सारं लुगड्यात गमावलं...
हे एक भन्नाट गाणं पूर्वी येऊन गेलं. ‘काय राव तुम्ही?’ या प्रश्नानंतर येणारी गंमत या गाण्यात आहे. संबंधित इसमाने धोतर विकण्याचा व्यवसाय (नमनालाच ‘धंदा’ हा शब्द मी वापरणार नाही!) सुरु केलेला असतो. त्यात त्याला खूप यश लाभलेले असते. मात्र एक देखण्या स्त्रीच्या म्हणण्यावरून तो लुगडी विकू लागतो आणि सर्व काही गमावून बसतो असा साधा, सरळ, सोपा आशय या शब्दांत आहे. परंतु होतं काय की गाणं गाणारा काय शब्द वापरतो, कसे उच्चार करतो अन् कोठे पॉज घेत गाण्याचा आशय ‘विषया’कडे नेतो हीच खरी ऐकणाऱ्यांची मौज होय.
गायक सहजच म्हणून जातो- ‘पण बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं!’ येथे ‘नाद’ आहे तो ‘बाई’ या शब्दाचा. म्हणजे स्त्रीचा. ती अशी तशी स्त्री नसून ‘बाई’ आहे हे ध्यानात ठेवावं लागतं. आणि लुगड्यात ’सारं’काही गमावणे ही खरी चपखल कोटी. मग ‘काय राव तुम्ही धोतराच्या धंद्यात भरपूर कमावलं, पण बाईच्या नादानं सारं लुगड्यात गमावलं.’ या मुखड्याचा खोचक आणि बोचक अर्थ उमजतो.
पुढील तीन कडव्यात तर मोक्कार मनोरंजन केलेलं आहे...
१) ‘दिलं उधार काही रोखं, गेलं लुगड्यात बिघडून डोकं, गेली सटकून गिऱ्हाईक लोकं, कुणी दहाचं देईना एक’ म्हणजेच लुगड्याच्या धंद्यात त्या इसमाचं डोकं पार भंजाळून गेलंय.. इतकं की कोणत्या स्त्रियांनी उधार नेलंय, कोणी एकही दमडी दिली नाही, कोणती स्त्री लुगडं घेऊन सटकलीय याचं भान त्याला राहिलेलं नाहीये. ‘दारावर चकरा मारुन नकरा तुम्हांला दमावलं’ म्हणजे उधारी मागायला जाऊनही नकारच मिळत गेले. उधारी मागून मागून दम लागला तरीही त्याने आपला धंदा चालूच ठेवला. कारण ‘बाईच्या नादानं’ त्याला काहीच सुचत नव्हतं.
२) ‘जे होतं ते सारं गेलं, आता एकच धोतर रहालं, तुमचं तुमीच केल्यात हाल, सारं बाईच्या लुगड्यानं केलं,’ या लुगड्याच्या धंद्यात तो सर्व काही गमावून बसला. त्याचे हाल हाल झाले. पूर्वी त्याचा (धोतराचा) व्यवसाय जोरात असे, कसा तर- ’आल्या-गेल्यांना, भल्याभल्यांना तुम्हीच नामावलं’ तरीही यातून तो काहीही शिकला नाही. ‘बाईच्या नादानं.’ सारा तोटा सहन करीत बसला.
३) ‘असा धंद्याचा त्याचा थाट, होती लोकांची रेटारेट, कुठं घालाया मिळंना बोटं, त्याला खरंच म्हणावं शेठ,’ ही ओळ म्हणणाऱ्या गायकाचं कसब पणाला लागतं. या कडव्यातील प्रत्येक शब्दाचा उच्चार कसा केल्यास कोणता अर्थ निघेल, कोणता काढायचा, ऐकणाऱ्यांना कशा गुदगुल्या करता येतील याचा विंचार गायकाने करायचा असतो. पूर्वी त्या इसमाचा धोतराचा धंदा फारच जोरात चालायचा. मोठ्या थाटात तो धोतर विकत असे. त्याच्याकडे इतकी गर्दी होई की कुठेही बोट शिरायला जागा उरत नसे, तो धोतराच्या धंद्यातला शेठ गणला जात होता. पुढच्या ओळीत वेगळाच अर्थ दडवून ठेवलेला आहे...‘झुन्जारानं लै आवडीनं गिऱ्हाईक जमावलं,’ झुंजारपणे वागून त्यानं हे गिऱ्हाईक गोळा केलं होतं..‘पण बाईच्या नादानं..’ इथे या कडव्यासाठी गायक मंडळी हमखास शब्द तोडीत ‘आवडी’ नावाच्या स्त्रीला मध्ये घेऊन भन्नाट अर्थ सांगून जायचे. त्यामुळे अख्ख्या कडव्याचा पुनर्विचार करावा लागे...!
या गाण्याचा ग्रामीण ठेका, ताल, व शब्द असे गारुड करून जात की एखाद्या इरसाल मित्राला सहजच म्हणावेसे वाटे- ‘काय राव तुम्ही..’
*************************
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
याद्या
12833
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी या गाण्याचा अर्थ वेगळाच
पुर्ण गाणे दिलेत तर संदर्भ
वरील लेखात पूर्ण गाणे आलेले
क्रमाने ते गाणे असे
सदर गाणे हे आनंद शिंदे ह्याचे आहे
"काय राव तुम्ही डॉक्टरकीत
हहाहाहा लै भारी. झुन्जार इथे
नवीन माहितीत भर पडली.
कृषी दिनाच्या निमीत्ताने झालेल्या
कोण होते बुवा हे
In reply to कृषी दिनाच्या निमीत्ताने झालेल्या by रामदास
डॉक्टरसाहेब...