Skip to main content

नीलकांत यांचा आज वाढदिवस

लेखक इंटरनेटस्नेही यांनी मंगळवार, 22/03/2011 01:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, आज आपल्या मिसळपाव या बेव साईटचे मालक श्री. नीलकांत यांचा आज (२२ मार्च) वाढदिवस आहे! सुरुवातीस मिपाची तांत्रिक बाजु भक्कमपणे सांभाळणारे नीलकांत, अनेक महिन्यांपासुन मिसळपाव.कॉम चा एवढा प्रचंड डोलारा एकहाती समर्थपणे चालवत आहेत. काळाबरोबर अतिशय वेगाने बदलत्या तांत्रिक आणि अन्य आव्हानांच्या आजच्या घडीला नीलकांत यांच्या शिवाय मिपा ही कल्पना सुद्धा करवत नाही. नीलकांत यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना हे वर्ष सुखसमाधानाचे, आनंदाचे, भरभराटीचे व आरोग्याचे जावो ही सदिच्छा तसेच त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्व बाबींमध्ये सुयश मिळावे ही शुभकामना! - शुभेच्छुक, इंट्या.

वाचने 23362
प्रतिक्रिया 97

प्रतिक्रिया

नीलकांत, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ............. मिपाची धुरा समर्थपणे सांभाळण्याची कौतुकास्पद कामगिरी करत आहात त्याबद्दल धन्यवाद .............

"नील" तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! मिपा सारख्या अनेक उत्तमत्तोम संकेतस्थळाची निर्मिती होउदे...!

माझ्या अजातशत्रु मित्राला वाढदिवसाच्या अनेकोत्तम शुभेच्छा :) (आता लोक म्हणतील आमच्यासारखे मित्र असतांना शत्रुंची का उणीव .. चालायचेच ;) )

In reply to by आनंदयात्री

म्हणणारच. अजातशत्रू होण्यामध्ये एक प्रकारची मुत्सद्देगिरी असते, असे म्हणतात ते उगाच नाही. मुत्सद्देगिरी या शब्दाला काळी छटा आहेच. तेच तुम्हाला म्हणायचे होते तर... ;) हीही पुणे-३० प्रतिक्रियाच आहे शेवटी. ;)

In reply to by श्रावण मोडक

मोठा होतोय मालक :) आपल्यासारख्या थोरामोठ्यांच्या आशिर्वादाने आम्ही मोठे होउ, शत्रू संपवुन अजातशत्रू होण्यात खरी मजा नाही का ? आणि काय आमचा नीलकांत आहेच अंमळ सावळा म्हणुन चालुन जाईल काळी छटा ;) अवांतरः "मोठा होतोय मालक" हे वाक्य पहिल्या अर्थाने घ्यावे ;-)

In reply to by आनंदयात्री

नीलकांत पोलिस आहे हो !! कदाचीत, गुन्हेगारीचे पिक वाढल्यास, ते (आळा घालणे, या अर्थाने) कापत असल्याने, त्याला शेतकरी म्हणले असावे. ;)

णिलकांत तर्फे सर्व शुभेच्छुकांचे आभार मानतो . तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा मी जातीने णिलकांत कडे पोच्त करिन . पुन्हश्च धन्यवाद . - कुरियरवाला

In reply to by टारझन

+१
गुन्हेगारीचे पिक वाढल्यास, ते (आळा घालणे, या अर्थाने) कापत असल्याने,

निलकांत, आपल्याला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. जगाच्या सगळ्या गदारोळात आपल्याला मनशांती लाभो ही "त्याला" विनंती.

नमस्कार, तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद. मिपावरच्या मित्रांनी आवर्जून दिलेल्या शुभेच्छांमुळे येत्या काळातील कठीण ( हे माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या संदर्भात आहे.) प्रसंगी माझ्या मागे शुभकामनांचे बळ उभे आहे यात शंका नाही. पुन्हा एकदा सर्वांचे आभार. - नीलकांत