मरणावेळेच्या शूटिंगची सोय आणि इतर सेवा पुरवल्या जातील. अधिक माहीतीसाठी वाचा..
काही लोकांनी मरणाचेवेळी त्यांचे व्हिडो शुटिंग केले जावे अशी अपेक्षा आम्हाजवळ व्यक्त केली. सदर इच्छेची दखल घेऊन आम्ही इनिशीएटीव्ह घेतलेला आहे. त्या धाग्यावर अवांतर होऊन इतर सदस्यांना भलते सलते अनुभव येऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवत आहोत.
मूर्खांसाठी, गाढवांसाठी अन नीट न वाचता येणार्यांसाठी विशेष सूचना.( रडारडी करायच्या आधी धागा कोणत्या सदरांत आहे हे पहावे.
)
वरील सर्व मरणेच्छुक लोकांना विडो शुटिंगचा लाभ देण्याची सोय आम्ही करू. (दमड्या तयार ठेवा!!)
त्यासाठी मात्र काही शेड्युल/अटी बिटी आहेत ते पाळले गेलेत तर गफलती होणार नाहीत. त्यातल्या काही खाली लिहतो.
१. आधी कान्ट्र्याक्ट वर मरणदिन ठरवून सही करून द्यावी लागेल. मरणाचा दीन एखाद आठवडा पुढे मागे झाल्यास हरकत नाही. दिवस अगदी बरोबर आल्यास ५०% सूट मिळेल.
२. कॉन्ट्र्याक्ट् साईनिंग डेट आणी व्हिडो कॉपीराईट स्टार्ट डेट एकच असेल. तेव्हा मरणाला उशीर होऊन कॉपीराईट संपल्यास निळे आणी व्हिडो शुटिंग कंपनी कोणताही मोबदला देण्यास बांधील राहणार नाही.
३. जितके आधी कॉन्ट्र्याक्ट साईन होईल तितका दर स्वस्त असेल.
४. मरणार्याच्या मरतानाच्या रंगरुपावरून मोबदल्याचे दर ठरवले जातील. याचे सगळे हक्क निळे आणि व्हिडो शुटिंग कंपनीकडे असतील, त्यावर कोणतेही चॅलेंज स्विकारले जाणार नाही.
५. हौशे गवश्यांचे स्वागतच आहे. त्यांना व्हिडिओत चार 'शब्द अन रडणे' इतका रोलही दिला जाईल. फूटेजच्या लांबीनुसार त्याचा चार्ज वेगळा पडेल. १५ मिनिट रडणे किंवा ५ मिनिट घाय मोकलून रडणार्याला स्पेशल डिस्काउंट+जेवण+ ३ स्टार हाटेलात स्टे कंपनीतर्फे दिला जाईल.
६. हॉलिवूड मधून नट्या आणण्याची सोयही असेल, त्याचा वेगळा चार्ज पडेल. कोणती नटी आणायची याचे सर्व हक्क कंपनीकडे असतील.
७. बॉलीवूडची नटी आणून मरणाराचे तिच्याशी अनैतिक संबंध होते अशी बातमी शेवटी देऊन ट्यार्पी वाढवण्याचा ऑप्शनही दिला जाईल. हा ऑप्शन घेतल्यास विशेष सवलत देण्यात येईल. नटी कोण हे निवडायचे हक्क फक्त कंपनीकडे असतील.
८. मरणशय्येवर केलेल्या उत्तम अभिनयाची दखल घेण्यात येऊन त्यानुसार योग्य असा मोबदला वारसांना देण्यात येईल.
९. एखाद्या मरणार्या मित्रास रेकमेंड केल्यास त्याच्या मरणटेप विक्रीतून मिळालेल्या नफ्यातील २०% मरणोन्मुखास वा त्याच्या वारसांना देण्यात येतील. रेकमेंड करणार्याने ठराविक एलिजीबीलीटीची पूर्तता करणे अनिवार्य आहे.
१०. मरताना दैवी अनुभव आले असे छानश्या अभिनयाने लोकांना पटवून देण्यास मरणारा यशस्वी ठरला आणि त्यायोगे त्याच्या नावाने भविष्यात मठ/आश्रम इ. काढावयाचा असेल तर त्याचे सर्व हक्क फक्त कंपनीकडे असतील. मठ/आश्रम इ. तून मिळालेल्या नफ्याचे २०-५०%* वारसांना दिले जातील. इतर सर्व नफा कसा वापरावा याचे हक्क कंपनीकडेच असतील.
*वारसांचा कंपनीशी आणि मठ/आश्रमाप्रती असलेल्या भूमिकेवरून योग्य प्रमाण ठरवले जाईल.
ह्या प्राथमिक अटींबरोबरच संपूर्ण टर्म्स आणि कंडिशन्स वर सही केल्याशिवाय कोणतेही कंत्राट घेतले जाणार नाही. संपूर्ण टर्म्स आणि कंडिशन्स कंत्राटावर सही करतेवेळीच सादर केले जातील.
इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे, तेव्हा लागा कामाला आणि खाली प्रतिसादात टिपा लिहा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जाम खपेल
आता धंदा म्हणलं की चोविस तास तोच विचार..
हे कसं आता नॉर्मल
३डी शुटींग ची काय सोय आहे का?