✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मरणावेळेच्या शूटिंगची सोय आणि इतर सेवा पुरवल्या जातील. अधिक माहीतीसाठी वाचा..

N
Nile यांनी
Sun, 09/11/2011 - 14:27  ·  लेख
लेख
काही लोकांनी मरणाचेवेळी त्यांचे व्हिडो शुटिंग केले जावे अशी अपेक्षा आम्हाजवळ व्यक्त केली. सदर इच्छेची दखल घेऊन आम्ही इनिशीएटीव्ह घेतलेला आहे. त्या धाग्यावर अवांतर होऊन इतर सदस्यांना भलते सलते अनुभव येऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवत आहोत. मूर्खांसाठी, गाढवांसाठी अन नीट न वाचता येणार्‍यांसाठी विशेष सूचना.( रडारडी करायच्या आधी धागा कोणत्या सदरांत आहे हे पहावे. ) वरील सर्व मरणेच्छुक लोकांना विडो शुटिंगचा लाभ देण्याची सोय आम्ही करू. (दमड्या तयार ठेवा!!) त्यासाठी मात्र काही शेड्युल/अटी बिटी आहेत ते पाळले गेलेत तर गफलती होणार नाहीत. त्यातल्या काही खाली लिहतो. १. आधी कान्ट्र्याक्ट वर मरणदिन ठरवून सही करून द्यावी लागेल. मरणाचा दीन एखाद आठवडा पुढे मागे झाल्यास हरकत नाही. दिवस अगदी बरोबर आल्यास ५०% सूट मिळेल. २. कॉन्ट्र्याक्ट् साईनिंग डेट आणी व्हिडो कॉपीराईट स्टार्ट डेट एकच असेल. तेव्हा मरणाला उशीर होऊन कॉपीराईट संपल्यास निळे आणी व्हिडो शुटिंग कंपनी कोणताही मोबदला देण्यास बांधील राहणार नाही. ३. जितके आधी कॉन्ट्र्याक्ट साईन होईल तितका दर स्वस्त असेल. ४. मरणार्‍याच्या मरतानाच्या रंगरुपावरून मोबदल्याचे दर ठरवले जातील. याचे सगळे हक्क निळे आणि व्हिडो शुटिंग कंपनीकडे असतील, त्यावर कोणतेही चॅलेंज स्विकारले जाणार नाही. ५. हौशे गवश्यांचे स्वागतच आहे. त्यांना व्हिडिओत चार 'शब्द अन रडणे' इतका रोलही दिला जाईल. फूटेजच्या लांबीनुसार त्याचा चार्ज वेगळा पडेल. १५ मिनिट रडणे किंवा ५ मिनिट घाय मोकलून रडणार्‍याला स्पेशल डिस्काउंट+जेवण+ ३ स्टार हाटेलात स्टे कंपनीतर्फे दिला जाईल. ६. हॉलिवूड मधून नट्या आणण्याची सोयही असेल, त्याचा वेगळा चार्ज पडेल. कोणती नटी आणायची याचे सर्व हक्क कंपनीकडे असतील. ७. बॉलीवूडची नटी आणून मरणाराचे तिच्याशी अनैतिक संबंध होते अशी बातमी शेवटी देऊन ट्यार्पी वाढवण्याचा ऑप्शनही दिला जाईल. हा ऑप्शन घेतल्यास विशेष सवलत देण्यात येईल. नटी कोण हे निवडायचे हक्क फक्त कंपनीकडे असतील. ८. मरणशय्येवर केलेल्या उत्तम अभिनयाची दखल घेण्यात येऊन त्यानुसार योग्य असा मोबदला वारसांना देण्यात येईल. ९. एखाद्या मरणार्‍या मित्रास रेकमेंड केल्यास त्याच्या मरणटेप विक्रीतून मिळालेल्या नफ्यातील २०% मरणोन्मुखास वा त्याच्या वारसांना देण्यात येतील. रेकमेंड करणार्‍याने ठराविक एलिजीबीलीटीची पूर्तता करणे अनिवार्य आहे. १०. मरताना दैवी अनुभव आले असे छानश्या अभिनयाने लोकांना पटवून देण्यास मरणारा यशस्वी ठरला आणि त्यायोगे त्याच्या नावाने भविष्यात मठ/आश्रम इ. काढावयाचा असेल तर त्याचे सर्व हक्क फक्त कंपनीकडे असतील. मठ/आश्रम इ. तून मिळालेल्या नफ्याचे २०-५०%* वारसांना दिले जातील. इतर सर्व नफा कसा वापरावा याचे हक्क कंपनीकडेच असतील. *वारसांचा कंपनीशी आणि मठ/आश्रमाप्रती असलेल्या भूमिकेवरून योग्य प्रमाण ठरवले जाईल. ह्या प्राथमिक अटींबरोबरच संपूर्ण टर्म्स आणि कंडिशन्स वर सही केल्याशिवाय कोणतेही कंत्राट घेतले जाणार नाही. संपूर्ण टर्म्स आणि कंडिशन्स कंत्राटावर सही करतेवेळीच सादर केले जातील. इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे, तेव्हा लागा कामाला आणि खाली प्रतिसादात टिपा लिहा.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
गुंतवणूक
धर्म
व्युत्पत्ती
जीवनमान
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
सद्भावना
शुभेच्छा
मदत

प्रतिक्रिया द्या
24171 वाचन

💬 प्रतिसाद (54)

प्रतिक्रिया

www.yamaraaj.com

चित्रगुप्त
Sun, 09/11/2011 - 15:02 नवीन
सदर शूटिंग चे वेळी ड्यूटीवर असणार्‍या आमच्या हापिसातील यमदूतांना त्यांचे कमिशन आगाऊ दिल्याशिवाय ते त्यांचे काम पूर्ण करणार नाहीत. तसेच कॉन्ट्र्याक्ट साईन करण्यापूर्वी आमच्या हापिसाकडून त्यादिवशी पुरेसे यमदूत उपलब्ध होतील की नाही, याची आगाऊ खात्री करून घेणे. यासाठी www.yamaraaj.com इथे चवकशी करावी. हॉलिवूड मधून नट्या आणल्यास, आमच्या दूतांना त्या आवडल्यास त्यांनाही उचलून आणले जाऊ शकते, याची नोंद घ्यावी.
  • Log in or register to post comments

काय हे?

Nile
Mon, 09/12/2011 - 11:35 नवीन
तुमचं आमचं 'गुप्त' डील असताना ते 'चित्र' असं पब्लिकसमोर कशाला मांडांयचं? काही कमी जास्त झालं असेल तर आपण करु की नीट. कधी बसायचं? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

@- हॉलिवूड मधून नट्या

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/11/2011 - 16:51 नवीन
@- हॉलिवूड मधून नट्या आणल्यास, आमच्या दूतांना त्या आवडल्यास त्यांनाही उचलून आणले जाऊ शकते, याची नोंद घ्यावी. .खिक्क...ह्ही ह्ही ह्हा ह्हा ह्हा :bigsmile: मला यमदूताची नोकरी हवी आहे ;-) आणी तसेही आंम्ही हॉलीवूड मध्ल्या अनेक नट्यांवर मरतोच :-p ,त्यामुळे नोकरी पूर्व म्रुत्यू ची अट घालू नये :-)
  • Log in or register to post comments

यमदूताची नोकरी हवी आहे ?

चित्रगुप्त
Sun, 09/11/2011 - 19:04 नवीन
यमदूताच्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता: शिक्षणः मार्तिक पास अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य. ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील. याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

यम दूताच्या नोकरीसाठी पात्र

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/11/2011 - 19:46 नवीन
:bigsmile: यम दूताच्या नोकरीसाठी पात्र आवश्यकता--- शिक्षणः @-मार्तिक पास :-D हा परीक्षा निकाल समजावा काय? ;-) आमचा निकाल 'जगणे फेल' असा लागलाय,चालेल का? अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). @-अन्य योनीत माणुस मारल्याचा अनुभव कसा येणार ? :puzzled: २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य...ह्ही ह्ही ह्हा ह्हा @-नक्की कोणाची व कोणती वस्तू धरावी ;-) ,याचा उलगडा होइल काय? ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. @-कुणाच्या? मरणाय्रांच्या की आमच्या? :-D आणी चोवीस ड्यूटी हे काय प्रकरण आहे,ते ही विस्तारून सांगावे... :-) इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील.@-नुसताच डेटा नेणार की आंम्हालाही? ..नेणार? ;-) याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.@- यांच बींग आमी कवाच ठोकून फोडलय...आनी तशी बी आपल्याला नाड्या सोडायची हौस नाय... :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रगुप्त

हे बेस्ट आहे.

Nile
Mon, 09/12/2011 - 11:39 नवीन
तुम्हाला यमदुताची नोकरी मिळावी अशा शुभेच्छा व्यक्त करतो. एवीतेवी तुम्ही मरणार्‍याच्या जवळपास त्याच्या मृत्युसमयी असालच तेव्हा कॅमेरामचा जॉबही यमदुतांनाच द्यावा अशी डील आम्ही चित्रगुप्तांना दिली आहे. यमदुत झाल्यानंतर मुंबईच्या मसणात कॅमेराचे ट्रेनिंग देण्यात येईल. हँडसम सॅलरी आणि महिन्याला एक नटी असा छानसा मोबदला मिळेल. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@- एवीतेवी तुम्ही

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/12/2011 - 13:56 नवीन
@- एवीतेवी तुम्ही मरणार्‍याच्या जवळपास त्याच्या मृत्युसमयी असालच तेव्हा कॅमेरामनचा जॉबही यमदुतांनाच द्यावा अशी डील आम्ही चित्रगुप्तांना दिली आहे--- ''हमकू फसाता है क्या?'' ;-) निळूभाऊ करती डाकु-डाव...डाकुडाव । २/२ सुपाय्रांना एकच-भाव एकच भाव ॥...आमाले न इचारता...डिल ठरवलं बी... ऊं ऊं ऊं...आमी नाइ ज्जा....हा काम-गारांवरचा अन्याय आहे...माझ्या सर्व काम-गार यमदूत बंधूंन्नो व --- त्यांच्या भगिनींन्नो :-D ...आज रात्री ठीक १२च्या पुढे कधीही- वैकुंठ-दहनखड्डा क्रमांक-३ ''मधेच'' आपल्यावर अन्याय करणाय्रा या भांडवलशाहांचा 'मडकी' फोडून निषेध करायचा आहे ...तेंव्हा सर्वांन्नी जमून यमदूत ऐक्य दाखवून देऊ.... काम-गारे-ग्गार चळवळीचा विजय असो :angry: @!- हँडसम सॅलरी आणि महिन्याला एक नटी असा छानसा मोबदला मिळेल. -- या ऐवजी आपण आंम्हास उभय पक्षी ;-) मान्य केलेला एक पगार मंजेच ''एक सेलरी व हेंडसम नटी :-p इतके दिलेत तरी आंम्ही मिसळला तर्री फुकट मिळाल्यासारखे आनंदाने कब्बड्डी खेळू... हीह्ह्ह्ह्हा हा हा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

हॅण्डसम

नितिन थत्ते
Mon, 09/12/2011 - 14:06 नवीन
>>'एक सेलरी व हेंडसम नटी "हॅण्डसम" नटीपेक्षा 'एक हॅण्डसम सॅलरी आणि नटी' हेच ठीक आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

+१

रमताराम
Mon, 09/12/2011 - 14:30 नवीन
फक्त 'हँड'सम (मुठीत मावणारी असा अर्थ निघू नये म्हणून) 'अट्रॅक्टिव सॅलरी' अशी दुरुस्ती सुचवतो. तसेही हँडसम नटी वाचून ह. ह. पु. वा. जोरदार 'फोरहँड' असणारी मार्टिना नवरातिलोवाच एकदम डोळ्यासमोर आली... मेलो. सामान्यपणे बाईला ब्यूटीफुल म्हणतात हो, बाप्या हँडसम असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

@- सामान्यपणे बाईला ब्यूटीफुल

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/13/2011 - 23:19 नवीन
@- सामान्यपणे बाईला ब्यूटीफुल म्हणतात हो, बाप्या हँडसम असतो... :-D ह्हा ह्हा ह्हा ह्हा ...ठ्ठार मेलो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रमताराम

च्यायला!

Nile
Tue, 09/13/2011 - 23:22 नवीन
ह्हा ह्हा ह्हा ह्हा ...ठ्ठार मेलो...
च्यायला, आम्ही व्हिडिओ शुटिंग काय सुरु केलं आता यमदुतही मरायला लागले!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@---"हॅण्डसम" नटीपेक्षा 'एक

अत्रुप्त आत्मा
Mon, 09/12/2011 - 16:49 नवीन
@---"हॅण्डसम" नटीपेक्षा 'एक हॅण्डसम सॅलरी आणि नटी' हेच ठीक आहे.---आइच्या गावात....! खरच की राव.... आमचा अनुभव कमी पडला म्हणायचा ;-) ,,,तुम्हाराच बाराब्बर हाय.''श्यालरी हेंडसम---तो नटी पचास'' :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

लोळालोल

इरसाल कार्टं
Fri, 02/10/2017 - 17:15 नवीन
हा...हा...हा.................................................
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

यमदूताची नोकरी हवी आहे ?

चित्रगुप्त
Sun, 09/11/2011 - 19:04 नवीन
यमदूताच्या नोकरीसाठी आवश्यक पात्रता: शिक्षणः मार्तिक पास अनुभवः १. कमित कमी शंभर मनुष्यांना यमसदनी पाठवण्याचा अनुभव. (हा एकाच जन्मातील असणे आवश्यक नाही, मात्र मनुष्ययोनी खेरीज अन्य योनीतील अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही). २. दीड योजन अंतरावरून अचूकपणे फास टाकून त्यात वस्तू धरता येण्याचे कौशल्य. ३. बारा महिने चोवीस ड्यूटी बजावण्याचा अनुभव (किमान पाच जन्मांचा) असणे आवश्यक. इच्छुक व्यक्तिंनी फोटो (स्वतःचे व ठारलेल्या लोकांचे) फास टाकण्याचे व्हिडो शूटिंग, तसेच पाच जन्मातील अनुभवाचे प्रमाणपत्र तयार ठेवावे. आमचे दूत स्वतः येऊन घेऊन जातील. याखेरीज आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक. नाडीसाठी बिंग कमादर ठोक यांचेशी संपर्क करावा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

शूटिंग

राजेश घासकडवी
Sun, 09/11/2011 - 17:07 नवीन
मी धाग्याचं शीर्षक वाचलं आणि उडालोच. मला वाटलं मरण्याच्या वेळी गोळ्या घालण्याची सुविधा पुरवताय की काय! व्हिडिओ शूटिंग म्हटल्यावर जरा हायसं वाटलं. बाकी धागा वाचून 'ही गोळी डोकेदुखीच्या बरोब्बर पंधरा मिनिटं आधी घेतली तर डोकं दुखत नाही' ही जाहिरात आठवली.
इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे,
मी काय म्हणतो, तुम्ही तुमचं प्याकेज वाढवलं पाहिजे. शिवाय चुकीचं डेमोग्राफिक टारगेट करताय असंही वाटतं. आता आपण अमुक दिवशी मरावं आणि त्याचं व्हिडिओ शूटिंग करून घ्यावं असं वाटणारे लोक किती? आणि त्यांच्याकडे तुम्हाला देण्यासाठी पैसे असतीलच याची खात्री काय? त्यापेक्षा नातेवाईकांकडे मार्केट करा ना. आपल्या नात्यातलं अमुकतमुक मरावं असं वाटणारे खूप असतील. बरं, त्यांच्याकडे पैसे असण्याची पण गरज नाही. विमा उतरवण्यासाठी तुम्ही त्यांना मार्गदर्शन केलं की झालं. मग बघा तुमच्याकडे क्लायंट्सचा कसा ओघ येईल ते. आणि लोकं बरोब्बर त्या दिवशी मरतील. सुपाऱ्या घेण्याचं कॉंट्रॅक्ट घ्यायला सुरूवात केलीत की तुमचं पॅकेज परिपूर्ण होईल. मरणात खरोखर जग जगते... हे वाक्य जगापुरतं लागू झालं नाही तर तुमच्यापुरतं तरी निश्चितच लागू होईल. (हा प्रतिसाद केवळ गमतीदार असून कोणी कोणाचे खून करावे अशा मताचा मी नाही. मिसळपाव व्यवस्थापन गोत्यात येऊ नये यासाठी हा खुलासा)
  • Log in or register to post comments

मनुष्य बळ

Nile
Mon, 09/12/2011 - 11:33 नवीन
मनुष्य बळाच्या कमतरतेमुळे हे पॅकेज देता येणार नाही. मात्र तुमची लोकांना मारायची एजन्सी असेल तर तुमच्याशी कोलॅबरेशन करण्यासंबंधी विचार करू.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

पोटावर पाय!

साती
Mon, 09/12/2011 - 12:57 नवीन
गुर्जी मी पण बी "मरणवेळी शुटींगची वेळ " मजी शुटींग करून मरणवेळची सोय करतात की काय असं समजले. उगाच आम्हा डॉक्टरांच्या पोटावर पाय देतात की काय निळेभाऊ असं वाटलं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

डागदरांना इसरलोच

राजेश घासकडवी
Mon, 09/12/2011 - 23:12 नवीन
गोळ्या घालून मारणे याबाबतीत डॉक्टरांचा हात कोण धरणार? :) निळेभाऊ, तुमच्या प्याकेजमध्ये डॉक्टरांनासुद्धा समाविष्ट करून घ्या. रोग्याला (किंवा निरोग्यालाही खरं तर) योग्य वेळी मरण येणं, आणि त्याआधी हॅलुसिनोजेन देऊन तोंडून चित्रविचित्र कहाण्या वदवणं, यासाठी डॉक्टर हवेच तुमच्या टीममध्ये. (समस्त डॉक्टरांनी ह. घ्या.) डॉ. राजेश घासकडवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

गोळ्यांनी मारले

धनंजय
Mon, 09/12/2011 - 23:30 नवीन
"गोळ्यांनी मारले" असे वाचून मला सन्माननीय सदस्य श्री. गोळे यांनी घेतलेले बळी (उदहरणार्थ १, आणि २) क्षणभर आठवले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

हॅ हॅ हॅ!

चतुरंग
Tue, 09/13/2011 - 02:16 नवीन
कोणाचं काय तर कोणाचं काय! धन्याशेठचा हा प्रतिसाद जाम आवडला. 'गोळे'फेक आवडली! ;) रंगगोळा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

वा झकास आयडीया!

Nile
Tue, 09/13/2011 - 02:47 नवीन
डाक्टरच्या पोटावर पाय देऊच कसे! एकाच धंद्यात असलेल्या लोकांबरोबर वैर ठेवू नये म्हणतात! ;-) बाकी गुर्जींशी सहमत आहे. योग्य डॉं भेटले तर मरणार्‍यावर अभिनयासाठी विसंबून रहावे लागणार नाही, डॉ. लोक गोळ्यावगैरे देऊन हवं तसं घडवून आणतील याची खात्रीच आहे. ट्यार्पी वाढेलच आणि कंपनीचे पैसेही वाचतील. बाकी यावरून आमच्या ग्रेगरी हाऊसचा 'केन अँड एबल' हा एपिसोड आठवला. रसिकांनी जरूर पहावा. http://www.usanetwork.com/series/house/theshow/episodeguide/episodes/s3_caneandable/index.html
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: राजेश घासकडवी

किती देताय?

साती
Tue, 09/13/2011 - 10:57 नवीन
भागीदारी मान्य. किती कट देताय? (आमाना जल्ला कटशिवाय दुसरा सुचना नाय! :) ) साते, भागिदारीत परशेंटेज मागतत कट नाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

कापायची सवयच असेल ना!

Nile
Tue, 09/13/2011 - 21:44 नवीन
(आमाना जल्ला कटशिवाय दुसरा सुचना नाय! Smile ) साते, भागिदारीत परशेंटेज मागतत कट नाय.
पेशंट्सचे गळे* कापायची सवय असल्यामुळे असेल. ;-) *हळव्या हृदयाच्या लोकांनी हा शब्द 'खिसे' असा वाचावा. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: साती

तीन टक्के देणारेस का रे?

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/14/2011 - 02:02 नवीन
तीन टक्के देणारेस का रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स

अत्रुप्त आत्मा
Sun, 09/11/2011 - 17:08 नवीन
इतर उपयुक्त मार्केटिंग टिप्स देणार्‍यास कंपनी नफ्यात हिस्सा देण्यास तयार आहे, तेव्हा लागा कामाला आणि खाली प्रतिसादात टिपा लिहा.-----अता लीहिलेले टीपा--- ;-) मरण मार्केटींग अ‍ॅड कंपनी प्रा.लिमिटेड... आमचे येथे घाऊक दरात मरणाचं मार्केटींग करणाय्रांच्या जाहिराती स्विकारल्या जातील...याच धाग्यावर भेटा अथवा लिहा- ''यमदूत'' अपार्मेंटस,प्रेतयात्रा लेन, जुन्या स्मशाना जवळ मु.पो.- वेताळवाडी,तिरडीखाना,वैकुंठ-दक्षिण.... ;-)
  • Log in or register to post comments

मी

नितिन थत्ते
Sun, 09/11/2011 - 18:27 नवीन
आपण कॉण्ट्रॅक्ट साईन करायला तयार आहोत. परंतु निळे आणि कं यांच्याशी केलेले कॉण्ट्रॅक्ट निळे आणि कं च्या वारसदारांस बंधनकारक असणार का? नाही, आमच्या आधीच निळे (किंवा 'आणि कं') खपले तर काय?
  • Log in or register to post comments

थत्तेचाचा पक्के पालिटीसन आहेत!!

Nile
Tue, 09/13/2011 - 02:49 नवीन
मारणार्‍यालाच मारणारे लोक तुम्ही! तुम्ही दलाल स्ट्रीटलाही फसवता तिथे आमची काय बात! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

अहो.... शूटींग जर

संतोषएकांडे
Sun, 09/11/2011 - 19:00 नवीन
अहो.... शूटींग जर मरणार्‍याच्या 'विडो' च ज कराच अस्ल्यास एवढा सोपस्कर कशाला...? ती 'विडो' च कय ते करेल.....
  • Log in or register to post comments

अहो.... शूटींग जर

संतोषएकांडे
Sun, 09/11/2011 - 19:07 नवीन
अहो.... शूटींग जर मरणार्‍याच्या 'विडो' च ज करायचं असेल तर एवढा सोपस्कार कशाला...? ती 'विडो' च काय ते करेल.....
  • Log in or register to post comments

अर्र, चूक झाली.

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/12/2011 - 09:38 नवीन
धागा वाचायच्या आधीच कॉण्ट्रॅक्ट द्यायला पाहिजे होतं. धागा आणि प्रतिसाद वाचून खपले.
  • Log in or register to post comments

छोटं त्यामुळे छान वाटलं

आशु जोग
Mon, 09/12/2011 - 23:59 नवीन
छोटं त्यामुळे छान वाटलं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

गमतीदार

धनंजय
Mon, 09/12/2011 - 09:44 नवीन
मस्त बिझिनेस प्लॅन
  • Log in or register to post comments

च्यायला... मरणाचा हसतोय मी

पिंगू
Mon, 09/12/2011 - 10:11 नवीन
च्यायला... मरणाचा हसतोय मी इथे. बाकी यमदूत व्ह्यायची लक्षणे आमच्यात पूरेपूर आहेत बरं का.. - पिंगू
  • Log in or register to post comments

खी: खी: खी:

नंदन
Mon, 09/12/2011 - 12:16 नवीन
चांगली स्कीम आहे. बादवे, अशीच योजना जालीय आयडींबद्दलही आहे का? काही आयडी अलीकडेच धारातीर्थी पडल्याचे समजते. (सुनीलकाका शेट्टी म्हणतात तसे पंगा ना ले)
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो

सहज
Tue, 09/13/2011 - 06:57 नवीन
पण मसंवर 'जालकंटक' आयडींना भूत म्हणून सुखाने नांदायचा अधीकार आहे पण कडक शब्दात निषेध / वेगळे मत नोंदवणार्‍या व कंपूत नसलेल्या आयडींना पुनर्जन्म नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अरेरे!

पिवळा डांबिस
Mon, 09/12/2011 - 12:17 नवीन
एक सुशिक्षित एरोनॉटिक्स इंजिनीयर मुडदेफरास झाल्याचे बघून ड्वाळे पानावले!!!!! रिसेशन रिसेशन म्हणतात ते हेच का? :)
  • Log in or register to post comments

taking a dig

नंदन
Mon, 09/12/2011 - 12:21 नवीन
तसेही निळोबा taking a dig at someone च्या कलेत प्रवीण असल्याने, त्यांनी मुडदे-फरासीकडे वळणं तसं नैसर्गिकच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

एरोनॉटीक्स इंजिनीयर आता

३_१४ विक्षिप्त अदिती
Mon, 09/12/2011 - 23:40 नवीन
एरोनॉटीक्स इंजिनीयर आता लोकांची विमानं उडवीत आहेत; हे ही नैसर्गिकच, नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

एस डब्बल ओ आर आय!

Nile
Tue, 09/13/2011 - 02:09 नवीन
एस डब्बल ओ आर आय! आमच्या क्लायंटने डोळे मिटले की आमचा कॅमेरापण बुब्बुळ मिटणार. आमचा करार तिथेच संपला. मुडद्याची जबाबदारी कंपनीची नाही!! पुढे मागे इन्शूरंस कंपनीचा कोणी क्लायंट भेटल्यास मूडद्याला काही सवलती मिळणार असतील तर चौकशी करू. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

व्हेकंसी?

ऋषिकेश
Mon, 09/12/2011 - 13:41 नवीन
तुमच्या 'आणि कं' मधे वेकंसी आहे का?
  • Log in or register to post comments

हेच विचारणार होतो. तुला काय

पाषाणभेद
Tue, 09/13/2011 - 00:58 नवीन
हेच विचारणार होतो. तुला काय निरोप आला तर सांग बाबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

दोघांनीही स्किलसेट इमेलने धाडा.

Nile
Tue, 09/13/2011 - 02:51 नवीन
धंदा बहरला तर थोडा मेलोड्रामा अ‍ॅड करता येईल. पाभेंना लिरीक्स डिपार्टमेंट अन ऋला परलौकिक अनुभवाचे स्क्रिप्ट ल्हायला घेऊ! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

ऋषिकेशच प. वि. वर्तक आहे काय?

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 09/13/2011 - 05:27 नवीन
ऋषिकेशच प. वि. वर्तक आहे काय?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

"प. वि. वर्तक" म्हणजे जसे

पाषाणभेद
Tue, 09/13/2011 - 05:40 नवीन
"प. वि. वर्तक" म्हणजे जसे शेअर मार्केट मध्ये एखादा नवीन इश्यू आला तर प्रवर्तक असतात तसली काही पोष्ट आहे काय? तसे असल्यास "प. वि. वर्तक" म्हणजे मोठा माणूस (जाड या अर्थाने नव्हे तर पद या अर्थाने) आहे. काही सेटींग असेल तर मुलाखतीविना त्या कंपनीत वर्णी लागेल काय? काये की रेसेशन सुरू झाली तर पंचाईत नको. आलेला माणूस कधीतरी जाणारच. त्याला मरण नाही. (म्हणजे माणसाच्या येण्याजाण्याला हो.) हा धंद म्हणजे केसकटिंग च्या धंद्यासारखा आहे. कापलेले केस उगवतीलच. नको ते बेभरवशाचे आयटी फियटी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

पा.भे...हा प. वि. वर्तक,

अत्रुप्त आत्मा
Tue, 09/13/2011 - 10:58 नवीन
पा.भे...हा प. वि. वर्तक, म्हणजे आजच्या काळातला स्मूक्ष्म देहाचा आद्य प्रवर्तक-तो म्हणे सूक्ष्म देहानी चंद्रावर/मंगळावर वगैरे जातो,,,तसेच भूतकाळात जाऊन आपले आधीचे जन्म वगैरे पाहुन येतो...असा म्हणे त्याच्या नावाचा दबदबा आहे,पण हाच मानव,शाम मानवांनी दिलेले -''सुक्ष्मदेहानी शेजारच्या खोलीत जा,व तिथे आंम्ही ठेवलेल्या वस्तू पाहुन या,व सांगा '' हे दिलेले साधे आव्हान नाकारतो...असला यांचा दबदबा---बदाबदा खाली पडणारा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

आरे वा!

ऋषिकेश
Tue, 09/13/2011 - 11:17 नवीन
आरे वा! लवकर धंदा तेजीत येवो म्हंजे सध्याच्या नोकरीच्या योग्य भागावर योग्य त्या पद्धतीने आघात करून आपण मढ्याच्या शुटींगसोबत त्याचे पारलौकीक अनुभव (चवीचवीने!) सांगून वर पैसे कमवायला मोकळे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Nile

आरे निळ्या

विनायक प्रभू
Mon, 09/12/2011 - 16:49 नवीन
मला विसरलास काय? माझे लिखाण वाचुन कित्येक जण धारातिर्थी पडतात.(विच्चार करुन करुन) बोल पार्टनर शिप देतोस काय?
  • Log in or register to post comments

तुम्हाला कसं विसरेन मी मास्तर!!

Nile
Tue, 09/13/2011 - 02:11 नवीन
मरणाची दिलेली डेट जवळ आली तरी क्लायंट काय हवी ती चिन्हं दाखवत नसेल तर तुमच्या समुपदेशनाचे सेशन्स ठेवायचे आमच्या प्लानात आहेच!! ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

रिसेशन रिसेशन म्हणतात ते हेच का?

मोहनराव
Mon, 09/12/2011 - 19:36 नवीन
रिसेशन रिसेशन म्हणतात ते हेच का? हि हि हि हि !!!! नविन व्यवसायाची कल्पना मस्त आहे.
  • Log in or register to post comments

मित्रा फारच जबरदस्त लिहितोयस

आशु जोग
Tue, 09/13/2011 - 00:02 नवीन
मित्रा फारच जबरदस्त लिहितोयस ! पण इथे लिहिण्याऐवजी पुस्तक का प्रसिद्ध करीत नाहीस जाम खपेल माहित्ये. (आपला हितचिंतक ) जोग
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा