Skip to main content

"तिरंगा फडकवलात तर जबाबदारी तुमची"

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 05/01/2011 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता ई-सकाळमधे बातमी वाचली. जम्मू - " प्रजासत्ताक दिनाला राजधानी श्रीनगरमध्ये तिरंगा फडकावलात तर काश्‍मीर खोऱ्यातील कोणत्याही अप्रिय घटनेची जबाबदारी तुमच्यावर राहिल,'' असा इशारा देत जम्मू आणि काश्‍मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी आज भारतीय जनता पक्षाला श्रीनगरमध्ये ध्वजवंदन न करण्याची सूचना केली आहे. प्रदीर्घ अशांततेनंतर काश्‍मीर खोऱ्यात निर्माण झालेली शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करत असल्याचा आरोपदेखील ओमर यांनी केला. ते जम्मूत पत्रकारांशी बोलत होते. भारतीय जनता युवा मोर्चाने 26 जानेवारी रोजी "चलो काश्‍मीर' ची हाक दिली असून श्रीनगरच्या लाल चौकात राष्ट्रध्वज फडकवण्यात येणार आहे. त्यासंदर्भात ओमर बोलत होते. "" श्रीनगरमध्ये शासकीय कार्यक्रमात अधिकृतरित्या राष्ट्रध्वज लावण्यात येणार असताना स्वतंत्र कार्यक्रमाची गरजच काय?'' असा प्रश्‍न ओमर यांनी उपस्थित केला. ""काश्‍मीरमधील परिस्थिती पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल तर त्यांनी तसा प्रयत्न करू नये. काश्‍मीर खोऱ्यात जर हिंसाचार उसळला तर त्यासाठी भाजप नेत्यांना व्यक्तिशः जबाबदार धरण्यात येईल,'' असे ओमर या वेळी म्हणाले. ओमर यांचे वडिल आणि केंद्रीय मंत्री फारूक अब्दुल्ला यांनी देखील भाजपला इशारा दिला आहे. काश्‍मीर खोऱ्यातील परिस्थितीसाठी भाजपने आपल्याला जबाबदार धरू नये, निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड देण्याची तयारी त्यांनी ठेवावी अशा शब्दात फारूक यांनी ओमर यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने ओमर यांचा हा आरोप फेटाळून लावला आहे. भारतीय जनता पक्षाने पश्‍चिम बंगाल ते काश्‍मीर खोरे अशी राष्ट्रध्वज यात्रा आयोजित केली आहे. देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने श्रीनगरच्या लाल चौकात प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवण्यात येणार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे. " जम्मू आणि काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून राष्ट्रध्वजाची यात्रा केवळ एकाच नाही तर अनेक राज्यांतून प्रवास करणार आहे. हिंसाचाराला खतपाणी घालण्यासाठी नाही तर देशाचे सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी ती आयोजित करण्यात आली आहे,'' असे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते अरूण जेटली यांनी नवी दिल्लीत सांगितले. http://72.78.249.107/esakal/20110105/5309626091301734432.htm (बातमी खालच्या प्रतिक्रीयासुध्दा वाचण्यासारख्या आहेत) बातमी वाचुन मन विषण्ण झाले. मला हे वाचल्यावर समजले नाही की विरोध नक्की कशाला आहे. तिरंगा फडकवायला की भा.ज.प.ला? हा अब्दुला पिता-पुत्रांचा पळपुटेपणा की दिल्लीश्वरांच्या (अर्थातच हाय कमांड) इशा-यावर बोलत आहेत? बाकी हे वाचल्यावर पुन्हा एकदा सुधीर काळ्यांच्या "इंचा-इंचाने आपण जम्मू-काश्मीरमध्ये माघार घेत आहोत?" ची आठवण झाली.

वाचने 21250
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by इन्द्र्राज पवार

इंद्रा-जी, एक परिस्थिती अशी येते कीं तर्कशास्त्र (logic) बाजूला ठेवून भावनेला प्रधान्य देऊन कांहीं पावले टाकावी लागतात. असे केले नसते तर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेच नसते. काश्मीरमध्ये भीत-भीत पावले टाकण्याचेच आपले धोरण राहिले आहे. भय सोडून ठाम पावले टाकायला आपण जितका जास्त वेळ लावू तितके आपले मूठभर फुटीरवादी शत्रू माजत जातील आणि वाढत जातील! धोका कशात नाहीं? पण धोक्याला घाबरत घाबरत कधीपर्यंत आपले हे धोरण राबवायचे? अशी ठाम पावले एकदाच टाकावी लागतात. जिंकलो तर वाद संपतो, हरलो तर मुद्दा सोडून द्यावा लागतो, पण हे सारे एकदाच करावे लागते व तसे करावे अशा विचाराचा मी आहे! (हे माझे मत कदाचित् माझ्या अज्ञानामुळेही असेल!!)

वरील बातमीच्या पार्श्वभुमीवर एक भन्नाट व्यंगचीत्र फेसबुकवर पाहण्यात आले. सदर फ्यक्तीने व्यंगचीत्र कुठुन घेतले याचा तपशील जरी माहीत नसला तरी या व्यंगचीत्राद्वारे केलेली "कॉमेंट" मात्र छान आहे.

पण ओमर पिता पुत्र राजकारणच करत नाहीत का? कायदा सुव्यव्स्था या बाबत वेळ पाहून निर्णय करता आला असता. आत्ता पासून साप साप ओरडायची काय गरज होती? पण ओमर पिता पुत्र व काँग्रेसला यात राजकारण करायचे आहे हे दिसत आहे.

भाजपला सध्या खरेतर विरोध करण्यासाठी बरेच मुद्दे आहेत. भाजप मध्ये त्या मुद्द्यांचा अभ्यास असणारी काही मम्डळी आहेत. पन सवम्ग प्रसिद्धी मिलवून लोकांच्या भावना हात घालता येतो असे त्याना वाटते. सोनियाना विरोध , त्यासाठी मुंडण करायची घोषणा वगैरे सवंगपणाच्या अनेक क्लुप्त्या वापरून झाल्या. अर्थकारणावरून , भ्रष्टाचारावरून सरकारला विरोध केला तर ते स्वतःच्याच अंगलट येते आहे असे भाजपच्या लक्षात आले असावे. स्पेक्ट्रम घोटाळ्याचे धागे थेट भाजप सरकारातील काही दिवंगत नेत्यापर्यन्त जात आहेत हे लक्षात येताच भाजप ने दुसरा मुद्दा पुढे आणला. काँग्रेस चे नेते भ्रष्टाचारी नाहेत असे नाही पण कर्नाटक मुळे भाजपचे पाय त्याच मातीचे आहेत हे स्पष्ट झाले. हेच जर मनमोहन सिम्गानी कर्नाटक सरकार भ्रष्टाचाराच्या आरोपावरून बरखास्त केले असते तर भाजपने रान माजवले असते. फारुख अब्दुलांचे सरकार इंदीरा गांधीनी जेंव्ह्या बरखास्त केले होते तेंव्हा हेच लोक फारुख ना डोक्यावर बसवत होते. भाजपचे दाखवायचे दात वेगळे आहेत कांद्याच्या किमती हा मुद्दा सरकारला अडचणीत आणू शकतो. भाजपला तो मुद्दा बीनमहत्वाचा वाटतो. स्पेक्ट्रम मुद्दा हा भाजपला बीन महत्वाचा वाटतो. बीहार मध्ये भाजपच्या आमदाराची हत्या झाली. पण आमदाराची हत्या करण्यास एक महीला का प्रवृत्त झाली याचा विचार करण्यास कोणीच भाजप चे नेते तयार नाहीत. लोकांची विस्मरण शक्ती दांडगी असते....पण भाजपला वाटते इतकी देखील नाही

तिरंगा फडकाविल्याने काही राष्ट्र मजबूत होत नाही. कुठेही असो. 'काश्मीर' मध्ये असो कि 'लाल किल्ल्यावर' कि आमच्या गल्लीत............. त्यामुळे कोणीही कुठेही तिरंगा फडकावू नये, इतकंच बिचारे बापडे सांगतायेत.(आणि सद्य सरकार ऐकून घेतंय) श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकवून भाजप काय मिळवणार आहे? आणि लाल किल्ल्यावर फडकावून देखील काय साध्य होते म्हणा ? आमच्या मते, लाल चौकात तिरंगा फडकावून काहीही साध्य होत नाही, तसेच अनुक्रमे लाल किल्ल्यावर आणि देशातील प्रत्येक शहरात, शहरातील प्रत्येक गल्लीत तिरंगा फडकावून देखील काहीच साध्य होत नाही. त्यामुळे तिरंगा कुठेच फडकवला जाऊ नये.

मिडडेमधे प्रसिध्द झाले आहे हे. (It could be Indian army vs Indian govt as the govt is planning to reduce troops in Kashmir while army doesn't agree with Govt's assessment of the situation. Midday cartoon)

(१) मी सध्या य. दि. फडकेलिखित "काश्मीर-स्वायत्तता कीं स्वातंत्र्य" हे पुस्तक वाचत आहे. त्यात शेख अब्दुल्ला यांच्यापासून ते फरूक अब्दुल्ला व आता ओमार अब्दुल्लापर्यंत अब्दुल्ला घराण्याच्या ३ पिढ्यांनी ज्या कारवाया (किंवा लीला) गेली ६० वर्षे चालवल्या आहेत-किंवा त्यांना चालवू दिल्या गेल्या आहेत असे म्हणणेच जास्त योग्य ठरेल-त्या वाचून मी अगदी धन्य-धन्य झालो! आतापर्यंत फक्त २५ टक्केच पुस्तक वाचून झाले आहे. निम्म्याहून जास्त वाचून झाल्यावर त्यावर आधारित एक धागा सुरू करायचा विचार आहे. सावधान!! (२) ही ध्वजयात्रा बंगालपासून सुरू व्हायची होती व २६ जानेवारी २०११ला श्रीनगरच्या लाल चौकात पोचायची होती व तिथे आपला तिरंगा फडकवला जाणार होता. ती एव्हाना सुरू व्हायला हवी. ती तशी सुरू झाली आहे काय? (३) फोटोतील तिरंगा ध्वज पाकिस्तानात जाळला गेला आहे याला काय आधार आहे या माझ्या प्रश्नाला अद्याप उत्तर आलेले नाहीं. (४) १४ ऑगस्टला लाल चौकात पाकिस्तानचा ध्वज फडकवला जातो ही माझी ऐकीव/वाचलेली माहिती चुकीची आहे काय हा प्रश्नही अनुत्तरित राहिला आहे. उत्तर जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.

In reply to by सुधीर काळे

१) जरूर. वाचण्यास उत्सुक. २) कल्पना नाही. ह्या बाबतीत अद्याप काही वाचले नाही. जाणून घेण्याची अर्थातच काही गरज वाटत नाही. ३) माझ्या मते, ज्यांनी हा फोटो डकवला त्यांची जबाबदारी आहे हे सिद्ध करण्याची की, हा ध्वज काश्मिरातच जाळला गेला. ४) कल्पना नाही. असल्यास सिद्ध करावे. (पहलगाम, काश्मिर येथे राष्ट्रगीत गायलेला) सुनील

In reply to by सुनील

तसे नव्हे, पण तुम्हीच तो पाकिस्तानात जाळला असे ठामपणे सांगितलेत म्हणून मला वाटले तुम्हाला खात्रीची माहिती आहे. केवळ म्हणून(च) तुम्हाला विचारले इतकेच. नसेल तर राहू द्या.....

In reply to by सुधीर काळे

नाही! ज्यांनी हा फोटो काश्मिरातील म्हणून डकवला त्यांना जर ते सिद्ध करता येत नसेल तर तो फोटो पाकिस्तानातील असे गृहित धरता येते. असो, हा फोटो बर्‍याचदा जालावर फिरला आहे आणि तो समझौता एक्स्प्रेसच्या अपघातानंतर पाकिस्तानात जाळला गेला हेदेखिल जालावरच वाचले होते. आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.

In reply to by सुधीर काळे

अजून एक कारण... उर्वरीत भारतात घडणार्‍या (विशेषतः भारतीय मुस्लिमांबाबत) घटनांवर काश्मिरी मुस्लिमांकडून फारशा प्रतिक्रिया दिल्या जात नाहीत. बाबरी-कांड असो वा गुजरात-कांड, काश्मिरमध्ये त्याबाबत उग्र प्रतिक्रिया वगैरे कधिच झाल्या नाहीत. तेव्हा समझौता प्रकरणात एवढी उग्र प्रतिक्रिया काश्मिरात होईल हेच मुळी संभवत नाही. हेच उलटदेखिल होते. भारतीय लष्कराकडून काश्मिरी मुस्लिमांवर होणार्‍या कथित्-तथाकथित अत्याचाराबाबत उर्वरीत भारतातील मुस्लिम फार प्रतिक्रिया देत नाहीत. तेव्हा असले कसलाही आगापिछा नसलेले निव्वळ भडकाऊ फोटो डकवून काय साध्य होते?

In reply to by सुनील

आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही. ज्यांनी हा फोटो पाकीस्तानातील आहे असे म्हणले त्यांना जर ते सिद्ध करता येत नसेल तर तो फोटो काश्मीरातीलच आहे असे गृहित धरता येते. सुधीर काळ्यांनी (आणि मी )डकवलेला फोटो (मी डकवलेला उडवलेला दिसत आहे) तिरंगा काश्मीरमधेच जाळला गेला हेदेखिल जालावरच वाचले होते. आता तो संदर्भ अर्थातच उपलब्ध नाही.

In reply to by चिंतामणी

सदर घटना पाकिस्तानात मुलतान येथे घडली हे दर्शविणारा पुरावा तुम्हाला व्यनिने पाठवला आहे. यापुढे फोटो डकवताना काळजी घ्यावी. आणि हो, हे शोधण्यात माझा एक तास फुकट गेला तो वसूल करायला एक बियरची सोय करून ठेवा. (ह्.घ्या)

In reply to by सुनील

सुनिल-जी, फोटोच्या मुळाबद्दलचा दुवा दिल्याबद्दल आभारी आहे. पण मी असे पाच फोटो "इंच-इंच"वर अपलोड केले होते त्यावेळी तुम्ही कांहीं लिहिले नव्हते. नाहीं तर तेंव्हाच उलगडा झाला असता. अर्थातच मला हे आधी माहीत असतं तर मी ते नक्कीच वापरले नसते! आपल्या श्रमाचा मोबदला म्हणून (तूर्तास) एक 'ब्लॅक लेबल' पाठवत आहे. स्वीकार व्हावा. पण एक गोष्ट लक्षात असू द्या कीं भडकविण्यासाठी मी कधीच लिहीत नाहीं. किंबहुना मी जेंव्हा स्वतः भडकतो तेंव्हांच लिहितो. आणि आपल्या ध्वजाचा असा अपमान आपल्याच लोकांनी केला आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर माझ्या डोक्यात सणक उठते! अशीच सणक गिलानींच्या आणि अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे आणि त्याहून जास्त आपल्या सरकारच्या गप्प बसण्यामुळे उठते. बलवान लोकांच्यापुढे गोगलगाय आणि शक्तीहीन लोकांच्यापुढे मात्र बाहू फुरफुरणार्‍यांबद्दल मला खरंच शून्य आदर आहे! या उलट कुणाही भारतीयाने पराक्रम केला तर मला तसाचा अभिमानही वाटतो. 'सिटी'चे विक्रम पंडित, 'पेप्सी'च्या इंद्रा नूयी, लूझियाना राज्याचा राज्यपाल बॉबी जिंदल आणि नुकताच ज्यांचा शपथविधी झाला त्या दक्षिण कॅरोलीनाच्या राज्यपाल नम्रता रंधवा हेली (निकी हेली). आजच्या "जकार्ता पोस्ट"मधील निकी हेली यांच्याबद्दलचे माझे हे पत्र वाचा! http://www.thejakartapost.com/news/2011/01/19/letter-nikki-haley%E2%80%… असो. चुकीची दुरुस्ती केल्याबद्दल धन्यवाद..... " " alt="" />

In reply to by सुनील

सुधीरजींच्या शब्दातच सांगतो की "आपल्या ध्वजाचा असा अपमान आपल्याच लोकांनी केला आणि त्याला जर शिक्षा झाली नाही तर माझ्या डोक्यात सणक उठते! अशीच सणक गिलानींच्या आणि अरुंधती रॉय यांच्या वक्तव्यामुळे आणि त्याहून जास्त आपल्या सरकारच्या गप्प बसण्यामुळे उठते." याच प्रमाणे ओमर अब्दुल्लांच्या वक्तव्यानेसुद्धा सणक आली. भारतातल्या इतर भागात सरकारी इमारतींबरोबरच सार्वजनीक ठिकाणीसुध्दा ध्वज फडवतात ना. मग तेथे का मनाई? किती दिवस शेपुट घालून बसायचे. कोणीतरी मान वर काढत असेल तर पाठींबा द्यायलाच हवा. मग भले श्री.राहूल गांधीनी तिरंगा फडकवावा. सुधीरजींनी ब्लॅक लेबल पाठविली आहेच. पण मी बीअर देइन.

In reply to by चिंतामणी

योग्य पुरावे - दिलदारपणे दुरुस्ती याबद्दल श्री सुधीर काळे, श्री चिंतामणी तसेच श्री सुनील यांचे हार्दीक अभिनंदन! अशी चर्चा वाचायला मजा येते.

In reply to by सुनील

४) कल्पना नाही. असल्यास सिद्ध करावे. १४ ऑगस्टचे ऐकलेले आहे. खालील छायाचित्र हे गेल्या वर्षीच्या ईदला पाकध्वज त्याच लाल चौकात उभारला गेला त्याचे आहे. http://www.tehelka.com/channels/News/2010/Sep/25/images/pakistan.jpg

त्याहि पेक्षा अत्यंत दुर्दैवी घटना म्हणजे केन्द्रिय गृहसचिवांनी (पिल्ले) काश्मीर मधील सैन्य २५ % कमी करण्याची घोषणा केली आहे आणि ते ही लष्कराला विश्वासात न घेता. लष्कर प्रमुखांनी त्यावर जाहिर असहमती व्यक्त केली आहेच पण प्रश्न पडतो १)इतका महत्वाचा निर्णय गृहसचिव कसा काय जाहिर करतात, संरक्षणमंत्री चचले का काय ? २) ते ही हा निर्णय पत्रकार परिषदेत न जाहिर करता कार्यालयाच्या बाहेर उभे राहून ? काश्मीर देउन टाकणे आता फक्त काळाचाच प्रश्न उरलेला आहे. बाकी देवुन टाकायची मानसिकता तयार झाली आहेच.

मुर्खपणा आहे हा सगळा ... सांगितलाय कोणी हा उपद्व्याप ?? भाजप काही धुतल्या तांदळाचे नाहित. जातीपातीचं आणि प्रांतवादाच राज्कारन आहे हे.

http://www.tehelka.com/channels/News/2010/Sep/25/images/pakistan.jpg या दुव्यावरील पाकिस्तानी ध्वजाचे चित्र स्पष्ट आहे पण हा चित्रात दाखविलेला भाग पाकिस्तानमधील एकादा भाग नसून श्रीनगरमधील लाल चौकच आहे याची खात्री कुणी देऊ शकेल काय? ब्लॅक लेबल पुन्हा-पुन्हा द्यायची तयारी आहे पण इतक्यांदा अशी चूक करायची मात्र इच्छा नाहीं! तरी जाणकारांनी खुलासा करावा! मगच मी पुढचा प्रश्न विचारू इच्छितो! हा लाल चौकच असल्यास १५ ऑगस्टला असो वा २६ जानेवारीला असो किंवा इदुल-फित्रला असो, त्याच लाल चौकात सरकारव्यतिरिक्त कुणीतरी पाकिस्तानचा झेंडा लावला होता. हे खरे असेल तर अशा देशद्रोह्यांविरुद्ध 'ज-का' सरकारने कांहीं कायदेशीर कारवाई केली होती कां? कीं 'महौल' बिघडू नये म्हणून आवंढा गिळून ते सरकार गप्प बसले? आज तिरंगा लाल चौकात फडकविण्याच्या मनसुब्याचे काय झाले? भाजपाच्या लोकांना अटक झाली इतके वाचले, पण तिथेच ही कहाणी संपली कां? उद्या २७ जानेवारीला झेंडा फडकविण्याचा प्रयत्न कां करू नये?

हा लाल चौक आहे कीं नाहीं? असल्यास इथे कधी तरी कुणी तरी पाकिस्तानी ध्वज फडकवलेला दिसतोय् त्याबद्दल कुणी कांही बोलणार आहे काय? अर्थात् कुणी पाकिस्तानी ध्वज फडकवल्याने काश्मीर हातचे गेले नाहीं हे माहीत झालेले आहे!

In reply to by सुधीर काळे

हा लाल चौक आहे कीं नाहीं? सदर जागा ही लाल चौकच आहे किंवा कसे, याबद्दल निश्चित ठाऊक नाही. परंतु, फोटोत टायटनची जाहिरात दिसते आहे त्यावरून सदर भाग भारतातीलच असावा, असे वाटते. असो, गुजरातेतील आणंद येथे पाकिस्तानी झेंडा सलग दोन महिने फडकत राहिला होता. तो झाडाआड असल्यामुळे दिसत नव्हता असे सांगण्यात येत होते. ह्या संदर्भात सहा जणांना अटक होऊन सुमारे दीड वर्षे लोटले आहे. त्याचे पुढे काय झाले कुणास ठाऊक आहे काय? अधिक माहिती येथे.

In reply to by सुनील

हा हा हा. मोदींच्या* गुजरातमध्ये तो बहुधा चौकात जाळण्यासाठी आणला असावा. पण तितक्यात द्वेष बाजूला ठेवून विकासाकडे लक्ष द्यायचे ठरवले गेल्यामुळे तो राहून गेला असेल. *हल्ली गुजरात ऐवजी मोदींचा गुजरात असे म्हणायची पद्धत आहे.

In reply to by सुनील

सुनिल-जी, हा प्रश्न मी तुम्हाला विचारल्यानंतर मला आणखी एक धागा कुणी दुसर्‍याने 'व्यनि'वर पाठविला. तो धागा पाहिल्यावर तो लाल चौकच आहे हे स्पष्ट झाले होते. पण ती चित्रफीत पहातांना मला गिलानीसाहेबांची आणखी एक 'लीला' दिसली. तीही माझ्या सहीत मी टाकली आहे. वेळ असल्यास जरूर उघडून पहावी. [या दोन्ही चित्रफिती मी सध्या 'सही' (signature) म्हणून वापरतो आहे.] दुसरे म्हणजे काश्मीरमध्ये पाकिस्तानचा झेंडा फडकावला हे जितके चूक आहे तितकेच आसाममध्ये किंवा गुजरातमध्ये फडकावणेही चूकच आहे. कुणी काश्मीरबद्दल लिहिले कीं लगेच अशी इतर ठिकाणची उदाहरणे देऊन त्याचे समर्थन करणे मला तरी कांहींसे विचित्र वाटते. माझ्या हातून असे झाले असेल तर ते माझेही चूकच आहे. म्हणजे एका सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप विरोधी पक्षांनी केला तर त्या सरकारने "तुम्हीही भ्रष्ट होतात" असे म्हटल्याने 'फिट्टंफाट' होत नाहीं! नेते करतात ते तर चूक आहेच, पन आपण ती संवय लावून घेता कामा नये असे मला मनापासून वातते! पहा पटतेय् का! गुजरातमध्ये त्या लोकांना पकडले तरी! इथे गिलानी तर शड्डूच मारत आहेत. अगदी दिल्लीतसुद्धा त्यांना अटक करायची कृती कां झाली नाहीं हे पहाणे माझ्या मते जास्त महत्वाचे. माझ्या सहीत गिलानींच्या एका भाषणाची चित्रफीत दिली आहे त्यातले "हम पाकिस्तानी हैं पाकिस्तान हमारा है" हे वाक्य अगदी स्पष्ट ऐकू येते! (त्या आधीचा कांहीं भाग नीट ऐकू आला नाहीं.) आपल्याकडे न्यायसंस्था चांगली आहे पण तिथे 'सारे कसे हल्लू-हल्लू' चालते. म्हणूनच सिद्धू, सलमान आणि संजय शिक्षा झाल्यावरही अनेक वर्षें 'तारखा' पडत/पाडत जामीनावर हुंदडत असतात. लोकही विसरून जातात ही दुर्दैवाची गोष्ट!

In reply to by सुनील

हे वृत्त टाइम्समध्ये आल्याचे वाचनात नाहीं. असो. आता DNA हे वृत्तपत्र वाचायला सुरुवात करायला हवी! करत आहे!!

अपेक्षाभंगाचे दु;ख वाईट असते. ;) (मी सुध्दा काला व्हिडीओ पोस्ट केला होता. पण कोणिही प्रतिक्रीया दिला नाही.) :(