काही लोकांनी मरणाचेवेळी त्यांचे व्हिडो शुटिंग केले जावे अशी अपेक्षा आम्हाजवळ व्यक्त केली. सदर इच्छेची दखल घेऊन आम्ही इनिशीएटीव्ह घेतलेला आहे. त्या धाग्यावर अवांतर होऊन इतर सदस्यांना भलते सलते अनुभव येऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवत आहोत.
मूर्खांसाठी, गाढवांसाठी अन नीट न वाचता येणार्यांसाठी विशेष सूचना.( रडारडी करायच्या आधी धागा कोणत्या सदरांत आहे हे पहावे.
)
वरील सर्व मरणेच्छुक लोकांना विडो शुटिंगचा लाभ देण्याची सोय आम्ही करू. (दमड्या तयार ठेवा!!)
त्यासाठी मात्र काही शेड्युल/अटी बिटी आहेत ते पाळले गेलेत तर गफलती होणार नाहीत. त्यातल्या काही खाली लिहतो.
१. आधी कान्ट्र्याक्ट वर मरणदिन ठरवून सही करून द्यावी लागेल. मरणाचा दीन एखाद आठवडा पुढे मागे झाल्यास हरकत नाही. दिवस अगदी बरोबर आल्यास ५०% सूट मिळेल.
२. कॉन्ट्र्याक्ट् साईनिंग डेट आणी व्हिडो कॉपीराईट स्टार्ट डेट एकच असेल. तेव्हा मरणाला उशीर होऊन कॉपीराईट संपल्यास निळे आणी व्हिडो शुटिंग कंपनी कोणताही मोबदला देण्यास बांधील राहणार नाही.
३. जितके आधी कॉन्ट्र्याक्ट साईन होईल तितका दर स्वस्त असेल.
४. मरणार्याच्या मरतानाच्या रंगरुपावरून मोबदल्याचे दर ठरवले जातील. याचे सगळे हक्क निळे आणि व्हिडो शुटिंग कंपनीकडे असतील, त्यावर कोणतेही चॅलेंज स्विकारले जाणार नाही.
५. हौशे गवश्यांचे स्वागतच आहे. त्यांना व्हिडिओत चार 'शब्द अन रडणे' इतका रोलही दिला जाईल. फूटेजच्या लांबीनुसार त्याचा चार्ज वेगळा पडेल. १५ मिनिट रडणे किंवा ५ मिनिट घाय मोकलून रडणार्याला स्पेशल डिस्काउंट+जेवण+ ३ स्टार हाटेलात स्टे कंपनीतर्फे दिला जाईल.
६. हॉलिवूड मधून नट्या आणण्याची सोयही असेल, त्याचा वेगळा चार्ज पडेल. कोणती नटी आणायची याचे सर्व हक्क कंपनीकडे असतील.
७. बॉलीवूडची नटी आणून मरणाराचे तिच्याशी अनैतिक संबंध होते अशी बातमी शेवटी देऊन ट्यार्पी वाढवण्याचा ऑप्शनही दिला जाईल. हा ऑप्शन घेतल्यास विशेष सवलत देण्यात येईल. नटी कोण हे निवडायचे हक्क फक्त कंपनीकडे असतील.
८. मरणशय्येवर केलेल्या उत्तम अभिनयाची दखल घेण्यात येऊन त्यानुसार योग्य असा मोबदला वारसांना देण्यात येईल.
९. एखाद्या मरणार्या मित्रास रेकमेंड केल्यास त्याच्या मरणटेप विक्रीतून मिळालेल्या नफ्यातील २०% मरणोन्मुखास वा त्याच्या वारसांना देण्यात येतील. रेकमेंड करणार्याने ठराविक एलिजीबीलीटीची पूर्तता करणे अनिवार्य आहे.
१०. मरताना दैवी अनुभव आले असे छानश्या अभिनयाने लोकांना पटवून देण्यास मरणारा यशस्वी ठरला आणि त्यायोगे त्याच्या नावाने भविष्यात मठ/आश्रम इ. काढावयाचा असेल तर त्याचे सर्व हक्क फक्त कंपनीकडे असतील. मठ/आश्रम इ. तून मिळालेल्या नफ्याचे २०-५०%* वारसांना दिले जातील. इतर सर्व नफा कसा वापरावा याचे हक्क कंपनीकडेच असतील.
*वारसांचा कंपनीशी आणि मठ/आश्रमाप्रती असलेल्या भूमिकेवरून योग्य प्रमाण ठरवले जाईल.
ह्या प्राथमिक अटींबरोबरच संपूर्ण टर्म्स आणि कंडिशन्स वर सही केल्याशिवाय कोणतेही कंत्राट घेतले जाणार नाही. संपूर्ण टर्म्स आणि कंडिशन्स कंत्राटावर सही करतेवेळीच सादर केले जातील.
इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे, तेव्हा लागा कामाला आणि खाली प्रतिसादात टिपा लिहा.
वाचने
24241
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
www.yamaraaj.com
काय हे?
In reply to www.yamaraaj.com by चित्रगुप्त
@- हॉलिवूड मधून नट्या
यमदूताची नोकरी हवी आहे ?
In reply to @- हॉलिवूड मधून नट्या by अत्रुप्त आत्मा
यम दूताच्या नोकरीसाठी पात्र
In reply to यमदूताची नोकरी हवी आहे ? by चित्रगुप्त
हे बेस्ट आहे.
In reply to यम दूताच्या नोकरीसाठी पात्र by अत्रुप्त आत्मा
@- एवीतेवी तुम्ही
In reply to हे बेस्ट आहे. by Nile
हॅण्डसम
In reply to @- एवीतेवी तुम्ही by अत्रुप्त आत्मा
+१
In reply to हॅण्डसम by नितिन थत्ते
@- सामान्यपणे बाईला ब्यूटीफुल
In reply to +१ by रमताराम
च्यायला!
In reply to @- सामान्यपणे बाईला ब्यूटीफुल by अत्रुप्त आत्मा
@---"हॅण्डसम" नटीपेक्षा 'एक
In reply to हॅण्डसम by नितिन थत्ते
लोळालोल
In reply to यम दूताच्या नोकरीसाठी पात्र by अत्रुप्त आत्मा
यमदूताची नोकरी हवी आहे ?
In reply to @- हॉलिवूड मधून नट्या by अत्रुप्त आत्मा
शूटिंग
मनुष्य बळ
In reply to शूटिंग by राजेश घासकडवी
पोटावर पाय!
In reply to शूटिंग by राजेश घासकडवी
डागदरांना इसरलोच
In reply to पोटावर पाय! by साती
गोळ्यांनी मारले
In reply to डागदरांना इसरलोच by राजेश घासकडवी
हॅ हॅ हॅ!
In reply to गोळ्यांनी मारले by धनंजय
वा झकास आयडीया!
In reply to डागदरांना इसरलोच by राजेश घासकडवी
किती देताय?
In reply to वा झकास आयडीया! by Nile
कापायची सवयच असेल ना!
In reply to किती देताय? by साती
तीन टक्के देणारेस का रे?
In reply to कापायची सवयच असेल ना! by Nile
इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स
मी
थत्तेचाचा पक्के पालिटीसन आहेत!!
In reply to मी by नितिन थत्ते
अहो.... शूटींग जर
अहो.... शूटींग जर
अर्र, चूक झाली.
छोटं त्यामुळे छान वाटलं
In reply to अर्र, चूक झाली. by ३_१४ विक्षिप्त अदिती
गमतीदार
च्यायला... मरणाचा हसतोय मी
खी: खी: खी:
हेच म्हणतो
In reply to खी: खी: खी: by नंदन
अरेरे!
taking a dig
In reply to अरेरे! by पिवळा डांबिस
एरोनॉटीक्स इंजिनीयर आता
In reply to taking a dig by नंदन
एस डब्बल ओ आर आय!
In reply to अरेरे! by पिवळा डांबिस
व्हेकंसी?
हेच विचारणार होतो. तुला काय
In reply to व्हेकंसी? by ऋषिकेश
दोघांनीही स्किलसेट इमेलने धाडा.
In reply to हेच विचारणार होतो. तुला काय by पाषाणभेद
ऋषिकेशच प. वि. वर्तक आहे काय?
In reply to दोघांनीही स्किलसेट इमेलने धाडा. by Nile
"प. वि. वर्तक" म्हणजे जसे
In reply to ऋषिकेशच प. वि. वर्तक आहे काय? by ३_१४ विक्षिप्त अदिती
पा.भे...हा प. वि. वर्तक,
In reply to "प. वि. वर्तक" म्हणजे जसे by पाषाणभेद
आरे वा!
In reply to दोघांनीही स्किलसेट इमेलने धाडा. by Nile
आरे निळ्या
तुम्हाला कसं विसरेन मी मास्तर!!
In reply to आरे निळ्या by विनायक प्रभू
रिसेशन रिसेशन म्हणतात ते हेच का?
मित्रा फारच जबरदस्त लिहितोयस
जाम खपेल
In reply to मित्रा फारच जबरदस्त लिहितोयस by आशु जोग
आता धंदा म्हणलं की चोविस तास तोच विचार..
In reply to मित्रा फारच जबरदस्त लिहितोयस by आशु जोग
हे कसं आता नॉर्मल
In reply to आता धंदा म्हणलं की चोविस तास तोच विचार.. by Nile
३डी शुटींग ची काय सोय आहे का?