आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली.
जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला. ते जम्मूत पत्रकारांशी बोलत होते.
भारतीय जनता युवा मोर्चाने 26 जानेवारी रोजी "चलो काश्मीर' ची हाक दिली असून श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात ओमर बोलत होते. "" श्रीनगरमध्ये शासकीय कार्यक्रमात अधिकृतरित्या राष्ट्रध्वज लावण्यात येणार असताना स्वतंत्र कार्यक्रमाची गरजच काय?'' असा प्रश्न ओमर यांनी उपस्थित केला. ""काश्मीरमधील परिस्थिती पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर त्यांनी तसा प्रयत्न करू नये. काश्मीर खोऱ्यात जर हिंसाचार उसळला तर त्यासाठी भाजप नेत्यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल,'' असे ओमर या वेळी म्हणाले.
ओमर यांचे वडिल आणि केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला यांनी देखील भाजपला इशारा दिला आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीसाठी भाजपने आपल्याला जबाबदार धरू नये, निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी त्यांनी ठेवावी अशा शब्दात फारूक यांनी ओमर यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाने ओमर यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे.
भारतीय जनता पक्षाने पश्चिम बंगाल ते काश्मीर खोरे अशी राष्ट्रध्वज यात्रा आयोजित केली आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने श्रीनगरच्या लाल चौकात प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवण्यात येणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
" जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून राष्ट्रध्वजाची यात्रा केवळ एकाच नाही तर अनेक राज्यांतून प्रवास करणार आहे. हिंसाचाराला खतपाणी घालण्यासाठी नाही तर देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी ती आयोजित करण्यात आली आहे,'' असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी नवी दिल्लीत सांगितले.
http://72.78.249.107/esakal/20110105/5309626091301734432.htm
(बातमी खालच्या प्रतिक्रीयासुध्दा वाचण्यासारख्या आहेत)
बातमी वाचुन मन विषण्ण झाले. मला हे वाचल्यावर समजले नाही की विरोध नक्की कशाला आहे. तिरंगा फडकवायला की भा.ज.प.ला?
हा अब्दुला पिता-पुत्रांचा पळपुटेपणा की दिल्लीश्वरांच्या (अर्थातच हाय कमांड) इशा-यावर बोलत आहेत?
बाकी हे वाचल्यावर पुन्हा एकदा सुधीर काळ्यांच्या "इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?" ची आठवण झाली.
वाचने
21250
प्रतिक्रिया
104
मिसळपाव
प्रतिक्रिया
तर्कशास्त्र बाजूला ठेवून कांहीं पावले टाकायला हवीत
In reply to उद्देश्य...! by इन्द्र्राज पवार
काळे साहेब
In reply to तर्कशास्त्र बाजूला ठेवून कांहीं पावले टाकायला हवीत by सुधीर काळे
सुधीरजी
In reply to तर्कशास्त्र बाजूला ठेवून कांहीं पावले टाकायला हवीत by सुधीर काळे
फेसबुकवर पाहण्यात आले एक भन्नाट व्यंगचीत्र
पण ओमर पिता पुत्र
भाजपला सध्या खरेतर विरोध
तिरंगा फडकाविल्याने काही
या विषयावरचे नवे कार्टुन
य. दि. फडकेलिखित "काश्मीर-स्वायत्तता कीं स्वातंत्र्य".....
उत्तरे
In reply to य. दि. फडकेलिखित "काश्मीर-स्वायत्तता कीं स्वातंत्र्य"..... by सुधीर काळे
...म्हणुन तुम्हाला विचारले इतकेच
In reply to उत्तरे by सुनील
गल्लत
In reply to ...म्हणुन तुम्हाला विचारले इतकेच by सुधीर काळे
झकास!
In reply to गल्लत by सुनील
धन्यवाद
In reply to झकास! by सुधीर काळे
मी ही असेच म्हणतो.
In reply to गल्लत by सुनील
मुलतान
In reply to मी ही असेच म्हणतो. by चिंतामणी
चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद
In reply to मुलतान by सुनील
धन्यवाद.
In reply to मुलतान by सुनील
अभिनंदन
In reply to धन्यवाद. by चिंतामणी
सिद्ध
In reply to उत्तरे by सुनील
त्याहि पेक्षा अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे
मुर्खपणा आहे हा सगळा ...
२७ जानेवारीला झेंडा फडकविण्याचा प्रयत्न कां करू नये?
तिरंग्या शी खेळणार्या
तिरंग्या शी खेळणार्या सगळ्यांना १ च शिक्षा.......
वरील प्रतिसाद डीलीट केला
+१
In reply to वरील प्रतिसाद डीलीट केला by नरेशकुमार
मी सुध्दा
In reply to +१ by नितिन थत्ते
कुणी पाकिस्तानी ध्वज फडकवल्याने काश्मीर हातचे गेले असे नाहींच!
कल्पना नाही
In reply to कुणी पाकिस्तानी ध्वज फडकवल्याने काश्मीर हातचे गेले असे नाहींच! by सुधीर काळे
कारण
In reply to कल्पना नाही by सुनील
कॉग्रेसच्या आसाममधे काय झाले हे बघा.
In reply to कारण by नितिन थत्ते
तो लाल चौकच आहे
In reply to कल्पना नाही by सुनील
आता DNA हे वृत्तपत्र वाचायला सुरुवात करायला हवी!
In reply to कल्पना नाही by सुनील
सुधीर काळे जी