य काठावरती सूर्य नाजुक निजला होता गंधाळलेल्या बेभान रात्री तारकांचा लख्ख पहारा परतीच्या निशब्द वाटेवरती चुंबनांचा सडा सांडला होता --- शब्दमेघ (१६ सप्टेंबर २०११, प्रितगंध... एक दरवळणारी साथ) २. स्वप्नमेघातील चांदणं : http://www.misalpav.com/node/18888 १. पहिल्या भेटीचा सुगंध : http://www.misalpav.com/node/18628
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 4703
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

सुंदर शब्द वेचून बनलेली कविता खूपच आवडली.

In reply to by michmadhura

धन्यवाद फक्त एक शब्द बदलतो तुमचा सुंदर क्षण वेचून बनवलेली कविता आहे ही

तितक्यात कातरवेळी आकाशाने रंगीत अलवार पदर सोडलेला (मुठा) नदीच्या रम्य काठावरती सूर्य नाजुक निजला होता
कविचे आयुष्य कवितेत उतरल्याशिवाय राहत नाही. ;)

गंधाळलेल्या बेभान रात्री तारकांचा लख्ख पहारा परतीच्या निशब्द वाटेवरती चुंबनांचा सडा सांडला होता..... आय हाय हाय हाय,,,,मार डाला,,, लल्ला,,,तुने मार डाला... +१ टु मि.का.----- कविचे आयुष्य कवितेत उतरल्याशिवाय राहत नाही. > गणेशराव,,, मि.का. वचनात तथ्य आहे,,का सत्य आहे..? ;-)

कवितेतील प्रसंगवर्णन ऐकून अगदी लवासा-टेमघरजवळची अतिशय स्वच्छ, सुंदर, नितळ मुठा नदी आठवली. पुण्यातल्या मुठेच्या किनार्‍याजवळ उभं राहून अशी सुंदर कविता स्फुरणे केवळ अशक्य.

In reply to by प्रचेतस

वल्ली ही मुठा नदी . छोट्याश्या मुठा गावापासुन पुढे गेले की हिरवळीच्या येथ्थेच निसर्गसंपन्न वातावरणातुन वाहते तेथील वर्णन आहे.. तेथे एक छोटासा लाकडी पुल आहे. मुठा नदी खुप सुंदर आहे तेथे .. पुण्यात येवुन आपण नदीला गटार बनवली आहे,, खुप वाईट वाटते जेंव्हा त्याच नदीला अश्या स्वरुपात पाहुन.

In reply to by गणेशा

गणेशा परवा येऊन गेला लवासात. खूपच घाई करत होता. जातो जातो म्हणून. का ते आज कळले....! ;) अवांतरः सेक्युरिटी 'टाईट' असते हे ठाऊक नाही काय ५० फक्त तुम्हाला?

ओ वल्ली, उगा जळताय का ते जात्यात आहेत तुम्ही सुपात, तुम्ही लिहा की अशी एखादी कविता लेण्याच्या खिडकीवरती, वाटलं तर ब्राम्हीत लिहा, आम्ही समजुन घेउ. अवांतर - आमच्या पुर्वीच्या कुंपनीची सिक्युरीटी पारच ढेपाळलेली दिसतेय,

In reply to by ५० फक्त

आम्ही नाय जळत हो, आम्हाला साध्या चारोळ्याही लिहिता येत नाहीत, कविता कुठून लिहिणार. :( बाकी ती तुमच्या जुन्या कुंपनीची सिक्युरीटी ढेपाळणारच ना हो. अजून परवानगी कुठे मिळालीय. साहेब अगदी गप्प झालेत सध्या.;)

पण सूर्य नाजूक हे विशेष कळले नाही. प्रखर नसलेला सूर्य सुचवायचे असावे. .. बेभान रात्री तारकांचा लख्ख पहारा हे आवडले.

गंधाळलेल्या बेभान रात्री तारकांचा लख्ख पहारा परतीच्या निशब्द वाटेवरती चुंबनांचा सडा सांडला होता शॉलिट्ट्ट्ट्ट... ;)